कॉ समुई तुमच्या मनाला भुरळ घालणारे हे एक आगळे पर्यटन स्थळ आहे. स्थानिक लोक या बेटास नुसते समुई असेही म्हणतात. मोहून टाकणा-या या नारळाच्या बेटावर शुभ्र वाळूचे किनारे आहेत. चावेंग बीच (Chaweng Beach), लामाई बोफत (Lamai Bophut) आणि बिग बुद्धा (Big Buddha) ही कॉ समुईची काही आकर्षणे आहेत. कॉ समुई बेटावर स्क्युबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, विंड सर्फिंग, सर्फिंग, सेलिंग, वॉटर स्कीइंग,सी कयाकिंग, हाइकिंग, गोल्फ आणि टुरिंग अशा सर्व प्रकारच्या क्रीडाप्रकारांना वाव आहे. येथे तुम्ही कॉ ताव (Koh Tao) या आशियामधील टॉप डायव्हिंग डेस्टिनेशनला जाऊ शकता किंवा पौर्णिमेच्या पार्टीसाठी कॉ फंगन (Koh Phangan) येथे जाऊ शकता. येथे तुम्ही सिक्रेट बुद्धा गार्डनमध्ये जीप राइड घेऊ शकता किंवा येथील उष्ण कटिबंधीय अरण्यामध्ये एलिफंट राइड घेऊ शकता. संस्कृती आणि आकर्षणांचे बेट असणा-या कॉ समुईवर बिग बुद्धा मंदिर ते समुई झू पर्यंत सर्व प्रकारची आकर्षणे आहेत. दर वर्षी येथे १५ लाख पर्यटक भेट देतात.
१. परिचय
स्थान, विस्तार व सीमा:
स्थान: कॉ समुई हे बेट थायलंडच्या क्रा इस्थ्मसच्या पूर्व दिशेकडे साऊथ चायना सीमधील गल्फ ऑफ थायलंडमध्ये आहे.
विस्तार: कॉ समुईचे क्षेत्रफळ २२८.७ चौ. कि. मी. असून कॉ चॅग (Ko Chag) आणि फुकेतनंतर कॉ समुई हे थायलंडमधील तिसरे सर्वांत मोठे बेट आहे. कॉ समुई थायलंडच्या सुरत थानी या प्रांतात येत असून त्याची लोकसंख्या फक्त ५५,००० आहे.
इतिहास: कॉ समुई बेटांवर पंधराव्या शतकामध्ये मले द्वीपकल्पावरून आणि दक्षिण चीनमधून आलेल्या मच्छीमारांची प्रथम वस्ती झाली असावी. चिनी नकाशांमध्ये कॉ समुईचा सर्वांत जुना उल्लेख १६८७ साली पुलो कॉर्नम (Pulo Cornam) या नावाने आढळतो.
समुई नावाची व्युत्पत्ती: समुई या नावाची निश्चित व्युत्पती माहीत नाही. या बेटावर आढळणाऱ्या मुई (mui) नावाच्या वृक्षावरून किंवा मले भाषेतील सबोई (Saboey) या शब्दावरून समुई हे नाव पडले असावे. मले भाषेमध्ये सबोई (Saboey) चा अर्थ ‘सुरक्षित ठिकाण’ असा होतो. कॉचा अर्थ बेट असा आहे.
अर्थव्यवस्था: समुई बेटांची अर्थव्यवस्था मुख्यत: पर्यटन व्यवसायावर तसेच नारळ आणि रबर यांच्या निर्यातीवर अवलंबून आहे.
विसाव्या शतकापर्यंत कॉ समुईचा थायलंडच्या मुख्य भूमीशी फारसा संबंध नव्हता. १९७० सालापर्यंत बेटावर रस्तेसुद्धा नव्हते. बेटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी जंगलांनी व्यापलेल्या डोंगराळ भागामधून पूर्ण दिवस ट्रेकिंग करावे लागत असे. कॉ समुईवर आर्थिक सुधारणांमुळे समृद्धी आली असली तरी स्थानिक रहिवासी आणि स्थलांतरित यांच्यामध्ये वितुष्टही निर्माण झाले आहे.
हवामान: को समुईचे हवामान विषुववृत्तीय मॉन्सून प्रकारचे आहे. येथे आर्द्रता भरपूर आणि सरासरी तापमान २८ ﹾ सेल्सिअसच्या आसपास असते. थंडी क्वचितच आढळून येईल. येथे जागतिक दर्जाच्या डायव्हिंग साइट्स आहेत आणि डायव्हिंगसाठी आदर्श परिस्थिती मार्च ते ऑगस्टदरम्यान असते. सर्वांत जास्त तापमान मार्च आणि एप्रिलदरम्यान (सरासरी ३० ﹾ) असते. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान सर्वांत जास्त पाऊस पडतो. त्यामुळे थंड हवामान, कमी पाऊस, शांत समुद्र आणि मंद वारे, अशा सर्व अनुकूल गोष्टींसाठी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान जाणे उत्तम. को समुईचे हवामान पाहण्यासाठी http://www.kosamui.com/weather.htm हे संकेतस्थळ पाहावे.
२. प्रवास
प्रमुख शहरे /विभाग/बीचेस
चावेंग (Chaweng) बीच: चावेंग हे को समुई बेटावरील सर्वांत मोठे आणि विकसित शहर आहे. हे बेट पूर्व किनार्यावर असून बनाना बोट रायडिंग, paरासेलिंग अशा विविध करमणुकीच्या प्रकारांसाठी लोकप्रिय आहे. पायी चालण्याच्या अंतरावर येथे तुम्हाला डाइव्ह शॉप्स, सूव्हनिर शॉप्स, इंटरनेट कॅफे, प्रवासी संस्थांची कार्यालये अशा सर्व सोयी आढळतील.
लामाई बीच: येथील सुंदर किनारे, वाजवी दरातील हॉटेल्स यामुळे लामाई एके काळी बॅकपॅकर्सचे आवडते ठिकाण होते. परंतु आता हे ठिकाण दुसर्या क्रमांकावर गेले आहे. चावेंगपेक्षा हे ठिकाण थोडे निवांत आहे. परंतु अलिकडे येथेसुद्धा मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करून अलिशान रिझॉर्ट्स, कॅफे, रेस्तराँ काढली आहेत.
बोफुत: समुईच्या उत्तर किनार्यावर बोफुत गाव आहे. याचे दोन भाग पडतात. एक भाग महणजे बोफुत बीच. हा बीच बिग बुद्धा आणि मैनाम बीचच्या मध्ये पसरलेला कित्येक किलोमीटर्सचा पट्टा आहे. दुसरा भाग म्हणजे बीचच्या मध्यभागी असणारे माच्छीमारांचे खेडेगाव. येथील जुनी चिनी लाकडी शॉपहाऊसेस लक्ष वेधून घेतात. येथे मच्छीमारांच्या होड्या सतत जा-ये करताना दिसतात.
मैनाम बीच: चावेंग आणि बोफुतच्या उत्तरेकडे असणार्या या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे येथील बारीक रेती आणि येथील सुंदर नारळाची झाडे. या बीचवर सर्व प्रकारचे बजेट असणार्यांची सोय होऊ शकते. येथे तुम्हाला राहण्यासाठे पंखा असणारी साधी खोली मिळेल तसेच पंचतारांकित पूल व्हिलासुद्धा मिळेल.
को फा नान आणि को फा ताव: को फा नान हे बेट समुईच्या उत्तरेकडे आहे. येथील पौर्णिमेची पार्टी फार प्रसिद्ध आहे. को फा ताव टर्ट्ल आयलंड म्हणूनसुद्धा ओळखले जाते. दोन्ही ठिकाणे विषुववृत्तीय निसर्गसौंदर्य आणि सर्व आधुनिक सुखसोयींसाठी प्रसिद्ध आहेत.
प्रमुख विभाग/रस्ते
चावेंग वॉकिंग स्ट्रीट: हा येथील गजबजलेला रस्ता येथून घासाघीस करून सर्व प्रकारची खरेदी करण्यास चांगला. कपडे, सन ग्लासेस पासून सर्व प्रकारच्या वस्तू येथे मिळतील.
मै नाम वॉकिंग स्ट्रीट: चावेंग वॉकिंग स्ट्रीटप्रमाणेच खरेदीसाठी चांगला रस्ता.
प्रेक्षणीय स्थळे
बिग बुद्धा (बुद्धा बीच):
बिग बुद्धा हे कॉ समुईचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. कॉ समुईच्या नैऋत्य दिशेस, समुई एअरपोर्टपासून सुमारे तीन किमी अंतरावर कॉ फान (Koh Faan) या एका छोट्या खडकाळ बेटावर बिग बुद्धा मंदिर आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी मुख्य बेटापासून एक कॉजवे आहे.थाई भाषेमध्ये या मंदिरास वत फ्रा याई (Wat Phra Yai) असे म्हणतात. या मंदिरात बुद्धांची सोनेरी रंगाची १२ मीटर उंच मूर्ती असून ही मूर्ती १९७२ साली बनवण्यात आली. ही मूर्ती खूप दूरवरून दिसते. विमान आकाशात उड्डाण करताना किंवा जमिनीवर उतरताना देखील ही मूर्ती दिसते. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या उजेडामध्ये या मूर्तीची शोभा वेगळीच दिसते.
या मंदिरातील बैठ्या स्थितीतील बुद्धांची मूर्ती ‘मार’ या मुद्रेमध्ये आहे. या मुद्रेमध्ये बुद्धांनी डाव्या हाताचा पंजा डाव्या मांडीवर आकाशाकडे तोंड करून ठेवला आहे. उजवा हात मांडी घातलेल्या उजव्या गुडघ्यावर पालथा ठेवला असून त्याची बोटे जमिनीच्या दिशेने आहेत. ही मुद्रा म्हणजे बुदधांच्या आत्मज्ञानापर्यंतच्या प्रवासातील एक महत्त्वाची मुद्रा आहे. या मुद्रेमध्ये ध्यानस्थ आणि शांत राहुन बुद्धांनी ‘मार’ या राक्षसाने उत्पन्न केलेल्या मोह आणि इतर संकटांचा यशस्वीपणे प्रतिकार केला. ही मुद्रा चिकाटी, शुद्धता आणि आत्मोन्नतीचे प्रतीक आहे. बिग बुद्धा मंदिर हे केवळ पर्यटनस्थळ नसून बौद्ध धर्मीयांचे धार्मिक स्थळही आहे.
मूर्तीच्या पायथ्याशी विस्तीर्ण मोकळी जागा असून तेथे धार्मिक वस्तू, कपडे, सूव्हनिर्स वगैरेची दुकाने आहेत. येथे आणखी दोन बुदधमूर्ती आहेत. येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि उपाहारगृहेसुद्धा आहेत.
हिन ता आणि हिन याई किंवा ग्रँडमा ग्रँडपा रॉक्स (लामाई बीच):
कॉ समुईच्या दक्षिण किना-यावरील हिन ता (Hin Ta) आणि हिन याई (Hin Yai) हा अजब खडकांचा प्रकार काही वर्षांपूर्वी स्थानिक लोकांना आढळून आला आणि आता तेथील आश्चर्यांमध्ये गणला जातो. सामान्यतः कला निसर्गाचे अनुकरण करते असे मानले जाते. परंतु निसर्ग सुद्धा कलाकृती निर्माण करू शकतो, हे ग्रँड मा (Ta) आणि ग्रँड पा (Yai) या खडकांच्या उदाहरणावरून दिसून येते. लामाई (Lamai) आणि हुआ थानोन (Hua Thanon) यांच्या मध्ये असणा-या खडकाळ समुद्रकिना-यावर असणारे पुरुष आणि स्त्रीच्या जननेंद्रियांचे आकार असणारे हे खडक पाहून पाहणा-यांच्या चेह-यावर अवघडलेले स्मितहास्य उमटते.
वत Khunaram येथील ममी मंक: समुईमधील सर्वांत प्रसिद्ध भिक्खू Luang Pordaeng याच्या इच्छेप्रमाणे त्याचा मृतदेह येथे ममीच्या स्वरूपात ठेवला आहे. हा मृतदेह एका विशेष प्रकारे बनविलेल्या काचेच्या पेटीमध्ये ठेवला आहे. बरीच वर्षे उलटल्यामुळे या शवावर आता खराब होण्याच्या खुणा दिसत आहेत.
कुठे आहे : लामाई बीचच्या दक्षिणेकडे. कसे जावे: टॅक्सीने.
ना मुअंग (Na Muang) वॉटरफॉल:
समुई बेटाच्या अंतर्भागात पुष्कळ धबधबे आहेत़. यांपैकी सर्वांत लोकप्रिय धबधबा आहे ना मुअंग फॉल्स. थाई भाषेमध्ये ना मुअंगचा अर्थ आहे जांभळा. या धबधब्याचे खडक जांभळे असल्यामुळे या धबधब्यास ना मुअंग असे नाव पडले आहे. ना मुअंग फॉल्स समुई बेटाच्या दक्षिण शिखरांमध्ये असून दोन किना-यांच्या जवळ जवळ मध्यभागी आहे. फरसबंदी असलेल्या रस्त्याने हुआ थानोनला (Hua Thanon) जोडणा-या मुख्य रस्त्यापासून दूर जाऊन लामाईच्या (Lamai) दक्षिणेकडे नाथोनकडे (Nathon) जाता येते. येथे खरे़ तर दोन धबधबे आहेत. वरील बाजूस असणा-या धबधब्याकडे जाण्यास थोड्या ट्रेकिंगची, पायी जाण्याची किंवा हत्तीवरून जाण्याची आवश्यकता आहे. खालील बाजूस असणारा धबधबा ३० मीटर उंचीवर असून येथे पाणी मोठ्या खडकावरून खाली असणा-या मोठ्या तळ्यामध्ये येते. या तळ्यामध्ये लोक अंघोळ करीत असतात. धबधब्याकडे जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूस तुम्हाला सूव्हनिर्स तसेच थाई पदार्थांचे स्टॉल्स मिळतील. पार्किंग लॉटच्या दोन्ही बाजूस तुम्हाला हत्ती दिसून येतील. या हत्तींवर बसून तुम्ही इतर धबधबे पाहण्यास
समुई बेटाच्या अंतर्भागात पुष्कळ धबधबे आहेत़. यांपैकी सर्वांत लोकप्रिय धबधबा आहे ना मुअंग फॉल्स. थाई भाषेमध्ये ना मुअंगचा अर्थ आहे जांभळा. या धबधब्याचे खडक जांभळे असल्यामुळे या धबधब्यास ना मुअंग असे नाव पडले आहे. ना मुअंग फॉल्स समुई बेटाच्या दक्षिण शिखरांमध्ये असून दोन किना-यांच्या जवळ जवळ मध्यभागी आहे. फरसबंदी असलेल्या रस्त्याने हुआ थानोनला (Hua Thanon) जोडणा-या मुख्य रस्त्यापासून दूर जाऊन लामाईच्या (Lamai) दक्षिणेकडे नाथोनकडे (Nathon) जाता येते. येथे खरे़ तर दोन धबधबे आहेत. वरील बाजूस असणा-या धबधब्याकडे जाण्यास थोड्या ट्रेकिंगची, पायी जाण्याची किंवा हत्तीवरून जाण्याची आवश्यकता आहे. खालील बाजूस असणारा धबधबा ३० मीटर उंचीवर असून येथे पाणी मोठ्या खडकावरून खाली असणा-या मोठ्या तळ्यामध्ये येते. या तळ्यामध्ये लोक अंघोळ करीत असतात. धबधब्याकडे जाणा-या रस्त्याच्या दोन्ही बाजूस तुम्हाला सूव्हनिर्स तसेच थाई पदार्थांचे स्टॉल्स मिळतील. पार्किंग लॉटच्या दोन्ही बाजूस तुम्हाला हत्ती दिसून येतील. या हत्तींवर बसून तुम्ही इतर धबधबे पाहण्यास जाऊ शकता किंवा आणखी अंतर्भागात फिरू शकता.
कुठे आहे: नॅथन बीच. कसे जावे: टॅक्सीने
अंग थाँग (Ang Thong) नॅशनल मरीन पार्क:
अंग थोंग नॅशनल मरीन पार्कची स्थापना १२ नोव्हेंबर १९८० मध्ये झाली. हा जवळ जवळ ४२ बेटांचा समूह दक्षिण थायलंडच्या सेंट्रल गल्फ कोस्टमध्ये कॉ समुईच्या वायव्य दिशेस आहे. या मरीन पार्कचे एकूण क्षेत्रफळ १०२ चौ. किमी असून त्यापैकी जमिनीचे क्षेत्रफळ फक्त १८ चौ. किमी आहे. मरीन पार्कच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण बेटांची साखळी समाविष्ट होत नाही. मरीन पार्कच्या क्षेत्रामध्ये बेटांचा ८२% भाग समाविष्ट होतो. बेटांच्या बहुतेक सर्व भागामध्ये ४०० मीटर उंचीचे १० चुनखडीचे पर्वत आहेत. चुनखडीचे आकार रासायनिक प्रक्रिया आणि हवामानामुळे बदलत राहतात. त्यामुळे बेटांवर निरनिराळ्या विचित्र दिसणा-या गुहा आणि कडे तयार झाल्या आहेत.
अंग थोंग मरीन पार्कच्या हवामानावर मॉन्सूनचा प्रभाव आहे. त्यामुळे येथे पाऊस भरपूर, म्हणजे २,००० मिमी इतका पडतो. पाऊस पडतो तेव्हा फार मोठ्या लाटा उसळतात आणि वादळेही होतात. येथील तापमान साधारणत: २३ﹾ असते. त्यामुळे येथे भेट देण्यासाठी योग्य काल म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळामध्ये गल्फ ऑफ थायलंडमध्ये मोठमोठ्या लाटा उसळतात आणि वादळे होतात. त्यामुळे या काळातील प्रवास सुरक्षित नसतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान मरीन पार्कचे कार्यालय बंद ठेवतात.
स्वच्छ आणि सुंदर बीचेस असणारा हा मरीन पार्क डाइव्हिंग करणा-यांसाठी नंदनवन आहे. येथे सुमारे ४२ अरण्याच्छादित बेटे आहेत. को समुईवरून सी कॅनो किंवा सी कयाकिंग ट्रिप्स काढून या बेटांवरील अद्भुत वन्यजीवनाचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. येथील प्रचंड खडक, खडकांआड लपलेल्या गुहा, येथील लगून्स पाहणे म्हणजे वेगळाच रोमांचकारी अनुभव आहे. को वाव(Koh Wao) किंवा हिन होपोन (Hin Hoppon) स्क्युबा डाइव्हिंग आणि स्नॉर्केलिंगसाठी योग्य आहे. को मै (Ko Mae) किंवा आयलंड मदरचा टेकड्यांचा भाग चढून गेले असता टेकड़्यांच्या प्रदेशामध्ये एमरल्ड लेक नावाचे अद्भुतरम्य सरोवर पाहण्यास मिळेल.
समुई अक्वेरिअम विथ टायगर शो:अक्वेरिअम आणि झू, दोन्हीमध्ये थायलंडच्या विषुववृत्तीय वातावरणातील भूचर आणि जलचर पाहावयास मिळतील. अक्वेरिअममध्ये कॉरल फिश, प्रचंड कॅट फिश, शार्क असे जलचर पाहावयास मिळतील. अक्वेरिअमला लागूनच झू असून त्यामध्ये आग्नेय आशियातील, वाघ, पोपट, हॉर्नबिल, सागरी ससाणे, गरुड, पाणकोंबडे, असे अनेक प्रकारचे पशुपक्षी पाहावयास मिळतील.
सिक्रेट बुद्धा गार्डन किंवा वत चालोंग : हे मंदिर लुअंग फो चॅम (Luang Pho Cham) आणि लुअंग फो चुअंग (Luang Pho Chuang) या दोन भिक्खूंच्या स्मरणार्थ बांधले आहे. हे भिक्खू आपल्याकडील वन्यौषधींनी लोकांवर उपचार करीत. १८७६ साली झालेल्या खाणकामगारांच्या बंडामध्ये त्यांनी बऱ्याच खाणकामगारांवर उपचार केले होते.
ठिकाण: समुई हिल्सवर.
उपक्रम
अँग थॉंग मरीन पार्कमधील सी सफारी:
को ताव आणि नांग युआन (Nang Yuan) बेटांचा स्पीड बोटीने प्रवास:
इको सफारी:
समुई सफारी:
निशाजीवन
लेडी बॉइज कॅबरे शो:
ठिकाण: चावेंग बीच
दिवस १
कॉ समुईला आगमन.
स्थळदर्शन:- बिग बुद्धा, ग्रँडमा – ग्रँडपा रॉक्स, नामुअंग वॉटरफॉल.
नॅथन शहरास भेट देणे.
दिवस २
बोटीने अंग थॉम्ग नॅशनल मरीन पार्क आणि मै कॉ आयलंडला भेट देणे .
कॉ समुईला कसे जावे: कॉ समुईला जाण्यासाठी बँकॉकहून बँकॉक एअरवेजच्या थेट फ्लाइट्स् आहेत. बँकॉकहून विमानाने कॉ समुई तासाभराच्या अंतरावर आहे. याशिवाय कॉ समुईला जाण्यासाठी फुकेत, क्रॅबी आणि सिंगापूरहूनसुद्धा थेट फ्लाइट्स् आहेत. चिअंग माय ते कॉ समुई या विमानप्रवासास साधारणत: पावणेदोन तास लागतात.
समुई एअरपोर्ट
समुई एअरपोर्ट द्वीपाच्या उत्तर भागामध्ये बो फुत (Bo Phut) बीचच्या जवळ आहे. समुई एअरपोर्ट हा अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने बांधलेला विमानतळ आहे. या विमानतळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला लाभलेली अतिशय निसर्गरम्य पार्श्वभूमी. समुई एअरपोर्ट हा बँकॉक एअरवेजच्या खाजगी मालकीचा विमानतळ असून त्याचे व्यवस्थापन बँकॉक एअरवेजकडेच आहे. बँकॉक एअरवेज हा थायलंडमधील खाजगी मालकीचा सर्वांत मोठा कॅरिअर आहे. बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टनंतर येत्या एक दोन वर्षांमध्ये समुई एअरपोर्ट दुस-या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय हब बनवण्याची बँकॉक एअरवेजची योजना आहे.
ना मुअंग सफारी पार्क: http://namuangsafarisamui.com/
नमुअंग वॉटर फॉल्सच्या अॅक्सेस रोडने आणखी खाली आले असता नमुअंग सफारी पार्कला जाता येते. एलिफंट राइड्स, मंकी शोज ही या सफारीची काही वैशिष्ट्ये आहेत.
नाथोन टाऊन:
थायलंडच्या मुख्यभूमीवरून समुईला बोटीने आले असता बोट नाथोन या गावात येते. नाथोन टाऊन हे समुई बेटाचे प्रशासकीय केंद्र असले तरी फार पूर्वीच लोकवस्तीचे केंद्र म्हणून त्याचे महत्त्व संपुष्टात आले. त्यामुळे तुम्ही जर बोटीने येणार नसाल तर नाथोन टाऊनला येण्याचे खास काही कारण नाही. नाथोन हे समुई बेटावरील मच्छीमारांचे केंद्र आहे. येथून बेटावरील उपाहारगृहांना मासळीचा पुरवठा होतो. शहराच्या किना-यावरील धक्क्यांस या मच्छीमारांच्या बोटी बांधलेल्या असतात. सकाळच्या वेळी या बोटी जास्त दिसून येतात.
सनसेट हाऊस: नाथोन समुद्रकिना-यावर सनसेट हाऊस नावाचे रेस्तराँ आहे. या रेस्तराँमध्ये बसून संध्याकाळी सीफूडचा आस्वाद घेत सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहता येते.
नाथोन शहराच्या समुद्रकिना-यावरील धक्क्यावरून अंगथाँग (Angthong) नॅशनल मरीन पार्कला ट्रिप जातात. हे टूर ऑपरेटर्स तुम्हाला हॉटेलमधून पिक करून पुन्हा हॉटेलमध्ये सोडतात.
नाथोन शहरामधील खरेदी:
नाथोन शहर समुईचे प्रशासकीय केंद्र असल्यामुळे स्थानिक लोक स्वस्तामध्ये खरेदी करण्यासाठी येथे येतात. येथे मुख्यत: रेशमी वस्तू, पादत्राणे यांची दुकाने आहेत.
३ . परिशिष्टे
BEST LUXURY HOTELS
1. Banyan Tree, Samui, Lamai
2. Intercontinental Samui Baan Taling Ngam
3. Vana Belle a Luxury Collection Resort
BEST BOUTIQUE HOTELS
1. Zazen Boutique Resort and Spa, Bophut Beach
2. Mae Samui Beach Resort, Laem Yai Bay
3. Pavilion Samui Boutique Resort, Lamai Beach
BEST BEACH RESORTS
1. Hansar Samui Resort, Bophut Beach
2. Muang Samui Spa Resort, Chaweng Beach
3. Sareeraya Villas & Suites, Chaweng Beach
BEST FAMILY HOTELS
1. Anantara Lawana Resort & Spa, Chaweng
2. New Star Beach Resort, Chaweng Noi
3. Chaba Cabana Beach Resort & Spa, Chawang
BEST RSETAURANTS
1. Barracuda Restaurant
2. Café 69
3. The Boudoir
4. Stacked
5. Tree Tops
6. Kob Thai
7. 9Gems Lounge Rsetaurant
8. Dining on the rocks
WHERE TO GO FOR NIGHT LIFE
1. Soi Green Mango
2. Soi Reggae
3. Lamai Central Plaza
4. Ko Pha Ngan full moon party
5. Ladyboy Cabaret shows
6. Swing Bar
7. Thai Boxing (Muay Thai)
8. Q Bar
WHERE TO SHOP
1. Central Festival Samui
2. Samui Hot Club
3. Buddy Oriental Plaza. Location: Lamai Beach
4. Bophut Plaza
5. Lamai Night Plaza
6. Chaweng Fashion Shopping
को समुईपासून भेट देता येण्यासारखे आणखी काही प्रदेश
सुरत थानी (जिल्हा):
लेम साई (Laem Sai) बीच, सुरत थानी:
या बीचवर सर्वत्र वाळू आणि गोटे आढळून येतील. समुद्रातून मासे आणि लॉब्स्टर्स पकडणे हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
No comments:
Post a Comment