Tuesday, April 14, 2026

१३ . सुपारीचे बेट-पिनांग

 

१३ . सुपारीचे बेट-पिनांग

प्रख्यात मराठी साहित्यिक कै. अनंत काणेकर यांनी १९५५ साली लिहिलेल्या ‘सोनेरी उन्हांत पाचूची बेटे’ या प्रवासवर्णनामध्ये मलेशियामधील पिनांग बेटांचे सुंदर वर्णन केले आहे. पिनांगची तुलना त्यांनी कोकणाशी केली आहे. पिनांगमध्ये सुपारीची झाडे भरपूर आहेत. मले भाषेमध्ये पिनांगचा अर्थ सुपारी असा आहे. त्यामुळे या भागास पिनांग असे नाव पडले आहे. या सुपारीच्या बेटास पूर्वेचा मोती असेही म्हणतात. पूर्वी ब्रिटिश वसाहत असणार्‍या पिनांगमध्ये ब्रिटिश अस्तित्वाच्या खुणा जागोजागी दिसतात. आजचे पिनांग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असले तरी त्याने जुन्या पिनांगची वैशिष्ट्ये टिकवून धरली आहेत. पिनांग हे मलेशियातील अगदी आगळे वेगळे राज्य आहे. याचा समृद्ध इतिहास, येथील विविधतापूर्ण संस्कृती, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, वाजवी दरातील खरेदी, निसर्गसौंदर्य, प्रशस्त समुद्रकिनारे, सर्व सुखसोयींनी युक्त हॉटेल रिझॉर्टस, यांमुळे पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.  न्यूयॉर्क टाइम्सच्या वाचकांनी, २००९ मध्ये, भेट देण्यास योग्य अशा ४४ सर्वोत्तम स्थळांमध्ये पिनांगला दुस-या क्रमांकाची पसंती दिली होती.                                     

v पिनांगविषयी झटपट माहिती

 

स्थान: पेनिन्सुलर मलेशियाच्या nairuty दिशेस.  

क्षेत्रफळ: १,०४८ चौ. कि. मी.

राजधानी: जॉर्ज टाऊन 

लोकसंख्या:१६.४८ लाख (२०१३).

जाण्यास  योग्य  वेळ: मे ते ऑक्टोबर हे पावसाळ्याचे महिने सोडून कुठलेही महिने जाण्यास चांगले.

भारतीय प्रमाणवेळेशी संबंध: भारतीय प्रमाणवेळेच्या २.५ तास पुढे.

१.      परिचय

v भौगोलिक परिचय 

पिनांग हे मलेशियाचे राज्य असून याचे दोन भाग पडतात. एक भाग म्हणजे पिनांग बेट आणि दुसरा मलेशियाच्या मुख्यभूमीवर असणारा भूभाग. मलेशियाच्या मुख्यभूमीवर असणाऱ्या भूभागास सबरांग पराइ (Seberang Perai) असे म्हणतात.

सलातानची सामुद्रधुनी (Salatan Strait): पिनांग बेट आणि मुख्यभूमी पिनांग या दोन्हींच्यामध्ये सलातानची सामुद्रधुनी (Salatan Strait) आहे. या सामुद्रधुनीच्या उत्तर भागास नॉर्थ चॅनल तर दक्षिणेकडील भागास साऊथ चॅनल म्हणतात. नॉर्थ चॅनल आणि साऊथ चॅनल दोन्ही मलाक्काच्या सामुद्रधुनीस मिळतात. सलातानच्या सामुद्रधुनीमध्ये काही लहान तर काही मोठी बेटे आहेत. यांपैकी जेरेजक आयलंड हे सर्वांत मोठे बेट आहे. सलातानच्या सामुद्रधुनीवर पिनांग द्वीप आणि सबरांग पराइ यांना जोडणारे  दोन पूल आहेत.  यांपैकी पिनांग ब्रिज हा जुना पूल असून त्याची लांबी १३.५ किमी आहे.  सुलतान अब्दुल हलीम मुअज्जम शाह ब्रिज हा दुसरा पूल अलीकडे बांधण्यात आला असून त्याची लांबी २४ किमी आहे.      

सबरांग पराइ : यास प्रोव्हिन्स वेलस्ली असेही म्हणतात.

पिनांग बेट

पिनांग बेट पेनिन्सुलर मलेशियाच्या ईशान्य बाजूस मोक्याच्या ठिकाणी आहे.  पिनांग बेटाचे एकूण क्षेत्रफळ २९५ चौकिमी असून हे मलेशियातील Banggi, Bruit आणि लंगकावीनंतर चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे बेट आहे. मलेशियातील हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे बेट असून याची लोकसंख्या ६७८,००० आहे. येथे पिनांग असा उल्लेख जेथे आहे, तो पिनांग बेटाचा उल्लेख आहे. 

v पिनांगचा थोडक्यात इतिहास 

पिनांग पूर्वी कदाहच्या सल्तनतीचा भाग होते. १७८६ साली ब्रिटिशांकडून लष्करी संरक्षणाच्या बदल्यात पिनांगचा ताबा  ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या कॅप्टन फ्रॅन्सिस लाइटकडे देण्यात आला. यानंतर  चहा, मसाल्याचे पदार्थ, चायना, कापड यांचे व्यापारी बंदर म्हणून पिनांगचा विकास करण्यात आला.                

v लोकसांख्यिकी

मलय, चिनी आणि भारतीय लोकांची येथे मुख्य वस्ती असून बाबा/ न्योन्या आणि युरेशिअन लोकांचीही ब-यापैकी संख्या आहे. त्यामुळे पिनांगच्या संस्कृतीस एक वेगळीच विविधता प्राप्त झाली आहे.

बाबा-न्योन्या (Baba-Nyonya) समाज  

पंधराव्या ते सतराव्या शतकामध्ये इंडोनेशियन द्वीपसमूह आणि आणि ब्रिटिश मलायामध्ये चीनमधून ज्या लोकांनी स्थलांतर केले, त्यांचे मलाक्का, मलेशियामधील सध्याचे वंशज स्वत:ला Peranakan चायनीज किंवा बाबा-न्योन्या म्हणवून घेतात. स्त्रीला न्योन्या तर पुरुषाला बाबा म्हणतात. हे लोक पेशाने व्यापारी होते. या मूलत: चिनी लोकांनी मले आणि इंडोनेशियन समाजामध्ये आंतर्जातीय विवाह केले आणि यांची वेगळी संस्कृती निर्माण तयार झाली. कालांतराने यांतील बरेच लोक चिनी भाषा विसरले आणि मले भाषा बोलू लागले. यांस इंग्रजी भाषा चांगली येत असल्याने यांनी ब्रिटिश आणि चिनी तसेच ब्रिटिश आणि मले लोकांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावली. बाबा-न्योन्या लोकांनी आजही आपल्या संस्कृतीचा वेगळेपणा टिकवून ठेवला आहे.       

v आजचा पिनांग

१.       १.      प्रवास

v पिनांगला कधी जावे

पिनांगची हवा उष्ण आणि दमट आहे. मे ते ऑक्टोबर पावसाळा असून पावसाळ्यामध्ये पाऊस भरपूर पडतो. येथे उन्हाळाही कडक असतो. त्यामुळे डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्याचे महिने जाण्यास चांगले.  

v पिनांगला कसे जावे  

विमानाने: पिनांगमधील बायान लेपास या गावामध्ये पिनांग इंटर नॅशनल एअरपोर्ट हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पिनांगला जाण्यासाठी सिंगापूर, क्वालालंपूर, जकार्ता येथून थेट फ्लाइट्स् आहेत. क्वालालंपूर ते पिनांग हा विमानप्रवास सुमारे ५० मिनिटांचा आहे.

रस्त्याने: पिनांग बेट आणि पिनांग मुख्यभूमी पुलाने जोडलेले असल्याने रस्त्याने पिनांग मुख्यभूमीवरून थेट पिनांग बेटावर जाता येते. पिनांग मुख्यभूमीवरील बटरवर्थ येथून तुम्ही पिनांग बेटावरील जॉर्जटाऊन येथे येता.   

रेल्वेने: KTMB या मलेशियाच्या राष्ट्रीय रेल्वेचे शेवटचे स्टेशन बटरवर्थपर्यंत आहे. क्वालालंपूरहून किंवा कदाहमधून ट्रेनने बटरवर्थपर्यंत येऊन पुढे फेरीने किंवा रस्त्याने पिनांगला यावे लागेल.   

जलमार्गाने: बटरवर्थ ते जॉर्जटाऊन  अशी नियमित फेरी सेवा आहे. या फेरीच्या प्रवासास पंधरा मिनिटे लागतात.

 

v पिनांगमधील अंतर्गत प्रवास कसा करावा

पिनांगमध्ये सार्वजनिक बस सेवा चांगली आहे. त्यामुळे तुम्ही बसने प्रवास करू शकता. पिनांगमध्ये रेल्वेचा पर्याय नाही. इतर पर्यायांमध्ये कार टॅक्सी, मोटर बाइक टॅक्सी, कार किंवा  मोटर बाइक भाड्याने घेणे हे पर्याय आहेत. टॅक्सी ड्रायव्हर मीटर टाकण्यास तयार नसतात. त्यांना मीटर टाकण्यास भाग पाडावे. कधी मीटरशिवाय जाण्याची वेळ आली तर प्रवासभाड्यासाठी घासाघीस करावी. येथे माणसे पेडल मारून चालवतात अशा सायकल रिक्षा आहेत. त्यांना येथे ट्राइशॉ म्हणतात.  

v पिनांगमध्ये कोठे राहावे

पिनांगमधील जास्तीत जास्त प्रेक्षणीय स्थळे पिनांगची राजधानी जॉर्जटाऊनमध्ये आहेत. जॉर्जटाऊनहून तुम्ही पिनांगमधील कुठल्याही ठिकाणी सहज जाऊ शकता. शिवाय तुम्ही पिनांग मुख्यभूमीवरीलही प्रेक्षणीय स्थळे पाहून आपल्या पिनांग भेटीचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकता. त्यामुळे जॉर्जटाऊनमध्ये राहणे चांगले.   

v पिनांगमधील सिम कार्ड आणि टेलिफोन 

मलेशियामध्ये सेल्कॉम, डिजी आणि मॅक्सिस हे तीन मुख्य सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. प्रीपेड सिम कार्ड्स सर्वत्र, विशेषत: मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये हमखास मिळतात. पिनांगमध्ये लँडलाइनवर फोन लावायचा झाल्यास ०४ आणि सात आकडी दूरध्वनी क्रमांक फिरवावा लागतो. मोबाईलवर फोन लावायचा प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरचा वेगळा क्रमांक व सात आकडी दूरध्वनी क्रमांक फिरवावा लागतो.    

 

 

 

 

 

 

     जॉर्जटाऊन

पिनांग बेटाच्या ईशान्य टोकाशी जॉर्ज टाऊन हे शहर असून ते पिनांगची राजधानी आहे. जॉर्जटाऊन हे पिनांगचे प्रशासन आणि पिनांगमधील व्यापार यांचे केंद्र आहे. येथे नव्या आणि जुन्याचा सुंदर संगम झालेला आढळतो. त्यामुळे येथे नव्या तसेच जुन्या प्रकारच्या वास्तू पुष्कळ  आढळतील. जॉर्जटाऊनला मलेशियाची खाद्यराजधानी म्हणतात. याला कारण मुख्यत: येथील रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ. जॉर्ज टाऊन या  पिनांगच्या ऐतिहासिक राजधानीच्या  शहराची येथील आगळ्या वेगळ्या वास्तू आणि शहराची वैशिष्ट्यपूर्ण रचनायांमुळे ७ जुलै २००८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये नोंद झाली.  जॉर्ज टाऊन या शहराचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स याच्या नावावरून ठेवले आहे. हाच प्रिन्स ऑफ वेल्स पुढे पंचम जॉर्ज झाला. जॉर्जटाऊन शहरास फार जुना आणि प्रसिद्ध इतिहास आहे. येथे १२,००० हून अधिक युद्धपूर्व चिनी शॉपहाऊसेस शिल्लक आहेत. कॉंप्लेक्स तुन अब्दुल बिन रझाकची (KOMTAR) गगनचुंबी इमारत जॉर्जटाऊनच्या आकाशरेषेवर उठून दिसते. पिनांगमधील सर्वांत जास्त प्रेक्षणीय स्थळे जॉर्जटाऊनमध्येच आहेत.      

पिनांगमधील ऐतिहासिक/वारसास्थळ वास्तूंचा दौरा    

 

पिनांगमध्ये सुमारे १७१ वर्षे ब्रिटिश अंमल होता. याशिवाय येथे चिनी, भारतीय, इस्लामी संस्कृती एकत्र नांदत आहेत. या साऱ्या संस्कृतींच्या संगमाची साक्ष देणार्‍या वास्तू पिनांगमध्ये अजूनही उभ्या आहेत. या वास्तू पाहताना तुम्ही भूतकाळात हरवून जाल, एका वेगळ्याच जगात जाल. अर्ध्या दिवसाचा दौरा करून या वास्तू तुम्ही पाहून घेऊ  शकता. या वास्तू एकत्र पाहण्याचा फायदा असा की या वास्तू पाहताना तुमची एक लिंक लागेल. अशा काही वास्तूंची येथे माहिती दिली आहे.     

 

·        क्वीन व्हिक्टोरिया मेमोरिअल क्लॉक टॉवर 

Location: At the intersection of Light Street, Beach Street (Lebuh Pantai) and King Edward’s Place (Persiaran King Edward). Address: Lebuh Light, Pulau Pinang, Malaysia

क्वीन व्हिक्टोरिया मेमोरिअल क्लॉक टॉवरची स्थापना १८९७ साली Cheah Chen Eok या स्थानिक लक्षाधीश व्यक्तीने केली. राणी व्हिक्टोरिया राणीच्या हीरक महोत्सवानिमित्त त्याने हा साठ फूट उंचीचा हा क्लॉक टॉवर बांधला. यातील प्रत्येक उंचीचा प्रत्येक फूट राणीच्या एक एक वर्षाच्या राजवटीचे प्रतीक आहे.  या टॉवरच्या बाबतीत आणखी एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती म्हणजे दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बॉंबवर्षावाचा परिणाम म्हणून हा टॉवर इटलीतील पिसाच्या झुकत्या मनोऱ्याप्रमाणे हा टॉवर एका बाजूस थोडा कललेला आहे. दुर्दैवाने व्हिक्टोरिया राणी पिनांगला कधीच येऊ शकली नाही आणि या टॉवरचे बांधकाम पूर्ण होण्याच्या आताच मरण पावली.   

क्वीन व्हिक्टोरिया मेमोरिअल क्लॉक टॉवरच्या बाजूस ४८ मीटर उंचीचे धातूचे पिनांगचे प्रतीक असणार्‍या सुपारीच्या आकाराचे शिल्प आहे. हे शिल्प अलीकडे बांधण्यात आले आहे.      

·        सेंट जॉर्जेस चर्च 

Address: Lebuh Farquhar, Pulau Pinang, Malaysia

पिनांग स्टेट म्युझिअम अँड आर्ट गॅलरीच्या जवळच सेंट जॉर्जेस चर्च हा मलेशियातील सर्वांत जुना अँग्लिकन चर्च आहे. या चर्चचे बांधकाम १८१८ साली पिनांग वसाहतीतील धर्मोपदेशक रेव्ह. रॉबर्ट स्पार्क हचिंग्ज यांच्या पुढाकाराने झाले. या बांधकामासाठी प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचा वापर केला. या चर्चचे बांधकाम बहुतांश ग्रीक पद्धतीचे आहे. या चर्चच्या वास्तूचे डिझाइन कॅप्टन रॉबर्ट स्मिथ या  लष्करी अभियंत्याने बनविले. चर्चचा आतील भाग सुखद अशा पेस्टल निळ्या रंगात रंगवला असून जमीन संगमरवरी फरशीचे आहे. चर्चच्या आवारातच ग्रीक मंदिराच्या स्वरूपात सर फ्रॅन्सिसचे स्मारक आहे. हे स्मारक १८८६ साली पिनांगच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त बांधण्यात आले. याच रस्त्याने पुढे आले की दोन स्पायर्स असलेले कथीड्रल ऑफ अझम्शन आहे.   

·        पिनांग म्युझिअम अँड आर्ट गॅलरी  www.penangmuseum.gov.my/

Address: Lebuh Farquhar, Pulau Pinang, Malaysia. Location: On the junction of Lebuh Farquhar and Lebuh Light.

१८२१ साली स्थापन झालेले हे म्युझिअम देशातील सर्वोत्कृष्ट म्युझिअमपैकी एक आहे. या म्युझिअममध्ये अनेक प्रकारच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तूंचा संग्रह आहे. या म्युझिअमचे ढोबळ मानाने कायम स्वरूपी आणि तात्पुरते असे दोन भाग पाडता येतील. कायमस्वरूपी भागामध्ये पिनांगमधील ऐतिहासिक वसाहती, पिनांगमधील ऐतिहासिक घटना यांच्याशी संबंधित दालने आहेत. या म्युझिअममध्ये बाबा-न्योन्या पद्धतीचे पोर्सिलेन, फर्निचर, जडजवाहीर, पोशाख, त्याचप्रमाणे कॅप्टन रॉबर्ट स्मिथने काढलेली आठ तैलचित्रे यांचा समावेश आहे.        

या म्युझिअमच्या पूर्व दिशेस असणारे इंग्रजी पब्लिक स्कूल १८१६ साली स्थापन झालेले असून पूर्वी या म्युझिअमच्या इमारतीत भरत असे. 

Heritage Buildings

1.        Fort Cornwallis:-Light Street.

2.        State Assembly Building:-Light Street.

3.        Cathedral of the Assumption:-3, Farquhar Street.

4.        Hainan Temple:-Muntri Street.

5.        Guan Yin Temple:-Masjid Kapitan Keling Road.

6.        King Street Temples:-30-40, King Street.

7.        Shri Mahamariamman Temple:-Queen Street.

8.        Nagore Shrine:-King Street and Chulia Street junction.

9.        Kapitan Keling Mosque:-Masjid Kapitan Keling Road.

10.      Lebuh Acheh Mosque:-Acheh Street.

11.      Syed Alatas mansion:-128, Armenian Street.

12.      Dr. Sun Yet Sen’s Pinang Base.

13.      Yap Kongsi:-Armenian Street.

14.      Khoo Kongsi:-18, Cannon Square.

15.      Chea Kongsi:-8, Armenian Street.

16.      The Penang Perenakan Mansion:-29, Church Street.

·        वॉर मेमोरिअल 

Address: Jalan Padang Kota Lama, 10200 Pulau Pinang, Malaysia. Location: At the intersection of Jalan Tun Syed Sheh Barakbah and Jalan Padang Kota Lama.

पहिल्या महायुद्धामध्ये २८ ऑक्टोबर १९१४ या दिवशी जर्मन युद्धनौका एम्डेनने (Emden) या ठिकाणी रशियन युद्धनौका झेम्चुगवर  (Zemchug) गनिमी काव्याने हल्ला केला.  झेम्चुगवरील जे खलाशी मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ येथे स्मारक बांधण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात हे स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर याची पुनर्बांधणी करण्यात आली. समुद्रकिनारी असणारे सध्याचे युद्धस्मारक म्हणजे कुंपणामध्ये बंदिस्त असणारा दगडी स्तंभ आहे. या स्मारकावर पहिल्या महायुद्धापासून निरनिराळ्या युद्धांमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांचा उल्लेख आहे.       ·        सिटी हॉल 

 Address: Jalan Tun Syed Sheh Barakbah, 10200 Georgetown, Pulau Pinang, Malaysia

सिटी हॉल या दुमजली इमारतीमध्ये पिनांग बेटाच्या म्युनिसिपल कौन्सिलचे कार्य चालते. १९५७ साली जॉर्ज टाऊनला सिटीचा दर्जा मिळाल्यामुळे या इमारतीस सिटी हॉल म्हटले जाऊ लागले. ही इमारत १९०३ साली बांधण्यात आली असून इमारतीचे बांधकाम एड्वर्डिअन बरोक (Edwardian Baroque) पद्धतीचे आहे. अँटिक्विटीज अॅक्ट १९७६ अन्वये या इमारतीस १९८२ पासून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे.  

·        स्टेट असेंब्ली बिल्डिंग (Malay:Dewan Undangan Negeri)

Address: Lebuh Light, Pulau Pinang, Malaysia. Location: Located between Light Street and Farquhar Street near Fort Cornwallis.

पिनांग स्टेट असेंब्ली बिल्डिंगचे बांधकाम १९व्या शतकामध्ये झाले आणि १८७४ साली या इमारतीचे नवीकरण करण्यात आले. ही इमारत पूर्वी सेंट्रल पोलीस स्टेशनचा भाग होती आणि येथे रेकॉर्डर्स आणि मॅजिस्ट्रेट्स् कोर्ट्स् होती. येथे आता पिनांगच्या विधानसभेचे कामकाज चालते. ही इमारत सामान्य लोकांस भेट देण्यास खुली नसते.  

·        कथीड्रल ऑफ द अझम्शन 

Address: Jalan Love Lane, Pulau Pinang, Malaysia. Location: Close to the Penang State Museum & Art Gallery.

हा  चर्च १७८६ साली कॅप्टन फ्रॅन्सिस लाइटने बांधला असून पिनांगमधील हा सर्वांत जुना चर्च आहे. या चर्चचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश आहे. या चर्चमध्ये दोन बेल टॉवर्स असून या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाइप ऑर्गन असलेला हा पिनांगमधील एकमेव चर्च आहे. माता मेरीच्या अझम्शनच्या भोजनावरून याचे नाव कथीड्रल ऑफ अझम्शन ठेवले आहे. १९५५ मध्ये व्हॅटिकनने या चर्चला कथीड्रलचा दर्जा दिला. 

अझम्शन: प्रभू येशूची  माता मेरी हिने आपले जीवितकार्य पूर्ण केल्यानंतर सदेह स्वर्गारोहण केले. या घटनेस ख्रिस्ती धर्मामध्ये, विशेषतः कॅथलिक पंथामध्ये अझम्शन म्हणतात.         

कथीड्रल: हा विशिष्ट प्रकारचा चर्च असून यामध्ये बिशपचे पद असते. 

·        कुआन यिन (Kuan Yin) टेंपल   

Location: Jalan Masjid Kapitan Keling

कुआन यिन टेंपल हे पिनांगमधील सर्वांत जुने मंदिर आहे. १७२८ साली चीनमधून आलेल्या आरंभीच्या स्थलांतरितांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर चिनी दयेची देवता कुआन यिन हिच्या सन्मानार्थ बांधले आहे. हे मंदिर मा चोर पो (Ma Chor Poh) या खलाश्यांचे श्रद्धास्थान असणार्‍या संतासही समर्पित आहे.

मंदिरामध्ये दगडी स्तंभांभोवती, छतावर आणि छताच्या कडांवर सिरॅमिक्सच्या ड्रॅगनच्या शिल्पाकृती आहेत. मुख्य गाभार्‍यामध्ये असंख्य हात असलेल्या कुआन यिनची सुंदर मूर्ती आहे. छताला लाल रंगाचे चिनी दिवे लटकत आहेत.   

·        कुआन यिन:

कुआन यिन ही देवता आपल्या पूर्वजन्मामध्ये भारतामध्ये अवलोकितेश्वर भगवान (बुद्धांचे पूर्वजन्मातील एक रूप) म्हणून अवतरली होती . अवलोकितेश्वर लोकांची दु:खे दूर करीत. ही दु:खे दूर करता करता या दु:खांनी विदीर्ण झाले आणि पुढील जन्मात कुआन यिन या स्त्रीरूपात अवतरले. स्त्रीरूपात असल्यामुळे ते लोकांची दु:खे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागले. लोकांची दु:खे दूर करण्यासाठी कुआन यिनने हजारो हात धारण केले आणि दु:खे पाहता यावी म्हणून हातांवरही डोळे धारण केले. मुलगी नको असणाऱ्या तिच्या पित्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने त्यांना क्षमा करून त्यांचा उद्धार केला. कुआन यिन निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या नावांनी ओळखली जाते. कुआन यिन विशेष करून स्त्रियांची रक्षणकर्ती आहे. इच्छुक  स्त्रियांना तिच्या कृपेमुळे  पुत्रप्राप्ती  होते. खलाशी, व्यापारी आणि कैदीसुद्धा आपले रक्षण व्हावे म्हणून कुआन यिनला भजतात.          

·        थिअन हौ कॉंग (Thean Hou Kong) किंवा हैनान (Hainan) टेंपल 

Address: Lebuh Muntri, Pulau Pinang, Malaysia

 

या चिनी मंदिराची स्थापना १८६६ साली झाली आणि १८९५ साली हे मंदिर पूर्ण बांधून झाले. १९९५ मध्ये या मंदिराच्या शताब्दीनिमित्त येथे चिनी कारागीर आणून मंदिरातील दगडी कोरीव काम करण्यात आले. याचे बांधकाम हैनानी वास्तुकलेच्या पद्धतीचे असून सुंग घराण्याच्या शैलीतील दगडावरील कोरीवकाम येथे आहे. हे मंदिर खलाश्यांची देवता मा चोर पोला समर्पित आहे. मा चोर पोला मझ्यू (Mazu) असेही म्हणतात. हे मंदिर सिंगापूरमधील थिअन हॉक केंग (Thian Hock Keng) टेंपलसारखे आहे. चीनच्या हैनान प्रांतातील लोक या मंदिरात आपल्या देवतेबद्दल श्रद्धा दाखवण्यासाठी येतात.     

·        महामरिअम्मन टेंपल  

Address: Lebuh Queen, Pulau Pinang, Malaysia

हे मंदिर १८३३ साली बांधण्यात आले असून पिनांगमधील सर्वांत जुने हिंदू मंदिर आहे. हे मंदिर कुणी बांधले याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही. प्रवेशद्वारापाशी २३.५ फूट उंचीचे विविध शिल्पाकृती असलेले गोपुर आहे. मंदिराचा मुख्य कळस २७.२५ फूट उंचीचा असून त्याचा ३.५ फूट उंचीचा कळस सोन्याने मढविला आहे. मुख्य गाभाऱ्यात मरीआई किंवा महामरिअम्मन देवीची मूर्ती असून मंदिरात गणपती, मुरुगन किंवा कार्तिकेय, अशा बऱ्याच देवतांच्या मूर्ती आहेत.       

·        फोर्ट कॉर्नवॉलिस 

Location: 4 kms north-east of George Town. Address: Jalan Tun Syed Sheh Barakbah, 10200 George Town, Pulau Pinang, Malaysia.

 

फोर्ट कॉर्नवॉलिस हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पिनांग बेटाच्या ईशान्य किनार्‍यावर बांधलेला स्टार फोर्ट आहे. अठराव्या शतकातील बंगालचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसचे नाव या किल्ल्यास दिले आहे. उभ्या असलेल्या किल्ल्यांपैकी फोर्ट कॉर्नवॉलिस हा सर्वांत मोठा किल्ला आहे. या किल्ल्याच्या संपूर्ण इतिहासामध्ये या किल्ल्याचा युद्धाशी कधीही संबंध आला नाही.     

·        खू काँगसी (Khoo Kongsi) टेंपल

Distance from Georgetown:2.6 km East. Address: 18, Cannon Square, 10450 Pulau Pinang, Malaysia. Visiting hours: 9:00 am - 5:00 pm

 

जॉर्ज टाऊन शहरातील गल्ली बोळ  आणि युद्धपू्र्व काळातील जुनी घरे असलेल्या कॅनन स्क्वेअर या जुन्या भागामध्ये खू काँगसी टेंपल आहे. खू काँगसी टेंपल ही वास्तू म्हणजे खू या चिनी घराण्याचे निवासस्थान आहे.  खू घराण्याचे मूळ  चीनच्या होकिअन प्रांतामध्ये असून या घराण्याची सतराव्या शतकामध्ये मलाक्कामधील श्रीमंत व्यापा-यांमध्ये गणना होत होती.या वास्तूचे बांधकाम अतिशय भव्य आणि सुबक असून ही वास्तू म्हणजे पिनांगमधील प्रबळ  चिनी अस्तित्वाचे प्रतीक आहे.   मलेशियातील घराण्याशी संबंधित वास्तूंमध्ये ही वास्तू  सर्वांत मोठी असून शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. खू काँगसी टेंपलमध्ये मुख्य वास्तूशिवाय आणखी एक वास्तू, एक पारंपरिक रंगभवन आणि घराण्यातील व्यक्तींना राहण्यासाठी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बांधलेली घरे यांचा समावेश होतो.  मध्यभागी ग्रॅनाइटची फरसबंदी असलेला चौक आहे. 

 

या वास्तुसंकुलामध्ये एक भव्य सभागृह असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम केलेले आहे. तसेच येथील तुळया उत्कृष्ट लाकडाच्या असून चिनी कारागिरांनी त्यांवर आपल्या कलाकुसरीचा ठसा उमटवला आहे. संकुलामध्ये काँगसी घराण्याच्या कुलदेवतांच्या प्रतिमा आहेत. चांद्रमासाच्या सप्तमीला येथील रंगभवनामध्ये चिनी संगीत नाटकांचे प्रयोग होतात. जॉर्ज टाऊनमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ  म्हणून जाहीर केलेल्या भागामध्ये हे संकुल असल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

·        बाटिक फॅक्टरी पिनांग 

Location: 11.6 kms northwest of Georgetown. Address: 11050 651 Teluk Bahang Balik Pulau Balik Pulau Pulau Pinang, 11000, Malaysia.

बाटिक उत्पादन हा मलेशियाच्या प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. १९७३ साली स्थापन झालेली बाटिक फॅक्टरी पिनांग म्हणजे बाटिक उत्पादनातील ख-या अर्थाने कुटीरोद्योग आहे. या फॅक्टरीमध्ये हाताने बनविलेल्या बाटिकच्या सुंदर कलाकृती पाहावयास मिळतील. यामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत. एक, म्हणजे हाताने केलेले बाटिक. यामध्ये पानाफुलांची  नक्षी जास्त आढळून येते. दुस-या प्रकारामध्ये हातानेच परंतु ब्लॉकच्या सहायाने छपाई केली जाते. यामध्ये अमूर्त चित्रे जास्त आढळतात. या कलाकृतींमध्ये कंपनीच्या बोधचिन्हाचाही वापर केला जातो. या फॅक्टरीने आजवर मलेशियातील हॉटेल्स, रिझॉर्ट्स्, कंपन्या आणि इतर संस्थांना कलाकृती पुरविल्या आहेत. बहुतेक बसेस येथे थांबा घेतात, म्हणजे पर्यटकांना बाटिकची प्रक्रिया पाहावयास मिळते आणि खरेदीही करता येते.

·        तांजुंग बुंगा (Tanjung Bungah) बीच 

Distance: 9.6  kms north-west of George Town.

जॉर्जटाऊनच्या किनारी भागापासून बसने वीस मिनिटांच्या अंतरावर समुद्रकिनार्‍यावर तांजुंग बुंगा हे उपनगर आहे. एके काळचे मासेमारीचे खेडेगाव आता पिनांगमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ झाले आहे.   गर्नी ड्राइव्ह आणि बातू फेरिंघी दोन्हींच्या जवळ असल्याने येथे पर्यटकांची वर्दळ भरपूर असते. हे ठिकाण हा बीच जॉर्जटाऊन आणि गर्नी ड्राइव्हच्या जवळच आहे. परंतु हा बीच बातू फेरिंघी बीचएवढा प्रसिद्ध नाही. त्यामुळे बातू फेरिंघी बीच पाहावयास वेळ  मिळावा म्हणून बहुतेक लोक या बीचला येणे टाळतात. परंतु कमी वर्दळीचा बीच हवा असेल तर हा बीच चांगला आहे.

A twenty-minute bus ride from Georgetown’s outskirts, Tanjung Bungah is a seaside suburb that was once a

sleepy fishing village. It’s risen in popularity in recent years to become one of Penang’s most popular tourist

destinations due to its close proximity to both Gurney Drive and Batu Ferringhi. Though the beaches here

are not as pristine as those out further west, they’re still pleasant and hotels here are shipshape ventures

and generally offer much cheaper rates. The Penang Water Sports Centre is based here.

·        बातू फेरिंघी बीच

Distance: 15 kms north-west of George Town.

बातू फेरिंघी हे किना-यावरील छोटे खेडेगाव आहे.  बातू फेरिंघीचा अर्थ आहे 'परदेशी लोकांचा खडक'. येथील बीच पिनांगमधील मुख्य बीच आहे. हा बीच म्हणजे तीन किमी लांबीचा पांढर्‍या वाळूचा मोठा पट्टा असून येथील किनार्‍यावर सर्वत्र पाम आणि कॅस्युआरिनाची झाडे आहेत. या बीचवर पूर्वी हिप्पी लोकांचा वावर जास्त असे. आता येथे पॅकेज टुरिस्ट्स्  ची विशेषत: मध्यपूर्वेकडील पर्यटकांची वर्दळ असते. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे नितळ नाही. तरीसुद्धा हा बीच लोकप्रिय आहे.

 

या भागामध्ये पुष्कळ  आंतरराष्ट्रीय हॉटेल्स, दुकाने आणि फिरण्यासाठी भरपूर मोकळी जागा आहे. त्यामुळे पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. या बीचचे नाइट मार्केटसुद्धा प्रसिद्ध असून येथील खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. 

येथून जवळच तेलुक बहांग नावाचा भरपूर वाळू असलेला आणखी एक बीच आहे. शिवाय जवळच्या एखाद्या मळ्यास भेट देऊन ताज्या विषुववृत्तीय फळांचा आस्वाद घेऊ शकता.

 

§  गर्नी Drive

 

Location: 3.6kms north of George Town.

जॉर्जटाऊनपासून काही मिनिटांच्या अंतरावरच गर्नी एस्प्लनेड स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे पोहचण्यासाठी दाट रहदारीतून मार्ग काढत येणे हे एक मोठे काम आहे. गर्नी ड्राइव्हच्या समोर समुद्र असून येथे उंची घरे तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. येथील हॉकर सेंटरमध्ये मले, पाश्चिमात्य असे सर्व प्रकारचे पदार्थ मिळतील. येथील लाक्सा विशेष प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या बाजूस स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम चालू असतात. येथे तुम्हाला शॉपिंग मॉल्स, बार्स, हॉटेल्स, रेस्तराँ असे सर्व काही मिळेल. 

·        पिनांग बॉटनिक गार्डन्स/वॉटरफॉल गार्डन्स:(Malay: Taman Kebun Bunga)

Location: 6.3 kms north west of George Town. Address: 10470 George Town, Penang, Malaysia.

हे उद्यान ‘अँफिथिएटर ऑफ हिल्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लसलशित पर्जन्यजनित अरण्यांनी आच्छादित अशा दरीमध्ये वसले आहे. उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ २९ हेक्टर्स आहे. जवळच असलेल्या धबधब्यामुळे यास ‘वॉटरफॉल गार्डन्स’ असेही म्हणतात. या उद्यानाची स्थापना १८८४ साली एका जुन्या दगडाच्या खाणीमध्ये करण्यात आली. या उद्यानाचे उद्दिष्ट उद्यानांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा, वनस्पतींचा संग्रह, नैसर्गिक भूमी आणि पानाफुलांची विविधता यांची माहिती करून देणे हा आहे. येथे वनस्पतिशास्त्र, taxonomy, horticulture and आणि भूनियोजन (landscaping) यांविषयी व्यावसायिक सल्ला दिला जातो. येथे जॉगिंग, फिरणे, जंगल ट्रेकिंग आणि एरोबिक्स यांची सोय आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण झाडांमध्ये कॅनन बॉल ट्री, मोठ्या पारंब्या असणारा  Sengkuang ट्री, पिनांग पाम म्हणजे सुपारीचे झाड, ब्लॅक लिली, कँड्ल् ट्री, स्लिपर ऑर्किड अशा अनेक झाडांचा समावेश होतो.     

बायान लेपास (Bayan Lepas)

 

Location: Distance 17.9 kms south west of George Town

बायान लेपासमधील प्रमुख आकर्षणे:-

१. क्वीन्स बे:- हा पिनांगमधील सर्वांत मोठा शॉपिंग मॉल आहे. 

२. वॉर म्युझिअम:-

 ३. बुकित जांबुल ऑर्किड:-

४. हिबिस्कस गार्डन:-

४. स्नेक टेंपल:-जिवंत साप असलेले अनोखे मंदिर.

·        पिनांग इंटरनॅशनल एअरपोर्ट

पिनांग इंटरनॅशनल एअरपोर्ट बायान लेपास गावामध्येच आहे.

·        स्नेक टेंपल

Address: Jalan Sultan Azlan Shah, 11900 Bayan Lepas, Pulau Pinang, Malaysia

 

स्नेक टेंपल या मंदिराचे  वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे व्हाइपर जातीचे जिवंत साप. हे  मंदिर बायान लेपास (Bayan Lepas) या छोट्या गावामध्ये आहे. या मंदिरात साप असण्यापाठी एक दंतकथा आहे.

 

सन १८०० मध्ये चीनमधून एक महंत पिनांगला आला. त्याच्याकडे चेंग-स्वी चोर-सू (Cheng-Swee Chor-Soo) किंवा चोर सू काँग (Chor Soo Kong) या प्रसिद्ध देवतेची मूर्ती होती. हा महंत लोकांच्या आजारांवर उपचार करीत असे आणि हे सारे या देवतेच्या कृपेने होते असे तो लोकांस सांगत असे. त्याने जंगलातील सापांना आश्रय दिला होता.१८७३ साली या महंताने डेव्हिड ब्राऊन या ग्लुगॉर इस्टेटीचा मालक असणा-या ब्रिटिश गृहस्थाच्या आजारपणाचा इलाज केला. आपल्याला बरे करणा-या देवतेप्रति कृतज्ञता म्हणून डेव्हिडने या देवतेचे मंदिर बांधण्यासाठी भूखंड दिला. या भूखंडावर हे मंदिर बांधण्यात आले.

मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा आजूबाजूच्या जंगलातून बरेचसे साप तेथे अद्भुत रीतीने अवतरले आणि मंदिरात शिरले. हा शुभशकुन आहे असे जाणून महंताने सापांना मंदिरातील सभागृहात आश्रय दिला. एवढेच नव्हे तर त्या सापांचे प्रजननही होऊ दिले.

वाढत्या शहरीकरणामुळे सध्या येथील सापांची संख्या बरीच कमी झाली आहे. तरीसुद्धा येथील पवित्र वेदीच्या टेबलांवर तुम्हाला बरेच साप वेटोळी घालून पहुडलेले दिसतील. तुम्ही धीट असाल तर त्यांना हात लावू शकता. येथे दरवळणा-या धुपाच्या वासामुळे हे साप सुस्त पडून असतात. त्यामुळे त्यांच्यापासून धोका नाही असे समजले जाते. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून या सापांचे विष काढून घेतले आहे.

या मंदिराचे बांधकाम सामान्यत: दक्षिण चीनमध्ये आढळून येणा-या बांधकामांसारखे आहे. मंदिराचे छत रंगविलेल्या पोर्सिलेनपासून बनविलेल्या शिल्पकृतींनी सजविले आहे. अशा शिल्पकृती बनवण्याच्या तंत्रज्ञानास च्येन न्येन (Chien Nien) असे म्हणतात. यामध्ये शिल्पकृती अगोदर बनवून घेऊन त्या नंतर हव्या त्या ठिकाणी बसविल्या जातात

मंदिराच्या मुख्य सभागृहामध्ये चीनमधील मांचुरिअन राजघराण्याच्या काळातील, सुमारे १८८६ सालातील ६०० पौंड वजनाची घंटा आहे. चिनी दिनदर्शिकेप्रमाणे महिन्याच्या पहिल्या आणि पंधराव्या दिवशी ही घंटा वाजवून स्वर्गातील तसेच नरकातील रहिवाश्यांना प्रार्थनेसाठी आमंत्रित केले जाते.

जेरेजक (Jerejak) आयलंड

 

Location: 10.6 kms south of George Town

 

शांत पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू  ही जेरेजक आयलंडची वैशिष्ट्ये आहेत. पिनांगच्या किना-यापासून दहा मिनिटांच्या अंतरावर हे मलेशियाचे अल्काट्राझ आहे. या बेटांवरील इमारतींचा एके काळी स्थलांतरितांसाठी आरोग्य तपासणी केंद्र आणि क्षयरोगाचे इस्पितळ  म्हणून होत असे. 

सेबेरंग प्राय (Seberang Prai)

 

Location: 5.0 kms south east of Butterworth

 

पिनांग ब्रिजच्या सुरुवातीला मलेशियाच्या मुख्यभूमीवर सेबेरंग प्राय आणि त्याचे बटरवर्थ हे शहर लागेल. बटरवर्थ हे पिनांगला जाण्यासाठी मुख्य बंदर आहे. येथून तुम्ही पिनांग बर्ड पार्कला भेट देऊ शकता. या बर्ड पार्कमध्ये सुमारे ३०० जातींचे पक्षी पाहावयास मिळतील. येथील दुसरे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे बुकित मर्तजम रिक्रिएशनल फॉरेस्ट. बुकित तांबुन (Tambun) हे छोटे खेडेगाव असून येथे भरपूर सीफूड रेस्तराँ आहेत. 

 

  बटरवर्थ

बटरवर्थ हे छोटे शहर जॉर्जटाऊन किंवा पिनांगचे प्रवेशद्वार आहे. The town impresses for its nguid vibe despite the multitude of travellers passing through its streets to get to the ferry terminal. दोन्हीच्या मध्ये नॉर्थ चॅनल ही खाडी आहे. बटरवर्थमधील पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे पिनांग बर्ड पार्क. हे सुमारे पाच एकर क्षेत्रफळ मध्ये पसरलेले पार्क असून येथे आग्नेय आशियामधील सुमारे ३०० जातींचे पक्षी आहेत. १२ लाख रिंगी खर्च करून बांधलेल्या या पार्कमध्ये दोन मोठी पक्षिघरे आहेत. त्याचप्रमाणे येथील वैशिष्ट्य म्हणजे घुमटाकार दोन पक्ष्यांची निवासस्थाने. यांमध्ये पक्ष्यांच्या मूळ  अधिवासाची निर्मिती केली आहे. येथे पेलिकन, फ्लेमिंगो, हंस, करकोचे, चिनी बिदके असे पुष्कळ  जातींचे पक्षी बागडताना दिसतील.  

·        द नाइन एंपरर गॉड्स् टेंपल 

Address: On Lot 894 & 896, Mukim 14, Jalan Raja Uda, 12300 Butterworth, Penang, Malaysia

Opening Hours: Daily, including Sundays and Public Holidays: 7 am to 9 pm

हे बटरवर्थमधील फारसे प्रसिद्ध नसलेले परंतु भेट देण्यासारखे मंदिर आहे. या मंदिरास Rooma Berhal Tow Boo Kong असेही म्हणतात. मंदिरामधील कोरीवकाम केलेले पॅगोडा, सोनेरी ड्रॅगनच्या मूर्ती असलेले सुंदर छत पाहण्यासारखे आहे.   

 

v पिनांगमधील नमुना प्रवासकार्यक्रम

Ø पिनांग एअरपोर्टच्या जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे

तुम्ही पिनांग एअरपोर्टवर ट्रांझिटमध्ये असाल किंवा कुठल्याही कारणाने तुम्हाला एअरपोर्टच्या जवळची ठिकाणे पाहावयाची असतील तर एअरपोर्ट बायान लेपास गावात असल्यामुळे बायान लेपासमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून घ्यावी.

Ø पिनांगमधील एक दिवसाचा प्रवासकार्याक्रम    

पिनांगला आगमन.

पाहावयाची ठिकाणे:-स्नेक टेंपल, बाटिक फॅक्टरी, जॉर्ज टाऊन, कॉर्नवॉलिस किल्ला, खू कॉँगसी (Khoo Kongsi) टेंपल, बॉटनिकल गार्डन, बातू  फेरींघी बीच एरिया.

ट्रायशॉने चक्कर मारणे.  

Ø पिनांगचा हॉप ऑन हॉप ऑफ बस दौरा

पिनांगचा  हॉप ऑन हॉप ऑफ बस दौरा तुम्ही www.myhoponhopoff.pg या संकेतस्थळावरून बुक करू शकता. यामध्ये दोन मार्ग आहेत.१. सिटी रूट आणि २. बीच रूट. दोन्ही मार्गावर कुठली ठिकाणे दाखविली जातात ते खाली दिले आहे:-

सिटी रूट:-From Persiaran Gurney → JalanBaganJermal → Jalan Gottlieb → JalanKebunTeh → JalanUtama → Jalan Macalister → JalanResidensi →Jalan Scotland → Jalan Air Hitam → Jalan Bukit Bendera → Jalan Ayer Hitam →JalanDatoKeramat → Jalan Penang → Jalan Transfer → Jalan Sri Bahari → JalanDr Lim Chwee Leong →LebuhCarnavon → Jalan Kg Kolam → LebuhChulia → Pengkalan Weld → JalanTun Syed Barakbah → Lebuh Light → Jalan Masjid KapitanKeling → Lebuh Farquhar → Jalan Sultan Ahmad Shah → JalanLarut → Jalan Burma → JalanPangkor → JalanKelawai → JalanPemenang and back to Persiaran Gurney.

बीच रूट :- From Persiaran Gurney → Jalan Tanjong Tokong → Lebuhraya Gelugor →Jalan Tanjong Buhgah → Jalan Batu Ferrenghi → Hassan Abas → Jalan Sultan Ahmad Shah → Jalan Larut → Jalan Hutton → Jalan Penang → Jalan Burma → Jalan Pemenang and back to Persiaran Gurney.

उपयुक्त संकेतस्थळे  

 http://www.penang.ws/penang-attractions/kuan-yin-temple.htm

www.penang-traveltips.com




                                                      











China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...