सुलभ श्रीमद्भगवद्गीता
Sharing knowledge, experiences etc. on all subjects such as travel, literature, spiritualism
सुलभ श्रीमद्भगवद्गीता
Sanjal bhabhi’s unique hobby
Back in Christmas 2022, my cousin Sushil from Sydney, was like, "Hey bro, wanna check out Melbourne?" And we were like, "Why not?" We've been in Sydney for more than a decade, but not had a chance to visit Melbourne, so it sounded fun. Sushil, his wife Madhavi, my wife Varsha and I, started early morning.
Sushil, being the driving enthusiast he is, took the wheel all the way, blasting Rafi's tunes on his phone the whole ride. We rolled into Melbourne by evening.
"We're gonna crash at my buddy Kishen Bhai's place," Sushil told us.
I asked Sushil,' Are you sure they will be cool with us, we are strangers to them? "
"Don't sweat it, or I wouldn't have invited you," Sushil reassured.
Turns out, Kishen Bhai and his wife Sanjal were the nicest hosts ever. They really made us feel at home. Sanjal bhabhi cooked delicious dishes.
Kishan bhai and Sanjal bhabhi
The next day, we planned a beach trip, but poor Madhavi felt sick halfway, so we had to return. It was scorching hot that day, unlike the cold December back in India.
We were having a chat, when Sanjal bhabhi showed us the video of her son Karan's wedding. In the video, I was surprised to see bhabhi reading out a poem on Karan which showed all the excellence of craftsmanship.
I asked, ' Whose poem is this?' I was more surprised when bhabhi told me that she had comppsed the poem.
Then bhabhi opened her file and showed us more poems penned by her on loose leaves.And believe me, there was one poem written on Kishan Bhai himself.
I said, "Kishan Bhai, you're lucky to have someone write a poem about you, especially your wife." Kishen Bhai was all smiles.
Turns out, whenever there's a gathering or a get-together, friends ask Sanjal bhabhi to whip up a poem for the occasion. Sanjal bhabhi readily takes up the challenge with pleasure. She is not particular about the sophisticated language but uses day-to-day language , a mixture of English and Hindi, with amusing rhymings. That makes her poems appealing to the crowd and wins applause accompanied with laughter of satisfied acceptance of the observations in the poems. Her poems shows close observation of the qualities of friends and certainly you need generous heart to appreciate them. Will not a man be pleased if his cooking skill is appreciated by someone?
I thought, if a poet were asked to write a poem, he would select heroes from the history, most probably. But who makes a simple man feel like a hero , highlighting the qualities, perhaps not known to him as well. That makes Sanjal bhabhi's hobby a unique one, doesn't it?
I told bhabhi, "Good thing we skipped the beach, or I'd never know about this cool talent of yours."
Coming to know that I'm into languages, a little bit, so now sometimes bhabhi sends me her poems for some fine-tuning, I just do a little touch up, I confess, as I hate to meddle with the essence of any spontaneous art work.
Last year, when Karan's mother-in-law passed away, bhabhi composed another beautiful poem to read out the funeral. It really captured the essence of who Raji was. Read the poem and you will understand yourselves.
Raji, a person of rare stature:
The memorable event in Karan-Divya’s life was staged ,
On the day, they both got engaged,
When we met Raji, a person with the rare stature,
With the cool, calm and sweet nature.
She was ready to help others with no expectation,
Busy with the social work, her passion,
She was intelligent and artistic,
Who did her work which was filled with a magic.
On the seashore, she loved walking,
Speechless, as if meditating.
Thus was the life, smooth and steady,
But suddenly a cloud made it shady.
Nobody had expected what befell,
When suddenly Raji bade us farewell,
The God gave her a short life, unfortunately,
And we are all standing at a turn of life, so tricky.
Raji’s memories will never part,
We will always nurture them in our heart.
Paddy, Divya, Manju, do not feel alone,
We are always there, just grab a phone.
I felt, Raji's soul must have been happy at her heavenly abode to find someone appreciate her qualities.
So, what do you guys think of Sanjal' bhabhi's hobby? Pretty unique, huh? Bhabhi takes so much pains to write down a poem, would you take pains writing your opinion about the hobby?
संजलवहिनींचा आगळा छंद
२०२२ च्या ख्रिस्मसमध्ये माझ्या मावस भावाने, सुशीलने त्यांचा मेल्बर्नला जाण्याचा बेत सांगितला आणि आम्हाला येण्याबद्दल विचारले. आम्ही याआधी मेल्बर्नला गेलो नसल्याने आम्हीसुद्धा येण्याचे कबूल केले.
सुशील, त्याची पत्नी माधवी, मी आणि माझी पत्नी वर्षा, असे आम्ही चौघे जण मेल्बर्नला पोहचलो.
मेल्बर्नला सुशीलचे मित्र किशन भट्टी आणि त्यांची पत्नी संजल यांची भेट झाली. किशन भाई आणि संजलवहिनी अतिशय प्रेमळ दांपत्य. संजलवहिनी मराठी परंतु किशनभाई काश्मीरी. माझी व वर्षाची त्यांच्याशी पूर्वीची ओळख नसतानाही ते आमच्याशी अतिशय प्रेमाने वागले. त्यांनी आम्हा सर्वांचे खूप चांगले आदरातिथ्य केले.
किशनभाई आणि संजलवहिनी
दुसऱ्या दिवशी आमचा मेल्बर्नमध्ये बीचवर जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे मी, वर्षा, सुशील, माधवी आणि संजलवहिनी, असे पाच जण निघालो. परंतु माधवीची अर्ध्या रस्त्यात तब्येत बिघडल्याने आम्हाला परत यावे लागले.
भारतामध्ये डिसेंबर थंडीचा , परंतु ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याचा महिना. त्या दिवशी खूपच कडक ऊन होतं.
आम्ही घरीच गप्पा मारत बसलो. मग संजलवहिनींनी मुलाच्या, करणच्या, लग्नाचा व्हिडिओ दाखवला.
त्या वेळी लग्नाच्या व्हिडिओमध्ये संजलवहिनी इंग्रजीमध्ये कविता म्हणताना दिसल्या. मी कवितेची तारीफ केली. त्या वेळी त्यांनी सांगितलं की ही कविता त्यांनी स्वतः मुलावर लिहिली आहे.
मग त्यांनी फाइल उघडून त्यांनी लिहिलेल्या आणखी कविता दाखवल्या. त्यांच्या कविता हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामध्ये हिंदीत एक कविता किशनभाईंवरही आहे. मी किशनभाईंना म्हटलं, 'आप बहुत लकी हो, कि तुमपर किसी ने कविता लिखी है, और वोभी तुम्हारे बीबीने.' किशन भाई साहजिक हसले.
कुणाच्या घरी वाढदिवस किंवा कुठला समारंभ असला, की संजलवहिनींचा छंद माहीत असणारे लोक त्यांना कविता बनवण्यास सांगतात. संजलवहिनीसुद्धा आह्वान स्वीकारून प्रसंगानुरूप छानदार कविता बनवतात. ज्या व्यक्तीवर कविता लिहिली, त्यांच्या गुणविशेषांचे सूक्ष्म निरीक्षण, सर्वांना समजणारी संभाषणातील हिंदी आणि इंग्रजी अशी संमिश्र भाषा आणि चटपटीत यमकांची योजना यांमुळे त्यांच्या कविता समारंभात सर्वांची वाहवा मिळवतात.
मला या आगळ्या छंदाचं खूप कौतुक वाटलं. म्हटलं, 'बरं झालं आपला बीचवर जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. नाहीतर तुमचा हा छंद मला समजलाच नसता.'
मलासुद्धा भाषेची थोडीफार आवड आहे हे कळल्यावर आता कविता लिहिली की इंडिपेंडंट ओपिनियनसाठी संजलवहिनी कविता माझ्याकडे पाठवतात. मी कवितेचा मूळ आशय बदलणार नाही, यांची काळजी घेत थोडे शब्द इथेतिथे करतो.
गेल्या वर्षी दिव्याच्या, संजलवहिनींच्या सुनेच्या आईस , म्हणजे संजलवहिनींच्या विहीणीस देवाज्ञा झाली. त्या वेळी संजलवहिनींनी लिहिलेली कविता खाली दिली आहे-
Raji, a person of rare stature:
The memorable event in Karan-Divya’s life was staged ,
On the day, they both got engaged,
When we met Raji, a person with the rare stature,
With the cool, calm and sweet nature.
She was ready to help others with no expectation,
Busy with the social work, her passion,
She was intelligent and artistic,
Who did her work which was filled with a magic.
On the seashore, she loved walking,
Speechless, as if meditating.
Thus was the life, smooth and steady,
But suddenly a cloud made it shady.
Nobody had expected what befell,
When suddenly Raji bade us farewell,
The God gave her a short life, unfortunately,
And we are all standing at a turn of life, so tricky.
Raji’s memories will never part,
We will always nurture them in our heart.
Paddy, Divya, Manju, do not feel alone,
We are always there, just grab a phone.
या कवितेवरून संजलवहिनींनी विहिणीच्या गुणविशेषांचं निरीक्षण आणि मनापासून केलेलं कौतुक दिसून येतं. संजलवहिनींच्या विहिणीचा आत्मा हे कौतुक ऐकून समाधान पावला असेल असं मला वाटलं.
मी असा छंद आतापर्यंत पाहिला नव्हता. संजलवहिनींच्या आगळ्या छंदास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला संजलवहिनींचा छंद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.
© Dr Hemant Junnarkar (All rights reserved)
सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी 'कालिदास जयंती' कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमामध्ये सिडनीतील निरनिराळे मराठी साहित्यिक आपल्या साहित्यकृती सादर करतात. मी प्रथम केवळ प्रेक्षक म्हणून जात असे. परंतु मंडळातर्फे सर्वांना आवाहन केले जाते की तुम्हीसुद्धा आपल्या साहित्यकृती सादर करा. त्यामुळे मी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मंडळाच्या या प्रोत्साहनाबद्दल मी मंडळाचा अतिशय आभारी आहे. आतापर्यंत दर वर्षी एक कथा सादर केली आहे. या कथा खाली दिल्या आहेत.
(कालिदास जयंती २०२३ मध्ये सादर केलेली कथा )
(मराठीतील अजरामर विनोदी लेखक कै. चिं.वि. जोशी यांचे कथानायक चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. कै. चिं.वि. जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे ' ऍडमिशन.')
नुकताच हिंवाळा सुरू झाला होता. वीक एंडचा दिवस. सकाळची वेळ. काऊनं मला वीक एंडच्या कामाला जुंपण्यापूर्वी मी व्हॉट्स अपवर नजर टाकत होतो.
'अहो, ऐकलंत का?' वॉशिंग मशीनमध्ये कपडे कोंबत काऊ म्हणाली.' जानकी, बाला आणि रवी अशी शेट्टी फँमिली आता आपल्याकडे येणार आहे.'
'आज घरी पाहुणे येण्याचा योग आहे,' मी माझं आजचं राशिभविष्य वाचून म्हटलं, ' वा!'
माझा 'वा!' ऐकून काऊ भलतीच खूष झाली आणि पुढे सांगू लागली, ' रवीला आपल्या घराजवळच्या ब्राइट फ्युचर शाळेत ऍडमिशन हवं आहे.'
'काऊ, अभ्यास करणं अधिक महत्त्वाचं की शाळा?' मी विचारलं.
'ते दिवस गेले आता. हल्ली शाळेच्या नावावरच सर्व अवलंबून आहे,' काऊ म्हणाली.
'हे व्रत पतीने केले असता, पत्नी प्रेमाने वागू लागते,' मी पोस्ट मोठ्या उत्सुकतेने स्क्रोल करीत राहिलो, तर खाली लिहिलं होतं, 'असं कुठलंही व्रत नाही,' आणि चार स्माइली टाकल्या होत्या. 'काय चावटपणा आहे हा,' मी म्हणालो.
'का ? लागली मिरची?' काऊ म्हणाली.
'अगं तुला नाही म्हटलं मी, या पोस्टला म्हटलं,' मी घाबरून म्हणालो.
' तुम्ही मोबाइल जरा बाजूला ठेवता का?' काऊ वैतागून म्हणाली. ' जानकीने आपण जवळचे नातलग आहोत असं दाखवून ते आपल्या घरी राहतात असं शाळेला पत्र दिलं आहे.'
'आं?' आता माझं मोबाइलमधलं लक्ष पूर्णपणे उडालं,' जवळचे नातलग? आपल्या घरी राहतात? कुणाचं डोकं हे?' मोबाइल बाजूला ठेवून मी म्हणालो.
'अहो, कुणाला मदत केली तर काही बिघडतं का? कालच्या सत्संगामध्ये ब्रह्मज्ञानीबाबाजी सांगत होते की माणसाने केलेली चांगली कामं परलोकात त्याच्या कामाला येतात,' काऊ म्हणाली.
'परलोकात जे काही व्हायचं ते होईल, पण शाळेच्या लक्षात आलं तर शेट्टी फँमिलीबरोबर या लोकात आपलीही वरात निघेल. आणि शेट्टी फँमिलीनं अरब आणि उंटाच्या गोष्टीप्रमाणे उद्या आपल्यालाच होमलेस केलं म्हणजे?' मी विचारलं.
‘काही होमलेस करीत नाही. जानकी माझी चांगली मैत्रीण आहे,' काऊ ठसक्यात म्हणाली.
'अच्छा, तीच जानकी ना जिचे मिस्टर बाला सारा स्वयंपाक करतात?' मी विचारलं.
'हो. तीच जानकी. आणि तुम्हीसुद्धा शिका की बालांकडून काही तरी. एकदाच रस्सा भाजी बनवली तर त्या भाजीला टूथपेस्टची चव,' काऊ फणका-याने म्हणाली.
'अगं, त्याचं असं झालं, तू सांगितलेले मसाले मी शोधत होतो. तेवढ्यात मला आठवलं हे सारे जिन्नस पतंजली टूथपेस्टमध्ये आहेत. म्हणून थोडी टूथपेस्टच टाकली,' मी साळसूदपणे म्हटलं.
'कर्म माझं,' काऊ कपाळाला हात .लावून म्हणाली, 'मग भाजी डेटॉलमध्ये तर धुतली नाहीत नं?'
'आठवत नाही आता,' मी डोकं खाजवत म्हणालो.
म्हणूनच सांगते बालांकडून शिका. बालांनी फेसबुकवर रेसिपी अपलोड केली की तोंडाला पाणी सुटण्याच्या इमोजींचा पाऊस पडतो नुसता,' काऊ म्हणाली.
'मग आज आपला स्वयंपाक बालांचा का?' मी खवचटपणे विचारलं.
'आज ते सारे झटकाज रेस्तरॉंमध्ये जेवायला जात आहेत. कारण रोज बालांच्या हातचं खाऊन जानकीला कंटाळा आला आहे. नंतर सारे जण 'बाईपण भारी देवा'च्या शोला जाणार आहेत,' काऊ म्हणाली.
'भारी तर खरंच,' मी स्मित करीत म्हणालो.
'तुम्हीच पहा. बाला स्वयंपाक करतात आणि जानकी रवीचा अभ्यास घेते. रवीला सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून जिवाचं रान करताहेत दोघं जण. तुम्ही स्वयंपाक नाही, मुलांचा अभ्यास तरी घ्या. राघू तर सांगत की अप्पांना कुठलीच शंका विचारण्यात अर्थ नाही,' काऊ इतस्तत: पडलेल्या कपड्यांची आवराआवर करीत म्हणाली.
'म्हणणारच. राघू एकदा मला विचारतो, 'अप्पा, वाघाचे वडील कोण?' म्हटलं, 'अरे, राघू मूर्खच आहेस. वाघाचे वडील वाघच.' तर विचारतो कसा, 'अप्पा, मूर्खाचे वडील कोण?'
काऊला हसताना पाहून मी म्हटलं, ' तू हसू नकोस. हल्ली मुलांचा अभ्यास घेणं सोपं नाही. आता परवाचीच गोष्ट पहा. मोरूनं मला विचारलं, 'अप्पा, 'तो जलेगी भी तेरे बाप की' हे संस्कृतमध्ये कसं म्हणता येईल?'
मी म्हटलं,' मो-या, मला अभ्यासातलं विचार.'
तर म्हणतो,' अप्पा, हे रामायण आहे. हनुमान इंद्रजिताला असं म्हणतो.'
मी म्हटलं,' हे असं रामायण आम्हाला शिकवलं नाही.'
तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करून काऊ म्हणाली, 'तुम्हाला सांगितलं होतं, मुलांना सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळेल का ब्रह्मज्ञानीबाबाजींना विचारायला, ते तरी विचारलं का?'
'विचारलं. बाबाजी म्हणाले, 'बेटा, वैसा बोलना मुश्किल है. क्यों कि वो पढाई बडी कठिन होती है.'
मी म्हटलो, ' क्या बात कर रहे हो बाबाजी, आप को जरूर पता होगा. आप तो ब्रह्मज्ञानी हो.'
बाबाजी म्हणाले,' बेटा, ब्रह्मज्ञान उस से आसान हैं.''
'तुम्ही नीट विचारलं नसेल. एक काम धड जमत नाही. सगळीकडे मलाच बाई लक्ष घालावं लागतं,' काऊ कुरकुरत म्हणाली.
'बरं, आता हा शेट्टी परिवार आपल्याकडे कशासाठी येणार आहे?' मी मूळ मुद्द्याकडे वळलो.
'ब्राइट फ्युचर शाळेच्या प्रिन्सिपल मार्था येणार आहेत व्हिजिटला,' काऊ म्हणाली.
'बघ, काय म्हटलं होतं मी?' मी डोळे विस्फारून म्हटलं.
'ही नुसती फॉर्मँलिटी आहे, असं जानकी म्हणाली. त्यांना आपण एक फँमिली आहो, असं वाटलं पाहिजे,' काऊ म्हणाली.
एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि शेट्टी परिवार आमच्या घरी अवतरला.
नमस्कार चमत्कार झाल्यानंतर काऊनं चहाचे कप आणले. आम्ही चहाचे घुटके घेत असतानाच मैनाच्या किंचाळण्याचा आवाज आला, 'अप्पा, यानं तुमचा मोबाईल फोडला.'
रवीनं आल्याआल्या माझा मोबाईल पाडला होता आणि त्याचा सोक्ष-मोक्ष लावला होता.
मैनानं रवीच्या पाठीत एक धपाटा घातला.
' अम्मा, नानिगे होडेदा,' असं ओरडून रवीनं कानठळ्या बसवणा-या आवाजात टाहो फोडला.
'काय बाई एवढासा तो मोबाइल. त्याच्यापायी एवढं मारावं का माझ्या लेकराला, ' जानकीबाई खाऊ की गिळू अशा नजरेने मैनाकडे पाहत म्हणाल्या.
रवीकडे रागाने बघणा-या मैनाला मी म्हटलं, 'मैना, आता भांडणं बंद. त्या मार्थाबाई येतील, त्यांना आपण एक फँमिली आहो असं वाटलं पाहिजे.'
'अहो, चिमणीराव,' बाला म्हणाले.
'चिमणीराव नाही, चिमणराव,' मी दुरुस्ती केली.
'अहो, तेच ते हो,' बाला आपला हेका पुढे चालवीत म्हणाले, ' तर चिमणीराव, त्यावरून तर त्यांची जास्त खात्री पटेल. कारण होल वर्ल्डमध्ये सर्वी जाणतात, की इंडियन लोक एकमेकांशीच जास्त फाईट्ट करतात.'
आमचं असं हितगुज चालू असतानाच पुन्हा एकदा दारावरील बेल वाजली. दरवाजा उघडल्यावर मार्थाबाई ऐटीत आत आल्या.
‘हाय, हाऊ आर यू’ झाल्यावर मार्थाबाई घराचं निरीक्षण करीत सोफ्यावर टेकल्या आणि पर्समधून एक पत्र काढून वाचू लागल्या. पत्र वाचून झाल्यावर मार्थाबाईंनी रवीला विचारलं, 'हे रँंवी, स्वीट बॉय, कुड यू टेल मी युवर ऍड्रेस?'
रवीनं पोपटासारखा आमच्या घराचा पत्ता सांगितला. मी चाटच झालो. आईनं पठ्ठ्याला भलताच ट्रेन केला असावा.
'ओके, दॅट्स डन, 'असं म्हणून मार्थाबाई निघाल्या.
'ऑल गुड नाऊ?' काऊनं दारात मार्थाबाईंना विचारलं.
'येस. ऑल गुड फॉर नाऊ. आफ्टर सिक्स मन्थ्स देअर विल बी वन मोअर व्हिजिट अँड दॅट विल बी अ सरप्राईज व्हिजिट,' मार्थाबाईंनी उत्तर दिलं आणि गाडी स्टार्ट करून फुर्रकन निघून गेल्या.
काऊचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
सिडनी, १५ जुलै २०२३
बंड्या प्रेमात पडला
(कालिदास जयंती २०२२ मध्ये सादर केलेली कथा वर्षी करोनामुळे कालिदास जयंती सभामंडपात साजरी झाली नव्हती. खालील कथा ऑनलाईन सादर केली)
'बंड्या, मला एक सांग, तू प्रेमात पडणार आहेस की नाहीस?' भांडी घासता घासता वसंतरावांनी विचारलं.
'अरेच्चा ! ही काय जबरदस्ती आहे? मला नाही प्रेमात पडायचं.' बंड्या म्हणाला.
'अरे बाबा, प्रेमात पड अगर पडू नको. लग्नाचा कधी विचार करणार आहेस?' राधाबाईनी विचारलं.
बंड्या, वसंतराव आणि राधाबाई, हे तीन माणसांचे कुटुंब पूर्वी वेंटवर्थव्हिलच्या उपनगरात युनिटमध्ये राहत असे. आता बॉक्स हिलला नवीन हाऊस घेतल्यापासून राधाबाई आणि वसंतरावांचा बंड्यापाठी लग्नासाठी ससेमिरा लागला होता.
'आई, हे ऑस्ट्रेलिया आहे. इथे मुली लग्न करतात आणि भांडण करून अर्धी प्रॉपर्टी घेऊन निघून जातात. आमच्या ऑफीसमधल्या निकने लग्नच केलं नाही.' बंड्या म्हणाला.
'अरे तू तुझ्या बापाला कमी समजू नकोस. तुझ्या नावावर आम्ही काही प्रॉपर्टी ठेवली नाही. आमचे डोळे मिटेपर्यंत तुला काहीही मिळणार नाही. त्यामुळे ती तुझ्याबरोबर आयुष्यभर नांदणार याची खात्री बाळग,' वसंतराव म्हणाले.
'अरेच्चा, म्हणजे तुम्ही मला चक्क ब्लॅकमेल करत आहात. इथे पाहिलं नं कसे नव्वद वर्षांचे म्हातारे माना डुगू डुगू हलवीत व्हील चेअरवर शॉपिंग करीत असतात? तुम्ही काही नव्वदीपर्यंत राम म्हणणार नाही आणि तोपर्यंत मी आणि माझ्या बायकोने आश्रितासारखं राहायचं काय? बरं, ते जाऊ द्या. तुम्ही का प्रेमात पडला नाहीत?' बंड्याने विचारलं.
'अरे बाबा, मोठी माणसं सांगतात तसं वागावं, वागतात तसं वागू नये,' वसंतराव म्हणाले.
'बाकी हे प्रेमात पडले नसतील यावर माझा विश्वास नाही. परवा तर कमालच केली. तासभर बसवून माझ्याकडून करोनासाठी फायझर व्हॅक्सिनचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. ॲस्ट्राझीनिकामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात म्हणे. गोरी नर्स बघून आले की ॲस्ट्राझीनिका घेऊन. आता नाही का झाल्या रक्ताच्या गुठळ्या? ' राधाबाई फणक्याने म्हणाल्या.
‘रक्ताच्या गुठळ्या- करोनाचं काय घेऊन बसलीस ? जगातील कुठल्याही रोगाला तोंड देण्याचं सामर्थ्य आता माझ्यात आलं आहे. ती नर्स होतीच तशी गोड,’ वसंतराव स्वप्नात हरवल्यासारखे कुठे तरी पाहत म्हणाले.
‘घ्या. ऐका आता. लाकडं घाटावर जायची वेळ आली तरी थेरं संपत नाहीत. माझ्या मैत्रिणी आल्या की लागले गोंडा घोळायला,' राधाबाई ठसक्यात म्हणाल्या.
'तुझ्या मैत्रिणी ना? त्या येतात बाजूच्या स्वर्णमाला ब्यूटी पार्लरमध्ये डॉलर्स उडवायला आणि चहाचे पैसे वाचवायला येतात तुझ्याकडे. मी स्वर्णमाला बाईंच्या कौशल्याला दाद देत असतो,' वसंतराव म्हणाले.
'कळतात बरं का टोमणे मला. मी माझ्या पैशावर जाते ब्यूटी पार्लरमध्ये. तुमच्या बहिणीसारख्या नवऱ्याच्या पैशावर भुवया नाही कोरत. आणि ते भांडं नीट घासा जरा. काल मी कुकर लावायला घेतला तर कुकरला चक्क भाताचं शीत लागलेलं .’ राधाबाई कडाडल्या. ‘
' घासतो घासतो, नीटच घासतो,' वसंतराव कातावून म्हणाले, ''बंड्या, तू मथितार्थ लक्षात घे. बायकोच्या मैत्रिणी पाहावयाच्या असतील तरी लग्न करायला हवे की नको?' वसंतरावांनी विचारलं.
'म्हणजे तुम्ही आज हा प्रश्न धसास लावायचा ठरवलेलं दिसतं तर. ठीक तर, मीसुद्धा जातो आणि येतो चांगली चायनीज सून घेऊन तुमच्यासाठी. बसा बेडकाच्या तंगड्या खात. आणि एखादी तंगडी घशात अडकली की म्हणा राम. नव्वदाव्या वर्षी मान डुगू डुगू हलवायचाही त्रास नाही.' असे म्हणून बंड्या गाडीची चावी घेऊन ताड ताड निघाला.
'अगं बाई, थांबवा त्याला. चायनीज सून आणतोय म्हणे. म्हणजे आता घरात वुहानची प्रयोगशाळा सुरू तर होणार नाही ना ? माझ्या सर्व मैत्रिणी आपल्या घरावर बहिष्कार टाकतील हं, ' राधाबाई घाबरून म्हणाल्या.
‘अरेच्च्या, मग माझं कसं होणार?’ वसंतराव म्हणाले. राधाबाईनी डोळे वटारून पाहताच वसंतराव दुसरीकडे पाहू लागले.
वसंतराव आणि राधाबाई दोघे बंड्याच्या पाठी धावले. परंतु बंड्या गाडी स्टार्ट करून राइटचा सिग्नल न देताच निघालासुद्धा. वसंतराव आणि राधाबाई कपाळाला हात लावून बसले.
'प्रेमात पड म्हणे.' बंड्या स्वतः शीच बडबडत होता. 'बिल चांगला सांगत होता. इथली मुलं आई-वडिलांच्या बरोबर राहत नाहीत. मीच पडलो श्रावणबाळ. आता भोगतोय फळं ! '
बंड्या तसा सभ्य मुलगा. कारण दुसरा एखादा मुलगा अशा वेळी पबमध्ये गेला असता. बंड्या आला वुलवर्थसमध्ये. गाडी पार्क करून बाहेर येतो तोच त्याला ट्रॉलीच्या रांगेतून ट्रॉली काढताना सई दिसली. वेंटवर्थव्हिलच्या युनिटमध्ये राहत असताना सई आणि तिचे आई-वडील त्याच बिल्डिंगमध्ये राहत असत. बंड्या आणि सईच्या घरच्यांचे चांगले संबंध होते. सई चांगलीच चुणचुणीत होती. वसंतरावांच्या डोळ्यात खुपणारी राधाबाईंची महागडी ऍव्हॉनची प्रसाधने सई स्वतःच्या नावावर खरेदी करून गुपचूप राधाबाईना आणून द्यायची. त्यामुळे राधाबाईंचं आणि सईचं चांगलं सूत होतं . तिच्या या कौशल्यामुळे बंड्या तिला ‘आनंदीबाई’ म्हणत असे.
सईला बघून बंड्याच्या डोक्यात लक्खकन एक युक्ती चमकली. तो धावत जाऊन सईला म्हणाला ,'आनंदीबाई, इकडे कुठे?'
'अरे,आम्ही आलो त्या रानड्यांकडे हाऊस वॉर्मिंगला आई-बाबा बसले सगळ्यांबरोबर गप्पा मारत. मी म्हटलं जरा शॉपिंग करून घ्यावं. तेवढाच जाताना वेळ वाचेल.'
'शॉपिंग जाऊ दे. बंड्या तिच्या हातातील ट्रॉली बाजूला करीत म्हणाला, 'चल, माझ्याबरोबर घरी. मला तुझ्या प्रेमात पडायचं आहे.'
'अय्या खरंच? म्हणजे तू मला हृतिक रोशन सारखं ‘कहो ना प्यार है’ म्हणणार?’ सई आनंदून म्हणाली.
'ए ! हे सारं खोटं हं.' बंड्या म्हणाला.
'उं उं ! म्हणजे तू मला प्रेम चोप्रासारखं फसवणार?' असं म्हणत सई रडू लागली.
‘ए माझे आई, आता भोकाड पसरू नकोस. पब्लिक माझी धुलाई करील,’ बंड्या घाबरून म्हणाला.
वुलवर्थसमध्ये पोलीस असण्याचं काही कारण नाही. परंतु अचानक एक पोलीस दत्त म्हणून उभा राहिला. 'आर बी टी ची कमाई सोडून हा पांडू इथे कुठे तडफडायला आला?' बंड्या वैतागून पुटपुटला.
बंड्याकडे करड्या नजरेने पाहत पोलीस सईला म्हणाला, ' आर यू ऑल राईट मॅम ?'
'येस येस आय ॲम ऑल राईट, थँक्स व्हेरी मच, ' सई अश्रू पुसून उसने हसत म्हणाली.
' नो वरीज, टेक केअर,' पोलीस बंड्याकडे संशयाने पाहत निघून गेला.
सई निमूटपणे बंड्याबरोबर निघाली आणि गाडीत येऊन बसली. दोघे घरी आले. सईला दारात पाहताच वसंतराव आणि राधाबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळल्या. त्या कशासाठी ते ओळखून सई मनातून खटटू झाली.
चहा-बिस्किटे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सई म्हणाली,' काकू निघते मी आता. उशीर होतोय.'
'थांब सई,' बंड्या एकदम उठून म्हणाला.
सईने बंड्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
'अजून मी तुला ‘कहो ना प्यार है’ , म्हटलं नाही. तू पोलीसाला माझ्यासाठी खोटं सांगितलं ती अदा मला एवढी आवडली की मी तेव्हाच ठरवून टाकलं की तुला ‘कहो ना प्यार है’ म्हणायचंच. हो . आणि मी तुला प्रेम चोप्रासारखं फसवणारही नाही. ' बंड्या एका दमात म्हणाला.
बंड्याला एकदम आपण तरंगत आहोत असा भास झाला. प्रेमात पडल्यावर 'आय वॉंट टू डान्स ऍण्ड प्ले' असं वाटतं हे बंड्याला हिंदी चित्रपटातून माहीत होतं.
पण चक्क तरंगण्याचा अनुभव? मग बंड्याच्या लक्षात आलं की कंबरदुखी विसरून वसंतरावांनी बंड्याला चक्क उचलून घेतलं होतं. वसंतरावांनी बंड्याला एकदम सोडलं. बंड्या जवळ जवळ पडलाच. वसंतराव म्हणाले, बंड्या प्रेमात-'
'पडला.’ सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं.
'हिप हिप' वसंतराव म्हणाले.
सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं, 'हुर्रे.'
प्रतिक्रिया:
जितेंद्र वैद्य:
बघितले सर खूप छान भट्टी जमली आहे.पण बंड्या काल्पनिक की अस्तित्वात असो खुप शुभेच्छा. इतर सहभागी कलाकार आणि सिडनी वासींयाना शुभेच्छा नमस्कार💐👏
मिलिंद बर्वे:
उत्तमम् (संस्कृत)
अरुण डाबरे (नागपूर)
👌👌👌Ekdam Sunder ahe Sir
समीर राणे:
मस्त भाऊ 👌🏻👌🏻👌🏻
लतामावशी:
Chan mast sunder.
Sangeeta Rodrigues:
आपला बंड्या प्रेमात प ङ ला वाटतं 😍👌🏼 मस्त छान छोटीशी गोष्ट आणि हळूच एक सुंदर विनोदाची झालर . मजा आली 👌🏼💐🙏🏻
वर्षाच्या आई:
अप्रतिम👌👌👍👍👏👏
संतोष चावक : मस्त👌👌[11:22 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Jijaji Sahi katha
[5:42 pm, 19/09/2021] माधवी: Did you listen to Bhau's story on Kalias program? Very interesting, good narration. Please convey my congratulations, I don't have his or Varsha's number.
[5:43 pm, 19/09/2021] माधवी: From Lalita our friend I think kalidas jayanti ka?
[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Chan hoti on very lighter mood
[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Mag Advait la kadhi ase mhannar 😃😃😃