Thursday, April 30, 2026

श्रीसाईसच्चरित अध्याय ३५ चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं

 श्रीसाईसच्चरित 

अध्याय ३५          

चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं                

(ओवीसंख्या २३३)

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ (-२४)

*      मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणाऱ्या काका महाजनींच्या मित्राची गोष्ट (२५-५८) बाबा त्यांना 'का यावे जी' म्हणून विचारतात जसे त्यांना फक्त त्यांचे वडीलच विचारीत असत.

*      धरमसी जेठाभाईंची गोष्ट (काका महाजनी यांच्या पदरी काम करीत) (६१-१५७)

*      वांद्र्याच्या एका कायस्थ मनुष्याच्या स्वप्नात मृत वडील येऊन शिव्याशाप देतात. रात्री उदी लावून झोपताच हा त्रास थांबतो (१५८-१७३)

*      बाबांचे भक्त बाळाजी पाटील नेवासकर यांची कथा (१७४-१९६) बाळाजी पाटील नेवासकरांच्या श्राद्धाच्या दिवशी अंदाजापेक्षा जास्त पाहुणे येतात. परंतु त्यांच्या पत्नी प्रत्येक भांडे कपड्याने झाकून भांड्यात बाबांची उदी घालून सुनेला पाहुण्यांना अन्न वाढण्यास सांगतात. प्रत्यक्षात सर्व पाहुणे जेवून जातात आणि अन्न शिल्लक राहते.

*      बाळाजी पाटील नेवासकरांच्या घरी भुजंग आला असता ते भुजंगास बाबांचेच रूप मानून दूध अर्पण करतात. भुजंग दूध पिऊन निघून जातो. अध्यायाचा समारोप (१९७-२३३)

काका महाजनींचे एक मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणारे मित्र बाबांना नमस्कार करण्याच्या आणि दक्षिणा देण्याच्या अटीवर बाबांना भेटायला येतात. बाबा त्यांना 'का यावे जी' म्हणून विचारतात जसे त्यांना फक्त त्यांचे वडीलच विचारीत असत. तेव्हा या मित्रांना बाबांचे महत्त्व पटते. बाबा या मित्रांकडे मुळीच दक्षिणा मागत नाहीत.





मित्र घरी येतात तेव्हा त्यांना घरी कोंडल्या गेल्यामुळे दोन चिमण्या मेलेल्या आढळतात. एक चिमणी जिवंत असते आणि ती  उडून जाते.

धरमसी जेठाभाईंना बियांची द्राक्षे आवडत नसताना बाबा बियांची द्राक्षे देतात. जेठाभाई द्राक्षे खातात तेव्हा त्यांना द्राक्षांत एकही बी आढळत नाही.

बाळाजी पाटील नेवासकरांच्या श्राद्धाच्या दिवशी अंदाजापेक्षा जास्त पाहुणे येतात. परंतु त्यांच्या पत्नी प्रत्येक भांडे कपड्याने झाकून भांड्यात बाबांची उदी घालून सुनेला पाहुण्यांना अन्न वाढण्यास सांगतात. प्रत्यक्षात सर्व पाहुणे जेवून जातात आणि अन्न शिल्लक राहते.

 

 


श्रीसाईसच्चरित अध्याय ३४ उदीमहिमा

 श्रीसाईसच्चरित 

अध्याय ३४          

उदीमहिमा             

*      अध्यायारंभ . मालेगावच्या डॉक्टरांच्या पुतण्याचा हाड्याव्रणाचा रोग उदी लावून बरा होतो. डॉक्टरांस स्वप्नात दृष्टांत (-४७)

*      डॉ. पिल्ले यांचा नारूचा रोग बरा होतो. बाबा सांगतात, 'काऊ येऊन चोच मारील.' प्रत्यक्षात अब्दुल्लाचा पाय डॉ. पिल्ले यांच्या पायावर पडून जखम फुटते (४८-९०)

*      माधवराव देशपांडे ऊर्फ श्यामा याचा धाकटा भाऊ बापाजी याच्या पत्नीचा ग्रंथिज्वर (प्लेग) उदीमुळे बरा होतो (९१-१३१)

*      इराणी (पारशी) मनुष्याच्या मुलीची आकडी उदीमुळे बरी होते  (१३२-१३९)

*      हर्द्यानजीक राहणाऱ्या वृद्ध गृहस्थांचा मूतखडा उदीमुळे बरा होतो. मुंबईच्या कायस्थ प्रभू गृहस्थांच्या पत्नीची उदीमुळे प्रसूती सुलभ होते. अध्यायाचा समारोप (१४८-१६६

 


Thursday, April 23, 2026

श्रीसाईसच्चरित अध्याय ३३

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय ३३          

उदीप्रभाव              

(ओवीसंख्या २३९)

या अध्यायात काय आहे


  अध्यायारंभ. उदीचे महत्त्व आणि बाबांचे उदीवरील प्रेम (१-३३)

  उदीमुळे नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची बाळंतपणाच्या वेदनांतून सुटका. 'आरती साईबाबा' या माधव अडकरांच्या आरतीचे महत्त्व (६३-११९)

  बाबांचे निर्वाण झाल्यानंतरही नारायण मोतीराम आजारी असताना  बाबा त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन बरे करतात (१२०-१४०)

  अप्पासाहेब कुलकर्णी यांची कथा (अप्पासाहेब कुलकर्णी घरी येऊन गेलेल्या फकीरास दहा रुपये दक्षिणा देण्याचे ठरवतात. फकीर सापडल्यानंतर अप्पासाहेब कुलकर्णी यांच्याकडून दहाच रुपये दक्षिणा मागून घेतो)  ( : (१४१-१९६)  

  हरिभाऊ कर्णिक यांची कथा (हरिभाऊ कर्णिक यांची बाबांस द्यावयाचा राहून गेलेला दक्षिणेचा रुपया नाशिकच्या काळा राम मंदिरातील नरसिंगजी महाराज मागून घेतात.) अध्यायाचा समारोप (१९७-२३९)




श्रीसाईसच्चरित अध्याय ३२

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय ३२          

गुरुमहिमावर्णनं              

(ओवीसंख्या १७४)

*      अध्यायारंभ (-३६)

*      बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची कथा- बाबांसह चार जण रानात गुरूचा शोध करतात, बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात.  (३७-१२१)

*      शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या इच्छेने बाबांकडे आलेल्या एका बाईंकडून  बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून घेतात (१२२-१४८)

*      बाबांनी सांगितलेली गोष्ट - बाबा पोटापाण्यासाठी बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले झाल्यामुळे मालक त्यांना पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)

 

रानात देवाचा शोध

बाबांसह चार जण रानात देवाचा शोध करतात. बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची कथा-.  (३७-१२१)


१.        बाबा आणि त्यांचे तीन सहाध्यायी ब्रह्मनिरूपण करून स्वतः शोध घेण्यासाठी रानात हिंडत असतात. त्या वेळी त्यांना एक वणजारी भेटून कुठल्याही शोधास जाताना रिकाम्या पोटी शोध न करण्याची आणि  बरोबर वाटाड्यास घेण्याची  विनंती करतो. इतर तीन सहाध्यायी त्या वणजाऱ्याचे ऐकत नाहीत, परंतु बाबा त्याचे ऐकून खाऊन घेतात. त्यांना गुरू भेटतात. बाबा गुरूला बरोबर घेऊन शोध चालू ठेवतात.

२.       बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात. गुरू दहा-बारा घटिकांनंतर बाबांना येऊन बाहेर काढतात आणि अनुभवाबद्दल विचारतात. बाबा सांगतात की तो अनुभव अतिशय सुखदायक होता. अशा प्रकारे बाबांची गुरुकडे शाळा सुरू होते

शिमग्याचा दिवस आणि पुरणपोळ्यांचे भोजन

शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या इच्छेने बाबांकडे आलेल्या गोखले  बाईंकडून  बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून घेतात (१२२-१४८)


एकदा गोखले नावाच्या एक बाई शिमग्याच्या दिवशी येऊन बाबांच्या पायाशी राहून तीन दिवस उपवास करण्याच्या इच्छेने येतात. बाबा तिला उपवास करण्याचा उपदेश करून दादा केळकरांच्या घरी जाऊन पुरणपोळ्यांचे भोजन  करण्यास सांगतात. त्याप्रमाणे त्या बाई उपवास करता पुरणपोळ्यांचे भोजन करतात.

बाबांनी केलेले जरीचे काम

बाबांनी सांगितलेली गोष्ट -बाबा पोटापाण्यासाठी बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले झाल्यामुळे मालक त्यांना पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)


 

बाबा एकदा पोटापाण्यासाठी कामाच्या शोधात जातात आणि बीड गावी त्यांना एक जरीचे काम मिळते. बाबांचे काम इतर सर्वांपेक्षा चांगले होते आणि मालक त्यांना पागोटे आणि शेला यांनी युक्त पोशाख देतात. बाबा तो न वापरता तसाच ठेवून देतात. बाबा सांगतात की, 'कोणाचे देणे कायम पुरत नाही. परंतु माझे सरकार देतात ते कल्पान्तीही सरत नाही.'  



 


Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai

Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...