Tuesday, April 1, 2025

ध्रुवतारा

ध्रुवताऱ्याची ओळख आपल्याला बहुतेकांना लहानपणी आपले वडील करून देतात. रात्री वडिलांबरोबर चांदण्या रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करताना बहुतेक मुलं वडिलांना प्रश्न विचारतात,' तो ठळक तारा कुठला?' आणि वडील सांगतात, 'तो ध्रुवतारा. ध्रुवतारा कायम उत्तर दिशेला असतो. सर्व तारे आपल्या जागा बदलतात. परंतु ध्रुवतारा आपली जागा बदलत नाही.'

दिवसा आपल्याला दिशा समजण्यासाठी सूर्याचा उपयोग होतो. परंतु अंधाऱ्या रात्री , जेव्हा चंद्र आकाशात नसेल तेव्हा ध्रुव ताऱ्याच्या स्थानावरून आपल्याला दिशा समजू शकतात. समुद्रातून रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करणाऱ्या जहाजांस किंवा वाळवंटामध्ये रात्रीच्या वेळी दिशा समजण्यास ध्रुव ताऱ्याचा उपयोग होतो. 

ध्रुव तारा आपली जागा का बदलत नाही 
सर्व ग्रह तारे आपली जागा बदलतात परंतु ध्रुव तारा आपली जागा कधीच बदलत नाही.

अढळ पद:
उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. एका राणीचे नाव होते सुरुचि आणि दुसऱ्या राणीचे नाव होते सुनीति. सुरुचि उत्तानपाद राजाची आवडती राणी होती तर सुनीति नावडती राणी होती. सुरुचिच्या मुलांचे नाव होते उत्तम तर सुनीतिच्या मुलाचे नाव होते ध्रुव. एक दिवस उत्तम राजाच्या एका मांडीवर बसला होता. ते पाहून ध्रुव राजाच्या दुसऱ्या मांडीवर बसला. परंतु सुरुचिने त्याला उठवले. ध्रुवास त्यामुळे अतिशय वाईट वाटले आणि तो ईश्वराच्या शोधात  अरण्यात जाण्यास निघाला. अरण्यात त्याला नारदमुनी भेटले आणि त्यांनी ध्रुवाला 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला. ध्रुवाने या मंत्राचा अखंड जप केल्यानंतर श्रीविष्णु ध्रुवावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. त्यावर ध्रुवाने त्याला ज्या स्थानावरून कोणीही दूर करू शकणार नाही असे स्थान देण्यास सांगितले. तेव्हा श्रीविष्णुंनी ध्रुवाला आकाशात ध्रुवताऱ्याच्या रूपात अढळ स्थान दिले. इतर सर्व तारे आपली जागा बदलतात परंतु ध्रुवतारा आपली जागा कधीच बदलत नाही.