क्रबी ही बेटे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणून प्रसिद्ध असलेली 'फी फी आयलंड्स' येथेच असून समुद्रकिनारे, चुनखडीचे कडे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. क्रबी च्या दक्षिणेस असणारी 'लांता आयलंड्स' मॅनग्रोव्हच्या राई, पोवळ्याच्या कडा असलेले समुद्रकिनारे, कणखर कडे आणि भुलविणारी अरण्ये यांनी नटलेली आहेत. 'ऒ नंग' आणि 'राय ले बे' येथे वाळूचे सुंदर समुद्रकिनारे आणि जगभरातील गिर्यारोहकांस आकर्षित करणार डोंगरकडे आहेत. असे हे क्रबी पर्यटकांच्या विरंगुळ्यासाठी आदर्श ठिकाण आहे.
१. परिचय
स्थान, विस्तार व सीमा: क्रबी हा थायलंडच्या नैऋत्येकडे बँकॉकपासून रस्त्याने ८०० किमी अंतरावर असणारा किनारी प्रांत आहे. याच्या उत्तरेस फं ङा, पूर्वेस Nakhon Si Thammarat आणि सुरत थानी तर दक्षिणेस Trang हे प्रांत आहेत. पश्चिमेस अंदमान समुद्र आहे. क्रबी म्हणजे बेट आहे असा समज आहे, परंतु तो बरोबर नाही. क्रबी प्रांत मुख्यभूमीवरच आहे. परंतु त्याच्या समुद्राकडील बाजूस छोटी मोठी सुमारे १३२ बेटे आहेत. ही बेटे क्रबी च्या अधिपत्याखाली येतात. यांपैकी लांता, को फी फी आणि को जुम (Jum) बेटांवर मनुष्यवस्ती आहे. क्रबी मध्ये एकूण आठ जिल्हे आहेत. यांपैकी मुअंग (Muang) जिल्ह्यामध्ये आव नंग, रेले, क्रबी शहर, klonग मुअंग आणि फी फी आयलंड्स ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. या साऱ्या बेटांसह क्रबी चे एकूण क्षेत्रफळ ४,७०९ चौ. किमी आहे. क्रबी ची लोकसंख्या साडेचार लाख असून यामध्ये बौद्ध लोक ६०% तर मुस्लीम लोक ४०% आहेत.
प्राकृतिक: येथील नैसर्गिक अरण्यांमध्ये मॅनग्रोव्हच्या राया आणि कॅसियाची झाडे आहेत. क्रबी ची वाळूने युक्त जमीन रबर, पाम, संत्री, नारळ, कॉफी अशा विविध प्रकारच्या कृषि उत्पादनांसाठी योग्य आहे.
क्रबी नदी: क्रबी नदी Panom Benja पर्वतांमध्ये उगम पावते, शहरातून पाच किमी पर्यंत वाहते आणि Tambon PAK NAM येथे अंदमान समुद्रास मिळते.
हवामान: वर्षभरातील तापमान १६.९° आणि ३७.३° सेल्सिअस च्या मध्ये असते. वर्षभरातील पाउस २,५६८.५ मिलीमीटर असतो.
इतिहास: क्रबी मध्ये असे बरेच कडे आणि गुहा आहेत ज्यांमध्ये प्राचीन भित्तिचित्रे, दगडी हत्त्यारे, मणी, भांडी तसेच हाडांचे सांगाडे सापडले आहेत. इसवी सनापूर्वी २५,००० ते ३५,००० या काळात क्रबी मध्ये आदिमानवाची वस्ती होती असे मानले जाते. ज्ञात इतिहासामध्ये क्रबी चा उल्लेख "Ban Thai Samor" म्हणून आढळतो. लोक लिहावाचायला शिकले नव्हते अशा काळामध्ये बारा शहरे अस्तित्वात होती, ज्यांचे चिन्ह वानर होते. "Ban Thai Samor" त्या शहरांपैकी एक होते.त्या काळी म्हणजे इ.स. १२०० च्या सुमारास क्रबी Ligor च्या राज्याचे मांडलिक होते. Ligor चे राज्य Kra पेनिन्सुलाच्या पूर्व किना-यावरील शहर होते आणि आज ते Nakhon Sri Thammarat म्हणून ज्ञात आहे.
Rattanakosin कालखंडाच्या सुरुवातीस म्हणजे सुमारे २०० वर्षांपूर्वी बँकॉक थायलंडची राजधानी झाली. त्या सुमारास Nakhon Sri Thammarat थायलंडच्या राज्याचा भाग झाले होते. Jao Praya Nakorn (Noy) या तेव्हाच्या Nakorn Sri Thammarat च्या राजाने हत्तींसाठी निवास (kraal) बांधण्याची आज्ञा दिली. या कामासाठी त्याने Pra Palad या आपल्या वजिराची नेमणूक केली. या मोठ्या शहरासाठी हत्तींचा नियमित पुरवठा करण्याचे काम Pra Palad कडे होते. त्यावेळी Pra Palad बरोबर बरेच लोक स्थलांतरित झाले आणि Pakasai, Klong Pon आणि Pak Lao या क्रबी च्या तीन परगण्यांमध्ये मोठी वस्ती झाली.
१८७२ साली राजे चुलालोंग्कोर्न यांनी उदारपणे या सर्व भागास शहराचा दर्जा दिला आणि त्याचे नाव ‘क्रबी ’ ठेवले. या नावामध्ये जुन्या वानराच्या चिन्हाचे स्मरण ठेवले होते. क्रबी चा अर्थ आहे तलवार. क्रबी शहराच्या स्थापनेच्या वेळी जमिनीमध्ये पुरलेली एक तलवार सापडली. यावरून या शहराचे नाव क्रबी असे पडले अशीही एक दंतकथा आहे. पुढे तलवार हे क्रबी चे चिन्ह झाले.
क्रबी चे प्रशासन Nakorn Sri Thammarat मधूनच होत होते. तरीसुद्धा शहरासाठी गव्हर्नर नेमण्यात आला. पहिला गव्हर्नर म्हणून Luang Tehp Sena याची नेमणूक झाली.
१८७५ साली यामध्ये बदल करण्यात आला आणि थाई प्रशासनाच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे क्रबी ला चौथ्या क्रमांकाचा दर्जा देण्यात आला. आता क्रबी चे प्रशासन थेट बँकॉकच्या केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली आले आणि येथूनच इतर प्रांतांपासून स्वतंत्र अशा क्रबी च्या इतिहासास सुरुवात होते.
क्रबी ला कसे जावे: क्रबी थायलंडच्या नैऋत्य किनार्यावर असून बँकॉकपासून ८०० किमी अंतरावर तर फुकेतपासून १७० किमी अंतरावर आहे. क्रबी ला विमानाने, रस्त्याने आणि जलमार्गाने जाता येते.
विमानाने: क्रबी ला जाण्यासाठी बँकॉक, चिंग माय, कॉ समुई, सिंगापूर आणि क्वालालंपूर येथून फ्लाइट्स आहेत. बँकॉक ते क्रबी या विमानप्रवासास एक तास वीस मिनिटे लागतात. आणखी एका पर्याय म्हणजे फुकेतला विमानाने येऊन टॅक्सीने क्रबी ला येणे. टॅक्सीने फुकेतहून क्रबी ला येण्यास दोन तास लागतात. क्रबी मध्ये क्रबी एअरपोर्ट हा छोटा विमानतळ असून हा विमानतळ हायवे रूट क्र. ४ वर सोयीस्कर ठिकाणी असल्याने क्रबी मधील बहुतेक सर्व ठिकाणी जाण्यास सोयीस्कर आहे.
बसने: बसने बँकॉक, कॉ समुई, Had Yai, फुकेत, Trang आणि मलेशिया अशा बहुतेक ठिकाणांहून क्रबी ला जाता येते. बसेस क्रबी शहरामध्ये येतात. बँकॉक ते क्रबी हा बस प्रवास दहा तासांचा आहे.
रेल्वेने: क्रबी रेल्वेमार्गावर नाही. त्यामुळे क्रबी ला थेट रेल्वेने जाता येत नाही. रेल्वेने यावयाचे असल्यास सुरत थानी किंवा Trang पर्यंत येऊन पुढे बसने किंवा टॅक्सीने यावे.
जलमार्गाने: फुकेतने क्रबी ला जाण्यास फेरी सेवा आहे. फेरीने आल्यास आव नंगला उतरावे लागते.
२ . प्रवास
क्रबी – मुख्यभूमी
<>क्रबी शहर
क्रबी शहर हे एक मध्यम आकाराचे
सुमारे २०,००० वस्तीचे शहर आहे. क्रबी शहर थायलंडमधील अतिशय जुन्या वसाहतींपैकी
एक आहे. हजारो वर्षांपूर्वी हे एक क्राल म्हणजे प्रामुख्याने हत्तींची देखभाल
करणारे गाव होते. आज या जुन्या इतिहासाची साक्ष देणारे एकमेव ठिकाण ‘टायगर केव्ह’
हे आहे. या शहराचे ग्रामीण वातावरण अतिशय भुरळ घालणारे आहे. शहराच्या मध्यभागी क्रबी नदी वाहते. यां
नदीच्या काठी बाजार, अतिथिगृहे, रेस्तराँ, कॅफे अशा सर्व सोयी आहेत. खरेदीच्या
दृष्टीने येथे विशेष प्रसिद्धी असणारे काही नाही. परंतु येथे कपड्यांची दुकाने
आढळतील. शहराच्या सीमावर्ती भागामध्ये मोठी स्टोअर्स आढळतील. संध्याकाळी चक्कर
मारली की या शहराचे मोहक स्वरूप तुम्हाला जाणवेल.
<>>वत थम सुआ (Tham Sua) किंवा टायगर केव्ह
हे ठिकाण क्रबी शहरापासून सुमारे
तीन किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूस डोंगर असून या डोंगरांमध्ये छोट्या
छोट्या गुहा आहेत. येथे एक गुहा असून या गुहेमध्ये एका दगडावर वाघाचे पंजे उमटलेले
दिसतात. हीच टायगर केव्ह. याच्या आसपास विशेषतः खिरिविंग (Khiriwing) दरीमध्ये
मोठे मोठे वृक्ष आहेत. यांपैकी काही वृक्ष शंभर वर्षे जुने आहेत. हे ठिकाण म्हणजे केवळ एक धार्मिक वास्तू नसून
येथे पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. येथे ठेवण्यात
आलेल्या वस्तूंमध्ये उत्खननामध्ये सापडलेली दगडी हत्यारे, मातीची भांडी, बुद्धांची
पावले बनविण्याचा साचे यांचा समावेश आहे.
येथील मुख्य मंदिर चढून जाण्यास १२७२ पायऱ्या आहेत. या मंदिरामध्ये बुद्धांची
पावले पाहण्यास मिळतात. एवढ्या पायऱ्या चढून जाणे म्हणजे सोपे काम नाही. परंतु
शिखरावर गेल्यावर येथून ३६०ﹾतून दिसणारे आजूबाजूच्या प्रदेशाचे सुंदर दृश्य पाहिले की तुम्हाला श्रमपरिहार
झाल्यासारखे वाटेल.
या मंदिरास वत
थम सुआ किंवा टायगर केव्ह नाव कसे पडले याविषयी अनेक कथा आहेत. एक कथा अशी आहे की १९७५
च्या सुमारास Jumnean
Seelasettho (Ajahn Jumnean) नावाचा एक बौद्ध भिक्खू येथील गुहेमध्ये ध्यान करीत असता त्याला
गुहेमध्ये वाघ फिरताना दिसले. त्यामुळे या मंदिराचे नाव वत थम सिया असे पडले. दुसऱ्या
कथेप्रमाणे येथील गुहेमध्ये एक मोठा वाघ राहत असे. या गुहेमध्ये एका ठिकाणी वाघाच्या
पंज्यांचे ठसे दगडावर उमटलेले दिसतात. एका
गुहेचा तर आकारच वाघाच्या पंज्याच्या
आकाराचा आहे. या कारणांमुळेसुद्धा या गुहेचे नाव टायगर केव्ह पडले असावे.
थम सियाच्या आसपासचा भाग अरण्यमय आहे. येथील किरिवॉंग
व्हॅलीमध्ये पुष्कळ जुने वृक्ष आहेत. येथे भेट देण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.
परंतु त्यातल्या त्यात Tum Khon Than, Tum Lod, Tum Chang Kaeo, and
Tum Luk या गुहा अवश्य भेट देण्यासारख्या
आहेत. येथील गुहांमध्ये आणि मंदिरांमध्ये बऱ्याच Thanu पुरातन वस्तू आढळल्या. थम
सिया प्रदेश डोंगराळ असून या डोंगरांमध्ये बऱ्याच गुहा असून यांपैकी कित्येक गुहांमध्ये
अजून कुणी गेलेलेसुद्धा नाही. वत थम सिया ही चुनखडीची गुहा असून तिच्यामध्ये
सांगाडे आणि सजावट केलेल्या कवट्या ठेवल्या आहेत. थम सिया प्रदेश ध्यानासाठी
जाण्यास योग्य आहे. परंतु येथे पुरातत्त्वशास्त्रीय आणि ऐतिहासिक आकर्षणेही बरीच
आहेत. यांमध्ये दगडी हत्त्यारे, भांडी आणि बुद्धांची पावले बनविण्याचे साचे यांचा
समावेश होतो.
टायगर केव्ह टेंपल किंवा थाई भाषेमध्ये वत थम सिया हे क्रबी प्रांतामधील बौद्धधर्मीयांचे
एक पवित्र ठिकाण आहे. ज्या लोकांना धर्मिक स्थळामध्ये रस नाही, त्यांच्यासाठीसुद्धा
येथे बरीच आकर्षणे आहेत. थाई भाषेमध्ये थम म्हणजे गुहा आणि सिया म्हणजे वाघ. वत थम
सिया म्हणजे वाघाच्या गुहेचे मंदिर. वर मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यांपैकी
एक जास्त त्रासदायक आहे तर दुसरा कमी त्रासदायक आहे.
डोंगरावरून दिसणारे दृश्य अविस्मरणीय असेच आहे. वरून बुद्धमूर्तींचे
सुंदर दृश्य दिसते. येथील सनसेट पॉइंट्ससुद्धा लोकप्रिय होत चालले आहेत. विशेषत: पौर्णिमेला
सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासारखे असते. या वेळी पश्चिमेकडे अंदमान समुद्रामध्ये
सोनेरी प्रकाशामध्ये सूर्य मावळताना दिसतो. तर पूर्वेला क्रबीच्या कमी उंचीच्या
भागातून सोनेरी रंगाचा चंद्र उगवताना दिसतो. या मंदिरास दिलेले टायगर केव्ह टेंपल
नाव समर्पक आहे. कारण येथे जवळपास पसरलेले खडक पाहून वाघाच्या पंजाची आठवण येते.
हे मंदिर ध्यानासाठी प्रमुख केंद्र आहे. आव लक थानू (Ao Luk
Thanu) पर्वतरांगांमधील निवांत जागा ध्यानासाठी आदर्श आहे.
येथील मुख्य विहार एका छोट्या चुनखडीच्या गुहेमध्ये आहे. या
गुहेस लागून आणखी छोट्या छोट्या खोल्या आहेत. या खोल्यांना कुटी म्हणतात. या
भागामध्ये प्रकाश भरपूर आहे आणि येथील भागाची देखभालही चांगली ठेवली जाते. येथे
अडीचशेहून अधिक भिक्खू आणि भिक्खूणी राहतात. या भागामध्ये वृक्षतोड होण्यास येथील
भिक्खूंनी विरोध केला. त्यामुळे येथील जंगलांचे संरक्षण झाले आहे.
निसर्गप्रेमी व्यक्तीसाठी हे ठिकाण म्हणजे क्रबीच्या
पूर्वीच्या नैसर्गिक वातावरणाची छोटी प्रतिकृती आहे. येथील मुख्य मंदिरापासून ‘वंडरफुल
ट्री’ म्हणून एक वृक्ष आहे. हा वृक्ष पवित्र मानला असून त्यास वस्त्र गुंडाळले
जाते. याच्या बुंध्याचा विस्तार थायलंडमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही
वृक्षाच्या बुंध्यापेक्षा मोठा असेल. या साऱ्या भागामध्ये गुहा आणि चुनखडीचे खडक
आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांस येथे पाषाणयुगातील
वसाहतीचे अवशेष मिळाले आहेत. य अवशेषांमध्ये दगडी हत्त्यारे, कुंभारकामाचे तुकडे ,
मणी, आणि मूर्ती यांचा समावेश होतो.
टायगर केव्ह टेंपल किंवा
थाई भाषेमध्ये वत थम सिया हे क्रबीच्या ईशान्य दिशेस असणारे बौद्ध मंदिर आहे. या
भागामधील हे बौद्ध धर्मीयांचे सर्वांत मोठे पवित्र ठिकाण येथील गुहेमध्ये असणार्या
वाघाच्या पंजाच्या खुणा, उंच बुद्धमूर्ती आणि शिखरावर जाण्यासाठी असणार्या अवघड पायऱ्यांसाठी
प्रसिध्द आहे.
या भागामध्ये किरिवॉंग दरी असून हा सारा भाग जंगलांनी आहे.
या जंगलांमधील काही वृक्ष अतिशय जुने आहेत. येथे भेट देण्यासारखी बरीच ठिकाणे असून
त्यांतल्या त्यात Tum Khon Than, Tum Lod, Tum Chang Kaeo, and Tum Luk या गुहा भेट
देण्यासारख्या आहेत.
मुख्य मंदिर शिखरावर असून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग असून
पुढे हे दोन्ही मार्ग एकत्र होतात. येथे वर जाण्यासाठी एकूण १,२७२ पायऱ्या आहेत.
येथे दुसरा मार्ग असून हा मार्ग दुसर्या चुनखडीच्या गुहेकडे जातो. शिखरावरील
मंदिर ६०० मीटर्स उंचीवर आहे. पायऱ्यांत आणि मंदिरात माकडे भरपूर आढळतात.
पर्वताच्या शिखरावर बुद्धांचा २७८ मीटर्स उंचीची भव्य सोनेरी मूर्ती आहे. ही मूर्ती पर्वताच्या पायथ्याहूनसुद्धा दिसते.
<>आव नंग (Ao Nang) www.aonang.com
आव नंग तसे छोटे
शहर असून तुम्ही अर्धा तास चालत राहिलात तर शहराच्या एका टोकापासून दुसर्या
टोकाला सहज पोहचता.
आव नंग बीच हे क्रबी मधील सर्वांत जास्त गर्दी
असलेले बीच डेस्टिनेशन आहे. याचे पूर्ण नाव 'आव
फ्रा नंग' किंवा 'प्रिन्सेस बे' असे असले तरी ‘आव नंग’ हे संक्षिप्त रूपच जास्त
वापरात आहे. आव नंग हा क्रबी मधील सर्वांत जास्त पाश्चात्त्यीकरण झालेला बीच आहे.
झटपट प्रवास करणा-या प्रवाश्यांचे हे आवडते ठिकाण, एअरपोर्टवरून दूरवरून नियोजन करून येणा-या
प्रवाश्यांनी भरत चालले आहे. हा बीच राय
ले एवढा निसर्गसुंदर नाही. परंतु क्रबी ची सफर करण्यासाठी आव नंग खूप सोयीचा आहे.
याचे कारण म्हणजे येथील स्वस्त दरात
राहण्याची सोय, चांगली उपाहारगृहे आणि
प्रवाश्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करणा-या भरपूर प्रवासी संस्था.
आव नंगमध्ये वावरताना फारशी
अडचण येणार नाही. कारण येथे बहुतेक सर्व गोष्टी बीचला लागूनच आहेत. बीच पूर्व-पश्चिम
असा पसरला आहे.एअरपोर्ट रोड (हायवे ४२०३) बीचच्या पूर्व टोकाकडून उत्तरेकडे जातो.
त्यामुळे बीच आणि एअरपोर्ट रोड एकमेकांना जवळ जवळ समांतर आहेत.दोन्ही रस्ते
एकमेकांस जेथे मिळतात, त्या ठिकाणापर्यंत लॉन्ग टेल बोट्स बीचपर्यंत येतात.या होड्यांच्या पाण्याने भिजलेल्या मोटर्सचा कर्कश आवाज येऊन
ध्वनिप्रदूषण निर्माण होते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ही समस्या गंभीर
होत चालली आहे. यामुळे बीचच्या
सौंदर्यालासुद्धा बाधा येते.
आव नंगमध्ये शॉपिंग मॉल्स किंवा सुपरमार्केट्स
नाहीत. परंतु कन्व्हीनिअन्स स्टोअर्स आणि सूव्हनिर्सची दुकाने भरपूर आहेत. बहुतेक दुकाने बीचसमोरील
रस्त्यापासून लागून ओळीने आहेत.काही साइड
रोड्स आहेत. तेथेसुद्धा बरीच दुकानेआहेत . या दुकानांतून पोस्टकार्ड्स, लोहचुंबक,
स्वस्तातील दागिने, कपडे, पादत्राणे अशा
थायलंडमध्ये आढळणा-या वस्तू आढळतील.
आव नंग बीच क्रबी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कारने ४० मिनिटांच्या, क्रबी शहर आणि क्लॉंग मुअंग बीचपासून २० मिनिटांच्या तर Noppharat
Thara बीचपासून दोन
मिनिटांच्या अंतरावर आहे.
<>> फॉसिल शेल बीच
हा बीच आव नंगच्या पश्चिमेस ७
किमी अंतरावर आहे. येथे चार कोटी
वर्षांपूर्वीचे शेलफिश चपट्या खडकांच्या
स्वरूपात आहेत. हे खडक चपट्या काँक्रीट शीट्ससारखे दिसतात. येथे एक छोटे
वस्तुसंग्रहालय आणि रांगेने भेटवस्तूंची दुकाने आहेत. संग्रहालय भूशास्त्रामध्ये रस असणा-यांसाठी
उपयुक्त आहे.
<>> नोपारत थारा (Nopparat Thara) बीच
आव नंगच्या पश्चिम टोकाशी हा सुंदर बीच आहे. या बीचला
नॅशनल पार्क म्हणून घोषित केले आहे .ओहोटीच्या वेळेला तुम्ही आसपासच्या खडकाळ
चुनखडीच्या बेटांपर्यंत चालत जाऊ शकता. हा बीच क्रबी शहराच्या पश्चिमेकडे १८ किमी अंतरावर असून आव
नंग बीचला लागूनच आहे.
<>> राय ले (Rai Leh) बीच
आव नंगवरील हा आणखी एक सुंदर
बीच. या बीचवर लॉंन्ग टेल बोटीनेच जाता येते.
हा बीच मुख्यभूमीचा भाग असूनसुद्धा
चुनखडीच्या टेकड्यांमुळे मुख्यभूमीपासून वेगळा झाला आहे. आव नंग आणि नोपारत थारापेक्षा हा बीच जास्त स्वच्छ आहे.
येथे पाहण्यासारख्या काही गुहा आहेत. बीचवर हॉटेल्स आणि रिझॉर्टस आहेत. राय ले आणि को फाय फाय आयलंड जवळ जवळ आहेत. येथे सी
कयाकिंग आणि एलिफंट ट्रेकची व्यवस्था करणारे टुर ऑपरेटर्स आहेत.
<>>फ्रा नंग केव्ह
राय लेच्या पूर्व दिशेस असणारी ही गुहा तेथील अद्भुत स्टॅलक्टाइट्स
आणि स्टॅलक्माइट्ससाठी प्रसिध्द आहे. फ्रा नंगचा अर्थ आहे राजकन्या. कोळी लोकांचा
असा विश्वास आहे की ही गुहा पुराणातील समुद्री राजकन्येचे घर आहे. पूर्वीच्या काळी
कोळी लोक समुद्रात जाण्यापूर्वी येथे काही भेटवस्तू अर्पण करून जात. येथे भेटवस्तू
अर्पण केली असता मासेमारीमध्ये यश येते आणि समुद्रातील धोक्यांपासून रक्षण होते अशी कोळी लोकांची श्रद्धा आहे. या गुहेमध्ये
लाकडाची बरीच शिवलिंगे ठेवली आहेत. या शिवलिंगास भेटवस्तू अर्पण केली असता
वंध्यत्व दूर होते असा येथील लोकांचा विश्वास आहे.
<>>को पोडा (Poda) किंवा
पोडा आयलंड
को पोडा हे बेट आव नंगपासून आठ किमी अंतरावर असून आव नंगपासून
बोटीने येथे पोहचण्यास २५ मिनिटे लागतात. हे बेट अतिशय छोटे असून त्याचा व्यास एक
किमीपेक्षा जास्त नाही. हे बेट नारळाच्या झाडांनी वेढले असून बेटावर अतिशय मऊ अशी
पांढरीशुभ्र वाळू आहे. बीचपासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर
पोवळ्याच्या खडकांची रांग असून तेथे विविध प्रकारचे सागरी प्राणी आढळतात.
स्नॉर्केलिंगसाठी हे बेट सोयीचे आहे. त्यामुळे स्नॉर्केलर्स आणि एक दिवसाची सहल
करणाऱ्या प्रवाश्यांचे हे आवडते बेट आहे. तरीसुद्धा या बेटावर फार वर्दळ आढळत
नाही. या बेटावर वर्षभरात कधीही जाता येते. कारण येथे मॉन्सूनमध्ये फारसा फरक पडत
नाही.
<>> टुप (Tup) आयलंड
टुप आयलंडला आव नंग बीचवरून जाता
येते. येथे जाण्यासाठी लॉंग टेल बोट सोयीची आहे. कारण या बोटीचे भाडे स्पीड
बोटच्या जवळ जवळ निम्मे भरते. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारा इंग्रजी Y
आकाराचा वाळूचा पट्टा. या पट्ट्यावरून इतर दोन बेटांना जाता येते. हे बेट स्नॉर्केलिंगसाठी योग्य आहे. उन्हाळ्यात येथे बरेच पर्यटक पोहातानाहे दिसतील.
क्लॉंग (Klong Muang) मुअंग आणि तुबकाक (Tubkaak) बीचेस
क्लॉंग मुअंग बीच : क्रबी शहरापासून चोवीस किमी आणि आव नंगपासून
वीस मिनिटांच्या राइडच्या अंतरावर हा पांढर्याशुभ्र वाळूचा शांत बीच आहे. येथे
तुम्ही बीचवरील रेस्तराँमध्ये बसून ताज्या
सीफूडचां आस्वाद घेत सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहो शकतात. तुम्हाला खरेदी आणि
निशाजीवन हवे असेल तर आव नंग बीच जवळच आहे. तुमच्यासाठी येथून दिवसभराच्या सहली, कयाकिंग,
डायव्हिंग, स्नोर्केलिंग इत्यादीची व्यवस्था हॉटेलमधून किंवा आसपास असणार्या
प्रवासी संस्थांमधून होऊ शकते.
तुबकाक
बीच: क्रबी शहरापासून तीस किमी अंतरावर हा शांत बेच आहे. येथून हॉंग आयलंडचे सुंदर दृश्य दिसते. येथून जवळच काव हांग नाक (Kao Hang Nak) फॉरेस्ट जवळच आहे. येथे पंचतारांकित रिझॉर्ट्ससह सर्व
सुखसोयी आहेत. खरेदी आणि निशाजीवनासाठी आव नंग बीच वीस मिनिटाच्या ड्राइव्हवर
आहे. How to get there?
क्रबी – बेटे
को गाय/काय (Gai/Kai) किंवा हुआ ख्वान (Hua Khwan) किंवा चिकन
आयलंड:
या बेटावरील एका खडकाचा आकार कोंबडीच्या डोक्याप्रमाणे
दिसतो. त्यामुळे या बेटास चिकन आयलंड असे नाव पडले आहे. या बेटाच्या एका टोकास उंच
कडे आहेत तर दुसऱ्या द्वीपकल्पाच्या आकाराच्या बाजूस सुंदर बीचेस आहेत. भरतीच्या
वेळेस द्वीपकल्पाची बाजू पाण्याने भरून येते आणि छोटे बेट तयार होते. या बेटावर
राहण्याची सोय आहे. येथे पोवळ्याचे खडक भरपूर आहेत. येथील पाणीसुद्धा स्वच्छ आणि
ऊबदार आहे. त्यामुळे येथे स्नॉर्केलिंगसाठी
भरपूर वाव आहे. या बेटावर वर्षभरात कधीही जाता येते. कारण येथे मॉन्सूनमध्ये फारसा
फरक पडत नाही.
को फी फी :
क्रबी मधील प्रवासकार्यक्रम
दिवस १
क्रबी मध्ये आगमन.
स्थळदर्शन
आव नंग (Ao Nang) बीच, वत थम सुआ (Wat Than Sua) किंवा टायगर केव्ह.
क्रबी समुद्रातील बेटांचा धावता दौरा
करून फ्रा नंग (Phra
Nang) केव्ह, टुप (Tup) आयलंड,
चिकन आयलंड, पोडा आयलंड ही ठिकाणे पाहणे.
३ . परिशिष्टे
उपयुक्त संकेतस्थळे:
www.yourkrabi.com
Krabi-andaman chaa paachoo
www.krabi.com
|
Krabi vishayee thodakyaat maahitee |
|
Krabi he Southern Thaialand chyaa pascchim kinaaryaavareel shahar aahe. |
|
He shahr krabi nadeechyaa mukhaashee vasale aahe. |
|
2005 madhye Krabi chee lokasankhyaa 24,986 hotee. |
|
Krabi shahar he Krabi praant aani Krabi jilhyaachee raajadhaanee aahe. |
|
Yetheel pramukh vyavasaay paryatan haach aahe. |
|
Bangkok paasoon Krabi rastyaane sumaare 800 kimee antaraavar aahe. |
|
Yaachyaa uttares Phang Nga, Nakhon Si Thammarat he praant tar poorves
Surat Thani aani dakshines Trang haa praant yetaat. |
|
Krabichyaa kshetraamadhye Andaman samudraamadheel sumaare 132 bete
yetaat. |
|
Tyaanpaikee, Lanta Islands, Ko Phi
Phi Don aani Ko Jum ashaa baryaach betaanvar lokavastee aahe. |
|
Krabi praantaache aath prashasakeey vibhaag aahet. |
|
Krabi praantaachaa ekoon vistaar 4709 kimee aahe. |
|
Krabi chee ekoon lokasankhyaa 395,000 asoon yaapaikee 60% lokasankhyaa
bauddh asoon 40% lokasankhyaa muslim aahe. |