Friday, October 11, 2024

दिगंबरा दिगंबरा (भजन)



(c) Dr Hemant Junnarkar, All rights reserved

(प्रस्तुत भजन १८ चरणांचे असून ते सकाळ, दुपार, संध्याकाळ दोन दोन वेळा म्हटले तर 'दिगंबरा दिगंबरा' मंत्राचा १०८ वेळा जप होईल. या भजनात श्रीदत्तांची नावे आहेत. त्यामुळे श्रीदत्ताचे नामस्मरण होईल. शिवाय या भजनात श्रीनवनाथादी दत्तसंप्रदायातील अवतारांचा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचेही स्मरण होईल. वाचकांनी जरूर प्रतिक्रिया कळवाव्यात.)

दिगंबरा दिगंबरा (भजन)

ब्रह्मा-विष्णु-शिवस्वरूपा

परब्रह्मा विश्वेश्वरा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १ ||


भावातीता द्वंद्वातीता

त्रिगुणातीता निर्विकारा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || २ ||


अवधूता अत्रिनंदना

रुद्रा श्रीशैलवनचरा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || ३ ||


अनसूयात्मज भक्ततारका

दयासागरा मनोहरा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपादवल्लभ दिगंबरा || ४ ||


चित्स्वरूपा आनंदकंदा

सर्वव्यापी जगदाधारा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ५ ||


भक्तरक्षका गिरिधरा

सृष्टिचालका जगदीश्वरा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ६ ||


षड्रिपुनाशक    भवभयहारक

कलिमलक्षालक सुरवरा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ७ ||


भूतप्रेतभयहारका

सर्वमंगला शुभंकरा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा || ८ ||


कामधेनुच्या पालका 

श्वानरूपवेदाधारा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपादवल्लभ दिगंबरा || ९ ||


वास गाणगापुरी तुझा

औदुंबरतळ तुझा निवारा

दिगंबरा दिगंबरा

श्रीपाद वल्लभ दिगंबरा || १० ||


श्रीपाद होसी पिठापुरा

नृसिंह अन् नृसिंहपुरा 

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || ११ ||


मच्छिंद्रा अन् गोरक्षा

गहिनीनाथा जालंदरा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १२ ||


कानिफनाथा भर्तृहरी 

चर्पटी-रेवण-नागेश्वरा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १३ ||


शेगावीच्या गजानना

शिर्डीच्या साईश्वरा 

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा ||१४||


अक्कलकोटी स्वामी समर्था

धनकवडीच्या श्रीशंकरा 

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा ||१५ ||


वासुदेव माणगावी

नित्यानंद गणेशपुरा 

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १६ ||


कलियुगात नानारूपे

अवतरसी भक्तोद्धारा 

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १७ ||


माथी वाहीन तुझ्या पादुका

भावभक्तिने गुरुवरा

दिगंबरा दिगंबरा 

श्रीपादवल्लभ दिगंबरा || १८ ||

|| श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ||