Thursday, April 16, 2026

श्रीसाईसच्चरित-अध्याय ३१

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय ३१         

दर्शनमहिमा            

(ओवीसंख्या १६८)

या अध्यायात काय आहे

चिंतन: या अध्यायास श्री दाभोळकरांनी दिलेले दर्शनमहिमाहे नाव अति व्यापक आहे. विजयानंद या संन्याशास बाबा त्याचा अंतसमय जवळ आला आहे हे जाणून श्रीमद्भागवताच्या वाचनास बैसवितात. बाळाराम मानकरांस ' मी केवळ शिरडीतच नाही तर सर्वत्र आहे,' असा दृष्टांत देतात. अंतकाळ जवळ आलेला वाघ बाबांच्या चरणांपाशी प्राण सोडतो.

 

*      अध्यायारंभ. मानससरोवरास जाऊ इच्छिणाऱ्या विजयानंद नावाच्या संन्याशाचा अंतकाळ जवळ आला आहे हे जाणून बाबा त्यास भागवतपाठ करण्यास बैसवितात आणि विजयानंद शिरडीतच निर्वाण पावतो   (-६३)

*      बाळाराम मानकर या आपल्या भक्तांस बाबा मच्छिन्द्रगडावर राहावयास पाठवतात. तेथे त्यांना  समाधिवस्थेत किंवा स्वप्नामध्ये नाही, तर जागृतावस्थेत साईदर्शन होते आणि मन: शांती लाभते (६४-११८)

*       बाबांच्या चरणापाशी येताच आजारी वाघास मुक्ती मिळाली. अध्यायाचा समारोप (११८-१६८)

बाळाराम मानकरांस मच्छिन्द्रगडावर साईदर्शन

बाळाराम मानकर या आपल्या भक्तांस बाबा मच्छिन्द्रगडावर राहावयास पाठवतात. तेथे त्यांना  समाधिवस्थेत किंवा स्वप्नामध्ये नाही, तर जागृतावस्थेत साईदर्शन होते आणि मन: शांती लाभते (६४-११८)

उपकथा:- बाळाराम मानकर पुण्याहून दादरला गाडीने जाण्यास निघाले असता एक कुणबी त्यांना दादरचे तिकीट आणून देतो आणि दिसेनासा होतो

आजारी वाघास मुक्ती

बाबांच्या चरणापाशी येताच आजारी वाघास मुक्ती मिळाली. अध्यायाचा समारोप (११८-१६८)

वाघ तो अति दीन I झाला बाबांपाशी लीन II कर्म त्याचे दूर करुनी I दिली मुक्ती बाबांनी II

बाघ बूढा अति दीन I बाबा के चरणों में हुआ लीन Ii बाबा ने की उस पर दया I जन्म-मरण से छुटकारा दिया II

વાધ ઘરડો અતિ દીન I બાબા ના ચરણો મા થયો લીન II બાબા નું મન અતિ કરુણ I છૂટ્યું  વાઘ નું જન્મ-મરણ II

वृद्ध: व्याघ्र: अतिदीन: I साईनाथस्य चरणयो: लीन: II साईनाथेन कृपया दृष्टम् I भग्नमभवत् व्याघ्रस्य कष्टम् II

There was an old ailing tiger I  To whom Baba gave shelter II

Baba eyed him with compassion I  And gave him salvation II


No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...