Monday, September 8, 2025

इंग्रजी भाषेच्या लीला

Can , able to की manage to

मित्रांनो, can , able to आणि manage to , तीन सारख्या दिसणाऱ्या शब्दरचना. पण तिन्हींमध्ये फरक आहे. चला आपण समजावून घेऊ या.

Can:

एखादा मनुष्य जेव्हा म्हणतो, I can pay, तेव्हा तो खालील गोष्टी गृहीत धरतो:
माझी पैसे देण्याची ऐपत किंवा क्षमता आहे. उदा. एखाद्या माणसाला ₹१०,००० द्यायचे आहेत तर त्याची प्राप्ती तेवढी असली पाहिजे, त्याच्या बॅंक खात्यात तेवढे पैसे असले पाहिजेत. 
Able to:

एखाद्या मनुष्य जेव्हा म्हणतो, I am able to pay, तेव्हा या क्षणाला त्याच्याकडे पैसे आहेत. म्हणजे एखाद्या मनुष्याची पैसे देण्याची क्षमता आहे, पण त्या वेळी त्याच्याकडे पैसे नसतील तर he is not able to pay. 

Able to म्हणजे या क्षणाला ती व्यक्ती ती गोष्ट करीत आहे, त्याची क्षमता आहे की नाही, माहीत नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे able to च्या आधी to be चे कुठले तरी रूप म्हणजे am, is , are आले पाहिजे. नुसतेच able to म्हणणे चुकीचे होईल. 

आता भूतकाळात बोलायचे असेल तर can चे could होईल, able to तसेच राहील, पण to be चे भूतकाळातील रूप, जसे was किंवा were येईल.

भविष्यकाळात can तसेच राहील, able to तसेच राहील, पण be च्या आधी भविष्यकाळ दाखवण्यासाठी त्याआधी shall किंवा will येईल. जसे, I can pay tomorrow किंवा I will be able to pay tomorrow.

अर्थ स्पष्ट करण्यासाठी आणखी एक चांगला शब्दसमूह म्हणजे managed to. याचा अर्थ म्हणजे जेमतेम, कसेबसे केले. हा बहुतेक भूतकाळातच वापरला जातो.

आता पहा,
I could pay, but I was not able to pay as I had no cash. At last I borrowed from a friend and managed to pay.

The bus was slow and I could/was able to easily catch it. 
The bus was fast, but I managed to catch it.


Can चा आणखी एक उपयोग म्हणजे परवानगी मागण्यासाठी.

Can I use your phone please- मी तुमचा फोन वापरू का?
Can I sit here please-मी येथे बसू शकतो का?
(नम्रता दाखवण्यासाठी please  हा शब्द हवा)
आता तुम्ही I can able to pay म्हणणार नाही ना? 🚫 

आता तरी can आणि able to यांचा वापर तुम्ही योग्य प्रकारे करू शकाल का? तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

Curds आणि Yoghurt:
curds म्हणजे दही असे आपण शिकतो. पण दुकानात आल्यावर आपल्याला curds कुठेच दिसत नाही. सगळीकडे yoghurt च दिसते. हा काय प्रकार आहे ते आपण समजून घेऊ या.


No comments:

Post a Comment