Wednesday, September 24, 2025

तुम्ही कुठल्या क्रिया नियंत्रित करू शकता?


'तुम्ही कुठल्या क्रिया नियंत्रित करू शकता?' हा रटाळ मथळा वाचून ही पोस्ट स्किप करण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर थांबा. कारण अशा क्रिया माहीत झाल्या तर तुम्ही अचूक इंग्रजी वापरू शकता.

1. See vs Look
तुमचे डोळे उघडे असले की डोळ्यांसमोर जे काही आहे, ते तुम्हाला दिसणारच. तुम्हाला काय दिसेल यावर तुमचे नियंत्रण नाही. मग म्हणा, I see. 
I came on the road and saw a crowd.
पण तुम्ही ठरवून कुठे पाहता, ती झाली तुमच्या नियंत्रणातील क्रिया.
I looked at the crowd and saw there was an accident.

2. Hear vs Look
डोळे तरी झाकता येतात. कान बंद केले तरी ऐकू येतच राहते. अशी ऐकण्याची क्रिया आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. मग गोंगाट ऐकू आला तर काय म्हणणार?
I hear the noise.
पण काही गोष्टी आपण आपल्या निर्णयाने ऐकतो, जसे- संगीत. मग म्हणणार:
I listen the music.
कानावर पडत असेल तर 
I hear the music सुद्धा बरोबर आहे. पण दोन्हींमध्ये हा फरक आहे.

काळाची निवड:
आणखी एक गोष्ट. नियंत्रणाबाहेरील क्रियांसाठी simple tense म्हणजे साधा काळ वापरायचा, imperfect tense नाही. 
म्हणजे I see बरोबर आहे, I am seeing नाही.
I hear बरोबर आहे, I am hearing नाही.

आपल्या भावभावना सुद्धा अशाच आपल्या नियंत्रणात नसतात. काही आवडणे, न आवडणे आपल्या हातात नसते. तेव्हा I like बरोबर, I am liking नाही. 

तीच गोष्ट love, hate यांच्यासाठी. 
आता McDonald जाहिरात करतात I am loving it, पण ती जाहिरात झाली.

अशा तुम्हाला आणखी काही नियंत्रणातील आणि नियंत्रणाबाहेरील क्रिया सुचत असतील, प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा.

© Dr Hemant Junnarkar
All rights reserved



No comments:

Post a Comment