मे फील्ड गार्डन (Mayfield Garden)ची सफर :
© Dr Hemant Junnarkar, All rights reserved
Mayfield Garden Location : 530, Mayfield Road, Oberon, New South Wales 2787, Australia, approximately 200 KMs west of Sydney Open 9.00am Address: 530
Mayfield Road Contact: +61 2 6336 3131 info@mayfieldgarden.com.au Website: www.mayfieldgarden.com.au
|
मित्रांनो, २५ एप्रिल २०२४ ला ऑस्ट्रेलियामध्ये ॲंझॅक डेची सुट्टी असल्याने आम्ही मे फील्ड गार्डनची सफर केली. या सफरीचा थोडक्यात वृत्तांत येथे दिला आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
मेफील्ड गार्डनची वैशिष्ट्ये:
Water Garden and Bluestone Bridge
Mobility-friendly Camelia Walk
Grotto
16.5 Metre Obelisk, Pond and Allee of London
Sandstone Gallery
Valley of the Five Ponds
Iron and Stone Arbour
Copper Tree Fountain
The Famous Mayfield 1.4km English Box Hedge Maze
Croquet Lawn
Rowing on the Lake
Family Chapel
Amphitheatre
Water Cascade
Stumpery
Moss Creek Garden
Herbaceous Border
१९८४ मध्ये मे हॉकिन्स नावाच्या कुटुंबाने मेफील्ड नावाचे फार्म घेऊन सुरुवातीला केवळ कसण्यासाठी शेत म्हणून बाळगलं होतं. आता हे फील्ड स्थानिक लॅंडस्केपर्स आणि व्यापारी लोकांच्या मदतीने निव्वळ घोड्यांच्या तबेल्यांपासून या खाजगी मालमत्तेचं जगातील एक थंड वातावरण असलेल्या उद्यानांमध्ये रूपांतर केलं आहे.
या उद्यानाची प्रेरणा युरोपातील उद्यानांवरून घेतली आहे. उद्यानाचा विस्तार ६५ हेक्टर्स (१६० एकर्स) असून उद्यान ख्रिसमस आणि बॉक्सिंग डे हे दोन दिवस सोडून वर्षभर पर्यटकांसाठी उघडे असते.
हॉकिन्स परिवार नियमित युरोपला भेट देत असतात. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय दर्जाप्रमाणे या कॅफे मध्ये पदार्थांचे आयोजन करतात. परंतु यामध्ये मुख्यतः ऑस्ट्रेलियन लोकांच्या आवडीनिवडींचा विचार केला जातो.
येथील रिटेल सेंटरमध्ये जॅम्स, पिकल्स असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत. शिवाय येथे थंड हवामनास उपयुक्त असे निरनिराळे प्लांट्स सोयीस्कर पॉट्समध्ये विक्रीसाठी उपल्ब्ध आहेत.
आम्ही इन्फर्मेशन सेंटरमधून उद्यानाचा नकाशा घेतला आणि उद्यानात प्रवेश केला. उद्यानात प्रवेश करण्यापूर्वी नकाशा जरूर घ्यावा. कारण येथे प्रत्येक उद्यानात प्रवेश केला की दुतर्फा कधी न पाहिलेली अशी सुंदर रंगीबेरंगी झाडे दिसू लागतात.
Box Hedge Maze:
(Box Hedge Maze वरून असा दिसतो)
हा एक व्यवस्थित कटिंग केलेल्या झाडांच्या भिंती असलेला एक बॉक्सच्या आकाराचा चक्रव्यूह आहे. यात शिरले की फक्त चालत राहायचे. मध्ये मध्ये हिंट देणाऱ्या छोट्या पाट्या आहेत. तुम्ही नुसते चालत राहता. त्यामुळे हिंट पाहण्याचा मोह आवरत नाही. मध्यभागी गेल्यावर छोट्या पायऱ्या असलेली शिडी चढून वर जाऊन सेल्फी घ्यायची. परत येतानासुद्धा तीच हालत होते.
Water Garden:
या वॉटर गार्डनचे क्षेत्रफळ २.५ हेक्टर आहे. येथे सुंदर तलाव असून तलावात लिलीची कमळासारखी फुले फुललेली दिसतात.
नौकानयन:
येथील तलावामध्ये नौकानयन किंवा बोटिंगला परवानगी आहे. तुम्हाला बोट घेऊन स्वतः वल्ही मारत त्यांच्या सूचनांचा पालन करून बोटिंग करावं लागतं.
Copper Tree Fountain:

No comments:
Post a Comment