Thursday, May 7, 2026

श्रीसाईसच्चरित अध्याय ३६ साईसर्वव्यापकता तदाशीर्वचनसाफल्यता

 


श्रीसाईसच्चरित 

अध्याय ३६          

साईसर्वव्यापकता तदाशीर्वचनसाफल्यता                 

(ओवीसंख्या १७०)

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ

*      दोन गोमांतकवासी गृहस्थांच्या कथा

o   नि:स्पृह म्हाळसापति (उपकथा)

o   दुसरा गृहस्थ पुढे सांगतो:

o   दुसऱ्या गृहस्थाचा शिरडीला जाण्यासाठी कुलाब्याहून नावेने प्रवास

o   श्री. दाभोलकरांचे विवेचन

*      सखाराम औरंगाबादकर यांच्या पत्नीला बाबांच्या आशिर्वादाने पुत्रप्राप्ती

    कथा . पहिल्या गृहस्थाने नोकरी लागल्यानंतर पहिला पगार (पंधरा रुपये) अर्पण करण्याचा दत्तात्रेयांना नवस बोलून तो नवस पूर्ण केलेला नसतो. म्हणून बाबा त्याच्याकडून पंधरा रुपये मागून घेतात.

    कथा २. दुसरा गृहस्थ बाबांना पस्तीस रुपये दक्षिणा म्हणून देऊ करतो. बाबा त्याचे पैसे घेत नाहीत. बाबा त्याची पूर्वकथा तंतोतंत सांगतात.

    (हंसराज नावाचा व्यापारी म्हाळसापतींना पैसे देऊ करतो. परंतु, 'बाबांच्या परवानगी शिवाय मी पैसे घेत नाही,' असे सांगून ते पैसे परत करतात)

अर्थ: मी स्वप्नात बाबांस पाहिले. स्वप्नातच मी बाबांना माझा प्रवासाचा संकल्प सांगितला. पुढे स्वप्नातच असे पाहिले की मला नावेत चढण्याची मनाई करण्यात आली. स्वप्नातच असे पाहिले की एका शिपायाच्या प्रयत्नाने मला नावेत प्रवेश मिळाला

हिंदी साईसच्चरितात ही कथा अशी दिली आहे:-

कुलाब्यामध्ये एका रात्री मी स्वप्नात साईबाबांना पाहिले. मग मला शिर्डीला भेट देण्याचे माझे वचन आठवले. मी गोव्यात पोहोचलो आणि तिथून मला बॉम्बेला स्टीमरने जायचे होते आणि नंतर शिर्डीला जायचे होते. पण जेव्हा मी किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा मला दिसले की स्टीमर खचाखच भरलेला होता आणि जागाच उरली नव्हती. कॅप्टनने मला स्टीमरमध्ये चढण्याची परवानगी दिली नाही, पण एका अज्ञात शिपायाच्या सल्ल्यानुसार मला स्टीमरमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली आणि अशा प्रकारे मी मुंबईला पोहोचलो. मग मी ट्रेनमध्ये चढलो आणि इथे पोहोचलो.

 (सखाराम औरंगाबादकर यांच्या पत्नीला पुत्र नसतो. त्यामुळे बाबांची भेट करवून देण्यास ती शामास विनंती करते. शामा युक्तीने तिची बाबांशी भेट घडवून आणतो आणि तिचे काम करून देतो.)







No comments:

Post a Comment

Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai

Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...