Monday, November 3, 2025

पटाया - पटाया बीच आणि बरेच काही

 

पटाया हे एके काळचे मासेमारीचे खेडेगाव. परंतु व्हिएटनाम युद्धामध्ये अमेरिकन सैनिक विश्रांती घेण्यासाठी करण्यासाठी येथे येऊ लागले आणि पटायाचे स्वरूप पूर्णपणे बदलूनच गेले. आज पटाया हे एक प्रमुख पर्यटन केंद्र झाले आहे. पटाया म्हटले की आपल्या डोळ्यांपुढे येतो तो पटाया बीच आणि तेथील विविध जलक्रीडा. पटाया बीच आणि तेथील जलक्रीडा अविस्मरणीय आहेतच परंतु त्याशिवाय पटायामध्ये पाहण्यासारखे आणि अनुभवण्यासारखे बरेच काही आहे. येथील अल्काझार शो जगप्रसिद्ध आहे. याशिवाय रिप्लेज बिलीव्ह इत ऑर नॉट, मिनी सयाम अशी सुंदर प्रेक्षणीय स्थळे पटायामध्ये आहेत. पटायामधील निशाजीवन प्रसिद्ध आहे आणि बदनामही आहे. एक गोष्ट निश्चित की पटाया म्हणजे न संपणारी करमणूक आहे.              

१.      परिचय

पटायाविषयी झटपट माहिती

स्थान:थायलंडच्या पूर्व किना-यावर चोनबुरी प्रांतामध्ये, बँकॉकपासून १४७ कि.मी. अंतरावर.

क्षेत्रफळ:२०८.१ चौ. कि. मी. (मुख्य भूमी ५३.४४ चौ. कि. मी. आणि बेटे आणि समुद्र मिळून १५४.६६ चौ. कि. मी.)

लोकसंख्या:३ ते ५ लाख

जाण्यास  योग्य  वेळ:ऑक्टोबर ते मार्च   

पटायाचा भूगोल

पटाया      शहर  थायलंडच्या   आखाताच्या  पूर्व  किना-यावर  एका  सुंदर  उपसागराच्या  किनारी  वसले  आहे. १९६०  सालातील  एका  छोट्या  मासेमारीच्या  खेडेगावातून  त्याचा  आग्नेय  आशियातील  एक  महत्त्वाचे  पर्यटनस्थळ  म्हणून  विकास  झाला  आहे. येथील  भरपूर  सूर्यप्रकाश  असलेले  समुद्रकिनारे  विशेषत: युरोपिअन    लोकांना  फार  आवडतात . येथे  जगभरातून  पर्यटक  सुट्टीचा  आनंद लुटण्यासाठी , मजा  करण्यासाठी  आणि  आरामदायक  बीच  रिझॉर्ट्स  मध्ये  राहण्यासाठी  येतात .

हवामान:

पटायाचे  हवामान  विषुववृत्तीय  प्रकारचे  असल्याने  वर्षभरामध्ये  हवामानामध्ये  फारसे  बदल  घडत  नाहीत. तरीसुद्धा  हवामानाचे  ठळकपणे  तीन  विभाग  पाडता  येतात  आणि  ते  भारतातील  हवामानाशी  साधारणपणे  मिळते  जुळते  आहेत.

मार्च ते मे - या  काळामध्ये  हवामान  अतिशय  उष्ण  आणि  दमट  असते . तापमान ४०° सेल्सिअस पर्यंत जाते.

जून ते ऑक्टोबर- हा काळ पावसाळ्याचा असून पाउस पूर्ण दिवस किंवा पूर्ण रात्रभर क्वचितच पडतो. पावसाळ्यातील तापमान दिवसा किंवा रात्री २५° ते ३०° सेल्सिअस असते.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी - हे महिने हिवाळ्याचे असून दिवसा तापमान ३०° तर रात्री २०° असते. त्यामुळे पटायाला जाण्यास हाच काळ सर्वांत योग्य आहे.   

पटायाचा थोडक्यात इतिहास

पटाया नावाची कथा

१७६७  ब्रह्मी आक्रमकांनी अयुथयाचा विध्वंस केला. यावेळी  राजा नसल्याने लष्कराचे नेतृत्व थाकसिन किंवा फ्रया ताक (Phraya Tak) या सेनापतीकडे आले.  थाकसिनला पर्यायी सुरक्षित शहराची गरज भासत होती. त्यामुळे तो तो चांताबुरी (Chantaburi)   वर  चाल  करून  आला . वाटेत त्याची  गाठ   स्थानिक नेता नोई क्लोम (Noi Klom) च्या  सैन्याशी  पडली . परंतु नोई क्लोम फ्रया ताकच्या  भारदस्तपणामुळे तसेच  त्याच्या  सैन्याच्या  शिस्तीमुळे  दबून  गेला  होता . त्यामुळे नोई क्लोमने  लढाई    करताच  शरणागती  पत्करली . दोन्ही  सैन्याची  जेथे  गाठ  पडली  त्या  ठिकाणास  थाप फ्रया (Thap Phraya) असे  नाव  पडले .  थाप फ्रयाचा  अर्थ  फ्रयाचे  सैन्य’ . पुढे  हे  नाव  पथाया  (Phatthaya) असे  झाले .

पटाया नावाची आणखी एक व्युत्पत्ती अशी आहे की ‘पथायाचा  अर्थ   ईशान्येकडून  नैऋत्येकडे   वाहणारा  वारा. हा  वारा  पावसाळ्याच्या  सुरुवातीस  वाहतो . या पथायाचे  पुढे  पटाया असे  नाव  झाले. (थाई भाषेतील उच्चार 'पातेया' असा होतो.) 

पटायाचा  पर्यटन  स्थळ  म्हणून  उदय  आणि  विकास: 

पटाया हे  पूर्वी एक  मासेमारीचे  गाव  होते.आजच्या  पटायाच्या  इतिहासाची   सुरुवात  अगदी अलिकडे म्हणजे १९६०  सालापासून  होते. या  सुमारास  बँकॉकमधून  बरेच  लोक सुट्टीचा  वेळ  घालविण्यासाठी   पटायाला  येउ  लागले. व्हिएटनाम युद्ध  चालू  असताना  अमेरिकन  सैन्यासाठी   पटायाजवळच  युथापाओ (UTapao) हा  विमानतळ  बांधण्यात  आला  आणि  अमेरिकन  सैनिक  पटायाकडे  वळले. येथून  पटायाचा  एक पर्यटनस्थळ  म्हणून  इतिहास  सुरू  होतो. १९८०  मध्ये  पर्यटनव्यवसायास  तेजी  आली. थायलंडमध्ये  जगभरातून  पर्यटकांचा ओघ  सुरू  झाला. बरेच  पाश्चिमात्य    लोक  थायलंडकडे  आकर्षित  झाले   आणि  त्यांनी  पटायामध्ये  स्थायिक  होउन  तेथे   बार ,   रेस्टॉरंट्स्    सुरू  केले. पटायाचा  पर्यटन  स्थळ  म्हणून  विकास  होण्यामध्ये  या  पाश्चिमात्य  लोकांचा  मोठा  वाटा  आहे.

पटायाला कसे जावे

पटायाच्या जवळचा विमानतळ म्हणजे U-Tapao–Rayong–Pattaya International Airport (UTP) हा आहे. हा विमानतळ पटायापासून सुमारे ४५ किमी दक्षिणेस आहे. तो प्रामुख्याने देशांतर्गत आणि काही आशियाई आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरला जातो. भारतामधून थेट उड्डाणे सध्या नियमित नाहीत (अल्पकाळासाठी काही चार्टर फ्लाइट्स होतात).

त्यामुळे पटायाला जाण्यासाठी बॅंकॉकहून रस्त्याने जाणे हाच चांगला मार्ग आहे. पटाया बॅंकॉकपासून फक्त १३०–१५० किमीवर आहे — म्हणजे प्रवास अगदी सोपा आहे. 

बँकॉकहून पटायाला रस्त्याने जाताना प्रवास अतिशय सुरळीत, सरळ आणि आरामदायी आहे.  शहराच्या गजबजीतून बाहेर पडताच उंच इमारतींची रांग मागे राहते आणि समोर खुल्या, रुंद हायवेचा विस्तार दिसू लागतो. 

थायलंडची उत्कृष्ट एक्सप्रेसवे व्यवस्था, स्वच्छ रस्ते आणि दोन्ही बाजूंना असलेली हिरवाई हा प्रवास आनंददायी बनवते. मार्गात काही ठिकाणी छोटे टेकाडे, कधी कधी रबर व नारळांच्या लागवडीचे प्रदेश, तर अधूनमधून दिसणारी छोटी थाई गावांची झोपडीवजा घरे, असे ग्रामीण थायलंडचे दर्शन होते. 

मार्गात Bang Pakong नदीवरील विस्तीर्ण पुलावरून काही क्षण सुंदर नदी-दृश्य दिसते. पुढे चोनबुरी प्रांतात प्रवेश होताच कारखाने, लॉजिस्टिक पार्क्स आणि Laem Chabang या मोठ्या समुद्रबंदराचे कंटेनर यार्ड्स रस्त्यालगत जाणवू लागतात.

प्रवास जसजसा पुढे जातो तसतसे वातावरणात समुद्राची झाक जाणवू लागते. हायवेवर अधूनमधून थाई फूड-स्ट्रिट्स, ७-इलेव्हन स्टोअर्स किंवा सर्व्हिस एरिया दिसतात, जिथे प्रवासी थोडा ब्रेक घेऊ शकतात. अखेर पटायाच्या हद्दीत प्रवेश करताच नीऑन साइनबोर्ड्स, रिसॉर्ट्सची रांग आणि बीचकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांची हालचाल दिसू लागते—जे पटाया हे खरेच एक उत्साहपूर्ण, समुद्रकिनारी वसलेले पर्यटन शहर आहे, याची जाणीव करून देते.

पटाया पर्यटनाचा २ दिवसांचा  प्रवासकार्यक्रम

दिवस १ – बँकॉक – पटाया

बँकॉकमध्ये आगमन.

कोचने  बँकॉकहून पटायाला प्रस्थान.

पटायामधील स्थळदर्शन  :- नॉँग  नूच  व्हिलेज.

नॉँग नूच  व्हिलेजमधील स्थळदर्शन :- ऑर्किड  गार्डन,  पॉटरी  गार्डन ट्रॉपिकल  गार्डन वगैरे.

नॉन्ग  नूचमधील कार्यक्रम :- थाई कल्चरल  शो एलिफंट  शो.

संध्याकाळचा  कार्यक्रम :- अल्काझार  शो.

दिवस २ –  पटाया

कार्यक्रम:-स्पीड बोट  राइड , पॅरासेलिंगकाचेचा  तळ  असलेल्या  बोटीने सफरकॉरल  आयलंड    मधील  स्वच्छ  निळ्या  पाण्यामध्ये  पोहणे.

स्थळदर्शन  :-

मिनी  सयामपटाया  पार्क  टॉवर

पटाया  पार्क  टॉवरमधील कार्यक्रम:- टॉवर  जंप /केबल  राइड

खरेदी:- लोटस मॉल.

कार्यक्रम:- थाई मसाज.

Nong Nooch Tropical Garden (नॉंग नूच ट्रॉपिकल गार्डन)
https://www.nongnoochpattaya.com/en 

नॉँग नूच ट्रॉपिकल गार्डन हे   दक्षिण पटायामधील   एक  आकर्षक  पर्यटनस्थळ  आहे.    नॉंग नूच ट्रॉपिकल गार्डन ही  फक्त एक बाग नाही, तर एक विशाल थीम पार्क व बोटॅनिकल गार्डन संकुल  आहे. या गार्डनचा परिसर सुमारे ६०० एकर्स ( २.४ चौकिमी)   इतका पसरलेला आहे. या विस्तारावरून या गार्डनच्या भव्यतेची कल्पना यावी.

आता तुम्ही ही बाग पाहायला जात आहात तर व्यवस्थित नियोजन करा. नाहीतर या बागेत जाऊन अमुक एक आकर्षण पाहायचे राहिले असे वाटायला नको. त्यासाठी आधीच या बागेची व्यवस्थित माहिती घ्या. या बागेची भेट म्हणजे एक शैक्षणिक मनोरंजन आहे. तेव्हा प्रवेश करतानाच बागेचा नकाशा मागून घ्या आणि नकाशाप्रमाणे बाग बघत जा.

Nong Nooch Garden हे तिकीट-आधारित आकर्षण आहे. एकदा प्रवेश तिकीट घेतल्यावर संपूर्ण बाग, थीम गार्डन्स, तलाव, पादचारी मार्ग, डायनॉसॉर व्हॅली यांसारखी मुख्य आकर्षणे पाहता येतात. मात्र थाई सांस्कृतिक शो, हत्ती शो, sightseeing bus tour, animal-feeding, तसेच e-cart / सायकल यांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. त्यामुळे प्रवाशांनी बाग पाहताना कोणते अनुभव समाविष्ट घ्यायचे याचे नियोजन प्रवेशद्वारावरच करावे.

Nong Nooch Garden मधील सर्व तिकीटे—प्रवेश, शो, sightseeing bus tour—ही बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मिळतात. आतल्या आकर्षणांच्या ठिकाणी स्वतंत्र तिकीट-विक्रीची व्यवस्था नाही. त्यामुळे आपल्याला कुठली आकर्षणे पाहावयाची आहेत त्यांचे सुरुवातीलाच नियोजन करावे.

बाग खूप मोठी असल्याने बरेच जण बस टूर घेतात. बस टूरचा फायदा असा की बस      नकाशावरील विविध स्पॉट्सवर बस थांबते. तुम्ही बसमध्ये बसून संपूर्ण बाग शांतपणे पाहू शकता.  तुमचा वेळ वाचतो व उन्हापासून बचाव होतो.    

इतिहासपिसित (Pisit) आणि  नॉँग नूच तान्साचा (Nong Nooch Tansacha) यांनी  १९५४ साली या बागेची स्थापना केली.  १९८०  मध्ये  हे  व्हिलेज लोकांसाठी  खुले करण्यात  आले. 

🏞️ गार्डन्स व विभाग

Nong Nooch मध्ये अनेक थीम असलेली गार्डन्स आहेत — काही प्रमुख: 

French Garden —  हे गार्डन फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) पॅलेस गार्डनच्या धर्तीवर बनवले आहे. अत्यंत सममितीय (symmetrical) व भौमितिक (geometric) रचना, झुडपांना दिलेली टॉपियरी कटिंग—प्राणी, आकृती, भूमितीय आकार, सरळ रेषांचे मार्ग, मध्यवर्ती अक्ष (central axis) या रचनेमुळे दूरवरून पाहिल्यास ही बाग शिस्तबद्ध, राजेशाही शैलीतील वाटते.

European / Italian Garden —  ही बाग
फ्रान्ससह इटली, इंग्लंड, स्पेन, जर्मनी यासारख्या विविध देशांच्या बागांची मिश्र शैलीत बनवली आहे. काही भागात इंग्लिश गार्डनची नैसर्गिक, अनौपचारिक रचना तर काही ठिकाणी इटालियन स्टेप्ड टेरेसेस, शिल्पे, फाउंटन, रंगीबेरंगी फुलांची जागा, विविध युरोपियन वास्तुकला-शैलींची झलक पाहायला मिळते. येथे सममिती कमी पण नैसर्गिक सौंदर्यावर भर जास्त आहे.

Orchid & Bromeliad Display Garden —  येथे  तुम्हाला  थायलंडमधील    ऑर्किडचा  सर्वांत  मोठा संग्रह  पाहावयास  मिळेल. 
येथील  ऑर्किड  फुलांच्या  जाती येथील  पाम -गार्डन  तसेच  जगाच्या  कानाकोप-यातून   आणून   लावलेली  फुलझाडे  तसेच  शोभेच्या  वनस्पती यांसाठी  प्रसिद्ध  आहे. येथे फुलांच्या  ताटव्यांमधून  फिरत   अक्षरश: लाखो  फुलांचे  विविध  रंग  आणि  सुगंध  यांचा  अनुभव तुम्ही  घेऊ शकता. 
Bromeliad (ब्रोमेलियाड / ब्रॉमिलियाड) ही Bromeliaceae या कुलातील एक सजावटी वनस्पतींची प्रजाती आहे. ही वनस्पती उष्ण कटिबंधात (tropical regions) नैसर्गिकरीत्या वाढते—दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, कॅरिबियन येथे यांचे जास्त प्रमाण आहे.

Cactus & Succulent Garden / Cactus Nursery — येथे विविध प्रकारचे कॅक्टस, सुक्युलेंट्स, काही दुर्लभ प्रजातीं सह आहेत. 

Butterfly Hill / Flower Display Areas रंगीबेरंगी फुले, आकर्षक लँडस्केपड फ्लोरल डिस्प्ले हे या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे.

Palm / Cycad Collection —येथे जगातील काही मोठ्या पाम प्रजातींसह, तडाखेबाज पाम्स आणि सायकॅड्सचे मोठे संकलन पाहायला मिळेल.

Cycad ही लाखो वर्षांपासून अस्तित्वात असलेली (living fossil) प्राचीन, पामसारखी पण वेगळी अशी बीजवनस्पती (gymnosperm) आहे.

Stonehenge Garden, Pottery Garden:
Stonehenge Garden  मध्ये UK मधील Stonehenge मध्ये जसे उभे मेगालिथिक दगड व त्यावर आडवे ठेवलेले स्लॅब्स, तशीच रचना  तयार केली आहे.
Stonehenge हे इंग्लंडमधील विल्टशायर येथे असलेले प्रागैतिहासिक दगडी वर्तुळ (stone circle) आहे, ज्यातील उभे प्रचंड दगड सूर्याच्या हालचालींशी संरेखित आहेत. हे सुमारे 3000–2000 BCE दरम्यान बांधले गेले असून त्याचा उपयोग विधी, खगोल निरीक्षण किंवा स्मारक म्हणून केला गेला असावा असे मानले जाते. इतक्या प्राचीन काळी हे कसे बनवले असावे, ते संशोधकांना अजूनही कळले नाही.

पॉटरी  गार्डनमध्ये  थायलंडमधील पारंपरिक  पद्धतीने  बनविलेल्या  मातीच्या  भांड्यांपासून  बनविल्या विविध  शिल्पाकृती पाहण्यास मिळतील.

🎭 शोज व मनोरंजन

Nong Nooch फक्त बाग नाही — येथे विविध प्रकारचे शोज आणि मनोरंजन योजना आहेत: 

थाई कल्चरल शो:
या शोमध्ये मध्ये  थायलंड च्या  निरनिराळ्या  सांस्कृतिक  कार्यक्रमांचा  समावेश  होतोया शोमध्ये काही थाई क्रीडाप्रकारसुद्धा दाखवण्यात येतातते म्हणजे थाई बॉक्सिंगहातात काठ्या घेउन लढाई वगैरे. 

एलिफंट शो:

या  शोमध्ये  थायलंडचे प्रतीक  असणारे    हत्ती  निरनिराळ्या  करामती  करून  दाखवितात. या  करामतींमध्ये    सायकल  चालविणे फुटबॉल, बास्केट बॉल खेळणे  यांचा  समावेश  होतो. हे हत्ती तुम्हाला रस्सीखेच खेळण्यासाठी बोलावतात. पण यातील अंगावर शहारे आणणारा खेळ म्हणजे हत्तीने माणसाच्या अंगावर चालून दाखविणे. या हत्तींच्या थक्क करून सोडणा-या आणखी करामती म्हणजे कवाईत करून दाखविणेडार्ट फेकणे, डिस्को नृत्य करून दाखवणेचित्रे काढणे वगैरे. 


“डायनासोर व्हॅली (Dinosaur Valley)” — डिजिटल पद्धतीने जीवन-आकाराच्या डायनासोरांच्या प्रतिकृती, प्रागैतिहासिक प्राण्यांच्या रूपात रचना, मुलांसाठी विशेष आकर्षण. 

Animal Sculptures, Rock Gardens, Water Features, Lakes & Lakeside Villas — तलाव, पुल, जलदृश्य, व्हिला / लॉजिंग पर्याय. 

✨ इतर काही आकर्षणे (फक्त गार्डन नव्हे तर संपूर्ण अनुभवासाठी)

Skywalk / Elevated Walkways — बागेच्या वरील रांगांवरून संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य. 

On-site Restaurants आणि Food Courts — थाई, आंतरराष्ट्रीय पदार्थ, तलावासमोरील भोजन. 

Accommodation Options — गार्डन परिसरातच रिजॉर्ट / व्हिला आहेत — ज्यामुळे रात्री थांबणे शक्य. 

Photo Spots, Sculptures, Creative Landscaping — बागा, प्राण्यांच्या शिल्पे, themed décor, फोटोसाठी उत्तम. 

या गार्डनमध्ये प्रवेश करताच अवाढव्य डायनॉसॉर्सच्या प्रतिकृती जिथे तिथे दिसू लागतात.


वाफे  आणि  त्यांवरील  फुले  पाहून  तुम्ही  हरखून  जाल .


 


नॉँग नूच व्हिलेजमधील शोनॉँग नूच व्हिलेजमध्ये विविध प्रकारचे शोज चालू असतात. येथे काही शोजची माहिती दिली आहे. 



इतर आकर्षणे: याशिवाय नॉँग नूच व्हिलेजची खालील प्रमुख आकर्षणे आहेत.

नॉँग नूच रोप ब्रिज वॉकनॉँग नूचमधील कार कलेक्शन आणि  कॅक्टस गार्डन यांच्यामध्ये एक छोटी नदी असून या नदीवर एक झुलता पूल आहे. या झुलत्या पुलावरून अतिशय सुंदर दृश्य पहाण्यास मिळते.

नॉँग नूच स्काय वॉक: नॉँग नूचमधील स्काय वॉकची कल्पना अभिनव अशीच आहे. स्काय वॉकच्या उंची मुळे    तुम्हाला उंचावरून शोभा दिसते एवढेच नव्हे तर तुम्ही वृक्षांच्या वरील भागाच्या अगदी जवळ  असल्यामुळे एरवी तुमच्या दृष्टी पलिकडे असणा-या वृक्षांच्या   वरील भागाचे जवळून निरीक्षण करू  शकता.

नॉँग नूच व्हिलेजमधील उद्यानेअसंख्य उद्याने हे नॉँग नूच व्हिलेजचे मोठे आकर्षण आहे. यांपैकी काही उद्यानांची खाली माहिती दिली आहे:-


युरोपिअन गार्डन:  युरोपिअन पद्धतीमधून  प्रेरणा घेउन  बनविण्यात  आलेले  हे आणखी  एक  उद्यान. येथे  फ्रेंच,  ग्रीक  आणि  इटालिअन प्रकारची   शिल्पे  ठेवण्यात  आलेली  असून  येथे  फिरताना  आपण  युरोपिअन  उद्यानामध्ये   फिरत  आहो  असे  वाटते .

बटरफ्लाय गार्डन: नॉँग नूच व्हिलेजमधील  कल्पक  लँडस्केपिंगचा  हा  आणखी  एक  उत्तम    नमुनायेथील  हिरवळीस    आणि  वनश्रीस  असे  आकार देण्यात आले  आहेत  की  ते  पाहताना  फुलपाखरांच्या  कमनीय  आकारांची आठवण येईल.

अंब्रेला गार्डन: येथील  पाम आणि  सायकॅड (cycad) च्या  नैसर्गिक  हिरव्या  रांगांमधून    लाल  आणि  सोनेरी  रंगाच्या  छत्र्या  दिसून  येतात. येथील  अजस्र  मुंग्यांच्या  प्रतिकृती  पाहून  तुम्हाला  वेगळ्या  जगात  आल्यासारखे  वाटेल.

कॅक्टस गार्डनयेथे  जगभरातून  आणलेल्या  तसेच  कलम  केलेल्या  कॅक्टसच्या  जाती  पाहून  तुम्ही  थक्क  व्हाल. हो , परंतु  कॅक्टसच्या जास्त  जवळ  जाउ  नका नाहीतर  रंगाचा  बेरंग  होईल.

टोपिअरी  ट्रीज: टोपिअरी याचा  अर्थ  झाडांना  निरनिराळ्या  प्रकारचे  आकार  देणे. येथील  ग्रोव्ह गार्डन  मध्ये  झाडांना  इतके  विविध  आकार  देण्यात  आले  आहेत  की  ते  पाहून  तुम्ही  थक्क  व्हाल.

फ्लोटिंग  ओअसिसयेथील  नॉँग नूच पाँटून (Pontoon) लेक मध्ये  तलावाच्या  पाण्यावर  तरंगणारॆ  झुडुपांचे  


येथील फ्रेंच गार्डन, आर्किड व ब्रॉमेलिआड डिस्प्ले, कॅक्टस व सायकॅड्सचे संग्रह, पाम्स व सुकेक्युलेंट बागा, Butterfly Hill, Stonehenge Garden यांसारख्या २०+ थीम-निहाय बागा आहेत. त्याबरोबरच येथे दैनिक सांस्कृतिक नृत्य-शो, हत्ती शो, प्रागैतिहासिक डायनासोर व्हॅली (life-size डायनासोर प्रतिकृती), तलाव, झु, झाडांची रंगत, फुलांची भरमार आणि लँडस्केप डिज़ाइन एकत्र आहे. हे सर्व एकत्र येऊन Nong Nooch ला करून देते — एक असा ठिकाण जिथे वनस्पती, निसर्ग, कला, मनोरंजन आणि विश्रांती — हे सगळे अनुभव एकाच दिवशी मिळू शकतात. त्यामुळे या गार्डनसाठी एकदा तरी पूर्ण दिवस राखावा, आणि यापेक्षा कमी नाही.




अप्रतिम बाग, सांस्कृतिक शो आणि हत्तींची प्रात्यक्षिके.



२.      प्रवास

प्रमुख विभाग / रस्ते:

Pattaya Second Road पटाया सेकंड रोड
पटाया बीच रोडला समांतर परंतु बीचपासून फारसा लांब नसणारा हा आणखी एक मध्यवर्ती वर्दळीचा रस्ता आहे. निशाजीवन आणि खरेदीच्या दृष्टीने पटाया बीच रोडचे सर्व फायदे या रस्त्याला मिळू शकतात. शिवाय हॉटेल्सचे दरही थोडे कमी होतात. आतील बाजूस असल्यामुळे पटाया बीचसारखे समुद्राचे दृश्य मिळू शकत नाही.

South Pattaya and Walking Street (साऊथ पटाया आणि वॉकिंग स्ट्रीट)

वॉकिंग स्ट्रीट: रात्रीचे नाइटलाइफ, रेस्टॉरंट्स, लाईव्ह म्युझिक — पटायाची सर्वात प्रसिद्ध गल्ली.

हा भाग साऊथ पटाया रोडच्या दक्षिण बाजूस लागूनच आहे. याच्या डाव्या बाजूस पटाया हिल तर दक्षिण बाजूस यॉम्टिअन (Jomtien)  बीच आहे. फिरण्यासाठी वॉकिंग स्ट्रीट चांगला परंतु कुप्रसिद्ध निशाजीवन. येथे निनच्या प्रकाशामध्ये सौदे ठरतात. पटायातील उत्कृष्ट खरेदी येथे होऊ शकते. त्याचप्रमाणे चांगल्या रेस्तराँना सुद्धा भेट देता येईल. येथील बहुतेक हॉटेल्स आतील बाजूस असल्याने तेथून समुद्र दिसू शकत नाही. सयाम बेशोअर हॉटेलसारखे बीचफ्रंट सँक्चुअरी यास अपवाद आहे.


North Pattaya, Wong Amat and Naklua (नॉर्थ पटायावाँग अमात आणि नक्लुआ)

सेंट्रल आणि साऊथ पटायापेक्षा नॉर्थ पटाया भाग अधिक शांत आणि कमी वर्दळीचा आहे. नॉर्थ पटायासुद्धा सिटी सेंटरचा भाग आहे. अल्काझार आणि टिफनी कॅबरे शोसँक्चुअरी फ ट्रुथ ही येथील काही आकर्षणे आहेत. नॉर्थ पटाया बीचसुद्धा बीच चेअर्स आणि छत्र्यांनी भरलेला आहे. येथेसुद्धा सर्व प्रकारच्या जलक्रीडा उपलब्ध आहेत. ज्या पर्यटकांना शांत वातावरण हवे आहेत्यांच्यासाठी वाँग अमात आणि नक्लुआ भाग चांगले आहेत. शिवाय पटायामधील बहुतेक महत्त्वाची आकर्षणे येथून दहा मिनिटाच्या अंतरावर आहेत.

पटाया  नॉर्थ भागात   तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे  हा भाग आरामशीर चालणे आणि समुद्रस्नानासाठी योग्य आहे.

Pattaya Beach Road (पटाया बीच रोड)
हा चार किमी लांबीचा चंद्रकोरीच्या आकाराचा अतिशय निसर्गरम्य असा रस्ता आहे. याच्या बाजूला पटाया बीचची सुंदर वाळूप्रॉमनेड आणि पामची झाडे आहेत. रस्त्याला लागून लक्झरी हॉटेल्सदुकानेबार्सरेस्तराँ आणि मार्केट स्टॉल्सची गर्दी आहे. हा रस्ता भरपूर रहदारीचा आहे. रस्त्याचे दक्षिण टोक पटायाच्या बदनाम निशाजीवनासाठी कुप्रसिद्ध आहे. रस्त्याची उत्तर बाजू तुलनेने विरळ वस्तीची आणि कमी वर्दळीची आहे. पटायामधील बरेच सुप्रसिद्ध रिझॉर्टस या रस्त्याला आढळतील. पटाया बीचवर असल्यामुळे त्यांचे दरसुद्धा त्याप्रमाणे महागडे आहेत. थोडे वाजवी दर हवे असतील तर बीच रोड आणि पटाया सेकंड रोडला जोडणा-या पटाया बीच रोडला कट करणा-या छोट्या रस्त्यांमध्ये शिरायचे.

👁️ प्रेक्षणीय स्थळे:

Art in Paradise (आर्ट इन पॅराडाईस) 3D आर्ट गॅलरी – फोटोग्राफीसाठी उत्तम.

Pattaya Beach पटाया बीच
जेट स्की, पॅरासेलिंग, बोट राईड, बनाना बोट अशा जलक्रीडा.

आता आपण जाणार आहोत पटाया बीचवर, जो तुम्ही कितीदा चित्रांतून, चित्रपटांतून पाहिला असेल — ज्या बीचवरील सफर कितीतरी प्राइझ स्कीमचं आकर्षण असते आणि जो बीच पाहणं अनेकांचं आयुष्यभराचं स्वप्न असतं.

पटाया बीच हा सुमारे चार किलोमीटर लांबीचा चंद्रकोरीसारखा किनारा आहे. या किनाऱ्यालगत सुंदर प्रोमेनेड, पामची झाडं, लक्झरी हॉटेल्स, रेस्तराँ, बार्स आणि बाजारपेठा यांची रांग लागलेली दिसते. एकेकाळी हे छोटं मासेमारीचं खेडं होतं, पण व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकन सैनिक येथे विश्रांतीसाठी येऊ लागले, आणि तेव्हापासून पटायाचं रूपांतर एका जागतिक पर्यटन केंद्रात झालं.

आज पटाया बीच जगभरातील पर्यटकांना आपल्या रंगीबेरंगी वातावरणामुळे, वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, जेट-स्कींग, सनबाथिंग आणि नाईटलाइफ मुळे आकर्षित करतो. दरवर्षी सुमारे एक कोटीहून अधिक पर्यटक पटायाला भेट देतात, आणि त्यांपैकी बहुतेकांचे पहिले पाऊल याच पटाया बीचवर पडते.

या बीचची सकाळ शांत, दुपार जलक्रीडांनी गजबजलेली, आणि रात्र उजळणाऱ्या दिव्यांनी व संगीताने जिवंत असते — म्हणूनच पटाया बीचला म्हणतात,
“The beach that never sleeps — न संपणाऱ्या उत्सवाचा किनारा.”

पटाया बीचवरील उपक्रम:   

स्पीड बोट राइडपटाया बीचवर स्पीड बोट राइड सेवा देणारे  निरनिराळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. या स्पीड बोट राइडमध्ये आपल्या पैशाचा जास्तीत जास्त मोबदला देणारे पॅकेज निवडणे उत्तम. स्पीड बोट राइडमध्ये तुम्ही खालील गोष्टी करू शकता:-    

मंकी आयलंडकॉ लार्न आणि इतर बेटांचा फेरफटका.

डीप  सी  फिशिंग स्पिअर फिशिंग   स्नॉर्केलिंग वॉटर स्की    आणि  वेक बोर्डिंग   सुपर  जेट  स्की  टूर्स  वगैरे क्रीडा प्रकार.

बार्बिक्यूड्रिंक्स आणि संगीत यांसह पार्टी.      

पॅरासेलिंग:   हा क्रीडाप्रकार पटायाबरोबरच जॉम्टिएन (Jomtien) बीच आणि कॉ लार्न आयलंड येथे साधारण नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान चालतो. याचे ऑपरेटर बीचवरच असतात.  स्पीड बोटच्या सहाय्याने तुम्हाला ते खोल समुद्रात नेऊन अंगात जॅकेट घालूनडोळ्यांस त्रास होऊ नये म्हणून गॉगल लावून आणि पट्ट्यांच्या सहाय्याने पॅराशूट तुमच्या अंगाला बांधतात. थोड्याच वेळात तुम्ही पक्ष्याप्रमाणे आभाळात झेपावता. या उंचीवरून तुम्ही पटायाचा किनारा उंचावरून पाहू  शकता. पॅराशूटचे दोर बोटीला बांधले असल्यामुळे धोका नसतो. परंतु हा क्रीडाप्रकार निश्चितच साहसी लोकांसाठी आहे.           

Ripley's Believe it or not Museum
रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट म्युझियम: थरारक आणि मनोरंजक प्रदर्शन

रॉबर्ट लेरॉय रिप्लेच्या बिलीव्ह इट र नॉटवरून प्रेरणा घेऊन या  म्युझिअमची निर्मिती केली आहे. येथे विविध विषयांवर आधारित अशी दहा दालने
असून या दालनांमध्ये मिळून एकूण तीनशे विभाग आहेत. रिप्लेच्या तुम्हाला माहीत असलेल्या आणि नसलेल्या आणि या भूतलावर असू शकतील यावर तुमचा विश्वासही बसणार नाहीअशा अनेक गोष्टी तुम्हाला या म्युझिअममध्ये पाहावयास मिळतील. हे म्युझिअम पाहून तुमचा जगाकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोनच बदलून जाईल.

Khao Pattaya View Point पटाया व्ह्यूपॉइंट 
शहराचा अप्रतिम सूर्यास्त दृश्य

Koh Larn or Coral Island (कॉ लार्न किंवा कॉरल आयलंडची सफर)

थायलंडच्या आखातामध्ये कॉ लार्न हे सुंदर बेट आहे. थाई भाषेमध्ये 'कॉम्हणजे बेट आणि कॉ लार्न म्हणजे पोवळ्याचे बेट. हे बेट पटाया बीचपासून फक्त सात किमी अंतरावर आहे. बेटाची  लांबी  ४ किमी आणि  रुंदी २ किमी आहे. यावरून या बेटाच्या लहान आकाराची कल्पना येईल.  बेटाची वस्ती जेमतेम १ हजार आहे.  बेट डोंगराळ असून येथे  पाऊस भरपूर पडतो. त्यामुळे बेट अरण्यमय आहे.  या अरण्य़ांमध्ये माकडे आणि इतर वन्य प्राणी पुष्कळ आहेत.     

पर्यटकांसाठी कॉ लार्नमध्ये भरपूर आकर्षणे आहेत. पर्यटक येथे पॅरासेलिंगस्नॉर्केलिंगजेट स्की बनाना  बोट अशा विविध क्रीडा प्रकारांचा आनंद लुटू शकतात किंवा मनसोक्त पोहूही शकतात. बेटावर एक शुटिंग रेंजसुद्धा आहे. यांशिवाय येथे बायसिक्लिंग आणि हायकिंगचीही मजा घेण्यासारखी आहे. येथे ब-याच बायसिक्लिंग इव्हेंट्स झाल्या आहेत. काही चित्रपटांचे शुटिंगसुद्धा येथे झाले आहे. बेटावर राहण्याची चांगली सोय आहे. बेटावर खाण्यापिण्याची रेलचेल आहे. त्यामध्ये ताजे सी फूड आस्वाद घेण्यासारखे आहे. ब-याच पर्यटकांचे कॉ लार्न इतके आवडते ठिकाण आहे की ते नियमित येथे येतातइतकेच नव्हे तर पूर्ण सुट्टी येथेच घालवितात. 

कॉ लार्नच्या आसपास इतरही लहान लहान बेटे आहेत.  त्यांमध्ये को रीन (Koh Rin)को फाय (Koh Phai)को साक (Koh Sak)को ख्रॉक (Koh Khrok) या बेटांचा समावेश होतो. या सर्व बेटांवरील  पर्यटकांसाठी आकर्षणे जवळ जवळ सारखीच आहेत

Mini Siam (मिनी सयाम): थायलंड आणि जगातील प्रसिद्ध स्मारकांची लघुरूपे.

मिनी सयाम या पार्कमध्ये जगप्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती (miniature) पाहावयास मिळतात. या प्रतिकृती मूळ  वास्तूंपेक्षा २५ पटीने लहान आहेत. या पार्कचे मिनी सयाम आणि मिनी युरोप असे दोन मुख्य विभाग आहेत. या प्रकल्पाची सुरुवात १९८५ साली झाली आणि १९८६ सालापर्यंत २९ राय क्षेत्रामध्ये बांधकाम झाले. (१ राय म्हणजे १,६०० चौ. मीटर). पार्कच्या इतर भागामध्ये बुकिंग हॉल्स सूव्हनिर शॉप्स आणि पार्किंग लॉट्स् आहेत.

येथे असणारे बँकॉकचे डिमॉक्रसी मॉन्य़ुमेंट ही  या पार्कमधील सर्वांत पहिली बनविलेली प्रतिकृती असून ती बनविण्याचे श्रेय श्री. कासम किएत्साकुल (Kasem KasemKietsakul)  यांच्याकडे जाते. या प्रकल्पाची रचना करण्याआधी श्री. कासम यांनी ब-याच देशांचा प्रवास केला.नेदर्लंड्स् मधील मदुरोदम आणि तैवानमधील विंडो ऑन चायना पाहिल्यावर त्यांना असे वाटले की थायलंडमध्येसुद्धा असे पार्क करता येईल.

मिनी सयाम विभाग : या विभागामध्ये थायलंडमधील प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. त्यांमध्ये थायलंड मधील बुद्धमंदिरे तसेच ऐतिहासिक स्मारके इत्यादी  वास्तूंचा समावेश होतो. थायलंडचा दौरा करण्यापूर्वी या विभागास भेट दिल्यास तुम्ही पुढे कुठली ठिकाणे पाहणार आहात याची कल्पना येईल.

मिनी युरोप विभाग: या विभागामध्ये युरोपमधील प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती पाहावयास मिळतील. त्यांपैकी काहींची  नावे  खाली दिली आहेत:-  

देश

:

वास्तू

ऑस्ट्रेलिया 

:

द ऑपेरा हाऊस

कंबोडिया 

:

अंकोर वत

फ्रान्स

:

आयफेल टॉवर

भारत

:

ताजमहाल

यू एस ए

:

द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

हा पार्क पाहण्यास दोन तासांचा अवधी हवा. हा पार्क रात्री पाहण्याची वेगळी मजा आहे. कारण रात्री सुंदर लायटिंगमध्ये या  प्रतिकृतींची शोभा अधिक सुंदर दिसते. शिवाय वातावरणही थोडे थंड असते. 

Pattaya Hill (पटाया हिल)

पटाया बेच्या दक्षिण टोकाशी ही छोटी टेकडी आहे. टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी वळणावळणाचा रस्ता आहे. पटाया हिलवर अलिशान सोयी असलेले रिझॉर्टसमोठी उद्यानेउत्कृष्ट रेस्तराँ अशा सर्व सोयी आहेत. येथील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न असून येथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. रिझॉर्टसमध्ये करमणुकीच्या भरपूर सोयी आहेत. पटाया बीचपेक्षा कमी वर्दळ असलेला यॉम्टिअन बीच येथून जवळच आहे.


Big Buddha Hill बिग बुद्धा हिल (Wat Phra Yai): उंच टेकडीवर बसलेली विशाल बुद्ध मूर्ती आणि शहराचे दृश्य.

Jomtien Beach (जोम्टियन बीच) शांत, स्वच्छ आणि परिवारासह पोहण्यास योग्य.

या बीचवर पटाया बीचपेक्षा कमी वर्दळ आहे. या बीचला लागूनसुद्धा दुकानेरेस्तराँहॉटेल्सची रेलचेल असलेला बीच रोड आहे. इतर सोयी पटाया बीचप्रमाणेचउलट थोडे वाजवी दर मिळू शकतात.




Pattaya Floating Market  (पटाया फ्लोटिंग मार्केट ): थायलंडच्या पारंपरिक बाजाराचा अनुभव – बोटीवरून खरेदी आणि स्थानिक पदार्थांची चव.

या मार्केटचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौकिमी आहे. थायलंडच्या उत्तरईशान्यमध्य आणि दक्षिण भागांतून विविध वस्तू येथे विक्रीसाठी येतात. याशिवाय रोज दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम असतो. माणसांनी चालवावयाची चार माणसे बसू शकतील अशी होडी तुम्ही अर्ध्या तासासाठी भाड्याने घेऊ शकता. थायलंडच्या चार प्रदेशांत असणा-या विविध प्रकारच्या शेकडो लाकडी घरांतून फिरणे हा एक वेगळा अनुभव वाटेल.      

Sanctuary of Truth ( सॅंक्च्युरी ऑफ ट्रुथ)
 पूर्णपणे लाकडात कोरलेले भव्य मंदिरसदृश बांधकाम — पटायातील सर्वात वेगळे स्थळ:
 
ही वास्तू मंदिर किंवा महालासारखी दिसत असली तरी या वास्तूस मंदिरही म्हणता येत नाही की महालही म्हणता येत नाही. यास थाई कारागिरीचे स्मारक म्हणता येईल. याची निर्मिती संपूर्णपणे सागाच्या लाकडाची असून येथे धर्मतत्त्वज्ञानकला आणि संस्कृती अशा विविध विषयांवर शिल्पकृती असून त्यांमधून सृष्टीची प्राचीन दृष्टीप्राचीन ज्ञान आणि पौर्वात्य तत्त्वज्ञान व्यक्त झाले आहे.

Tiffany Show and Alcazar Show
 संध्याकाळी पाहण्याजोगा प्रसिद्ध ट्रान्सजेंडर कॅबरे शो.

टिफनी आणि अल्काझार ही नॉर्थ पटायामधील दोन वेगवेगळी थिएटर्स आहेत. Tiffany’s Theater Second Road वर,  तर Alcazar Theater, Second Road वरच, पण थोडे दक्षिणेकडे.  तुम्ही दोन्ही ठिकाणी सहज चालतही जाऊ शकता — पण शोच्या वेळा वेगवेगळ्या असतात.

टिफनी थिएटरमध्ये होणारा टिफनी शो व अल्काझार थिएटरमध्ये होणारा अल्काझार शो हे कॅबरे शैलीतील ट्रान्सजेंडर (लेडीबॉय) परफॉर्मन्स शो आहेत, पण ते भिन्न व्यवस्थापन चालवतात. दोन्हींचा दर्जा, सेट्स, वेशभूषा आणि संगीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहे.

बँकॉकमध्ये काही हॉटेल्स आणि थिएटर्समध्ये छोट्या प्रमाणावर कॅबरे शो होतात. फुकेतमधील  Simon Cabaret Show सुद्धा प्रसिद्ध आहे.
तरीही पटाया हे थायलंडचे कॅबरे राजधानी म्हणून ओळखले जाते.

Tiffany Show ची मूळ कल्पना खुन पिचाय सुथिथुमरोंग (Khun Pichai Suthithumrong) या थाई उद्योजकांची. त्यांनी एक छोटा शो रेस्टॉरंटमध्ये सुरू केला, पण त्याच्या लोकप्रियतेमुळे नंतर मोठे थिएटर उभारले गेले. या शोचा त्याचा उद्देश होता थायलंडमधील ट्रान्सजेंडर कलाकारांना सन्माननीय व्यासपीठ देणे हा होता.

थाई समाजामध्ये  लेडी बॉइजना मान्यता आहे आणि त्यांना कुणीही त्रास देत नाही. हे लेडी बॉइज  इतके सुंदर दिसतात की कुणी सांगितल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या स्त्रीत्वाविषयी शंकासुद्धा येणार नाही.

१९७० च्या दशकात पटायामध्ये सामान्य स्त्रियांचे नाइट शो आणि डान्स बार आधीपासूनच चालत होते. परंतु त्या काळात काही ट्रान्सजेंडर कलाकारांनी आपले रूपांतर केलेल्या कलात्मक परफॉर्मन्सचे सादरीकरण सुरू केले. त्यावेळी पर्यटकांना हे अनोखे आणि आश्चर्यकारक वाटले — आणि ते लोकप्रिय झाले. हळूहळू त्या शोना स्वतंत्र ओळख मिळाली, आणि १९७४ मध्ये “Tiffany’s Show” हा पहिला व्यावसायिक, शालीन, सांस्कृतिक ट्रान्सजेंडर कॅबरे शो सुरू झाला. त्याच धर्तीवर “Alcazar” नंतर सुरू झाला.

सुरुवातीला हा मनोरंजन व्यवसाय म्हणूनच सुरू झाला. पण हळूहळू ते तृतीयपंथीयांसाठी रोजगार, आत्मसन्मान आणि सामाजिक ओळख निर्माण करणारा व्यासपीठ ठरले.

आज Tiffany आणि Alcazar मध्ये काम करणारे कलाकार नृत्य, मेकअप, संगीत, व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत व्यावसायिक प्रशिक्षण घेतात. त्यामुळे हे शो केवळ “मनोरंजन” नाहीत, तर समाजातील एका घटकासाठी सन्मानाचे माध्यम बनले आहेत. त्यामुळे आपण पटायाला गेल्यास हा शो पाहून या कलाकारांच्या पाठीवर  शाबासकीची थाप जरूर द्यावी.

या शोमध्ये  रंगीबेरंगी पोशाख घालून  नर्तक  गीतनृत्याचा कार्यक्रम सादर करतात. या नृत्यास सुंदर प्रकाशयोजना आणि संगीत यांची साथ असते. नर्तकांच्या गाण्यामध्ये 'सवद्दीहा स्वागतपर शब्द वारंवार येतो. 'सवद्दीहा शब्द संस्कृत 'स्वस्तिम्हणजे 'कल्याण असोया शब्दावरून आला आहे.

नृत्य झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडीच्या नर्तकाबरोबर फोटो काढू शकता. 

Tiffany Theatre and Tiffany Show (टिफनी थिएटर आणि टिफनी शो) 
https://www.tiffany-show.co.th/
हा 1974 मध्ये सुरू झालेला थायलंडमधील पहिला ट्रान्सजेंडर कॅबरे शो. “Tiffany” हे नाव अमेरिकन/युरोपीय सौंदर्याची झलक देण्यासाठी वापरले गेले — कारण त्याचे उद्दिष्ट एक ग्लॅमरस, ब्रॉडवे-शैलीतील सादरीकरण तयार करणे होते.
हा शो अधिक पारंपरिक आणि प्रतिष्ठित मानला जातो.

Alcazar Theatre and Alcazar Show: अल्काझार  थिएटर आणि अल्काझार शो 
https://www.alcazarthailand.com/

हा शो 1981 मध्ये सुरू झाला. “Alcazar” हा स्पॅनिश शब्द आहे,  त्याचा अर्थ आहे  राजवाडा. नावावरूनच दिसते की या शोचा हेतू होता भव्य राजवाड्यासारख्या मंचावर रंगतदार दृश्य सादर करणे. हा शो अधिक आधुनिक, उत्साही आणि प्रकाशयोजनांवर आधारित आहे.

फेत्राकुल (Phettrakul) फॅमिली ही अल्काझार कॅबरेचे संस्थापक आणि मालक.  अल्काझार हे   सुरुवातीला छोटे थिएटर होते. सुरुवातीला फ्लोअर स्टेज  आणि तंत्रसामग्री अतिशय सुमार दर्जाची होती. व्यवसायसुद्धा फारसा फायदेशीर नव्हता. परंतु फेत्राकुल फॅमिलीने चिकाटीने कार्यक्रमाचा दर्जा उंचावत नेला आणि आज अल्काझार एक जगप्रसिद्ध कार्यक्रम झाला आहे. आजपर्यंत दहा लाखाहून  अधिक लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे.

आजचे अल्काझार थिएटर म्हणजे १२०० आसनी, ४४० कर्मचारी असलेले भव्य आणि सुसज्ज थिएटर आहे.येथे अत्युच्च दर्जाची 'सर्कल सराउंड डी टी एस सिस्टीमआणि अत्याधुनिक कॉंम्प्य़ुटर तंत्रज्ञान वापरले आहे. अल्काझार शो आज जागतिक दर्जाचा कार्यक्रम असून त्याची तुलना पॅरीसच्या लिडो (Lido) आणि  मूलिन रूग (Moulin Rouge)  या कार्यक्रमांशी होऊ शकते.        

अल्काझार कॉम्प्लेक्समध्ये थाई रेस्टॉरंटकॅफे आणि गिफ्ट शॉपसुद्धा आहे.


Khao Kheow Open Zoo (खाव खू  ओपन झू)

खाव खू यास झूपेक्षा वन्यजीवन संवर्धन आणि संशोधन केंद्र म्हणता येईल. येथे ८,००० पेक्षा जास्त प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी मिळत्या जुळत्या वातावरणामध्ये मोकळे फिरत असतात. तुमच्या कारमधून किंवा झूच्या ट्राममधून तुम्ही या प्राण्यांचे अगदी जवळून निरीक्षण करू शकता. हा झू रात्रीसुद्धा चालू असतो. या वेळी सात किमी ट्राम सफरीमध्ये मोठ्या मांजरांपासून सुरुवात करून वन्य प्राण्यांचे अनोखे निशाजीवन तुम्ही अनुभवू शकता.

फ्लाइट फ द गिबन अॅड्व्हेंच: खाव खू ओपन झूमधील हा एक साहसी अनुभव आहे. गिबन म्हणजे एका जातीचे लांब हाताचे वानर. या उपक्रमामथ्ये तुम्ही गिबन वानराप्रमाणे वृक्षराजींच्या शिखरावरून फिरत येथील जंगलाचे निरीक्षण करू शकता. वृक्षांच्या शिखरावरून विहार करण्यासाठी मजबूत वायर्स, स्कायब्रिजेस यांची तुम्हाला मदत होते. वृक्षांच्या शिखरावरून हा मार्ग तीन किमी लांबीचा असून या प्रवासातून साहसाबरोबरच तुमच्या ज्ञानातही भर पडेल आणि थायलंडमधील तुमच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभवांमध्ये    भर पडेल.

Pattaya Elephant Village (पटाया एलिफंट व्हिलेज)

कामासाठी वापरल्या जाणा-या हत्तींसाठी निवासस्थान म्हणून १९७३ साली हे एलिफंट व्हिलेज सुरू करण्यात आले. या कँपमध्ये पूर्णवेळ अनुभवी माहूत हत्तींची देखभाल करतात. पर्यटकांसाठी आकर्षण म्हणजे येथील निरनिराळे शोज, हत्तींचे प्रशिक्षण, स्नान वगैरे. युद्धाच्या हत्तींचा ग्लोबल साबाद चाय (Global Sabad Chai) किंवा विजयदुंदुभी हा आणखी एक शो आहे.

Wat Yannasangwararam or  Viharn Sien  (वत यन्नासंगवारारम किंवा विहार्न स्येन)

हे भव्य तीन मजली चिनी मंदिर म्हणजे एक पूजास्थान तसेच म्युझिअमसुद्धा आहे. मंदिराचे अधिकृत नाव अनेक कुसोन साला (Anek Kuson Sala) असे आहे. परंतु येथे ठेवण्यात आलेल्या चिनी संतांच्या वस्तूंमुळे या मंदिरास विहार स्येन म्हणतात. स्येनचा अर्थ संत. येथे बौद्ध धर्माच्या महायान आणि थेरवाद पंथांशी संबंधित तसेच प्राचीन चीनमधील अनेक पुरातनवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

Alangkarn Show  (अलंग्कर्न  शो) 

हा दोन तासाचा  कार्यक्रम असून यामध्ये ध्वनी आणि प्रकाश, लेझर तंत्रज्ञान या सर्वांतून तुम्हाला थाई इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचे भव्य आणि डोळे दिपवून टाकणारे दर्शन होते. या शोमध्ये हत्तींचासुद्धा समावेश आहे, यावरून तुम्हाला रंगमंच किती मोठा असेल त्याची कल्पना येईल. कलाकारांची रंगीबेरंगी वेशभूषा आणि निरनिराळ्या रंगातील प्रकाश या सा-यांनी निश्चित डोळ्यांचे पारणे फिटेल.

Pattaya Park Beach Resort (पटाया  पार्क  बीच रिझॉर्ट)

थायलंडच्या पूर्व किना-यावरील पहिला आणि सर्वांत उंच समुद्रकिना-यावरील मनोरा आणि फिरते उपाहारगृह अशी याची प्रसिद्धी आहे.जॉम्टिएन बीचवरील हा रिझॉर्ट अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून येथून जॉम्टिएन बीच आणि पटाया बेचे सुंदर दृश्य दिसते. रिझॉर्ट मध्ये ७१८ लक्झरिअस सी व्ह्यू रूम्स आणि सूट्स असून बँक्वेट आणि कॉन्फरन्स रूम्स, फिटनेस सेंटर, सोना, स्नूकर रूम, शॉपिंग आर्केड अशा सर्व सोयी आहेत.

स्पा: येथे दोन स्पा असून या स्पामध्ये शोल्डर अँड बॅक, थाई ट्रेडिशनल, हर्बल कॉम्प्रेस, अरोमा असे विविध मसाज घेता येतात. तसेच स्क्रब विथ जॅस्मिन राइस प्लस आमंड सीड,  स्ट्रीम रूम, मिनरल फ्लोरल बाथ, राइस मिल्क बॉडी लोशन अशी वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यप्रसाधने घेऊ शकता. 

रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटस : पॅनोरमा रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट (५२ वा मजला),  पिनॅकल रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट (५३  वा मजला) , मेरिडिअन रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट (५४  वा मजला) या उपाहारगृहांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बफे लंच किंवा सीफूड डिनर मिळते. शिवाय फिरत्या उपाहारगृहामध्ये भोजनाचा वेगळा अनुभव घेण्यासारखा आहे. 

अपेक्स अब्झर्व्हेशन (५५   वा मजला): या मजल्यावरील निरीक्षण कक्षामधून जॉम्टिएन  बे  आणि पटाया शहराचे सुंदर दृश्य दिसते.

टॉवर जंप: तुम्ही जर साहसी असाल तर तुमच्यासाठी एक रोमांचकारी क्रीडाप्रकार येथे   आहे. २४० मीटर उंच असणा-या ५५ व्या मजल्यावरून खाली उडी मारायची. घाबरू नका, तारांच्या सहाय्याने एकटा माणूस किंवा केबल शटलच्या सहाय्याने एकाहून अधिक व्यक्ती. यात सुरुवातीला भीती वाटते, परंतु नंतर मजा वाटते.    

स्पीड शटल/स्काय शटल: स्काय शटलने थेट बीचवर जाता येते. स्पीड शटल ने अधिक वेगाने जाता येते. 

पटाया पार्क टॉवर वर जाण्यास १५० बाथ शुल्क आहे. यामध्ये मोफत ड्रिंक येते. शिवाय टॉवर जंपसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. 

Fun Park (फन पार्क)

फन पार्कची आकर्षणे:

- टॉवर शॉट

- Slalom रोलर कोस्टर

- व्हायकिंग्स

- फॅमिली स्विंगर

- मोनोरेल

- डिमॉलिशन डर्बी

- म्युझिकल Carousel

- सांबा टॉवर

वॉटर पार्क : पटायामधील हे एकमेव वॉटर पार्क असून येथे मोठमोठ्या वॉटर स्लाइड्स आहेत. येथे तुम्ही समुद्रात पोहू शकता किंवा सूर्यस्नान करू शकता. पाण्यातील भोव-याभोवती पोहणे हा येथील एक वेगळा प्रकार आहे.    

Gems Gallery, Pattaya(जेम्स गॅलरी, पटाया)                                                                  पटायामधील जेम्स गॅलरी ३.८ एकर  (१५,२०० चौ. किमी ) जागेवर  बांधण्यात  आली  आहे. या गॅलरीमध्ये  ५००हून  अधिक  कर्मचारी  आहेत. या गॅलरीचे  वैशिष्ट्य  म्हणजे  'थीम  पार्क डार्क  राइड ' हे  जवाहिरांविषयी ध्वनी  आणि  प्रकाशयुक्त  सादरीकरण. या  राइडमध्ये  तुम्ही  फक्त  बसून  राहायचे  आणि  रत्नांच्या झगमगत्या  दुनियेची  सफर  करायची.  


पटाया पर्यटनाचा ४ दिवसांचा प्रवास कार्यक्रम:


🌇 दिवस १ – मध्य आणि पश्चिम पटाया (Central & West Pattaya)

वैशिष्ट्य: बीच अ‍ॅक्टिव्हिटीज, नाइटलाइफ आणि आधुनिक आकर्षणे.

🕘 09:00 – हॉटेलमधून निघणे (नाश्त्यानंतर)
गाईडकडून दिवसाच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती.
बसने किंवा टॅक्सीने पटाया बीचकडे प्रयाण.

🏖️ 09:30 – 12:00 : पटाया बीच भ्रमंती

चार किमी लांबीचा नयनरम्य चंद्रकोरीसारखा किनारा.
वाळूत चालणे, फोटोसेशन, बीचवरील पाम झाडांची रांग अनुभवणे.
इच्छुक प्रवाशांसाठी पॅरासेलिंग, जेट-स्की, बनाना राईड यांसारख्या जलक्रीडा.
प्रवाशांना थोडा मुक्त वेळ.
🍽️ 12:15 – 13:30 : दुपारचे जेवण

पटाया बीच रोडवरील The Glass House, Preecha Seafood किंवा Sizzler (Terminal 21) यांसारख्या रेस्तराँमध्ये जेवणाची सोय.
समुद्रदृश्यासह लंचचा आनंद.

🛍️ 13:45 – 16:00 : सेंट्रल पटाया – खरेदी व शहरफेरी

Central Pattaya Festival Mall — आधुनिक शॉपिंग मॉल, स्मृतिचिन्हांची दुकाने.

इच्छुकांसाठी Art in Paradise (3D illusion museum).

पर्यायी कार्यक्रम म्हणून Ripley’s Believe It or Not म्युझियम.

🌇 16:15 – 17:30 : Pattaya Viewpoint (Khao Phra Tamnak Hill)

संध्याकाळी समुद्रावर मावळत्या सूर्याचे अप्रतिम दृश्य.

वरून पटाया शहराचा विहंगम नजारा; फोटोसाठी उत्तम ठिकाण.

🍛 18:00 – 19:30 : रात्रीचे जेवण

Terminal 21 मॉलमधील Food Court (Pier 21) मध्ये विविध देशांच्या पाककृतींचा आनंद.

येथे हलके जेवण आणि थोडी विश्रांती.

🎭 20:00 – 21:30 : Alcazar / Tiffany Show

पटायातील प्रसिद्ध लेडी बॉय कॅबरे शो (दोन्ही थिएटर्स नॉर्थ पटायामध्ये आहेत).

नेत्रदीपक प्रकाशयोजना, संगीत, नृत्य आणि फॅशनचे अविस्मरणीय सादरीकरण.

🌃 21:45 – रात्रीचा समारोप / वॉकिंग स्ट्रीट (ऐच्छिक)

इच्छुक प्रवाशांसाठी South Pattaya येथील Walking Street ची फेरफटका.

रंगीबेरंगी निऑन लाईट्स, संगीत, रेस्टॉरंट्स आणि नाइटलाइफचा अनुभव.
🏨 22:30 – हॉटेलला परत व विश्रांती

पुढील दिवसाच्या समुद्री सफरीसाठी तयारी.


🌅 दिवस ४ – उत्तर पटाया (North Pattaya):

वैशिष्ट्य: समुद्रकिनाऱ्याची शांतता, सांस्कृतिक आकर्षणे, आणि मनोरंजन.

प्रवासकार्यक्रम:
08:00 a.m. – 09:00 a.m. नाश्ता व दिवसाची तयारी.
09:00 a.m. – 09:30 a.m. हॉटेलमधून Sanctuary of Truth कडे प्रयाण (नॉर्थ पटाया बीचलगत).
09:30 a.m. – 12:00 noon Sanctuary of Truth दर्शन.
ही संपूर्ण लाकडात कोरलेली भव्य रचना सुमारे १०५ मीटर उंच असून बुद्ध, हिंदू व तत्त्वज्ञान यांचा संगम दाखवते.
संपूर्ण मंदिरात एकही लोखंडी खिळा नाही.
याला पाहण्यासाठी सुमारे दीड-दोन तास लागतात.
येथून समुद्राचे दृश्य अप्रतिम दिसते.
📷 फोटोसाठी उत्तम ठिकाण.
12:15 p.m. – 01:30 p.m. दुपारचे जेवण
सुचवलेले पर्याय:
Surf & Turf Pattaya (Sanctuary जवळ – सीफूड व सुंदर सी व्ह्यू).
The Glass House Silver (थोडे दूर पण अत्यंत लोकप्रिय). | | 01:45 p.m. – 04:00 p.m. | Leisure / Sightseeing – North Pattaya Area
Art in Paradise (३D इंटरॅक्टिव्ह आर्ट म्युझियम) — हलके मनोरंजनासाठी.
किंवा Tiffany’s Show Museum / Photo Gallery भेट.
पर्याय: इच्छुकांनी हॉटेलमध्ये विश्रांती घेऊ शकतात. | | 04:00 p.m. – 05:30 p.m. | Terminal 21 Pattaya – एक थीम बेस्ड मॉल, प्रत्येक मजला वेगळ्या देशाच्या थीमनुसार सजवलेला (पॅरिस, लंडन, टोकियो इ.).
येथे शॉपिंग, स्नॅक्स व फोटोस्पॉट्ससाठी वेळ. | | 05:30 p.m. – 06:15 p.m. | रात्रीचे जेवण – Terminal 21 च्या Pier 21 Food Court मध्ये थाई आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ.
किंवा शोच्या वेळेनुसार हलके जेवण. | | 06:30 p.m. – 08:00 p.m. | Alcazar Cabaret Show किंवा Tiffany Show
– पटायाचे प्रसिद्ध “कॅबरे शो” जे संगीत, नृत्य आणि नेत्रदीपक पोशाखांनी सजलेले असतात.
– सामान्यतः ६:३० किंवा ७:०० वाजता सुरू होतात आणि सुमारे ७५–९० मिनिटे चालतात. | | 08:00 p.m. – 08:30 p.m. | शो संपल्यानंतर फोटो घेण्यासाठी वेळ. | | 08:30 p.m. – 09:00 p.m. | हॉटेलकडे परतीचा प्रवास व दिवसाची सांगता. |



        . परिशिष्टे

WHAT TO SEE/WHAT TO DO IN PATTAYA

1.       Mini Siam,http://www.minisiam.com/,387, Moo 6 Sukhumvit Rd, Pattaya City Naklua, Banglamung, Chonburi 20150

2.       Nong Nooch Village, http://nongnoochgarden.com, 34/1 Moo 7 Na Jomtien, Sattahip, Chonburi 20250

3.       Alcazar Show, http://www.alcazar-pattaya.com,78/14 Pattaya 2nd Road., Pattaya City, 20260

4.       Pattaya Park Beach Resort,http://www.pattayapark.com/345 Jomtien Beach, Pattaya City, Chon Buri, 20150, Thailand

5.     Gems Gallery, www.gems-gallery.com, 555 Moo 6 North Pattaya Road, Banglamung, Pattaya, Chon Buri                      

BEST BEACHFRONT RESORTS

1.       The Heritage Pattaya Beach Resort (Formerly, Grand Heritage Beach Resort & Spa), 435, Moo 12, Pratumnak Soi 6, Nongprue, Dong Tarn Beach, Pattaya, Thailand 20150.

2.       Avalon Beach Resort, http://www.avalonbeachresort.com/, 436 Moo 12, Thuppraya Road, Dongtarn Beach, Jomtien, Nongprue, Dong Tarn Beach, Pattaya, Thailand 20150.

3.       Ravindra Beach Resort & Spa, http://www.ravindraresort.com/, 246 Moo 4, Sukhumvit Road. (km.157), Na Jomtien, Sattahip, Chonburi 20250 THAILAND.

BEST FAMILY RESORTS

1.       Royal Cliff Beach Terrace , Pattaya Hill, http://www.royalcliff.com/, 353 Phra Tamnuk Road, South Pattaya, Banglamung, Chonburi, 20150 Pattaya South.

2.       Pullman Pattaya Aisawan , Wongamat-Naklua, www.pullmanhotels.com, 445/3 Moo 5 Wong Amart Beach, Pattaya - Naklua Road Soi 16, Pattaya, 20150, Thailand.

3.       Chateau Dale Resort Spa and Villas, Jomtien

BEST NIGHTLIFE HOTELS

1.       Baron Beach Hotel , Pattaya Beach Road

2.       Sunbeam Hotel , Pattaya Beach Road

3.       Areca Lodge Pattaya , Pattaya Second Road

BEST BUDGET HOTELS

1.       Ibis Pattaya , Pattaya Second Road

2.       Sawasdee Seaview Pattaya , Pattaya Beach Road

3.       Eastiny Plaza Hotel , Pattaya Beach Road

BEST RESTAURANTS

1.       Mantra Restaurant & Bar

2.       Moom Aroi

3.       Volterra

4.       Preecha Seafood

5.       Bruno's

6.       Au Bon Coin

7.       Casa Pascal

8.       The Glass House

SHOPPING

1.       Tesco/Lotus

2.       Central Festival Pattaya Beach

3.       Big C

4.       Royal Garden Plaza

5.       Mike Shopping Mall

No comments:

Post a Comment