Thursday, September 19, 2024

श्री यल्लम्मा देवीची कथा

श्रीयल्लम्मा  देवीची कथा:  

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved

रेणुका जमदग्नी ऋषींची पत्नी होती. त्यांना परशुराम धरून पाच पुत्र होते. एकदा रेणुका नदीवर पाणी भरण्यास गेली असता तिला एक राजा राण्यांबरोबर जलक्रीडा करताना दिसला आणि आध्यात्मिक साधनेपासून तिचे चित्त    विचलित झाले. ती घरी परत आली असता जमदग्नी ऋषींनी अंतर्ज्ञानाने घडला प्रकार जाणला आणि आपल्या मुलांना तिचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. 

परंतु पहिल्या चार मुलांनी या कामास नकार दिला.  त्यामुळे  जमदग्नी ऋषींनी शाप देऊन त्यांना भस्म केले. परशुराम मात्र आईचा शिरच्छेद करण्यास तयार झाले.  रेणुका   त्यामुळे  पळत सुटली.

या वेळी  मातंगी नावाच्या एक दलित स्त्रीने रेणुकेला वाचवण्याचा प्रयत्न केला. परशुरामांनी मातंगीचाही शिरच्छेद केला आणि नंतर रेणुकेचा शिरच्छेद केला. जमदग्नी ऋषी त्यामुळे परशुरामांवर प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी त्यावेळी आपल्या आईला आणि भावांना जिवंत करण्यास सांगितले. जमदग्नी ऋषींनी त्यावेळी परशुरामांना पाणी मंत्रून देऊन आईच्या धडास डोके जोडून पाणी शिंपडण्यास सांगितले. 

परंतु परशुरामांनी चुकून रेणुकेच्या धडावर मातंगीचे डोके तर मातंगीच्या धडावर रेणुकेचे डोके ठेवून पाणी शिंपडले. नंतर त्यांना आपली चूक लक्षात आली. 

जमदग्नी ऋषींचा  रेणुकेवरील राग गेला नव्हता. त्यामुळे मातंगीचे डोके असलेल्या स्त्रीला त्यांनी  आपली  पत्नी म्हणून स्वीकारले आणि रेणुकेचे  शिर असलेल्या स्त्रीला निघून जाण्यास सांगितले. ती रेणुकेचे शिर असलेली स्त्री म्हणजे सौंदत्तीच्या मंदिरातील 'यल्लम्मा.' 

आणखी   एका गोष्टीमध्ये ही रेणुका तपश्चर्येसाठी निघून जाते. ती माहुरगडाची रेणुका. आणखी बरीच रेणुकेची मंदिरे आहेत. त्या सर्वांची बहुतेक अशीच कथा सांगतात. रेणुकेचे शिर असल्यामुळे फक्त शिराची किंवा घागरीवर शिराचा मुखवटा ठेवून पूजा करतात. 

एका कथेप्रमाणे जमदग्नी ऋषी परशुरामांच्या भावांना न मारता त्यांना नपुंसक होण्याचा शाप देतात. रेणुका या मुलांचा स्वीकार करते. त्यामुळे तृतीय पंथीय लोक यल्लम्माला भजतात.  यल्लम्माच्या मंदिरात मातंगीचेही मंदिर आहे. यल्लम्मा संततिवर्धक आणि स्त्रियांची देवता मानतात. हिचे दर्शन घेतले तर पुरुषाची स्त्री होते अशी समजूत आहे.

No comments:

Post a Comment

Ni Hao Beijing , Ni Hao Shanghai

Ni Hao Beijing, Ni Hao Shanghai ----------------------------------------- Travelogue of a Journey through Beijing and Shanghai (22 May 2026 ...