Saturday, March 21, 2026

गुरुचरित्र अध्याय ३

गुरुचरित्र 

अध्याय ३ - अंबरीषव्रतनिरूपण

(ओवीसंख्या ८३)

अंबरीष राजाची कथा

श्रीगणेशाय नमः: ||

येणेपरी सिद्ध मुनि | सांगता झाला विस्तारोनि | संतोषोनि नामकरणी | विनवितसे मागुती || १ ||

जय जयाजी सिद्ध मुनी | तारक तू आम्हालागुनी | संदेह होता माझे मनी | आजि तुवा फेडिला || २ ||

तुझेनि सर्वस्व लाधलो | आनंदजळी बुडालो | परम तत्त्व जोडलो | आजिचेनि दातारा || ३ ||

ऐसे श्रीगुरुमहिमान | मज निरोपिले त्वां ज्ञान | आनंदमय माझे मन | तुझेनि धर्मे स्वामिया || ३ ||

कवणे ठायी तुमचा वास | नित्य तुम्हा कोठे ग्रास | होईन तुझा आता दास | म्हणोनि चरणी लागला || ५ ||

कृपानिधी सिद्ध मुनी | तया शिष्या आलिंगोनि | आशीर्वचन देऊनि | सांगे आपुला वृत्तांत || ६ ||

जे जे स्थानी होते गुरू | तेथे असतो चमत्कारू | पुससी जरी आम्हां आहारू | गुरुस्मरणी नित्य जाणा || ७ ||

गुरुचरित्राचा महिमा:

श्रीगुरुचरित्र महिमान | तेचि आम्हा अमृतपान | सदा सेवितो याचे गुण | म्हणोनि पुस्तक दाविले || ८ ||

भक्ति मुक्ति परमार्थ | जे जे वांछिजे मनांत | ते ते साध्य होय त्वरित | गुरुचरित्र ऐकता || ९ ||

धनार्थी यासी अक्षय धन | पुत्रपौत्रादि गोधन | कथा ऐकता होय जाण | ज्ञानसिद्धी तात्काळ || १० ||

जे भक्तीने सप्तक एक | पढती ऐकती भक्तलोक | काम्य होय तात्कालिक | निपुत्रिका पुत्र होती || ११ ||

गृहरोगादिपीडन | न होती व्याधि कधी जाण | जरी मनुष्यास असेल बंधन | त्वरित सुटे ऐकता || १२ ||

ज्ञानवंत शतायुषी | ऐकता होय भरवसी | ब्रह्महत्यापापे नाशी | एकचित्ते ऐकता || १३ ||

इतके ऐकोनि त्या अवसरी | नामधारक नमस्कारी | स्वामी माते  तारी तारी | कृपानिधि सिद्ध मुनी || १४ ||

साक्षात्कारे गुरुमूर्ति | भेटलासी तू  जगज्योती | होती वासना माझे चित्ती | गुरुचरित्र ऐकावे || १५ ||

एखादा तृषेने पीडित | जात असता मार्गस्थ | त्या आणूनि देती अमृत | तयापरी तू मज भेटलासी || १६ || 

गुरूचा महिमा ऐको कानी | सांगिजे स्वामी विस्तारोनि | अंधकार असतां रजनी | सूर्योदयापरी करी || १७ ||

इतुकिया अवसरी | सिद्ध योगी अभय करी | धरोनिया  सव्य करी | घेवोनि गेला स्वस्थाना || १८ ||

असे ठाव ज्ञानपंथी | कल्पवृक्षी अश्वत्थी | बैसोनि सांगे ज्ञानज्योती | एक शिष्या नामधारका || १९ ||

नेणती सोय गुरुदास्यका | याचि कारणे उपबाधका | होती तुज अनेका | चिंता क्लेश घडती तुज || २० ||

ओळखावया गुरुमूर्तीसी | आपुला आचार परियेसी | दृढ भक्ति धरोनि मानसी | ओळखिजे मग श्रीगुरु || २२ ||

ऐकोनि सिद्धांचे वचन | संतोषे नामधारक सगुण | क्षणक्षणा करी नमन | करुणावचने करोनिया || २२ ||

तापत्रयाग्नीत पोळलो | मी संसारसागरी बुडालो | क्रोधादि जलचरी वेष्टलो | अज्ञानजाळे वेष्टूनिया || २३ ||

ज्ञाननौकी बसवूनि | कृपेचा वायू पालाणुनि | देहा तारक करूनि | तारावे माते स्वामिया || २४ ||

ऐशिया करुणावचनी | विनवितसे नामकरणी | मस्तक सिद्धाचिया चरणी | ठेविता झाला पुन: पुन: || २५ ||

तव बोलिला सिद्ध मुनि | न धरी चिंता अंत:करणी | उठवीतसे आश्वासोनि | सांकडे फेडीन तुझे आता || २६ ||

ज्यांसी नाही दृढ भक्ति | सदा दैन्ये कष्टती | श्रीगुरूवरी बोल ठेविती | अविद्यामाये वेष्टूनि || २७ ||

संशय धरोनि मानसी | श्रीगुरू काय देईल म्हणसी | तेणे गुणे हा भोग भोगिसी | नाना कष्टे व्याकुळित || २८ ||

सांडोनि संशय निर्धार | गुरुमूर्ति देईल अपार | असा देव कृपासागर | तुज नुपेक्षी सर्वथा || २९ ||

गुरुमूर्ति कृपासिंधु | प्रख्यात असे वेदा बोधु | तुझे अंत:करणी वेधु | असे तया चरणांवरी || ३० ||

तो दातार अखिल मही | जैसा मेघाचा गुण पाही | पर्जन्य पडतो सर्वां ठायी | कृपासिंधु ऐसा असे  || ३१ ||

त्यांतचि पात्रानुसार | सांगेन साक्षी एक थोर | सखोल भूमि उदक स्थिर | उन्नती उदक नाही जाण || ३२ ||

दृढ भक्ति जाणा सखोल भूमि | दांभिक ओळखा उन्नत तुम्ही | याचिया कारणे मनोकर्मी | निश्चयावे श्रीगुरुसी || ३३ ||

म्हणोनि श्रीगुरुउपमा | ऐसा कणव असे महिमा | प्रपंच होय परब्रह्मा | हस्त मस्तकी ठेवोनिया || ३४ ||

कल्पतरूची द्यावी उपमा | कल्पिले लाभे त्यांचा महिमा | न कल्पिता पुरवी कामा | कामधेनु श्रीगुरु || ३५ ||

ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ति | ख्याति असे श्रुतिस्मृती | संदेह सांडूनि एकचित्ती | ध्याय पदांबुज श्रीगुरूचे || ३६ ||

इतके परिसोनि नामधारक | नमन करोनि क्षणैक | करसंपुट जोडोनि एक | विनवितसे सिद्धासी || ३७ ||

श्रीगुरू सिद्ध योगेश्वरा | कामधेनु कृपासागरा | विनवितसे अवधारा | सेवक तुमचा स्वामिया || ३८ ||

स्वामींनी निरोपिले सकळ | झाले माझे मन निर्मळ | वेध लागला असे केवळ | चरित्र श्रीगुरूचे ऐकावया || ३९ ||

गुरू त्रयमूर्ति ऐको कानी | का अवतरले मनुष्ययोनी | सर्व सांगावे विस्तारोनि | म्हणोनि चरणी लागला || ४१ ||

मग काय बोले योगींद्र | बा रे शिष्या तू पूर्णचंद्र | माझा बोधसमुद्र | कैसा तुवा उत्साहविला || ४२ ||

तूते महासुख लाधले | गुरुदास्यत्व फळले | परब्रह्म अनुभवले | आजिचेनि तुज आता || ४२ ||

हिंडत आलो सकळ क्षिती | कवणा नव्हे ऐंशी मति | गुरुचरित्र न पुसती | तूते देखिले आजि आम्ही || ४३ ||

ज्यासी इहपरत्रींची चाड | त्यासी ही कथा असे गोड | त्रिकरणे करोनिया दृढ | एकचित्ते ऐकिलें || ४४ ||

तू भक्त केवळ श्रीगुरुचा | म्हणोनि भक्ति झाली उंचा | निश्चयो मानी माझिया वाचा | लाधसी चारी पुरुषार्थ || ४६ ||

धनधान्यादि संपत्ति | पुत्रपौत्र श्रुतिस्मृति | इह सौख्य आयुष्यगति | अंती गति असे जाणा || ४६ ||

गुरुचरित्र कामधेनु |  वेदशास्त्रसंमत जाणु | अवतरला त्रयमूर्ति आपणु | धरोनि नरवेष कलियुगी || ४७ ||

कार्याकारण अवतार | होऊनि येती हरिहर | उतरावया भूमिभार | भक्तजनाते तारावया || ४८ ||

ऐकोनि सिद्धाचे वचना | प्रश्न करी शिष्यराणा | त्रयमूर्ति अवतार किंकारणा | देह धरोनि मानुषी || ४९ ||

विस्तारोनि ते आम्हासी | सांगा स्वामी कृपेसी‌ | म्हणोनि लागला चरणासी | करुणावचने करोनिया  || ५० ||

सिद्धमूर्ती म्हणे नामधारका | त्रयमूर्ति तीन गुण ऐका | आदिवस्तु आपण एका | प्रपंच वस्तु तीन जाणा || ५१ ||

ब्रह्मयाचा रजोगुण | सत्त्वगुण विष्णु जाण | तमोगुण उमारमण | मूर्ति एकचि अवधारा || ५२ ||

ब्रह्मा सृष्टिरचनेसी | पोषक विष्णु परियेसी | रुद्रमूर्ति प्रळयासी | त्रयमूर्तीचे तीन गुण || ५३ ||

एका वेगळे एक न होती | कार्याकारण अवतार होती | भूमीचा भार फेडती | प्रख्यात असे पुराणी || ५४ ||

अंबरीष राजाची कथा:

सांगेन साक्ष आता तुज | अंबरीष म्हणिजे द्विज | एकादशीव्रताचिया काज | विष्णूसी अवतार करविले || ५५ ||

अवतार व्हावया कारण | सांगेन तुज विस्तारून | मन करोनि सावधान | एकचित्ते परियेसा || ५६ ||

द्विज करी एकादशीव्रत | पूजा करी अभ्यागत | निश्चयो करी दृढचित्त | हरिचिंतन सर्वकाळ || ५७ ||

असो त्याचिया व्रतासी | भंग करावया आला ऋषि | अतिथि होऊनि हठेसी | पावला मुनि दुर्वास || ५८ ||

ते दिवशी साधनद्वादशी घडी एक | आला अतिथि कारणिक | अंबरीषास पडला धाक | केवी घडे म्हणोनिया || ५९ ||

ऋषि आले देखोनि | अंबरीषाने अभिवंदोनि | अर्घ्य पाद्य देवोनि | पूजा केली उपचारे || ६० ||

विनवीतसे ऋषीश्वरासी | शीघ्र जावे स्नानासी | साधन आहे घटिका द्वादशी | यावे अनुष्ठान सारोनिया || ६१ ||

ऋषि जाऊनि नदीसी | अनुष्ठान करती विधींसी | विलंब लागता तयासी | आली साधन घटिका || ६२ ||

व्रत भंग होईल म्हणोनि | पारणे केले तीर्थ घेऊनि | नाना प्रकार पक्वान्नी | पाक केला ऋषीते || ६३ ||

तव आले दुर्वास देखा | पाहूनि अंबरीषाच्या मुखा | म्हणे भोजन केलेसि का | अतिथीविण दुरात्मया || ६४ ||

शाप देता ऋषीश्वर | राजे स्मरला शार्ङ्गधर | करावया भक्ताचा कैवार | टाकून आला वैकुंठा || ६५ ||

भक्तवत्सल नारायण | शरणागताचे रक्षण | बिरुद बोलती पुराणे जाण | धावे धेनु वत्सासी जैसी || ६६ ||

शापिले ऋषीने द्विजासी | जन्मावे गा अखिल योनीसी | तव पावला हृषीकेशी | येऊनि जवळी उभा ठेला || ६७ ||

मिथ्या नव्हे ऋषीचे वचन | द्विजे धरिले श्रीविष्णुचे चरण | भक्तवत्सल ब्रीद जाण | तया महाविष्णुचे || ६८ ||

विष्णु म्हणे दुर्वासासी | तुवा शापिले अंबरीषासी | राखीन आपुल्या दासासी | शाप आम्हासी तुम्ही द्यावा || ६९ ||

दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर | केवळ ईश्वर अवतार | फेडावयास भूमिभार | कारण असे पुढे म्हणतसे || ७० ||

जाणोनि ज्ञानीशिरोमणी | म्हणे तप करिता युगे क्षोणी (= पृथ्वी) | भेटी नव्हे हरिचरणी | भूमीवरी दुर्लभ || ७१||

शापसंबंधे अवतरोनि | येईल लक्ष्मी घेऊनि | तारावयालागोनी | भक्तजना समस्ता || ७२ ||

परोपकारसंबंधेसी | शाप द्यावा विष्णुसी | भूमिभार फेडावयासी | कारण असे म्हणोनिया || ७३ ||

ऐसे विचारोनि मानसी | दुर्वास म्हणे विष्णूसी | अवतरोनी भूमीसी | नाना स्थानी जन्मावे || ७४ ||

प्रसिद्ध होसी वेळ दहा | उपर अवतार पूर्ण दहा | सहज तू विश्वात्मा महा | स्थूळसूक्ष्मी वससी तू || ७५ ||

ऐसा कार्यकारण शाप | अंगिकारी जगाचा बाप | दुष्टांवरी असे कोप | सृष्टिप्रतिपाळ करावया || ७६ ||

ऐसे दहा अवतार झाले | असे तुवा कर्णी ऐकिले | महाभागवती विस्तारिले || ७७ ||

कार्यकारण अवतार होती | क्वचित्प्रकट क्वचित गुप्ती | ते ब्रह्मज्ञानी जाणती | मूढमति काय जाणे || ७८ ||

आणीक सांगेन तुज | विनोद झालासे सहज | अनसूया अत्रिऋषीची भाज (= शोभा/गौरव) | पतिव्रताशिरोमणी || ७९ || 

तिचे गृही जन्म जाहले | त्रयमूर्ति अवतरले | कपटवेष धरोनि आले | पुत्र जाहले तियेचे || ८० ||

नायधारक पुसे सिद्धासी | विनोदकथा निरोपिलीसी | देव अतिप्रकट वेषी | पुत्र जाहले कवणे परी || ८१ ||

अत्रि ऋषि पूर्वी कवण | कवणापासूनि उत्पन्न | मूळ पुरुष होता कवण | विस्तारोनि मज सांगावे || ८२ ||

म्हणे सरस्वती गंगाधर | पुढील कथेचा विस्तार | ऐकता होय मनोहर | सकलांभीष्टे साधती || ८३ ||

इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अंबरीषव्रतनिरूपणं नाम तृतीयोSध्याय : 

(ओवीसंख्या ८३)

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

टिपणे:

एकादशीव्रत: एकादशीच्या उपवासाचे पारणे द्वादशीला फेडणे आवश्यक आहे. अन्नग्रहण करून किंवा नुसते जलग्रहण करून हे पारणे फेडता येते. व्रत करण्याबरोबरच त्याची योग्य प्रकारे पूर्तता करणेही आवश्यक असते. अन्नग्रहण केल्यास अतिथीच्या आधी भोजन केल्याचा दोष लागेल, म्हणून अंबरीष राजाने केवळ जलग्रहण केले. परंतु दुर्वास ऋषींचा उद्देश अंबरीष राजाला त्रास देणे असल्याने त्यांनी अतिथीचा अनादर केल्याबद्दल अंबरीष राजाला शाप दिला.

Wednesday, March 18, 2026

११ . क्रबी – अंदमानचा पाचू

 क्रबी  ही बेटे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणून प्रसिद्ध असलेली 'फी फी आयलंड्स' येथेच असून समुद्रकिनारे, चुनखडीचे कडे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. क्रबी च्या दक्षिणेस असणारी 'लांता आयलंड्स' मॅनग्रोव्हच्या राई, पोवळ्याच्या कडा असलेले समुद्रकिनारे, कणखर कडे आणि भुलविणारी अरण्ये यांनी नटलेली आहेत. 'ऒ नंग' आणि 'राय ले बे' येथे वाळूचे सुंदर समुद्रकिनारे आणि जगभरातील गिर्यारोहकांस आकर्षित करणार डोंगरकडे आहेत. असे हे क्रबी  पर्यटकांच्या विरंगुळ्यासाठी आदर्श ठिकाण आहे.

१. परिचय 

स्थान, विस्तार व सीमा: क्रबी  हा थायलंडच्या नैऋत्येकडे बँकॉकपासून रस्त्याने ८०० किमी अंतरावर असणारा किनारी प्रांत आहे. याच्या उत्तरेस फं ङा, पूर्वेस Nakhon Si Thammarat आणि सुरत थानी तर दक्षिणेस Trang हे प्रांत आहेत. पश्चिमेस अंदमान समुद्र आहे. क्रबी  म्हणजे बेट आहे असा समज आहे, परंतु तो बरोबर नाही. क्रबी  प्रांत मुख्यभूमीवरच आहे. परंतु त्याच्या समुद्राकडील बाजूस छोटी मोठी सुमारे १३२ बेटे आहेत. ही बेटे क्रबी च्या अधिपत्याखाली येतात. यांपैकी लांता, को फी फी आणि को जुम (Jum) बेटांवर मनुष्यवस्ती आहे. क्रबी मध्ये एकूण आठ जिल्हे आहेत. यांपैकी मुअंग (Muang) जिल्ह्यामध्ये आव नंग, रेले, क्रबी  शहर, klonग मुअंग आणि फी फी आयलंड्स ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. या साऱ्या बेटांसह क्रबी चे एकूण क्षेत्रफळ ४,७०९ चौ. किमी आहे. क्रबी ची लोकसंख्या साडेचार लाख असून यामध्ये बौद्ध लोक ६०% तर मुस्लीम लोक ४०% आहेत.      

प्राकृतिक: येथील नैसर्गिक अरण्यांमध्ये  मॅनग्रोव्हच्या राया  आणि कॅसियाची झाडे आहेत. क्रबी ची वाळूने युक्त जमीन रबर, पाम, संत्री, नारळ, कॉफी अशा विविध प्रकारच्या कृषि उत्पादनांसाठी योग्य आहे.

क्रबी  नदी: क्रबी  नदी Panom Benja पर्वतांमध्ये उगम पावते, शहरातून पाच किमी पर्यंत वाहते आणि Tambon PAK NAM येथे अंदमान समुद्रास मिळते.  

हवामान: वर्षभरातील तापमान १६.९° आणि ३७.३° सेल्सिअस च्या मध्ये असते. वर्षभरातील पाउस २,५६८.५ मिलीमीटर असतो.    

इतिहास: क्रबी मध्ये असे बरेच कडे आणि गुहा आहेत ज्यांमध्ये प्राचीन भित्तिचित्रे, दगडी हत्त्यारे, मणी, भांडी तसेच हाडांचे सांगाडे सापडले आहेत. इसवी सनापूर्वी २५,००० ते ३५,००० या काळात क्रबी मध्ये आदिमानवाची वस्ती होती असे मानले जाते. ज्ञात इतिहासामध्ये क्रबी चा उल्लेख "Ban Thai Samor" म्हणून आढळतो. लोक लिहावाचायला शिकले नव्हते अशा काळामध्ये बारा शहरे अस्तित्वात होती, ज्यांचे चिन्ह वानर होते. "Ban Thai Samor" त्या शहरांपैकी एक होते.त्या काळी म्हणजे इ.स. १२०० च्या सुमारास क्रबी  Ligor च्या राज्याचे मांडलिक होते. Ligor चे राज्य Kra पेनिन्सुलाच्या पूर्व किना-यावरील शहर होते आणि आज ते Nakhon Sri Thammarat म्हणून ज्ञात आहे.   

Rattanakosin कालखंडाच्या सुरुवातीस म्हणजे सुमारे २०० वर्षांपूर्वी बँकॉक थायलंडची राजधानी झाली. त्या सुमारास Nakhon Sri Thammarat थायलंडच्या राज्याचा भाग झाले होते. Jao Praya Nakorn (Noy) या तेव्हाच्या Nakorn Sri Thammarat च्या राजाने हत्तींसाठी निवास (kraal)  बांधण्याची आज्ञा दिली. या कामासाठी त्याने Pra Palad या आपल्या वजिराची नेमणूक केली. या मोठ्या शहरासाठी हत्तींचा नियमित पुरवठा करण्याचे काम Pra  Palad कडे होते. त्यावेळी Pra  Palad बरोबर बरेच लोक स्थलांतरित झाले आणि  Pakasai, Klong Pon आणि Pak  Lao  या क्रबी च्या तीन परगण्यांमध्ये मोठी वस्ती झाली.    

१८७२ साली राजे चुलालोंग्कोर्न यांनी उदारपणे या सर्व भागास शहराचा दर्जा दिला आणि त्याचे नाव ‘क्रबी ’ ठेवले. या नावामध्ये जुन्या वानराच्या चिन्हाचे स्मरण ठेवले होते. क्रबी चा अर्थ आहे तलवार. क्रबी  शहराच्या स्थापनेच्या वेळी जमिनीमध्ये पुरलेली एक तलवार  सापडली. यावरून या शहराचे नाव क्रबी  असे पडले अशीही एक दंतकथा आहे.  पुढे तलवार हे क्रबी चे चिन्ह झाले.

क्रबी चे प्रशासन Nakorn Sri Thammarat मधूनच होत होते. तरीसुद्धा  शहरासाठी गव्हर्नर नेमण्यात आला. पहिला गव्हर्नर म्हणून Luang Tehp Sena  याची नेमणूक झाली.   

१८७५ साली यामध्ये बदल करण्यात आला आणि थाई प्रशासनाच्या त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे क्रबी ला चौथ्या क्रमांकाचा दर्जा देण्यात आला. आता क्रबी चे प्रशासन थेट बँकॉकच्या केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली  आले आणि येथूनच इतर प्रांतांपासून स्वतंत्र अशा क्रबी च्या इतिहासास सुरुवात होते.   

क्रबी ला कसे जावे: क्रबी  थायलंडच्या नैऋत्य किनार्‍यावर असून बँकॉकपासून ८०० किमी अंतरावर तर फुकेतपासून १७० किमी अंतरावर आहे. क्रबी ला विमानाने, रस्त्याने आणि जलमार्गाने जाता येते. 

विमानाने: क्रबी ला जाण्यासाठी बँकॉक, चिंग माय, कॉ समुई, सिंगापूर आणि क्वालालंपूर येथून फ्लाइट्स  आहेत. बँकॉक ते क्रबी  या विमानप्रवासास एक तास वीस मिनिटे लागतात. आणखी एका पर्याय म्हणजे फुकेतला विमानाने येऊन टॅक्सीने क्रबी ला येणे. टॅक्सीने फुकेतहून क्रबी ला येण्यास दोन तास लागतात. क्रबी मध्ये क्रबी  एअरपोर्ट हा छोटा विमानतळ असून हा विमानतळ हायवे रूट क्र. ४ वर सोयीस्कर ठिकाणी असल्याने क्रबी मधील बहुतेक सर्व ठिकाणी जाण्यास सोयीस्कर आहे.   

बसने: बसने  बँकॉक, कॉ समुई, Had Yai, फुकेत, Trang आणि मलेशिया अशा बहुतेक ठिकाणांहून क्रबी ला जाता येते. बसेस क्रबी  शहरामध्ये येतात. बँकॉक ते क्रबी  हा बस प्रवास दहा तासांचा आहे. 

रेल्वेने: क्रबी  रेल्वेमार्गावर नाही. त्यामुळे क्रबी ला थेट रेल्वेने जाता येत नाही. रेल्वेने यावयाचे असल्यास सुरत थानी किंवा Trang पर्यंत येऊन पुढे बसने किंवा टॅक्सीने यावे.              

जलमार्गाने: फुकेतने क्रबी ला जाण्यास फेरी सेवा आहे. फेरीने आल्यास आव  नंगला उतरावे लागते.  

२ . प्रवास  


क्रबी  – मुख्यभूमी

<>क्रबी  शहर

क्रबी  शहर हे एक मध्यम आकाराचे सुमारे २०,००० वस्तीचे शहर आहे. क्रबी  शहर थायलंडमधील अतिशय जुन्या वसाहतींपैकी एक आहे. हजारो वर्षांपूर्वी हे एक क्राल म्हणजे प्रामुख्याने हत्तींची देखभाल करणारे गाव होते. आज या जुन्या इतिहासाची साक्ष देणारे एकमेव ठिकाण ‘टायगर केव्ह’ हे आहे. या शहराचे ग्रामीण वातावरण अतिशय भुरळ घालणारे आहे. शहराच्या मध्यभागी क्रबी  नदी वाहते. यां नदीच्या काठी बाजार, अतिथिगृहे, रेस्तराँ, कॅफे अशा सर्व सोयी आहेत. खरेदीच्या दृष्टीने येथे विशेष प्रसिद्धी असणारे काही नाही. परंतु येथे कपड्यांची दुकाने आढळतील. शहराच्या सीमावर्ती भागामध्ये मोठी स्टोअर्स आढळतील. संध्याकाळी चक्कर मारली की या शहराचे मोहक स्वरूप तुम्हाला जाणवेल.    

<>>वत थम सुआ (Tham Sua) किंवा टायगर केव्ह

हे ठिकाण क्रबी  शहरापासून सुमारे तीन किमी अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूस डोंगर असून या डोंगरांमध्ये छोट्या छोट्या गुहा आहेत. येथे एक गुहा असून या गुहेमध्ये एका दगडावर वाघाचे पंजे उमटलेले दिसतात. हीच टायगर केव्ह. याच्या आसपास विशेषतः खिरिविंग (Khiriwing) दरीमध्ये मोठे मोठे वृक्ष आहेत. यांपैकी काही वृक्ष शंभर वर्षे जुने आहेत.  हे ठिकाण म्हणजे केवळ एक धार्मिक वास्तू नसून येथे पुरातन आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. येथे ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये उत्खननामध्ये सापडलेली दगडी हत्यारे, मातीची भांडी, बुद्धांची पावले बनविण्याचा साचे  यांचा समावेश आहे. येथील मुख्य मंदिर चढून जाण्यास १२७२ पायऱ्या आहेत. या मंदिरामध्ये बुद्धांची पावले पाहण्यास मिळतात. एवढ्या पायऱ्या चढून जाणे म्हणजे सोपे काम नाही. परंतु शिखरावर गेल्यावर येथून ३६०तून दिसणारे आजूबाजूच्या प्रदेशाचे सुंदर दृश्य पाहिले की तुम्हाला श्रमपरिहार झाल्यासारखे वाटेल.     

या मंदिरास वत थम सुआ किंवा टायगर केव्ह नाव कसे पडले याविषयी अनेक कथा आहेत. एक कथा अशी आहे की १९७५ च्या सुमारास Jumnean Seelasettho (Ajahn Jumnean) नावाचा एक बौद्ध भिक्खू येथील गुहेमध्ये ध्यान करीत असता त्याला गुहेमध्ये वाघ फिरताना दिसले. त्यामुळे या मंदिराचे नाव वत थम सिया असे पडले. दुसऱ्या कथेप्रमाणे येथील गुहेमध्ये एक मोठा वाघ राहत असे. या गुहेमध्ये एका ठिकाणी वाघाच्या  पंज्यांचे ठसे दगडावर उमटलेले दिसतात. एका गुहेचा तर आकारच वाघाच्या  पंज्याच्या आकाराचा आहे. या कारणांमुळेसुद्धा या गुहेचे नाव टायगर केव्ह पडले असावे.

थम सियाच्या आसपासचा भाग अरण्यमय आहे. येथील किरिवॉंग व्हॅलीमध्ये पुष्कळ जुने वृक्ष आहेत. येथे भेट देण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. परंतु त्यातल्या त्यात Tum Khon Than, Tum Lod, Tum Chang Kaeo, and Tum Luk या गुहा अवश्य भेट देण्यासारख्या आहेत. येथील गुहांमध्ये आणि मंदिरांमध्ये बऱ्याच Thanu पुरातन वस्तू आढळल्या. थम सिया प्रदेश डोंगराळ असून या डोंगरांमध्ये  बऱ्याच गुहा असून यांपैकी कित्येक गुहांमध्ये अजून कुणी गेलेलेसुद्धा नाही. वत थम सिया ही चुनखडीची गुहा असून तिच्यामध्ये सांगाडे आणि सजावट केलेल्या कवट्या ठेवल्या आहेत. थम सिया प्रदेश ध्यानासाठी जाण्यास योग्य आहे. परंतु येथे पुरातत्त्वशास्त्रीय आणि ऐतिहासिक आकर्षणेही बरीच आहेत. यांमध्ये दगडी हत्त्यारे, भांडी आणि बुद्धांची पावले बनविण्याचे साचे यांचा समावेश होतो.    

टायगर केव्ह टेंपल किंवा थाई भाषेमध्ये वत थम सिया  हे क्रबी  प्रांतामधील  बौद्धधर्मीयांचे एक पवित्र ठिकाण आहे. ज्या लोकांना धर्मिक स्थळामध्ये रस नाही, त्यांच्यासाठीसुद्धा येथे बरीच आकर्षणे आहेत. थाई भाषेमध्ये थम म्हणजे गुहा आणि सिया म्हणजे वाघ. वत थम सिया म्हणजे वाघाच्या गुहेचे मंदिर. वर मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. यांपैकी एक जास्त त्रासदायक आहे तर दुसरा कमी त्रासदायक आहे.

डोंगरावरून दिसणारे दृश्य अविस्मरणीय असेच आहे. वरून बुद्धमूर्तींचे सुंदर दृश्य दिसते. येथील सनसेट पॉइंट्ससुद्धा लोकप्रिय होत चालले आहेत. विशेषत: पौर्णिमेला सूर्यास्ताचे दृश्य पाहण्यासारखे असते. या वेळी पश्चिमेकडे अंदमान समुद्रामध्ये सोनेरी प्रकाशामध्ये सूर्य मावळताना दिसतो. तर पूर्वेला क्रबीच्या कमी उंचीच्या भागातून सोनेरी रंगाचा चंद्र उगवताना दिसतो. या मंदिरास दिलेले टायगर केव्ह टेंपल नाव समर्पक आहे. कारण येथे जवळपास पसरलेले खडक पाहून वाघाच्या पंजाची आठवण येते.

हे मंदिर ध्यानासाठी प्रमुख केंद्र आहे. आव लक थानू (Ao Luk Thanu) पर्वतरांगांमधील निवांत जागा ध्यानासाठी आदर्श आहे.

येथील मुख्य विहार एका छोट्या चुनखडीच्या गुहेमध्ये आहे. या गुहेस लागून आणखी छोट्या छोट्या खोल्या आहेत. या खोल्यांना कुटी म्हणतात. या भागामध्ये प्रकाश भरपूर आहे आणि येथील भागाची देखभालही चांगली ठेवली जाते. येथे अडीचशेहून अधिक भिक्खू आणि भिक्खूणी राहतात. या भागामध्ये वृक्षतोड होण्यास येथील भिक्खूंनी विरोध केला. त्यामुळे येथील जंगलांचे संरक्षण झाले आहे.

निसर्गप्रेमी व्यक्तीसाठी हे ठिकाण म्हणजे क्रबीच्या पूर्वीच्या नैसर्गिक वातावरणाची छोटी प्रतिकृती आहे. येथील मुख्य मंदिरापासून ‘वंडरफुल ट्री’ म्हणून एक वृक्ष आहे. हा वृक्ष पवित्र मानला असून त्यास वस्त्र गुंडाळले जाते. याच्या बुंध्याचा विस्तार थायलंडमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही वृक्षाच्या बुंध्यापेक्षा मोठा असेल. या साऱ्या भागामध्ये गुहा आणि चुनखडीचे खडक आहेत.  पुरातत्त्वशास्त्रज्ञांस येथे पाषाणयुगातील वसाहतीचे अवशेष मिळाले आहेत. य अवशेषांमध्ये दगडी हत्त्यारे, कुंभारकामाचे तुकडे , मणी, आणि मूर्ती यांचा समावेश होतो.      

टायगर केव्ह टेंपल किंवा थाई भाषेमध्ये वत थम सिया हे क्रबीच्या ईशान्य दिशेस असणारे बौद्ध मंदिर आहे. या भागामधील हे बौद्ध धर्मीयांचे सर्वांत मोठे पवित्र ठिकाण येथील गुहेमध्ये असणार्‍या वाघाच्या पंजाच्या खुणा, उंच बुद्धमूर्ती आणि शिखरावर जाण्यासाठी असणार्‍या अवघड पायऱ्यांसाठी प्रसिध्द आहे.    

या भागामध्ये किरिवॉंग दरी असून हा सारा भाग जंगलांनी आहे. या जंगलांमधील काही वृक्ष अतिशय जुने आहेत. येथे भेट देण्यासारखी बरीच ठिकाणे असून त्यांतल्या त्यात Tum Khon Than, Tum Lod, Tum Chang Kaeo, and Tum Luk या गुहा भेट देण्यासारख्या आहेत.

मुख्य मंदिर शिखरावर असून तेथे जाण्यासाठी दोन मार्ग असून पुढे हे दोन्ही मार्ग एकत्र होतात. येथे वर जाण्यासाठी एकूण १,२७२ पायऱ्या आहेत. येथे दुसरा मार्ग असून हा मार्ग दुसर्‍या चुनखडीच्या गुहेकडे जातो. शिखरावरील मंदिर ६०० मीटर्स उंचीवर आहे. पायऱ्यांत आणि मंदिरात माकडे भरपूर आढळतात.

पर्वताच्या शिखरावर बुद्धांचा २७८ मीटर्स उंचीची भव्य सोनेरी मूर्ती आहे. ही मूर्ती पर्वताच्या पायथ्याहूनसुद्धा दिसते.   

<>आव  नंग (Ao Nang)                                                                                                      www.aonang.com 


आव नंग तसे छोटे शहर असून तुम्ही अर्धा तास चालत राहिलात तर शहराच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला सहज पोहचता.

<>>आव  नंग  बीच

आव  नंग बीच हे क्रबी मधील सर्वांत जास्त गर्दी असलेले बीच डेस्टिनेशन आहे. याचे पूर्ण नाव 'आव फ्रा नंग' किंवा 'प्रिन्सेस बे' असे असले तरी आव नंग हे संक्षिप्त रूपच जास्त वापरात आहे. आव नंग हा क्रबी मधील सर्वांत जास्त पाश्चात्त्यीकरण झालेला बीच आहे. झटपट प्रवास करणा-या प्रवाश्यांचे हे आवडते ठिकाण,  एअरपोर्टवरून दूरवरून नियोजन करून येणा-या प्रवाश्यांनी भरत चालले आहे.  हा बीच राय ले एवढा निसर्गसुंदर नाही. परंतु क्रबी ची सफर करण्यासाठी आव नंग खूप सोयीचा आहे. याचे कारण म्हणजे येथील  स्वस्त दरात राहण्याची सोय, चांगली उपाहारगृहे  आणि प्रवाश्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करणा-या  भरपूर प्रवासी संस्था.

आव नंगमध्ये वावरताना फारशी अडचण येणार नाही. कारण येथे बहुतेक सर्व गोष्टी बीचला लागूनच आहेत. बीच पूर्व-पश्चिम असा पसरला आहे.एअरपोर्ट रोड (हायवे ४२०३) बीचच्या पूर्व टोकाकडून उत्तरेकडे जातो. त्यामुळे बीच आणि एअरपोर्ट रोड एकमेकांना जवळ जवळ समांतर आहेत.दोन्ही रस्ते एकमेकांस जेथे मिळतात, त्या ठिकाणापर्यंत लॉन्ग टेल बोट्स   बीचपर्यंत येतात.या  होड्यांच्या पाण्याने  भिजलेल्या मोटर्सचा कर्कश आवाज येऊन ध्वनिप्रदूषण निर्माण होते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ही समस्या गंभीर होत  चालली आहे. यामुळे बीचच्या सौंदर्यालासुद्धा बाधा येते.

आव  नंगमध्ये शॉपिंग मॉल्स किंवा सुपरमार्केट्स नाहीत. परंतु कन्व्हीनिअन्स स्टोअर्स आणि सूव्हनिर्सची दुकाने  भरपूर आहेत. बहुतेक दुकाने बीचसमोरील रस्त्यापासून  लागून ओळीने आहेत.काही साइड रोड्स आहेत. तेथेसुद्धा बरीच दुकानेआहेत . या दुकानांतून पोस्टकार्ड्स, लोहचुंबक, स्वस्तातील दागिने, कपडे, पादत्राणे  अशा थायलंडमध्ये आढळणा-या वस्तू आढळतील.

आव नंग बीच क्रबी  इंटरनॅशनल एअरपोर्टवरून कारने ४० मिनिटांच्या, क्रबी  शहर आणि क्लॉंग मुअंग  बीचपासून २० मिनिटांच्या तर  Noppharat Thara बीचपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे.

<>> फॉसिल शेल बीच

हा बीच आव नंगच्या पश्चिमेस ७ किमी अंतरावर   आहे. येथे चार कोटी वर्षांपूर्वीचे शेलफिश  चपट्या खडकांच्या स्वरूपात आहेत. हे खडक चपट्या काँक्रीट शीट्ससारखे दिसतात. येथे एक छोटे वस्तुसंग्रहालय आणि रांगेने भेटवस्तूंची दुकाने आहेत.  संग्रहालय भूशास्त्रामध्ये रस असणा-यांसाठी उपयुक्त आहे.

<>> नोपारत थारा (Nopparat Thara) बीच

आव नंगच्या पश्चिम टोकाशी हा सुंदर बीच आहे. या बीचला नॅशनल पार्क म्हणून घोषित केले आहे .ओहोटीच्या वेळेला तुम्ही आसपासच्या खडकाळ चुनखडीच्या बेटांपर्यंत चालत जाऊ शकता. हा बीच क्रबी  शहराच्या पश्चिमेकडे १८ किमी अंतरावर असून आव नंग बीचला लागूनच आहे.  

<>> राय ले (Rai Leh) बीच 

आव नंगवरील हा आणखी एक सुंदर बीच. या बीचवर लॉंन्ग टेल बोटीनेच जाता येते.  हा बीच मुख्यभूमीचा भाग असूनसुद्धा  चुनखडीच्या टेकड्यांमुळे मुख्यभूमीपासून वेगळा झाला आहे. आव नंग आणि नोपारत थारापेक्षा हा बीच जास्त स्वच्छ आहे. येथे पाहण्यासारख्या काही गुहा आहेत. बीचवर हॉटेल्स आणि रिझॉर्टस आहेत. राय ले आणि को फाय फाय आयलंड जवळ जवळ आहेत. येथे सी कयाकिंग आणि एलिफंट ट्रेकची व्यवस्था करणारे टुर ऑपरेटर्स आहेत.

<>>फ्रा नंग केव्ह

राय लेच्या पूर्व दिशेस असणारी ही गुहा तेथील अद्भुत स्टॅलक्टाइट्स आणि स्टॅलक्माइट्ससाठी प्रसिध्द आहे. फ्रा नंगचा अर्थ आहे राजकन्या. कोळी लोकांचा असा विश्वास आहे की ही गुहा पुराणातील समुद्री राजकन्येचे घर आहे. पूर्वीच्या काळी कोळी लोक समुद्रात जाण्यापूर्वी येथे काही भेटवस्तू अर्पण करून जात. येथे भेटवस्तू अर्पण केली असता मासेमारीमध्ये यश येते  आणि समुद्रातील धोक्यांपासून रक्षण होते  अशी कोळी लोकांची श्रद्धा आहे. या गुहेमध्ये लाकडाची बरीच शिवलिंगे ठेवली आहेत. या शिवलिंगास भेटवस्तू अर्पण केली असता वंध्यत्व दूर होते असा येथील लोकांचा विश्वास आहे.       

 

<>>को पोडा (Poda) किंवा पोडा आयलंड

को पोडा हे बेट आव नंगपासून आठ किमी अंतरावर असून आव नंगपासून बोटीने येथे पोहचण्यास २५ मिनिटे लागतात. हे बेट अतिशय छोटे असून त्याचा व्यास एक किमीपेक्षा जास्त नाही. हे बेट नारळाच्या झाडांनी वेढले असून बेटावर अतिशय मऊ अशी पांढरीशुभ्र   वाळू आहे.  बीचपासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर पोवळ्याच्या खडकांची रांग असून तेथे विविध प्रकारचे सागरी प्राणी आढळतात. स्नॉर्केलिंगसाठी हे बेट सोयीचे आहे. त्यामुळे स्नॉर्केलर्स आणि एक दिवसाची सहल करणाऱ्या प्रवाश्यांचे हे आवडते बेट आहे. तरीसुद्धा या बेटावर फार वर्दळ आढळत नाही. या बेटावर वर्षभरात कधीही जाता येते. कारण येथे मॉन्सूनमध्ये फारसा फरक पडत नाही.  

<>> टुप (Tup) आयलंड

टुप आयलंडला आव नंग बीचवरून जाता येते. येथे जाण्यासाठी लॉंग टेल बोट सोयीची आहे. कारण या बोटीचे भाडे स्पीड बोटच्या जवळ जवळ निम्मे भरते. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारा इंग्रजी Y आकाराचा वाळूचा पट्टा. या पट्ट्यावरून इतर दोन बेटांना जाता येते. हे बेट स्नॉर्केलिंगसाठी योग्य आहे. उन्हाळ्यात येथे बरेच पर्यटक पोहातानाहे दिसतील.

 

क्लॉंग (Klong Muang) मुअंग आणि तुबकाक (Tubkaak) बीचेस 

क्लॉंग मुअंग बीच : क्रबी  शहरापासून चोवीस किमी आणि आव नंगपासून वीस मिनिटांच्या राइडच्या अंतरावर हा पांढर्‍याशुभ्र वाळूचा शांत बीच आहे. येथे तुम्ही बीचवरील  रेस्तराँमध्ये बसून ताज्या सीफूडचां आस्वाद घेत सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहो शकतात. तुम्हाला खरेदी आणि निशाजीवन हवे असेल तर आव नंग बीच जवळच आहे. तुमच्यासाठी येथून दिवसभराच्या सहली, कयाकिंग, डायव्हिंग, स्नोर्केलिंग इत्यादीची व्यवस्था हॉटेलमधून किंवा आसपास असणार्‍या प्रवासी संस्थांमधून होऊ शकते.

तुबकाक बीच:  क्रबी  शहरापासून तीस किमी अंतरावर हा शांत बेच आहे. येथून हॉंग आयलंडचे सुंदर दृश्य दिसते. येथून जवळच काव हांग नाक (Kao Hang Nak) फॉरेस्ट जवळच आहे.   येथे पंचतारांकित रिझॉर्ट्ससह सर्व सुखसोयी आहेत.  खरेदी आणि निशाजीवनासाठी आव नंग बीच वीस मिनिटाच्या ड्राइव्हवर आहेHow to get there?

क्रबी  – बेटे

को गाय/काय (Gai/Kai) किंवा हुआ ख्वान (Hua Khwan) किंवा चिकन आयलंड: 

या बेटावरील एका खडकाचा आकार कोंबडीच्या डोक्याप्रमाणे दिसतो. त्यामुळे या बेटास चिकन आयलंड असे नाव पडले आहे. या बेटाच्या एका टोकास उंच कडे आहेत तर दुसऱ्या द्वीपकल्पाच्या आकाराच्या बाजूस सुंदर बीचेस आहेत. भरतीच्या वेळेस द्वीपकल्पाची बाजू पाण्याने भरून येते आणि छोटे बेट तयार होते. या बेटावर राहण्याची सोय आहे. येथे पोवळ्याचे खडक भरपूर आहेत. येथील पाणीसुद्धा स्वच्छ आणि ऊबदार आहे. त्यामुळे येथे स्नॉर्केलिंगसाठी भरपूर वाव आहे. या बेटावर वर्षभरात कधीही जाता येते. कारण येथे मॉन्सूनमध्ये फारसा फरक पडत नाही.    

 

को फी  फी :  

क्रबी मधील प्रवासकार्यक्रम

दिवस  

क्रबी मध्ये आगमन.

स्थळदर्शन

आव नंग (Ao Nang) बीच, वत थम सुआ (Wat Than Sua) किंवा टायगर केव्ह.

क्रबी  समुद्रातील बेटांचा धावता दौरा करून फ्रा नंग (Phra Nang) केव्ह, टुप (Tup) आयलंड, चिकन आयलंड, पोडा आयलंड ही ठिकाणे पाहणे.

३ . परिशिष्टे  

उपयुक्त संकेतस्थळे:

www.yourkrabi.com 

Krabi-andaman chaa paachoo

www.krabi.com

Krabi vishayee thodakyaat maahitee

Krabi he Southern Thaialand chyaa pascchim kinaaryaavareel shahar aahe.

He shahr krabi nadeechyaa mukhaashee vasale aahe.

2005 madhye Krabi chee lokasankhyaa 24,986 hotee.

Krabi shahar he Krabi praant aani Krabi jilhyaachee raajadhaanee aahe.

Yetheel pramukh vyavasaay paryatan haach aahe.

Bangkok paasoon Krabi rastyaane sumaare 800 kimee antaraavar aahe.

Yaachyaa uttares Phang Nga, Nakhon Si Thammarat he praant tar poorves Surat Thani aani dakshines Trang haa praant yetaat.

Krabichyaa kshetraamadhye Andaman samudraamadheel sumaare 132 bete yetaat.

Tyaanpaikee, Lanta Islands,  Ko Phi Phi Don aani Ko Jum ashaa baryaach betaanvar lokavastee aahe.

Krabi praantaache aath prashasakeey vibhaag aahet.

Krabi praantaachaa ekoon vistaar 4709 kimee aahe.

Krabi chee ekoon lokasankhyaa 395,000 asoon yaapaikee 60% lokasankhyaa bauddh asoon 40% lokasankhyaa muslim aahe.

 

Monday, March 16, 2026

०९. दक्षिणेचा मोती – फुकेत

 वैशिष्ट्ये 

  थायलंड मधील सर्वांत मोठे बेट

  ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या इंग्रजी चित्रपटातील चित्रीकरणाचे ठिकाण असलेले ‘जेम्स बॉंड आयलंड’ येथे आहे. 

 

१ . परिचय 

फुकेतविषयी झटपट माहिती

 

स्थान:

???

क्षेत्रफळ:

५४० चौ. कि. मी.

लोकसंख्या:

२ लाख.

जाण्यास योग्य  वेळ:

नोव्हेंबर ते फेब्रुवारी.    



दृष्टिक्षेपात फुकेत


विस्तार


फुकेत हे थायलंड मधील सर्वांत मोठे बेट आहे.  ५४०  चौ  मीटर्स  आकारमान  असणारे  हे  बेट  जवळ  जवळ  सिंगापूरच्या  आकाराचे  आहे.


भौगोलिक स्थान

थायलंडच्या ईशान्य किना-यापासून थोडे दूर अंदमान समुद्रामध्ये.


मुख्य शहर

फुकेत टाऊन.


प्रचलित भाषा 

थाई, चिनी, इंग्लिश.


लोकसंख्या 

२११,०००.


हवामान: स्थानिक हवामान उष्ण आणि दमट आहे. उष्ण कटिबंधीय हवामान, मुख्यत: मॉन्सून वा-यांवर अवलंबून आहे. मे  महिन्यामध्ये  या  बेटावर  पाऊस  येतो  आणि  वर्षभरात  साधारण  १००  इंच  पाऊस  पडतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हवामान थंड आणि कोरडे असते.


विस्ताराने माहिती


फुकेत  हा  शब्द  बहुतेक  बुकित  या  मले  शब्दापासून  तयार झाला  आहे. फुकेत दुरून टेकडीसारखे  दिसते, त्यामुळे  हे  नाव  पडले  असावे. शतकानुशतके थाई  मुख्यभूमी , चीन  आणि  मलेशियामधून  फुकेतमध्ये  असंख्य  लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे  येथे  चिनी  प्रभाव  असलेली  मिश्र  संस्कृती  दिसून  येते  आणि  त्यामुळे  फुकेत  पर्यटकांचे   भेट  देण्याचे  आवडते ठिकाण आहे.

फुकेत थायलंडच्या ईशान्य किनार्‍यावर आहे. ते Bankokच्या दक्षिणेकडे ८६० किमी तर विषुववृताच्या उत्तरेस ८३० किमी अंतरावर आहे (अक्षांश ७.५ﹾ).  या भौगोलिक स्थानामुळे त्याची तुलना इथिओपिया, नायजीरिया आणि व्हेनेझुएलाबरोबर होऊ शकते. हिंदी महासागरातील अंदमान समुद्रामध्ये फुकेत आहे. हे थायलंडमधील सर्वांत मोठे बेट असून स्वतंत्र प्रांताचा दर्जा  मिळण्याएवढे त्याचे आकारमान आहे. 

बेटाची लांबी ४९ किमी असून रुंदी २१ किमी आहे. आसपास असणाऱ्या ३९ बेटांच्या ७० चौकिमी क्षेत्रफळासह  फुकेतचे एकूण क्षेत्रफळ ५७० चौकिमी आहे. थायलंडच्या मुख्य भूमीपासून छोट्या खाडीने विभागले असून Sarasin या ६०० मीटर लांबीच्या पुलाने थायलंडच्या मुख्य भूमीशी जोडले आहे. 

फुकेतच्या प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आहे. बेटाची भूमी मुख्यत: granite आणि थर असलेल्या खडकांची आहे. टेकड्या भरपूर असून काही टेकड्यांची उंची ५०० मीटर्स आहे. टेकड्या सर्वत्र असून पश्चिम किनार्‍याकडे त्या कमी होत जातात. मैदानी भागांमध्ये शहरी वस्ती असून तेथे रबर आणि नारळाची लागवड होते. Khao Phra Thaew National Park मध्ये  खारफुटीची आणि विषुववृत्तीय पर्जन्यजनित  अरण्ये आहेत. 

बेटाच्या पश्चिम किनार्‍यावर उत्कृष्ट बीचेस आहेत. पावसाळ्यामध्ये बेटावर आदळणाऱ्या अजस्र लाटांमुळे हे बीचेस तैय्यार झाले असून मध्ये मध्ये खडकाळ भूशिरे आहेत.  

बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर लहान बीचेस आहेत आणि तेही दलदलीने भरलेले आहेत. पूर्वीच्या कथलाच्या खाणकामाच्या काळातील कचरा या किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला हे सुद्धा या किनार्‍याच्या दुरावस्थेचे एक कारण आहे. बहुतेक सारा पूर्व किनारा खारफुटीच्या जंगलांनी भरलेला आहे. 

फुकेतच्या आसपास असणारी बेटे दोन प्रकारची आहेत. पश्चिमेकडे असणारी बेटे मुख्यत: graniteची असून ही बेटे दक्षिण आणि पूर्व किनार्‍यास जवळ आहेत.  ही बेटे कमी उंचीची असून जंगलांनी भरलेली आहेत. या बेटांमध्ये Koh Racha Yai आणि Koh Hee सारखे बीचेस आहेत. नैऋत्य दिशेस असणारी बेटे चुनखडीच्या खडकांची असून पूर्व आणि दक्षिण बाजूस पसरलेली आहेत. ही बेटे समुद्राशी काटकोनामध्ये उभी असून अतिशय निसर्गरम्य  आहेत. यांमध्ये Phi Phi आयलंड्स आणि फंग आ बेचा समावेश होतो. ही बेटे तयार  होण्यास कारणीभूत असणारे चुनखडीचे खडक फुकेतच्या पूर्वेकडील फंग आ प्रांत ते Krabi प्रांत आणि पुढे Trang पर्यंत पसरलेले आहेत. या खडकांमुळे या साऱ्या किनारपट्टीवर सुंदर वनश्री निर्माण झाली आहे. 

फुकेत सहसा नैसर्गिक आपत्तींपासून मुक्त आहे. पावसाळ्यामध्ये कधी कधी मोठी वादळे होतात, परंतु त्यांचे रूपांतर टायफूनमध्ये कधी झाले  नाही. पावसाळ्यामध्ये क्वचित पाणी साचते आणि छोटे मोठे पूर  येतात. पावसाळ्यामध्ये काही भूस्खलनाचे प्रकार होऊन कधी कधी जीवितहानी झाली आहे. जेथे वृक्षतोड झाली आहे, अशा ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. २००४ साली त्सुनामीमुळे जो भूकंप झाला होता, तो फुकेतमध्ये केवळ जाणवला होता, त्यामुळे नुकसान असे झाले नव्हते. तरीसुद्धा फुकेतखालून एक साधारण भूकंपकारी रेषा आहे. कदाचित त्यामुळेच एप्रिल २०१२ मध्ये फुकेतला ४.४. रिश्टर मात्रेचा धक्का बसला होता. परंतु त्यामुळे कुठलेच मोठे नुकसान असे झाले नाही.      


इतिहास: सतराव्या शतकामध्ये फुकेतमध्ये कथलाचे साठे आढळल्याने डच, इंग्रज आणि नंतर फ्रेंच, फुकेतवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. थाई राजा Narai याने डच आणि इंग्रज यांचा प्रभाव कमी करण्यासाठी फ्रेंचांबरोबर करार करून व्यापाराचा एकाधिकार फ्रेंचांना दिला.  परंतु १६८८ साली झालेल्या सयामी क्रांतीमुळे थायलंडमधून फ्रेंचांना हुसकून देण्यात आले.  यानंतर १७८५ मध्ये ब्रह्मी लोकांनी फुकेतवर आक्रमण केले. यावेळी फुकेतचा गव्हर्नर नुकताच मरण पावला होता. परंतु त्याची पत्नी थान फू यिंग चान मोठी धीराची बाई होती. तिने आणि तिची बहीण मूक हिने होत्या त्या साऱ्या फौजा एकत्र करून ब्रह्मी आक्रमकांविरुद्ध यशस्वी लढा दिला. या लढ्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग होता. रामा पहिला या थायलंडमधील त्या वेळच्या राजाने या वीरांगनांचा यथोचित गौरव केला.  Chulalongkorn (रामा पाचवा) या राजाच्या कारकीर्दीमध्ये फुकेतला कथलाचे उत्पादन करणाऱ्या दक्षिणेकडील प्रांतांच्या प्रशासकीय केंद्राचा दर्जा देण्यात आला. १९३३ साली फुकेतला स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्यात आला.  

फुकेतला कसे जावे: बँकॉक आणि सिंगापूरहून विमानाने फुकेत तासाभराच्या अंतरावर आहे. आशियामधील बहुतेक सर्व विमानतळांना फुकेत जोडलेले आहे.

फुकेतमध्ये राहावे कुठे: फुकेतचा आकार पाहिलात तर उभट आहे. त्याची लांबी २१ किमी तर रुंदी ४९ किमी आहे. म्हणजे रुंदी लांबीपेक्षा जास्त आहे. फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट उत्तरेकडे आहे. पूर्व किनाऱ्यावर फुकेत शहराशिवाय फारसे काही नाही. फुकेत शहर औद्योगिक केंद्र असल्यामुळे येथे पर्यटकांच्या दृष्टीने फारसे काही नाही. फुकेतमधील बीचेस पश्चिम किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे राहण्यास योग्य ठिकाण पश्चिम किनाऱ्याच्या मध्यभागी असणारे पातोंग हे आहे. पातोंगमध्ये राहून तुम्ही उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील ठिकाणी सहज जाऊ शकता. फुकेतमधील निशाजीवन आणि खरेदी यांचे केंद्रही पातोंगच आहे. या भागामध्ये हॉटेल्सही भरपूर आहेत.  

२. प्रवास

उत्तर फुकेत

फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट, http://www.phuketairportonline.com/                                                                                         


फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट हा थायलंडमधील दुसरा सर्वांत मोठा वर्दळीचा विमानतळ आहे. हा विमानतळ म्हणजे फुकेत आयलंडचे प्रवेशद्वार असून थायलंडच्या दक्षिण भागातील पर्यटकांचे नंदनवन आहे. आज या विमानतळावर १० ए्अरलाइन्स सेवा देतात, २९ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात, २७ हजार उड्डाणे होतात तर १२ हजार टन सामानाची नेआण होते. यावरून या विमानतळाच्या भव्यतेची कल्पना येईल.

पश्चिम फुकेत

पातोंग (Patong) शहर : पातोंग हे फुकेतच्या पश्चिम किनार्‍यावरील शहर निशाजीवन आणि खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. १९८०च्या उत्तरार्धामध्ये पाश्चिमात्य, विशेषत: युरोपिअन पर्यटकांमध्ये पातोंग लोकप्रिय झाले. आता येथे भरपूर हॉटेल्स झाली असून हे ठिकाण म्हणजे पर्यटकांची मक्का झाले आहे. २००४ मध्ये आलेल्या सुनामीचा पातोंगला मोठा फटका बसला होता आणि येथे बरीच हानी झाली होती. पातोंग आता या हानीमधून बऱ्यापैकी सावरले आहे.      

पातोंग बीच: पातोंग शहराच्या पूर्ण पश्चिम बाजूस ३.५ किमी लांबीचा बीच आहे. येथील निशाजीवन बांगला रोड आणि पॅराडाइज कॉंप्लेक्स या दोन भागामध्ये एकवटले आहे. पॅराडाइज कॉंप्लेक्स भागातील निशाजीवन समलिंगी लोकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. या दोन्ही भागांमध्ये बार्स, डिस्कोथेक्स आणि गो गो बार्स भरपूर आहेत. 

काटा (Kata) बीच: कॅरन बीचच्या दक्षिणेकडे काही मिनिटांच्या अंतरावर काटा बीच आहे. येथील पांढरीशुभ्र वाळू, स्वच्छ पाणी, चहुबाजूंना असणारी नारळाची झाडे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे बीचजवळच रेस्तराँ आणि राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. हा बीचसुद्धा निशाजीवणासाठी चांगला आहे. मे ते ऑक्टोबरमध्ये लाटांचा उपयोग करून घेण्यासाठी येथे सर्फर्सची गर्दी असते तर नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये सूर्यास्नासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते.  काटाचे दोन मुख्य भाग पडतात.

१. काटा सेंटर:- हा भाग उत्तर दिशेस असून कॅरनला जवळ आहे. 

२. काटा साऊथ:- येथे ब्राऊजिंग करण्यासाठी कॅफे, सूव्हनिर्स आणि कपड्यांची दुकाने भरपूर आढळतील.   


कॅरन (Karon) बीच: 

कमला बीच: 

फुकेत फँटसी : www.phuket-fantasea.com

        

फुकेत फँटसी हा एक थीम पार्क असून याला ‘बेस्ट अट्रॅक्शन अॅवॉर्ड मिळाले आहे.  हे  थीम पार्क सफारी पार्कच्या निर्मात्यांनी बनविले आहे.  हा थीम पार्क एकूण १४० एकर क्षेत्रामध्ये पसरला आहे. हा पार्क बांधण्यासाठी ३५० कोटी बाथ एवढा खर्च आला होता. फुकेत फँटसीची प्रमुख आकर्षणे अशी आहेत:-

१. कार्निव्हल व्हिलेज:- येथे निरनिराळे खेळ खेळावयास मिळतील, हस्तव्यवसाय पाहावयास मिळतील, तसेच खरेदी करता येईल. 

२. रेस्तराँ:- येथे ४,००० आसनक्षमता असणारे बफे पद्धतीचे भव्य रेस्तराँ असून यामध्ये थाई आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात.

३. थिएटर शो:- येथे तुम्हाला श्वास रोखून धरावयास लावणारा ला व्हेगा पद्धतीचा भव्य थिएटर शो पाहावयास मिळेल. या शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष परिणाम यांच्या सहायाने तुमच्यासमोर थाई संस्कृतीची रहस्ये उलगडली जातील. हा प्रयोग सहकुटुंब पाहण्यासारखा आहे.    


बांगताओ (Bangtao) बीच:  


पूर्व फुकेत

फुकेत शहर

जुने फुकेत शहर

जुन्या फुकेत शहरामधील साइनो-पोर्तुगीज वास्तू:  

              

फुकेतचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या फुकेत शहरामधील साइनो-पोर्तुगीज म्हणजे चिनी आणि पोर्तुगीज पद्धतीच्या वास्तू. फुकेतमध्ये कथलाच्या व्यापारासाठी निरनिराळ्या देशातून लोक आले. या लोकांनी अनेक वास्तूसुद्धा बांधल्या. त्यांमध्ये मुख्यत: चिनी आणि पोर्तुगीज पद्धतीने बांधलेल्या वास्तू लक्ष वेधून घेतात. या वास्तू मुख्यत: दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या प्रकारच्या वास्तू म्हणजे शॉप हाऊसेस. यांची शैली चिनी-पोर्तुगीज अशा मिश्र प्रकारची आहे. दुसऱ्या प्रकारच्या वास्तू म्हणजे मोठे प्रासाद. यांची शैली चिनी आणि वसाहतकालीन अशी मिश्र प्रकारची आहे. या वास्तू कुणी आणि कधी बांधल्या याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.  परंतु या वास्तू पाहताना तुम्हाला भूतकाळामध्ये कित्येक शतके मागे गेल्यासारखे वाटेल.   

Phithak Chinpracha House Museum (Chinpracha House) Ban Chinpracha, 98 Krabi Road      

 

हा सुंदर प्रासाद Phithak Chinpracha (११८३-१९४९) याने १९०३ मध्ये बांधला. १९०९ मध्ये थाई अधिकार्यांकडून यास संवर्धनाचे पारितोषिक मिळाले. 

Phra Pithak Mansion, 9 Krabi Road  

 

Phra Pithak Chinpracha यानेच Chinpracha हाऊसला लागून हा आणखी एक सुंदर प्रासाद बांधला आहे. हा प्रासाद बांधण्यास दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि १९४० साली याचे बांधकाम पूर्ण झाले. हा प्रासाद लोकांना पाहण्यास खुला नाही. 

फुकेत प्रॉव्हिन्शल हॉल, Surin, Phuket 83000

 

ही सुंदर इमारत  १९१० साली बांधण्यात आली असून तिचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि ९९ दरवाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

थाई हुआ (Thai Hua) म्युझिअम: 

Opening Hours: Daily from 09:00 – 17:00 

Location: 28 Krabi Road, Phuket Old Town area within walking distance from the famous Soi Romanee and Baan Chinpracha Mansion. Its parking space is open until 17:30 only.  

Tel: +66 (0)76 211 224 

Price Range: 200 baht per person + 200 baht to take photos! 


     

हे म्युझिअम युरोपिअन-साइनो-थाई पद्धतीचे बांधकाम आहे. याचे बांधकाम १९३४ साली पूर्ण झाले. ही थायलंडमधील सर्वांत जुनी शाळा असून तिची स्थापना १९११ साली झाली. १९९० सालच्या उत्तरार्धामध्ये या शाळेचे स्थलांतर झाले. सध्या या वास्तूमध्ये आर्ट गॅलरी आहे.  

 

बान क्लुंग जिंदा (Baan Klung Jinda)

 

ही वास्तू शंभर वर्षे जुनी असून सध्या येथे जुने सयामी खाद्यपदार्थ मिLaणारे उपाहारगृह आहे. ही अद्भुत वास्तू चिनी लष्करामधील एका इसमाने बांधली असून या वास्तूचे बांधकाम पूर्णपणे चिनी पद्धतीचे आहे. येथे ब-याच पुरातन वस्तू आहेत.

फुकेत फिलॅटेलिक म्युझिअम:

 

हे फुकेतमधील सर्वांत जुने डाक आणि तारघर आहे. याचे नूतनीकरण करून येथे फिलॅटेलिक म्युझिअम करण्यात आले आहे. येथे जुनी डाक सामग्री, जुने टेलिफोन्स, तसेच जुने थाई पोस्टाची तिकीटे ठेवण्यात आली आहेत.  


दक्षिण फुकेत

चालोंग : 

चालोंग हा दक्षिण फुकेतमधील उपजिल्हा आहे.  

चालोंग बे: चालोंगचा पूर्व किनारा दलदलयुक्त असल्याने पोहण्यास उपयोगी नाही. पण बोटिंगसाठी उपयोगी आहे. येथे ७२० मीटर्स लांब आणि सात मीटर्स रुंद जेटी आहे. येथे रेस्तराँ, दुकाने भरपूर आहेत. 


वत चालोंग (Wat Chalong):

वत चालोंग फुकेत शहराच्या दक्षिणेस आठ किमी अंतरावर आहे. फुकेतमध्ये एकूण २९ बौद्ध मंदिरे असून वत चालोंग यांमधील सर्वांत मोठे बौद्ध मंदिर आहे. १८७६ साली कथलाच्या खाणकामगारांचे बंड झाले होते. या बंडामध्ये जखमी झालेल्या लोकांवर Luang Pho Chaem आणि Luang Pho Chuang या दोन बौद्ध भिक्खूंनी औषधोपचार केले होते. त्यांची स्मृती म्हणून हे बौद्धमंदिर बांधले आहे.    

केप प्रोम्थेप (Cape Promthep):

प्रोम्थेप केप किंवा लेम प्रोम्थेप (Laem Promthep) हे एका खडकाळ भूशिराचे नाव आहे. हे भूशिर फुकेतच्या ईशान्य दिशेस असून समुद्रामध्ये शिरले आहे. येथून समुद्राचे अतिशय सुंदर ठिकाण असून येथून सूर्यास्ताचेही अतिशय सुंदर दृश्य दिसते. येथे एक टेकडी असून टेकडीवर एक मंदिर आणि दीपगृहसुद्धा आहे. येथून रवाई (Rawai) आणि नैहाम (Naiham) बीच जवळ आहेत.    

फं ङा (Phang Nga)

फं ङा आ प्रांत: फं ङा हा थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या पश्चिम दिशेस अंदमान समुद्र तर दक्षिण दिशेस फं ङा बे हा उपसागर आणि फुकेत प्रांत आहे.     

फङ आ बे: मले द्वीपकल्पाचा भाग असणारी दक्षिण थायलंडची मुख्यभूमी आणि फुकेत बेटाच्यामध्ये  असणारा फङ आ बे हा  उपसागर मले सामुद्रधुनीचा भाग आहे. फङ आ बेचे एकूण क्षेत्रफळ ४०० चौकिमी असून येथे एकूण १०० बेटे आहेत. या उपसागरामध्ये जिथे तिथे पाचूसारख्या हिरव्या पाण्यातून काटकोनातून बाहेर आलेले चुनखडीचे उंच खडक ठिकठिकाणी दिसतात. येथील बेटांवर चुनखडीच्या गुहा आढळतात. १९८१ पासून या उपसागराचा मोठा भाग आओ फङ आ बे नॅशनल पार्क म्हणून संरक्षित केला गेला आहे. त्यामुळे या उपसागरातील दुर्मिळ प्राणी आणि  वनस्पती यांना संरक्षण मिळाले आहे.

फं ङा बेमधील चुनखडीचे खडक म्हणजे फार मोठे आश्चर्य आहे. हे खडक पाहून असा प्रश्न पडेल की हे खडक तयार कसे झाले? या खडकांचा इतिहासही रंजक आहे. सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वी या भागामध्ये मले द्वीपकल्पाची उत्तर सीमा ते उत्तर व्हिएटनाम एवढ्या विस्तृत भागामध्ये पोवळ्याचे खडक होते. हे पोवळे नंतर मृत झाले आणि त्यांमध्ये असणाऱ्या कॅल्साइट किंवा कॅल्शिअम कार्बोनेटच्या अंशामुळे येथे शेकडो मीटर्स जाडीचे खडक तयार झाले.  नंतर  भूगर्भातील हालचालींमुळे हे खडक भूपृष्ठाच्या वर आले. ही क्रिया डोंगर तयार होतात तशी होती. यानंतर साडेसात कोटी वर्षे पाऊस, वारा, समुद्राच्या लाटा, सूर्याची उष्णता, या सर्वांचा परिणाम होऊन या खडकांचे आज दिसणारे स्वरूप तयार झाले आहे. या खडकांमध्ये असणाऱ्या निनिराळ्या रासायनिक पदार्थांवरून त्यांना निरनिराळे रंग प्राप्त झाले आहेत         

फंग आ बे हे फुकेतमधील पर्यटकांचे सर्वांत आवडते आकर्षण आहे. फुकेतहून कारने फंग आ आयलंडला ४५ मिनिटात पोहचता येते. फंग आ बे ला क्रूझने सफर करणे हा आणखी एक वेगळा अनुभव आहे. जेम्स बॉंड आयलंड आणि को Panyee ही  येथील सर्वांत जास्त लोकप्रिय दोन ठिकाणे आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे फुकेतच्या उत्तर टोकाकडून बोटीने सफर करणे. फङ आ बेमधील सर्व बेटांना भेट द्यावयाचे ठरवले तर एक महिना सहज लागेल. येथे अतिशय सुंदर परंतु निर्मनुष्य असे पुष्कळ बीचेस आहेत. येथे स्नॉर्केलिंग आणि डायव्हिंगसाठी उत्तम साइट्स आहेत.     

को पिंग गान/ गन (Ping Gan/Ping Gun) आणि को तापू (Tapoo) /जेम्स बॉंड आयलंड: 

खाओ फिंग कान (Khao Phing Kan) किंवा को खाओ फिंग कान हे बेट फं ङा बेमध्ये फुकेतच्या ईशान्य दिशेस आहे. हे बेट म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. हे बेट म्हणजे एक उंच खडक असून यामध्ये अनेक गुहा आहेत. या गुहा पाहणे म्हणजे मजेदार अनुभव आहे. बेटाचा पूर्व किनारा गजबजलेला असून येथे कपड्यांचे, शिंपले आणि लाकडापासून बनवलेल्या सूव्हनिर्सचे आणि इतर वस्तूंचे बरेच स्टॉल्स आहेत.  

या बेटाच्या किनार्‍यापासून ४० मीटर्स अंतरावर २० मीटर्स उंचीचा एक खडक आहे. या खडकास खाओ किंवा को तापू म्हणतात. तापूचा अर्थ थाई भाषेमध्ये ‘खिळा’. को तापू म्हणजे ‘खिळ्याचे बेट’. या उभट खडकाचा वर पसरट आणि खाली निमुळता आकार येथील लोकांना खिळ्यासारखा वाटल्यास नवल नाही. को तापूविषयी एक मजेदार कथा प्रचलित आहे. एकदा एक कोळी फंग आ बेमध्ये मासेमारी करीत होता. मासेमारी करताना बहुतेक वेळा त्याला भरपूर मासळी मिळत असे. परंतु एकदा त्याला मासळी काहीच मिळाली नाही. उलट जाळ्यामध्ये एक गंजलेला खिळा आला. त्या कोळ्याने रागाने तो खिळा पाण्यात फेकून दिला आणि त्याने जाळे पुन्हा पाण्यात टाकले. जाळे ओढून पाहतो तर जाळ्यामध्ये पुन्हा तोच खिळा. कोळ्याने राग येऊन तो खिळा जमिनीचा भाग पाहून त्यात ठोकला. तो खिळा म्हणजेच हा खडक. हा खडक संरक्षित क्षेत्रात असल्यामुळे याच्या फार जवळ जाता येते नाही. तेव्हा याचे निरीक्षण बोटीतून किंवा याच्या जवळ असणाऱ्या  को पिंग गान बेटाच्या किनार्‍यावरून करता येते. हे थायलंडमधील सर्वांत प्रसिद्ध बेट फंग आ बेमध्ये आहे. को तापू आता एवढे प्रसिद्ध झाले आहे की ते फुकेतची ओळख झाले आहे.    

ही बेटे आव फं ङा नॅशनल पार्कचा भाग आहेत. ही बेटे १९७४ साली आलेल्या  ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या जेम्स बॉंडच्या  चित्रपटामध्ये झळकली होती. तेव्हापासून या बेटांचे नाव ‘जेम्स बॉंड आयलंड’ पडले.  पुष्कळ लोक को तापूस जेम्स बॉंड आयलंड समजतात. प्रत्यक्षात खाव फिंग कान हे जेम्स बॉंड आयलंड आहे.   

द मॅन विथ द गोल्डन गन’ आणि को पिंग गान:

 

बॉंडपटांची परिणामकारकता त्यामधील खलनायकावर अवलंबून असते. यामध्ये खलनायकाचे गुप्त आणि सुसज्ज निवासस्थानही महत्त्वाचे असते. बॉंडला अखेर या गुप्त निवासस्थानामध्ये जाऊन खलनायकाचा शेवट करावा लागतो. या कामी त्याला बहुतेक वेळी एखाद्या सुंदर युवतीची मदत मिळते. ही युवती बऱ्याच वेळा खलनायकाच्या पक्षातील असते. ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ मध्ये असा खलनायक आहे सोनेरी बंदुकीचा वापर करणारा फ्रॅन्सिस्को स्कॅरामँगा आणि त्याचे निवासस्थान एका अज्ञात बेटावर आहे, जेथे स्कॅरामँगाने सौर शक्तीवर चालणारी संयंत्रे बनविली आहेत. बॉंड अखेर त्याच्या नेहमीच्या शिताफीने स्कॅरामँगाचा खात्मा करतो. चित्रपटास आवश्यक असणाऱ्या  प्रखर उन्हाची  आणि खलनायकाच्या निवासस्थानाच्या  गूढरम्यतेची गरज को पिंग गानने पूर्ण केली आहे.              

Koh Panyee: 


को पनक (Koh Panak) आयलंड: 

       


को पनक हे बेत फुकेत आणि को Side Yi पासून सारख्या अंतरावर आहे. या बेटावर बऱ्याच गुहा आहेत. या गुहा पाहावयाच्या असतील तर वाटाड्यास बरोबर घेणे चांगले.  

हॉन्ग आयलंड: 

      

हॉन्ग आयलंडचा स्टार लाईट किंवा चांदण्यातील प्रवास प्रसिद्ध आहे. येथे नैसर्गिक प्रकाशाचे तीन स्रोत आहेत. त्यामुळे येथे विजेरीची गरज भासणार नाही.

बांगला रोड नाइट लाइफ: 

जुने फुकेत शहर:

सायमन कॅबरे:

बिग बुद्धा: 

थाई बॉक्सिंग: 

वत चालोंग (Chalong): 

उपक्रम  

स्पीडबोटने फाय फाय आयलंडचा दौरा:

फुकेत फँटझिया शो: 

फोर इन वन अर्ध्या दिवसाची सफारी:

फुकेत आयलंड आणि सिटी दौरा:

सी कयाकिंग- हॉंग बाय स्टारलाइट:

व्हाइट वॉटर रॅफ्टिंग: 

ए टी व्ही (ATV) 

फङ् आ बे चा क्रूझने दौरा:    

फुकेतमधील प्रवासकार्यक्रम

दिवस ६ 

कॉ समुईहून विमानाने फुकेतला आगमन.

आल्यावर  रंगीबेरंगी (colourful) मार्केट  मध्ये  फेरफटका  मारून  १९  व्या  शतकातील  साइनो-पोर्तुगीज (Sino-Portuguese) पद्धतीच्या    इमारती  पाहणे. 

संध्याकाळी प्रेक्षणीय फॅण्टझिया शो  पाहणे . 

दिवस ७ 

फङ् आ (Phang Nga) डिस्कव्हरी लँडचा दौरा.

क्रूझने प्रसिद्ध फङ् आ बेला जाणे.

फङ् आ बेमध्ये पाहावयाची ठिकाणे:-

मॅनग्रोव्ह फॉरेस्ट, सागरी गुहा, समुद्रातील चुनखडीचे खडक, जेम्स बॉन्ड आयलंड वगैरे.     

३. परिशिष्टे


BEST LUXURY HOTELS

1. Avista Hideway, Patong Beach, http://www.phuket.com/avista-hideaway-resort-spa/

2. The Naka Island, http://www.phuket.com/naka-island-luxury-collection-resort/

3. Cape Sienna, Kamala Beach, http://www.phuket.com/capesienna/


BEST BOUTIQUE HOTELS

1. SALA Phuket Resort, Mai Khao Beach, http://www.phuket.com/salaphuket/

2. Manathai Resort, Surin Beach, http://www.phuket.com/manathai/

3. Burasari Resort, Patong Beach http://www.phuket.com/burasari/


BEST BEACHSIDE HOTELS

1. Moevenpick Resort & Spa, Karon Beach, http://www.phuket.com/moevenpick/

2. The Surin Phuket, Surin Beach, http://www.phuket.com/the-surin-phuket/

3. The Mangrove Panwa Phuket Resort, Panwa, http://www.phuket.com/the-mangrove-panwa-phuket-resort/


BEST BUDGET HOTELS

1. Deevana Patong Resort & Spa, Patong Beach, http://www.phuket.com/deevana/

2. Safari Beach Hotel, Patong Beach, http://www.phuket.com/safaribeachhotel/

3. Aloha Villa, Patong Beach, http://www.phuket.com/aloha-phuket/



  





China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...