Saturday, November 15, 2025

हंटर व्हॅली गार्डनची सफर

ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये  ख्रिसमसचे वातावरण सुरू होते. आमची सून मनाली हिने हंटर्स व्हॅली गार्डनमध्ये ख्रिसमस लाइटिंग खूप चांगले असते असे सांगून हे लाइटिंग पाहण्याचे बुकिंग केले.

त्याप्रमाणे आम्ही १५/११/२०२५ (शनिवार) ला सकाळी माझे व्याही श्री. देवेंद्र पाटील यांच्या घरी तुंगाबी (Toongabbie ) येथे जमलो आणि सकाळी प्रवासास सुरुवात केली. माझा मुलगा अद्वैत, सून मनाली आणि त्यांचा डॉग बेली त्यांच्या गाडीत व देवेंद्र, त्यांच्या पत्नी सौ. वैशाली वहिनी, मी व माझी पत्नी सौ. वर्षा एका गाडीत असे सर्वजण निघालो.
-----------------------------------------
Mooney Mooney 
मूनी मूनी
-----------------------------------------------------------
मूनी मुनी हे हॉक्सबरी नदीच्या उत्तरेस, M1 मोटरवेच्या अगदी जवळ - सिडनीपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेले एक लहान वॉटरफ्रंट   गाव आहे. Hawkesbury River Bridge पार केल्यानंतर लगेच डावीकडे तुम्हाला मूनी मूनी दिसेल. येथे बरेच पर्यटक तुम्हाला फोटो घेताना, उपाहार करताना दिसतील. सेंट्रल कोस्टला जाताना बहुतेक वेळा पर्यटक सकाळी लवकर निघतात. या वेळी फार तर चहा झालेला असतो. मग तासाभराने चांगली भूक लागलेली असते. मूनी मूनी येथे नाश्ता झाला की मग जेवायच्या वेळेपर्यंत काळजी राहत नाही.
तुंगाबीहून  पाऊण तासाच्या प्रवासानंतर (सुमारे ४५ किमी)  मूनी मूनी येथे  पहिला विश्राम आम्ही येथे घेतला. या मार्गाने जाताच नेहमीच मूनी मूनी येथे आमचा पहिला विश्राम असतो.

मूनी मूनी न्यू साउथ वेल्समधलं एक शांत लेकफ्रंट गाव आहे. मूनी मूनी हे नाव हॉक्सबरी नदीच्या बाजूला असलेल्या पेनिन्सुला भागातून आलं आहे. मूनी मूनी या शब्दाचा अर्थ स्थानिक भाषेत कांगारू असा असावा. मूनी मूनी म्हणजे खूपच कांगारू. खूप या अर्थाने शब्द दोनदा वापरण्याची स्थानिक भाषेतील पद्धत असावी. आपण मराठीत सुद्धा अशा अर्थाने बोलतो. जसे-ऑस्ट्रेलियाच्या आऊटस्कर्ट्स मध्ये गेलात तर तुम्हाला कांगारूच कांगारू दिसतील.

मूनी मूनी येथे Deerubbun Reserve हे सार्वजनिक विश्रांती क्षेत्र आहे. आम्ही गेलो ते हेच क्षेत्र असावे. येथे बोट रॅम्प, पिकनिक Tisch, आणि नदीकाठीचा सुंदर विहारक्षेत्र आहे. 

इतिहासामध्ये, हे गाव जुना फेरीपॉइंट होता.  येथे १९व्या शतकात हॉक्सबरी नदी पार करण्यासाठी फेऱ्या चालत असत. 
 
(मूनी मूनी येथील क्षणचित्रे)
मूनी मूनी येथे अल्प उपाहार करून आम्ही पुढे निघालो.
---------------------------------------------------------
Norah Head Light House 
नोरा हेड लाइटहाऊस 
40 Bush Street, Norah Head, NSW 2263, Australia
norahheadlighthouse.com.au
-----------------------------------------------------------
पुढे आम्ही  ७०-८० किमी प्रवास करून नोरा हेड येथे आलो.      

नोरा हेड हे Central Coast भागातील समुद्रकिनारी असणारे गाव असून ते The Entrance आणि Toukley यांच्या उत्तरेस आहे. 

नोरा हेडचे  मूळ नाव “Bungaree Noragh Point” होते. हे आदिवासी नेता Bungaree यांच्या नावावरून आहे. “Norah” हा शब्द आदिवासी भाषेतील “ngurra” या शब्दाचे इंग्रजी  रूपांतर आहे, ज्याचा अर्थ “camp / place” किंवा “place of origin” असा होतो.

Norah Head Light House:
नोरा हेड लाइट हाऊस

नोरा हेड   परिसरात झालेल्या अपघातांत लहान coasters, schooners, ketches यापासून ते मोठ्या steamshipsपर्यंत विविध प्रकारच्या जहाजांचा समावेश होता.
-----------------------------------------------------------
नोरा हेडजवळ असलेल्या धोकादायक खडकांमुळे या भागात  १८३३ ते १९६७ या काळात  नोरा हेडजवळील Bird Island परिसरात १३ प्रमुख अपघात झाले. या अपघातांची माहिती देणारा खालील बोर्ड तेथे लावला आहे:-

किनाऱ्यावर Merchant Mariners Memorial असे वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे स्मारक असून तेथे एक स्मृति फलक (plaque) आहे. त्यावर  “In memory of merchant mariners lost in time of war – June 1995.” असा संदेश लिहिला आहे.

युद्धकाळात Merchant Navy हे युद्धात थेट लढत नसले तरी माल, इंधन, सैनिक, औषधे आणि आवश्यक सामग्री पोहोचवण्याचे अत्यंत धोकादायक काम करते.  शत्रूच्या हल्ल्यांत अनेक जहाजे बुडाली आणि नाविकांचे प्राण गेले. अशा निधन पावलेल्या व्यापारी जहाजांच्या नाविकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारले आहे. 
-----------------------------------------------------------
सर्वांच्या मागणीवरून १९०१ साली या दीपगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अनेक औपचारिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करीत दीपगृह कार्यरत होण्यास २००३ साल उजाडले. हे दीपगृह अस्तित्वात येण्यास एडवर्ड हारग्रेव्ह्ज (Edward Hargraves) या स्थानिक रहिवाश्याचा पुढाकार होता.

नोरा हेड लाइट हाऊस हा सुमारे २७ मीटर उंच टॉवर असून त्याचे बांधकाम रि-कास्ट कॉंक्रीट ब्लॉक्स वापरून केले आहे. सुरुवातीला याचा प्रकाश केरोसीन, नंतर विजेवर आणि आता हॅलोजनने निर्मित केला जातो. याचे कार्य ऑटोमेटेड केले आहे. या दीपगृहाचा प्रकाशझोत ४६ नॉटिकल मैल (सुमारे ४८ किमी) इतका दूरवर जातो.

पर्यटक या दीपगृहाच्या टॉवरमध्ये वर चढू शकतात  आणि ३६०° दृश्यांचा अनुभव घेऊ शकतात. 

Norah Head Light House Reserve:
नोरा हेड जवळ हे पर्यटन स्थळ आहे. या रिझर्व्हचा विस्तार सुमारे २० हेक्टर असून यात  लाइटहाऊस, हेडकीपर्स कॉटेजेस, वॉक ट्रॅक्स आणि समुद्रकाठच्या भागांचा समावेश होतो. 

या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे — अनेक जुन्या लाइटहाऊस कीपर्सचे वंशज आजही या स्थानाशी जोडलेले आहेत, आणि ते इतिहास कायम ठेवण्यासाठी सक्रिय आहेत. 

रिझर्व्ह नैसर्गिक सौंदर्याने    नटला आह. सुंदर खडक , सागरतटीय वनस्पती आणि सुंदर
समुद्राचे दृश्य अतिशय मोहून टाकणारे आहेत. हे एक शांत, नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
या रिझर्व्ह मध्ये पर्यटकांसाठी  खालील आकर्षणे आहेत:-

वॉकिंग ट्रेल: लाइटहाऊसच्या बाजूने वॉक करण्यासाठी  ट्रॅक आहे. हा ट्रॅक  हेडलँडवरून खाली कमी खडक असलेल्या प्लेटफॉर्मपर्यंत आणि Lighthouse Beach पर्यंत घेऊन जातो. 

व्हेल वॉचिंग: मे ते नोव्हेंबर दरम्यान, हेडलँडवरून व्हेल्स बघायला संधी असते. 

निवास: रिझर्व्हमध्ये तीन हेरिटेज कीपर्स’ कॉटेजेस आहेत — मुख्य कीपर्सची कॉटेज व दोन सहाय्यक कीपर्स कॉटेज. 

इव्हेंट्स: हा रिझर्व्ह विवाह सोहळे, इव्हेंट्स आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी देखील लोकप्रिय आहे. 


-----------------------------------------------------------
Tom Burke Reserve   टॉम बर्क रिझर्व्ह 
Dianne Avenue / Anita Avenue, Lake Munmorah NSW 2259, Australia
Central Coast Council — “Tom Burke Reserve” या विभागात माहिती उपलब्ध आहे. 
-----------------------------------------------------------
नोरा हेड लाइट हाऊस रिझर्व्ह येथून निघून आम्ही सुमारे २० किमी अंतरावर टॉम बर्क रिझर्व्ह येथे आलो.

हा रिझर्व्ह Central Coast Council अंतर्गत येतो आणि मूलतः  विश्रांतीसाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. 

जेवणाची वेळ झाली असल्याने आम्ही जेवण उरकून घेतले. जेवणासाठी वैशालीवहिनींनी भेळेचा मेनू केला होता.
                        (क्षणचित्रे)
-----------------------------------------
Dudley Beach डडली बीच 
Dudley Beach, in Glenrock State Conservation Area, NSW, Australia.
जवळचा उपनगर / पोस्ट कोड आहे Whitebridge / Dudley 2290

Dudley Beach चे माहिती पेज (visitor info, beach safety, alerts, map) NSW National Parks and Wildlife Service (NPWS) या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
-----------------------------------------------------------
टॉम बर्क रिझर्व्ह पासून आम्ही पुढे सुमारे ३३ किमी अंतरावर  डडली बीच येथे आलो.

डडली बीच हा न्यू साउथ वेल्समधील Lake Macquarie या प्रदेशात आहे, आणि सिडनी—सेंट्रल कोस्ट—न्यूकॅसल या किनारपट्टी मार्गावर प्रवास करताना सहज भेट देता येणारे ठिकाण आहे.

विशेषता: हा बीच प्रसिद्ध आहे त्याच्या विस्तीर्ण, शांत वाळूच्या पट्ट्यासाठी उंच कड्यांसाठी (cliff formations) सुंदर तटीय वॉकसाठी
कमी गर्दीच्या, नैसर्गिक वातावरणासाठी

ॲक्सेस: डडली उपनगरातून एक छोटासा तटीय ट्रॅक खाली बीचकडे जातो. हा बीच थोडा “अप्रचलित पण निसर्गरम्य” अशा श्रेणीत मोडतो — जे फोटोग्राफी आणि शांत समुद्रदृश्यांसाठी उत्तम आहे.

तटीय संरक्षण क्षेत्र: डडली बीच Glenrock State Conservation Area च्या सीमेवर आहे, त्यामुळे परिसरात जंगल paths, lookouts, पक्षी निरीक्षण आणि रेनफॉरेस्ट ट्रेल्सही मिळतात.

खडकांवर नैसर्गिक टाइड पूल्स पाहणे (टीप: पोहणे शक्य असले तरी अधिकृत लाइफगार्ड नसतात, त्यामुळे काळजी आवश्यक.)
 
यानंतर आम्ही चार्ल्स टाऊन येथे आम्ही बुक केलेल्या हाऊस मध्ये        आलो (Fraser st, Charles town).  चार्ल्स टाऊन येथे मनाली ने घर बुक करण्याचे कारण म्हणजे हंटर व्हॅली भागात राहणे फार महाग आहे. त्याऐवजी चार्ल्स टाऊनला राहून    तासाभराचा प्रवास करणे परवडते.     

आजच्या प्रवासातील ठिकाणे खालील नकाशात दाखवली आहेत:-
Charlestown, NSW चार्ल्स टाऊन:

चार्ल्सटाउन हे न्यू साउथ वेल्सचे  उपनगर असून ते  लेक मक्वारी (Lake Macquarie) भागात येते.  हे गाव खाणकामातून विकसित झाले. Waratah Coal Company ची येथे कोळश्याची खाण होती. या  खाणीसाठी कंपनीने कामगार आणले जे येथे स्थायिक झाले. ही खाण १९६१ मध्ये बंद झाली. सध्या येथे खाणकाम चालत नाही.

२००१ च्या जनगणनेप्रमाणे चार्ल्स टाऊनची लोकसंख्या १३ हजार होती. चार्ल्स टाऊनमध्ये शॉपिंग मॉल्स, शाळा, रेस्तरॉं अशा सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. चार्ल्स टाऊन हे लेक मक्वारीमधील प्रमुख व्यावसायिक आणि आर्थिक केंद्रापैकी एक आहे.

आमच्या घराच्या जवळच एक मॉल होता. तेथे वुल्वर्थ्स, कोल्स अशी बहुतेक सुपर मार्केट्स होती.  पण मॉलमध्ये फ्री पार्किंग केवळ अर्ध्या तासाचे ची होते.    आमचे  दुपारचे जेवण वाटेतच  झाले असल्याने संध्याकाळपर्यंत विश्रांती घेतली. संध्याकाळच्या जेवणासाठी रॅप्सचा लाइट मेनू वैशालीवहिनीनी आणि वर्षाने केला होता.

रात्री आठच्या सुमारास आम्ही हंटर व्हॅलीच्या दिशेने  निघालो.
-----------------------------------------------------------
Hunter Valley (हंटर व्हॅली)
-----------------------------------------------------------
हंटर व्हॅली  हा प्रदेश न्यू साउथ वेल्स (NSW) राज्याच्या उत्तर दिशेला, सिडनीपासून साधारण १२० -१५० किमी अंतरावर आहे.

हंटर व्हॅली प्रदेशात हंटर नदी वाहते . नदीला आणि प्रदेशाला  ब्रिटिश नौदल अधिकारी कॅप्टन जॉन हंटर यांच्या नावावरून (ते NSW चे दुसरे गव्हर्नर होते) सध्याचे नाव मिळाले.

हंटर नदी  पश्चिमेकडे  उगम पावते आणि सिंगलटन, मेटलॅंडमार्गे (Singleton, Maitland) न्यू कासल (Newcastle) येथे समुद्रास मिळते.

हंटर व्हॅली हे  हंटर नदीचे खोरे आहे. ते टेकड्यांनी वेढले असल्यामुळे दरीसारखे वाटते. त्यामुळे या भागास व्हॅली म्हणतात.
हा  सखल भाग हंटर नदी  आणि  तिच्या उपनद्यांभोवती पसरलेला आहे. याच्या सीमांमध्ये प्रामुख्याने सेंट्रल कोस्ट, न्यूकॅसल, सिंगलटन, मस्वेलब्रुक आदी भागांचा समावेश होतो. माळराने, नदीकिनारीचा सपाट भूभाग आणि टेकड्यांच्या रांगा अशा स्वरूपाचा हा विस्तृत कृषी पट्टा आहे.

हंटर  व्हॅली मुख्यतः येथील द्राक्षमळे आणि वाइनरीजसाठी प्रसिद्ध असली तरी  येथे  दुग्धव्यवसाय, पशुपालन, बागायती शेती, हस्तकला असे विविध उद्योगांचा विकास झाला आहे. या सर्वांमुळे पर्यटनाला   चांगली चालना मिळाली आहे. 

वाइनरीज,  हंटर व्हॅली गार्डन्स, बलून राइड्स,  चीझ आणि चॉकलेट फॅक्टरीज, आर्ट गॅलरीज ही पर्यटकांची येथील  मुख्य आकर्षणे आहेत. 

Pokolbin (पोकलबिन):

हंटर व्हॅली  गार्डन्स ज्या  उपनगरात आहे, त्या उपनगराचे नाव आहे पोकलबिन (Pokolbin). पोकलबिन शब्द मराठी  पोकळ शब्दाशी जुळत असल्याने गंमत वाटत होती. हे नाव बहुधा Wonnarua या स्थानिक आदिवासी लोकांच्या भाषेतून आले असावे. Poccolbin किंवा Pokolbin याचा अर्थ 'धुराचे ठिकाण' किंवा 'अतिशय उष्ण जागा'.

काही इतिहासकारांच्या मते, पूर्वी या भागात वारंवार वणवे लागत असावे किंवा  सांस्कृतिक  समारंभात जाळ पेटवीत असावेत.  त्यावरून या भागाला हे नाव मिळाले असावे.   

पोकलबिन हा हंटर व्हॅली (Hunter Valley) च्या लोअर भागात आहे.  हे Cessnock शहराच्या लग्झुआरमध्ये येते आणि Singleton Council च्या भागात   त्याचा काही भाग आहे. २०२१ च्या अंदाजाप्रमाणे  येथे  एक हजारांपर्यंत लोकसंख्या होती. 

पोकलबिनच्या भागात मूळतः Wonnarua (Darkinjung) आदिवासी लोक वसले होते. युरोपीय लोक येऊन  अठराशेच्या सुमारास येथे शेती — विशेषतः द्राक्षबागायती (vineyards) — सुरू केली. 

पोकलबिनमध्ये हंटर व्हॅलीमधील  Tyrrell’s, McGuigan  अशा अनेक प्रसिद्ध वाइनरी आहेत.
-----------------------------------------------------------
Hunters Valley Garden हंटर व्हॅली गार्डन 

2090 Broke Road, Pokolbin, NSW 2320, Australia

https://www.huntervalleygardens.com.au/ 
-----------------------------------------------------------
हंटर व्हॅली गार्डन्स बिल ( Bill ) आणि इमल्डा रोशन( Imelda Roche) यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची स्वप्नपूर्ती म्हणून बांधले. १९९९मध्ये गार्डनचे  बांधकाम सुरू झाले. सुमारे ४०-५० लँडस्केप गार्डनर्स, आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्सनी चार वर्षे मेहनत केली.  या गार्डनचे अधिकृत उद्घाटन ऑक्टोबर २००३ मध्ये त्या वेळचे  न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर  बॉब कार यांच्या हस्ते झाले. 

या गार्डनचे क्षेत्रफळ  सुमारे १४ हेक्टर असून तेथे ८ किलोमीटरचे वॉकिंग पाथ  आणि  दहा थीम  गार्डन्स आहेत. 

 गार्डनमध्ये    सुमारे ६,००० वृक्ष,  झुडुपे, आणि 1 लाखांहून अधिक ग्राउंड कवर वनस्पती आहेत. 

आकर्षणे: मानवनिर्मित धबधबे, मूर्त्या, म्यूरल्स, टोपिओरी यांसारखे कलात्मक घटक. 

इव्हेंट्स: वर्षभर विविध इव्हेंट्स होतात — जसे की “Christmas Lights Spectacular”, “Mega Creatures”, “Snow Time in the Garden” इत्यादी. 

मनोरंजन: बागेमध्ये 5 कायमस्वरूपी राईड्स आहेत — स्कूली सुट्टी किंवा खास इव्हेंटमध्ये चालतात. 

शॉपिंग आणि जेवण: प्रवेशाजवळ Shopping Village आहे, जिथे गिफ्ट शॉप्स, कॅफे, वाइन आणि फॅशन स्टोअर्स आहेत. 

राहण्याची सोय: बागेजवळच Mercure Hunter Valley Gardens आणि “Harrigan’s” नावाचे हॉस्पिटॅलिटी ठिकाण आहे — जे अगदी वॉकिंग पाथने गार्डनशी जोडलेले आहे. 

प्रवेश वेळा: बाग रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या दरम्यान खुली आहे, पण शेवटचा प्रवेश ४ वाजता होतो. 

रोचक तथ्य: बाग तयार करण्यासाठी 40 हॉर्टिकल्चर गार्डनर्स, आर्किटेक्ट्स आणि इंजिनिअर्स यांनी चार वर्षे मेहनत केली आहे. 

तासभराच्या ड्राइव्ह नंतर आम्ही गार्डनला पोहचलो. या भागातील पर्यटन लक्षात घेऊन येथे प्रख्यात हॉटेल्स आली आहेत. वाटेत आम्हाला Mercure आणि Rydges ही प्रसिद्ध हॉटेल्स दिसली.

हंटर व्हॅली गार्डन्समध्ये दर वर्षी ख्रिसमस निमित्त   ख्रिसमस लाइट स्पेक्टॅक्युलर शो  आयोजित केला जातो, हा उत्सव नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून जानेवारीपर्यंत चालतो. 

हा डिस्प्ले २००७ पासून दरवर्षी पार पडतो, आणि हे “दक्षिण गोलार्धातील एक मोठे लाईट डिस्प्ले” मानले जाते. नववर्षाच्या संध्याकाळी  गार्डनमध्ये  रात्री ९ वाजता    फायरवर्क्स शो देखील असतो. 

या डिस्प्लेमध्ये ४.५ दशलक्षाहून अधिक  twinkling लाईट्स वापरल्या जातात, ज्यामुळे संपूर्ण बाग एका प्रकाशमय जादूच्या  प्रदेशासारखी  बनते. 

येथे थीम असलेले लाईट डिस्प्ले असतात. यांमध्ये सतत नवीन आकर्षणांचा  समावेश होत असतो. “Italian Grotto Garden” (“HO HO Harvest”), “Merry Meadow”, “Santaville”, “Shimmering Falls” ही काही नवी आकर्षणे आहेत. 

कार्यक्रमात रात्रीचे मनोरंजन देखील असते. स्टिल वॉकर्स, Equilibrist Jugglers    , एरियल कलाकार (“Lollipop Lyra”) आणि संगीत सोहळे (उदा. Felix Quinn बँड) यांचा समावेश असतो. 

मुलांसाठी “Nutcracker Storytime” नावाचं संवादात्मक प्रदर्शन आहे — जिथे मुले Nutcracker कथेमधील पात्रांना भेटू शकतात. 

मनालीने सर्वांची तिकीटे आधीच बुक केली होती. गार्डनमध्ये पेट्स नेण्यास परवानगी नसल्याने बेलीबरोबर मनाली बाहेर थांबली. मनाली येऊ शकत नाही याची आम्हाला रुखरुख लागली. परंतु मनालीने सांगितले की तिने हे लाइटिंग पूर्वी पाहिले आहे. आमच्यापैकी कोणीच हे लाइटिंग आधी पाहिले नव्हते.

गार्डनमध्ये प्रवेश करताच आम्हाला ख्रिसमस विषयांवर आधारित विद्युत रोषणाई दिसू लागली. ही रोषणाई किती नेत्रदीपक होती, त्याची कल्पना खालील छायाचित्रांवरून येईल.
येथील स्टोरी बुक थीम गार्डनमध्ये भिंतीवर ऐटीत बसलेले हम्टी डम्टी दिसत आहेत.


अशा भव्य दिव्य रोषणाईमध्ये कुठे फोटो काढावे याविषयी गोंधळ उडाला नाही तरच नवल. तरीसुद्धा आम्ही फोटो काढण्याची हौस शक्य तेवढी पूर्ण केली. येथे काही छायाचित्रे दिली आहेत.

ख्रिस्मस   लाइट स्पेक्टॅक्युलर दरम्यान, राइड्स (फेरिस व्हील, स्विंग चेअर, टी-कप्स इ.)  अशी करमणूक देखील  चालू होती. 

गार्डनमध्ये खाद्यपेयांचे स्टॉल्स देखील होते. त्यांमध्ये एक इंडियन फूड स्टॉलही होता. तेथे‌ पावभाजी, मसाला टी वगैरे बोर्डावर दिसत होते. परंतु आम्ही जेवून आल्यामुळे आम्हाला खाण्यामध्ये रस नव्हता.

ही रोषणाई पाहिल्यानंतर आम्ही घरी परत आलो. सर्वजण अतिशय थकून गेल्यामुळे लगेच झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी चीझ फॅक्टरीला भेट द्यायची होती.

🌄 दिवस २:
१६/११/२०२५ रविवार
सकाळी थोड्या आरामात उठून सर्व उरकून घेतले. चहा, कॉफी , मेथीचे ठेपले असा नाश्ता करून दहा वाजेपर्यंत आम्ही रुम चेक आऊट केली आणि चीझ फॅक्टरीला जाण्यास निघालो. काल रात्री प्रवास केल्यामुळे न दिसणारे द्राक्षांचे मळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दिसत होते.
-----------------------------------------------------------
Hunters Valley Cheese Factory 
हंटर व्हॅली चीझ फॅक्टरी
447 McDonalds Road, Pokolbin, NSW)
https://huntervalleycheese.com.au/ 
-----------------------------------------------------------
हंटर व्हॅली प्रदेशातील डेअरी फार्म व ताजे दूध यामुळे येथे artisan cheese उद्योग विकसित झाला. बहुतेक चीझ छोटे कारखाने किंवा कौटुंबिक व्यवसायातून हाताने तयार केले जाते.

आम्ही ज्या फॅक्टरीला भेट दिली ती हंटर व्हॅली चीझ फॅक्टरी  म्हणजे  बुटीक चीज कारखाना आहे. या फॅक्टरीची स्थापना एप्रिल १९९५ मध्ये रोझी लॅंबर्ट ( Rosie Lambert) आणि  पीटर कर्टिस (Peter Curtis) यांनी केली होती. 

येथे गाय आणि म्हशींचे दूध वापरून विविध प्रकारचे चीज   कुठलेही केमिकल्स किंवा प्रिझर्व्हेटिव्हज न वापरता  बनवले  जाते. फ्रॉमाज ब्लॅंक, फेटा, ब्री, वॉश्ड रिन्ड, नैसर्गिक रिन्ड, चेडर, ब्लू व्हेन असे येथे बनणारे चीझचे काही प्रकार आहेत.  शिवाय स्टोअरमध्ये    घरगुती चटणी, रिलेझ, जॅम्स      अशा विविध गोष्टी       विक्रीसाठी ठेवल्या आहेत.   

येथे “Make Room” आणि “Maturation Room”  अशा दोन विंडोज आहेत. या विंडोज मधून जिथे तुम्ही चीज बनण्याच्या प्रक्रियेला Live पाहू शकता. 

दररोज सकाळी  ९  ते  संध्याकाळी ५.३० पर्यंत  चीझ टेस्टिंग करता येते.   यासाठी  तुम्ही चीज प्लेटर्स मागवू शकता व लोकल युनिटसोबत जेवूही शकता. 

येथे   चीज मेकिंग वर्कशॉप्स आणि क्लासेस सुद्धा असतात.    

येथील चीझचे काही प्रकार असे आहेत:-

Pokolbin White Natural Rind — सौम्य, क्रीमी टेक्सचर असणारे चीझ.

Pokolbin Ported Blue Vein — पोर्ट वाइनने इन्फ्युज केलेले ब्लू चीज, जास्त समृद्ध चव. 

प्रवेशद्वाराशी असा खरा वाटणारा गाईचा पुतळा आहे.


आम्ही चीझ टेस्टिंग साठी घेतलेला मेनू असा होता:-
ऊन वाढले होते. पण वारा छान वाहत  होता. बेली बरोबर असल्याने आम्हाला बाहेर बसणे आवश्यक होते. पण बाहेर बसणेच जास्त आल्हाददायक होते. त्या प्रसन्न वातावरणात आम्ही चीझचा आस्वाद घेतला.


चीझचा आस्वाद एवढा परिपूर्ण होता की आम्हाला दिवसभर जेवणाची आवश्यकता भासली नाही.

स्थानिक रोड स्टॉल्सना भेट:

वाईन पर्यटनामुळे छोट्या कारागिरांना एक मजबूत बाजार मिळाला आहे.

स्थानिक मध,  जॅम, दालचिनीची उत्पादने, हर्ब्स, मसाले, नैसर्गिक सुगंधी वस्तू, हाताने बनवलेल्या साबण व मेणबत्त्या इत्यादी उत्पादने तयार करणारे छोटे स्टॉल्स सामान्यतः प्रत्येक मोठ्या  पर्यटन स्थळाजवळ  दिसतात.

हे उत्पादक प्रदेशातील स्थानिक अर्थव्यवस्थेला टिकवतात आणि हंटर व्हॅलीला “handcrafted experiences” ची ओळख देतात.


अशाच रोडसाइड स्थानिक स्टॉल्सना आम्ही भेट दिली. या स्टॉल्समध्ये स्थानिक कलाकारांनी बनवलेल्या वस्तू  होत्या. यांमध्ये कंबुचा ड्रिंक्स, की चेन्स, पेंटिंग, कपडे अशा बऱ्याच वस्तू होत्या. येथील उत्पादने शुद्ध आणि घरगुती असतात. पण यांच्या किंमती सुपरमार्केट मधील अशाच उत्पादनांपेक्षा बऱ्याच जास्त असतात. 

या स्टॉल्स मधून खरेदी करण्यामध्ये  स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि रोजगार देणे हाही आहे. 

मनाली आणि अद्वैतने  बेलीच्या थीमचे की चेन होल्डर घेतले. या विक्रेत्या बाईने बेली कुठल्या ब्रीडचा डॉग आहे ते पाहून आपल्या संग्रहातून लगेच एक तसाच फेस काढून त्यात थोडे चेंजेस करून की चेन होल्डर  बनवून दिला. हा की चेन इतकी हुबेहूब होता की खरोखरच बेली या होल्डर मध्ये जाऊन बसला असे वाटावे. या कलाकारांच्या कौशल्याला दाद द्यावी तेवढी थोडीच.
(अद्वैत आणि मनालीने घेतलेला की चेन होल्डर)

चॉकलेट स्टोअरला भेट:

हंटर व्हॅलीमध्ये boutique chocolate makers हे मोठे आकर्षण आहे.

हाताने तयार केलेले chocolate truffles, fudge, brittles, chocolate-coated nuts इत्यादी उत्पादने येथे मिळतात.

पर्यटकांना live demonstrations किंवा sampling सुद्धा अनेक ठिकाणी मिळते.

आम्ही  वाटेमध्ये  एका  चॉकलेट स्टोअरला भेट दिली. येथे ख्रिस्मसमध्ये  बहुतेक ऑफिसेसमध्ये एकमेकांना भेट देण्याची पद्धत आहे. अशी भेट देण्यासाठी  थोडी चॉकलेट खरेदी केली.  

आता ऊन भरपूर झाले होते. दुपारचे दोन वाजले होते. त्यामुळे आम्ही परतीचा प्रवास सुरू केला 
(आमचा परतीचा प्रवास अशा मार्गाने झाला)

दुपारी चारपर्यंत तुंगाबीला पोहचलो. एका प्रकाशमय उत्सवाच्या रंगीबेरंगी स्मृती अजूनही मनात रेंगाळत होत्या.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved



Tuesday, November 11, 2025

द मर्चंट ऑफ व्हेनिस-अंक १-प्रवेश १

 


(विल्यम शेक्सपिअरच्या नाटकांची जादू आज साडेचारशे वर्षांनंतर सुद्धा कमी झालेली नाही. येथे वाचकांसाठी शेक्सपिअरच्या 'The Merchant of Venice' या गाजलेल्या नाटकाचे क्रमशः मराठी भाषांतर देत आहे. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवाव्या आणि काही प्रश्न असतील तर विचारावे)
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved

                   मर्चंट ऑफ व्हेनिस

अंक

प्रवेश १

अँटोनिओ

:

खरं सांगायचं तर मला आज मानसिक दडपण का आले आहे माझं मलाच कळत नाही. मला त्याचा वीट आला आहे आणि तू म्हणतोस की तुलाही त्याचा वीट आला आहे. पण हे दडपण कशामुळे आले आहे याचा मला उलगडा होत नाही. स्वत:ला जाणणे मला कठीण जात आहे.

सॅलरिनो

:

तुम्हाला तुमच्या जहाजांची काळजी लागली आहे. तुमचं मन समुद्रामध्ये त्या जहाजांबरोबर हेलकावे खात आहे. परंतु ती जहाजे सुरक्षित आहेत. ही जहाजे प्रवाहामध्ये  बड्या असामी किंवा उमरावांप्रमाणे एखादी भपकेबाज मिरवणूक जावी किंवा समुद्रातील पक्षी पंख फुलवून जावे त्याप्रमाणे जात आहेत आणि इतर छोट्या जहाजांकडे अशा तोऱ्यात पाहत आहेत की ही छोटी जहाजे या मोठ्या जहाजांस निमूटपणे सलाम करून मार्ग मोकळा करून देत आहेत.    

सोलॅनिओ

:

महाराज, खरं सांगायचं तर माझे जर  इतर देशात असे जोखमीचे व्यवसाय असते तर मलासुद्धा  असेच मानसिक दडपण आले असते. वारा कसा वाहत आहे ते जाणून घेण्यासाठी मी एकसारखा गवताची पाती उपटून हवेत भिरकावत बसलो असतो. मी एकसारखा नकाशांचे निरीक्षण करून चांगली बंदर, चांगले धक्के तसेच  चांगले जलमार्ग शोधत बसलो असतो आणि काही अघटित तर घडणार नाही ना, असा विचार करून माझ्यावरही मानसिक दडपण आले असते.    

सॅलरिनो

:

सूप थंड करण्यासाठी त्यावर फुंकर मारताना माझ्या मनात विचार आला असता की असाच सोसाट्याचा वारा माझ्या जहाजांची दैना करू शकेल. वाळूच्या घड्याळातील वाळूकडे पाहताना माझ्या मनात विचार येईल की माझी जहाजे वाळूच्या किनाऱ्यावर रुतली तर काय होईल. चर्चमध्ये गेलो तर चर्चच्या बांधकामाचे दगड पाहून माझ्या डोळ्यासमोर समुद्रातील धोकादायक खडक येतील. माझी जहाजे जर अशा खडकांवर आदळली, तर जहाजांमधील सारे मसाल्याचे पदार्थ पाण्यात फेकले जातील. सारे रेशमाचे कापड वाऱ्यावर तरंगत गरजणाऱ्या लाटांना आच्छादून टाकेल. एका क्षणात माझे सारे होत्याचे नव्हते होईल. एका दृष्टीने, मी असा विचार करावा का? आणि अशी दुर्घटना घडली तर मी दु:खी होईन, म्हणून असा विचार मी करू नये का? स्पष्ट आहे. आपल्या जहाजांतील मालाची काळजी वाटत असल्याने अँटोनिओ काळजीत आहे, हे मी जाणून आहे.    

अँटोनिओ

:

अरे बाबा, असे काही नाही. माझ्या सुदैवाने माझी सारी गुंतवणूक एकाच जहाजामध्ये किंवा एकाच ठिकाणी नाही. या वर्षी काही मोबदला मिळाला नाही तरीसुद्धा मला फरक पडणार नाही. त्यामुळे माझ्या व्यापारातील जोखीम हे काही माझ्या दु:खाचे कारण नाही. 

सोलानिओ

:

काय सांगता? मग तुम्ही प्रेमात पडला असाल.

अँटोनिओ

:

चूप रे !

सोलॅनिओ

:

प्रेमातसुद्धा नाही? मग असं म्हणू या की तुम्ही दु:खी आहात कारण तुम्ही आनंदी नाही. चला तर मग हसा, बागडा आणि सांगा की तुम्ही आनंदात आहात कारण तुम्ही दु:खी नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं. काही लोक त्यांच्या डोळ्यांच्या खिडक्यांतून सतत डोकावत असतात आणि पोपट बॅगपायपर पक्ष्याकडे पाहून  हसतो, त्याप्रमाणे हसत असतात. तर काही लोक एरंडेल प्याल्याप्रमाणे राहून कुणी शपथेवर जरी सांगितले की हसण्यासारखी घटना घडली आहे तरी आपले दात हसण्यासाठीसुद्धा दाखवणार नाहीत.    

(बसॅनिओ, लॉरेन्झो आणि ग्रेश्यानो प्रवेश करतात.)

हा पहा तुमचा आदरणीय नातलग बसॅनिओ आला आहे. बरोबर लॉरेन्झो आणि ग्रेश्यानोसुद्धा आले आहेत. चला, आम्ही आता तुमचा निरोप घेतो. कारण तुम्हाला आमच्यापेक्षा चांगले सोबती मिळाले आहेत.

सोलॅनिओ

:

तुमचे हे आदरणीय मित्र आले नसते तर तुम्हाला आनंदित केल्याशिवाय मी येथून गेलो नसतो.  

अँटोनिओ

:

बाबांनो, तुम्हीसुद्धा मला तेवढेच प्रिय आहात. तुमचीसुद्धा काही कामे असतील आणि त्यामुळे तुम्हाला जावे लागत आहे असे मी समजतो.  

सॅलरिनो

:

(बसॅनिओ, लॉरेंझो आणि ग्रेश्यानोला उद्देशून) नमस्कार मंडळी.

बसॅनिओ

:

नमस्कार नमस्कार. हास्यविनोद करण्यासाठी पुन्हा कधी भेटू या? मला फक्त कधी ते सांगा. तुम्ही लोक हल्ली जरा चक्रम होत चालला आहात. असं वागणं बरं आहे का?

सॅलरिनो

:

असं काही नाही. आपण नक्कीच भेटू या.

(सॅलरिनो आणि सोलॅनिओ जातात.)

लॉरेंझो

:

बसॅनिओ, आता तुला अँटोनिओ भेटला आहे, तेव्हा आम्ही दोघेसुद्धा निघतो. परंतु रात्री आपण जेवावयास भेटणार आहो, हे विसरू नको.

बसॅनिओ

:

नाही विसरणार.

ग्रेश्यानो

:

अँटोनिओ, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. तुम्ही जगाची फार चिंता करता बुवा. जे लोक एखादी गोष्ट विकत घेताना फार विचार करतात, ते ती निश्चित गमावून बसतात. मी नक्की सांगतो, तुमच्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे.

अँटोनिओ

:

जग जसे आहे तसेच मी मानतो, ग्रेश्यानो. माझ्या दृष्टीने जग म्हणजे एक रंगभूमी आहे जेथे प्रत्येक माणसाला आपली भूमिका बजावायची आहे. माझ्या वाट्याला मात्र दु:खी भूमिका आली आहे.   

ग्रेश्यानो

:

असे असेल तर मी विदुषकाची भूमिका बजावतो. माझ्या चेहऱ्यावर वृद्ध माणसासारख्या सुरकुत्या पडू देत, परंतु हास्यविनोदाने. माझे हृदय असह्य वेदनांनी थंड पडण्यापेक्षा माझे पित्ताशय मद्याने उष्ण होणे केव्हाही चांगले. ज्या मनुष्याच्या रक्तात ऊब आहे त्याने उगीच दगडात कोरलेल्या आपल्या आज्याच्या मूर्तीसारखे का मख्ख बसून राहावे? त्याने जाग आल्यावर झोपी का जावे आणि सदैव चिंताग्रस्त राहून कावीळ का ओढवून घ्यावी? अँटोनिओ, माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि मी हे तुमच्यावरील प्रेमापोटी बोलत आहे. माझे ऐका, असे लोक असतात की जे चेहऱ्यावर असा काही मुखवटा धारण करतात की त्यांचे तोंड नेहमी साचलेल्या डबक्याप्रमाणे मख्ख दिसते. हे लोक आपण फार ज्ञानी असल्याचा आव आणतात आणि कायम गंभीर चेहऱ्याने वावरतात. त्यांची बोलण्याची ढब अशी असते की, मी बृहस्पती आहे, मी बोलताना कुत्र्यानेसुद्धा भुंकता कामा नये. असे बरेच लोक मला माहीत आहेत अँटोनिओ. ते मुळीच बोलत नाहीत, त्यामुळे त्यांना हुशार समजतात. माझी खात्री आहे, या लोकांनी बोलण्यासाठी तोंड उघडले तर ते किती मूर्ख आहेत ते सर्वांना समजेल. मी पुन्हा कधीतरी या विषयावर आणखी बोलेन. तोपर्यंत जरा हसा. उगीच उदास होऊन बसू नका. हे झालं माझं मत. परंतु मीही शेवटी बुद्दूच आहे. चल लॉरेंझो, आपण निघू या. आम्हाला निरोप द्या. माझे भाषण मी रात्रीच्या जेवणानंतर पूर्ण करीन.    

लॉरेंझो

:

ठीक आहे, चला. आपण आता रात्री जेवणाच्या वेळी भेटू या. ग्रेश्यानो आता ज्या हुशार माणसांबद्दल बोलत होता, त्यांपैकी एक मला झाले पाहिजे. कारण ग्रेश्यानो मला मुळी बोलूच देत नाही.

ग्रेश्यानो

:

अगदी बरोबर. दोनेक वर्षे माझ्याबरोबर राहा आणि तुम्हाला स्वत:चाच आवाज ओळखू येणार नाही.

अँटोनिओ

:

चला भेटू आता, तुझा हा उपदेशाचा डोस घेऊन मी आता थोडा जास्त बोलेन.

ग्रेश्यानो

:

शांतता फक्त गाईच्या जिभेला (गाईच्या जिभेपासून बनविलेला पदार्थ) आणि लग्नासाठी उपवर झालेल्या कुमारिकेला शोभते (कारण तिने न बोलणे अभिप्रेत असते).

(ग्रेश्यानो आणि लॉरेंझो जातात.)

अँटोनिओ

:

तुझं काय म्हणणं आहे यावर? (ग्रेश्यानोच्या उपदेशाबद्दल).

बसॅनिओ

:

क्षुल्लक  कारणासाठी अफाट बडबड करणारा ग्रेश्यानोसारखा माणूस साऱ्या व्हेनिसमध्ये शोधून सापडणार  नाही. त्याच्या बोलण्यातून अर्थ शोधून काढणे म्हणजे दोन पिंपे भरून फोलपटांतून गव्हाचे दोन दाणे शोधून काढण्यासारखे आहे आणि शोधून काढल्यानंतर तुम्हाला कळेल की हा शोध काही उपयोगाचा नव्हता.

अँटोनिओ

:

बरं ते जाऊ दे. आता मला त्या मुलीबद्दल सांग जिच्यासाठी तू खास सफरीवर जाणार आहेस. तू मला  सांगण्याचं कबूल केलं होतंस.

बसॅनिओ

:

अँटोनिओ, माझी आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे, तुला चांगलंच माहीत आहे. या साऱ्याला कारण मी माझ्या ऐपतीच्या बाहेर जाऊन केलेला खर्च. त्यामुळे त्याबद्दल मी तक्रार करू शकत नाही. चैनीचे आयुष्य जगण्यासाठी मी जी काही कर्जे काढली आहेत, त्यांचा आता डोंगर झाला आहे. मला  या कर्जांतून आता सन्मानाने बाहेर पडायचे आहे. मी पैसा आणि प्रेम या दोन्हींमध्ये तुझा ऋणाईत आहे. तुझ्या प्रेमामध्येच माझ्या सर्व ऋणांतून मुक्त होण्याची हमी आहे असे मी मानतो.   

अँटोनिओ

:

तुझी काय योजना आहे ते तरी सांग. ही योजना सन्मानाच्या कसोटीवर टिकण्यासारखी असेल जसा तू अजून टिकून आहेस, तर व्यक्तिश: मी, माझी पैशाची थैली आणि माझा जो काही पैसाअडका असेल तो तुझ्यासाठी मुक्तपणे उपलब्ध आहे.   

बसॅनिओ

:

फार पूर्वी मी शाळकरी विद्यार्थी  असताना माझे एक अजब तंत्र होते. खेळताना मी सोडलेला एखादा बाण  हरवला तर मी त्याच दिशेने तितक्याच वेगाने दुसरा बाण  सोडत असे आणि बऱ्याचदा हा दुसरा बाण शोधताना मला दोन्ही बाण सापडत असत. माझा आतासुद्धा या तंत्रावर विश्वास आहे. कारण याचा परिणाम केवळ विश्वासावर आधारित आहे. तू मला बरेच पैसे उसने दिले आहेत आणि एखाद्या बिघडलेल्या मुलाप्रमाणे  मी ते सर्व गमावून बसलो आहे. परंतु तू जर पहिला बाण सोडला त्याच दिशेने दुसरा बाण सोडण्यास तयार असशील तर मी निश्चित लक्ष्यावर दृष्टी ठेवून राहीन आणि कदाचित मला दोन्ही बाण सापडतील. तसे झाले नाही तर मला दुसरा बाण निश्चितच सापडेल आणि माझे सध्याचे ऋण आहे तसेच राहील.

अँटोनिओ

:

बसॅनिओ , तू मला चांगला ओळखतोस आणि तरी हे सर्व सांगून तू माझ्या प्रेमाविषयी एक प्रकारे अविश्वास दाखवीत आहेस. यापेक्षा मी माझे सर्वस्व गमावले असते तर ते मला परवडले असते. तू मला फक्त सांग की मी काय करायला हवे आणि मी ते केलेच म्हणून समज. चल, काय ते सांगून टाक.     

बसॅनिओ

:

ठीक, सांगतो तर. बेल्मॉंट गावी एक मुलगी आहे. तिला वडिलोपार्जित पुष्कळ संपत्ती मिळाली आहे.  ती अतिशय सुंदर आहे आणि सुंदर या शब्दापेक्षा सुंदर असे तिचे गुण आहेत. मी पूर्वी तिच्याकडे गेलो असताना तिच्या डोळ्यांतून मला नि:शब्द अनुकूल प्रतिसाद मिळाला  आहे. तिचे नाव पोर्शिया आहे. केटोची मुलगी आणि ब्रूटसची पत्नी म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या पोर्शियापेक्षा ती कुठल्याही बाबतींत यत्किंचितही कमी नाही. तिची योग्यता सारे जग जाणून आहे आणि चहुबाजूंनी ख्यातनाम असे युवक तिच्याशी विवाह करण्याच्या इच्छेने येत आहेत. तिच्या कानांवर रुळणाऱ्या  सोनेरी केसांच्या बटा  पाहून जेसन हा राजपुत्र जसा सोनेरी कातडीच्या शोधात आला होता त्याप्रमाणे बरेच राजपुत्र बेल्मॉंटच्या  किनाऱ्यावर दाखल होत आहेत. प्रिय अँटोनिओ, त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याची माझी जर ऐपत असती तर मी स्वत:ला फार नशीबवान समजलो असतो.          

अँटोनिओ

:

तुला चांगले माझे माहीत आहे की माझे सारे नशीब सागरस्थ आहे. माझ्याकडे तेवढा पैसा नाही की पैसा उभा करता येईल अशी मालमत्ताही जवळ नाही. पण मी तुला सांगू शकतो की, माझी व्हेनिसमध्ये जी पत आहे तिचा जास्तीत जास्त वापर करून पोर्शियापर्यंत पोहचता येईल एवढा पैसा तू निश्चित उभा करू शकशील. तेव्हा पैसा उभा करण्यासाठी तूही प्रयत्न कर आणि मीही प्रयत्न करतो. माझी खात्री आहे की मी तेवढा पैसा कर्ज म्हणून किंवा माझ्यावर मेहरबानी म्हणून तरी मिळवू शकेन.       

सुवचने, म्हणी, वाक्प्रचार :

Gratiano: They lose it that do buy it with much care.

Two grains of wheat hid in two bushels of chaff: गवताच्या भाऱ्यात सुई शोधणे, चार आण्याची कोंबडी दहा रुपयाचा मसाला.



Thursday, November 6, 2025

पर्यटकांसाठी मार्गदर्शन

पूर्वतयारी:

पर्यटन करताना:
१. स्थळदर्शनासाठी निघताना सकाळी लवकर सुरुवात करावी. म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही.

२. पाणी भरपूर प्यावे.

३. उन्हामध्ये फिरताना हॅट किंवा कॅप घालावी.

४. येथे अनोळखी पर्यटकांस फसवण्याचे प्रकार बरेच होतात. त्यामुळे अनोळखी लोकांपासून सावध राहावे.

Wednesday, November 5, 2025

चिअंग माय – थायलंडची सांस्कृतिक राजधानी

 





६. चिअंग माय थायलंडची सांस्कृतिक राजधानी   


चिअंग माय हे उत्तर थायलंडमधील सर्वांत मोठे आणि सांस्कृतिक महत्त्वाचे शहर आहे. चिअंग मायमध्ये तुम्हाला जिथे तिथे झगमगत्या वास्तू, प्राचीन मंदिरे आणि लन्ना संस्कृतीचा प्रभाव असलेली दुकाने आढळून येतील. चिअंग माय या उत्तर थायलंडमधील शहरास स्वतःचे व्यक्तित्व आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या शहरात वावरताना येथील आश्चर्यकारक स्थळे पुस्तकाच्या पानांसारखी तुमच्यासमोर उलगडत जातील आणि तुम्ही हरवून जाल.

उत्तर थायलंड   

 

उत्तर थायलंडचे वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे हिरव्यागार वृक्षांनी आच्छादिलेली सुंदर पर्वतराजी, जुन्या संस्कृतीच्या खाणाखुणा, ऐतिहासिक स्थळे आणि येथील रम्य ग्रामीण प्रदेश. येथे निरनिराळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती राहतात आणि त्यांच्या जीवनपद्धतीचा वेगळेपणा जाणवल्यावाचून राहत नाही. उत्तर थायलंड हा डोंगराळ प्रदेश असल्यामुळे येथील हवामान घामाघूम करणा-या थायलंडच्या हवामानापेक्षा थंड आहे. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये येथे पर्यटकांची गर्दी जास्त आढळते. येथील मैदानी भागातील तापमान क्वचितच २५ अंश सेल्सिअसच्या खाली जाते तर डोंगरांवर कडाक्याची थंडी असते.

 

उत्तर थायलंडवर शेजारील देश म्यानमार आणि चीनचा युनान प्रांत यांचा सांस्कृतिक प्रभाव आहे. त्यामुळे उत्तर थायलंडचा तोंडावळा बराचसा म्यानमार आणि युनानसारखा भासतो. चिअंग मायमधील लन्ना आणि सुखोथाईमधील सुखोथाई या ऐतिहासिक दृष्ट्या पहिल्या थाई राजवटी होत्या. उत्तर थायलंडला बराच काळ साम्यवादी उठाव, म्यानमारची अंमली पदार्थांवरून झालेली युद्धे आणि अंतर्गत यादवीने ग्रासले होते. या सा-या समस्यांचे आता बहुतांशी निराकरण झाले आहे. ताक (Tak) आणि मै होंग सोन (Mae Hong Son) या प्रांतांमध्ये गेलात तर अजूनही सावधगिरी बाळगण्यास सांगितले जाते. 

 

उत्तर थायलंडमध्ये खाम मिअंग (Kham Meaung) किंवा खाम मुअंग (Muang) ही थाई भाषेची बोलीभाषा प्रचारात आहे. तरीसुद्धा प्रमाणित थाई भाषा सर्वांना समजते. याशिवाय आदिवासी जमाती त्यांची वेगळी भाषा बोलतात. काही ठिकाणी विशेषत: मंदिरांमध्ये प्राचीन लन्ना भाषेतील काही सूचना लिहिलेल्या आढळतील.  ही भाषा आता फारच थोड्या लोकांना समजते. धार्मिक विधींमध्ये या भाषेचा वापर होतो. 


उत्तर थायलंड
उत्तर थायलंड हा डोंगर, द-या, जंगले, नद्या यांनी व्यापलेला विस्तीर्ण प्रदेश आहे. येथे शतकानुशतके थायलंड, चीन, लाओस, म्यानमार आणि त्याहीपलिकडील देश वस्तूंची आणि विचारांची देवाणघेवाण करीत आले आहेत. आदिवासी जमातींना तर कुठल्याच राजकीय सीमा ठाऊक नसतात. उत्तर थायलंडमध्ये स्थलांतरित झालेल्या आखा, कारेन, लिसू, हमाँग आणि याव या आदिवासी जमातींनी येथील संस्कृतीच्या विविधतेमध्ये भर घातली आहे.
अगदी विसाव्या शतकापर्यंत उत्तर थायलंडचा प्रवास दुर्गमच होता. हा प्रवास बँकॉकहून नदीमार्गे किंवा हत्तीवरून होत असे. हत्तीवरून प्रवासास कित्येक आठवडे लागत. तेव्हा अशा दुर्गम भागाने आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून ठेवले असल्यास नवल नाही. येथील मंदिरांचे सौंदर्य, मंदिरांतील सागाच्या लाकडावरील कोरीव काम आणि ब्रह्मी वळणाची सजावट पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात. येथील टेकड्यांवर फुलणारी र्किडची फुले मोहून टाकतात.  शहरीकरणाचा स्पर्श न झालेल्या येथील जीवनपद्धतीचा वेगळेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. साहसी पर्यटकांना येथील डोंगर आणि जंगले ट्रेकिंगसाठी खुणावतात.
डोंगर म्हणजे थाई आदिवासींचे निवासस्थान. पर्यटनामुळे आदिवासी जमाती उजेडात येत आहेत त्याचप्रमाणे थायलंडच्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये येत आहेत. बरेच आदिवासी उत्तरेकडील मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. चिअंग माय हे शहर उत्तर थायलंडच्या राजधानीचे शहर आहे तसेच ते देशाचे सांस्कृतिक हृदयसुद्धा आहे. मै होंग सोन या सीमावर्ती प्रांतामध्ये तर आदिवासींची संख्या थाई वंशाच्या लोकांपेक्षा जास्त आहे.
गोल्डन ट्रँगल
उत्तर थायलंडच्या डोंगराळ आणि जंगलांनी व्यापलेल्या सीमेचा तस्करांनी फायदा घेतल्यास नवल नाही. कारण अशा भूमीवर पूर्ण देखरेख करणे कठीण आहे. त्यामुळे गोल्डन ट्रँगल अंमली पदार्थांच्या तस्करीसाठीसुद्धा कुप्रसिद्ध आहे.


चिअंग राय प्रांत: चिअंग राय हा थायलंडचा उत्तरेकडील सीमावर्ती प्रांत आहे. या प्रांताला लागून उत्तरेकडे म्यानमार तर पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेस लाओस हे देश आहेत. पश्चिम दिशेस चिअंग माय  आणि दक्षिण दिशेस कडे फायाव (Phayao) हे प्रांत येतात. चिअंग राय प्रांताचे एकूण क्षेत्रफळ ११,६७८ चौकिमी असून त्यामध्ये एकूण १६ परगणे येतात. हा प्रांत बहूतेक सारा डोंगराळ असून येथे १,५०० मीटर्स उंचीपर्यंत पर्वतशिखरे आहेत. या पर्वतरांगांमधून अनेक नद्या उगम पावतात. त्यांपैकी कोक नदी सर्वांत महत्त्वाची आहे. या प्रांताच्या उत्तर दिशेस मीकाँग आणि रुआक या दोन नद्या एकमेकांस ज्या ठिकाणी मिळतात, तेथे त्रिकोणाकृती प्रदेश तयार झाला आहे. हाच प्रदेश गोल्डन ट्रँगल किंवा सोनेरी त्रिकोण म्हणून प्रसिद्ध आहे. कारण याच्या एका बाजूस थायलंड, दुस-या बाजूस म्यानमार तर तिस-या बाजूस लाओस हे देश येतात.  येथील डोंगराळ भागामध्ये प्रामुख्याने आखा, लहू, करेन आणि हमाँग या आदिवासी जमातींची वस्ती आहे. चिअंग माय प्रांतास खूप जुना इतिहास असून येथे प्रामुख्याने छोटी राज्ये अस्तित्वात होती.   

लिसू हिल ट्राइब                                                     http://www.lisuhilltribe.com/lisu.htm

 

लिसू आदिवासींची प्रामुख्याने चिअंग राय, चिअंग माय आणि मै हॉंग या प्रांतांमध्ये वस्ती आहे. त्यांचा उगम दक्षिण चीनमध्ये आणि त्याआधी तिबेटमध्ये असल्याचे मानले जाते. हे आदिवासी थायलंडमध्ये सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी आले.        

 

मै पिंग नदीमधील सफर

 

येथून तुम्ही मै पिंग नदीमध्ये raफ्टींग किंवा  क्रूझ सफर करू शकता. क्रूझच्या सफरीस सुमारे दोन तास लागतात. तुम्ही गाव मागे टाकून नदीच्या पात्रामध्ये जसजसे पुढे जाल, तसतसे तुम्हाला नदीचे बदलते स्वरूप दृष्टीस येईल. वाटेमध्ये सागाची घरे, सुंदर वनश्री आणि पाण्यात बागडणारी मुले दिसून येतील. वाटेमध्ये तुम्ही एखाद्या शेतक-याच्या घरी थांबून jaस्मीन तांदळाची लागवड पाहू शकता किंवा औषधांमध्ये किंवा स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणा-या वनस्पती पाहू शकता. ताजी स्थानिक फळे, लेमन ग्रास आणि इतर वनस्पतींच्या रसाचा आस्वाद घेऊ शकता. या क्रूझच्या प्रवासामध्ये तुमच्यासाठी स्वादिष्ट थाई भोजनाचीसुद्धा सोय होऊ शकते. मात्र तुम्हाला तसे paकेज निवडावे लागेल. या क्रूझच्या प्रवासासाठी ४५० बाथ एवढा खर्च येतो. भोजनाची सोय हवी असेल तर हा खर्च ५५०-६५० बाथ एवढा येतो.

 

खांतोके डिनर शो         


 

खांतोके डिनर शो हे उत्तर थायलंडचे वैशिष्ट्य आहे. रोज होणारे खांतोके डिनर शो थाई आणि परदेशी पर्यटकांमध्ये सारखेच लोकप्रिय आहे. हे जेवण एका लाकडी ट्रेवर देण्याची पद्धत आहे. या ट्रेला ‘खांतोके’ असे म्हणतात. त्यामुळे या जेवणास खांतोके डिनर असे म्हणतात. या जेवणामध्ये दिले जाणारे पदार्थ उत्तर थायलंडमध्ये लोकप्रिय असणारे पदार्थ आहेत. बहुतेक पदार्थ हे पोर्कचे म्हणजे डुकराच्या मांसाचे असतात. या पदार्थांमध्ये आले घातलेली पोर्क करी, मिरची आणि टोmaटो घातलेला पोर्कचा खिमा, पोर्कचे कुरकुरीत तुकडे, अशा पोर्कच्या पदार्थांचा समावेश होतो. पाहुणे जेवण करीत असताना नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम चालू असतो. या कार्यक्रमातील कलाकार थाई आदिवासी पद्धतीचे पोशाख आणि चांदीचे अलंकार घालतात. काही ठिकाणी थायलंडच्या चार निरनिराळ्या प्रदेशातील सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात येतात.         

 

 

 

Tham Lod

Tham Lod ही मोठी सागरी गुहा असून आव फंग आ पर्वताच्या मुखापाशी आहे. लाखो वर्षांपासून समुद्राच्या लाटांनी झीज झाल्यामुळे या गुहा तयार झाल्या आहेत. या गुहांमध्ये stalagmite आणि stalactiteचे खडक आहेत. या गुहांमध्ये बोटीने जावे लागते.    


१.      परिचय

स्थान, विस्तार व सीमा

चिअंग माय हे चिअंग माय या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे.  बँकॉकपासून हे शहर सुमारे ७०० किमी अंतरावर असून देशातील सर्वांत उंच पर्वतीय प्रदेशामाध्ये आहे. हे शहर पिंग नदीच्या काठी वसले आहे.

इतिहास

चिअंग माय शहराची स्थापना मेंग राय नावाच्या राजाने १२९६ साली केली. चिअंग मायचा अर्थ आहे ‘ नवे शहर’.  यानंतर चिअंग माय लन्ना राजवटीचे राजधानीचे शहर म्हणून उदयास आले. ब्रह्मी आक्रमकांपासून बचाव होण्यासाठी शहराभोवती तटबंदी उभारण्यात आली आणि खंदक खोदण्यात आले. लन्ना  राजवटीच्या ऱ्हासानंतर चिअंग माय शहराचे महत्त्वसुद्धा कमी झाले आणि बहुतांश काळ शहर अयुथयामधील थाई लोकांच्या किंवा ब्रह्मी आक्रमकांच्या ताब्यात होते. एप्रिल १७६७ मध्ये ब्रह्मी आक्रमकांसमोर अयुथयाचा पाडाव झाला. त्यामुळे सन १७७६ ते १७९१ या काळामध्ये चिअंग मायवर कुणाचेच नियंत्रण नव्हते. लन्ना राज्याचा जो भाग शिल्लक राहिला होता त्याची राजधानी laMpaMg हे शहर होते. १७७४ साली थाई राजा थाकसिन याने ब्रह्मी आक्रमकांना हुसकावून लावण्यासाठी चाओ टोळ्यांना मदत केली आणि चिअंग माय अधिकृत रीत्या थायलंडचा भाग झाले.  यानंतर  चिअंग माय शहराची सांस्कृतिक, व्यापारी आणि आर्थिक पातळीवर प्रगती होत राहून चिअंग मायला आजचे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. सध्या चिअंग माय म्हणजे उत्तर थायलंडची अनौपचारिक राजधानी असून बँकॉकनंतर थायलंडमधील दुसरे महत्त्वाचे शहर आहे.  

२.      प्रवास

चिअंग मायला कसे जावे 

विमानाने: चिअंग मायला जाण्यासाठी थाई एअरवेज इंटरnaशनल, बँकॉक एअरवेज, एअर एशिया, ओरियंट थाई एअरलाइन्स, नॉक एअर अशा खूप एअरलाइन्सच्या भरपूर फ्लाइTs आहेत. बँकॉक ते चिअंग माय हा विमानाने एक तासाचा प्रवास आहे. थायलंडमधील इतर शहरांमधूनसुद्धा चिअंग मायला जाण्यासाठी नियमित फ्लाइts  आहेत. सिंगापूर, हॉंगकॉंग, क्वालालंपूर अशा आशियामधील महत्त्वाच्या ठिकाणांहूनसुद्धा चिअंग मायला जाण्यासाठी फ्लाइts आहेत.               

रस्त्याने : खाजगी किंवा सार्वजनिक बसने बँकॉकहून  चिअंग मायला जाता येते. बसने हा प्रवास १० ते ११ तासाचा आहे.  कारने साधारणत: ८ तास लागतात.    

रेल्वेने: Hualamphong स्टेशनपासून चिअंग मायला जाण्यास नियमित एक्स्प्रेस गाड्या आहेत. या प्रवासास साधारणत: १२ तास लागतात.   

प्रमुख विभाग/रस्ते

१. चिअंग माय सिटी आणि ओल्ड सिटी

पिंग नदीच्या पश्चिमेस साधारण एक किमी अंतरावर असणा-या तटबंदीमध्ये असणारा भाग म्हणजे जुने शहर. येथेच चिअंग मायचा इतिहास बोलका होतो. येथे प्राचीन लन्ना मंदिरे आणि इतर सांस्कृतिक आकर्षणे आहेत. येथील संडे वॉकिंग स्ट्रीटसुद्धा पर्यटकांचा आवडता आहे. पायी किंवा सायकलने फिरून हा भाग पाहण्यात मजा आहे. नाइट बझार आणि ओल्ड सिटीच्या भोवती चिअंग माय सिटीचा मध्यवर्ती भाग आहे. या भागामध्ये जुन्या-नव्या पद्धतीची शॉप हाऊसेस, कॅफे, स्पाज आणि रिव्हरसाइड रेस्तराँ खच्चून आहेत.  शहराच्या आणखी पश्चिम बाजूस Nimmanhaemin रोडचा भागसुद्धा विकसित झाला असून येथे बुटिक्स, गॅलरीज आणि खाण्या-पिण्याच्या सोयी भरपूर आहेत. 

२. नाइट बझार

चिअंग मायमधील खरेदी आणि निशाजीवनासाठी हा मुख्य विभाग आहे. Chang Khlan आणि Loi Khroh एकमेकांना दुभागतात तेथे या भागाचे केंद्र आहे. परंतु आता हा सारा विभागच Chang Khlan आणि Loi Khroh च्या दिशेने पसरला आहे. संध्याकाळी सहा वाजले की या भागामध्ये वर्दळ सुरू होते ती रात्री साडेदहापर्यंत टिकते.  नाइट बझारमध्ये वाजवी दरात राहण्याची सोय होऊ शकते.येथे माफक दरातील गेस्ट हाऊसेस ते पंचतारांकित अलिशान हॉटेल्स उपलब्ध होऊ शकतात.  तुम्हाला चिअंग मायमधील व्यस्त अशा व्यापारी भागामध्ये राहावयाचे असेल तर नाइट बझारमध्ये किंवा नाइट बझारच्या आसपास राहणे चांगले. 

३. रिव्हरसाइड-वत केत (Wat Ket)

चिअंग मायचे जुनेपणाचे जे काही आकर्षण आहे, ते सारे रिव्हरसाइडमध्ये एकवटले आहे. या भागाला पंचतारांकित हॉटेल्सचे वावडे आहे. येथील वैशिष्ट्ये म्हणजे वाजवी दरातील खाण्यापिण्याची ठिकाणे, बुटिक क्राफ्ट शॉप्स आणि संगीतगृहे. हा भागसुद्धा महागडाच आहे हे मान्य केले तरीसुद्धा बँकॉकच्या चओ फ्रया रिव्हरसाइडपेक्षा या भागामध्ये भपकेबाजपणा कमी आहे. येथे स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्यामध्ये जास्त आपलेपणा आढळेल. हा भाग वेळ चांगला घालवण्याची हमी देणारा आहे.

४. Nimmanhaemin रोड  

हा भाग चिअंग मायमधील महत्त्वाचा भाग म्हणून उदयास आला आहे. येथे बुटिक्स, gaलरीज आणि खाण्यापिण्याच्या भरपूर सोयी आढळतील. तुम्हाला हाताने बनवलेल्या वस्तू, पुरातन वस्तू, कपडे, उपकरणांचे सुटे भाग यांच्या खरेदीमध्ये रस असेल तर  Nimmanhaemin रोड विशेषत: सोई १ मध्ये भटकण्यास हरकत नाही. येथील वस्तूंचा दर्जाही चांगला आहे. येथील जवळच्या Huay Kaew रोडवर नाईट मार्केट असून हा रस्ता latest fashionच्या वस्तू स्वस्तात खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि युवकांनी गजबजलेला असतो. हा भाग कॅफे, रेस्तराँ, लाइव्ह म्युझिक असलेले कूल बार्स यांनी भरलेला असून येथील वातावरणही खेळीमेळीचे असते.   

५. Hang Dong

Hang Dong हे चिअंग मायमधील हस्तव्यवसायासाठी प्रसिद्ध केंद्र आहे. याचे कारण येथील Baan Tawai हे गाव लाकडावरील कोरीव कामासाठी तर Muang Kung हे गाव मातीच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. Baan Tawai सिटी सेंटरच्या दक्षिणेकडे अठरा किमी अंतरावर आहे. येथील हाताने कोरीवकाम केलेले लाकडी फर्निचर आणि घरगुती लाकडी वस्तू तुम्हाला मोहून टाकतील. येथे तुमच्या मागणीप्रमाणे वस्तूसुद्धा बनवून दिल्या जातात. चिअंग मायची आणखी कौटुंबिक आकर्षणे म्हणजे चिअंग माय नाइट सफारी आणि रॉयल फ्लोरा Ratchaphruek. Hang Dong मध्ये राहण्याची आवश्यकता नाही. परंतु येथे राहण्यासाठी सुंदर रिjhoर्ट्स आहेत आणि येथील वातावरणही अतिशय शांत आणि आल्हादादायक आहे.     

.Mae Rim-Mae Taeng

Mae Rim म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणी आहे. येथील सुंदर पर्वतरांगा, धबधबे, गुहा, फुलबागा, एलिफंट कॅम्प्स आणि आदिवासींची निवासस्थाने असणारी खेडेगावे पाहून तुम्हाला येथून परत जावेसे वाटणार नाही. Mae Rimच्या थोडे उत्तरेस असणारे Mae Taeng दूर असल्यामुळे अधिकच सुंदर वाटेल. येथे सर्व सुखसोयींनी युक्त असे सुंदर रिjhoर्ट्स उपलब्ध आहेत.   

निशाजीवन

१.      नाइट बझार: सूर्यास्त झाला की नाइट बझारमधील वर्दळ वाढू लागते. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांचे stoल्स लागतात. निरनिराळ्या वस्तूंचे विक्रेते दिसू लागातात. तुम्हाला खरेदी, खाणे, पिणे यास भरपूर वाव मिळेल.

२.      वॉकिंग स्ट्रीट्स: पहिल्यांदा या भागास संडे वॉकिंग स्ट्रीट्स म्हणत. आता हा भाग saटर्डे Wualai वॉकिंग स्ट्रीट म्हणतात. दुपारनंतर हा भाग कार वाहतुकीसाठी बंद केला जातो. येथील रस्त्यावरील विक्रेते, खाण्यापिण्याचे stoल्स, शॉपहाऊसेस या सर्वांतून चिअंग मायचे वेगळेपण तुम्हाला जाणवेल.  

३.      रिव्हरसाइड जाझ: नाइट बझारहून पिंग नदीच्या पलीकडे Charoenrat रोड नदीला समांतर जातो. येथे रांगेने रेस्टो-बार्स आहेत. येथे जाझ, सोल, reggae आणि क्लासिक रॉक anड रोलची मेजवानी मिळेल. नदीकाठचे सुंदर दृश्य, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि इतर आकर्षणे आहेतच.  

४.      Nimmanhaemin रोड: या रस्त्यास gaलरीज, आर्ट kaफेज, बुटिक शॉप्स आणि हॉटेल्सची रेलचेल आहे. सूर्यास्तानंतर येथील बार्स, क्लब्स आणि रेस्तराँ गजबजून जातात. संगीत, नृत्य आणि पार्टीसाठी येथील मंकी क्लब प्रसिद्ध आहे.  

५.      कॅबरे शोज: फुकेत, बॅंकॉक प्रमाणेच चिअंग मायसुद्धा येथील लेडी बॉईजसाठी प्रसिद्ध आहे. कॅबरे शोजसाठी मून मुअंग रोडवरील ब्लू मून कॅबरे आणि Chang Peuak रोडवरील सायमन कॅबरे प्रसिद्ध आहेत.

६.      लोई क्रोज (Loi Kroh’s) गो गो स्ट्रिप: हा Tha Pae च्या दक्षिणेकडे नाइट बझारकडे जाणारा पट्टा आहे आणि तो बार्स, मसाज पार्लर्स, गो-गो बार्स यांनी भरलेला आहे.

७.      ओल्ड सिटी बार्स आणि पब्स: ओल्ड सिटीमधील बार्स आणि पब्स रिव्हरसाइड किंवा नाइट बझारप्रमाणे अत्याधुनिक आणि गजबजलेले नाहीत. तरीसुद्धा येथीलही बार्स आणि पब्स अवश्य भेट देण्यासारखे आहेत.

८.      सी. एम. एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स: हा भागसुद्धा बार्स, पूल टेबल्स यांनी भरलेला आहे. थाई किक बॉक्सिंगचे एक स्टेडिअमसुद्धा आहे. येथे बहुतेक रात्री बॉक्सिंगचे मोफत शोज होतात. साऱ्या भागामध्ये जिथे तिथे ‘फ्री शो’ अशी निऑन साइन्स दिसतील आणि संगीत ऐकू येईल.           

खरेदीसाठी प्रमुख विभाग

१.      रिव्हरसाइड बुटिक शॉप्स: पिंग नदीलगत असणारा Charoenrat रोड फिरण्यास चांगला आहे. येथे नवीकरण केलेली लाकडी शॉप-हाऊसेस आहेत. या दुकानांमध्ये लन्ना शैलीच्या स्थानिक उच्च प्रतीच्या branडच्या कलाकुसरीच्या वस्तू मिळतील. ही दुकाने शंभर वर्षे जुनी असून यांचे बांधकाम वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

२.       नाइट बझार: नाइट बझारमध्ये रस्त्याला लागून भरपूर दुकाने आहेत. या दुकानांमध्ये कपड्यांसहित सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील.     

३.      Nimmanhemin प्रॉमनेड : कलात्मक लाकडी फर्निचर, मेणबत्त्यांचे sTanड, बोहेमिअन कपडे, अमूर्त पेंटिंग्स, हाताने विणलेले कपडे, सा पेपरच्या कलात्मक वस्तू अशा असंख्य गोष्टींची खरेदी करता येईल. येथे डिसेंबरमध्ये एक आठवड्यासाठी वार्षिक मेळा असतो. या वेळी आणखी वैशिष्ट्यपूर्ण वस्तू मिळतील.  

४.      Pae रोड: Pae रोडवरील शॉप हाऊसेस आदिवासी कलाकुसरीच्या वस्तू, चांदीचे दागिने, सिraमिक्स, घरगुती वापराच्या वस्तू, लाकडी कलाकुसरीच्या वस्तू, बुद्धमूर्ती  यांसाठी प्रसिद्ध आहेत.

५.      बान तावाई (Baan Tawai) वुड क्राफ्ट्स: हे ठिकाण सिटी सेंटरपासून वीस किमी अंतरावर असून लाकडी कलाकुसरीच्या वस्तू आणि होम फर्निशिंगसाठी प्रसिद्ध आहे. बँकॉक, फुकेत आणि समुई येथे मिळणाऱ्या बऱ्याच वस्तू येथे बनतात. येथे तुम्हाला कारागीर या वस्तू कशा बनवतात तेसुद्धा पाहावयास मिळेल.

६.      Sankampaeng क्राफ्ट स्ट्रीट: सिटी सेंटरच्या पूर्वेकडे तेरा किमी अंतरावर असणारा हा भाग थाई रेशमासाठी प्रसिद्ध आहे. थाई रेशीम जगात सर्वांत उच्च प्रतीचे समजले जाते. इतर उत्पादने म्हणजे laकरच्या वस्तू, सिraमिक्स आणि उत्तर थायलंडचे वैशिष्ट्य असणाऱ्या आकर्षक छत्र्या. चिअंग माय सान कंphanग रोडला लागून लहान कारखाने दिसून येतील. या कारखान्यांमध्ये कारागीर पिढ्या n पिढ्या जोपासलेल्या कौशल्याने या वस्तू बनवत असतात.   

७.      Wualai रोड: चांदीच्या वस्तू हाताने बनवणे ही चिअंग मायची आणखी एक प्राचीन कला आहे. या कलेचे मूळ म्यानमारमधील शेकडो वर्षांपूर्वीच्या shaन राजवटीमध्ये आहे. या काळामध्ये चांदीचे दागिने बनवणारे कारागीर दक्षिणेकडे स्थलांतरित होऊन Wualaiच्या पट्ट्यामध्ये स्थायिक झाले. आज असे थोडेच कारागीर शिल्लक राहिले आहेत. Wualai रोडला हे कारागीर तुम्हाला हातोड्याने ठोकून चांदीच्या वस्तू बनवताना दिसतील. येथे तुम्हाला चांदीची भांडी आणि इतर कलाकुसरीच्या वस्तू मिळतील.   

८.      जे. जे. मार्केट: सिटी सेंटरपासून थोडे दूर असलेले हे ओपन एअर मार्केट म्हणजे आधुनिक शॉपिंग प्लाझा आणि पारंपरिक क्राफ्ट सेंटर्सना उत्तर आहे. येथे एका कॉंक्रीटच्या वास्तूमध्ये तीन विभागांमध्ये दुकाने पसरलेली आहेत. येथील वातावरणामध्ये  नाइट बझारपेक्षा मोकळेपणा आहे तर जुन्या पद्धतीच्या क्राफ्ट मार्केटपेक्षा आधुनिकता आहे. Nimmanhaemin रोड, बान तावाई आणि सान कंphanग येथे मिळणाऱ्या बहुतेक साऱ्या वस्तू येथे तुम्हाला मिळतील.     

प्रेक्षणीय स्थळे/उपक्रम

१.      दोई सुथेप (Doi Suthep) किंवा वत प्रथात (Wat Prathat) टेंपल

        

दोई सुथेपच्या पर्वतशिखरावरून एखाद्या त्या-याप्रमाणे चमकणारे वत फ्रा थात चिअंग मायमधील सर्वांत जास्त प्रसिद्ध मंदिर आहे. आकाश निरभ्र असेल तर या मंदिराचा सोनेरी कळस शहराच्या विरुद्ध बाजूने पिंग नदीपलिकडून सुद्धा दिसू शकतो.  हे मंदिर लन्ना संस्कृतीचा प्रभाव असलेली एक प्रभावी वास्तू असून एक महत्त्वाचे धार्मिक केंद्रही आहे. येथे जगभरातून पर्यटक तसेच भाविक लोक भेट देत असतात. हे मंदिर चिअंग माय शहरापासून पंधरा किमी अंतरावर आहे. हे मंदिर दोई सुथेप नावाच्या डोंगरावर आहे, म्हणून यास दोई सुथेप मंदिर म्हणतात.  मंदिरापर्यंत जाण्यास ३०६ पाय-या लागतात. मंदिरापर्यंत जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे फ्युनिकुलर रेल्वे.  या डोंगरावरून चिअंग माय शहराचे सुंदर दृश्य दिसते.  

२. चिअंग माय नाइट सफारी, Hang Dong.

हे पार्क शहरापासून १२ किमी अंतरावर असून १.२ चौकिमी क्षेत्रफळामध्ये वसले आहे. या नाइट सफारीमध्ये सॅव्हाना सफारी, प्रिडेटर प्रौल आणि जग्वार ट्रेल असे तीन मुख्य प्राणिविभाग आहेत. येथे तुम्ही प्राण्यांना खायला घालू शकता किंवा वाघाच्या पिल्लांबरोबर छायाचित्रेही घेऊ शकता. येथे सूव्हनिर्सची दुकाने आहेत. येथील फन प्लाझामधील डान्सिंग फाऊंटनमध्ये तुम्ही तुमचे शारीरिक संतुलन तपासून पाहू शकता. रात्री अंधार पडला की येथील लेझर लाइट शोसुद्धा पाहण्यासारखा असतो. 

३. वत चेदी लुआंग (Wat Chedi Luang), ओल्ड सिटी 

या चेदीचे बांधकाम सन १३८५ ते १४०२ च्या दरम्यान झाले.  वत चेदी लुआंगचा भव्य कळस चिअंग मायच्या आकाशरेषेचा ठळक भाग आहे. या मंदिराचे क्षेत्र अतिशय विस्तीर्ण असून त्यामध्ये अनेक लहान-मोठ्या वास्तू आहेत. मुख्य विहार्नमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी विशाल डिंकाचे झाड आहे. येथे एक उंच असा स्तंभ (Intakin) सुद्धा आहे. मोठ्या बौद्ध सणांच्या वेळी येथे संध्याकाळी मेणबत्त्या घेऊन मिरवणूक काढण्यात येते, ती पाहण्यासारखी असते. 

४. विअंग कुम काम (Wiang Kum Kam) - प्राचीन भूमिगत शहर

सिटी सेंटरच्या दक्षिण दिशेस पिंग नदीच्या काठी विअंग कुम काम हे शहर वसलेले होते. हे शहर नंतर पिंग नदीच्या पात्रामध्ये लुप्त झाले. आता या शहराचे अवशेष पाहावयास मिळतात. हे शहर आठव्या शतकातील हरिपुंचाई राज्याचा भाग होते आणि काही काळ हे शहर लन्ना राज्याच्या राजधानीचे शहर होते. या शहरातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणजे वत चेदी लिअम (Wat Chedi Liam) हे बौद्ध मंदिर. हे पाच थर असलेले मंदिर एका चौथ-यावर आहे. ही शैली लन्ना पद्धतीची आहे. याचे प्रांगण ब्रह्मी पद्धतीचे आहे. हे मंदिर लंफुन (Lamphun) महामार्गावर जुन्या शहराच्या आग्नेय दिशेस पाच किमी अंतरावर आहे. सिटी सेंटरहून साँगथ्यूने येथे जाता येते.

५. मै सा ( Mae Sa ) एलिफंट कँप

या एलिफंट कँपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. येथील हत्ती चित्रकला, फुटबॉल खेळणे, नृत्य अशा ब-याच कलांमध्ये प्रवीण आहेत.

६. दोई इंथानोन (Doi Inthanon) नॅशनल पार्क

दोई इंथानोन हे थायलंडमधील सर्वांत उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,५६५ मीटर्स आहे. येथील ४८२ चौकिमी क्षेत्रफळ असणारे विशाल पार्क म्हणजे निसर्गसौंदर्याचे रत्नच आहे. हा सारा प्रदेश विषुववृत्तीय अरण्यांनी आच्छादित अशा दणकट पर्वतांनी व्यापलेला असून अधूनमधून दिसणा-या नद्या आणि धबधबे यांनी या प्रदेशाच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे.  हा पार्क संरक्षित विभाग असल्यामुळे येथे विविध प्रकारचे प्राणी आढळतात. पक्षिनिरीक्षणासाठी तर हे थायलंडमधील सर्वांत चांगले ठिकाण असावे. 

. डोई पुई (Doi Pui) ट्राइबल व्हिलेज आणि Naशनल पार्क  

डोई पुई या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची १,६८५ मीटर आहे. येथील Naशनल पार्कमध्ये पुष्कळ धबधबे आहेत. येथे Hmong आदिवासींची वस्ती आहे. येथील आणखी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे फू पिंग (Phu Ping) paलेस हे सध्याच्या राजाचे निवासस्थान.

७. बो संग (Bo Sang)  आणि सन कंphaMg (San Kamphaeng)   


बो संग आणि सन कंphaMग हे दोन खेडेगाव तेथील छत्र्या, थाई रेशीम आणि सुती कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील छत्र्या केवळ देशामध्येच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहेत. या छत्र्या एवढ्या प्रसिद्ध आहेत की चिअंग मायचे चिन्हसुद्धा छत्रीच आहे. येथे तुम्हाला छोट्या आकाराच्या कॉकटेल छत्र्‍या तर बागेमध्ये ठेवण्याच्या नऊ फूट व्यासाइतक्या मोठ्या paरासोल छत्र्‍या मिळतील. या छत्र्यांचा  सांगाडा बांबूच्या कामTyaaMपासून बनवितात आणि छत्रीचे कापड सा नावाच्या झाडाच्या सालीचे बनविलेले असते. या कापडास विशिष्ट लेप दिला की ते पाण्यापासून अभेद्य होते. मग त्यावर आकर्षक रंगकाम आणि नक्षीकाम केले जाते.    

याशिवाय येथे पेशो आणि हाताने बनविलेल्या इतर वस्तूही मिळतील. येथील आणखी मिळणा-या गोष्टी म्हणजे चांदीची भांडी, लाकडावर कोरीव काम केलेल्या वस्तू, सिraमिक्स, विणकाम आणि भरतकाम केलेल्या वस्तू. येथील कपडे पारंपरिक पद्धतीने हातमागावर विणलेले असते.    

८. जेम्स गॅलरी

चिअंग मायमधील जेम्स गॅलरी २ एकर  (८,००० चौ. किमी ) जागेवर  बांधण्यात  आली  असून  ती  १९९३ साली  सुरू  करण्यात  आली. या गॅलरीमध्ये  ४०० हून  अधिक  कर्मचारी  आहेत. येथील  कलाकृतींवर उत्तर  थायलंडच्या  लन्ना  संस्कृतीचा  प्रभाव आहे. येथे  स्थानिक  कारागिरांनी  घडविलेले  जवाहिरे  उपलब्ध  असून  येथील  गोमेद  (जेड ) विशेष  प्रसिद्ध  आहेत. येथे स्थानिक  कारागिरांनी  बनविलेली  सूव्हनीर्स  उपलब्ध  आहेत.

९. सन कंMphaMग हॉट स्प्रिंग्स 

 

हे ठिकाण शहरापासून ३६ किमी अंतरावर असून वृक्ष आणि हिरव्यागार टेकड्यांच्या नैसर्गिक वातावरणामध्ये आहे.  हे गरम पाण्याचे कारंजे असून यामध्ये गंधकाचा अंश आहे. त्यामुळे या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. येथे राहण्याची, जेवण्याची तसेच स्नानाची सोय उपलब्ध आहे.

उपक्रम

१.      Mae Wang Sanpathong, Mae Taengमध्ये ट्रेकिंग

Mae Wang भागामध्ये अतिशय सुंदर अरण्ये, धबधबे आहेत. येथे तुम्ही पायी फिरणे, हत्तीवरून फिरणे, बांबूच्या तराफ्यावरून प्रवास करणे अशा सर्व गोष्टींचा रोमांच अनुभवू शकता. वाटेवर हmonग आणि Karen आदिवासींच्या वस्त्यांना भेट देऊ शकता.  

२.      Mae Taengमध्ये हत्तीवरून सफर आणि बांबूच्या तराफ्यावरून प्रवास

Mae Taeng मध्ये हत्तीवरून प्रवास म्हणजे मोठी पर्वणी वाटेल. थायलंडमधील हत्ती अतिशय प्रशिक्षित आणि माणसाळलेले असतात. त्यांना खेळणे, चित्रे काढणे, निरनिराळी कामे करणे अशी विविध कौशल्ये शिकवलेली असतात. हत्तींच्या सहवासात तुमचा दिवस आनंदात निघून जाईल. Mae Taeng नदीमध्ये बांबूच्या तराफ्यावरून प्रवास करून या आनंददायक सफरीची सांगता करा.    

३.      चिअंग राय आणि गोल्डन Tranगलचा दौरा किंवा ट्रेकिंग

४.      डोई सुथेप मंदिर आणि इतर मंदिरांसहित शहराचा दौरा

५.      एक दिवसाचे माहूत प्रशिक्षण

वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ

१.      खाव सोई: हे अंड्याच्या नुडल्सचे सूप असते. शिवाय अंडे डीप फ्राय करून सूपवर टाकलेले असते. सूपमध्येसुद्धा अंडे मिसळलेले असते. बरोबर कांद्याची पात, कोबीचे लोणचे आणि लिंबाच्या फोडी देतात. हे खाव सोई तुम्ही चिकन, पोर्क किंवा बीफ पद्धतीचे निवडू शकता.

२.      खान तोके:

३.      साई क्वा: पोर्कचा खिमा, सुक्या मिरच्या, लसूण, shaलट आणि विविध प्रकारच्या झणझणीत मसाले घालून बनविलेले उत्तर थायलंड पद्धतीचे सॉसेज.   

४.      Nam Prik Ong/Nam Prik Nume : लाल आणि हिरव्या मिरच्यांपासून बनविलेली झणझणीत चटणी. कुरकुरीत पोर्कचे कातडे, वाफवलेल्या भाज्या किंवा चिकट भाताबरोबर तोंडीलावणे म्हणून वापरली जाते.

५.      Gaeng Hang Lay : चिंचेचे सार, पोर्कचे तुकडे, shaलट आणि कोलंबीची पेस्ट घालून बनवलेली करी. हा मूळ ब्रह्मी पदार्थ असून उत्तर थायलंड पद्धतीचे फेरफार केले आहेत.

६.      Kanom Jeen Nam Ngeow (Rice Vermicelli with Soybean Curry): Kanom Jeen म्हणजे spaगेतीसारख्या तांदळाच्या नूडल्स आणि Nam Ngeow म्हणजे पोर्क आणि सोयाबीनची करी. ही करी भाज्या आणि कुरकुरीत पोर्क स्किनबरोबर खाल्ली जाते.

७.      Miang Kham: विड्याच्या पानामध्ये गुंडाळून खाण्याचा एक पदार्थ. यामध्ये तुम्ही गोड चटणी, चिरलेला shaलट, लाल किंवा हिरव्या मिरच्या, आले-लसणाचे तुकडे, लिंबू, सुकी कोलंबी, भाजलेले सुके खोबरे यांपैकी हवे ते पदार्थ घालून खाऊ शकता.

८.      Tam Khanun (Young Jackfruit Salad): कोवळ्या फणसाची भाजी. कोवळा फणस प्रथम मऊ होईपर्यंत उकडून घेतला जातो. नंतर त्याचे तुकडे करून ते लसूण, मिरची , कोलंबीची पेस्ट, भाज्यांची पाने, काजूसारख्या सुक्या मेव्याचे तुकडे घालून तेलावर परतून घेतले जातात. एकाच वेळेला आंबट, गोड, खारट, सुक्या मेव्याची चव देणारी अशी ही भाजी.    

नमुना प्रवासकार्यक्रम

दिवस १

चिअंग मायमध्ये  आगमन.

स्थळदर्शन:- डोई सुथेप (Doi Suthep) टेंपल

खरेदी:- सॅन कंफॅम्ग (San Khamphaeng) व्हिलेज मध्ये हस्तनिर्मित तसेच विविध वस्तू.   

२.      परिशिष्टे

BEST LUXURY HOTELS

1.       The Chedi Chiang Mai Hotel and Resort, Riverside,

2.       Le Meridien Chiang Mai, Night Bazaar,

3.       Rachamankha Hotel, Old City,

BEST BOUTIQUE HOTELS

1.       The Rim Chiang Mai, Old City

2.       De Naga Hotel, Old City,

3.       Tamarind Village, Old City

BEST RESORTS

1.       Rawee-Waree Resort & Spa, Mae Rim-Mae Taeng

2.       Siripanna Villa Resort, Chiang Mai City

3.       Sukantara Cascade Resort & Spa, Mae Rim-Mae Taeng

BEST BUDGET HOTELS

1.       Imperial Mae Ping Hotel, Night Bazaar

2.       Vieng Mantra Hotel, Old City

3.       Centara Duangtawan, Night Bazaar

WHERE TO EAT

1.       Tong

2.       The Gallery

3.       Huen Pen

4.       Huen Suntari

5.       Khan Toke Dinner at Old Chiang Mai Cultural Center

6.       The Good View

7.       Charcoa Bakery & Restaurant

8.       House


७. चिअंग दाव – ताऱ्यांची नगरी    


चिअंग दाव शब्दाचा अर्थ आहे 'ता-यांची नगरी'. हे नाव पडण्याचे कारण म्हणजे येथे असणारे चुनखडीची पांढरीशुभ्र  शिखरे. चिअंग दाव हा  उत्तर थायलंडमधील        अतिशय सुंदर आणि पर्वतीय प्रदेश चिअंग मायच्या उत्तरेस तासाभराच्या    अंतरावर आहे. चिअंग दाव हे मेनाम पिंग (Menam Ping) खिंडीच्या वर दोई चिअंग (Doi Chiang) पर्वताच्या हिरव्या उतारावर वसले आहे. हे गाव अतिशय शांत आणि सुंदर असून येथे  उत्तर   थायलंडचा अनुभव येतो. येथे तुम्ही ट्रेकिंग, पक्षिनिरीक्षण आणि इतर भरपूर उपक्रम करू शकता. तुम्हाला काही न करता नुसता आराम करावयाचा असेल तरी चिअंग दाव एक आदर्श ठिकाण आहे.

स्थान, विस्तार आणि सीमा 
 

चिअंग दाव हा चिअंग माय प्रांतातील जिल्हा़ असून त्याचे क्षेत्रफळ १,८८२.१ चौ. किमी आहे. 
लोकसंख्या आणि लोकजीवन 
२०१० च्या गणनेप्रमाणे चिअंग दावची लोकसंख्या ८८ हजार होती. चिअंग दाव हा थायलंडमधील असा एकमेव जिल्हा़ आहे, जेथे सर्व बारा डोंगरातील आदिवासी जमाती राहतात.  

चिअंग दाव हे उत्तर थायलंडमधील लन्ना राज्यामधील छोटे शहर आणि राज्य होते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस झालेल्या thesaphiban प्रशासकीय सुधारणांच्या अंतर्गत चिअंग दावला चिअंग माय प्रांतामध्ये छोट्या जिल्ह्याचा आणि १९०८ साली पूर्ण जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.   
चिअंग दावमधील प्रवासकार्यक्रम
दिवस ३
चिअंग मायच्या उत्तरेस चिअंग दाव येथे येणे. तेथे एलिफंट कॅम्प पाहणे. हत्तीवर सफर करून लिसू या आदिवासींच्या खेडेगावात जाणे. नदीच्या पात्रातून बांबूच्या तराफ्यावरून प्रवास करणे. 
चिअंग मायला परत येणे. 
संध्याकाळी वैशिष्ट्यपूर्ण खान्तोके डिनरचा आस्वाद घेणे.  
चिअंग दावला कसे जावे:

चिअंग मायच्या उत्तरेस ७२ किमी अंतरावर चिअंग दाव असून फंग (Fang) आणि था तोन (Ton) ला जाणा-या हायवे १०७ वर आहे.

विमानाने:

येथून सर्वांत जवळचा विमानतळ चिअंग माय येथे असून मीटर असलेल्या वातानुकूलित टॅक्सीने चिअंग मायला जाण्यासाठी  १,००० ते १,२०० बाथ (१,६०० ते २,००० रुपये) एवढा खर्च येतो.

बसने:

चिअंग दावमध्ये जाण्यास आणि चिअंग दावमधून बाहेर पडण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे हायवे १०७ जवळ राहणे. या हायवेवर तुम्ही बस किंवा साँगथ्यूला हात करून थांबवू शकता. या बस किंवा साँगथ्यूच्या ड्रायव्हरला सांगून तुम्ही हव्या त्या ठिकाणी उतरू शकता. थेट चिअंग दावला जाण्यापेक्षा हा प्रवास १०० बाथने (१६० रुपये) स्वस्त पडतो.

चिअंग दाव चिअंग माय एलिफंट सेंटर                                              

 
सभोवती असणा-या टेकड्या आणि एलिफंट कँपमधून वाहणारी पिंग नदी असे निसर्गरम्य वातावरण चिअंग दाव चिअंग माय एलिफंट सेंटरला लाभले आहे. या एलिफंट सेंटरची स्थापना १९६९ साली झाली. चिअंग मायमधील हा त्यावेळी पहिलाच एलिफंट कँप होता. बाजूस असणा-या कॅरन या डोंगरी आदिवासी जमातीकडून तीन हत्ती भाड्याने घेऊन मानस यविराज याने या एलिफंट कँपची स्थापना केली. हत्तींची विविध प्रकारची कौशल्ये पर्यटकांस दाखवण्याचा हेतू या एलिफंट कँपच्या स्थापनेमागे होता. सेंटरची वर्षानुवर्षे वाढ होत गेली. सेंटरने बाहेरून हत्ती खरेदी केले, त्याचप्रमाणे हत्तींच्या प्रजननाचा कार्यक्रम राबविला. त्यामुळे आज या ट्रेनिंग सेंटरमधील हत्तींची संख्या पस्तीसपर्यंत गेली आहे. येथे हत्तींकडून सकाळच्या वेळी कामे करून घेतात आणि दुपारी त्यांना आपले नैसर्गिक जीवन जगण्यासाठी मोकळे  सोडण्यात येते. हत्तींच्या बछड्यांची विशेष काळजी घेण्यात येते.    

या सेंटरमध्ये हत्तींचे प्रशिक्षण आणि जंगलातील उपक्रम यांचा सुंदर संगम झाला आहे. विशेषत: येथील ‘वन ऑन वन एलिफंट एन्काऊटर’ हा न विसरता येणारा अनुभव आहे. येथील नैसर्गिक वन्य वातावरणामध्ये एलिफंट राइड हा वेगळा अनुभव आहे. येथील हत्तींच्या गोंडस बछड्यांचे प्रशिक्षण पाहणे हा एक मजेदार अनुभव आहे. या हत्तींच्या प्रशिक्षणामध्ये हत्तींनी एका रांगेमध्ये चालणे, निरनिराळी कामे करून दाखविणे, अंघोळ करून दाखविणे, अशा निरनिराळ्या गोष्टींचा समावेश होतो. प्रशिक्षकाच्या आज्ञेवरून हत्ती जंगलातून लाकडी ओंडके ओढून आणतात. या सेंटरमध्ये पिंग नदीमधील  रॅफ्टिंग राईड्स आणि बाजूच्या आदिवासी खेडेगावांना भेट देण्याची व्यवस्था करतात.          

दम हुआ उत्सव: सेंटरतर्फे दर वर्षी १६ एप्रिलला पारंपरिक 'दम हुआ' या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. वरिष्ठांबद्दल आदर दाखवण्यासाठी थाई नववर्षदिनी हा उत्सव साजरा करण्याची लन्ना  आदिवासींची पदधत आहे. सेंटरतर्फे हा कार्यक्रम हत्तींबद्दल आदर दाखवून गतवर्षात हत्तींच्या बाबतीत आपल्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्यांबद्दल हत्तींची क्षमा मागण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी हत्तींना फुलांनी सजविले जाते आणि ऊस, केळी, नारळ, कलिंगड असे हत्तींच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाण्यास देतात.

सेंटरमधील उपक्रम: 

हत्तींचे प्रशिक्षण: सेंटरमध्ये हत्तींच्या प्रशिक्षणाची सकाळी  ९ वाजता आणि  १० वाजता अशी एक एक तासाची दोन सत्रे असतात. हे प्रशिक्षण पर्यटकांना पाहण्यासाठी खुले असते.  या प्रशिक्षणामध्ये हत्तींच्या पिल्लांना स्वावलंबनाचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये हत्तींच्या पिलांना आईशिवाय वावरणे, त्यांची माहुताशी जवळीक वाढवणे, त्यांच्यामध्ये कार्यकौशल्ये निर्माण करणे, वगैरे गोष्टींचा समावेश होतो़.हत्तींच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना रांगेत उभे राहणे, रांगेत चालणे, जोडीने चालणे, गुडघे टेकणे, लाकडाचे ओंडके ओढून नेणे, अशा  गोष्टी शिकवितात. 
‘प्रत्यक्ष माहूत व्हा’ उपक्रम : ही एक गमतीदार प्रकारची राइड आहे. या राइडमध्ये तुम्हीच हत्तीचा माहूत बनता. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन माणसे एका हत्तीवरून ही राइड घेऊ शकता. या राइडचे शुल्क ८,००० बाथ असून एका माणसासाठीसुद्धा तेवढेच शुल्क आकारले जाते. राइडची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ अशी असून या राइडला दोन तास लागतात.या राइडसाठी तुम्ही माहुताचा पोषाखसुदधा घेऊ शकता. या पोषाखासाठी वेगळे ५०० बाथ शुल्क आकारले जाते. या राइडमध्ये हत्तीला अंघोळ घालणे, हत्तीला खाऊ घालणे ही कामे तुम्ही करू शकता. एवढेच नव्हे तर हत्तींबरोबर चित्रेसुदधा काढू शकता. पर्यटकांना हत्तींच्या सहवासात नैसर्गिक वातावरणात राहावयास मिळून हत्तींच्या संगोपनाची माहिती व्हावी हा या राइडचा हेतू आहे.
एलिफंट ट्रेकिंग: एलिफंट कॅम्पमधून तुम्ही जवळच्या लिसू आदिवासींच्या खेडेगावास एलिफंट राइड घेऊ शकता. या राइडला साधारणत: दीड तास लागतो. नदीच्या काठाने जाणा-या या राइडमध्ये तुम्हाला सुंदर वनश्रीचे दर्शन घडते. 

   
  



 
 
 


  


.








China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...