Monday, May 20, 2024

English Translations



 English Translations


(टीप: या पोस्टमधील कवितांवर  आमचा कोणताही हक्क नाही. या कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी/ प्रकाशक यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)


ज्ञानपीठ पारितोषिक विजेते स्व. कविवर्य कुसुमाग्रज 

दूर मनो-यात

वादळला हा जीवनसागर अवसेची रात

पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात

भांबावुनि अभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा

सूडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनि आयाळ गर्जती लाटा भवताली

प्रचंड भिंगापरि फुटते जळ आदळूनी खाली

प्रवासास गलबते आपली अशा काळराती

वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परंतु अंधारात चकाके बघा बंदरात

स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी

काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो-यात

अन् लावा हृदयात सख्यांनो आशेची वात

-कुसुमाग्रज

In that far-off Tower

(स्व. कवी कुसुमाग्रज यांच्या 'दूर मनो-यात' या कवितेचे रूपांतर)

It is the moonless night out

Stormed is the sea of life

The dejected wind rolls about

On the waters, with strife

Crushed by the clouds

The stars are breathless

The wind, mad with revenge,

Shreds the sail to pieces.

The waves roar all around

With manes dishevelled

The splashes of water

Are like the huge lenses splintered

In the hour of such a bleak night,

Our vessels on travel

Are like spinning feathers

Caught in the mighty whirl

But look at the  cool green glow

Of the light in the tower

Which stands firmly

In the distant harbor

The glow is like an angel 

With the wings of beams

Who carves on the darkness

The sculptures of gleams

In that far-off tower,

Watch his bright mantle.

And friends, light at your hearts,

The wicks of hope gentle.

भाषांतर-डॉ. हेमंत जुन्नरकर

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved

Thursday, May 16, 2024

सुभाषितानि

 सुभाषितानि 


अथ यो गुणसम्पन्नान्
हृदयस्याप्रियानपि  ।
प्रियेण कुरुते  वश्या
श्चिरं यशसि तिष्ठति।। 

भावार्थ : जो अप्रिय व्यक्तींना  सुध्दा आपल्या सद् व्यवहाराने वश करुन घेतो तो चिरकाळपर्यंत यशस्वीच राहतो.

लोकयात्रा भयं लज्जा
दाक्षिण्यं त्यागशीलता |
पन्च यत्र न विद्यन्ते
न कुर्यात्तत्र संगतिम् ||

भावार्थ: ज्या घरात उपजीवीकेचे साधन नाही, लोकांत भय, लज्जा नाही, आणी इतरांना मदत व दान देण्याची प्रव्रूत्ती नाही अशा पाच ठिकानी मनुष्याने कधिही जाऊ नये.

Wednesday, May 15, 2024

आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी

 आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी 


आम्ही सर्वांनी, म्हणजे -आई, अण्णा, दादा (नितीन), सचिन, (बहीण शामा तेव्हा लग्न होऊन सासरी गेली होती ) नूतनवहिनीस प्रथम पाहिले, दर्शन हॉल, चिंचवड येथे 'नाथ हा माझा' या नाटकाच्या प्रयोगात. या नाटकात नूतन वहिनीने यशवंत दत्त या नटसम्राटाबरोबर सहजतेने काम केले होते. नंतर दादा म्हणाला की आपण नाटकात पाहिलेली मुलगी आमच्या कंपनीत (रॅपिकट कार्बाइडस लिमिटेड ) मध्ये जॉईन झाली आहे. तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की आमच्या परिवाराशी नूतनवहिनीचा ऋणानुबंध जळणार आहे.


नूतनवहिनी नूतन दांडेकरची नूतन जुन्नरकर होऊन आमच्या परिवाराची सदस्य झाली. प्रत्येक परिवारात काही समस्या असतात. पण नूतनवहिनीचा गुण मला आठवतो की परिवारातील समस्यांची तिने कधी बाहेर वाच्यता केली नाही. नूतनवहिनीचे बाबा फारच विनोदी स्वभावाचे होते. सहज बोलता बोलता ते विनोद करीत. वडील वास्तविक मुलीचे कट्टर अभिमानी असतात. पण ते विनोदात मुलीची पोल खोल करीत. एकदा सर्व जण जेवण करीत होते. नूतन वहिनी जेवण करीतच नव्हती. सारे जण तिला आग्रह करीत होते. बाबा म्हणाले, ' काळजी करू नका. तिने बनवतानाच खाऊन घेतले आहे.'

मला एक गोष्ट आठवते. आमचे आजी-आजोबा चिंचवडमध्ये राहत असत. आजोबा खूप आजारी होते. त्यांची दाढी वाढली होती. न्हाव्याकडे नेणे शक्य नव्हते. त्या वेळी नूतनवहिनीने त्यांची दाढी करून दिली. त्यानंतर आजोबांचा देहांत झाला. त्यांचा चेहरा स्वच्छ दिसत होता.

नंतर माझे लग्न झाले. माझ्या पत्नीचे वर्षाचे आणि नूतनवहिनींचे बहिणी-बहिणीसारखे संबंध होते. दर्शन हॉल मध्ये 'कुणीतरी आहे तिथं' नाटकाचा प्रयोग होता. दादा सतत ऑफीसच्या दौऱ्यावर असे. मी, वर्षा आणि नूतनवहिनीने नाटकाला जावयाचे ठरवले. नूतनवहिनीला पाहून कुणीतरी आम्हाला पहिल्या रांगेतील फ्री पास दिले. नूतनवहिनीने सांगितले की सारे मित्र मोहन जोशींना 'मोहन्या' म्हणत असत. तिने आम्हाला मोहन जोशींची ओळख करून दिली. आम्ही समोरासमोर मोहन जोशींशी गप्पा मारल्या. नूतन वहिनीला नाट्यवर्तुळात किती आदर आहे, ते आम्हाला त्या दिवशी कळले.

नंतर मला मुलगा झाला-अद्वैत. अद्वैतची नूतनवहिनी लाडकी काकी होती. तिला तो निरनिराळे पदार्थ बनवण्यास सांगत असे.
पुढे दादा ऑफीसच्या कामामुळे सहकुटुंब अहमदाबादला स्थलांतरित झाला. त्यामुळे आम्हालाही अहमदाबादला जाण्याचा योग्य आला. नूतनवहिनीचे शेजाऱयांशी तसेच प्रेमाचे संबंध होते. तिने गुजराती भाषा शिकून घेतली होती. त्यांचे शेजारी हर्षदाबेन यांच्या सासूबाई काठियावाडहून येत. त्यांच्याशी काठियावाडी गुजरातीमध्ये त्यांच्या घरचे बोलू शकत नसत. पण नूतनवहिनी बोलू शकत असे.

नंतर मी सहकुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालो. मी ऑफीसच्या कामासाठी सिंगापूरला असताना नूतनवहिनीचा देहांत झाल्याची आश्चर्यजनक आणि दु:ख द बातमी आली (३/७/२००६). बाबांचा गेल्या वर्षीच देहांत झाला होता (२००५). वर्षा ताबडतोब सिडनीहून दादाकडे राहण्यास गेली. दादा, जाई यांनी या प्रसंगास धीराने तोंड दिले. पुढीलच वर्षात आईंचा सुद्धा देहांत झाला (२००७). परलोकात भेटण्याचा त्यांचा संकेत असावा. दांडेकर घरातील आता कुणीच हयात नाही, पण त्यांचे प्रेम शिल्लक आहे.

माझी मावस वहिनी माधुरी एकदा म्हणाली की तिला स्वप्नात नूतन वहिनी तिच्या घरात दिसली होती. ती गाणे गुणगुणत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत होती. माधुरी म्हणाली की याचा अर्थ,'परलोकात ती आनंदात आहे.' परलोकाबद्दल आपल्याला माहिती नाही. परंतु औंधच्या घरातील भिंतीवरील नूतन वहिनीचा फोटो पाहिला की वाटते की ती अजूनही हसून स्वागत करते आहे. जाईने तिच्यातील वाचन, स्वयंपाक, सामान्य ज्ञान या सर्व गोष्ट उचलल्या आहेत. जावई पारितोष, नातू तक्ष यांना पाहून तिला खूप आनंद झाला असता. ती आम्हा सर्वांना आता भेटू शकत नसेल. परंतु तिची कृपा दृष्टी निश्चितच आहे.

२९/४/२०२५ ला स्मृतिदिनानिमित्त लिहिलेली कविता 

प्रतिक्रिया:
फार पूर्वी गोरेगाव मध्ये आमच्याच बाजूला, पूर्वेला, सेंट थॉमस शाळेच्या पटांगणात महाराष्ट्र मंडळाची नाटके होती. त्यात राजसंन्यास हे सुद्धा नाटक होते आणि त्यात नूतनने काम केले होते. त्यावेळेस तिच्याबरोबर यशवंत दत्त आणि अश्विनी भावे, हे सुद्धा होते. गोरेगावच्या स्टेशन जवळ आम्हाला हे तिघेही भेटले आणि नूतनने आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. 
नाटकाचा प्रयोगही छान झाला. आमची पण वट वाढली होती. थँक्स नूतन.🙏😊

-मोहन तांबडे (नूतनचा मावसभाऊ)

@⁨Niteen Junnarkar⁩ give my best wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
st wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
कीर्ती (नूतनची भाची)









आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी

 आमच्या घरातील सेलिब्रिटी - स्व. नूतन वहिनी 


आम्ही सर्वांनी, म्हणजे -आई, अण्णा, दादा (नितीन), सचिन, (बहीण शामा तेव्हा लग्न होऊन सासरी गेली होती ) नूतनवहिनीस प्रथम पाहिले, दर्शन हॉल, चिंचवड येथे 'नाथ हा माझा' या नाटकाच्या प्रयोगात. या नाटकात नूतन वहिनीने यशवंत दत्त या नटसम्राटाबरोबर सहजतेने काम केले होते. नंतर दादा म्हणाला की आपण नाटकात पाहिलेली मुलगी आमच्या कंपनीत (रॅपिकट कार्बाइडस लिमिटेड ) मध्ये जॉईन झाली आहे. तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की आमच्या परिवाराशी नूतनवहिनीचा ऋणानुबंध जळणार आहे.


नूतनवहिनी नूतन दांडेकरची नूतन जुन्नरकर होऊन आमच्या परिवाराची सदस्य झाली. प्रत्येक परिवारात काही समस्या असतात. पण नूतनवहिनीचा गुण मला आठवतो की परिवारातील समस्यांची तिने कधी बाहेर वाच्यता केली नाही. नूतनवहिनीचे बाबा फारच विनोदी स्वभावाचे होते. सहज बोलता बोलता ते विनोद करीत. वडील वास्तविक मुलीचे कट्टर अभिमानी असतात. पण ते विनोदात मुलीची पोल खोल करीत. एकदा सर्व जण जेवण करीत होते. नूतन वहिनी जेवण करीतच नव्हती. सारे जण तिला आग्रह करीत होते. बाबा म्हणाले, ' काळजी करू नका. तिने बनवतानाच खाऊन घेतले आहे.'

मला एक गोष्ट आठवते. आमचे आजी-आजोबा चिंचवडमध्ये राहत असत. आजोबा खूप आजारी होते. त्यांची दाढी वाढली होती. न्हाव्याकडे नेणे शक्य नव्हते. त्या वेळी नूतनवहिनीने त्यांची दाढी करून दिली. त्यानंतर आजोबांचा देहांत झाला. त्यांचा चेहरा स्वच्छ दिसत होता.




नंतर माझे लग्न झाले. माझ्या पत्नीचे वर्षाचे आणि नूतनवहिनींचे बहिणी-बहिणीसारखे संबंध होते. दर्शन हॉल मध्ये 'कुणीतरी आहे तिथं' नाटकाचा प्रयोग होता. दादा सतत ऑफीसच्या दौऱ्यावर असे. मी, वर्षा आणि नूतनवहिनीने नाटकाला जावयाचे ठरवले. नूतनवहिनीला पाहून कुणीतरी आम्हाला पहिल्या रांगेतील फ्री पास दिले. नूतनवहिनीने सांगितले की सारे मित्र मोहन जोशींना 'मोहन्या' म्हणत असत. तिने आम्हाला मोहन जोशींची ओळख करून दिली. आम्ही समोरासमोर मोहन जोशींशी गप्पा मारल्या. नूतन वहिनीला नाट्यवर्तुळात किती आदर आहे, ते आम्हाला त्या दिवशी कळले.

नंतर मला मुलगा झाला-अद्वैत. अद्वैतची नूतनवहिनी लाडकी काकी होती. तिला तो निरनिराळे पदार्थ बनवण्यास सांगत असे.




पुढे दादा ऑफीसच्या कामामुळे सहकुटुंब अहमदाबादला स्थलांतरित झाला. त्यामुळे आम्हालाही अहमदाबादला जाण्याचा योग्य आला. नूतनवहिनीचे शेजाऱयांशी तसेच प्रेमाचे संबंध होते. तिने गुजराती भाषा शिकून घेतली होती. त्यांचे शेजारी हर्षदाबेन यांच्या सासूबाई काठियावाडहून येत. त्यांच्याशी काठियावाडी गुजरातीमध्ये त्यांच्या घरचे बोलू शकत नसत. पण नूतनवहिनी बोलू शकत असे.

नंतर मी सहकुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झालो. मी ऑफीसच्या कामासाठी सिंगापूरला असताना नूतनवहिनीचा देहांत झाल्याची आश्चर्यजनक आणि दु:ख द बातमी आली (३/७/२००६). बाबांचा गेल्या वर्षीच देहांत झाला होता (२००५). वर्षा ताबडतोब सिडनीहून दादाकडे राहण्यास गेली. दादा, जाई यांनी या प्रसंगास धीराने तोंड दिले. पुढीलच वर्षात आईंचा सुद्धा देहांत झाला (२००७). परलोकात भेटण्याचा त्यांचा संकेत असावा. दांडेकर घरातील आता कुणीच हयात नाही, पण त्यांचे प्रेम शिल्लक आहे.

माझी मावस वहिनी माधुरी एकदा म्हणाली की तिला स्वप्नात नूतन वहिनी तिच्या घरात दिसली होती. ती गाणे गुणगुणत एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत होती. माधुरी म्हणाली की याचा अर्थ,'परलोकात ती आनंदात आहे.' परलोकाबद्दल आपल्याला माहिती नाही. परंतु औंधच्या घरातील भिंतीवरील नूतन वहिनीचा फोटो पाहिला की वाटते की ती अजूनही हसून स्वागत करते आहे. जाईने तिच्यातील वाचन, स्वयंपाक, सामान्य ज्ञान या सर्व गोष्ट उचलल्या आहेत. जावई पारितोष, नातू तक्ष यांना पाहून तिला खूप आनंद झाला असता. ती आम्हा सर्वांना आता भेटू शकत नसेल. परंतु तिची कृपा दृष्टी निश्चितच आहे.

प्रतिक्रिया:
फार पूर्वी गोरेगाव मध्ये आमच्याच बाजूला, पूर्वेला, सेंट थॉमस शाळेच्या पटांगणात महाराष्ट्र मंडळाची नाटके होती. त्यात राजसंन्यास हे सुद्धा नाटक होते आणि त्यात नूतनने काम केले होते. त्यावेळेस तिच्याबरोबर यशवंत दत्त आणि अश्विनी भावे, हे सुद्धा होते. गोरेगावच्या स्टेशन जवळ आम्हाला हे तिघेही भेटले आणि नूतनने आमची त्यांच्याशी ओळख करून दिली. 
नाटकाचा प्रयोगही छान झाला. आमची पण वट वाढली होती. थँक्स नूतन.🙏😊

-मोहन तांबडे (नूतनचा मावसभाऊ)

@⁨Niteen Junnarkar⁩ give my best wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
st wishes to Hemat Junnerkar uncle for his blog writing. 🌺🍫🌹
कीर्ती (नूतनची भाची)









Sunday, May 12, 2024

रात्र काळी घागर काळी - रसग्रहण

रात्र काळी घागर काळी - रसग्रहण


-डॉ. हेमंत जुन्नरकर

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved




रात्र काळी घागर काळी 
यमुनाजळे ही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळा मोती एकावळी काळी वो माय
मी काळी काचोळी काळी
कांस कांसिली ते काळी वो माय
एकली पाण्याला नव जाय साजणी
सवे पाठवा मूर्ति सावळी वो माय
विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
कृष्णमूर्ति बहु  काळी वो माय

'रात्र काळी घागर काळी' हे विष्णुदास नामा यांचे वरील  गीत मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्या वेळी पहाटे रेडिओवर मंगल प्रभात हा कार्यक्रम असे. या कार्यक्रमात हे गीत हमखास लागत असे आणि अंथरुणात पडल्या पडल्या हे गीत मी  ऐकत असे. 

आता हे गीत ऐकताना या गाण्याचे निरनिराळे पदर जाणवतात. या गीताच्या शेवटी विष्णुदास नाम्यांचे नाव येते. हे विष्णुदास नामा कुणी वेगळे आहेत की सर्वांस माहीत असलेले संत नामदेव, याबद्दल चर्चा होते. मला या विषयावर चर्चा करावयाची नाही. कारण माझा हेतू फक्त या गीताचे रसग्रहण आहे. 

हे गाणे एक उच्च दर्जाचे भक्तिगीत असून त्याची  दत्ताराम गाडे यांनी त्यास अतिशय साधी चाल दिली असून गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर यांनी संयुक्तपणे रांगड्या आवाजात गीत गाइले  आहे.

आता  गीताकडे वळू या. या  गीतात वापरलेल्या सर्व प्रतिमा काळ्या रंगातील आहेत, जशा - रात्र, घागर, यमुनाजळ, बुंथी (=आवरण, पडदा, आच्छादन), बिलवर (=एक प्रकारची काचेची बांगडी), गळा मोती एकावळी (=एकपदरी हार), काचोळी (=मागे बंद असलेली चोळी), कांस कासिली (=नेमलेले लुगडे, पातळ).

काळा रंग हा आपल्याला भीतिदायक वाटतो. परंतु साऱ्या विश्वाला व्यापून उरलेल्या अंधाराचा रंग काळाच आहे. विशिष्ट अंतरावर फिरणारे ताऱ्यांचे प्रकाशपुंज सोडले तर विश्वात सर्वत्र     निराकार अंधारच भरून  राहिला आहे‌.

याच अंधाराचा काळा रंग भगवान श्रीकृष्णांनी घेतला आहे. त्याच्या भूतलावरील प्रगटकाळी मध्यरात्र, कारागृह, पूर आलेला यमुनेचा प्रवाह असे सर्वत्र काळ्या रंगाचे साम्राज्य आहे. या  काळ्या रंगाचे चिंतन हे निराकार भगवान श्रीकृष्णांचे चिंतन.

गाण्यातील पुढील कल्पना म्हणजे गोपीचे एकलेपण.यमुनेवरून घागर भरून आणणे हे जीवात्म्यावरील भौतिक जबाबदारीचे प्रतीक. ही गोपी म्हणजे जीवात्मा. आपण सारे या जगात एकटेच येतो आणि  एकटेच जातो. या प्रवासात जमणारे गणगोत केवळ क्षणिक असतात, चिरंतन असतो तो काळा अंधार. पण या काळेपणास भिण्याचे कारण नाही , कारण सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी हाच काळा रंग धारण केला आहे हे नित्य चिंतनात असू द्या, म्हणजे तुमचा प्रवास,  एकाकी होणार नाही, तुमची भौतिक जबाबदारी सुसह्य होईल.

विष्णुदास नामा       गीताच्या अखेरीस सांगतात  की त्यांची स्वामिनी कृष्णमूर्ती 'बहु काळी' आहे. ही कृष्णमूर्ती   भगवान       श्रीकृष्णांचे     सगुणरूप. ही कृष्णमूर्ती  विष्णुदास नामा यांची स्वामिनी आहे, ती आपणा सर्वांची स्वामिनी आहे.

गीतातील अर्थाचे  वरील पदर मला जाणवणारे असे मी म्हणतो कारण विष्णुदास नामा यांना हे अर्थ अभिप्रेत आहेत , असे  नाही. उच्च आंतरिक पातळीवर   स्फुरलेल्या गीतांतून असेच बहुविध अर्थ जाणवतात. तेच त्या गीतांचे मोठेपण आहे.

 (टीप : या पोस्टमधील माहिती www.athavanitali-gani.com या संकेतस्थळावरून घेतली आहे)







रफीसाहेब, एक दंतकथा

रफीसाहेब, एक दंतकथा:

रफीसाहेब आणि सोनिक ओमी:

रफीसाहेब  आणि सोनिक ओमी  हे  काका पुतण्या असणारे संगीतकार, अविभक्त भारतातील  पंजाबचे. सोनिक ओमींकडे गाणी गाताना रफीसाहेब म्हणत , ' ऐसा लगता है मैं अपने घर आया हूं.' रफीसाहेबांनी सोनिक  ओमींच्या ' दिल ने फिर याद किया' (१९६६) या पहिल्या चित्रपटातील गीते गाण्यासाठी  केवळ एक रुपया मानधन घेतले.     

जेव्हा रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धवट सोडले

रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धे सोडले असे कधी घडले नाही. परंतु याला एक गाणे अपवाद आहे.
 'माया' चित्रपटातील 'तसवीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी है' या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. गाण्याचे रेकॉर्डिंग तर चांगले होत होते. परंतु संगीतकार सलिल चौधरी पुन्हा पुन्हा रिटेक्स घेत होते. तेव्हा रफीसाहेबांनी न राहवून त्याबद्दल विचारले. तेव्हा सलिलजींनी सांगितले की लताबाईंना हवा तसा परिणाम येत नाही. त्यामुळे त्या रिटेक्स घ्यायला सांगत आहेत. रफीसाहेबांना ते आवडलं नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग अर्धवट सोडून ते निघून गेले.

रफीसाहेबांमुळे 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला

सूरज चित्रपटासाठी नायकाची निवड करायची होती. संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडे 'बहारों फूल बरसाओ' या गाण्याची चाल होती. ताराचंद बडजात्यांनी रफी साहेबांना ही चाल तुम्ही निरनिराळ्या नटांसाठी कशी म्हणाल असे विचारले. रफीसाहेबांनी जेव्हा ही चाल राजेंद्रकुमारसाठी गाऊन दाखवली, ती ताराचंद बडजात्यांना पसंत पडली आणि 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला.

दिल की आवाज़:
१९६० च्या दशकामध्ये जॉय मुखर्जी हा नट रुपेरी पडद्यावर झळकला.  अशोककुमार, किशोरकुमार आणि अनुप कुमार ही भावंडे जॉय मुखर्जीचे काका लागत. जॉय मुखर्जी अभिनयामध्ये सुमार होता. परंतु ६ फूट २ इंच उंची आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व या त्याच्या जमेच्या बाजू. यांच्या जोरावर त्याने मोठमोठे नट रुपेरी पडदा गाजवत असताना आपले अस्तित्व टिकवून ठेवले. प्रसिद्ध सिनेतारकांनी त्याच्याबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या.

लव्ह इन सिमला (१९६०) या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक मुसाफिर एक हसीना (१९६२), फिर वही दिल लाया हूं (१९६३), ज़िद्दी (१९६४), लव्ह इन टोकियो (१९६६) हे जॉय मुखर्जीचे गाजलेले चित्रपट.

जॉय मुखर्जीच्या यशामध्ये  चित्रपटांचे  सुमधुर संगीत आणि रफी साहेबांचा आवाज यांचा मोठा वाटा होता. 'फिर वोही दिल लाया हूं', 'लाखों हैं निगाह में', 'तुम हे ओ हसीना', ही रफी साहेबांनी जॉय मुखर्जी साठी गायिलेली गाणी गाजली. रफींच्या आवाजानेच जॉय मुखर्जीची रोमँटिक प्रतिमा अधिक लोकप्रिय झाली.

जॉय मुखर्जीला चित्रपट मिळेनासे झाल्यावर तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरला. १९६८ मध्ये त्याने 'हमसाया' या स्वतःची दुहेरी भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली - एका भूमिकेत  भारतीय वायुदलातील अधिकारी तर दुसऱ्या भूमिकेत  चिनी गुप्तहेर.  चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याचेच होते.  संगीत ओ. पी. नैयर यांचे होते. 

जॉय मुखर्जीचे डोळे फुगीर होते आणि काही समीक्षक याबद्दल त्याची टवाळकीही करीत. पण या चित्रपटात याचा त्याने चांगला वापर करून घेतला आणि चिनी गुप्तहेराची भूमिका त्याला चांगली शोभून दिसली. माला सिन्हाचे लांबट डोळे आणि निमुळता चेहरा यांमुळे चिनी गुप्तहेराची चिनी नायिका म्हणून भूमिका तिने सफाईदारपणे केली.

सारख्या चेहऱ्यामुळे  दोन्ही नायिकांचे  नाटकाबद्दल  गैरसमज होत राहतात. भारतीय गुप्तहेराची नायिका लीना (शर्मिला टागोर) नायकावर रुष्ट होते तेव्हा तिचा रोष दूर होण्यासाठी नायक रफीसाहेबांच्या आवाजात 'दिल की आवाज़ भी सुन' हे गीत गाऊन आळवणी करतो. रफीसाहेबांच्या भावपूर्ण गायकीमुळे जॉय मुखर्जी यांच्या अभिनयातील वेदना आणि प्रामाणिकता अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

या गीताच्या रेकॉर्डिंगच्या वेळी जॉय मुखर्जीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि रफीसाहेबांना त्याने तसे सांगताच रफीसाहेबांनी या गाण्यासाठी मोबदला घेतला नाही.






साईसच्चरितातील साईबाबांच्या कथा


साईसच्चरितातील  साईबाबांच्या कथा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------




अध्याय १

मंगलाचरण 

भक्तीचे निरनिराळे प्रकार सांगून श्री. दाभोळकर सर्वांत शेवटी गुरुकथाश्रवण हा प्रकार सांगतात. म्हणजे पर्यायाने श्रीसाईसच्चरित या आपल्या विषयाकडे येतात.

जात्यावर गहू दळून बाबा महामारीचा बंदोबस्त करतात

अध्याय २  

कथाप्रयोजन

*      श्रीसाईसच्चरितापूर्वीची बाबांची चरित्रे

*      श्रीसाईसच्चरित लिहिण्याची श्री. दाभोळकरांची कल्पना व तिला बाबांची अनुमती

*    दाभोळकरांचे नाव हेमाडपंत कसे पडले त्याची कथा  

श्री. दाभोळकरांची पूर्वी सद्गुरूवर श्रद्धा नव्हती. परंतु काकासाहेब दीक्षित आणि नानासाहेब चांदोरकर यांच्यामुळे त्यांना शिरडीला जाण्याचा योग आला. 

भाऊसाहेब ऊर्फ काकासाहेब दीक्षितांनी श्री. दाभोळकरांना शिरडीस चलण्याचा आग्रह केल्यामुळे श्री. दाभोळकर अखेर तयार झाले. 

परंतु श्री. दाभोळकरांच्या जाण्याच्या दिवशीच एक घटना घडली. श्री. दाभोळकरांच्या एका मित्राचा मुलगा आजारी पडला. मित्राने त्याच्या गुरूंना जवळ आणून बसवले. परंतु मुलाचा अखेर देहांत झाला. हे कळल्यावर श्री. दाभोळकरांच्या मनात विचार आला की जे व्हायचे ते होणारच. मग कशाला हवा आहे गुरू? म्हणून त्यांचा जाण्याचा विचार बदलला.

त्या वेळी  नानासाहेब चांदोरकर, जे प्रांताधिकारी होते, त्यांना वसईला जावयाचे होते. त्यांना एक गाडी मिळाली जी केवळ वांद्र्यापर्यंत होती. त्यामुळे त्यांनी श्री. दाभोळकरांना निरोप पाठवला (श्री. दाभोळकर वांद्र्याला राहत होते) आणि शिर्डीला कधी जाता म्हणून विचारले. त्यामुळे श्री. दाभोळकर नरमले आणि सामान बांधून शिर्डीला जाण्यासाठी तयारी करून वांद्र्याला आले.

शिर्डीला जाण्यासाठी त्यांनी दादरहून मनमाड मेल पकडण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे गाडीत बसले. परंतु त्याच वेळी एका यवनाने गाडीत डोकावून सामान पाहून 'कोठे चाललात?' असे विचारले. श्री. दाभोळकरांनी माहिती देताच त्याने सांगितले की,' मनमाड मेल दादरला थांबत नाही, तरी तुम्ही परस्पर बोरीबंदर स्टेशनला जा.' श्री. दाभोळकरांच्या मनात आले की ही माहिती वेळेवर मिळाली नसती तर केवढा अनर्थ झाला असता. कारण शिर्डीला भाऊसाहेब दीक्षित श्री. दाभोळकरांची वाटच पाहत होते. 



अध्याय ३  

ग्रंथप्रयोजनानुज्ञापन   

*       बाबांचे चरित्र लिहिण्याविषयी श्री. दाभोळकरांचे अधिक चिंतन. 

दाभोळकरांस निवृत्तीपश्चात नोकरी लागते आणि जाते

श्री. दाभोळकरांची कथा१९१६ साली श्री. दाभोळकर नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर अण्णा चिंचणीकर बाबांना सांगतात की 'यांचे पेन्शन मध्ये भागणार नाही. तेव्हा यांना दुसरी नोकरी लागू द्या.' यावर बाबा सांगतात,' नोकरी लागेल, परंतु आता याने गुरुसेवेसाठी आयुष्य वाहिले पाहिजे.’ श्री. दाभोळकर सांगतात,' नोकरी आली तशी गेली. बाबांनी नोकरीचे गुळाचे बोट दाखवले, परंतु गुरुसेवेचे औषध गळी उतरविले.'

*      रोहिल्याची कथा

*      समारोप

या अध्यायाचे नाव आहे ग्रंथप्रयोजनानुज्ञापन, म्हणजे ग्रंथ लिहिण्याची आज्ञा. श्री. दाभोळकरांनी ग्रंथप्रयोजन मागील अध्यायात सांगितले व बाबांनी त्याच अध्यायात त्यास अनुमतीही दिली. त्यामुळे या अध्यायात तोच विषय पुढे नेला आहे.

बाबांचे चरित्र लिहिण्याचा श्री. दाभोळकरांचा विचार पक्का झाला आहे. बाबांची अनुमतीही मिळाली आहे. परंतु अजून मनाचा निश्चय  होत नाही. कारण त्यांना आपल्या क्षमतेविषयी शंका आहे. लोक ज्याप्रकारे अधर्माचरण करीत आहेत ते पाहून बाबांच्या चरित्राची आवश्यकता त्यांना वाटत आहे.

दाभोळकरांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन पुरत नसल्याने त्यांना नोकरी लावण्याची विनंती अण्णांनी बाबांना केल्याची आठवण श्री. दाभोळकर सांगतात. बाबांनीसुद्धा ‘ नोकरी मिळेल. परंतु याने आता माझ्या सेवेसाठी अधिक वेळ दिला पाहिजे,’ असे सांगितले. नोकरी मिळाली तशी गेली, परंतु गुरुसेवेची प्रेरणा राहिली, असे दाभोळकर सांगून नोकरी देण्याचे गुळाचे बोट दाखवून बाबांनी गुरुसेवेचे कडू औषध आपल्या गळी उतरवले असे दाभोळकर सांगतात.

अध्यायात बाबांचे मधुर तत्त्वज्ञान आणि वचने आहेत. त्याचप्रमाणे रोहिल्याची गोष्ट सांगून बाबा भक्तीमध्ये धर्माची विभिन्नता मानत नसत, असे दाखवून दिले आहे.

अध्याय ४  

साईसमर्थावतरण    

*      संत कधी अवतार घेतात 

*      शिरडी क्षेत्राचा महिमा  

*      बाबांच्या वास्तव्याने शिरडीमध्ये विठ्ठलभक्तांना विठ्ठलाची तसेच दासगणूंना प्रयागक्षेत्राची अनुभूती     

बाबा म्हणजे विठ्ठलाचे रूप

बाबांच्या वास्तव्याने शिरडीमध्ये विठ्ठलभक्तांना विठ्ठलाची तसेच दासगणूंना प्रयागक्षेत्राची अनुभूती (44-109)       

१.       विठ्ठलभक्त गौळीबुवा बाबांमध्ये विठ्ठल असल्याचे सांगतात.

२.       नामसप्ताहामध्ये दासगणू बाबांना सांगतात, ‘विठ्ठल प्रगटला पाहिजे.’ बाबा उत्तर देतात,’ हो हो प्रगटेल विठ्ठलमूर्ती,भक्त भावार्थी पाहिजे.’ नामसप्ताहानंतर दासगणूंना विठ्ठलदर्शनाची अनुभूती येते.  

३.       काकासाहेब दीक्षित सकाळी ध्यानस्थ असताना त्यांना ध्यानामध्ये विठ्ठलाची मूर्ती दिसते. नंतर बाबांना भेटल्यावर बाबा विचारतात,’ विठ्ठलपाटील आला होता ना, भेट झाली ना तयाची? मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेख मारुनि करी त्या अढळ, दृष्टि चुकवूनि काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष.’ दुपारी एक बाहेरगावचा विक्रेता काही विठ्ठलमूर्ती विक्रीस घेऊन येतो. त्यांमध्ये एक मूर्ती ध्यानात दिसलेल्या मूर्तीसारखी असते. काकासाहेब दीक्षित ती विकत घेतात.

४.       भगवंतराव क्षीरसागरांचे  विठ्ठलभक्त वडील पंचत्वात पावल्यानंतर वडील करीत असलेली विठ्ठलपूजा थांबते. विठ्ठलराव शिर्डीस आल्यावर बाबा त्यांच्या वडिलांची आठवण काढून सांगतात,’ तो होता दोस्त माझा. हा त्या स्नेह्याचा सुत, म्हणूनि यासी मी आणिला खेचीत, नाही कधी हा नैवेद्य करीत, उपाशी ठेवीत मजलाही. विठ्ठलासही ठेवी उपाशी, म्हणूनि शिरडीसी आणिले यासी, आता देईन आठवणीसी, लावीन पूजेसी याजला.’   

एकदा पर्वविशेषी दासगणूंना प्रयागतीर्थी स्नान करण्याची इच्छा होते. बाबा त्यांना सांगतात,’ नलगे तदर्थ जाणे दूर, हेची आपुले प्रयागतीर, विश्वास धर दृढ मनी.’ दासगणू बाबांच्या चरणी मस्तक ठेवताच बाबांच्या पायांच्या दोन्ही अंगठ्यांतून गंगा-यमुना वाहू लागतात. दासगणू उत्स्फूर्तपणे त्यांच्या ‘अगाध शक्ति अघटित लीला तव सद्गुरुराया’ या पदाची रचना करतात.      

*      दीक्षितांच्या वाड्यांची कथा, बुट्टींच्या वाड्याची कथा आणि समारोप 

लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर बाबा शिरडीत कायमचे वास्तव्यास आले. परंतु त्याआधीसुद्धा ते शिरडीमध्ये वास्तव्यास होते. यामध्ये त्यांच्या  बालवयातील  शिरडीमधील वास्तव्याची कथा आहे. तसेच गुरुस्थानाची कथा आहे. परंतु गुरुस्थानास बाबांनी आपल्या गुरुचे ठिकाण म्हणून सांगणे दाभोळकरांना बाबांची ‘गंमत’ का वाटते ते कळत नाही.  

गुरुस्थानावरील वास्तूवरील बांधकामावरून विषय निघाला म्हणून दीक्षितांचा वाडा आणि बुट्टींचा वाडा कसा झाला कसा झाला ते येथे सांगितले आहे. वास्तविक अध्यायाच्या विषयाशी याचा काही संबंध नाही. दीक्षितांचा प्रथम उल्लेख आला आहे आणि ते बाबांकडे कसे आले ते सांगितले आहे. परंतु साठेंच्या वाड्याच्या ठिकाणी आधी असणाऱ्या ठिकाणी बाबांनी कशी बाग फुलवली ते सांगितले आहे. अशा प्रकारे अध्यायाचा समारोप विषयास अनुरूप होतो.



अध्याय ५  

साई-पुन:प्रकटीभवन

*      साईबाबा पुन्हा शिरडीस कसे आले  

धूपगावचे रहिवासी चांदपाटील याची हरवलेली घोडी बाबांनी शोधून दिली.त्यामुळे चांदपाटील बाबांना आपल्या घरी घेऊन गेला. पुढे चांदपाटील याच्या पत्नीच्या भाच्याची सोयरीक शिरडीमधील मुलीशी जुळली. त्यामुळे चांदपाटील वऱ्हाड घेऊन शिरडीस आला. या वऱ्हाडाबरोबर बाबा शिरडीस आले. वऱ्हाड परत गेले. परंतु बाबा कायमचे शिरडीत राहिले. साईबाबांच्या या पुनरागमनाच्या वेळीसुद्धा बाबा बालवयातच असावे. कारण पुढे श्री. दाभोळकर म्हणतात, ‘हे बाल फकीर गाडीतूनि उतरले.’    

*      साईबाबांचे नाव ‘साईबाबा’ कसे पडले   

खंडोबाच्या देवळापाशी म्हाळसापतीने साईबाबांना ‘या साई’ असे संबोधले. तेव्हापासून साईबाबांचे नाव ‘साईबाबा’ पडले.    

*      शिरडीतील संतांकडून बालवयातील बाबांची प्रशंसा, बाबांनी स्वहस्ते फुलविलेली बाग

गंगागीरबुवांचे साईबाबांबद्दल उद्गार:-धन्य शिरडीचे भाग्य वरिष्ठ I जोडले श्रेष्ठ हे रत्न I हा आज खांदां पाणी वाही I परी ही मूर्ती सामान्य नाही I होते या भूमीचे पुण्य काही I तरीच ये ठायी पातली I   

संत आनंदनाथांचे साईबाबांबद्दल उद्गार :-हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा I आज जरी हा उकिरड्यावर I तरी हा हिरा नाही गार I

बाबांचे भक्त वामनतात्या बाबांना मातीचे घडे आणून देत. त्या घड्यांनी पाणी घालून बाबांनी उघड्या जागेवर बाग फुलवली. नंतर तेथे वाडा झाला. 

*      भाई नावाच्या स्वामी समर्थांच्या भक्तांस स्वामी समर्थांचा ‘मी शिरडीत आहे’ असा दृष्टांत   

या दृष्टांतानंतर भाईनी स्वामी समर्थांच्या पादुकांची शिरडीतच निंबातळी स्थापना केली.  

*      डोक्यास फडके आणि अंगात कफनी असा पोशाख साईबाबा का करू लागले    

मोहिद्दीन तांबोळीकडून कुस्तीत हरल्यानंतर बाबांना विरक्ती आली आणि डोक्यास फडके आणि अंगात कफनी असा साधा पोशाख ते करू लागले.

साईबाबांचे प्रसिद्द्ध वचन :- गरीबी अव्वल बादशाही I अमीरीसे लाख सवाई I  गरीबोंका अल्ला भाई I 

*      साईबाबांचा शिरडीतील दिनक्रम     


*      पणत्यांत पाणी घालून साईबाबांचा दीपोत्सव      

*      साईबाबा जव्हारअल्लीचे शिष्यत्व पत्करतात       

*      देवीदासाकडून जव्हारअल्लीचा भ्रमनिरास आणि अध्यायाचा समारोप

अध्याय ६   

रामजन्मोत्सावादि  कथन 

*      अध्यायारंभ    

परमेश्वराची माया त्रिगुणात्मक आहे. कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे परमेश्वरापर्यंत पोहचण्याचे मार्ग आहेत. त्यांतील भक्ती सर्वांत सोपा असला तरी ‘भक्तीसुद्धा बाभूळवनीची वाट’ आहे. तेथे ‘काटा टाळून पाय टाकणे’ आवश्यक आहे. बाबांच्या कथा श्रवण करून भक्ती दृढ होण्यास मदत होईल.  

*      शिरडीमध्ये रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात     

या अध्यायात शिरडीत रामनवमीचा उत्सव कसा सुरू झाला ते सांगितले आहे. पण एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत.

पहिली गोष्ट अशी आहे, गोपाळ गुंड या बाबांच्या भक्तांस शिरडीतील उरुसाची जत्रा पाहून शिरडीत रामनवमी उत्सव सुरू करावा असे वाटले. यास बाबांची अनुमतीही मिळाली. परंतु या उत्सवास सरकारी परवानगी आवश्यक होती. शिरडीतील कुलकर्णी यांनी यामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबांच्या कृपेने अखेर सरकारी परवानगी मिळाली आणि शिरडीत रामनवमी उत्सव सुरू झाला.   

दुसरी गोष्ट अशी सांगितली आहे की, बाबांचे भक्त भीष्म यांस शिरडीतील उरूस पाहून शिरडीत रामनवमी उत्सव सुरू करावा असे वाटले. त्याप्रमाणे बाबांच्या अनुमतीने उत्सव सुरू झाला. परंतु उत्सवाच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल गेला आणि बाबा अतिशय संतप्त झाले. बाबांच्या या संतापाचे दाभोळकरांनी असे स्पष्टीकरण दिले आहे,’ गुलालाचे केवळ मिष I रामजन्माचा तो आवेश I होईल अहं-रावणाचा नाश I दुर्वृत्ति-राक्षस मरतील.’ परंतु बाबांचा संताप लवकरच शांत झाला आणि उत्सव व्यवस्थित पार पडला.   

*      मशिदीचा जीर्णोद्धार आणि अध्यायाचा समारोप  

बाबाबांच्या मशिदीची फार वाईट अवस्था होती. त्यामुळे सर्वानी मनावर घेऊन तिचा जीर्णोद्धार केला. परंतु बाबांनी तोसुद्धा धडपणे करू दिला नाही. सर्व मेहनत करून मशिदीचे खांब बसवीत. परंतु बाबा ते उपटून टाकत. एकदा तर त्यांनी तात्याची मानगूट धरून त्यांचा फेटा जाळून टाकला. परंतु लगेचच त्यांचा राग शांत झाला आणि त्यांनी तात्यांसाठी नवा फेटा आणवला. अखेर मशिदीचा जीर्णोद्धार पूर्ण झाला.     

चिंतन:

साईसच्चरितामध्ये अध्यायाचा आरंभ, अध्यायातील कथा आणि अध्यायाचा समारोप यांमध्ये एक सूत्र दिसते. अध्यायाच्या आरंभी श्री. दाभोळकर एखादे आध्यात्मिक तत्त्व सांगतात. नंतर बाबांच्या कथा सांगतात. समारोप करताना या कथांतून बाबांनी आचरणातून हे आध्यात्मिक तत्त्व कसे विषद केले ते सांगतात. अध्याय ६ मध्ये दाभोळकरांनी असे काहीच केलेले दिसत नाही. माझ्या चिंतनाप्रमाणे मला काय वाटते ते मी सांगतो. अध्यायाच्या आरंभी, ईश्वराला साध्य करण्यासाठी भक्ती हा सर्वांत सोपा मार्ग असला तरी ‘भक्ती बाभूळवनीची वाट’ असून ‘काटा टाळून पाय टाकला पाहिजे’ असे श्री. दाभोळकर सांगतात. परंतु हे काटे कुठले ते श्री. दाभोळकर सांगत नाहीत. माझ्या मते ‘अहंकार’ हा भक्तीमध्ये प्रगती होण्यामध्ये  एक मोठा काटा आहे. ‘मी ईश्वरासाठी काही करतो,’ हा सुद्धा एक अहंकारच आहे. हा उल्लेख अध्यायात कुठे नाही. परंतु रामनवमी उत्सवात बाबांच्या डोळ्यात गुलाल गेला आणि बाबा चिडले तेव्हा श्री. दाभोळकरांनी याचे स्पष्टीकरण देताना ‘अहं रावणाचा नाश’ असे म्हटले आहे. मशिदीच्या जीर्णोद्धाराच्या वेळी श्री. दाभोळकरांनी असे काही म्हटले नाही. कदाचित असे असेल, की रामनवमी उत्सव सुरू करताना किंवा मशिदीचा जीर्णोद्धार करताना या भक्तांच्या मनात आपल्यामुळे हे सारे होत आहे असा अहंकार असेल. हा अहंकारसुद्धा भक्तिमार्गावरील काटाच आहे हे ओळखून भक्तांचा अहंकार दूर करण्यासाठी बाबांनी रुद्रावतार धारण आणि अखेर आपल्या भक्तांचे हितच साधले. 


अध्याय ७    

विविधकथानिरूपण  

*       अध्यायारंभ आणि बाबांचे परोपकारी जीवन    

१.      या अध्यायातील स्पष्ट उल्लेख :- i) बाबांचे कान टोचलेले होते ii) मुसलमान फकीरांसोबत बाबा मांसाहार करीत.

२.      दक्षिणा म्हणून मिळालेला पैसा बाबा दान करीत.


३.      बाबा वैद्यकी करीत तेव्हा एका भक्ताचे डोळे सुजले असताना बाबांनी  त्याच्या डोळ्यांत बिब्बे भरले. परंतु डोळ्यांना काही अपाय होता डोळे बरे झाले.

४.      बाबांना धोती-पोती योग अवगत होता. त्यायोगे ते एकांत स्थळी जाऊन आपली आतडी बाहेर काढून धुऊन काढत.

५.      बाबांना खंडयोग  अवगत होता. त्यायोगे ते शरीराचे अवयव वेगळे करून ठेवीत. एकदा ते पाहून एक इसम बाबांचे काही बरे -वाईट झाले असे समजून बातमी सांगण्यास गेला. परंतु सर्व लोक आले असताना बाबा पहिल्यासारखे दिसले.  

दक्षिणा म्हणून मिळालेला पैसा बाबा दान करीत.


*       लोहाराच्या पोरीस वाचवण्यासाठी बाबा धुनीत हात घालतात आणि भागोजी शिंद्याने बाबांची केलेली सेवा   

*       दादासाहेब खापर्ड्यांच्या मुलाच्या ग्रंथिज्वराचे साकडे स्वीकारल्याने बाबांच्या कमरेस गाठी येतात

*       नानासाहेब चांदोरकरांच्या पंढरपूरला झालेल्या बदलीचे बाबांना ज्ञान आणि अध्यायाचा समारोप

अध्याय ८    

साईसमर्थावतरणम्   



*      अध्यायारंभ     

*      साईबाबांचे  भिक्षाचरण आणि बायजाबाईनी केलेली बाबांची सेवा

*      बाबा, तात्या आणि  म्हाळसापती यांचे मशिदीत झोपणे, खुशालछंदांशी स्नेहबंध आणि अध्यायाचा समारोप

बाबांच्या सांगण्याविरुद्ध जे शिरडी सोडून गेले त्यांना मनस्ताप भोगावा लागला



अध्याय ९    

आज्ञावज्ञाविघ्नं, पंचसूनादि पातकक्षालनं, तथा भक्त तर्खडकथानिरूपणम्    

*      प्रवासाविषयी बाबांचे निर्देश आणि अवज्ञेचा परिणाम 

साईबाबांना जे सांगून गेले त्यांचा प्रवास चांगला झाला आणि साईबाबा थांबण्यास सांगत असता जे गेले , त्यांना प्रवासात त्रास झाला.

१.     तात्या कोते पाटील बाबांच्या दर्शनास आले असता बाबांनी त्यांना थांबण्यास सांगितले . बाबांचे न ऐकता ते आठवड्याच्या बाजारासाठी  गेले आणि घोड्यास चाबूक जोरात बसून घोडा उधळला आणि टांगा उलटला.  

२.     मुंबईचे एक गृहस्थ शिरडीला आले असता बाबा थांबण्यास सांगत असता निघाले. त्यांच्या टांग्यास वाटेत बायसिकल आल्यामुळे अपघात झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले.  

*      बाबांची भैक्ष्यवृत्ती- पंचसूना पातके आणि पंचमहायज्ञ

१.     कंडणी:- उखळीमध्ये धान्य कांडणे;   

२.     चुल्ली:- चुलीस लाकडे सर्पण म्हणून लावणे;

३.     पेषणी:- जात्यात धान्य दळून त्याचे पीठ करणे;

४.     उदकुंभी:-विहीर, नदी, तलावातून पाणी आणणे किंवा धुणी धुणे;

५.     मार्जनी:- शीतोष्ण पाण्याने स्नान करणे किंवा सडासंमार्जन करणे.

पंचसूना पातके नष्ट होण्यासाठी शास्त्रात पंचमहायज्ञ सांगितला आहे.

१.     पितृयज्ञ :- स्वधाकाराने पितरांस भोग देणे;

२.     देवयज्ञ:- स्वाहाकाराने देवांस भोग देणे;

३.     भूतयज्ञ :- भूतांना अन्न देणे;

४.     मनुष्ययज्ञ :- अतिथींना भोजन देणे;

५.     ब्रह्मयज्ञ :- वेदाध्ययन.

देवतांना आहुती देताना स्वाहा असे म्हणतात, मुख्य पुरोहित "ओम इंद्राय स्वाहा" असे म्हणतो, म्हणजे इंद्र ह्या आहुतीचा स्वीकार करो . इतर पुरोहित फक्त स्वाहा म्हणतात म्हणजे इंद्राने आहुती स्वीकारली. स्वधा म्हणजे पितरांना देणं. स्वाहा आणि स्वधा ह्या अग्नीच्या दोन बायका आहेतअग्नी त्यांच्या हस्ते आहुती स्वीकारतो. येथे भूत म्हणजे पिशाच्च नसून, डोळ्यांना दिसणारे सूक्ष्म जीव आणि कीटक आहेत. देवांना द्यायची आहुती होमातील अग्नीत देतात, म्हणजे ज्यातून ज्वाला निघत असलेला अग्नी, पितरांची आहुती निखाऱ्यावर देतात किंवा फक्त पाणी सोडून स्वधा असे म्हणतात

*      मुलाला कबूल करुनही बाबासाहेब तर्खड बाबांना नैवेद्य दाखवावयास विसरतात

*      बाबासाहेब तर्खडांची पत्नी बाबांसाठी आणलेला नैवेद्य डुकरास आणि कुत्र्यास खाऊ घालते

*      वांग्याचे भरीत आणि काच-यांची गोष्ट

*      बाबांसाठी पेढा पाठविला असता बाबा आठवण करून देतात

चिंतन

बाबांच्या भिक्षाचरणाविषयी माहिती अध्याय मध्येसुद्धा आहे. परंतु या अध्यायातील बाबांच्या भैक्ष्यवृत्तीचा  विषय आणखी व्यापक आहे. भिक्षा कुणीही मागू शकत नाही. भिक्षा मागण्यासाठीसुद्धा पात्रता असावी लागते. ही पात्रता बाबांजवळ कशी होती, ते येथे सांगितले आहे. शिवाय यामध्ये अन्नाविषयी पंचसूना पातके आणि या पातकांचे निवारण करण्याचा उपाय म्हणजे पंचमहायज्ञ (जो बाबा शिरडीमध्ये करीत) यांविषयी माहिती दिली आहे. परंतु या अध्यायात अन्नाविषयी आणखीही काही निर्देश आहेत ते असे:-

१.     अन्नाचा आदर करणे. म्हणजे कुणी भोजनाविषयी विचारले असता नाही म्हणणे.    'जेवून जा' असा बाबांचा आदेश मानता जे गाडी पकडण्याच्या घाईने निघून गेले, त्यांचे प्रवासात कसे हाल झाले ते या अध्यायात दिले आहे.  

२.     नैवेद्याविषयी नियम केल्यास त्याचे कटाक्षाने पालन करणे. येथे बाबासाहेब तर्खडांच्या मुलासमोर प्रत्यक्ष बाबा आहेत  तरी ते बाबासाहेब तर्खडांनी बाबांच्या प्रतिमेस नैवेद्य दाखविल्याने 'मी उपाशी राहिलो' अशी तक्रार करतात. येथे मला अशी शंका येते की, बाबांनी कुठलेही कर्मकांड करण्यास सांगितले असताना बाबा येथे कर्मकांडावर भर देत नाहीत का ? यावर माझे उत्तर असे आहे की, येथे प्रत्यक्ष बाबा किंवा प्रतिमा यांस महत्त्व नसून त्या संकल्पास महत्त्व आहे. यात कर्मकांड असू नये हे पुढे डुक्कर आणि कुत्र्यास अन्न खाऊ घालण्याच्या कथेवरून दिसून येतेच

३.     भूतयज्ञामध्ये प्राण्यास खाऊ घालणे असा अर्थ अभिप्रेत आहे. परंतु येथे अर्थ त्याहीपलीकडे असून  प्रत्यक्ष ईश्वराला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्यापेक्षाही भुकेल्या प्राण्यास अन्न  खाऊ घालणे महत्त्वाचे आहे असे दाखवून दिले आहे. जसे बाबांसाठी नेत असलेला प्रसाद वाटेत भुकेल्या डुकरास खाऊ घातला असता तो 'मला पावला' असे बाबा सांगतात. पुन्हा आपल्या शास्त्रात पितृ-ऋण फेडण्यास कावळा तर गाईस गोग्रास, म्हणजे कावळा आणि गाय या दोन प्राण्यांचा विचार केला आहे. परंतु येथे डुक्कर आणि कुत्रा या प्राण्यांच्या उदाहरणावरून विशिष्ट प्राणी महत्त्वाचा नाही, असे दाखवून दिले आहे. कुत्रा हा तर वेदांत निषिद्ध मानला आहे.    

४.     प्रसाद किंवा अन्न नेऊन देण्याची कुणाची जबाबदारी घेतल्यास तिचे कटाक्षाने पालन करणे.

अध्याय १०    

साईसमर्थमहिमानं

१.     बाबा चिंध्यांनी छतास टांगलेल्या एका वीतभर रुंदीच्या फळीवर झोपत. त्यांना त्या फळीवर चढताना किंवा उतरताना कुणी पाहिले नाही. या चिंध्या फळीचा किंवा बाबांचा भार पेलण्याइतक्या मजबूत नव्हत्या.   

२.     श्री. दाभोळकरांनी बाबांचे जन्मसाल निश्चित केले आहे ते असे- बाबांच्या निर्वाणाच्या वेळी (शके १८४०-इस १९१६) बाबांचे वय ८० वर्षे होते. म्हणजे बाबांचे स्थूल मानाने जन्म साल इस १८३६.    

३.     गुरुचे 'नियत' आणि 'अनियत' असे दोन प्रकार आहेत. यांपैकी अनियत गुरूची भूमिका जास्त व्यापक आहे. बाबा हे अनियत गुरूच्या प्रकारामध्ये मोडतात.


अध्याय ११    

साईसमर्थमहिमावर्णनं 

अध्यायारंभ (1-48) गुरु देहधारी असावा का, याविषयी श्री. दाभोळकरांचे मत

*      तात्यासाहेब नूलकरांचे  स्नेही डॉ. पंडित निरागसपणे बाबांच्या कपाळास गंध लावतात (49-76)

बाबा कुणालाही कपाळाला गंध लावू देत नसत. परंतु तात्यासाहेब नूलकरांचे  स्नेही डॉ. पंडित यांनी एकदा निरागसपणे बाबांच्या कपाळास गंध लावले. यामुळे चकित होऊन दादांनी बाबांना याबाबतीत विचारले असता बाबांनी उत्तर दिले,

दादा तयाचा गुरु बामण I मी जातीचा मुसलमान I तरी मी तोचि ऐसे मानून I केले गुरुपूजन तयाने II आपण मोठे पवित्र ब्राह्मण I  हा जातीचा अपवित्र यवन I कैसे करू याचे पूजन I ऐसे न तन्मन शंकले II ऐसे मज त्याने फसविले I  तेथे माझे उपाय हरले I  नको म्हणणे जागीच राहिले I  आधीन केले मज तेणे

*      मक्का-मदिनेची यात्रा  करून आलेल्या  सिदीक फाळके याची कथा

सिदीक फाळके नावाचा वृद्ध गृहस्थ मक्का-मदिनेची यात्रा करून बाबांच्या दर्शनासाठी प्रयत्न करीत होता. परंतु त्यास मक्का-मदिना यात्रा केल्याचा अहंकार होता. त्यामुळे बाबा त्यास भेट देत नव्हते. बाबांनी त्यास निरनिराळे कूटप्रश्न विचारून त्याची परीक्षा घेतली आणि मग त्यास भेट दिली. नंतर बाबांचे आणि त्याचे स्नेहसंबंध प्रस्थापित झाले.

चिंतन:- सिदीक फाळके याची कथा डॉ. पंडितांच्या कथेच्या विरुद्ध आहे. डॉ. पंडितांच्या भक्तीतील निरागसपणा पाहून बाबांनी कपाळास गंध लावून घेण्याचा नियम मोडला. सिदीक फाळके यास मक्का-मदिना यात्रा केल्याचा अहंकार असल्याने बाबा त्यास भेट देण्यास तयार नव्हते.

यावरून पुढील निष्कर्ष निघतात. . भक्तीमध्ये अहंकार उपयोगाचा नाही. . बाबा परब्रह्मस्वरूप असल्याने हिंदू-मुस्लीम या धर्मांच्या पलीकडे होते.  

*      बाबांच्या आज्ञेवरून वादळी  पाऊस थांबला

शिरडीमध्ये एकदा जोरदार वादळी पाऊस झाला. सर्वजण घाबरून आश्रयासाठी बाबांकडे आले. बाबांनी आज्ञा करताच पाऊस थांबला.

चिंतन: येथे आपल्याला श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून भक्तांचे पावसापासून रक्षण केले ही कथा आठवते. जीझसच्या आज्ञेनेसुद्धा वादळ असेच शांत झाले होते. परंतु श्री. दाभोळकर येथे बाबांस ईश्वरत्व किंवा परब्रह्मस्वरूप न देता बाबांच्या संतत्वास श्रेय देतात. ते म्हणतात,' वाटे इंद्रास दया आली I पाहिजे संतांची वाणी राखिली I ढगे बारा वाटा फांकलीशांत झाली वावटळ II '

*      बाबांनी सटक्याचे फटके मारून मशीदीस लागलेली आग विझविली

अध्याय १२     

श्रीसंतघोलप-रामदर्शनं  

*      अध्यायारंभ

*      बाबांच्या इच्छेशिवाय कोणी शिरडीत जाऊ शकत नसे किंवा राहू शकत नसे

१.     काका महाजनी आठवड्याची रजा घेऊन शिरडीत राहण्याच्या तयारीने आले. परंतु बाबांनी त्यांना लगेच जाण्यास सांगितले. ते परत गेल्यावर पाहतात तो पेढीवर मुनीम आजारी पडले होते आणि मालक त्यांच्या येण्याची वाट पाहत होते.

२.     भाऊसाहेब धुमाळांस मुकदम्याचे तातडीचे काम असताना ते उभ्या उभ्या बाबांस भेटण्यासाठी आले आणि बाबांनी त्यांना आठवडाभर ठेवून घेतले. प्रत्यक्षात न्यायाधीशांना पोटशूळ उठल्याने मुकदम्याचे काम थांबले होते. यथावकाश मुकदम्याचे काम व्यवस्थित पार पडले आणि आरोपी निर्दोष सुटला.  

३.     नानासाहेब निमोणकर आणि त्यांच्या पत्नी शिरडीत बाबांजवळ राहून बाबांची सेवा करीत असत. एकदा बेलापुरास बाईंचा मुलगा आजारी पडला होता त्यामुळे बाईंना बेलापुरास जावेसे वाटत होते. परंतु नानासाहेबांस बाईंनी जाऊन परत यावेसे वाटत होते. बाबांची परवानगी घेण्यास गेले असता बाबांनी बाईंना चार दिवस सर्वाना निवांत भेटून परत येण्यास सांगितले. बाई निश्चित मनाने गेल्या आणि नानासाहेबांस खूण पटली.     

*      बाबांच्या ठिकाणी मुळेशास्त्रींना त्यांच्या समाधिस्थ गुरु घोलपनाथांचे दर्शन

*      श्रीरामाचे भक्त असणाऱ्या एका डॉक्टरांना बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन

बाबांना भेटावयास आलेले एक डॉक्टर श्रीरामाचे भक्त होते आणि मी मुसलमान फकिराच्या पाया पडणार नाहीया बोलीवरच बाबांच्या भेटीस आले. परंतु त्यांना बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन झाले आणि प्रथम तेच बाबांच्या पाया पडले.


अध्याय १३     

भीमाजी क्षय निवारणं  

*      अध्यायारंभ

*      भीमाजी पाटलाचा क्षय बाबांनी बरा केला आणि इतर कथा

या अध्यायाचा मुख्य विषय बाबांनी 'भीमाजी पाटलाचा क्षय बरा केला' हा आहे. परंतु त्या अनुषंगाने श्री. दाभोळकरांना इतरही तशाच कथा आठवतात आणि त्या कथा  ते सांगत जातात. या विषयांतराचे समर्थनही श्री. दाभोळकर  असे करतात,' माझी कथा मीच करीन' I साईच गेले आहेत बोलूनत्यांनीच या कथांची आठवण I दिधली मजलागून ये समयी II' बाबांनी भक्तांच्या बऱ्या केलेल्या व्याधींच्या कथा अध्याया-अध्यायात आल्या आहेत. परंतु त्या सर्व कथांचा मुख्य विषय हाच आहे कीउपाय काय केला नसून तो बाबांनी केला आणि त्यामुळे त्या उपायास गुण  आला. हाच उपाय भक्तांनी स्वतःच्या इच्छेने केल्यास तो गुण आला नाही. सर्वांत शेवटीभीमाजी पाटलाच्या क्षयनिवारणाची कथा आहे. या कथेत बाबा त्याला एका ओलसर जागी तरटावर निजवतात. झोपेत भीमाजी पाटलास भीतिकारक स्वप्ने पडतात, ज्यांची अर्थसंगती त्याला लागत नाही. परंतु तो जागा झाल्यानंतर त्याची क्षयाची व्याधी बरी होते. त्यावर बाबांचेच शब्द आठवतात,' बैस  आता सोडी खंत  I खंत न करिती विचारवंत I झाला तुझिया भोक्तृत्वा अंत I पाय शिरडीत टाकिता II '

उपकथा

. बाबांनी बाळा गणपत शिंप्याचा हिंवताप काळ्या कुत्र्यास दही भाताचे कवळ खाण्यास देऊन बरा केला. (ओवी ८५ ते ओवी ९७).

. बापूसाहेब बुट्टीचे जुलाब केवळ शब्दांनी बरे केले . (ओवी ९८ ते १०३).

. डॉक्टर पिल्ले यांचा पटकीचा त्रास सुका मेवा खाण्यास सांगून बरा केला. (ओवी १०४ ते १०९).

. आळंदीच्या एका स्वामींचा कर्णरोग आशिर्वाद देऊन बरा केला (ओवी ११० ते ११८).

. काका महाजनींचे जुलाब भुईमुगाच्या शेंगा खावयास देऊन बरे केले ( ओवी ११९ ते १४७ )

. दत्तोपंत नावाच्या गृहस्थांचा पोटशूळाचा त्रास विभूति-आशीर्वादाने बरा केला.  (ओवी १४८ ते १५५)

. भीमाजी पाटलांचा क्षय बरा केला (ओवी १५६ ते १८९)- (स्वप्नात पंतोजी मारून मारून सवाई पाठ  करवून घेतात)

अध्यायाचा समारोप


अध्याय १४      

रतनजी साई समागम   

*      अध्यायारंभ

*      शेठ रतनजी मुलगा होण्यासाठी साईबाबांच्या भेटीस येतात. साईबाबा त्यांना सांगतात की तुझ्याकडून मला तीन रुपये चौदा आणे मिळाले, बाकीची दक्षिणा मला दे. रतनजींनी पूर्वी मौलीबाबांना जेवावयास घातले होते. त्याचा सर्व खर्च तीन रुपये चौदा आणे भरतो.

*      अध्यायाचा समारोप


अध्याय १५      

चोळकरशर्कराख्यानं    

*      अध्यायारंभ

*      कीर्तनास साधेपणाने जाण्याविषयी बाबांचे दासगणूंना मार्गदर्शन

संत दासगणू कीर्तनास नटून थटून जात असतात. साईबाबा त्यास साधेपणाने जावयास सांगतात.

*      नवस पूर्ण करता आल्याने श्री. चोळकर बिनसाखरेचा चहा पितात

चोळकर परीक्षा पास झाल्यावर खडीसाखर वाटण्याचा नवस करतात आणि नवस पूर्ण होईपर्यंत बिनसाखरेचा चहा पितात. ते नवस पूर्ण करतात तेव्हा साईबाबा त्यांना भरपूर साखर घातलेला चहा पिण्यास देण्यास सांगतात.

*      पालीच्या चुकचुकण्याचा अर्थ बाबा सांगतात

पालीचे चुकचुकणे ऐकून बाबा सांगतात की तिची बहीण तिला औरं

गाबादहून भेटावयास येणार आहे. औरंगाबादहून एक सौदागर येतो, त्याच्या सामानातून एक पाल पडते आणि या पालीला भेटते.

*      अध्यायाचा समारोप आणि फलश्रुति

या अध्यायाचा समारोप करून बाहेर फलश्रुती अशी सांगितली आहे की हा अध्याय जो आदराने वाचेल किंवा या अध्यायाची आवर्तने करील त्याची सारी संकटे बाबा निवारती


अध्याय १६      

ब्रह्मज्ञानकथनं     

*      अध्यायारंभ

*      धनाची आसक्ती न सुटलेल्या परंतु बाबांस 'ब्रह्म' दाखवण्याची विनंती करणाऱ्या एका गृहस्थास बाबा धडा शिकवितात 

*      अध्यायाचा समारोप आणि ब्रह्मप्राप्ती कशी होईल याविषयी श्री. दाभोलकरांचे विवेचन

अध्याय १७       

ब्रह्मज्ञानकथनं-२   

*      अध्यायारंभ- मुख्यतः  श्रेय आणि प्रेय यांचे विवेचन

*      धनाची आसक्ती न सुटलेल्या परंतु बाबांस 'ब्रह्म' दाखवण्याची विनंती करणाऱ्या एका गृहस्थास बाबा धडा शिकवितात- 

धनाची आसक्ती  असलेले एक गृहस्थ बाबांकडे येऊन 'ब्रह्म दाखविण्याची विनंती करतात. बाबा त्याला प्रत्यक्ष उदाहरणातून 'धनाची आसक्ती सुटल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होणे अशक्य आहे' असा धडा देतात.

समारोप

*      अध्यायाचा समारोप आणि ब्रह्मप्राप्ती कशी होईल याविषयी श्री. दाभोलकरांचे विवेचन


अध्याय १८       

मदनुग्रह    

चिंतन- हा अध्याय खुद्द ग्रंथकर्ते श्री. दाभोलकरांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेविषयी आहे. श्री. साठे गुरुचरित्राचा सप्ताह करीत असताना त्यांना आठवड्यातच बाबांचा अनुग्रह होतो. यावर श्री. दाभोलकरांच्या मनात शंका उत्पन्न होते, की ते गेली चाळीस वर्षे गुरुचरित्राचे वाचन करीत आहेत, परंतु त्यांना बाबांनी अनुग्रहावाचून का वंचित केले. बाबा दाभोलकरांची ही शंका ओळखून तिचे निरसन करतात, परंतु स्वत: नाही तर श्री. माधवराव देशपांडे ऊर्फ 'शामा' याने बाबांविषयी सांगितलेल्या कथेतून. (ही कथा पुढील अध्यायात पूर्ण केली आहे.) श्री. दाभोलकरांना त्यामुळे बाबांच्या उपदेशपद्धतीचा आणखी एक पैलू ध्यानी येतो.  

या अध्यायाचा विषय येथेच संपत नसून तो पुढील अध्यायात पूर्ण केला आहे. साईसच्चरितातील इतर अध्यायांत असलेल्या भक्तांच्या कथा आणि बाबांचे मार्गदर्शन यांपेक्षा या दोन अध्यायांचे स्वरूप अशा प्रकारे वेगळे आहे की, यांत प्रत्यक्ष ग्रंथकर्त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली, जशी युद्धप्रसंगी अर्जुनाच्या मनात झाली तशी. बाबांनी या शंकेचे निरसन तसेच केले जसे श्रीकृष्ण भगवानांनी केले तसे. या दोन अध्यायांत बाबांचा सारा महत्त्वाचा उपदेश आला आहे . त्यामुळे या दोन अध्यायांस साईगीतेचे स्वरूप आले आहे.


*      अध्यायारंभ

*      श्री. साठे गुरुचरित्राचा सप्ताह करीत असताना बाबा त्यांना स्वप्नात येऊन गुरुचरित्र समजावून सांगतात

*      श्री. साठे यांना बाबांचा अनुग्रह झाल्याने श्री. दाभोळकरांस शंका आणि बाबांकडून श्री. दाभोलकरांचे श्री. माधवराव देशपांडे ऊर्फ शामाकडून प्रबोधन

श्री. साठे यांनी केवळ गुरुचरित्राचा एकच सप्ताह केल्यानंतर बाबांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. श्री. दाभोलकरांना यावर अशी शंका उत्पन्न होते की श्री. साठे यांनी केवळ एकच सप्ताह केल्यानंतर बाबांनी त्यांना दृष्टांत दिला. मी मात्र गेली चाळीस वर्षे गुरुचरित्राचे वाचन करीत आहे. तरी मला बाबांनी माझ्यावर कृपा का केली नाही? बाबा अंतर्ज्ञानाने ही शंका  जाणून घेतात. परंतु या शंकेचे स्वतः निरसन करण्याऐवजी श्री. दाभोलकरांना श्री. माधवराव देशपांडे ऊर्फ शामाकडे पंधरा रुपये दक्षिणा घेऊन येण्यास आणि थोड्या गप्पागोष्टी करून येण्यास सांगतात. शामाकडे पंधरा रुपये नसल्याने तो पंधरा रुपयांऐवजी पंधरा नमस्कार सांगण्यास सांगतो. तेथेच श्री. दाभोलकरांना भागवताची अर्धवट उघडलेली पोथी दिसते. श्री. दाभोळकरांनी त्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी भागवताचे वाचन अर्धे सोडलेले असते. त्यामुळे श्री. दाभोळकरांस आश्चर्य वाटते. आपले अर्धे वाचन पूर्ण करण्याची ही बाबांचीच योजना असावी असे त्यांना वाटते. पुढे शाम्याबरोबर ज्या गप्पागोष्टी होतात, विशेषतः शामा श्री. दाभोलकरांना राधाबाई देशमुख यांची जी गोष्ट सांगतो, त्यामध्ये श्री. दाभोलकरांना आपल्या शंकेचे उत्तर  सापडते.

*      उपकथा-बाबांनी आपल्या भक्तांचे कल्याण साधण्यासाठी त्यांच्याकडून निरनिराळ्या

      धर्मग्रंथांचे वाचन करवून घेतले

*      शामाने श्री. दाभोलकरांना सांगितलेली कथा - राधाबाई देशमुख नावाच्या वृद्ध महिला बाबांकडून गुरुमंत्र मिळावा म्हणून हट्ट धरून बसतात (पूर्वार्ध) आणि अध्यायाचा समारोप

(शामाने श्री. दाभोलकरांना सांगितलेली कथा - राधाबाई देशमुख नावाच्या वृद्ध महिला बाबांकडून गुरुमंत्र मिळावा म्हणून हट्ट धरून बसतात (पूर्वार्ध) आणि अध्यायाचा समारोप


अध्याय १९        

मदनुग्रह    

*      अध्यायारंभ

*      शामाने श्री. दाभोलकरांना सांगितलेली कथा - राधाबाई देशमुख नावाच्या वृद्ध महिला बाबांकडून गुरुमंत्र मिळावा म्हणून हट्ट धरून बसतात, बाबा तिचे समाधान करतात (उत्तरार्ध)

*      बाबांनी श्री. दाभोलकरांना केलेला उपदेश

*      दाभोळकरांना रामनामाचे आवर्तन करण्याची इच्छा होते आणि सकाळीच त्यांना औरंगाबादकरांच्या रामाच्या भजनाने जाग येते

*      डुक्कर विष्ठा भक्षण करीत असता बाबा निंदकांना त्यांच्याकडे निर्देश करतात

*      बाबा घराच्या छपरास शिडी लावून शिडी वापरण्याचे मोल दोन रुपये देतात, अध्यायाचा समारोप  

अध्याय २०         

ईशावास्यभावार्थबोधनं

*      अध्यायारंभ

*      ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात 

*      श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप 


अध्याय २१         

अनुग्रहकरणं

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

एकदा एक बीए झालेले गृहस्थ मामलेदारी मिळाल्यानंतर बेळगावातील वडगाव येथे एका कानडी सत्पुरुषांस भेटतात. त्यांच्याकडे निश्चळदासकृतविचारसागरनावाचा ग्रंथ असतो. ते सत्पुरुष सांगतात की या ग्रंथामुळे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. पुढे तुम्हाला एक महापुरुष भेटतील. हे गृहस्थ पुढे शिर्डीस जातात आणि बाबा त्यांना म्हणतात, ‘ कानडी अप्पाने सांगितले तेवढे येथे सोपे नाही. येथे अनिवार्य अंग झिजवावे लागते.त्या गृहस्थांस खूण पटते की ते महापुरुष म्हणजे बाबाच.

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

एकदा अनंतराव पाटणकर नावाचे गृहस्थ बाबांचे भेटीस येतात. यांनी वेदांचे वाचन केलेले असते परंतु यांच्या मनाला स्थैर्य नसते. ते बाबांना याबद्दल विचारतात. बाबा त्यांना एक गोष्ट सांगतात.एका सौदागरासमोर एक घोडा नऊ लेंड्या टाकतो. सौदागर त्या घट्ट बांधून जवळ ठेवतो.पाटणकर केळकरांना या गोष्टीचा अर्थ विचारतात. केळकर या गोष्टीचा अर्थ सांगतात की घोडा ही ईंश्वरी कृपा. नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती (१. श्रवण २. कीर्तन ३. विष्णुस्मरण ४. चरणसेवन ५. अर्चन ६. वंदन ७. दास्य ८. सख्य ९. आत्मनिवेदन). यांतील एक जरी भक्ती सफल झाली तरी मनाला स्थैर्य येईल. दुस-या दिवशी जाताना बाबा त्यांना विचारतात, ‘पदरी लेंड्या बांधल्यास काय?’ पाटणकर उत्तर देतात, ‘तुमची कृपा असू द्या, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील.

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

अध्याय २२         

सर्प-वृश्चिक- संकट-निवारणं

*      अध्यायारंभ-साप आणि दोरीचे उदाहरण, बाबांच्या गुडघ्यावर हात ठेवून बसण्याच्या स्थितीचे विश्लेषण

(-२५)


श्री. दाभोळकरांनी या अध्यायाचे नाव अपमृत्युनिवारणंअसे ठेवले असले तरी अध्यायातील कथांप्रमाणे या अध्यायाचे नाव ''सर्पभयनिवारणं' असे हवे होते. श्री दाभोळकर अध्यायाच्या सुरुवातीलाच सर्प या मूळ विषयाला हात घालतात. परंतु त्यांना 'बाबांनी भक्तांना सापापासून वाचविले' अशा कथा सांगावयाच्या नसल्यामुळे ते व्यापक  अर्थाकडे वळतात. अध्यात्मामध्ये साप आणि दोरीचे वारंवार उदाहरण दिले जाते. अंधारात दोरीच्या ठिकाणी सापाचा आभास होतो. परंतु प्रकाशात ती दोरी आहे असे कळते. येथे अंधार हे अज्ञानाचे प्रतीक असून प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर दाभोळकर येथे बाबांच्या गुडघ्यावर हात ठेवून बसण्याच्या स्थितीचे सुंदर विश्लेषण करतात.  

*      काकासाहेब मिरीकरांच्या उपरण्यावर बसलेला साप वेळीच लक्षात येतो  (२६ ते ९२)

नगरचे रहिवासी काकासाहेब मिरीकर शिरडीस बाबांच्या भेटीस येतात. बाबा सांकेतिक भाष्य करून त्यांच्यावर येणाऱ्या सर्पसंकटाची सूचना देतात. त्याचबरोबर आपण 'द्वारकामाईची पिल्ले' असल्याने आपल्याला भिण्याचे कारण नाही असे आश्वासन देतात. मिरीकर पुढे चिथळीस जाण्यास निघतात. बाबा त्यांच्यबरोबर माधवराव देशपांडे ऊर्फ शामाला पाठवतात. चिथळीला मिरीकर मारुतीच्या मंदिरात मुक्कामास असताना एक साप त्यांच्या उपरण्यावर बसतो. परंतु एका पट्टेवाल्याच्या ते लक्षात येते आणि साप उपरण्यावरून उतरताच मारला जातो. अशा प्रकारे मिरीकरांचे सर्पसंकटापासून रक्षण होते.    

*      बापूसाहेब बुट्टी शौचविधीस गेले असता भयंकर साप तेथे येतो, परंतु बापूसाहेबांस अपाय न होता साप निसटून जातो (९३-१०५)

बापूसाहेब बुट्टींना एक ज्योतिषी नानासाहेब डेंगळे सांगतात की आज त्यांच्यावर मोठे गंडांतर येणार आहे. परंतु बाबा त्यांना आश्वस्त करतात. बापूसाहेब शौचविधीस गेले असता तेथे एक साप येतो. सापास मारावयास गेले असता तो निसटून जातो.

*      अमीर शक्कर एका फकीरास पाणी पाजतो आणि फकिराचा अचानक मृत्यू होतो (१०६-१५३)

अमीर शक्कर नावाचा कोराळे गावचा, व्यवसायाने दलाल असणारा रहिवासी संधिवाताने त्रस्त असतो. हा रोग बरा होण्यासाठी बाबांकडे आला असता बाबा त्याला द्वारकामाईमध्ये राहण्याचा सल्ला देतात. परंतु तेथील अस्वच्छ वातावरणाला कंटाळून तो बाबांना न सांगताच तेथून निघून जातो. रात्री एका धर्मशाळेत उतरला असता एका तहानलेल्या फकीरास तो पाणी पाजतो आणि तो फकीर डोळे मिटतो. अमीर शक्कर घाबरून जातो आणि पुन्हा शिरडीत येऊन राहू लागतो. यथावकाश अमीर शक्करची व्याधी बरी होते.

*      अमीर शक्करचे  सापापासून रक्षण  (१५४-१८१ )

एकदा बाबाअमीर शक्कर असे बरेच जण चावडीमध्ये निजले असता बाबा रात्री अचानक ओरडत उठले की, ' माझ्या उशापाशी विवशी (भूत) आहे.' सारेजण उठून पाहतात तर बाबांच्या उशाशी काहीच नव्हते. परंतु अमीर शक्करच्या उशाशी साप आढळला. सापाला मारण्यात आले. श्री. दाभोळकर सांगतात की बाबांची ही पद्धतच होती, की भक्तांवर संकट आले तर ते आपल्यावर संकट आल्याचा ओरडा करीत, ज्यायोगे भक्तांवर आलेल्या संकटांचे निवारण व्हावे.    

*      श्री. दाभोलकरांच्या उपरण्यावर विंचू आढळतो, परंतु दाभोळकरांस इजा होत नाही (१८२-२०८)

काकासाहेब दीक्षित रोज दिवसा एकनाथी भागवत आणि रात्री एकनाथांचे भावार्थ रामायण वाचीत. श्री. दाभोळकर या दोन्हींच्या श्रवणास  जाऊ लागले. एकदा रामायणाचे वाचन चालले असता  श्री दाभोळकरांच्या लक्षात आले की एक विंचू उजव्या खांद्यावर त्यांच्या उपरण्यावर येऊन बसला आहे. हा विंचू निश्चल बसला होता आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे नांगी वरखाली करीत होता. श्री दाभोळकरांच्या म्हणण्याप्रमाणे हा विंचूही रामकथा ऐकण्यात दंग झाला होता. श्री दाभोळकरांनी त्याला हळूच उपरण्यात गुंडाळून बाहेर बागेत नेऊन सोडले. श्री दाभोळकरांना विंचवापासून कुठलाच अपाय झाला नाही.

*      काकांच्या  घरी साप येतो, परंतु कोणास इजा न करता निघून जातो, अध्यायाचा समारोप-साप, विंचू इत्यादी प्राण्यांविषयी बाबांचे मत (२०९-२३५)

एकदा काकांच्या घरी साप येतो. परंतु कोणी त्याला मारण्याच्या आत तेथून निसटून जातो. यावर मुक्ताराम म्हणतो की,' बरे झाले, निष्पाप जिवाची सुटका झाली.' श्री दाभोळकरांस हे मत पटत नाही. त्यांचे मत असे पडते की, ' साप दुष्ट आहे आणि त्याला दया दाखवणे चुकीचे आहे.' बराच वाद होतो परंतु निष्कर्ष निघत नाही. नंतर सारे मशिदीत जमले असता बाबा अंतर्ज्ञानाने हा वाद जाणून त्याविषयी चौकशी करतात. सर्व जण या विषयावर बाबांचे मत विचारतात. तेव्हा बाबा आपले मत सांगतात की, '


अध्याय २ ३         

गुरुभक्तलीलादर्शनं

*      अध्यायारंभ (-११)

*      बाबांना कांदा खाताना पाहून एका योगाभ्यास्यास बाबांच्या योग्यतेबद्दल शंका येते. बाबांकडून त्याचे समाधान (१२-२०)

*      शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस सर्पदंश झाला असता बाबा 'ओसरीवर चढू नको' अशी आज्ञा विषास देऊन विषनिवारण करतात (२१-६६)

*      शिरडीत महामारीची साथ आली असता गावात बाहेरची कुठली गाडी येण्यास मनाई असताना बाबा बाहेरच्या गाडीवाल्याकडून धुनीसाठी लाकडे घेतात. धुनीचे माहात्म्य. (६७-१०३)

*      मरणासन्न झालेल्या बोकडास मारण्याच्या बाबांनी केलेल्या आज्ञेचे पालन करण्याची काकासाहेब दीक्षितांची तयारी. परंतु बोकडाचा मृत्युसमय जवळ आल्याने बोकडाचा आपोआप मृत्यू. अध्यायाचा समारोप. (१०४-२०५)

अध्याय २४         

विनोदविलसितं 

*      अध्यायारंभ - थट्टाविनोदातून  बाबांची शिकवण (-१४)

*      श्री दाभोळकरांच्या कोटाच्या अस्तनीवर पाच-पंचवीस फुटाणे आढळून येतात आणि बाबांकडून त्यांची थट्टामस्करी व उपदेश (१५-७३)

*      सुदाम्याची कथा-गुरुपत्नीने सर्वांसाठी चणे दिले असता सुदामा ते एकट्याने खातो आणि पुढे त्यास दारिद्र्य भोगावे लागते (७४-८७)

*      अण्णा चिंचणीकर आणि मावशीबाई बाबांची सेवा करीत असता अण्णांचे तोंड मावशीबाईंच्या तोंडाजवळ जाते आणि त्या अण्णांवर त्यांचा 'मुका घेण्याचाआरोप करतात. बाबा हसत खेळत दोघांस शांत करतात (८८-१२४)

*      मावशीबाई बाबांचे पोट जोरात रगडत असता भक्त त्यांना हळू रगडण्यास विनंती करतात आणि बाबा 'मी कणखर आहे' हे दाखवण्यासाठी सटक्याचे एक टोक खांबास लावून दुसरे टोक पोटात खुपसतात. अध्यायाचा समारोप  (१२५-१४४)

अध्याय २ ५         

भक्ताभीष्टसंपादनं  

*      अध्यायारंभ ((-१३)

*      दामू अण्णा कासार यांस मित्राकडून कापसाच्या व्यापारातील भागीदारीचा प्रस्ताव, परंतु बाबा त्यास नकार देऊन पुढील नुकसानीपासून वाचवितात (१४-८५)

*      बाबांनी  दिलेले आंबे खाल्यानंतर दामूअण्णांच्या पत्नीस पुत्रप्राप्ती (८६-१०३)

*      अध्यायाचा समारोप (१०४-१२६)


अध्याय २६         

अपस्मारात्महत्त्यानिवारणं तथा निजगुरूपदस्थिरीकरणं   

*      अध्यायारंभ; बाबांची आंतरिक पूजा करण्याविषयी श्री दाभोळकरांचे मार्गदर्शन  (- ३७)

*      बाबांशिवाय इतर व्यक्तीस गुरू मानणारे पंत नावाचे गृहस्थ बाबांच्या भेटीस गेले असता मूर्च्छित होऊन पडतात; बाबा त्यांस आपल्या गुरुशीच एकनिष्ठ राहण्याचा संकेत देतात (३८-५६)

*      हरिश्चंद्र पितळे  यांच्या मुलाचा अपस्मार बाबा बरा करतात व त्यांस तीन रुपये देऊन आधी दिलेल्या दोन रुपयांमध्ये हे तीन रुपये ठेवून त्यांची पूजा करण्यास सांगतात (५७-११२)

*      बाबांचे एक भक्त गोपाळ नारायण आंबेडकर दारिद्र्यामुळे आत्महत्त्येस जात असता एक खानावळवाले त्यांस अक्कलकोट स्वामींची पोथी वाचण्यास देतात; या पोथीतील आत्महत्त्येच्या निष्फळतेवरील अध्याय वाचून आंबेडकर आत्महत्त्येपासून परावृत्त होतात; अध्यायाचा समारोप (११३-१५६)

श्री. गोपाळ नारायण आंबेडकर हे बाबांचे भक्त होते. ते आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्रस्त झाले होते. एकदा ते शिरडीला आले असताना विहिरीत उडी मारून आत्महत्त्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

तेथे समोरच एक खाणावळ होती. त्या खाणावळीचा सगुण नावाचा मालक बाबांचा भक्त होता. तो आंबेडकरांजवळ येऊन त्याने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची पोथी आंबेडकरांच्या हातात देऊन त्याने विचारले,'ही पोथी तुम्ही वाचली आहे का?'

आंबेडकरांनी पोथी हातात घेऊन चाळली असता योगायोगाने एक अध्याय त्यांच्या वाचण्यात आला. या अध्यायातील कथा अशी होती-

स्वामी समर्थांचे एक भक्त असाध्य रोगाने पीडित असल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्त्येचा विचार करीत असतात. त्याच वेळी स्वामी समर्थ त्याच्या समोर प्रगट होऊन त्याला उपदेश करतात की मनुष्याला सारे भोग त्याच्या कर्मांमुळे भोगावे लागतात आणि हे भोग त्याच जन्मात भोगले नाहीत तर दुसरा जन्म घेऊन भोगावे लागतात. या भक्ताने मग आत्महत्त्येचा विचार रहित केला.

ही कथा आंबेडकरांस मार्गदर्शक वाटली आणि बाबांचे आभार मानून त्यांनी आत्महत्त्येचा विचार रहित केला. आंबेडकरांनी ज्योतिषविद्येचा अभ्यास करून या विद्येवर उपजीविका सुरू केली. बाबांच्या कृपेमुळे यथावकाश त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

अध्याय २७         

दीक्षानुग्रहदानं     

चिंतन

बाबांनी भक्तांना निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे  वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे  घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला होता.

*      अध्यायारंभ (- ३०)

*      काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)

*      एका रामदासी बुवाची  विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )

*      बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)

*      दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)


अध्याय ३२          

गुरुमहिमावर्णनं      

रानात देवाचा शोध

बाबांसह चार जण रानात देवाचा शोध करतात. बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची कथा-.  (३७-१२१)

काय गोड गुरूची शाळा I सुटला जनक-जननीचा लळा II

तुटली मोहममतेची शृंखळा I लाधलो अवलीळा मुक्तता II ७६ II  

१.        बाबा आणि त्यांचे तीन सहाध्यायी ब्रह्मनिरूपण करून स्वतः शोध घेण्यासाठी रानात हिंडत असतात. त्या वेळी त्यांना एक वणजारी भेटून कुठल्याही शोधास जाताना रिकाम्या पोटी शोध न करण्याची आणि  बरोबर वाटाड्यास घेण्याची  विनंती करतो. इतर तीन सहाध्यायी त्या वणजाऱ्याचे ऐकत नाहीत, परंतु बाबा त्याचे ऐकून खाऊन घेतात. त्यांना गुरू भेटतात. बाबा गुरूला बरोबर घेऊन शोध चालू ठेवतात.

२.       बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात. गुरू दहा-बारा घटिकांनंतर बाबांना येऊन बाहेर काढतात आणि अनुभवाबद्दल विचारतात. बाबा सांगतात की तो अनुभव अतिशय सुखदायक होता. अशा प्रकारे बाबांची गुरुकडे शाळा सुरू होते.   


शिमग्याचा दिवस आणि पुरणपोळ्यांचे भोजन

शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या इच्छेने बाबांकडे आलेल्या गोखले  बाईंकडून  बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून घेतात (१२२-१४८)

सारांश सकल इंद्रियां शक्ती | तरीच घडे देवाची भक्ती || जरी अन्नावीण क्षीणत्वा येती | तरी त्या गती परमार्थी || .३२ .१२८ ||

एकदा गोखले नावाच्या एक बाई शिमग्याच्या दिवशी येऊन बाबांच्या पायाशी राहून तीन दिवस उपवास करण्याच्या इच्छेने येतात. बाबा तिला उपवास करण्याचा उपदेश करून दादा केळकरांच्या घरी जाऊन पुराणपोळ्यांचे भोजन  करण्यास सांगतात. त्याप्रमाणे त्या बाई उपवास करता पुरणपोळ्यांचे भोजन करतात.    


बाबांनी केलेले जरीचे काम

बाबांनी सांगितलेली गोष्ट -बाबा पोटापाण्यासाठी बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले झाल्यामुळे मालक त्यांना पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)

माझे सरकार न्या न्या वदे I मजलाच जो तो म्हणे दे दे II

कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे I एकही सुधे   ऐकेना II १६१ II

बाबा एकदा पोटापाण्यासाठी कामाच्या शोधात जातात आणि बीड गावी त्यांना एक जरीचे काम मिळते. बाबांचे काम इतर सर्वांपेक्षा चांगले होते आणि मालक त्यांना पागोटे आणि शेला यांनी युक्त पोशाख देतात. बाबा तो न वापरता तसाच ठेवून देतात. बाबा सांगतात की, 'कोणाचे देणे कायम पुरत नाही. परंतु माझे सरकार देतात ते कल्पान्तीही सरत नाही.'  

अध्याय ३३          

उदीप्रभाव              


उदीचा प्रभाव (३४-६२)

. नारायण मोतीराम उर्फ जानी यांच्या मित्रास विंचू चावतो. जवळ उदी नसल्यामुळे उदबत्तीची राख बाबांची प्रार्थना उदी म्हणून लावताच विंचू चावल्याच्या वेदना दूर झाल्या.

. एकदा एका  भक्ताच्या मुलीला ग्रंथिज्वरामुळे (प्लेगमुळे) तीन दिवसांपासून  ताप आलेला असतो. त्यामुळे तो नानासाहेब चांदोरकरांस उदी आणण्यास सांगतो. नानासाहेब चांदोरकरांस ते ठाणे स्टेशनजवळ असताना हा निरोप मिळतो. नानासाहेब चांदोरकर  बाबांस गाऱ्हाणे घालून तेथेच जमिनीवरील माती उचलून आपल्या पत्नीच्या कपाळास लावतात. त्याच वेळेपासून त्या भक्ताच्या मुलीचा ताप उतरतो.

विभूतीमुळे बाळंतपणाच्या वेदनांतून सुटका

उदीमुळे नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची बाळंतपणाच्या वेदनांतून सुटका. 'आरती साईबाबा' या माधव अडकरांच्या आरतीचे महत्त्व (६३-११९)

कुठला तांगा, कुठला शिपाई I नट नाटकी ही माऊली साई II

संकटसमयी धावत येई I भावापायी भक्तांच्या II ११९ II

नानासाहेब चांदोरकरांची मुलगी बाळंतपणाच्या वेळी अडली असताना बाबा रामगीर बुवांबरोबर उदी आणि 'आरती साईबाबा' ही आरती पाठवतात. अनोळखी टांगेवाला रामगीरबुवांस जळगाव स्टेशनवरून रामगीरबुवांस नानासाहेब चांदोरकरांच्या घरी नेतो. उदीमुळे नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीच्या वेदना दूर होऊन तिची प्रसूती सुखरूप होते


अप्पासाहेब कुलकर्णी आणि बाळाबुवा सुतार

अप्पासाहेब कुलकर्णी यांची कथा (१४१-१९६

पाहता या कथेचे सार I जया भक्ताचे जैसे उद्गार II

तैसे ते पूर्ण करवून घेणार I ब्रीद हे साचार साईंचे II १९६ II

अप्पासाहेब कुलकर्णी यांची दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ठाण्याला बदली होते. त्यांना फार वर्षांपूर्वी बाळासाहेब भाटे यांनी बाबांची एक छबी दिलेली असते. तिचे ते नियमित पूजन करतात. परंतु बाबांची केव्हा भेट होईल याची त्यांना उत्कंठा लागलेली असते. एकदा ते घरात नसताना घरी एक फकीर येऊन दक्षिणा मागतो. त्यावेळी त्यांची पत्नी एक रुपया दक्षिणा देऊन त्या फकीराची बोळवण करते. फकीर तिला एका पुडीत थोडी विभूती देऊन बाबांच्या छबीबरोबर तिचीही पूजा करावयास सांगतो. अप्पासाहेब कुलकर्णी घरी आल्यावर  घडलेला प्रकार कळल्यावर त्यांना वाईट वाटते आणि ते विचार करतात की  मी असतो तर दहा रुपये तरी दक्षिणा दिली असती. अप्पासाहेब कुलकर्णी त्या फकिराच्या शोधात निघतात. परंतु त्यांना तो फकीर सापडत नाही. भुकेल्या पोटी ईश्वर सापडत नाही, हे बाबांचीच शिकवण  आहे. त्यामुळे अप्पासाहेब कुलकर्णी  घरी येऊन जेवण करतात आणि मित्र चित्रे यांना बरोबर घेऊन पुन्हा फकीराच्या शोधात निघतात. यावेळी त्यांना छबीतील वर्णनाशी मिळता जुळता फकीर सापडतो. तो फकीर अप्पासाहेब कुलकर्णी यांच्याकडे दक्षिणा मागतो. अप्पासाहेब कुलकर्णी  त्याला दक्षिणा देतात. परंतु फकीर आणखी दक्षिणा मागत राहतो. अखेर नऊ रुपये देऊन झाल्यावर अप्पासाहेब सांगतात की माझ्याकडे दहाची नोट आहे. तेव्हा फकीर दहाची नोट घेऊन नऊ रुपये परत करतो. तात्पर्य, अप्पासाहेब कुलकर्णी यांनी निश्चय केल्याप्रमाणे फकीर दहा रुपये दक्षिणा घेतो. तसेच नवविधा भक्तीचे प्रतीक म्हणून नऊ रुपयांची नाणी देतो.

बाळाबुवा सुतार यांची उपकथा:- (विषय: बाबांच्या छबीचे दर्शनही प्रत्यक्ष बाबांचे दर्शन घेण्यासारखे आहे) बाळाबुवा सुतार शिरडीस गेले तेव्हा बाबा त्यांस म्हणाले की ,' माझी याच्याशी चार वर्षांपूर्वीची ओळख आहे,' बाळाबुवांना आश्चर्य वाटले कारण त्यांनी प्रथमच बाबांची भेट घेतली होती. नंतर त्यांना आठवले की चार वर्षांपूर्वी त्यांनी बाबांच्या छबीला नमस्कार केला होता.


हरिभाऊ कर्णिक

हरिभाऊ कर्णिक यांची कथा. अध्यायाचा समारोप (१९७-२३९)

१९१७-हरिभाऊ कर्णिक गुरु पौर्णिमेनिमित्त शिरडीस बाबांच्या दर्शनास येतात

काय बाबांच्या उदीचे महिमान I  उदी शंकराचेही भूषण II

भावे भाळी करी जो चर्चन I विघ्ननिरसन तात्काळ II २३३ II

हरिभाऊ कर्णिक शिरडीहून निघताना बाबांना एक रुपया दक्षिणा देण्याचे ठरवतात, परंतु दक्षिणा देण्याचे राहून जाते. वाटेत ते नाशिकला काळा रामाच्या मंदिरात नरसिंगजी महाराजांना भेटतात. नरसिंगजी महाराज त्यांच्याकडून एक रुपया मागून घेतात.

अध्याय ३५          

चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं   


'का यावे जी' विचारणा

मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणाऱ्या काका महाजनींच्या मित्राची गोष्ट (२५-५८)

काय वाणीची मोहनशक्ती I काकांचे मित्र विस्मित चित्ती II

म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती I स्वर हा निश्चिती ओळखीचा II ३५ II

काका महाजनींचे एक मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणारे मित्र बाबांना नमस्कार करण्याच्या आणि दक्षिणा देण्याच्या अटीवर बाबांना भेटायला येतात. बाबा त्यांना 'का यावे जी' म्हणून विचारतात जसे त्यांना फक्त त्यांचे वडीलच विचारीत असत. तेव्हा या मित्रांना बाबांचे महत्त्व पटते. बाबा या मित्रांकडे मुळीच दक्षिणा मागत नाहीत.

मित्र घरी येतात तेव्हा त्यांना घरी कोंडल्या गेल्यामुळे दोन चिमण्या मेलेल्या आढळतात. एक चिमणी जिवंत असते आणि ती  उडून जाते.


बिन बियांची द्राक्षे

धरमसी जेठाभाईंची गोष्ट (काका महाजनी यांच्या पदरी काम करीत) (६१-१५७)

कोणी करा वा करा वंदन I द्या अथवा द्या दक्षिणादान II

आनंदकंद साई दयाघन I करी अवगणन कोणाचे II १४७ II

धरमसी जेठाभाईंना बियांची द्राक्षे आवडत नसताना बाबा बियांची द्राक्षे देतात. जेठाभाई द्राक्षे खातात तेव्हा त्यांना द्राक्षांत एकही बी आढळत नाही.


विभूतीमुळे श्राद्धाच्या जेवणास पुरवठा

बाबांचे भक्त बाळाजी पाटील नेवासकर यांची कथा (१७४-१९६)

उदीचा हा ऐसा प्रभाव I संतांचा हा सहज स्वभाव II

जया मनी जैसा अनुभव I तया अनुभवही तैसाच II १९६ II

बाळाजी पाटील नेवासकरांच्या श्राद्धाच्या दिवशी अंदाजापेक्षा जास्त पाहुणे येतात. परंतु त्यांच्या पत्नी प्रत्येक भांडे कपड्याने झाकून भांड्यात बाबांची उदी घालून सुनेला पाहुण्यांना अन्न वाढण्यास सांगतात. प्रत्यक्षात सर्व पाहुणे जेवून जातात आणि अन्न शिल्लक राहते.

अध्याय ३९

ज्ञानी आणि तत्त्वदर्शी अज्ञानाचा उपदेश कसा करतील?

नानासाहेब चांदोरकर श्रीमद्भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील ३४वा श्लोक गुणगुणत असतात. श्लोक हा आहे 

'तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया | 

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन:'

तेव्हा बाबा नानासाहेब चांदोरकरांना म्हणतात,'नाना, काय पुटपुटतो आहेस. जरा मोठ्याने म्हण.'

नानासाहेब चांदोरकर श्लोक म्हणून दाखवतात  तेव्हा बाबा विचारतात,'या श्लोकाचा अर्थ काय?'

नानासाहेब चांदोरकर सर्वमान्य असा अर्थ सांगतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, '(अर्जुना,) प्रणिपात म्हणजे नमस्कार, परिप्रश्न आणि सेवा केली असता तत्त्वदर्शी आणि ज्ञानी जो ज्ञानाचा उपदेश करतील तो तू जाण.'

तेव्हा बाबा म्हणतात की, 'ते च्या पुढे अवग्रह (S) असेल तर श्लोकाचा काय अर्थ होईल?'

अवग्रह असेल तर तो श्लोक 'तेSज्ञानं' म्हणजे संधिविग्रह करून 'ते अज्ञानं' असा होईल. ज्ञानी आणि तत्त्वदर्शी लोक अज्ञान कसे देतील? कुणाचेच डोके चालेना.

तेव्हा बाबा सांगतात की 'ज्ञान काय आहे ते कळण्यासाठी अज्ञान काय आहे ते आधी कळले पाहिजे.  त्यामुळे खरे ज्ञानी आणि तत्त्वदर्शी अज्ञान काय आहे ते सांगतील. म्हणजे ज्ञान काय आहे ते आपोआप कळेल.'

बाबांच्या या स्पष्टीकरणाचे आणि संस्कृतच्या ज्ञानाचे सर्वांना कौतुक वाटते.

अध्याय ४१

संत चित्रांचे समुद्रात विसर्जन

अली मुहंमद याने सांगितलेली बाबांच्या चित्राची कथा (२१-७३)

सर्व संतांची चित्रे समुद्रात विसर्जित करूनही बाबांचे चित्र मागे राहते

. अली मुहम्मद (जो ही कथा सांगत आहे) बाबांचे चित्र दुकानातून खरेदी करून फ्रेम कर त्याच्या घरातील इतर संतांच्या चित्रांबरोबर भिंतीवर लावतो.

. अली मुहम्मद (वरील घटनेच्या ) काही वर्षे पूर्वी बाबा अब्दुल रहमान या संताचे चित्र आपला मेहुणा नूर मुहम्मद पीरभाई यास देतो.

. नूर मुहम्मद बाबा अब्दुल रहमान यांच्या चित्राच्या सहा प्रती काढून आपल्या ओळखीच्या लोकांना देतो.

. एक दिवस बाबा अब्दुल रहमान यांच्या घरी मेळा जमला असता नूर मुहम्मद बाबा अब्दुल रहमान यांचे चित्र त्यांना भेट देण्यास जातो. परंतु बाबा अब्दुल रहमान मूर्तिपूजेच्या विरुद्ध असल्याने ते रागावतात आणि नूर मुहम्मदला मारायला  जातात.

. नूर मुहम्मद त्यामुळे निराश होतो आणि सर्वांना दिलेल्या प्रती त्यांच्याकडून मागवून घेतो.

. अली मुहम्मद पायाची शस्त्रक्रिया झाल्याने नूर मुहम्मदच्या घरी राहत असतो. त्यामुळे तो आपल्या मॅनेजर मेहता यास घरी पाठवून घरातील सर्व चित्रे मागवून नूर मुहम्मदकडे देतो.

. नूर मुहम्मद सर्व चित्रे समुद्रात विसर्जित करतो.

. दोन महिन्यांनी अली मुहम्मद घरी जाऊन पाहतो तर सर्व चित्रे नेलेली असतात, परंतु केवळ साईबाबांचे चित्र शिल्लक असते.

. अली मुहम्मद विचार करतो की नूर मुहम्मदला या चित्राबद्दल कळले तर तो हे चित्र सुद्धा आपल्याकडून काढून घेईल. त्याच्या मनात विचार येतो की (‘साईच सुविचार सुचवी चित्ता’) (हा अध्याय बाबांच्या निर्वाणापूर्वीचा असल्याने बाबा तेव्हा शिरडीत असतील.) या बाबतीत मौलाना इस्मू मुजावर यांचा सल्ला घ्यावा.

१०. मौलाना इस्मू मुजावर यावर अली मुहम्मदला सल्ला देतात की बाबांचे चित्र  श्री. दाभोळकर यांना द्यावे. तेच त्या चित्राची चांगल्या प्रकारे काळजी घेतील.

११. त्याप्रमाणे मौलाना इस्मू मुजावर आणि अली मुहम्मद श्री. दाभोळकरांना भेटावयास येऊन बाबांचे चित्र दाभोळकरांकडे देतात. (हे चित्र अली मुहम्मद आणि मौलाना इस्मू मुजावर श्री. दाभोळकरांकडे आणण्यापूर्वी श्री. दाभोळकरांनाही स्वप्नात बाबांचा दृष्टांत झालेला असतो. त्याची कथा अध्याय ४० मध्ये वाचावी)  

ज्ञानेश्वरी वाचनाबद्दल मार्गदर्शन

श्री देवांस ज्ञानेश्वरी वाचनाबद्दल मार्गदर्शन अध्यायाचा समारोप (७४-१७३)

श्री देव वारंवार ज्ञानेश्वरी वाचनाचा प्रयत्न करतात, परंतु त्यात ते यशस्वी होत नाहीत. देव बाळकरामांकडे विचारणा करतात. ते आवडून बाबा देवांवर चिंधी चोरण्याचा आरोप करतात. अखेर बाबा देवांस ज्ञानेश्वरी वाचण्याविषयी मार्गदर्शन करतात. नंतर श्री देवांस स्वप्नातही दर्शन देऊन विचारपूस करतात

अध्याय ४ ५          

स्वप्नातील साईदर्शन आणि धोतराचे दान (. ४३ ते १२५)

काकासाहेब (हरी सीताराम) दीक्षित बाबांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथी भागवताचे नित्य वाचन करीत असतात. यामध्ये नवनाथांनी सांगितलेला भक्तीचा मार्ग वाचून ते प्रभावित होतात. त्याच वेळी त्यांच्या मनात विषण्णता उत्पन्न होते की अशा प्रकारची भक्ती आपल्याला शक्य आहे का? आपली विषण्णता ते श्री. माधवराव देशपांडे (ऊर्फ श्यामा) यांच्यापाशी व्यक्त करतात. माधवराव देशपांडे त्यांचे समाधान करतात की आपल्याला बाबांसारखे गुरू लाभले आहेत. त्यामुळे आपण आपल्या भक्तीला कमी लेखता कामा नये.

याच वेळी आनंदराव पाखाडे नावाचे एक गृहस्थ देशपांडे यांना भेटायला येतात आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न सांगतात. स्वप्नात त्यांना ते श्यामाबरोबर समुद्रात उभे  असलेले दिसतात. त्या वेळी रत्नजडित सिंहासनावर बसलेले बाबा प्रगट होऊन आनंदरावांना आशिर्वाद होतात आणि देशपांडे यांना धोतर देण्यास आनंदरावांना सांगतात. आनंदराव त्याप्रमाणे देशपांडे यांना धोतर स्वीकारण्यास सांगतात.

परंतु श्री. देशपांडे शंका काढतात की बाबांच्या आदेशाशिवाय त्यांनी  ते धोतर का घ्यावे. काकासाहेब दीक्षित त्यांच्या पद्धतीप्रमाणे बाबांच्या प्रतिमेसमोर एक होकारार्थी आणि दुसरी नकारार्थी, अशा दोन चिठ्ठ्या टाकतात आणि लहान मुलाकडून एक चिठ्ठी उचलून घेतात. ही चिठ्ठी होकारार्थी येते आणि अशा प्रकारे देशपांडे यांना बाबांचा होकारार्थी कौल मिळतो. याप्रमाणे बाबांनी काकासाहेब दीक्षितांना आपल्या अस्तित्वाची प्रचीती दाखवून आश्वस्त केले.


अध्याय ४६          


बाबा गयेमध्ये शामा आधी पोहचतात

बाबा शामास सांगतात की 'मी गयेमध्ये तुझ्याआधी पोहचेन' आणि शामाला गयेला गेल्यानंतर गयेच्या पुजाऱ्याच्या घरी बाबांच्या प्रतिमेचे दर्शन होते, जी पूर्वी शामानेच पुजाऱ्याला दिलेली असते (२५-९०)  

दोन शेळ्यांची कथा

बाबा दोन शेळ्यांची कथा सांगतात. या शेळ्या पूर्वजन्मी भाऊ-भाऊ असतात, परंतु पैशाच्या लोभाने एकमेकांचा वध करतात (९१-१३७)











China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...