Thursday, May 9, 2024

श्री साईसच्चरित सूची

 


श्री साईसच्चरित सूची  








मित्रांनोश्री साईसच्चरित हा साईभक्तांचा आवडता ग्रंथ आहे. साईभक्त या ग्रंथाचे नियमित वाचन करतात. बाबा या ग्रंथातून भक्तांना मार्गदर्शन करतात असा माझा आणि सर्व साईभक्तांचा अनुभव आहे. या ग्रंथाचे


कुठलेही पान काढून वाचले तर आपल्या मनात जी शंका असेल तर तिचे उत्तर मिळते असे अनुभव येतो. असा हा अद्वितीय ग्रंथ वाचताना मला एक अडचण नेहमी येते. प. पू. श्री. दाभोळकर हा ग्रंथ जसा सुचला तसा लिहीत गेलेत्यामुळे कुठली कथा कुठे सुरू होते आणि कुठे संपते ते कळत नाही. कधी एखाद्या कथेत उपकथा सुरू होते आणि त्यात मूळ कथा विसरून जायला होते. ही अडचण दूर करण्यासाठी मी एक सूची बनवत गेलो. त्यामुळे मला कुठल्या अध्यायात काय आहे ते नेमके समजते आणि ग्रंथाचे अधिक चांगले आकलन होते. ही सूची मी येथे शेअर करीत आहे. तुम्हाला काही उपयोग झाला तर मला कळवा. धन्यवाद.




IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय १

मंगलाचरण 

(ओवीसंख्या १४२)


या अध्यायात काय आहे

'प्रथमाध्यायी' मंगलाचरण I विघ्नहर्ता विश्वादिकारण II गौरीशंकर कंठमंडन I श्रीगजवदना  नमियेला II . ५३, . २४ II जी अभिनव वाग्विलासिनी I चातुर्यकलाकामिनी II ती श्रीशारदा विश्वमोहिनी I  इष्टार्थदायिनी नमियेली II . ५३, . २५ II कुलगुरू आप्तेष्ट गुरूजन I सगुणावतार संतसज्जन II शरण्य सद्गुरु कैवल्यनिधान I साईभगवान नमियेले II . ५३, . २६ II गोधूमपेषण कथा सांगोन I महामारी पूर्णोपशमन II कैसे केले ते विशद करोन I साईसामर्थ्य वर्णिले II अ ५३, . २७ II   

अध्याय ५३(अवतरणिका) 

*      ग्रंथप्रारंभापूर्वी देवता, संत वगैरेंना वंदन

*      भक्तीचे प्रकार

जात्यावर गहू दळून बाबा महामारीचा बंदोबस्त करतात

अध्याय २  

कथाप्रयोजन

(ओवीसंख्या १९८)

या अध्यायात काय आहे

प्रस्तुत ग्रंथप्रयोजन I हेमाडपंत नामकरण II गुर्वनवश्यकता  विवादखंदनदर्शन हेमाडा 'द्वितीयाध्यायीं' II . ५३, . २८ II

अध्याय ५३(अवतरणिका)

*      श्रीसाईसच्चरितापूर्वीची बाबांची चरित्रे

*      श्रीसाईसच्चरित लिहिण्याची श्री. दाभोळकरांची कल्पना व तिला बाबांची अनुमती

कथा

*    दाभोळकरांचे नाव हेमाडपंत कसे पडले त्याची कथा  

*      उपकथा-दाभोळकर शिर्डीस जाण्यास निघताना चुकीच्या गाडीत बसले असताना अचानक अनोळखी यवन येऊन योग्य गाडीबद्दल मार्गदर्शन करतो

 


अध्याय ३  

ग्रंथप्रयोजनानुज्ञापन   

(ओवीसंख्या १८५)

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

ग्रंथ लेखन अनुज्ञापन I कैसे आले साईमुखांतून II

रोहिल्याचे वृत्तकथन I केले संपूर्ण तृतीयाध्यायी II २९ II

अध्याय ५३(अवतरणिका)

*       बाबांचे चरित्र लिहिण्याविषयी श्री. दाभोळकरांचे अधिक चिंतन. दाभोळकरांस निवृत्तीपश्चात नोकरी लागते आणि जाते

*      रोहिल्याची कथा

*      समारोप

या अध्यायाचे नाव आहे ग्रंथप्रयोजनानुज्ञापन, म्हणजे ग्रंथ लिहिण्याची आज्ञा. श्री. दाभोळकरांनी ग्रंथप्रयोजन मागील अध्यायात सांगितले व बाबांनी त्याच अध्यायात त्यास अनुमतीही दिली. त्यामुळे या अध्यायात तोच विषय पुढे नेला आहे.

बाबांचे चरित्र लिहिण्याचा श्री. दाभोळकरांचा विचार पक्का झाला आहे. बाबांची अनुमतीही मिळाली आहे. परंतु अजून मनाचा निश्चय  होत नाही. कारण त्यांना आपल्या क्षमतेविषयी शंका आहे. लोक ज्याप्रकारे अधर्माचरण करीत आहेत ते पाहून बाबांच्या चरित्राची आवश्यकता त्यांना वाटत आहे.

दाभोळकरांच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन पुरत नसल्याने त्यांना नोकरी लावण्याची विनंती अण्णांनी बाबांना केल्याची आठवण श्री. दाभोळकर सांगतात. बाबांनीसुद्धा ‘ नोकरी मिळेल. परंतु याने आता माझ्या सेवेसाठी अधिक वेळ दिला पाहिजे,’ असे सांगितले. नोकरी मिळाली तशी गेली, परंतु गुरुसेवेची प्रेरणा राहिली, असे दाभोळकर सांगून नोकरी देण्याचे गुळाचे बोट दाखवून बाबांनी गुरुसेवेचे कडू औषध आपल्या गळी उतरवले असे दाभोळकर सांगतात.

अध्यायात बाबांचे मधुर तत्त्वज्ञान आणि वचने आहेत. त्याचप्रमाणे रोहिल्याची गोष्ट सांगून बाबा भक्तीमध्ये धर्माची विभिन्नता मानत नसत, असे दाखवून दिले आहे.

 

 

 

अध्याय ४  

साईसमर्थावतरण    

(ओवीसंख्या १७५)

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

जगच्चालक-कंठाभरण I साधुसंतांचे अवतरण I भूमंडळी किंकारण I केले विवरण विस्तारें II ३० II

दत्तावतार अत्रिनंदन I साई साक्षाद्धरिचंदन I शिरडी क्षेत्री प्रथमागमन I वर्णन समग्र ‘चतुर्थी’ II ३१ II  

अध्याय ५३

*      संत कधी अवतार घेतात 

*      शिरडी क्षेत्राचा महिमा  

*      बाबांच्या वास्तव्याने शिरडीमध्ये विठ्ठलभक्तांना विठ्ठलाची तसेच दासगणूंना प्रयागक्षेत्राची अनुभूती     

*      दीक्षितांच्या वाड्यांची कथा, बुट्टींच्या वाड्याची कथा आणि समारोप

*      बाबांचे शिरडीतील बालवयातील वास्तव्य, गुरुस्थानाची कथा

*       

   अध्याय ५  

साई-पुन:प्रकटीभवन

(साईबाबांचे पुन्हा प्रगट होणे

(ओवीसंख्या १६६)   

या अध्यायात काय आहे

शिरडी क्षेत्री गुप्त होऊन I पुनश्च तेथे प्रकटन  I सकलां केले विस्मयापन्न I सघन पाटलासमवेत II ३२ II

गंगागीरादि संतसंमेलन I स्वशिरी वाहून दूरचे जीवन I कैसे निर्माण केले उद्यान I निरूपण समस्त ‘पंचमी’II ३३ II  

अध्याय ५३

*      साईबाबा पुन्हा शिरडीस कसे आले  

*      साईबाबांचे नाव ‘साईबाबा’ कसे पडले   

*      शिरडीतील संतांकडून बालवयातील बाबांची प्रशंसा, बाबांनी स्वहस्ते फुलविलेली बाग

*      भाई नावाच्या स्वामी समर्थांच्या भक्तांस स्वामी समर्थांचा ‘मी शिरडीत आहे’ असा दृष्टांत   

*      डोक्यास फडके आणि अंगात कफनी असा पोशाख साईबाबा का करू लागले    

*      साईबाबांचा शिरडीतील दिनक्रम     

*      पणत्यांत पाणी घालून साईबाबांचा दीपोत्सव      

*      साईबाबा जव्हारअल्लीचे शिष्यत्व पत्करतात       

*      देवीदासाकडून जव्हारअल्लीचा भ्रमनिरास आणि अध्यायाचा समारोप

१९१२- मशिदीचा जीर्णोद्धार

 

 अध्याय ७    

विविधकथानिरूपण  

(ओवीसंख्या १३१)

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

बाबांचा समाधिखंडयोग I धोती पोती इत्यादी प्रयोग I बाबा हिंदु कीं यवन ढोंग I संतांतरंग अगाध II ३५ II

बाबांचा पेहराव वर्तन दवा I चिलीम जाती धुनी दिवा I त्यांचा आजार त्यांची सेवा I अगम्य देखावा अवघाचि II३६II

भागोजी शिंद्याची महाव्याधी I खापर्डेसुत ग्रंथिज्वरौषधी I नाना पंढरीदर्शनबुद्धि I कथिती सुधी ‘सप्तकी’ II ३७ II  

अध्याय ५३

या अध्यायातील कथांचे नेमके वर्गीकरण कसे करावे याचा निश्चय न झाल्याने बहुधा श्री. दाभोळकरांनी या अध्यायाचे नाव 'विविधकथानिरूपण' असे ठेवले असावे. परंतु या अध्यायात प्रामुख्याने लोकांच्या दु:खांचे बाबांनी कसे निवारण केले त्याचे वर्णन आल्यामुळे श्री. दाभोळकरांनीच या अध्यायात वापरलेले 'परदु:खनिवृत्तिता' हे नाव शोभले असते

  

*       अध्यायारंभ आणि बाबांचे परोपकारी जीवन    

*       लोहाराच्या पोरीस वाचवण्यासाठी बाबा धुनीत हात घालतात आणि भागोजी शिंद्याने बाबांची केलेली सेवा   

*       दादासाहेब खापर्ड्यांच्या मुलाच्या ग्रंथिज्वराचे साकडे स्वीकारल्याने बाबांच्या कमरेस गाठी येतात

*       नानासाहेब चांदोरकरांच्या पंढरपूरला झालेल्या बदलीचे बाबांना ज्ञान आणि अध्यायाचा समारोप


अध्याय १०    

साईसमर्थमहिमानं

(ओवीसंख्या १५९)

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

 

लांब अवघी हात चार  I रुंद तशीच वीतभर I आढ्यास टांगिलेल्या फळीवर I शयन योगेश्वर बाबांचे II४४II केव्हा शिरडीत पद पडले Iकिती वर्षें वास्तव्य झाले I देहावसान कधी घडले I केले निरूपण हृदयंगम II ४५ II अंतरी शांत निरीच्छस्थिती I बाहेर दावीत पिशाचवृत्ती  I लोकसंग्रह नित्य चित्ती I अढळ प्रवृत्ती गुरुरायांची II४६II वेदशास्त्र-धर्म लक्षण I परमार्थ आणि व्यवहार शिक्षण I भक्ताभक्त-चित्त परीक्षण I हतवटी विलक्षण सद्गुरूंची II४७II बाबांचे आसन  बाबांचे ज्ञान I बाबांचे ध्यान  बाबांचे स्थान I त्यांचे सामर्थ्य आणि महिमान I कथन संपूर्ण दशमाध्यायी II४८II

अध्याय ५३(अवतरणिका)

या अध्यायाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बाबांची एकही गोष्ट नाही. परंतु यात बाबांच्या चमत्कृतियुक्त वर्तनाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे त्याचे 'साईसमर्थमहिमान' हे नाव सार्थ आहे.



अध्याय ११    

साईसमर्थमहिमावर्णनं

(ओवीसंख्या १५७)

 

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

सच्चिदानंदस्वरूपस्थिती I दिगंत बाबांची प्रख्याती I डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ति I सिदिकवृत्ती वर्णियेली II४९II कैसे केले अभ्राकर्षण  I कैसी अनिली सत्ता विलक्षण I अनलापासूनि संरक्षण  I सुरस वर्णन एकादशी II५०II

अध्याय ५३(अवतरणिका)

  • अध्यायारंभ -गुरु देहधारी असावा का, याविषयी श्री. दाभोळकरांचे मत (1-48)
  • तात्यासाहेब नूलकरांचे  स्नेही डॉ. पंडित निरागसपणे बाबांच्या कपाळास गंध लावतात (49-76)
  • मक्का-मदिनेची यात्रा  करून आलेल्या  सिदीक फाळके याची कथा (71-113)
  • बाबांच्या आज्ञेवरून वादळी  पाऊस थांबला (114-139)
  • बाबांनी सटक्याचे फटके मारून मशीदीस लागलेली आग विझविली (140-149)
  • अध्यायाची फलश्रुती (150-157)

होऊनि श्रद्धा-भक्तियुक्त I करील जो या अध्यायाचे नित्य  I

पारायण होऊनि स्वस्थचित्त  I आपदानिर्मुक्त होईल  II


अध्याय १२     

श्रीसंतघोलप-रामदर्शनं 

(ओवीसंख्या १८९)

 

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

काका धुमाळ, निमोणकर  I एक मामलेदार एक डॉक्टर  I प्रसंग भिन्न भिन्न प्रकार  I वर्णिले मधुर वाणीने II ५१ II नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी I संत घोलप रामानुयायी I त्यांची साईदर्शननवलाई I ‘द्वादशाध्यायीनिरूपिली II ५२ II                                                                                                                      अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ

*      बाबांच्या इच्छेशिवाय कोणी शिरडीत जाऊ शकत नसे किंवा राहू शकत नसे

*      बाबांच्या ठिकाणी मुळेशास्त्रींना त्यांच्या समाधिस्थ गुरु घोलपनाथांचे दर्शन

*      श्रीरामाचे भक्त असणाऱ्या एका डॉक्टरांना बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन


अध्याय १३     

भीमाजी क्षय निवारणं  

(ओवीसंख्या १९४)

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

बाळा-शिंपी हिमज्वरनाशन I केले कृष्णश्वाना दध्योदन देऊन I बापूसाहेब-महामारी-शमन I केले चारून अक्रोड पिस्ते II ५३ II आळंदी स्वामी कर्णयोगी I आशीर्वचनेचि केले निरोगी I जुलाब पीडा काका भोगी I नाशिली भुईमुगी दाण्यांनी II५४ II हर्द्याचे भक्त दत्तोपंत  I पोटशूळव्याधिग्रस्त  I आशीर्वादेंचि केले मुक्त  I समस्त जनांदेखत II५५II एका भीमाजी पाटलाला I कफक्षयाचा व्याधी जडला I उदी लावूनि रोग दवडिला I वृत्तांत वर्णिला 'त्रयोदशी' II५६II                                                             अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ

*      भीमाजी पाटलाचा क्षय बाबांनी बरा केला आणि इतर कथा

*      अध्यायाचा समारोप



अध्याय १४      

रतनजी साई समागम   

(ओवीसंख्या २१९)

 

 

 

 

 अध्यायात काय आहे

नांदेडचे शेट रतनजी पारसी I विख्यात व्यापारी खिन्न मानसी I पुत्रसंतान देऊन त्यांसी I हर्षाकाशी बैसविले II ५७ II मौलीसाहेब गुप्त संत I नांदेड शहरी हमाली करीत I साईसंकेतवचे ज्ञात होत I कथा अद्भुत चतुर्दशी’ II ५८ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ

*      शेठ रतनजी मुलगा होण्यासाठी साईबाबांच्या भेटीस येतात. साईबाबा त्यांना सांगतात की तुझ्याकडून मला तीन रुपये चौदा आणे मिळाले, बाकीची दक्षिणा मला दे. रतनजींनी पूर्वी मौलीबाबांना जेवावयास घातले होते. त्याचा सर्व खर्च तीन रुपये चौदा आणे भरतो.

*      अध्यायाचा समारोप



अध्याय १५      

चोळकरशर्कराख्यानं    

(ओवीसंख्या ११६)

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

नारदीय कीर्तनपद्धती I कथिती बाबा दासगणूप्रती II चोळकरांचे फेडूनि  घेती  I व्रत चहा सितां त्यां पाजुनी II५९II औरंगाबादेहुनि पल्ली आली I मशिदीतील पल्लीस भेटली  I चुकचुकण्यावरूनि वार्ता कथिली  I कथा निरूपिली पंचदशी’ II६०II 

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ

*      कीर्तनास साधेपणाने जाण्याविषयी बाबांचे दासगणूंना मार्गदर्शन

*      नवस पूर्ण न करता आल्याने श्री. चोळकर बिनसाखरेचा चहा पितात

*      पालीच्या चुकचुकण्याचा अर्थ बाबा सांगतात

*      अध्यायाचा समारोप आणि फलश्रुति

 


अध्याय १८       

मदनुग्रह    

(ओवीसंख्या १६३)

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

साठयांची गुरुचरित्रकथा I राधाबाईंची उपदेशवार्ता II हेमाडांची अनुग्रहता I कथनकुशलता 'अष्टाध्यायी' II ६६ II  

  

*      अध्यायारंभ

*      श्री. साठे गुरुचरित्राचा सप्ताह करीत असताना बाबा त्यांना स्वप्नात येऊन गुरुचरित्र समजावून सांगतात

*      श्री. साठे यांना बाबांचा अनुग्रह झाल्याने श्री. दाभोळकरांस शंका आणि बाबांकडून श्री. दाभोलकरांचे श्री. माधवराव देशपांडे ऊर्फ शामाकडून प्रबोधन

उपकथा-बाबांनी आपल्या भक्तांचे कल्याण साधण्यासाठी त्यांच्याकडून निरनिराळ्या  धर्मग्रंथांचे वाचन करवून घेतले

*शामाने श्री. दाभोलकरांना सांगितलेली कथा - राधाबाई देशमुख नावाच्या वृद्ध महिला बाबांकडून गुरुमंत्र मिळावा म्हणून हट्ट धरून बसतात (पूर्वार्ध) आणि अध्यायाचा समारोप


अध्याय १९        

मदनुग्रह    

(ओवीसंख्या २५६)


 


 

 

 

 

या अध्यायात काय आहे

अनुग्रहकथेचा विस्तार I साईश्रीबोधानुसार II

केला असे फार फार I विचार 'एकोनविंशती'  II ६७ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ

*      शामाने श्री. दाभोलकरांना सांगितलेली कथा - राधाबाई देशमुख नावाच्या वृद्ध महिला बाबांकडून गुरुमंत्र मिळावा म्हणून हट्ट धरून बसतात, बाबा तिचे समाधान करतात (उत्तरार्ध)

*      बाबांनी श्री. दाभोलकरांना केलेला उपदेश

*      दाभोळकरांना रामनामाचे आवर्तन करण्याची इच्छा होते आणि सकाळीच त्यांना औरंगाबादकरांच्या रामाच्या भजनाने जाग येते

*      डुक्कर विष्ठा भक्षण करीत असता बाबा निंदकांना त्यांच्याकडे निर्देश करतात

*      बाबा घराच्या छपरास शिडी लावून शिडी वापरण्याचे मोल दोन रुपये देतात, अध्यायाचा समारोप 



 

 

अध्याय २१         

अनुग्रहकरणं

(ओवीसंख्या १३०)

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

एक प्रांताधिकारी सुलक्षण I दुसरे पाटणकर विचक्षण II तिसरे एक वकील विलक्षण I अनुग्रहण तिघांचे एकविंशती’ II ७० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

 

अध्याय २२         

सर्प-वृश्चिक- संकट-निवारणं

(ओवीसंख्या २३५)

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

मशीद माई भवतारका I तीच द्वारावती द्वारका II बाबा कथिती सकल लोकां I भावार्थ एकाही नकळे II ७१ II मशीद माईचे गुण  वानिती I  मिरीकर, बुट्टींचे अहिदंश टाळिती II अमीर सक्काराचा वात हरिती I वारिती अहिदंश तयांचे II ७२ II हेमाड वृश्चिकदंश-संकट I इतरांवरचे उरगारिष्ट II निवारीत अपमृत्यु दुर्घट I प्रसंग प्रकट 'द्वाविंशती' II ७३ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ-साप आणि दोरीचे उदाहरण, बाबांच्या गुडघ्यावर हात ठेवून बसण्याच्या स्थितीचे विश्लेषण (-२५)

*      काकासाहेब मिरीकरांच्या उपरण्यावर बसलेला साप वेळीच लक्षात येतो  (२६ ते ९२)

*      बापूसाहेब बुट्टी शौचविधीस गेले असता भयंकर साप तेथे येतो, परंतु बापूसाहेबांस अपाय न होता साप निसटून जातो (९३-१०५)

*      अमीर शक्कर एका फकीरास पाणी पाजतो आणि फकिराचा अचानक मृत्यू होतो (१०६-१५३)

*      अमीर शक्करचे  सापापासून रक्षण  (१५४-१८१ )

*      श्री. दाभोलकरांच्या उपरण्यावर विंचू आढळतो, परंतु दाभोळकरांस इजा होत नाही (१८२-२०८)

*      काकांच्या  घरी साप येतो, परंतु कोणास इजा न करता निघून जातो, अध्यायाचा समारोप-साप, विंचू इत्यादी प्राण्यांविषयी बाबांचे मत (२०९-२३५)


अध्याय २ ३         

गुरुभक्तलीलादर्शनं

(ओवीसंख्या २०५)

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

योगाभ्यासियाचे शंका निरसन  I माधवरावांचे अहिदंश निवारण II धुनी, इंधन, अजाहनन I वर्णन केले अतिरम्य II ७४ II  बडेबाबाची बडेजाव I गुर्वाज्ञा निष्ठाअभाव II किती दिले तरी बहू हांव I अतृप्त स्वभाव मूळचा II ७५II  काकासाहेब भक्तश्रेष्ठ I गुर्वाज्ञी परमैकनिष्ठ II सद्गुरुलीलाकथनविशिष्ट I केले उत्कृष्ट 'त्रयोविंशती' II ७६ II  

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-११)

*      बाबांना कांदा खाताना पाहून एका योगाभ्यास्यास बाबांच्या योग्यतेबद्दल शंका येते. बाबांकडून त्याचे समाधान (१२-२०)

*      शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस सर्पदंश झाला असता बाबा 'ओसरीवर चढू नको' अशी आज्ञा विषास देऊन विषनिवारण करतात (२१-६६)

*      शिरडीत महामारीची साथ आली असता गावात बाहेरची कुठली गाडी येण्यास मनाई असताना बाबा बाहेरच्या गाडीवाल्याकडून धुनीसाठी लाकडे घेतात. धुनीचे माहात्म्य. (६७-१०३)

*      मरणासन्न झालेल्या बोकडास मारण्याच्या बाबांनी केलेल्या आज्ञेचे पालन करण्याची काकासाहेब दीक्षितांची तयारी. परंतु बोकडाचा मृत्युसमय जवळ आल्याने बोकडाचा आपोआप मृत्यू. अध्यायाचा समारोप. (१०४-२०५)



अध्याय २४         

विनोदविलसितं

(ओवीसंख्या १४४)

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

फुटाण्याचे निमित्त करून I हेमाडपंतां देती शिकवण II सदगुरुस्मरण केलियावीण I विषयसेवन न करावा II ७७ II अण्णा बाबरे व मावशीबाई I कलह दोघांत लाविती साई II त्या विनोदमस्करीची नवाई गाई I कविवर्य चतुर्विंशती II ७८ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - थट्टाविनोदातून  बाबांची शिकवण (-१४)

*      श्री दाभोळकरांच्या कोटाच्या अस्तनीवर पाच-पंचवीस फुटाणे आढळून येतात आणि बाबांकडून त्यांची थट्टामस्करी व उपदेश (१५-७३)

*      सुदाम्याची कथा-गुरुपत्नीने सर्वांसाठी चणे दिले असता सुदामा ते एकट्याने खातो आणि पुढे त्यास दारिद्र्य भोगावे लागते (७४-८७)

*      अण्णा चिंचणीकर आणि मावशीबाई बाबांची सेवा करीत असता अण्णांचे तोंड मावशीबाईंच्या तोंडाजवळ जाते आणि त्या अण्णांवर त्यांचा 'मुका घेण्याचाआरोप करतात. बाबा हसत खेळत दोघांस शांत करतात (८८-१२४)

*      मावशीबाई बाबांचे पोट जोरात रगडत असता भक्त त्यांना हळू रगडण्यास विनंती करतात आणि बाबा 'मी कणखर आहे' हे दाखवण्यासाठी सटक्याचे एक टोक खांबास लावून दुसरे टोक पोटात खुपसतात. अध्यायाचा समारोप  (१२५-१४४)

 

अध्याय २ ५         

भक्ताभीष्टसंपादनं  

(ओवीसंख्या १२६)

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

भक्त दामूअण्णा कासार I अहमदनगरचे राहणार II करूं इच्छिती फार थोर I व्यापार कापूस तांदुळाचा II ७९ II उद्यमी होईल हानी सत्य I आम्रफलसेवनी  प्राप्त अपत्य I वदती साई ज्ञानादित्य I निरूपण कृत्य पंचविंशती II ८० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

 

*      अध्यायारंभ ((-१३)

*      दामू अण्णा कासार यांस मित्राकडून कापसाच्या व्यापारातील भागीदारीचा प्रस्ताव, परंतु बाबा त्यास नकार देऊन पुढील नुकसानीपासून वाचवितात (१४-८५)

*      बाबांनी  दिलेले आंबे खाल्यानंतर दामूअण्णांच्या पत्नीस पुत्रप्राप्ती (८६-१०३)

*      अध्यायाचा समारोप (१०४-१२६)

 

 

अध्याय २६         

अपस्मारात्महत्त्यानिवारणं तथा निजगुरूपदस्थिरीकरणं   

(ओवीसंख्या १५६)

 

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

भक्त एक नामे 'पंत' I अन्य संतानुग्रहीत पाठवून दिली त्या खूण त्वरित II पंत प्रमोदित जाहले II ८१ II हरिश्चंद्र पितळे  भक्त I तदीय तनय अपस्मारग्रस्त II कृपावलोकनेचि  समस्त I रोग अस्त पावला II ८२ II दिले पितळ्यांस रुपये तीन I म्हणती  पूर्वी दिले दोन II बाबा वदती करी पूजन I रुचिर कथन 'षड् विंशति'  II ८३ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

चिंतन

मनोमन करिता बाबांचे स्मरण अंतश्चक्षूंनी घेता बाबांचे दर्शन II

सदैव गाता  बाबांचे गुणगान   I  होईल सार्थक जन्माचे II (स्वविचार)  

 

*      अध्यायारंभ; बाबांची आंतरिक पूजा करण्याविषयी श्री दाभोळकरांचे मार्गदर्शन  (- ३७)

*      बाबांशिवाय इतर व्यक्तीस गुरू मानणारे पंत नावाचे गृहस्थ बाबांच्या भेटीस गेले असता मूर्च्छित होऊन पडतात; बाबा त्यांस आपल्या गुरुशीच एकनिष्ठ राहण्याचा संकेत देतात (३८-५६)

*      हरिश्चंद्र पितळे  यांच्या मुलाचा अपस्मार बाबा बरा करतात व त्यांस तीन रुपये देऊन आधी दिलेल्या दोन रुपयांमध्ये हे तीन रुपये ठेवून त्यांची पूजा करण्यास सांगतात (५७-११२)

*      बाबांचे एक भक्त गोपाळ नारायण आंबेडकर दारिद्र्यामुळे आत्महत्त्येस जात असता एक खानावळवाले त्यांस अक्कलकोट स्वामींची पोथी वाचण्यास देतात; या पोथीतील आत्महत्त्येच्या निष्फळतेवरील अध्याय वाचून आंबेडकर आत्महत्त्येपासून परावृत्त होतात; अध्यायाचा समारोप (११३-१५६)


अध्याय २७         

दीक्षानुग्रहदानं     

(ओवीसंख्या २०२)

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

भागवत पोथी हाती देऊन I आपण घ्यावी प्रसाद म्हणून II देती काका इच्छा धरून I भगवान देत ती  माधवा II ८४ II विष्णुसहस्रनामाची पोथी I एका रामदाशाचे पोथ्यांत होती I त्या न कळत बाबा घेती II तीही देती माधवरावा II ८५ II विष्णुसहस्रनामाची पोथी  देऊन I शामरावावर करिती अनुग्रहण II कैसे करिती साई दयाघन कथानिरूपण सप्तविंशती’  II ८६ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

चिंतन

बाबांनी भक्तांना निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे  वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे  घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला होता.

*      अध्यायारंभ (- ३०)

*      काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)

*      एका रामदासी बुवाची  विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )

*      बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)

*      दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)



अध्याय २९         

स्वप्नकथाकथनं        

(ओवीसंख्या १९३)

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

मद्रदेशीचा भजनी मेळा  I शिरडी क्षेत्री झाला गोळा II बघाया दानौदार्य सोहळा I भोळा शंकर बाबांचा II ८९ II रघुनाथराव तेंडुलकर I तत्तनय परीक्षाप्रकार II  त्यांची पेन्शनचिंता दूर I मनोहर लीला बाबांची II ९० II भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे I साईचरणी प्रेम मोठे II दिले स्वप्नदर्शन पहाटे I कथानक गोमटे 'एकोनत्रिंशती' II ९१ II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ. बिदागीच्या आशेने मद्रासी लोकांच्या भजनी मेळ्याची बाबांस भेट. मेळ्यातील एका बाईंस  बाबांच्या ठिकाणी श्रीरामाचे दर्शन तर तिच्या पतीस भीतिदायक स्वप्नात बाबांचा दृष्टांत (-९२)

*      उपकथा- बाबांचे लहान मुलांवरील प्रेम-अमनी नावाच्या लहान मुलीला बाबा रोज दोन रुपये देत

*      परीक्षेसाठी ग्रहदशा अनुकूल नसल्याचे ज्योतिष्याने रघुनाथराव तेंडुलकरांच्या मुलास सांगितले असतानाही बाबांच्या सांगण्यावरून तो परीक्षेस बसतो आणि पास होतो (९४-१२९)

*      बाबांच्या कृपेने रघुनाथराव तेंडुलकरांस पुरेसे पेन्शन मिळते  (१३०-१४४)

*      स्वप्नातील दृष्टांतानुसार कॅप्टन हाटे बाबांसाठी शिधा आणि वालपापडीच्या शेंगा पाठवतात. बाबा सर्व पदार्थांतून वालपापडीच्या शेंगांची निवड करतात (१४५-१६०

*      बाबांनी स्पर्श केलेला रुपया आपल्याकडे असावा या हेतूने वामन नार्वेकर बाबांकडे रुपया पाठवतात. परंतु हा रुपया परत न करता बाबा ठेवून घेतात . अध्यायाचा समारोप (१८०-१९३)

 



अध्याय ३२          

गुरुमहिमावर्णनं              

(ओवीसंख्या १७४)

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

आम्ही चौघे सज्जन संत I देव शोधार्थ रानी हिंडत II

मी होताच अभिमानगलित I दर्शन मज देत गुरुराय II ९७ II

उपोषण करणार गोखलेबाई I अशीच दुजी कथा साई II

सांगत स्वमुखे त्याची नवाई I हेमाड गाई 'द्वात्रिंशती' II ९८II

*      अध्यायारंभ (-३६)

*      बाबांनी सांगितलेली स्वानुभवाची कथा- बाबांसह चार जण रानात गुरूचा शोध करतात, बाबांचे गुरू बाबांना विहिरीत उलटे बांधून जातात.  (३७-१२१)

*      शिमग्याच्या दिवशी उपवास करण्याच्या इच्छेने बाबांकडे आलेल्या एका बाईंकडून  बाबा पुरणपोळ्यांचे भोजन करवून घेतात (१२२-१४८)

*      बाबांनी सांगितलेली गोष्ट - बाबा पोटापाण्यासाठी बीड गावी जरीचे काम करतात आणि त्यांचे काम सर्वांत चांगले झाल्यामुळे मालक त्यांना पागोटे-आणि शेला यांनी युक्त असा पोशाख भेट देतो. अध्यायाचा समारोप. (१४९-१७४)

 

 

 अध्याय ३३          

उदीप्रभाव              

(ओवीसंख्या २३९)

या अध्यायात काय आहे

नारायण जानीचे मित्रास | जाहला एकाएकी व्रुश्चिकदंश || एका भक्ताचे कन्यकेस | दिधला त्रास ज्वराने || ९९|| चांदोरकरसुतेस भारी | प्रसूतिवेदना करी घाबरी | जानी स्वत: दु:खित अंतरी | तिळभरी सुचेना कोणाला ||१०० || कुलकर्णीसाहेब भक्तवर | बाळाबुवा भजनकार || उदीप्रभाव बलवत्तर | कळला खरोखर सर्वांना || १०१|| भक्त हरीभाऊ कर्णिक | श्रद्धावंत आणि भाविक | त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक | बोधप्रद 'त्रयस्त्रिंशती' || १०२||

अध्याय ५३(अवतरणिका)

 

*      अध्यायारंभ. उदीचे महत्त्व आणि बाबांचे उदीवरील प्रेम (-३३)

*      उदीमुळे नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीची बाळंतपणाच्या वेदनांतून सुटका. 'आरती साईबाबा' या माधव अडकरांच्या आरतीचे महत्त्व (६३-११९)

*      बाबांचे निर्वाण झाल्यानंतरही नारायण मोतीराम आजारी असताना  बाबा त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन बरे करतात (१२०-१४०)

*      अप्पासाहेब कुलकर्णी यांची कथा (अप्पासाहेब कुलकर्णी घरी येऊन गेलेल्या फकीरास दहा रुपये दक्षिणा देण्याचे ठरवतात. फकीर सापडल्यानंतर अप्पासाहेब कुलकर्णी यांच्याकडून दहाच रुपये दक्षिणा मागून घेतो)  ( : (१४१-१९६

*      हरिभाऊ कर्णिक यांची कथा (हरिभाऊ कर्णिक यांची बाबांस द्यावयाचा राहून गेलेला दक्षिणेचा रुपया नाशिकच्या काळा राम मंदिरातील नरसिंगजी महाराज मागून घेतात.) अध्यायाचा समारोप (१९७-२३९)




अध्याय ३५          

चिकित्साखंडनं-विभूतिमंडनं  

(ओवीसंख्या २३३)

या अध्यायात काय आहे

महाजनींचे मित्र एक | निर्गुणाचे पूर्ण भजक || ते बनले मूर्तिपूजक | दर्शनैकमात्रेकरूनि || १०७ || धरमसी जेठाभाई ठक्कर | मुंबईचे एक सॉलिसिटर || सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर | करूनि गुरुवर त्या देती || १०८ || वांद्र्याचे एक कायस्थ | त्यां नींद ये स्वस्थ || बाळा पाटील नेवासस्थ | उदीप्रचीत 'पंचत्रिंशती' || १०९ ||

अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-२४)

*      मूर्तिपूजेच्या विरुद्ध असणाऱ्या काका महाजनींच्या मित्राची गोष्ट (२५-५८) बाबा त्यांना 'का यावे जी' म्हणून विचारतात जसे त्यांना फक्त त्यांचे वडीलच विचारीत असत.

*      धरमसी जेठाभाईंची गोष्ट (काका महाजनी यांच्या पदरी काम करीत) (६१-१५७)

*      वांद्र्याच्या एका कायस्थ मनुष्याच्या स्वप्नात मृत वडील येऊन शिव्याशाप देतात. रात्री उदी लावून झोपताच हा त्रास थांबतो (१५८-१७३)

*      बाबांचे भक्त बाळाजी पाटील नेवासकर यांची कथा (१७४-१९६) बाळाजी पाटील नेवासकरांच्या श्राद्धाच्या दिवशी अंदाजापेक्षा जास्त पाहुणे येतात. परंतु त्यांच्या पत्नी प्रत्येक भांडे कपड्याने झाकून भांड्यात बाबांची उदी घालून सुनेला पाहुण्यांना अन्न वाढण्यास सांगतात. प्रत्यक्षात सर्व पाहुणे जेवून जातात आणि अन्न शिल्लक राहते.

*      बाळाजी पाटील नेवासकरांच्या घरी भुजंग आला असता ते भुजंगास बाबांचेच रूप मानून दूध अर्पण करतात. भुजंग दूध पिऊन निघून जातो. अध्यायाचा समारोप (१९७-२३३)

 

अध्याय ३७          

चावडीवर्णनं       

(ओवीसंख्या २२०)

या अध्यायात काय आहे

चावडी समारंभ सोहळा I इतरत्र पाहण्या मिळे विरळा II

हेमाड वर्णिती पाहूनि डोळां I कथा रसाळा 'सप्तत्रिंशती ' II ११३ II

अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-११५)

*      चावडीवर्णन. अध्यायाचा समारोप (११६-२२०)

 

अध्याय ४०           

उद्यापन कथाकथनं       

(ओवीसंख्या १७५)

या अध्यायात काय आहे

मातु:श्रीचे व्रतोद्यापन | देव घालिती ब्राह्मणभोजन || बाबांस देती निमंत्रण | पत्रलेखन करूनिया || .४०, .११७|| यतिवेष धारण करून | तद्दिनी येती विभूती तीन || ब्राह्मणांसमवेत जाती जेवून | कळे विंदान गुरुरायाचे || .४०, .११८|| दृष्टांत देऊनि हेमाडास | बाबा येती भोजनास || छबीरूपी धरूनि वेष | वर्णन सुरस 'चत्वारिंशती' || .५३, .११९||

अध्याय ५३(अवतरणिका)


*      अध्यायारंभ

*      बाळासाहेब देवांच्या आईच्या व्रताचे उद्यापन

*      श्री. दाभोळकरांच्या घरी  मूर्तिरूपाने बाबांचे आगमन


  अध्याय ४१            

साईकृपानुग्रहदानं      

(ओवीसंख्या १७३)

या अध्यायात काय आहे

छबीचीच कथा विस्तारून | सांगती कवी भक्तालागून || सद्गुरूचे अतर्क्य महिमान | निरूपण रमणीय रसाळ || १२०|| धारण करूनि रुद्रावतार | होती लाल खदिरांगार | करिती गाळीचा भडिमार | क्रोधे देवांवर श्रीसाई || १२१|| 'नित्य नेमे श्रीज्ञानेश्वरी | वाच' म्हणती साई श्रीहरी | स्वप्नी कथिती वाचनाची नरी | हेमाड विवरी 'एकचत्वारिंशती' || १२२||

अध्याय ५३(अवतरणिका)

 

*      अध्यायारंभ (-२०)

*      अली मुहंमद याने सांगितलेली बाबांच्या चित्राची कथा (२१-७३)

*      श्री देवांस ज्ञानेश्वरी वाचनाबद्दल मार्गदर्शन अध्यायाचा समारोप (७४-१७३)

 

 

 

एप्रिल १९१४- बाबा देवांच्या स्वप्नात येऊन देवांच्या ज्ञानेश्वरी वाचनाविषयी चौकशी करतात

 

  

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

एकदा काकासाहेब दीक्षित | काका माधवासमवेत || वाचीत असता नाथ भागवत | शंकित मानसी जाहले || .४५, .१२६|| माधवराव शंका निरसित | समाधान पावे दीक्षितचित्त || आनंदराव पाखाडे स्वप्न कथीत | करीत निरसन शंकेचे || .४५, .१२७ || आढ्यास टांगल्या फळीवरी | म्हाळसापती कां निद्रा करी || साई समर्थ शंका निवारी | कथाकुसरी 'पंचचत्वारिंशतीं' || .५१, .१२८||

अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (. -४२)

*      स्वप्नातील साईदर्शन आणि धोतराचे दान (. ४३ ते १२५)

*      बाबा फळीवर का झोपू शकत होते, याचे स्पष्टीकरण. अध्यायाचा समारोप

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

जागीच बैसूनि अटन सर्वत्र | दावीत जनां चमत्कृतिसत्र || काशी गया गमन विचित्र | अद्भुत चरित्र बाबांचे || १२९ || चांदोरकरसूनु लग्न-पर्वणी | शामास जाण्या कथी संतमणी || शामा देखे बाबा ईक्षणी | गयापट्टणी छबीरूपे || १३० || अजद्वय-पूर्व-जन्मकथन | करिती स्वमुखे साईत्रिनयन | |  रम्य मधुर पवित्र गहन | कथावर्णन 'षट्चत्वारिंशती' || १३१ ||

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

 

*      अध्यायारंभ (-२४)

*      गयेमध्ये शामाआधी बाबा पोहचतात

*      दोन शेळ्यांची कथा

 

अध्याय ४८         

साशंकभक्तानुग्रहकरणं     

(ओवीसंख्या १७९)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या अध्यायात काय आहे

एक शेवडे भक्तप्रवर I एक अभाविक सपटणेकर II

एकाचा  वकीलीपरीक्षाप्रकार I कृपा दुज्यावर 'अष्टचत्वारिंशती' II १३४ II

                                                                        अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-५०)

*      शेवडे यांची कथा (५०-६८)

*      सपटणेकरांची कथा (६९-१७९)

अध्याय ५०            

अज्ञाननिरसनं       

(ओवीसंख्या २१५)

 

या अध्यायात काय आहे

तद्विध्दि प्रणिपातेन I  याचाच अर्थ विस्तारून II करिती त्याचेच समर्थन I रघुनाथनंदन 'पंचाशती' II १३८ II

अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-३५)

*      भगवद्गीतेतील  'उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं' हा श्लोक 'उपदेक्ष्यन्ति तेSज्ञानं' असा वाचला तर काय अर्थ होईल असा प्रश्न नानासाहेब चांदोरकरांना विचारून बाबा 'उपदेक्ष्यन्ति तेSज्ञानं' ला सुद्धा अर्थ आहे हे स्पष्ट करतात. अध्यायाचा समारोप (३६-२१५)   

अध्याय ५१          

भक्तत्रयवृत्तकथनं  (ओवीसंख्या २५०)

"शुक्लपक्षाचिया चढत्या कला तेणेंपरी भजे जो मजला धन्य जेणें मनोधर्म आपुला निःशेष विकला मदर्थ ॥२११॥ दृढ विश्वास धरोनि मनीं प्रवर्ते जो निजगुरू - भजनीं तयाचा ईश्वर सर्वस्वें ऋणी पाही   कोणी वक्र तया ॥२१२॥ वायां दवडितां अर्धघडी जयासी हरिगुरूभजनीं आवडी तया ते देतील सुख निरवडी भवपैलथडी उतरतील " - सा. . . ५१वा

या अध्यायात काय आहे

दीक्षित हरी सीताराम I भक्त धुरंधर बाळाराम II नांदेड वकील पुंडलीक नाम I शिरडी प्रथम पातले कैसे II १३९ II एकेकाची कथा अद्भुत I श्रवणी श्रोते होत विस्मित II भक्त मनोदचि उचंबळत I वृत्त वर्णिती एक पंचाशती

II १४० II

अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ (-१८)

*      हरी सीताराम दीक्षित यांची कथा. (१९-१२०)

*      वासुदेवानंद सरस्वती यांची कथा (१२१-१८३)

*      बाळाराम यांची कथा (१८४-२५०)

 



 

 

 

 

 

 

 

 






Sunday, May 5, 2024

संस्कृत-भाषान्तराणि

 


संस्कृत-भाषान्तराणि 


© Dr Hemant Junnarkar, All rights reserved


संस्कृत-भाषा  मह्यं अतीव रोचते . मया संस्कृतभाषायां कृतानि कतिपयानि भाषान्तराणि अत्र दत्तानि . पाठका: प्रतिक्रिया: च सूचना: च अवश्यं लिखिताव्या: 


फुलपाखरू  

छान किती दिसते | फुलपाखरू ||
या वेलींवर | फुलांबरोबर 
गोड किती हसते | फुलपाखरू ||
पंख चिमुकले | निळेजांभळे ||
हालवुनी झुलते | फुलपाखरू ||
डोळे बारीक  | करिती लुकलुक |
गोल मणी जणु ते | फुलपाखरू ||
मी धरु जाता | येइ न हाता |
दूरच ते उडते | फुलपाखरू ||
-ग.ह.पाटील

(टीप: सदर कथा किंवा कविता यांच्यावर आमचा कोणताही हक्क नाही. या कथा किंवा कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)

 पुष्पपतङ्ग:

दृश्यते बहु रुचिर: पुष्पपतङ्ग:

आसां वल्लीषु, तेषु सुमनेषु

उपविश्य हसति, पुष्पपतङ्ग:

यस्य पक्षे कोमले, नीललोहिते

मुहु: मुहु: दोलायते, स: पुष्पपतङ्ग:

लघुनी लोचने, गोलमणिदर्शने

यस्य व्यस्ते स्फुरणे, स: पुष्पपतङ्ग:

धारयितुं तं , मया कुर्वता यत्नम्

डयति स: दूरं, पुष्पपतङ्ग:



कवि-कुसुमाग्रज: 

अनामिकास 

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा

(टीप: सदर कथा किंवा कविता यांच्यावर आमचा कोणताही हक्क नाही. या कथा किंवा कवितांचा पूर्णतः हक्क त्यांचे मूळ लेखक/कवी यांचा आहे. ही पोस्ट फक्त मनोरंजन/वाचना  साठी केलेली असून या पोस्ट द्वारे आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या या लिखाणावर हक्क दाखवत नाही आहोत.)


अनामिकं वीरं प्रति

अनाम वीर, त्वया यत्स्थले कृतं प्राणत्यागम् 
नास्ति स्तम्भ: दीप: अथवा तत्र स्मरणार्थम् || ध्रु.||
देशाकाश: समरस्य यदा ज्वालाभि: ज्वलित: 
स्वदहनार्थं भवपाशं त्वं परित्यज्य विगत: || १ || 
सन्ध्यातेज: अन्ध:कारे गच्छति लुप्तत्वम्
आशां भयंश्च त्यक्त्वा मरणे तथा विलीतस्त्वम् || २ || 
जनसमूह: नैव तवोपरि भक्तिं वर्षितवान्  |
इतिहासे तव नाम न कश्चन कदा अभिलिखितवान् ||३ ||
नैव गायको वाद्ये गायति तव सुयशोगानम् |
सफलीभूतं तवैव नूनं एतद्बलिदानम् || ४ ||
तिमिरादुदेति शुभ्रतारका नभसि जयस्येयम् |
हे मृत्युंजय वीरोत्तम त्वां नमाम्यहं प्रथमम् || ५ ||





 


 

 

Saturday, May 4, 2024

मे फील्ड गार्डन (Mayfield Garden)ची सफर

 

मे फील्ड गार्डन (Mayfield Garden)ची सफर : 

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved


Mayfield Garden

Location : 530, Mayfield Road, Oberon, New South Wales 2787, Australia, approximately 200 KMs west of Sydney 

Open 9.00am
Last Entry 3.00pm
Garden Closes at 4.30pm

Address:

530 Mayfield Road
Oberon NSW 2787 Australia

Contact:

+61 2 6336 3131 info@mayfieldgarden.com.au

Website: www.mayfieldgarden.com.au 

 

मित्रांनो, २५ एप्रिल २०२४ ला ऑस्ट्रेलियामध्ये  ॲंझॅक डेची सुट्टी असल्याने आम्ही मे फील्ड गार्डनची सफर केली. या सफरीचा  थोडक्यात वृत्तांत येथे दिला आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.  


मेफील्ड गार्डनची वैशिष्ट्ये:

Water Garden and Bluestone Bridge

Mobility-friendly Camelia Walk

Grotto

16.5 Metre Obelisk, Pond and Allee of London

Sandstone Gallery

Valley of the Five Ponds

Iron and Stone Arbour

Copper Tree Fountain

The Famous Mayfield 1.4km English Box Hedge Maze

Croquet Lawn

Rowing on the Lake

Family Chapel

Amphitheatre

Water Cascade

Stumpery

Moss Creek Garden

Herbaceous Border



सिडनीमध्ये राहून आम्हाला पंधरा वर्षांहून अधिक काळ झाला. परंतु आम्हाला मेफील्ड गार्डनची माहिती नव्हती. २५ एप्रिल २०२४ ला येथे ॲंझॅक डेची सुट्टी असल्याने माझे व्याही श्री. देवेंद्र पाटील यांनी मेफील्ड गार्डनच्या पिकनिकचा बेत सांगताच आम्ही तयार झालो.

सकाळी ७.०० वाजता आम्ही आमचे घर पॉंड्स येथून प्रवासाला कार ड्राइव्हने सुरुवात केली. मेफील्ड गार्डन ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यातील ओबेरॉन टाऊनमधील एक निसर्गरम्य उद्यान आहे. सिडनीपासून निघाल्यास साधारण २०० किमी अंतरावर  ब्लू माऊंटनच्या पुढे हे ठिकाण आहे.

वाटेत एक किरकोळ हॉल्ट घेऊन सकाळी १०.०० वाजता आम्ही मेफील्ड गार्डनला पोहचलो. या उद्यानाची कथा अशी आहे:

१९८४ मध्ये मे हॉकिन्स नावाच्या कुटुंबाने मेफील्ड नावाचे फार्म  घेऊन सुरुवातीला केवळ कसण्यासाठी शेत म्हणून बाळगलं होतं. आता हे फील्ड स्थानिक लॅंडस्केपर्स आणि व्यापारी लोकांच्या मदतीने निव्वळ घोड्यांच्या तबेल्यांपासून या  खाजगी मालमत्तेचं जगातील एक थंड वातावरण असलेल्या उद्यानांमध्ये रूपांतर केलं आहे.

या उद्यानाची प्रेरणा युरोपातील उद्यानांवरून घेतली आहे. उद्यानाचा विस्तार ६५ हेक्टर्स (१६० एकर्स) असून उद्यान ख्रिसमस आणि बॉक्सिंग डे हे दोन दिवस सोडून वर्षभर पर्यटकांसाठी उघडे असते.

येथे पोहचताच प्रसन्न हवा जाणवू लागते आणि सुंदर निसर्गदृश्ये पाहावयास मिळतात. त्यामुळे प्रत्येक जण मोबाइल कॅमेरा सरसावून लागतो. सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी बरीच होती. गाडी पार्क करून आम्ही गार्डनच्या प्रवेशद्वाराशी आलो. आत प्रवेश करण्यासाठी $३८ प्रतिव्यक्ति तिकीट आहे. देवेंद्र यांनी तिकिटे ऑनलाइन बुक केली होती. तिकीट घेऊन प्रवेश केला आहे हे कळावं म्हणून मनगटाला लावण्यासाठी एक कागदी बॅंड देतात. तिकीट खूप जास्त वाटते. परंतु आत गेल्यावर अतिशय सुंदर देखभाल केलेले उद्यान पाहिल्यावर वाटते की उद्यानाच्या देखभालीसाठी एवढा खर्च निश्चित येत असावा.

प्रवेशद्वारापाशी प्रसाधनगृह आहे. येथेच प्रसाधन उरकून घ्यावे. कारण आत गेल्यावर एवढ्या मोठ्या परिसरात एकच प्रसाधनगृह आढळले आणि तेही अतिशय अस्वच्छ होते.

प्रवेशद्वाराजवळच मेफील्ड कॅफे आणि रिटेल सेंटर आहे.

हॉकिन्स परिवार नियमित युरोपला भेट देत असतात. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय दर्जाप्रमाणे या कॅफे मध्ये पदार्थांचे आयोजन करतात. परंतु यामध्ये मुख्यतः ऑस्ट्रेलियन लोकांच्या आवडीनिवडींचा विचार केला जातो. 

येथील रिटेल सेंटरमध्ये जॅम्स, पिकल्स असे विविध पदार्थ उपलब्ध आहेत. शिवाय येथे थंड हवामनास उपयुक्त असे निरनिराळे प्लांट्स सोयीस्कर पॉट्समध्ये विक्रीसाठी उपल्ब्ध आहेत.

आम्ही इन्फर्मेशन सेंटरमधून उद्यानाचा नकाशा घेतला आणि उद्यानात प्रवेश केला.  उद्यानात प्रवेश करण्यापूर्वी नकाशा जरूर घ्यावा. कारण येथे प्रत्येक   उद्यानात प्रवेश केला की दुतर्फा कधी न पाहिलेली अशी सुंदर रंगीबेरंगी झाडे दिसू लागतात.


Box Hedge Maze:

(Box Hedge Maze वरून असा दिसतो)

हा एक व्यवस्थित कटिंग केलेल्या झाडांच्या भिंती असलेला एक बॉक्सच्या आकाराचा चक्रव्यूह  आहे. यात शिरले की फक्त चालत राहायचे. मध्ये मध्ये हिंट देणाऱ्या छोट्या पाट्या आहेत. तुम्ही नुसते चालत राहता. त्यामुळे हिंट पाहण्याचा मोह आवरत नाही. मध्यभागी गेल्यावर छोट्या पायऱ्या असलेली शिडी चढून वर जाऊन सेल्फी घ्यायची. परत येतानासुद्धा तीच हालत होते.

Water Garden:

या वॉटर गार्डनचे क्षेत्रफळ २.५ हेक्टर आहे. येथे सुंदर तलाव असून तलावात लिलीची कमळासारखी फुले फुललेली दिसतात.

नौकानयन:

येथील तलावामध्ये नौकानयन किंवा बोटिंगला परवानगी आहे. तुम्हाला बोट घेऊन स्वतः वल्ही मारत त्यांच्या सूचनांचा पालन करून बोटिंग करावं लागतं. 


Copper Tree Fountain:











Tuesday, April 23, 2024

सुलभ श्रीमद्भगवद्गीता

                                 


सुलभ श्रीमद्भगवद्गीता 









सुलभ श्रीमद्भगवद्गीता
मनोगत


भगवद्गीतेची ओळख मला कधी झाली? माझ्या मोठ्या भावाला शाळेत एका स्पर्धेमध्ये सार्थ भगवद्गीता बक्षीस मिळाली. तेव्हापासून मी भगवद्गीता वाचतो आहे. शाळेमध्ये भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठांतरासाठी असे. 

माझ्या बहिणीला शालेय अभ्यासक्रमात पूज्य विनोबा भावे यांची 'गीताई' होती.  भगवद्गीता ज्या अनुष्टुभ छंदामध्ये आहे, त्याच छंदामध्ये विनोबाजींनी गीताई लिहिली आहे. गीताई इतक्या सोप्या मराठीत लिहिली आहे की जणू काही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन मराठी होते, असे वाटावे.

माझे पदवी शिक्षण के. जे. सोमैया कॉलेज , मुंबई येथे झाले. कॉलेजचे संस्थापक के.जे.सोमैया संस्कृतप्रेमी होते. त्यामुळे आम्हाला भगवद्गीतेवर पेपर असे. या परीक्षेत सर्वांत जास्त गुण मिळाल्याबद्दल मला एकदा बक्षीस मिळाले होते. या पेपर्सच्या निमित्ताने मी स्वामी विवेकानंदांचे 'कर्मयोग' हे पुस्तक वाचले. कॉलेजमध्ये एकदा स्वामी चिन्मयानंद यांचे भगवद्गीतेवरील प्रवचन ऐकले.

आम्ही मिरा रोड, मुंबई येथे राहत असताना तेथे इस्कॉनचे मंदिर होते. माझी सौभाग्यवती वर्षा मंदिराच्या कार्यात खूपच भाग घेत असे. त्यामुळे मी मंदिराचे कीर्तन, प्रवचन असे बरेच कार्यक्रम अटेंड केले. श्रील प्रभुपादांचे 'भगवद्गीता - जशी आहे तशी' हे पुस्तक वाचले.

नंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केले. तेथेही नॉर्थ सिडनी येथे इस्कॉनचे चांगले मंदिर आहे. वर्षाने येथेही मंदिराच्या कार्यात सहभाग ठेवला. त्यामुळे पुन्हा कीर्तन, प्रवचन अटेंड करणे चालू राहिले.

माझ्या कामावरील साहेब श्री. नंदू मेहता यांच्यामुळे मी रामकृष्ण मिशनच्या लिव्हरपूल रोडवरील वेदांत हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ लागलो. तेथे माताजी भगवद्गीतेतील निरनिराळ्या अध्यायांवर पूर्ण दिवस रिसॉर्ट्स घेत असतात. असे बरेच रिसॉर्ट्स मी अटेंड केले.

एवढे सारे करून मला सतत असे वाटत होते की भगवद्गीता मला समजत नाही. उलट अधिकाधिक गोंधळ होतो आहे.

मी विचार केला, असं का बरं होतं आहे? तेव्हा माझ्या लक्षात आले की भगवद्गीतेवरील पुस्तके लिहिताना किंवा प्रवचने सांगताना लेखक किंवा प्रवचनकार त्यामध्ये आपल्या पदरचे काहीतरी ॲड करतात. ते समजण्यासाठी उपयोगी असले तरी मूळ भगवद्गीतेत काय सांगितले आहे, याविषयी गोंधळ उडतो. आजकाल तर असे दिसते की कोणीही येतो आणि 'भगवद्गीतासुद्धा असे सांगते' म्हणून प्रतिपादन करतो. 'गीता का सार', 'गीता संदेश' म्हणून मेसेजेस समाज माध्यमांवर फिरत असतात. हे खरोखर भगवद्गीतेत सांगितले आहे का, असा प्रश्न मला पडत असे.

तेव्हा मी ठरवले की आपणच आपल्याला समजेल असे भगवद्गीतेचे व्हर्शन बनवायचे. हे व्हर्शन बनवताना माझी मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे होती:-

१. आपल्या दैनंदिन संभाषणातील सोपी मराठी भाषा वापरायची. आलंकारिक भाषेचा किंवा कठीण भाषेचा सोस मुळीच ठेवायचा नाही.

२. रचनेसाठी ओवी छंदाचा वापर, जो छंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी वापरला आहे. ओवीमध्ये साडेतीन चरण असतात, तीन चरण दीर्घ तर चौथा चरण आखूड असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक असते. शब्दसंख्या शिथिल असते. माझ्या ओव्यांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक आहे, पण ते नावापुरते, यमक जुळवण्याच्या अट्टाहासात भाषेला अवघडपणा येऊ नये म्हणून. बऱ्याच ठिकाणी पहिले, दुसरे किंवा तिसरे चरण आखूड झाले आहेत आणि चौथा चरण दीर्घ झाला आहे.

३. मराठी भाषेत बहुतांश संस्कृत शब्द असल्याने भाषांतर करताना जर भगवद्गीतेतील संस्कृत शब्द मराठीत असेल, तर तो अवघड असला तरी तसाच ठेवला आहे. परंतु जेथे संस्कृत शब्द मराठीत नाही, तेथे सोपा मराठी शब्द वापरला आहे. म्हणजे वाचताना भगवद्गीता समजली तर पाहिजे, पण मूळ भगवद्गीतेचा फील कुठेही जाता कामा नये, असा प्रयत्न केला आहे.

उदा. 
'श्रेयान्स्वधर्मो विगुणो परधर्मात्सुनिष्ठात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:'

हा भगवद्गीतेतील सुप्रसिद्ध श्लोक घेतला तर यातील बहुतेक सारे शब्द मराठीत आहेत. विगुण हा शब्द समजण्यासारखा असला तरी मराठीत नित्य वापरात नाही. 

त्यामुळे माझे भाषांतर असे झाले-
गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||
बरे स्वधर्मात निधन | परधर्म भयावह || अ.३, श्लो.३५ ||

४. संकल्पना भाषांतरित करण्याऐवजी तशाच वापरल्या आहेत. उदा. भूत ही संकल्पना भगवद्गीतेत सतत येते. तिचे भाषांतर करून प्राणी, सजीव, जीवमात्र असे केले तर या प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. निराळ्या व्यक्तिमत्त्वाचे शब्द आले की ते मूळ संहितेचे व्यक्तिमत्त्व बदलून टाकतात. त्यामुळेच मूळ भगवद्गीता कुठेतरी हरवल्या सारखी वाटते. शिवाय हे प्राणी , सजीव, जीवमात्र हे शब्द ज्याअर्थी संस्कृत भाषेत आहेत आणि भगवद्गीतेतही निरनिराळ्या संदर्भात येत असेल, तर भूत शब्दामागे काही एक संकल्पना अभिप्रेत आहे आणि ती तशीच ठेवली पाहिजे. 

आणखी एक उदाहरण म्हणजे 'नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:' या श्लोकाचे. येथे भाव, अभाव, सत्, असत् या शब्दांसाठी निराळे शब्द योजले तर या शब्दांमागील संकल्पनेपासून दूर गेल्यासारखे होईल.

५. भगवद्गीता वाचताना मला असे वाटते की भगवद्गीता हा एक सलग संवाद आहे. भगवद्गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण काही अध्याय सांगत नव्हते. हे अध्याय पुढील रचनाकारांनी आपल्या सोयीसाठी केले आहेत. त्यामुळे अध्यायाचे नाव एक असेल तर वेगळ्याच विषयावर चर्चा केलेली आढळते. त्यामुळे मी असे शक्य तितके विषय आयडेंटिफाय करून त्यांना नावे दिली आहेत.

६. भगवद्गीता हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. त्यामुळे त्यांच्या इंटरप्रिटेशनसाठी भगवद्गीता पुरेशी आहे. त्यामुळे कुठल्याही बाह्य ग्रंथाचा आधार न घेता, भगवद्गीतेत दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारेच भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ लावायचा.

६. कुठलाही विषय आपल्याला चित्रांतूनच चांगला समजतो. त्यामुळे ठिकठिकाणी चित्रे वापरली आहेत. जिथे समर्पक चित्रे मिळाली नाहीत तिथे मी चित्रे काढली आहेत. अवघड कल्पनांची उकल व्हावी, म्हणून डायग्रॅम्सही काढले आहेत.

भगवद्गीता लिहीत असताना एकेक अध्याय झाला की माझे परम मित्र श्री. मिलिंद बर्वे यांना पाठवीत असे. श्री. मिलिंद बर्वे संस्कृत भाषेचे प्रेमी असून आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करीत असतात. माझे भाषांतर चांगले समजते, असे मत त्यांनी दिले.

यासाठी ग.का. रायकर आणि दि.अ.घैसास यांचे जयहिंद प्रकाशनाकडून प्रकाशित 'सान्वय व सार्थ श्रीमद्भगवद्गीता' या पुस्तकाचा वापर केला आहे. या लैखकांचे मन:पूर्वक आभार. (यांचेच पुस्तक माझ्या मोठ्या भावाला बक्षीस मिळाले होते. पुस्तक तेच आहे‌ . फक्त त्यात अन्वय ॲड केला आहे).

श्रील प्रभुपादांच्या 'भगवद्गीता-जशी आहे तशी' या पुस्तकाचा खूप उपयोग झाला आहे. सर्व श्रीकृष्णभक्तांस श्रील प्रभुपाद गुरूसमान आहेत. त्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार.

आता मला भगवद्गीता वाचावीशी वाटली की ही भगवद्गीता मी वाचतो. मला ती समजायला सोपी वाटते आणि मुख्यत: मूळ भगवद्गीतेपासून दूर गेल्यासारखे वाटत नाही. मी ही भगवद्गीता लिहिली नसती, तर इतक्या वेळा कधीच वाचली नसती. भगवद्गीता कळली आहे असे म्हणण्याचे धाडस कुणीच करणार नाही. मीही ते करीत नाही. भगवद्गीतेत काय आहे आणि काय नाही, त्याची बऱ्यापैकी कल्पना आली आहे, एवढेच मी म्हणू शकतो. माझा हा प्रयत्न कसा झाला आहे, त्यावर वाचकांनी जरूर प्रतिक्रिया लिहाव्यात आणि काही सुधारणा हव्या असतील तरी सांगावे.

माझा हा प्रयत्न भगवान श्रीकृष्णास अर्पण करून हे मनोगत पूर्ण करतो.

-डॉ.हेमंत जुन्नरकर

Sanjal bhabhi’s unique hobby संजलवहिनींचा आगळा छंद

 


Sanjal bhabhi’s unique hobby

 

Back in Christmas 2022, my cousin Sushil from Sydney, was like, "Hey bro, wanna check out Melbourne?" And we were like, "Why not?" We've been in Sydney for more than  a decade, but not had a chance to visit Melbourne, so it sounded fun. Sushil, his wife Madhavi, my wife Varsha and I, started early morning.

Sushil, being the driving enthusiast he is, took the wheel all the way, blasting Rafi's tunes on his phone the whole ride. We rolled into Melbourne by evening.

"We're gonna crash at my buddy Kishen Bhai's place," Sushil told us.

I asked Sushil,' Are you sure they will be  cool with us,  we are strangers to them? "

"Don't sweat it, or I wouldn't have invited you," Sushil reassured.

Turns out, Kishen Bhai and his wife Sanjal were the nicest hosts ever. They really made us feel at home. Sanjal bhabhi cooked delicious dishes. 

Kishan bhai and Sanjal bhabhi

The next day, we planned a beach trip, but poor Madhavi felt sick halfway, so we had to return. It was scorching hot that day, unlike the cold December back in India.

We were having a chat, when  Sanjal bhabhi showed us the video of her son Karan's wedding. In the video, I was surprised to see bhabhi reading out a poem on Karan which showed all the excellence of craftsmanship.

I asked, ' Whose poem is this?' I was more surprised when bhabhi told me that she had comppsed the poem.

Then bhabhi opened her file and showed us more poems penned by her on loose leaves.And believe me,  there was one poem written on Kishan Bhai himself.

I said, "Kishan Bhai, you're lucky to have someone write a poem about you, especially your wife." Kishen Bhai was all smiles.

Turns out, whenever there's a gathering or a get-together, friends ask Sanjal bhabhi to whip up a poem for the occasion. Sanjal bhabhi readily takes up the challenge with pleasure.  She is not particular about the sophisticated language but uses day-to-day language , a mixture of English and Hindi, with amusing rhymings. That makes her poems appealing to the crowd and wins applause accompanied with laughter of satisfied acceptance of the observations in the poems. Her poems shows close observation of the qualities of friends and  certainly you need generous heart to appreciate them. Will not a man be pleased if his cooking skill is appreciated by someone?

I thought, if  a poet were asked to write a poem, he would select heroes from the history, most probably. But who makes a simple man feel like a hero , highlighting the qualities, perhaps not known to him as well. That makes Sanjal bhabhi's hobby a unique one, doesn't it? 

I told bhabhi, "Good thing we skipped the beach, or I'd never know about this cool talent of yours."

Coming to know that I'm into languages,  a little bit, so now sometimes bhabhi sends me her poems for some fine-tuning, I just do a little touch up, I confess, as I hate  to meddle with the essence of any spontaneous art work.

Last year, when Karan's mother-in-law passed away, bhabhi composed another   beautiful poem to read out  the funeral. It really captured the essence of who Raji was. Read the poem and you will understand yourselves.

 

Raji, a person of rare stature:

The memorable event in Karan-Divya’s life was staged ,

On the day, they both got engaged,

When we met Raji, a person with the rare stature,

With the cool, calm and sweet nature.

She was ready to help others with no expectation, 

Busy with the social work, her passion,

She was intelligent and artistic,

Who did her work which was filled with a magic.

On the seashore, she loved walking,

Speechless, as if meditating.

Thus was the life, smooth and steady,

But suddenly a cloud made it shady.

Nobody had expected what befell,

When suddenly Raji bade us farewell,

The God gave her a short life, unfortunately,

And we are all standing at a turn of life, so tricky. 

Raji’s memories will never part,

We will always nurture them in our heart.

Paddy, Divya, Manju,  do not feel alone, 

We are always there, just grab a phone.


I felt, Raji's soul must have been happy at her heavenly abode to find someone appreciate her qualities.

So, what do you guys think of Sanjal' bhabhi's hobby? Pretty unique, huh? Bhabhi takes so much pains to write down a poem, would you take pains writing your opinion about the hobby?

संजलवहिनींचा आगळा छंद

२०२२ च्या ख्रिस्मसमध्ये माझ्या मावस भावाने, सुशीलने त्यांचा मेल्बर्नला जाण्याचा बेत सांगितला आणि आम्हाला येण्याबद्दल विचारले. आम्ही याआधी मेल्बर्नला गेलो नसल्याने आम्हीसुद्धा येण्याचे कबूल केले.

सुशील, त्याची पत्नी माधवी, मी आणि माझी पत्नी वर्षा, असे आम्ही चौघे जण मेल्बर्नला पोहचलो.

मेल्बर्नला सुशीलचे मित्र किशन भट्टी आणि त्यांची पत्नी संजल यांची भेट झाली. किशन भाई आणि संजलवहिनी अतिशय प्रेमळ दांपत्य.   संजलवहिनी मराठी परंतु किशनभाई काश्मीरी.   माझी व वर्षाची त्यांच्याशी पूर्वीची ओळख नसतानाही ते आमच्याशी अतिशय प्रेमाने वागले. त्यांनी आम्हा सर्वांचे खूप चांगले आदरातिथ्य केले.



किशनभाई आणि संजलवहिनी  

दुसऱ्या दिवशी आमचा मेल्बर्नमध्ये बीचवर जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे मी, वर्षा, सुशील, माधवी आणि संजलवहिनी, असे पाच जण निघालो. परंतु माधवीची अर्ध्या रस्त्यात तब्येत बिघडल्याने आम्हाला परत यावे लागले.

भारतामध्ये डिसेंबर थंडीचा , परंतु ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याचा महिना. त्या दिवशी खूपच कडक ऊन होतं. 

आम्ही घरीच गप्पा मारत बसलो. मग संजलवहिनींनी मुलाच्या, करणच्या,   लग्नाचा व्हिडिओ  दाखवला.

त्या वेळी लग्नाच्या व्हिडिओमध्ये संजलवहिनी इंग्रजीमध्ये कविता म्हणताना दिसल्या. मी कवितेची तारीफ केली. त्या वेळी त्यांनी सांगितलं की ही कविता त्यांनी स्वतः मुलावर लिहिली आहे. 

मग त्यांनी फाइल उघडून त्यांनी लिहिलेल्या आणखी कविता दाखवल्या. त्यांच्या कविता हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामध्ये हिंदीत एक कविता किशनभाईंवरही आहे. मी किशनभाईंना म्हटलं, 'आप बहुत लकी हो, कि तुमपर किसी ने कविता लिखी है, और वोभी तुम्हारे बीबीने.' किशन भाई साहजिक हसले.

कुणाच्या घरी वाढदिवस किंवा कुठला समारंभ असला, की संजलवहिनींचा छंद माहीत असणारे लोक त्यांना कविता बनवण्यास सांगतात. संजलवहिनीसुद्धा आह्वान स्वीकारून प्रसंगानुरूप छानदार कविता बनवतात. ज्या व्यक्तीवर कविता लिहिली, त्यांच्या गुणविशेषांचे सूक्ष्म निरीक्षण, सर्वांना समजणारी संभाषणातील हिंदी आणि इंग्रजी अशी संमिश्र भाषा आणि चटपटीत यमकांची योजना  यांमुळे त्यांच्या कविता समारंभात सर्वांची वाहवा मिळवतात.

मला या आगळ्या छंदाचं खूप कौतुक वाटलं. म्हटलं, 'बरं झालं आपला बीचवर जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. नाहीतर तुमचा हा छंद मला समजलाच नसता.'

मलासुद्धा भाषेची थोडीफार आवड आहे हे कळल्यावर आता कविता लिहिली की इंडिपेंडंट ओपिनियनसाठी संजलवहिनी  कविता माझ्याकडे पाठवतात. मी कवितेचा मूळ आशय बदलणार नाही, यांची काळजी घेत थोडे शब्द इथेतिथे करतो.

गेल्या वर्षी दिव्याच्या, संजलवहिनींच्या सुनेच्या आईस , म्हणजे संजलवहिनींच्या विहीणीस देवाज्ञा झाली. त्या वेळी संजलवहिनींनी लिहिलेली कविता खाली दिली आहे-

Raji, a person of rare stature:

The memorable event in Karan-Divya’s life was staged ,

On the day, they both got engaged,

When we met Raji, a person with the rare stature,

With the cool, calm and sweet nature.

She was ready to help others with no expectation, 

Busy with the social work, her passion,

She was intelligent and artistic,

Who did her work which was filled with a magic.

On the seashore, she loved walking,

Speechless, as if meditating.

Thus was the life, smooth and steady,

But suddenly a cloud made it shady.

Nobody had expected what befell,

When suddenly Raji bade us farewell,

The God gave her a short life, unfortunately,

And we are all standing at a turn of life, so tricky. 

Raji’s memories will never part,

We will always nurture them in our heart.

Paddy, Divya, Manju,  do not feel alone, 

We are always there, just grab a phone.

या कवितेवरून संजलवहिनींनी विहिणीच्या गुणविशेषांचं निरीक्षण आणि मनापासून केलेलं कौतुक  दिसून येतं. संजलवहिनींच्या विहिणीचा आत्मा हे कौतुक ऐकून समाधान पावला असेल असं मला वाटलं.

मी असा छंद आतापर्यंत पाहिला नव्हता. संजलवहिनींच्या आगळ्या छंदास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला संजलवहिनींचा छंद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

सिडनी येथे महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या कालिदास जयंती कार्यक्रमात सादर केलेल्या कथा

 

सिडनी येथे महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या कालिदास जयंती कार्यक्रमात सादर केलेल्या कथा 



© Dr Hemant Junnarkar  (All rights reserved)


सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी 'कालिदास जयंती' कार्यक्रम साजरा केला जातो.  या कार्यक्रमामध्ये सिडनीतील निरनिराळे मराठी साहित्यिक आपल्या साहित्यकृती सादर करतात. मी प्रथम केवळ प्रेक्षक म्हणून जात असे. परंतु मंडळातर्फे सर्वांना आवाहन केले जाते की तुम्हीसुद्धा आपल्या साहित्यकृती सादर करा. त्यामुळे मी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मंडळाच्या या प्रोत्साहनाबद्दल  मी मंडळाचा अतिशय आभारी आहे. आतापर्यंत दर वर्षी एक कथा सादर केली आहे. या कथा खाली दिल्या आहेत.  

 (कालिदास जयंती २०२३ मध्ये सादर केलेली कथा )

ऍडमिशन 

 

(मराठीतील अजरामर विनोदी लेखक कै. चिं.वि. जोशी  यांचे कथानायक चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. कै. चिं.वि. जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे  '                   ऍडमिशन.')

नुकताच हिंवाळा सुरू झाला होता.  वीक एंडचा दिवस. सकाळची वेळ. काऊनं मला वीक एंडच्या  कामाला जुंपण्यापूर्वी मी व्हॉट्स अपवर नजर टाकत होतो.   

'अहो, ऐकलंत का?' वॉशिंग मशीनमध्ये कपडे कोंबत काऊ म्हणाली.' जानकी, बाला आणि रवी  अशी शेट्टी फँमिली आता आपल्याकडे येणार आहे.'    

'आज घरी पाहुणे येण्याचा योग आहे,' मी माझं आजचं राशिभविष्य वाचून म्हटलं, ' वा!'

माझा 'वा!' ऐकून काऊ भलतीच खूष झाली आणि पुढे सांगू लागली, ' रवीला आपल्या घराजवळच्या ब्राइट फ्युचर शाळेत ऍडमिशन हवं आहे.'

'काऊ, अभ्यास करणं अधिक महत्त्वाचं की शाळा?' मी विचारलं. 

'ते दिवस गेले आता. हल्ली शाळेच्या नावावरच सर्व अवलंबून आहे,' काऊ म्हणाली.

'हे व्रत  पतीने केले असता, पत्नी  प्रेमाने वागू लागते,' मी पोस्ट मोठ्या उत्सुकतेने स्क्रोल करीत राहिलो, तर खाली लिहिलं होतं, 'असं कुठलंही व्रत नाही,' आणि चार स्माइली टाकल्या होत्या. 'काय चावटपणा आहे हा,' मी म्हणालो.

'का ? लागली मिरची?' काऊ म्हणाली.

'अगं तुला नाही म्हटलं मी, या पोस्टला म्हटलं,' मी घाबरून म्हणालो.

 

' तुम्ही मोबाइल जरा बाजूला ठेवता का?' काऊ वैतागून म्हणाली. ' जानकीने आपण जवळचे नातलग आहोत असं दाखवून ते आपल्या घरी राहतात असं शाळेला पत्र दिलं आहे.

'आं?' आता माझं मोबाइलमधलं लक्ष पूर्णपणे उडालं,' जवळचे नातलग? आपल्या घरी राहतात? कुणाचं डोकं हे?'  मोबाइल बाजूला ठेवून मी म्हणालो.

'अहो, कुणाला मदत केली तर काही बिघडतं का? कालच्या सत्संगामध्ये ब्रह्मज्ञानीबाबाजी सांगत होते की माणसाने केलेली चांगली कामं परलोकात त्याच्या कामाला येतात,' काऊ म्हणाली.

'परलोकात जे काही व्हायचं ते होईल, पण शाळेच्या लक्षात आलं तर शेट्टी फँमिलीबरोबर या लोकात आपलीही वरात निघेल. आणि शेट्टी फँमिलीनं अरब आणि उंटाच्या गोष्टीप्रमाणे उद्या आपल्यालाच होमलेस केलं म्हणजे?' मी विचारलं.

काही होमलेस करीत नाही.  जानकी माझी चांगली मैत्रीण आहे,' काऊ ठसक्यात म्हणाली.

'अच्छा, तीच जानकी ना जिचे मिस्टर बाला सारा स्वयंपाक करतात?' मी विचारलं.

'हो. तीच जानकी. आणि तुम्हीसुद्धा शिका की बालांकडून काही तरी. एकदाच रस्सा भाजी बनवली तर त्या भाजीला टूथपेस्टची चव,' काऊ फणका-याने म्हणाली.

'अगं, त्याचं असं झालं, तू सांगितलेले मसाले मी शोधत होतो. तेवढ्यात मला आठवलं हे सारे जिन्नस पतंजली टूथपेस्टमध्ये आहेत. म्हणून थोडी टूथपेस्टच टाकली,' मी साळसूदपणे म्हटलं.

'कर्म माझं,' काऊ कपाळाला हात .लावून म्हणाली, 'मग भाजी डेटॉलमध्ये तर धुतली नाहीत नं?'

'आठवत नाही आता,' मी डोकं खाजवत म्हणालो.

 

म्हणूनच सांगते बालांकडून शिका. बालांनी फेसबुकवर रेसिपी अपलोड केली की तोंडाला पाणी सुटण्याच्या इमोजींचा पाऊस पडतो नुसता,' काऊ म्हणाली.

'मग आज आपला स्वयंपाक बालांचा का?' मी खवचटपणे विचारलं.

 'आज ते सारे झटकाज रेस्तरॉंमध्ये जेवायला जात आहेत. कारण रोज बालांच्या हातचं खाऊन जानकीला कंटाळा आला आहे. नंतर सारे जण 'बाईपण भारी देवा'च्या शोला जाणार आहेत,' काऊ म्हणाली.

'भारी तर खरंच,' मी स्मित करीत म्हणालो.

'तुम्हीच पहा. बाला स्वयंपाक करतात आणि जानकी रवीचा अभ्यास घेते. रवीला सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून जिवाचं रान करताहेत दोघं जण. तुम्ही स्वयंपाक नाही, मुलांचा अभ्यास तरी घ्या. राघू तर सांगत की अप्पांना कुठलीच शंका विचारण्यात अर्थ नाही,' काऊ इतस्तत: पडलेल्या कपड्यांची आवराआवर करीत म्हणाली.

'म्हणणारच. राघू एकदा मला विचारतो, 'अप्पा, वाघाचे वडील कोण?' म्हटलं, 'अरे, राघू मूर्खच आहेस. वाघाचे वडील वाघच.' तर विचारतो कसा, 'अप्पा, मूर्खाचे वडील कोण?'

काऊला हसताना पाहून मी म्हटलं, ' तू हसू नकोस. हल्ली मुलांचा अभ्यास घेणं सोपं नाही. आता परवाचीच गोष्ट पहा.  मोरूनं मला  विचारलं, 'अप्पा, 'तो जलेगी भी तेरे बाप की' हे संस्कृतमध्ये कसं म्हणता येईल?'

मी म्हटलं,' मो-या, मला अभ्यासातलं विचार.'

तर म्हणतो,' अप्पा, हे रामायण आहे. हनुमान इंद्रजिताला असं म्हणतो.'

मी म्हटलं,' हे असं रामायण आम्हाला शिकवलं नाही.'

तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करून काऊ म्हणाली, 'तुम्हाला सांगितलं होतं, मुलांना सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळेल का ब्रह्मज्ञानीबाबाजींना विचारायलाते तरी विचारलं का?'

 

'विचारलं. बाबाजी म्हणाले, 'बेटा, वैसा बोलना मुश्किल है. क्यों कि वो पढाई बडी कठिन होती है.'

मी म्हटलो, ' क्या बात कर रहे हो बाबाजी, आप को जरूर पता होगा. आप तो ब्रह्मज्ञानी हो.'

बाबाजी म्हणाले,' बेटा, ब्रह्मज्ञान उस से आसान हैं.''

'तुम्ही नीट विचारलं नसेल. एक काम धड जमत नाही. सगळीकडे मलाच बाई लक्ष घालावं लागतं,' काऊ कुरकुरत म्हणाली.

'बरं, आता हा शेट्टी परिवार आपल्याकडे कशासाठी येणार आहे?' मी मूळ मुद्द्याकडे वळलो.

'ब्राइट फ्युचर शाळेच्या प्रिन्सिपल मार्था येणार आहेत व्हिजिटला,' काऊ म्हणाली.

'बघ, काय म्हटलं होतं मी?' मी डोळे विस्फारून म्हटलं.

'ही नुसती फॉर्मँलिटी आहे, असं जानकी म्हणाली. त्यांना आपण एक फँमिली आहो, असं वाटलं पाहिजे,' काऊ म्हणाली.

एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि शेट्टी परिवार आमच्या घरी अवतरला.     

नमस्कार चमत्कार झाल्यानंतर काऊनं चहाचे कप आणले. आम्ही चहाचे घुटके घेत असतानाच मैनाच्या किंचाळण्याचा आवाज आला, 'अप्पा, यानं तुमचा मोबाईल फोडला.

रवीनं आल्याआल्या माझा मोबाईल पाडला होता आणि त्याचा सोक्ष-मोक्ष लावला होता.  

मैनानं रवीच्या पाठीत एक धपाटा घातला.  

' अम्मा, नानिगे होडेदा,' असं ओरडून रवीनं कानठळ्या बसवणा-या आवाजात  टाहो फोडला. 

 

'काय बाई एवढासा तो मोबाइल. त्याच्यापायी एवढं मारावं का माझ्या लेकराला, ' जानकीबाई खाऊ की गिळू अशा नजरेने मैनाकडे पाहत म्हणाल्या.

रवीकडे रागाने बघणा-या मैनाला मी म्हटलं, 'मैना, आता भांडणं बंद. त्या मार्थाबाई येतील, त्यांना आपण एक फँमिली आहो असं वाटलं पाहिजे.'

'अहो, चिमणीराव,' बाला म्हणाले.

'चिमणीराव नाही, चिमणराव,' मी दुरुस्ती केली.  

'अहो, तेच ते हो,' बाला आपला हेका पुढे चालवीत म्हणाले, ' तर चिमणीराव, त्यावरून तर त्यांची जास्त खात्री पटेल. कारण होल वर्ल्डमध्ये सर्वी जाणतात, की इंडियन लोक एकमेकांशीच जास्त फाईट्ट करतात.

आमचं असं हितगुज चालू असतानाच पुन्हा एकदा दारावरील बेल वाजली. दरवाजा उघडल्यावर मार्थाबाई ऐटीत आत आल्या.        

हाय, हाऊ आर यूझाल्यावर मार्थाबाई  घराचं निरीक्षण करीत सोफ्यावर टेकल्या  आणि पर्समधून एक पत्र काढून  वाचू लागल्या. पत्र वाचून झाल्यावर मार्थाबाईंनी  रवीला विचारलं, 'हे रँंवी, स्वीट बॉय, कुड यू टेल मी युवर ऍड्रेस?' 

रवीनं पोपटासारखा आमच्या घराचा पत्ता सांगितला. मी चाटच झालो. आईनं पठ्ठ्याला भलताच ट्रेन केला असावा.

'ओके, दॅट्स डन, 'असं म्हणून मार्थाबाई निघाल्या.  

'ऑल गुड नाऊ?' काऊनं दारात मार्थाबाईंना विचारलं.  

'येस. ऑल गुड फॉर नाऊ. आफ्टर सिक्स मन्थ्स देअर विल बी वन मोअर व्हिजिट अँड दॅट विल बी अ सरप्राईज व्हिजिट,' मार्थाबाईंनी उत्तर दिलं आणि गाडी स्टार्ट करून फुर्रकन निघून गेल्या.  

काऊचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

सिडनी, १५ जुलै २०२३

 

बंड्या प्रेमात पडला                     

(कालिदास जयंती २०२२ मध्ये सादर केलेली कथा वर्षी करोनामुळे कालिदास जयंती सभामंडपात साजरी झाली नव्हती. खालील कथा ऑनलाईन सादर केली)            

                           

'बंड्यामला एक सांगतू प्रेमात पडणार आहेस की नाहीस?' भांडी घासता घासता वसंतरावांनी विचारलं.  

'अरेच्चा ! ही काय जबरदस्ती आहेमला नाही प्रेमात पडायचं.' बंड्या म्हणाला.

'अरे बाबा, प्रेमात पड अगर पडू नको. लग्नाचा कधी विचार करणार आहेस?' राधाबाईनी विचारलं.

बंड्यावसंतराव आणि राधाबाईहे तीन माणसांचे कुटुंब पूर्वी वेंटवर्थव्हिलच्या उपनगरात युनिटमध्ये राहत असेआता बॉक्स हिलला नवीन हाऊस घेतल्यापासून राधाबाई आणि वसंतरावांचा बंड्यापाठी लग्नासाठी ससेमिरा लागला होता.

'आईहे ऑस्ट्रेलिया आहेइथे मुली लग्न करतात आणि भांडण करून अर्धी प्रॉपर्टी घेऊन निघून जातातआमच्या ऑफीसमधल्या  निकने लग्नच केलं नाही.' बंड्या म्हणाला.

'अरे तू तुझ्या बापाला कमी समजू नकोसतुझ्या नावावर आम्ही काही प्रॉपर्टी ठेवली नाहीआमचे डोळे मिटेपर्यंत तुला काहीही मिळणार नाहीत्यामुळे   ती तुझ्याबरोबर आयुष्यभर नांदणार याची खात्री बाळग,' वसंतराव   म्हणाले.

'अरेच्चाम्हणजे तुम्ही मला चक्क ब्लॅकमेल करत आहातइथे पाहिलं नं कसे नव्वद वर्षांचे म्हातारे माना डुगू डुगू हलवीत व्हील चेअरवर  शॉपिंग करीत असताततुम्ही काही नव्वदीपर्यंत राम म्हणणार नाही आणि तोपर्यंत मी आणि माझ्या बायकोने आश्रितासारखं राहायचं कायबरंते जाऊ द्यातुम्ही का प्रेमात पडला नाहीत?' बंड्याने विचारलं.

'अरे बाबामोठी माणसं सांगतात तसं वागावंवागतात तसं वागू नये,' वसंतराव म्हणाले.

'बाकी हे प्रेमात पडले नसतील यावर माझा विश्वास नाहीपरवा तर कमालच  केलीतासभर बसवून माझ्याकडून करोनासाठी फायझर व्हॅक्सिनचं  रजिस्ट्रेशन करून घेतलं.  ॲस्ट्राझीनिकामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात म्हणे.  गोरी नर्स बघून आले की ॲस्ट्राझीनिका घेऊनआता नाही का झाल्या रक्ताच्या गुठळ्या? ' राधाबाई फणक्याने म्हणाल्या.

रक्ताच्या गुठळ्या- करोनाचं काय घेऊन बसलीस ? जगातील कुठल्याही रोगाला तोंड देण्याचं सामर्थ्य आता माझ्यात आलं आहे. ती नर्स होतीच तशी गोड,’ वसंतराव स्वप्नात हरवल्यासारखे कुठे तरी पाहत म्हणाले.

घ्या. ऐका आता. लाकडं घाटावर जायची वेळ आली तरी थेरं संपत नाहीत. माझ्या मैत्रिणी आल्या की लागले गोंडा घोळायला,' राधाबाई ठसक्यात म्हणाल्या.

'तुझ्या मैत्रिणी नात्या येतात बाजूच्या स्वर्णमाला ब्यूटी पार्लरमध्ये डॉलर्स उडवायला  आणि चहाचे पैसे वाचवायला येतात तुझ्याकडेमी स्वर्णमाला बाईंच्या कौशल्याला दाद देत असतो,' वसंतराव म्हणाले.

'कळतात बरं का टोमणे मलामी माझ्या पैशावर जाते ब्यूटी पार्लरमध्येतुमच्या बहिणीसारख्या नवऱ्याच्या पैशावर भुवया नाही कोरतआणि ते भांडं नीट घासा जराकाल मी कुकर लावायला घेतला तर कुकरला चक्क भाताचं शीत लागलेलं .’ राधाबाई कडाडल्या. ‘

घासतो घासतो,  नीटच घासतो,' वसंतराव कातावून म्हणाले, ''बंड्यातू मथितार्थ लक्षात घेबायकोच्या मैत्रिणी पाहावयाच्या असतील तरी लग्न करायला हवे की नको?' वसंतरावांनी विचारलं.

'म्हणजे तुम्ही आज हा प्रश्न धसास लावायचा ठरवलेलं दिसतं तरठीक तरमीसुद्धा जातो आणि येतो चांगली चायनीज सून घेऊन तुमच्यासाठीबसा बेडकाच्या तंगड्या खातआणि एखादी तंगडी  घशात अडकली की म्हणा रामनव्वदाव्या वर्षी मान डुगू डुगू हलवायचाही त्रास नाही.' असे म्हणून बंड्या गाडीची चावी घेऊन ताड ताड निघाला

'अगं बाईथांबवा त्यालाचायनीज सून आणतोय म्हणेम्हणजे आता घरात वुहानची प्रयोगशाळा सुरू तर होणार नाही ना ? माझ्या सर्व मैत्रिणी आपल्या घरावर बहिष्कार टाकतील हं, ' राधाबाई घाबरून म्हणाल्या.

अरेच्च्या, मग माझं कसं होणार?’ वसंतराव म्हणाले. राधाबाईनी डोळे वटारून पाहताच वसंतराव दुसरीकडे पाहू लागले.

वसंतराव आणि राधाबाई दोघे बंड्याच्या पाठी धावलेपरंतु बंड्या गाडी स्टार्ट करून राइटचा सिग्नल  देताच निघालासुद्धावसंतराव आणि राधाबाई कपाळाला हात लावून बसले

'प्रेमात पड म्हणे.' बंड्या स्वतः शीच बडबडत होता. 'बिल चांगला सांगत होताइथली मुलं आई-वडिलांच्या बरोबर राहत नाहीतमीच पडलो श्रावणबाळआता भोगतोय फळं ! '     

बंड्या तसा सभ्य  मुलगाकारण दुसरा एखादा मुलगा अशा वेळी पबमध्ये गेला असताबंड्या आला वुलवर्थसमध्येगाडी पार्क करून बाहेर येतो तोच त्याला ट्रॉलीच्या रांगेतून ट्रॉली काढताना सई दिसलीवेंटवर्थव्हिलच्या युनिटमध्ये राहत असताना सई आणि तिचे आई-वडील त्याच बिल्डिंगमध्ये राहत असत.   बंड्या आणि सईच्या  घरच्यांचे चांगले संबंध होतेसई चांगलीच चुणचुणीत होतीवसंतरावांच्या डोळ्यात खुपणारी राधाबाईंची महागडी ऍव्हॉनची प्रसाधने सई स्वतःच्या नावावर खरेदी करून गुपचूप राधाबाईना आणून द्यायचीत्यामुळे राधाबाईंचं आणि सईचं चांगलं सूत  होतं  . तिच्या या कौशल्यामुळे बंड्या तिला ‘आनंदीबाई’ म्हणत असे.

सईला बघून बंड्याच्या डोक्यात लक्खकन एक युक्ती चमकलीतो धावत जाऊन सईला म्हणाला ,'आनंदीबाईइकडे कुठे?'

'अरे,आम्ही आलो त्या रानड्यांकडे हाऊस वॉर्मिंगला आई-बाबा बसले सगळ्यांबरोबर गप्पा मारतमी म्हटलं जरा शॉपिंग करून घ्यावंतेवढाच जाताना वेळ वाचेल.'  

'शॉपिंग जाऊ देबंड्या तिच्या हातातील ट्रॉली बाजूला करीत म्हणाला, 'चलमाझ्याबरोबर घरीमला तुझ्या प्रेमात पडायचं आहे.'

'अय्या खरंचम्हणजे तू मला हृतिक रोशन सारखं ‘कहो ना प्यार है’ म्हणणार?’ सई आनंदून म्हणाली

' ! हे सारं खोटं हं.' बंड्या म्हणाला.

'उं उं ! म्हणजे तू मला प्रेम चोप्रासारखं फसवणार?' असं म्हणत सई रडू लागली

 ‘ माझे आईआता भोकाड पसरू नकोसपब्लिक माझी धुलाई करील,’ बंड्या घाबरून म्हणाला. 

वुलवर्थसमध्ये पोलीस असण्याचं काही कारण नाहीपरंतु अचानक एक पोलीस दत्त म्हणून उभा राहिला. 'आर  बी टी ची कमाई सोडून हा पांडू इथे कुठे तडफडायला आला?' बंड्या वैतागून पुटपुटला.

बंड्याकडे करड्या नजरेने पाहत पोलीस सईला म्हणाला, ' आर यू ऑल राईट मॅम ?'

'येस येस आय ॲम ऑल राईटथँक्स व्हेरी मच, ' सई अश्रू पुसून उसने हसत म्हणाली.

नो वरीजटेक केअर,' पोलीस बंड्याकडे संशयाने पाहत निघून गेला.

सई निमूटपणे बंड्याबरोबर निघाली आणि गाडीत येऊन बसलीदोघे घरी आलेसईला दारात पाहताच वसंतराव आणि राधाबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळल्यात्या कशासाठी ते ओळखून सई मनातून खटटू झाली.

चहा-बिस्किटे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सई म्हणाली,' काकू निघते मी आताउशीर होतोय.' 

'थांब सई,' बंड्या एकदम उठून म्हणाला.

सईने बंड्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

'अजून मी तुला ‘कहो ना प्यार है’ , म्हटलं  नाहीतू पोलीसाला माझ्यासाठी खोटं सांगितलं ती अदा मला एवढी आवडली की मी तेव्हाच ठरवून टाकलं की तुला ‘कहो ना प्यार है’ म्हणायचंचहो . आणि मी तुला प्रेम चोप्रासारखं फसवणारही नाही. ' बंड्या एका दमात म्हणाला.  

बंड्याला एकदम आपण तरंगत आहोत असा भास झालाप्रेमात पडल्यावर 'आय वॉंट टू डान्स ऍण्ड प्लेअसं वाटतं हे बंड्याला  हिंदी चित्रपटातून  माहीत होतं.

पण चक्क तरंगण्याचा अनुभवमग  बंड्याच्या लक्षात आलं की कंबरदुखी विसरून वसंतरावांनी बंड्याला चक्क उचलून घेतलं होतंवसंतरावांनी बंड्याला एकदम सोडलंबंड्या जवळ जवळ पडलाचवसंतराव म्हणालेबंड्या प्रेमात-'

'पडला.’ सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं.

 'हिप हिपवसंतराव म्हणाले.

सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं, 'हुर्रे.'  

प्रतिक्रिया:

जितेंद्र वैद्य:

बघितले सर खूप छान भट्टी जमली आहे.पण बंड्या काल्पनिक की अस्तित्वात असो खुप शुभेच्छा. इतर सहभागी कलाकार आणि सिडनी वासींयाना शुभेच्छा नमस्कार💐👏

मिलिंद बर्वे:

उत्तमम् (संस्कृत)

अरुण डाबरे (नागपूर)

👌👌👌Ekdam Sunder ahe Sir

समीर राणे:

मस्त भाऊ 👌🏻👌🏻👌🏻

लतामावशी:

Chan mast sunder.

Sangeeta Rodrigues:

आपला बंड्या प्रेमात प ङ ला वाटतं 😍👌🏼 मस्त छान छोटीशी गोष्ट आणि हळूच एक सुंदर विनोदाची झालर . मजा आली 👌🏼💐🙏🏻

वर्षाच्या आई:

अप्रतिम👌👌👍👍👏👏

संतोष चावक : मस्त👌👌[11:22 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Jijaji Sahi katha

[5:42 pm, 19/09/2021] माधवी: Did you listen to Bhau's story on Kalias program? Very interesting,  good narration. Please convey my congratulations,  I don't have his or Varsha's number.

[5:43 pm, 19/09/2021] माधवी: From Lalita our friend I think kalidas jayanti ka?

[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Chan hoti on very lighter mood

[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Mag Advait la kadhi ase mhannar 😃😃😃



China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...