Monday, March 30, 2026

दिव्यांची उद्याननगरी-क्वालालंपूर

 दिव्यांची उद्याननगरी-क्वालालंपूर    

क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी. बहुतेक वेळा याचा संक्षिप्त उल्लेख के एल असा होतो. मलेशियाची ओळख आणि मलेशियाच्या भावी प्रगतीचे प्रतीक असणा-या जगातील सर्वांत उंच जुळ्या इमारती पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्येच आहेत. मलेशियामधील सर्वांत जास्त लोकसंख्येचे हे शहर. क्वालालंपूर हे मलेशियाचे सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र आहे.क्वालालांपूरची गणना अल्फा वर्ल्ड सिटीमध्ये झाली आहे. Foreign Policy 2010 च्या जागतिक नगर निर्देशांकाप्रमाणे क्वालालंपूरचा क्रमांक अठ्ठेचाळीसावा होता.  २०१० मधील 2thinknow Innovation Cities Index प्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये क्वालालंपूरचा क्रमांक सदुसष्टावा होता. १९९० पासून या शहरामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन झाले आहे. यांमध्ये १९९८ च्या कॉमनवेल्थ स्पर्धा आणि फॉर्म्युला वन Grand प्रिक्सचा समावेश आहे. त्याचबरोबर येथे अनेक राजकीय आणि सांस्कृतिक समारंभांचे आयोजनही झाले आहे. क्वालालंपूर  आपल्याला  त्याच्या  आधुनिकतेने  आणि  कुठलीही  गोष्ट  शक्य  करून  दाखविण्याच्या  क्षमतेने  थक्क  करून  सोडते. क्वालालंपूरमधील सुंदर उद्याने आणि प्रकाशाने झगमगणाऱ्या इमारतींमुळे क्वालालंपूरला ‘गार्डन सिटी ऑफ लाईट्स’ म्हणजे ‘दिव्यांची उद्याननगरी’ असे सार्थ नाव दिले आहे. 

दृष्टिक्षेपात क्वालालंपूर

स्थान: ???

क्षेत्रफळ : २४३.६५ चौ. कि. मी.

लोकसंख्या: १८ लाख. 

जाण्यास  योग्य  वेळ: ???

१ . परिचय

स्थान, विस्तार आणि सीमा

क्वालालंपूर या शब्दाचा मले भाषेमध्ये अर्थ आहे ‘दलदलयुक्त संगम’. याचे कारण क्वालालंपूर हे Klang आणि गोंबाक नद्यांच्या संगमावर वसले असून हा पूर्वी दलदलीचा प्रदेश होता. क्वालालंपूरची भौगोलिक रचना पाहू गेलो तर क्वालालंपूर KlaMg Valley या मोठ्या दरीमध्ये वसले आहे. याच्या पूर्वेकडे टिटिवांगसा पर्वतरांगा आहेत. पूर्व आणि उत्तर दिशेस छोट्यामोठ्या पर्वतरांगा आहेत. पश्चिम दिशेस मलाक्काची सामुद्रधुनी आहे.  द्वीपकल्पीय मलेशियाच्या मध्य पश्चिम किनार्‍यावरील Selangor राज्यामध्ये क्वालालंपूरचे स्थान असून ते मलेशियामध्ये असणाऱ्या एकूण तीन केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. बृहत् क्वालालंपूरला Klang Valley असे म्हणतात. बृहत् क्वालालंपूर हा क्वालालंपूरसहित उपनगरांचा समुदाय असून याची लोकसंख्या २०१० मध्ये ६९ लाख होती. लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांच्या दृष्टीने हा देशातील सर्वाधिक वेगाने वाढ होणारा महानगरी प्रदेश आहे. क्वालालंपूर हे मलेशियाच्या संसदेचे ठिकाण आहे. पूर्वी येथे संघराज्याच्या कार्यकारी आणि न्यायिक शाखा होत्या. परंतु १९९९ साली त्या पुत्रजया येथे हलविण्यात आल्या. काही प्रशासकीय विभाग अजूनसुद्धा क्वालालंपूरमध्ये आहेत. मलेशियाच्या राजाचे, Istana Negaraचे अधिकृत निवासस्थान क्वालालंपूरमध्येच आहे. 

प्राकृतिक

हवामान

क्वालालंपूरचे हवामान बारा महिने उष्ण आणि दमट असते. तापमान २० ते ३० सेल्सिअसमध्ये असते. पावसाळा असा वेगळा  ऋतू नसतो. दिवसभरात केव्हाही वादLee पाऊस येऊ शकतो.

इतिहास

क्वालालंपूरचा  विस्तार  लक्षात  घेता  तसे  ते अलिकडचे  शहरच  म्हणावे  लागेल. हा  भाग  क्लँग   आणि  गोंबाक  नद्यांच्या  संगमावर  येत  असून  येथील  वास्तुरचनेला  सुरुवात  १८५७  सालापर्यंत  झाली  नव्हती. या  साली  ८७  चिनी  खाणकामगार  कथलाच्या  शोधात  येथे  आले. एकोणीसाव्या शतकाच्या  मध्यास  औद्योगीकरणाच्या  काळामध्ये  कथील  हा  अगदी  इंग्लंड  आणि  अमेरिकेमध्येसुद्धा  महत्त्वाचा  धातू  समजला  जात  होता. कथलाच्या  शोधात  आलेल्या  खाणकामगारांना  क्वालालंपूरच्या जवळ  कथील  सापडले. क्लँग आणि  गोंबाक  नद्यांच्या  संगमजवळील  मोठा  जंगलांनी  व्यापलेला  प्रदेश  व्यापाराचे  केंद्र  स्थापन  करण्यास  आदर्श  भाग  होता. या  ठिकाणास  बहासा  मलेशिया  भाषेमध्ये  क्वालालंपूर  म्हणजे  'दलदलयुक्त  संगम ' असे  म्हणत. कथील  सापडलेल्या  भागामध्ये  लोक मोठ्या  प्रमाणावर   स्थायिक  झाले  आणि  काही  वर्षांतच   येथे  ब-याच  वसाहती  स्थापन  झाल्या. या  वसाहती  मुख्यत: क्वालालंपूर आणि  अंपांग  या  भागांमध्ये  झाला. अंपांग  हे  आज  क्वालालंपूरचे उपनगर आहे. १८६८  मध्ये  वसाहतींसाठी  प्रशासकीय  व्यवस्था  निर्माण  करण्यात  आली. तेव्हा  स्थानिक  घराण्यांनी   Yap Ah Loy याची  चिनी  समाजाचा  नेता  म्हणून  निवड  केली. Yap Ah Loy हे  क्वालालंपूरचे  पहिले  महापौर  झाले  आणि  त्यांनीच   शहराची  पायाभरणी  केली. दुस-या  महायुद्धामध्ये  क्वालालंपूर  जपानी  वर्चस्वाखाली  आले . युद्ध  संपल्यानंतर  ब्रिटिश  परत  आले  आणि  शहराचा  पुन्हा  विकास  सुरू  झाला. याला  कारण  म्हणजे  १९४८  सालापासून  अनेक  नवी  उपनगरे  बनवून  शहराच्या  विस्ताराचा  कार्यक्रम   हाती  घेण्यात  आला.

खाणकामगारांची   वसाहत  ते  मोठे  शहर  म्हणून  क्वालालंपूरचा   विकास  होताना  ब-याच  गुंतागुंतीही  निर्माण  झाल्या. या  भागामध्ये  मलेरियाचा  प्रभाव  बराच  होता. त्यामुळे  पुष्कळ  खाणकामगार  मृत्युमुखी  पडले. झटपट  आलेली  श्रीमंती  आणि  कमकुवत  प्रशासकीय  व्यवस्था  यांमुळे  कायदाविरहित  स्थिती  निर्माण  झाली. संपत्तीच्या  लालसेने  आलेल्या  नवीन  लोकांमुळे  परिस्थिती  आणखी  वाईट  झाली.

क्वालालंपूरच्या   स्वत:च्या  अशा  समस्या  असताना  मलेशियामध्ये  यादवी  युद्ध  सुरू  झाले. या  युद्धामध्ये  स्थानिक  सुलतान  पराक या क्वालालंपूरच्या उत्तरेकडील  राज्याच्या  सिंहासनासाठी  आपापसामध्ये  लढू लागले . त्यावेळच्या  स्ट्रेट्स  सेटलमेंटमधील  व्यापा-यांना  यादवी  युद्धाची  काळजी  लागली  होती. कारण  यादवी  युद्धाचा  आर्थिक  विकासावर  मोठा  परिणाम  होणार  होता. त्यामुळे  त्यांनी  ब्रिटनला  हस्तक्षेप  करून  शांतता  प्रस्थापित  करण्याची  विनंती  केली. कथलाच्या  उत्पादनामध्ये  ब्रिटनचे  मोठे  आर्थिक  हितसंबंध  होते. त्यामुळे  या  संघर्षातून  शांततापूर्ण    तोडगा  काढण्यासाठी  ब्रिटनने  गव्हर्नर  अँड्रू क्लार्क  यास  पाठविले . क्लार्कने  Pangkor पीस  ट्रीटी  नावाचा  शांतता  करार  करून  १८७४ मध्ये  यादवी  युद्धाचा  शेवट  केला. पराकमध्ये  नवीन  सुलतान  गादीवर  आला. याशिवाय  ब्रिटिशांनी  तेथे  कायमचे  बस्तान  बसवले  आणि  मले  धर्म  आणि  परंपरा  यांव्यतिरिक्त  इतर  कुठल्याही  बाबींमध्ये  निर्णय  घेण्यापूर्वी  आपली  संमती  घेतली  पाहिजे  अशी  मागणी  केली.

१८८०  साली  राजधानी  Klang   हून  क्वालालंपूर  येथे  आणण्यात  आली. यामुळे  शहराच्या  विकासामध्ये  आणखी  वाढ  झाली. ब्रिटनच्या  वसाहतीचा  प्रशासक  Frank  स्वेटनहम  यानेसुद्धा  त्याच्या  प्रशासनाचे  केंद्र  म्हणून  क्वालालंपूरची    निवड  केली . १८८१  साली  लागलेल्या  आगीनंतर   त्याने  विटांच्या  इमारती  बांधावयास  घेतल्या. त्यामुळे  शहराचे  आगीपासून  रक्षण  झाले  तसेच  लोकांच्या  आरोग्यामध्येही   सुधारणा  झाली.

स्वेटनहम  याने  या  प्रदेशातील  चार  सल्तनती  एकत्र  केल्या  आणि  १८९६  मध्ये  संयुक्त  मले  संघराज्याची  (फेडरेटेड  मले  स्टेट्स)    स्थापना  केली. क्वालालंपूरचे   स्थान  मध्यवर्ती  असल्यामुळे  त्याची  राजधानी  म्हणून  निवड  करण्यात  आली. या  संघराज्याचे  प्रशासन  ब्रिटिशांकडून   ब्रिटिश  वसाहतींचे  व्यवस्थापन  करीत  होते  तसेच  होत  होते. सुलतान  अब्दुल  समद  बिल्डिंग  ही  वास्तू  राजकारणाचे  केंद्र  होती  आणि  फावल्या  वेळामध्ये  पडांग  येथे  क्रिकेट  खेळणे  किंवा  सेलंगोर  क्लबमध्ये  आराम   करणे  हा  ब्रिटिश  अधिका-यांचा  उद्योग  होता. रॉयल  क्लबमध्ये  केवळ  गो-या  लोकांना  प्रवेश  होता  आणि  हे  ठिकाण  म्हणजे  ब्रिटिश  साम्राज्यवादाचे  चिन्ह  झाले  होते.

दुस-या महायुद्धामध्ये क्वालालंपूर जपानी  वर्चस्वाखाली  आले. युद्ध  संपल्यानंतर  ब्रिटिश  परत  आले  आणि  शहराचा  पुन्हा  विकास  सुरू  झाला. याला  कारण  म्हणजे  १९४८  सालापासून  अनेक  नवी  उपनगरे  बनवून  शहराच्या  विस्ताराचा  कार्यक्रम  हाती  घेण्यात  आला.

 

तरीसुद्धा  ब्रिटिशांपासून  स्वातंत्र्य  मिळविण्याची  मागणी  पुढे येऊ लागली. स्वातंत्र्यासाठी  कम्युनिस्टांच्या  पुढाकाराखाली  चळवळ  जोर  धरू  लागली. अखेर  ३०  ऑगस्ट १९५७  रोजी  हजारो  लोकांच्या  साक्षीने  रॉयल  सेलंगोर  क्लबवरून    युनिअन जॅक कायमचा  उतरवला  गेला . यानंतर  क्वालालंपूर  नव्या  मले  संघराज्याची  (फेडरेशन  ऑफ  मले ) आणि  १९६३  सालापासून  आजच्या  मलेशियाची  राजधानी  झाले.

 

ब्रिटनपासून    स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर  क्वालालंपूरमधील    निरनिराळ्या  वांशिक  गटांमध्ये  असंतोष उफाळून आला. याचा  परिणाम  म्हणून  १९६९  मध्ये  आणीबाणी  जाहीर  करण्यात  आली. ही  आणीबाणी  दोन  वर्षे  टिकली. आर्थिक  विकास  आणि  एकत्र  काम  करण्याची  इच्छा  यांमुळे  हा  असंतोष  अखेर  संपला आणि  १९७४  मध्ये  क्वालालंपूर  मलेशियाचा  संघराज्य  प्रदेश   (फेडरल  टेररीटरी  ) झाला. नव्या  इमारतींमध्ये  वाढ  झाली. यांमध्ये  पेट्रोनास  टॉवर्सचा  समावेश  होतो. लोकसंख्यासुद्धा  वीस  लाखाच्या  पुढे  गेली. अलीकडील  काही  वर्षांमध्ये  शहराची  वाढ  सातत्याने  होत  आहे . १९८८  मध्ये  क्वालालंपूरमध्ये   राष्ट्रकुल  स्पर्धा  भरल्या  होत्या.

 

२ प्रवास

Thursday, March 26, 2026

श्रीसाईसच्चरित - अध्याय २५

 श्रीसाईसच्चरित - अध्याय २५

अध्याय २         

भक्ताभीष्टसंपादनं  

(ओवीसंख्या १२६)

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ ((-१३)

*      दामू अण्णा कासार यांस मित्राकडून कापसाच्या व्यापारातील भागीदारीचा प्रस्ताव, परंतु बाबा त्यास नकार देऊन पुढील नुकसानीपासून वाचवितात (१४-८५)

*      बाबांनी  दिलेले आंबे खाल्यानंतर दामूअण्णांच्या पत्नीस पुत्रप्राप्ती (८६-१०३)

*      अध्यायाचा समारोप (१०४-१२६)


श्रीसाईसच्चरित - अध्याय २४

 श्रीसाईसच्चरित - अध्याय २४

विनोदविलसितं

(ओवीसंख्या १४४)

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ - थट्टाविनोदातून  बाबांची शिकवण (-१४)

*      श्री दाभोळकरांच्या कोटाच्या अस्तनीवर पाच-पंचवीस फुटाणे आढळून येतात आणि बाबांकडून त्यांची थट्टामस्करी व उपदेश (१५-७३)

*      सुदाम्याची कथा-गुरुपत्नीने सर्वांसाठी चणे दिले असता सुदामा ते एकट्याने खातो आणि पुढे त्यास दारिद्र्य भोगावे लागते (७४-८७)

*      अण्णा चिंचणीकर आणि मावशीबाई बाबांची सेवा करीत असता अण्णांचे तोंड मावशीबाईंच्या तोंडाजवळ जाते आणि त्या अण्णांवर त्यांचा 'मुका घेण्याचाआरोप करतात. बाबा हसत खेळत दोघांस शांत करतात (८८-१२४)

*      मावशीबाई बाबांचे पोट जोरात रगडत असता भक्त त्यांना हळू रगडण्यास विनंती करतात आणि बाबा 'मी कणखर आहे' हे दाखवण्यासाठी सटक्याचे एक टोक खांबास लावून दुसरे टोक पोटात खुपसतात. अध्यायाचा समारोप  (१२५-१४४)

यदा पंचावतिष्ठंते

वेदातील अथवा उपनिषदातील मंत्र आहे. हे वाक्य बृहदारण्यक उपनिषदात (४.५.१४) आलेले आहे. हा मंत्र आत्मज्ञान, पंचप्राण, आणि त्यांचा शारीरिक अवस्थेशी संबंध याविषयी आहे.

मंत्राचा संपूर्ण संदर्भ (बृहदारण्यक उपनिषद ४.५.१४):

"यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञाने प्राणे च हृदि चैकं भवति । तदा मर्त्योऽमृतो भवति एतावदनुशासनम् ॥"

शब्दार्थ:

यदा = जेव्हा; पञ्च = पाच; अवतिष्ठन्ते = स्थिर होतात / निवृत्त होतात / थांबतात; ज्ञाने = ज्ञानेंद्रिये (इंद्रियांचे ज्ञान); प्राणे = प्राण (श्वास/जीवनशक्ती) ; हृदि = हृदयात; च एकं भवति = आणि (सर्व काही) एकरूप होते ; तदा = तेव्हा; मर्त्यः = मरणशील मनुष्य; अमृतः भवति = अमर होतो (मोक्षप्राप्त होतो); एतावत् अनुशासनम् = हेच अंतिम शिक्षण आहे / अंतिम तत्त्वज्ञान आहे

श्लोकाचा अर्थ:

"जेव्हा पाचही (ज्ञानेंद्रिये) स्थिर होतात, प्राण (श्वास) शांत होतो, आणि मन/चित्त हृदयात एकरूप होते, तेव्हा हा मरणशील मनुष्य अमर होतो हेच अंतिम तत्त्वज्ञान आहे."

तात्त्विक अर्थ:

"पंच" म्हणजे पंचज्ञानेंद्रिये: डोळे, कान, नाक, जिभ, त्वचा जे सामान्यतः बाह्य जगाकडे वळलेले असतात.

जेव्हा ही पाचही इंद्रिये निष्क्रिय होतात, म्हणजे योगसाधनेत, ध्यानात मन अंतर्मुख होते. प्राण (श्वास, जीवनशक्ती) स्थिर होते. मन हृदयात "एकरूप" होते म्हणजेच संपूर्ण व्यक्तिमत्व केंद्रित होते आत्मज्ञानी अवस्थेत. तेव्हा साधक मोक्ष/अमरत्व प्राप्त करतो.

 

निष्कर्ष:

"यदा पंचावतिष्ठंते" म्हणजे: "जेव्हा (योग्य क्षणी) पाच इंद्रिये स्थिर होतात / विश्रांती घेतात." हा मोक्षप्राप्तीचा संकेत आहे इंद्रिय, प्राण आणि मन स्थिर झाले की आत्मज्ञान प्रकट होते.


Wednesday, March 25, 2026

१२. खरा आशिया –मलेशिया

 

१२. खरा आशिया –मलेशिया    

मलेशियाने पर्यटनाभिमुख व्यवस्था कशी असावी, याचा एक आदर्शच घालून दिला आहे. कलर्स ऑफ मलेशिया, मलेशिया शॉपिंग फेस्टिवल, शू फेस्टिवल अशी अनेक निमित्ते साधून जगभरातल्या पर्यटकांना मलेशियाकडे आकर्षित करण्यात मलेशिअन  लोक यशस्वी झाले आहेत.  'मलेशिया- ट्रूली एशिया' असे घोषवाक्य मिरवणाऱ्या या देशाने पर्यटनाला प्रोत्साहन देत त्याला अर्थव्यवस्थेचा कणा बनविण्याची किमया साधली आहे. 'वन मलेशिया' असे म्हणत देशाच्या एकतेचा गौरव करत आपली संस्कृती जपली आहे. मात्र, 'जुनं ते सगळंच सोनं' असा अट्टहास न धरता नव्याचे स्वागतही केले आहे. प्रख्यात ब्रिटिश कादंबरीकार आणि नाटककार सॉमरसेट मॉमने मलेशियाबद्दल म्हटले आहे, ‘तुम्ही हा  देश पाहिला नसेल, तर तुम्ही  जग काय पाहिले आहे?’

 

१.      परिचय

मलेशियाविषयी झटपट माहिती

राजधानी: क्वालालंपूर  

अधिकृत भाषा : मलय

लोकसंख्या: २.८७  कोटी  (जुलै २०११ च्या  अंदाजाप्रमाणे).

लोकसंख्या वितरण: ??????????????????

चलन: मलेशियाचे चलन मलेशियन रिंगी  (Malaysian Ringgit) असून त्याचे चिन्ह MYR असे आहे. एक मलेशियन रिंगीचे  सुमारे १७.५० भारतीय रुपये होतात.

कॉलिंग कोड:     

मलेशियाच्या वेळेचा भारतीय प्रमाणवेळेशी संबंध: मलेशियाची वेळ भारतीय प्रमाणवेळेच्या २.५ तास पुढे आहे.

मलेशियाचा भूगोल

स्थान विस्तार आणि सीमा : मलेशियाचे  अक्षांश रेखांश  उत्तर  २  ३०   दक्षिण ११२  ३०  असे  आहेत. मलेशियाचे  पूर्व  मलेशिया  आणि  पश्चिम  मलेशिया असे  दोन  विभाग  पडतात. पश्चिम  मलेशिया हा  द्वीपकल्प   असल्यामुळे  यास  पेनिन्सुलर  मलेशिया असेही  म्हणतात . पेनिन्सुलर मलेशिया हा  आशिया खंडास जोडलेला आहे तर पूर्व मलेशिया इंडोनेशियाच्या  बोर्निओ  बेटाचा  भाग  आहे. पूर्व आणि पश्चिम  मलेशियाच्या  मध्ये  दक्षिण  चीन  समुद्र  (South China Sea) आहे .

शेजारी देश: पेनिन्सुलर  मलेशियाची उत्तर सीमा  थायलंडला  भिडली आहे तर दक्षिणेकडे जोहोरच्या  सामुद्रधुनीपलिकडे अगदी जवळचा शेजारी देश सिंगापूर आहे आणि नैऋत्य दिशेस मलाक्काच्या सामुद्रधुनीपलिकडे इंडोनेशियाची सुमात्रा बेटे आहेत. पूर्व मलेशियाची दक्षिण सीमा इंडोनेशियाला (बोर्निओ भाग) भिडली आहे तर उत्तरेकडे चिमुकला ब्रुनेई हा देश आहे. 

हवामान: ??????

पेनिन्सुलर मलेशियास पश्चिम मलेशिया असेही म्हणतात. पेनिन्सुलर मलेशिया हा मले द्वीपकल्पाचा भाग आहे. पेनिन्सुलर मलेशियाचे एकूण क्षेत्रफळ १,३१,५९८ चौकिमी आहे. मलेशियाची ८०% लोकसंख्या पेनिन्सुलर मलेशियामध्ये राहत असून मलेशियाच्या उत्पन्नाचा जवळ जवळ तेवढाच भाग पेनिन्सुलर मलेशियाकडून येतो.

 

विभागवार राज्ये

·         उत्तर विभाग: पर्लिस, कदाह, पिनांग आणि परक

·          पूर्व किनारी विभाग: केलंतन, तेरंगनू आणि पहांग

·          मध्य विभाग: सेलंगोर हे राज्य आणि क्वालालंपूर आणि पुत्रजया हे केंद्रशासित प्रदेश

·         दक्षिण विभाग: नगरी सेंबिलन, मलाक्का आणि जोहोर.

 

मलेशियाचे पूर्वीचे नाव मलाया असून हे नाव सुमात्रामध्ये असणा-या याच नावाच्या नदीवरून पडले असावे. १९६३ साली मलायाचे संघराज्य, उत्तर बोर्निओ, सरावाक आणि सिंगापूर या सर्वांस मिळून मलेशिया हे नाव देण्यात आले. या नावाचा फिलिपाइन्सनेसुद्धा विचार केला होता. 

 

पश्चिम मलेशिया आणि पूर्व मलेशिया हे वेगळे देश आहेत असे वाटू नये म्हणून आणि मलाया नावास पूर्वीच्या ब्रिटिश वसाहतीचा संदर्भ असल्याने पश्चिम मलेशियासाठी पेनिन्सुलर मलेशिया हा शब्द जास्त वापरला जातो.

असे असूनही हाय कोर्ट ऑफ मलाया, युनिव्हर्सिटी ऑफ मलाया, मलायन रेल्वे अशा काही संस्थांच्या नावामध्ये आणि काही कायदेशीर संज्ञांमध्ये मलाया शब्द टिकून आहे. हल्ली मलेशियामध्ये मलाया शब्द विनोदांमध्ये वापरला जातो. जसे, 'या बातमीने सारे मलाया हादरून गेले आहे!'

 मलेशियाचा थोडक्यात इतिहास

प्राचीन  मलेशिया: मलेशियाला फार  प्राचीन  इतिहास  असून   ख्रिस्तपूर्व  ८,०००  मध्ये येथे  पाषाणायुगातील  मानवाची  वस्ती  होती. दुसऱ्या  आणि  तिसऱ्या  शतकांमध्ये  मलेशियामध्ये  लहान  लहान  राज्ये  स्थापन  झाली. यांमध्ये  उत्तरेकडे  कदाह (Kedah)  चे  राज्य  सर्वांत  मोठे  होते. या  काळात  मलेशियामध्ये  उच्च  दर्जाची  संस्कृती  उदयास  आली. या  संस्कृतीचा  भारताशी  अगदी  जवळचा  संबंध  होता. मलेशियाचा  भारताबरोबर  व्यापारसुद्धा  नियमित  चालत  असे. याच  काळामलेशियामध्ये  भारतातून  आलेले  हिंदू  आणि  बौद्ध  धर्म  रुजले .

श्रीविजय  राज्य : सातव्या  आणि  आठव्या शतकांमध्ये  इंडोनेशियाच्या  सुमात्रा  बेटावर  श्रीविजय  राज्य उदयास  आले  आणि  त्याने  मलेशियावर  वर्चस्व  गाजविले. तरीसुद्धा  श्रीविजय  राज्याचा  प्रभाव  किनारी  भागावरच  जास्त  होता. तेराव्या शतकामध्ये  श्रीविजय  राज्याचा ऱ्हास  झाला .

मलाक्का: इस्लामचा  आठव्या शतकामध्ये  मलेशिया  मध्ये  शिरकाव  झाला  आणि  १४  ते  १६  व्या  शतकापर्यंत  तो  मलेशियामध्ये  रुजला. चौदाव्या शतकामध्ये  मलाक्का    या मलेशियामधील राज्याचा  प्रभाव  वाढला. याच्या  संस्थापकाचे  नाव  होते  परमेश्वर.  परमेश्वरने  नंतर  इस्लामचा  स्वीकार  केला . मलाक्काची  सत्ता  आणि  संपत्ती  अरबांबरोबरील   व्यापारामुळे  वाढत  होती . त्याचबरोबर  त्यांचा  भारत  आणि  चीनबरोबरही   व्यापार  चालू  होता . मलाक्काचे  वैभव  पोर्तुगीजांच्या    नजरेमध्ये  आले  आणि  त्यांनी  सन १५११  मध्ये  अल्फोन्सो  द  अल्बुकर्कच्या  नेतृत्वाखाली  मलाक्का जिंकून  घेण्यासाठी  मोहीम  काढली . पोर्तुगीजांच्या   तोफखान्यापुढे  मलाक्काचा  टिकाव  लागला  नाही . परंतु  मलाक्काच्या  सुल्तानाच्या  मुलाने  जोहोरची  स्थापना  केली .

जोहोर  आणि  डच: यानंतरच्या  काळामध्ये  जोहोरचा  प्रभाव  वाढत  होता . सोळाव्या  शतकाच्या  सुरुवातीला    जोहोरने  मलाक्का  जिंकून  घेण्यासाठी  बरेच  अयशस्वी  प्रयत्न  केले . आपल्याला  स्वबळावर  मलाक्का  जिंकता  येत  नाही  असे  दिसून  आल्यावर  या  कामी  त्यांनी  डचांची    मदत  घेतली . बऱ्याच प्रयत्नानंतर  १६४१  मध्ये  डचांना  मलाक्कावर    ताबा  मिळविता  आला . सतराव्या  शतकाच्या  सुरुवातीपर्यंत   डचांनी     या  भागामधून  इतर  युरोपिअनांची    हकालपट्टी     केली . डचांचे    जोहोर  बरोबर  चांगले  संबंध  होते .

ब्रिटिशांचे  आगमन  आणि  स्वतंत्र  मलेशियाची  स्थापना: अठराव्या  आणि  एकोणीसाव्या  शतकांच्या  उत्तरार्धामध्ये  ब्रिटनने  मलेशियामध्ये  आपल्या  वसाहती  स्थापन  केल्या . दुसऱ्या  महायुद्धामध्ये  सन १९४२  ते  १९४५  दरम्यान  या  वसाहतींवर    जपानने  ताबा  मिळविला . सन १९४८  मध्ये  मले  द्वीपकल्पावरील   ब्रिटिशांची    सत्ता  असलेल्या  वसाहतींचे  मलेशियाचे  संघराज्य  स्थापन  झाले . या  संघराज्यास  सन  १९५७  मध्ये  स्वातंत्र्य  मिळाले . ब्रिटिशांच्या  सिंगापूरमधील  पूर्वीच्या  वसाहती  आणि  बोर्निओच्या  उत्तर  किनाऱ्यावरील    साबा   आणि  सरावाक  ही  पूर्व  मलेशिअन  राज्ये  सामील  झाल्यावर  सन १९६३  मध्ये  मलेशियाची  स्थापना  झाली . यानंतर  मलेशियाच्या  इतिहासातील  सुरुवातीची  बरीच  वर्षे  इंडोनेशियाच्या  मलेशियावर  नियंत्रण  मिळविण्याच्या  प्रयत्नांना तर फिलिपाइन्सच्या  साबा  आणि  सरावाकवरील  दाव्याला  तोंड  देण्यात  गेली .

आजचा मलेशिया

प्रशासकीय विभाग:

ले  पेनिन्सुलामध्ये  एकूण  १३  राज्ये  आणि  ३  केंद्रशासित  प्रदेश  आहेत . या  सर्वांना  मिळून  पेनिन्सुलर  मलेशिया  किंवा  पश्चिम  मलेशिया  म्हणतात . बोर्निओ  बेटावरील    साबा आणि सरावाक  ही दोन राज्ये  आणि  बोर्निओच्या  आसपास  असणा-या  बेटांचा  मिळून  एक  केंद्रशासित  प्रदेश , या  सर्वांस  साबा आणि सरावाक  किंवा  पूर्व  मलेशिया  किंवा  मलेशिअन  बोर्निओ  असे  म्हणतात .

मलेशियामधील शासनपद्धती: मलेशिया हे एक संघराज्य असून येथील शासनपद्धती घटनात्मक राजेशाहीची आहे.  प्रत्यक्ष कारभार हा बहुपक्षीय लोकशाही पद्धतीने चालतो.  यांग दि पर्तुआन आगोंग हा राष्ट्रप्रमुख असतो तर सरकारचा प्रमुख पंतप्रधान असतो. शासनपद्धतीचे १) कायदा २) कार्यकारी आणि ३) न्याय असे तीन विभाग पडतात. कायदे आणि कार्यकारी अधिकार संघराज्याची संसद आणि तेरा राज्यांच्या विधानसभा यांच्याकडे असतात तर न्यायसंस्था स्वायत्त असते.   

मलेशियाचे सर्वोच्च पद यांग दि पर्तुआन आगोंग: द किंग्डम ऑफ मलेशियामध्ये ९ सल्तनती (जोहोर, कदाहकलांतन, नगरी पहंग, पिराक, पर्लिस, सेलंगोर, संबिलन, तेरंगनू) आणि ४ राजेशाही नसणारी राज्ये (मलाका, पेनंग, सबाह, सरावाक) आहेत. यांग दि पर्तुआन आगोंग, म्हणजे येथील सर्वोच्च पदी असणारी व्यक्ती, ९ राज्यांच्या सुलतानांमधून दर पाच वर्षांनी निवडले जातात. याचा  अर्थ  एका  सुलतानाची  दुस-यांदा    निवड  ४५  वर्षांनी  होऊ  शकते. यांग दि पर्तुआन आगोंगकडे सर्वोच्च पद नावालाच असते, त्याच्याकडे अधिकार नसतात. कदाहचे सुलतान अब्दुल हलीम हे मलेशियाचे सध्याचे यांग दि पर्तुआन आगोंग आहेत.      

१.      प्रवास 

                   सिम कार्डस आणि डायलिंग प्रिफिक्सेस: मलेशियामध्ये मुख्यत: तीन फोन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, सेल्कॉम, डिजी आणि मॅक्सिस. प्रिपेड सिम कार्डस सर्वत्र, विशेषत: मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये हमखास मिळतात. डिजी आणि मॅक्सिस यांच्या सेवा  सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत. सबा आणि सरावाकमध्ये सेल्कॉमची सेवा सर्वांत जास्त आढळून येते. प्रत्येक राज्याचा स्वतंत्र एरिया कोड आहे. के एल मधील लँड लाइनवर फोन करावयाचा झाल्यास ०३ हा क्रमांक फिरवून आठ आकडी फोन क्रमांक फिरवावा. मोबाइल फोन्सवर कॉल करण्यासाठी तीन आकडी प्रिफिक्स (डिजी ०१६, मक्सिस ०१२, आणि सेल्कोम ०१९) आणि  सात आकडी सबस्क्रायबर क्रमांक फिरवावा लागतो.                    

पूर्व मलेशिया  

पूर्व मलेशियाची लोकसंख्या पश्चिम मलेशियापेक्षा कमी असून त्याचा विकासही पश्चिम मलेशियाएवढा झालेला नाही. तरीसुद्धा पूर्व मलेशियाचे क्षेत्रफळ पश्चिम मलेशियापेक्षा जास्त आहे. पूर्व मलेशिया तेल आणि नैसर्गिक वायूसह नैसर्गिक साधनसंपत्तीने  पश्चिम मलेशियापेक्षा समृद्ध आहे.      

पूर्व मलेशियाची भूमी प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याजवळील भागामध्ये सखल असून समुद्रकिनार्‍यापासून अंतर्भागामध्ये पर्वतीय प्रदेश आहेत. पूर्व मलेशियामध्ये सर्वत्र पर्जन्यजनित अरण्ये आहेत.      

पूर्व मलेशियाचे एकूण क्षेत्रफळ २,००,५६५ चौकिमी असून हे मलेशियाच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६१% तर बोर्निओ बेटाच्या क्षेत्रफळाच्या २७% आहे.  

मलेशियामधील सर्वाधिक उंचीचे पाच पर्वत पूर्व मलेशियामध्ये आहेत. यांपैकी माऊंट किनाबालू हा सर्वांत उंच पर्वत असून त्याची उंची ४,०९५ मीटर्स आहे. माऊंट किनाबालू बोर्निओमधील सर्वांत उंच तर आग्नेय आशियामधील सर्वाधिक उंचीचा दहावा पर्वत आहे. मलेशियामधील सर्वाधिक लांबीच्या Rajang  आणि Kinabatangan या दोन नद्यासुद्धा माऊंट किनाबालूमध्ये उगम पावतात. 

पूर्व मलेशियामधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

गुनुंग मुलू (Gunung Mulu) नॅशनल पार्क : हे पार्क सरावाक प्रांतामध्ये असून याची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आहे. येथील मुलू केव्हजमधील सरावाक चेंबर ही गुहा जगातील माहीत असलेल्या गुहांपैकी सर्वांत मोठी गुहा आहे.   

किनाबालू पार्क: या पार्कचीसुद्धा जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली आहे. या पार्कमध्ये माउंट किनाबालू आणि सिपादान आयलंडचा समावेश होतो. सिपादान आयलंड डायव्हिंग आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.    

मानव संसाधन  

पूर्व मलेशियाची लोकसंख्या २०१० साली ५७ लाख होती. यामध्ये मले लोकांचे प्रमाण २० टक्के आहे. बहुतांश लोकसंख्या शहरी भागामध्ये एकवटली आहे.

पूर्व मलेशियाच्या सुरुवातीच्या रहिवाश्यांमध्ये Dayak आणि Dusun या लोकांचा समावेश होतो. आजसुद्धा या लोकांचे लोकसंख्येमधील प्रमाण ठळक आहे. पूर्व मलेशियामध्ये शेकडो वर्षे मले द्वीपसमूह, जावा, Lesser Sunda आयलंड्स, सुलावेसी (Sulawesi) आणि सुलू  (Sulu) येथून लोकांनी स्थलांतर केले आहे. अलीकडे भारत आणि चीनमधूनसुद्धा लोकांनी पूर्व मलेशियामध्ये स्थलांतर केले आहे.   

पूर्व मलेशियामधील सुरुवातीचे रहिवासी आत्मावादी होते. पंधराव्या शतकापासून येथे इस्लामचा तर एकोणीसाव्या शतकापासून ख्रिस्ती धर्माचा शिरकाव झाला.

महत्त्वाची शहरे 

कुचिंग: हे शहर सरावाक प्रांताच्या राजधानीचे शहर असून याची लोकसंख्या सुमारे ६ लाख आहे.  

कोटा किनाबालू: हे पूर्व मलेशियामधील कुचिंगनंतर दुसरे महत्त्वाचे शहर आहे.

इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सबाहमधील Sandakan, Tawau, सरावाकमधील सिबू (Sibu), बिंतुलू (Bintulu) आणि Labuan मधील व्हिक्टोरिया या शहरांचा समावेश होतो.    

महत्त्वाचे विमानतळ  

कुचिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट, Labuan इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि कोटा किनाबालू  इंटरनॅशनल एअरपोर्ट हे पूर्व मलेशियामधील महत्त्वाचे विमानतळ आहेत.  


China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...