Thursday, March 12, 2026

श्रीसाईसच्चरित - अध्याय २० -आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २०         

ईशावास्यभावार्थबोधनं

(ओवीसंख्या १३५)

या अध्यायात काय आहे

अध्यायारंभ

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात 

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप

अध्यायारंभ (1-11

ईशावास्य उपनिषदातील शंकेचा मोलकरणीकडून उलगडा

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात  (12-93)








 





































Dressing in rags when faced with deficiency 

But doing the same in spite of sufficiency

Is called ‘display of dearth with satisfaction’

For happiness or unhappiness is nothing but emotion  II Ch.20, St. 92 II

These were the lines with which Ganudas was confused

And thus the puzzle was solved  

The whole bunch of Eeshaavasya was discovered  

When  its correct meaning was uncovered 93

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप (94-135)

'










मी अशरीर सर्वत्र एक । मजहूनि कोणी नाहीं आणिक । मीच कीं सकलांचा व्यापक । स्वरूपोन्मुख हें ज्ञान ॥१११॥

पूर्णब्रब्रह्मस्वरूपच्युत । ऐसा हा जीवात्मा पूर्ववत । कधींतरी स्वस्वरूपाप्रत । पावावा निश्चित हें ध्येय ॥११२॥

श्रुति - स्मृति आणि वेदान्त । या सर्वांचा हाचि सिद्धान्त । हेंचि अंतिम साध्य निश्चित । च्युतासी अच्युतपदप्राप्ति ॥११३॥

सम: सर्वेषु भूतेषु। जोंवरी अप्राप्त हा स्थितिविशेषु । तोंवरी न भूतात्मा  हृषीकेशु । ज्ञान प्रकाशूं समर्थ ॥११४॥

विहितकर्में चित्त शुद्ध । होतां होईल अभेदबोध । शोकमोहादि संसृतीविरुद्ध । प्रकटेल सिद्ध ज्ञान तें ॥११५॥

अखिल त्रैलोक्य सचराचर । आच्छादी जो ईश परमेश्वर । निष्क्रिय निष्कल जो परात्पर । तो अशरीर सदात्मक ॥११६॥

नामरूपात्मक हें विश्व । सबाह्य आच्छादी हा ईश । तो मीच मी भरलों अशेष । निर्विशेषरूपत्वें ॥११७॥

अस्तु वस्तुत: जें निराकार । मायागुणें भासे साकार । कामुकापाठीं हा संसार । तोचि असार निष्कामा ॥११८॥

हें यत्किंचित्‌ भूतभौतिक । जगत्‌ चेतनाचेतनात्मक । ईश्वरचि हा अद्वितीय एक । निर्धार नि:शंक करावा ॥११९॥

जगद्वुद्धीचा हा विवेक । जरी मनासी पटेना देख । तरी हें धनहिरण्यादिक । यांचा अभिलाख न करावा ॥१२०॥

हेंही जरी न घडे तरी । जाणावें आपण कर्माधिकारी । आमरणान्त शतसंवत्सरीं । कर्मचि करीत रहावें ॥१२१॥

तेंही स्ववर्णाश्रमोचित । यथोक्तानुष्ठानसहित । अग्निहोत्रादि नित्यविहित । चित्त अकलंकित होईतों ॥१२२॥

हा एक चित्तशुद्धीचा मार्ग । दुजा सर्वसंगपरित्याग । हें न आक्रमितां ज्ञानयोग । कर्मभोगचि केवळ ॥१२३॥

ही ब्रह्मविद्या हें उपनिषद । सर्वां न देती अधिकारविद । वृत्ति न जोंवरी झाली अभेद । उपनिषद्बोध शाब्दिक ॥१२४॥

तरी तोही व्हावा लागे । जिज्ञासु आधीं तोच मागे । म्हणोनि बाबांहीं पाठविलें मागें । मोलकरीण सांगेल म्हणोनि ॥१२५॥

स्वयेंच बाबा हा बोध देते । तरी हें पुढील कार्य न घडतें । एकमेवाद्वितीयनसतें । ज्ञान हें कळतें बाबांचें ॥१२६॥

मजवांचूनि आणीक कोण । आहे ती काकांची मोलकरीण । मीच ती ही दिधली खूण । ईशावास्य जाणविलें ॥१२७॥

परमेश्वरानुग्रहलेश । आचार्यानुग्रह विशेष । नसतां आत्मज्ञानीं प्रवेश । सिद्धोपदेशचि आवश्यक ॥१२८॥

आत्मप्रतिपादक जें जें शास्त्र । श्रवणीं आणावें तें तेंच मात्र । प्रतिपाद्य जें तें मीच सर्वत्र । मजवीण अन्यत्र कांहींच न ॥१२९॥

होतां आत्मतत्त्वाचें विवरण । तोच मी आत्मा नव्हे आन । हें जयासी अभेदानुसंधान । आत्माही प्रसन्न तयासीच ॥१३०॥

असो आत्मनिरूपण होतां । ऐसेंच आत्मानुसंधान राखितां । ऐसीच निश्चल धरितां आत्मता । परमात्मा हाता येईल ॥१३१॥

समारोप

पुढील अध्यायकथानुसंधान । विनायक ठाकूरादि कथा कथन । श्रोते करोत सादर श्रवण । परमार्थप्रवण होतील ॥१३२॥

त्याही कथा ऐशाच गोड । ऐकतां पुरेल श्रोतियांचें कोड । महापुरुषदर्शनाची होड । पुरेल चाड भक्तांची ॥१३३॥

जैसा उगवतां दिनमणि । अंधार जाय निरसोनी । तेवीं या कथापीय़ूषपानीं । माया हरपोनी जातसे ॥१३४॥

अतर्क्य साईंचें विंदान । त्यावीण कोण करील कथन । मी तों एक निमित्त करून । तेचि तें वदवून घेतील ॥१३५॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ईशावास्यभावार्थबोधनं नाम विंशोऽध्याय: संपूर्ण: ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

परिशिष्ट

ईशावास्य उपनिषद्

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

शांतीचा अर्थ - [पूर्णं अदः] - तें परब्रह्म पूर्ण आहे. [पूर्णं इदं] - हे सोपाधिक ब्रह्महि स्वरूपानें पूर्ण आहे. [पूर्णं पूर्णात् उदच्यते] - ते हे कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवते. पण ते त्याच्यापासून जरी निराळें होत असलें तरी आपले पूर्णत्व सोडीत नाहीं. तर ते पूर्णच उद्‌भवते. [पूर्णस्य पूर्णं आदाय] - कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन [पूर्ण एव अवशिष्यते] - पूर्णच-केवल ब्रह्म-अवशिष्ट राहतें. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीं जें अखंड एकरस सर्वव्यापी ब्रह्म होतें तेंच हे सृष्टीनंतरचें नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे. पण तेहि पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हें कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असें भासू लागते. प्रलयसमयीं त्या द्वैतरूप कार्यब्रह्मांतील पूर्णत्व तेवढें घेऊन म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यांतून काढून घेऊन तें पहिलें कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहते. त्रिविध तापांची शांति होवो.

ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥

जगत्याम् यत् किं च जगत् इदम् सर्वम् ईश आवास्यम् - अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड व चेतनस्वरुप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे - तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः - त्या ईश्वराचे सतत स्मरण ठेऊन (कारण सर्व त्याचे आहे) ह्या जगताचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. त्यांत आसक्त होऊं नये. कारण, - धनम् कस्य स्वित् - हे धन, हे भोग पदार्थ कुणाचे आहेत ? अर्थात कुणाच्याच मालकीचे नव्हेत. जगांतील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धां परमेश्वर-रहित नाही. मनुष्य (चुकीने) ह्या सर्व पदार्थांशी ममता व आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग फक्त परमेश्वरासाठींच केला गेला पाहिजे. ॥ १ ॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ २ ॥

कर्माणि कुर्वन् एव इह शतम् समाः जिजीविषेत् - ह्या जगात् (इह) ईश्वरपूजनार्थ भाव ठेऊनच शास्त्रनियत कर्मांचे आचरण करीत शंभर वर्षे आयुष्य कंठीत करण्याची इच्छा केली पाहिजे - एवम् कर्म त्वयि नरे न लिप्यते - हे मनुष्या, अशा प्रकारे त्यागपूर्वक ईश्वरासाठी केलेल्या कर्माने तूं लिप्त होणार नाहीस - इतः अन्यथा न आस्ति - मुक्तिसाठी ह्याप्रमाणे कर्म करीत राहाणे हा एकमेव मार्ग आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही. ॥ २ ॥

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः ।
ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥

असुर्याः नाम लोकाः ते अन्धेन तमसा आवृता - असुरांचे जे नरकरूपी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व अज्ञान व दुखःरुप महान अंधकाराने आच्छादित आहेत - ये के च आत्महनः जनाः - जे कोणी आत्म-विरोधी आचरण करणारी माणसे असतात - ते प्रेत्य तान् अभिगच्छति - ते मेल्यावर त्या भयंकर अशा नरकांत जातात. -- मानव शरीर इतर शरीरांपेक्षा श्रेष्ठ व दुर्लभ आहे. ईश्वर कृपेने असे शरीर केवळ मुक्ति मिळवण्याच्या उद्देशाने दिले गेलेले असते. दुसर्‍या मंत्रात केलेल्या उपदेशानुसार आचरण करणे म्हणजे आत्महीत साधणे होय. ह्या उलट ईश्वर समर्पण भाव न ठेवता, विषयांचा केवळ यथेच्छ भोग घेत राहाणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे. कारण अशाने केवळ जन्म व्यर्थ गेला एव्हढेच नव्हे तर आपल्याला अधिकाधिक कर्मबंधनात जखडून घेतल्यासारखे होईल. अधिकाधिक पतन झाल्यास क्षुद्र योनिंमध्ये जन्म मिळून नरकातच भटकत राहावे लागेल. ॥ ३ ॥

अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् ।
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥ ४ ॥

अनेजत् एकं मनसः जवीयः - परमेश्वर अचल, एकरूप, मनापेक्षाही अधिक तीव्र गतिमान आहे - पूर्वम् अर्षत् - सर्वांचा आदि आणि ज्ञानस्वरूप (सर्वांचे ज्ञान ज्याला आहे असा) - एनत् देवाः न आप्नुवन् - ह्या परमेश्वराला इन्द्रादि देव देखील जाणूं शकत नाहीत. - तत् अन्यान् धावतः तिष्ठत् अत्येति - अन्य कोणी कितीही वेगाने धावले तरी स्वताः एके ठिकाणी स्थीर (जागेवरून न हालतां) राहूनही ते त्या सर्व धावणार्‍यांचे अतिक्रमण करणारे आहेत - तस्मिन् मातरीश्वा अपः दधाति - त्यांच्या सत्तेनेंच वायु जल वगैरे (सर्वमहाभूतांना) सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ४ ॥

तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥ ५ ॥

तत् एजति तत् न एजति - तो चालतोही आणि चालत नाहीही (सगुण रूपानें भक्तांसाठी कुठेही प्रकट होणे म्हणजे चालणे, आणि निर्गुण रूपाने सर्वथा अचल स्थितीत राहणे म्हणजे न चालणे. परस्पर विरोधी गुण व क्रिया करणे हे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे). - तत् दूरे तत् अन्तिके - ते अति दूर आहेत (श्रद्धा, प्रेमरहित मनुष्यांसाठी त्यांचे दर्शन दुर्लभ आहे), तसेच अत्यन्त निकटही आहेत (भक्तांच्या ह्रुदयांत ?) - तत् अस्य सर्वस्य अंतः - जगतांतील प्रत्येक वस्तूत - तत् सर्वस्य उ बाह्यतः - आणि जगताच्या पलिकडेही. [ह्या सर्व अचिंत्य शक्त्या परमेश्वरी शक्तिचा एक अंशमात्र समजले जाते. थोडक्यात त्याचे स्वरूप व सामर्थ्य हे कल्पनातीत आहे] ॥ ५ ॥

 

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥

तु यः सर्वणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति - परंतु जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराचे ठिकाणी पाहातो - च सर्वभूतेषु आत्मानम् - तसेंच सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराला (तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने) पाहातो - ततः न विजुगुप्सते - तो कुणाचाही द्वेष करीत नाही. ॥ ६ ॥

यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः ।
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥

यस्मिन् विजानतः - अशा प्रकारे ज्याची मति झाली आहे - सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत - त्याला सर्व प्राणी एकमात्र परमात्मरूपच होतात - तत्र एकत्वम् अनुपश्यतः - असें सर्व प्राणीमात्रांस एकत्व (समभाव) रूपाने पाहाणार्‍या माहात्म्याला - कः मोहः कः शोकः - मग कशाचा मोह आणि कशाचे (कुणापासून) दुःख ? सर्वच आप्त, मग जें काही घडेल ती सर्व परमेश्वरी लीलाच. ॥ ७ ॥

 

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूः याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ८ ॥

सः शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् पर्यगात् - तो महापुरुष परम तेजोमय, शरीररहित, क्षत रहित (कशाचाही परिणाम होत नाही असा), सच्चिदानंदस्वरूप (शुद्ध), शुभ-अशुभ परिणाम रहित अशा परमेश्वराला प्राप्त होतो - कविः मनिषीः परिभूः स्वयंभूः - जे सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वनियंता स्वताःच्या इच्छेनें कुठेही केव्हांही प्रकट होऊं शकणारे आहेत, आणि - शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात् - अनादि कालापासून सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार सर्व पदार्थांची उत्पत्ती करत आलेले आहेत (ईश्वर बहुतेक अशा महात्म्यांना प्रजापति म्हणून नेमत असेल) ॥ ८ ॥



पुढील तीन मंत्रात विद्या व अविद्याचें तत्त्व-वर्णन - पण आधी त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे - परमेश्वर प्राप्ती हेतूनें केलेला शास्त्राभ्यास वा निष्काम कर्म म्हणजे विद्याआणि भोगांच्या प्राप्तिसाठी केलेला अभ्यास व काम्यकर्मे म्हणजे अविद्या

 

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥ ९ ॥

ये अविद्याम् उपासते ते अन्धम् तमः प्रविशन्ति - जे लोक अविद्येची (भोगांच्या प्राप्तीसाठी साधनरूप कर्मांचे अनुष्ठान) उपासना करतात त्यांचा शेवटीं अज्ञानस्वरूप घोर अन्धकारांत प्रवेश होतो - ये विद्यायाम् रताः ते ततः उ भूयः इव तमः - आणि जे नुसत्या शास्त्रांचे पठण करून मिथ्याभिमानाने मत्त होऊन आमच्यासाठी काही कर्तव्य उरलेले नाहीअशा अविर्भावात कर्तव्यकर्म न करतां, शास्त्र विपरीत कर्मात रत होतात, तेंही घोर नरकाला प्राप्त होतात. ॥ ९ ॥

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १० ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविषयी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - विद्यया अन्यत् एव आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति - की ज्ञानाच्या यथार्थ अनुष्ठानाने तसेच कर्माच्या यथार्थ अनुष्ठानाने (मागील मंत्रात सांगितलेल्या फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १० ॥

 

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥ ११ ॥

यः तत् उभयम् विद्याम् च अविद्याम् च वेद - जो मनुष्य ज्ञानतत्त्व व अज्ञान-कर्म तत्त्व ह्या दोन्हींना यथार्थपणे जाणतो - अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते - तो कर्तव्यकर्माचे अनुष्ठानाने मृत्युला पार करून ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताची (परमेश्वराची) प्राप्ती करतो. [कर्म - अकर्म - विकर्म - नैष्कर्म्य - त्यांत आणि संचितकर्म व प्रारब्ध प्रभाव हें सर्व सोपे तर नाहीच, पण गोंधळ उडविणारे आहेत , तरीपण जाणून घेणे आवश्यक आहे. अतिशय सावधानता आणि विवेक गरजेचे आहे] ॥ ११ ॥

अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्याँ रताः ॥ १२ ॥

ये सम्भूतिम् उपासते (ते) अन्धम् तमः प्रविशन्ति - मान, किर्ति, अधिकार, धन तसेच भोग्य वस्तूंच्या वृद्धीसाठी पितर, क्षुद्र देवता, व मनुष्यांची (नेता वगैरे) उपासना करणारे घोर नरकात जातात - ये सम्भूत्याम् रताः ते ततः उ भुयः एव तमः (प्रविशन्ति) - आणि जे इतर देव-देवींच्या उपासनेंत व्यग्र आहेत तेही अज्ञानरूपी घोर नरकांतच जातात. ॥ १२ ॥

 

अन्यदेवाहुः सम्भवात् अन्यदाहुरसम्भवात् ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १३ ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविष्यी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - सम्भवात् अन्यत् एव आहुः असम्भवात् अन्यत् आहुः इति - की ज्यांच्यासाठी पितर, देवता इत्यादींच्या उपासनेचे स्वरूप व हेतु ब्रह्मोपासना आहे त्यांच्यासाठी (मागील मंत्रांतील फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १३ ॥

सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह ।
विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥ १४ ॥

यः तत् उभयम् सम्भूतिम् च विनाशम् च सह वेद - जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील क्षुद्र देवदेवता यांना यथार्थपणे जाणतो - विनाशेन मृत्युम् तीर्त्वा सम्भूत्याम् अमृतम् अश्नुते - तो विनाशशील देवादिंच्या उपासनेने मृत्युला पार करून अविनाशी परब्रह्माच्या उपासनेने अमृततत्त्वाची प्राप्ती करून घेतो (परमपद पावतो). ॥ १४ ॥

 

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ १५ ॥

पूषन् सत्यस्य मुखम् - अखिल ब्रह्माण्डाचे पोषण करणाऱ्या सत्यस्वरूप परमेश्वरा तुझे मुख तर - हिरण्मयेन पात्रेण अपिहितम् - सुर्यमण्डळाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या तेजस्वी पात्राने झाकलेले आहे - सत्यधर्माय दृष्टये तत् त्वम् अपावृणु - मी तुझ्या सत् धर्माची भक्तिभावाने उपासना करतो आणि तुझ्या दर्शनासाठी आतूर आहे. तुं माझ्यासाठी त्यांत बाधा आणणारी सर्व प्रकारची आवरणें काढून टाक. ॥ १५ ॥

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः ।
यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥

पूषन् एकर्षे प्राजापत्य सूर्य - एकट्यानेंच सर्व भक्तांचे पोषण करणाऱ्या हे प्रजापति सूर्या, - रश्मिन् व्यूह तेजः समूहः - (तुझ्या किरणांचे तेज आमचे डोळे दिपवून टाकत असल्यामुळे) तुझ्या ह्या किरणांना एकत्र करून ते तेजस्वी किरण थोडा वेळ आवरून घे - यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि - ज्या योगे तुझे जे अतिशय कल्याणमय दिव्य स्वरूप आहे ते मी आपल्या कृपेने पाहूं शकेन - यः असौ असौ पुरुषः अहम् सः अस्मि - (ज्ञानदृष्टी झाल्यावर भक्त म्हणतो) अरे हा जो सुर्याचा आत्मा आहे तो तर परम पुरुष परमात्माच आहे आणि तो तर मी स्वताःच असल्यासारखा भासतोय. ॥ १६ ॥

 

वायुरनिलममृतमथेदं भस्मांतँ शरीरम् ।
ॐ क्रतो स्मर कृतँ स्मर क्रतो स्मर कृतँ स्मर ॥ १७ ॥

अथ वायुः अमृतम् अनिलम् - आतां हा प्राण आणि इन्द्रिये वायु तत्त्वात प्रवेश करोत - इदम् शरीरम् भस्मांतम् - हे स्थूल शरीर अग्निमध्ये भस्म होऊन जावो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो. ॥ १७ ॥

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
     
विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो
    
भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ॥ १८ ॥

अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥

॥ इति ईशोपनिषत् ॥

Wednesday, March 11, 2026

गुरुचरित्र अध्याय २


गुरुचरित्र 

अध्याय २ - शिष्यदीपकाख्यान

(गुरुनिष्ठ दीपकाची कथा)

(ओवीसंख्या २७८ )

॥ ॐ ॥

या अध्यायात काय आहे:

नामधारकास स्वप्नात सिद्धमुनींचे दर्शन होते आणि जागृत अवस्थेत आल्यावर त्याला स्वप्नात दिसले तसेच सिद्धमुनी भेटतात. नामधारक त्यांना शरण जातो. तेव्हा सिद्ध मुनी त्याला गुरूचा महिमा सांगतात. नामधारक सिद्धमुनींना प्रश्न विचारतो की हा गुरूचा महिमा कुठल्या शास्त्रात सांगितला आहे.

सिद्धमुनी सांगतात की हा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने कलीला सांगितला आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवाने कालाप्रमाणे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग यांना पृथ्वीवर पाठविले. जेव्हा कलियुगाची वेळ आली तेव्हा कलीने तो पृथ्वीवर जाऊन लोकांना  कशा प्रकारे पीडा देणार आहे ते सांगितले.

त्या वेळी ब्रह्मदेवाने कोणास त्रास देऊ नये ते कलीला  सांगितले. त्यातच एक जो गुरुचरणी अनन्य होईल , त्याला पीडा देऊ नये असे सांगितले. येथे ब्रह्मदेव कलीला गुरुनिष्ठ दीपकाची गोष्ट सांगतात.

दीपक आपल्या  गुरूंना वाराणशीला घेऊन येतो. गुरूंना कुष्ठरोग झालेला असतो. दीपक गुरूंची सर्वतोपरी सेवा करतो तरी गुरू त्याला एक सारखा त्रास देतात. 

दीपकच्या गुरुनिष्ठेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीविष्णू त्याला भेटायला येतात आणि वर मागण्यास सांगतात. परंतु दीपक नम्रपणे सांगतो की मला वर द्यायचाच असेल तर गुरूवरील माझी निष्ठा दृढ व्हावी. श्रीविष्णू प्रसन्न होऊन दीपकला तसा वर देतात. मग दीपक गुरूंना घडलेला प्रकार सांगतो. त्यामुळे गुरूसुद्धा दीपकला आशिर्वाद देतात. गुरूंचे कुष्ठ बरे होऊन त्यांना दिव्य देह प्राप्त होतो.

सूची:

१. नामधारकास स्वप्नामध्ये सिद्धमुनींचे दर्शन

२. सिद्धमुनींचा नामधारकाबरोबर संवाद:

२.१. गुरूचा महिमा 

२.२. सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेव    सत्य, त्रेता आणि द्वापार  युगांना पृथ्वीवर पाठवतात

२.३. ब्रह्मदेव आणि कलीचा संवाद

२.३.१.गुरुनिष्ठ दीपकाची कथा

🌺 🌺 🌺 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारकास स्वप्नामध्ये सिद्धमुनींचे दर्शन:

त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा | कृष्णातिरी वास करोनि वोजा | सुभक्त तेथे करिती आनंदा | ते सुर स्वर्गी पहाती विनोदा || १ ||

ऐसे श्रीगुरुचरण ध्यात | जातां भक्त 'नामांकित' | अति श्रमला चालत | राहिला एका वृक्षातळी || २ ||

क्षण एक निद्रिस्त | मनी श्रीगुरु चिंतित | कृपानिधि अनंत | दिसे स्वप्नी परियेसा || ३ ||

रूप दिसे सुषुप्तींत | जटाधारी भस्मांकित | व्याघ्रचर्म परिधानित | पीतांबर वास देखा || ४ ||

येऊनि योगेश्वरु जवळी | भस्म लाविले कपाळी | आश्वासूनि तया वेळी | अभयकर देतसे || ५ ||

इतके देखोनि सुषुप्तीत | चेतन झाला नामांकित | चारी दिशा अवलोकित | विस्मय करी तरे वेळी || ६ ||

जागृत झाल्यावर नामधारकास सिद्धमुनी भेटतात

मूर्ति देखिली सुषुप्तीत | तेचि ध्यातसे मनांत | पुढे निघाला मार्ग क्रमित | प्रत्यक्ष देखें तैसाचि || ७ ||

देखोनियां योगीशातें | करिता झाला दंडवत | कृपा भाकी करुणावक्त्र | तारीं तारीं म्हणतसे || ८ ||

जय जया जी योगाधीशा | अज्ञानतमविनाशा | तूंचि ज्योति:प्रकाशा | कृपानिधि सिद्धमुनी || ९ ||

तुझे दर्शनें नि:शेष | गेले माझे दुरितदोष | तूं तारक आम्हांस | म्हणोनि आलासी स्वामिया || १० ||

कृपणे भक्तालागुनी | येणें झाले कोठोनि | तुमचेच नाम कवण मुनी | कवण स्थानी वास तुम्हां || ११ ||

सिद्ध म्हणे आपण योगी | हिंडू तीर्थे भूमि-स्वर्गी | प्रसिद्ध आमुचा गुरु जगी | 'नृसिंहसरस्वती' विख्यात || १२ ||

ज्याचे स्थान गाणगापुर | अमरजासंगम भीमातीर | त्रयमूर्तीचा अवतार | नृसिंहसरस्वती || १३ ||

भक्त तारावयालागीं | अवतार त्रयमूर्ति जगीं | सदा ध्याती अभ्यासयोगी | भवसागर तरावयासी || १४ ||

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु | भक्तजनां सदा वरदु | अखिल सौख्य श्रियानंदु | देता होय शिष्यवर्गा || १५ ||

त्याच्या भक्तां कैचे दैन्य | अखंड लक्ष्मी परिपूर्ण | धनधान्यादि गोधन | अष्टैश्वर्ये नांदती || १६ ||  

ऐसे म्हणे सिद्ध मुनि | ऐकोनि विनवी | नामकरणी | आम्ही असतों सदा ध्यानीं | तया श्रीगुरुयतीचे || १८ ||

ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति | सांगतसे सिद्ध मति | वंशोवंशी करितो भक्ति | कष्ट आम्हां केवी पाहे || १८ ||

तूं तारक आम्हांसी | म्हणोनि मातें भेटलासी | संहार करोनि संशयासी | निरोपावे स्वामिया || १९ ||

सिद्धमुनी नामधारकास गुरूचा महिमा सांगतात

सिद्ध म्हणे तये वेळी | ऐक शिष्या स्तोममौळी | गुरुकृपा सूक्ष्मस्थळी | भक्तवत्सल परियेसा || २० ||

गुरुकृपा होय ज्यास | दैन्य दिसे कैचे त्यास | समस्त देव त्यासी वश्य | कळिकाळासी जिंके नर || २१ ||

ऐसी वस्तु पूजूनी | दैन्यवृत्ती सांगसी झणी | नसेल दृढ तुझे मनी | म्हणोनि कष्ट भोगतोसी || २२ ||

त्रयमूर्ति श्रीगुरु | म्हणोनि जाणिजे निर्धारु | देऊ शके अखिल वरु | एक भावे भजावे || २३ ||

एखादे समयी श्रीहरि | अथवा कोपे त्रिपुरारि | राखे श्रीगुरु निर्धारी | आपुले भक्तजनांसी || २४ ||

आपण कोपे एखाद्यासी | रक्षूं न शके व्योमकेशी | अथवा विष्णु परियेसी | रक्षूं न शके अवधारी || २५ ||

ऐसे ऐकोनि नामकरणी | लागे सिद्धाचिया चरणी | विनवीतसे कर जोडुनी | भावभक्ती करोनियां || २६ ||

स्वामी ऐसे निरोपिती | संदेह होत माझे चित्ती | गुरुचि केवीं झाले त्रिमूर्ति | ब्रह्मा-विष्णु-महेश्वर || २७ ||

आणीक तुम्ही निरोपिलेती | विष्णु रुद्र जरी कोपती | राखो शके गुरु निश्चिती | गुरु कोपलिया न राखे कोणी || २८ ||

हा बोल असे कवणाचा | कवण शास्त्रपुराणींचा | संदेह फेडीं गा मनाचा | जेणे मन दृढ होय || २९ ||

येणेपरी नामकरणी | सिद्धासी पुसे वंदोनि | कृपानिधि संतोषोनि | सांगतसे परियेसा || ३० ||

सिद्धमुनींचे कथन:

ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न केल्यानंतर सत्य, त्रेता आणि द्वापार युगांना पृथ्वीवर पाठवतात

सिद्ध म्हणे शिष्यासी | तुवां पुसिले आम्हांसी | वेदवाक्य- साक्षीसी | सांगेन ऐक एकचित्ते || ३१ ||

वेद चारी उत्पन्न | झाले ब्रह्मयाचे मुखेंकरून | त्याचियापासाव पुराण | अष्टादश विख्यात || ३२ ||

त्या अष्टादशांत | ब्रह्मवाक्य असे ख्यात | पुराण 'ब्रह्मवैवर्त' | प्रख्यात असे त्रिभुवनी || ३३ ||

-----------------------------------------------------------

👉ब्रह्मवैवर्त पुराण:

ब्रह्मवैवर्त पुराण हे अठरा पुराणांपैकी महत्त्वाचे पुराण असून राधा-कृष्ण तत्त्व, सृष्टी-निर्मिती आणि  स्त्री-शक्तीचा दिव्य महिमा सांगणारे महत्त्वाचे वैष्णव महापुराण आहे. हे पूर्ण ब्रह्म खंड, प्रकृती खंड , गणेश खंड आणि कृष्ण जन्म खंड अशा चार खंडांमध्ये विभागले आहे. 

-----------------------------------------------------------

नारायण विष्णुमूर्ति |  व्यास झाला द्वापारांतीं | प्रकाश केला हे क्षितीं | ब्रह्मवाक्यविस्तार || ३४ ||

तया व्यासापासुनी| ऐकिलें समस्त ऋषिजनीं | तेचि कथा विस्तारोनि | सांगेन एका एकचित्ते || ३५ ||

चतुर्मुख ब्रह्मयासी | कलियुग पुसे हर्षी | गुरुमहिमा विस्तारेसी | ब्रह्मदेवे निरुपिला || ३६ ||

ऐसे म्हणतसे नामकरणी | पुनरपि सिद्धासी नमूनि | विनवीतसे करद्वय जोडोनि | भावभक्तीकरोनिया || ३८ ||

म्हणे सिद्धयोगीश्वरा | अज्ञानतिमिरभास्करा | तूं तारक भवसागरा | भेटलासी कृपासिंधु || ३८ ||

ब्रह्मदेव कलियुगासी | सांगे केवी कारणेंसी | आद्यंत विस्तारेसीं | निरोपिजे स्वामिया || ३९ ||

ऐक शिष्या एकचित्ता | जंघी प्रळयो झाला होता | आदिमूर्ति निश्चिता | होता वटपत्रशयनी || ४० ||

अव्यक्तमूर्ति नारायण | होता वटपत्रशयन | बुद्धि उपजे चेतन | आणिक सृष्टी रचावया || ४१ ||

प्रपंच म्हणजे सृष्टिरचना | करणे म्हणोनि आलें मना | जागृत होई या कारणा | आदिपुरुष तये वेळी || ४२ ||

जागृत होवोनि नारायण | बुद्धि संभवे चेतन | कमळ उपजवीं नाभींहून | त्रैलोक्याचे रचनाघर || ४३||

तया कमळामधून|  उदयो झाला ब्रह्मा आपण | चारी दिशा पाहोन | चतुर्मुख झाला देखा || ४४ ||

म्हणे ब्रह्मा तये वेळी | समस्तांहूनि आपण बळी | मजहूनि आणिक स्थूळी | कवण नाही म्हणतसे || ४५ ||

हांसोनिया नारायणु | बोले गाढ शब्दवचनु | आपण असे महाविष्णु | भज म्हणे तया वेळी || ४६ ||

देखोनियां श्रीविष्णूसी | नमस्कारी ब्रह्मा हर्षी | स्तुति केली बहुवसी | अनेक काळ परियेसा || ४७ ||

संतोषोनि नारायण | निरोप दिधला अतिगहन | सृष्टि रची गा म्हणून | आज्ञा दिल्ही तये वेळी || ४८ ||

ब्रह्मा विनवी विष्णूसी | नेणे सृष्टि रचावयासी | देखिली नाहीं कैसी | केवीं रचूं म्हणतसे || ४९ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचनु | निरोप दिला महाविष्णु | वेद असती हे घे म्हणोनु | देता झाला तये वेळी  || ५० ||

सृष्टि रचावयाचा विचार | असे वेदांत सविस्तर | तेणेचिपरी रचूनि स्थिर | प्रकाश करीं म्हणितले || ५१ ||

अनादि वेद असती जाण | असे सृष्टिचे लक्षण | जैसी आरसा असे खूण | सृष्टि रचावया तैसा वेद || ५२ ||

या वेदमार्गे सृष्टीसी | रचीं गा ब्रह्मया अहर्निशी | म्हणोनि सांगे हृषिकेशी | ब्रह्मा रची सृष्टीते || ५३ ||

सृष्टी प्रजा अनुक्रमे | विविध स्थावरजंगमें | स्वेदज अंडज नामें | जारज उद्भिज्ज उपजविले || ५४ ||

श्रीविष्णूचे निरोपानें | त्रिजग रचिलें ब्रह्मयाने | तेणेपरी सृष्टीक्रमणें | व्यासें असे कथियेली || ५५ ||

सिद्ध म्हणे शिष्यासी | नारायण वेदव्यासीं | विस्तार केला पुराणांसी | अष्टादश विख्यात || ५६ ||

तयांत ब्रह्मवैवर्त | पुराण असे प्रख्यात | ऋषेश्वरांसी सांगे सूत | तेचि परी सांगतसे || ५७ ||

सनकांदिकांते उपजवोनि | ब्रह्मनिष्ठ येणें गुणी | मरीच्यादि ब्रह्म सगुणी | उपजवी ब्रह्मा तये वेळीं || ५८ ||

तेथोनि देवदैत्यांसी | उपजवी ब्रह्मा परियेसीं | सांगता कथा विस्तारेंसीं | असे, ऐक शिष्योत्तमा || ५९ ||

कृत-त्रेत-द्वापारयुग | मग उपजवी कलियुग | एकेकातें निरोपी मग | भूमीवरी प्रवर्ताया || ६० ||

बोलावूनि कृतयुगासी | निरोपी ब्रह्मा परियेसीं | तुवां जावोनि भूमीसी | प्रकाश करीं आपणांते || ६१ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन | कृतयुग आलें संतोषोन | सांगेन त्याचे लक्षण | ऐका श्रोते एकचित्ते || ६२ ||

असत्य नेणे कधीं वाचे | वैराग्यपूर्ण ज्ञानी साचें | यज्ञोपवीत आभरण त्याचें | रुद्राक्षमाळा करकंकणे || ६३ ||

येणें रूपें युग-सत्य | ब्रह्मयासी असे विनवित | मातें तुम्ही निरोप देत | केवीं जाऊं भूमीवरी || ६४ ||

भूमीवरी मनुष्य लोक | असत्य-निंदा-अपवादक | मातें न साहे तें ऐक | कवणेपरी वर्तावे || ६५ ||

ऐकोनि सत्ययुगाचे वचन | निरोपी तो ब्रह्मा आपण | तुवां वर्तावे सत्वगुण | क्वचित्काळ येणेंपरी || ६६ ||

न करीं जड तूंतें जाण | आणिक युग पाठवीन | तुवां रहावें सावधान | म्हणूनि पाठवी भूमीवरी || ६७ ||

वर्ततां येणेपरी ऐका | झाली अवधि सत्याधिका | बोलावूनि त्रेतायुगाते, विवेका | निरोपी ब्रह्मा परियेसा || ६८ ||

त्रेतायुगाचे लक्षण | ऐक शिष्या सांगेन | असे त्याची स्थूल तनु | हाती असे यज्ञसामग्री || ६९ ||

त्रेतायुगीं याचि कारणें | यज्ञ करिती सकळ जनें | धर्मशास्त्र प्रवर्तणे | कर्ममार्ग ब्राह्मणांसी || ७० ||

हातीं देखा वृषभ असे | धर्मप्रवर्तक सदा वसे | ऐसें युग गेलें हर्षे | निरोप घेऊनि भूमीवरी || ७१ ||

बोलावूनि ब्रह्मा हर्षीं | निरोप देत द्वापारासी | सांगेन तयाचे रूपासी | ऐका श्रोते एकचित्ते || ७२ ||

खड्ग खट्वांग धरोनि हातीं | धनुष्य बाण येरा हातीं | लक्ष्य उग्र असे शांति | निष्ठुर दया दोनी असे || ७३ ||

पुण्य पाप समान देखा | स्वरूपे द्वापार ऐसा निका | निरोप घेऊनि कौतुका | आला आपण भूमीवरी || ७४ ||

सिद्धमुनींचे कथन-

ब्रह्मदेव आणि कलीचा संवाद:

त्याचे दिवस पुरल्यावरी | कलियुगातें पाचारी | जावें त्वरित भूमिवरी | म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा || ७५ ||

ऐसें कलियुग देखा | सांगेन लक्षणें एका |  ब्रह्मयाचे सन्मुखां | केवीं गेले परियेसा || ७६ ||

विचारहीन अंत:करणी | पिशाचासारखा वदनी | तोंड खालतें करुनी | ठायीं ठायीं पडतसे || ७७ ||

क्रूर आपण विरागहीन | कलह द्वेष सवे घेऊन | वाक हाती धरूनि शिस्न | येत ब्रह्मयासन्मुख || ७८ ||

जिव्हा धरोनि उजवे हाती | नाचे कली अतिप्रीती | दोषोत्तरें करी स्तुति | पुण्यपापसंमिश्रित || ७९ ||

वांकुल्या दावी हांसे रडे | जिव्हा तोंड करुनि वांकुडे | उभा ठेला ब्रह्मयापुढे | काय निरोप म्हणतसे || ८० ||

देखोनि तयाचें लक्षण | ब्रह्मा हांसे अतिगहन | पुसतसे अति विनोदाने | लिंग जिव्हा कां धरिली || ८१ ||

कलियुग म्हणे ब्रह्मयासी | जिंकीन समस्त लोकांसी | लिंग जिव्हा रक्षणारांसी | हारी असे आपणांते || ८२ ||

याकारणें लिंग जिव्हा | धरोनि नाचें ब्रह्मदेवा | जेथें जाईन मी स्वभावा | आपण न भिये कवणिया || ८२ ||

ऐकोन कलींचे वचन | निरोप देतो ब्रह्मा आपण | भूमीवरी जाऊन | आपुले गुण प्रकाशी || ८४ ||

कलि म्हणे ब्रह्मयासी | मज पाठवितां भूमीसी | आपुले गुण आहेत कैसी | सांगेन ऐका स्वामिया || ८५ ||

छेद करीन धर्मासी | आपण असें निरंकुशी | निरानंद परियेसी | निद्रा-कलह माझे प्राण || ८६ ||

परद्रव्यहारक परस्त्रीरत | हे दोघे माझे भ्रात | प्रपंच-मत्सर-दंभक | प्राणसखे माझे असती || ८७ ||

बकासारिखे संन्यासी | तेचि माझे प्राण परियेसी | छळ करोनि उदरासी | मिळविती पोषणार्थ || ८८ ||

तेचि माझे सखे प्राण | आणीक असतील पुण्यजन | तेचि माझे वैरी जाण | म्हणोनि विनवी ब्रह्मयासी || ८९ ||

ब्रह्मा म्हणे कलियुगासी | सांगेन तुज उपदेशी | तुझ्या युगीं आयुष्य नरासी | स्वल्प असे एक शत || ९० ||

पूर्व युगायुगीं देखा | आयुष्य बहु मनुष्यलोकां | तप अनुष्ठान ऐका | करिती अनेक दिवसवरी || ९१ ||

मग होय तयांसी गति | आयुष्य असे अखंडिती | याकारणें कष्टती क्षिती | बहु दिवसपर्यंत || ९२ ||

आतां ऐसे नव्हे जाण | स्वल्प आयुष्य मनुष्यपणें | करिती तप अनुष्ठानें | शीघ्र पावती परमार्था || ९३ ||

जे जन असती ब्रह्मज्ञानी | पुण्य करिती जाणोनि | त्यांसी तुवां साह्य होऊनि | वर्तत असे म्हणे ब्रह्मा || ९४ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन | कली म्हणतसे नमून | स्वामींनी निरोपिले जे जन | तेचि माझे वैरी असती || ९५ ||

ऐसे वैरी जेथ असती | केवीं जाऊं तिये क्षिती | ऐकतां होते मज भीति | केवीं पाहू तयांसी || ९६ ||

पंचाशत भूमंडळात | भरतखंडीं पुण्य बहुत | मातें मारितील देखत | कैसा जाऊं म्हणतसे || ९७ ||

ऐकोनि कलीचें वचन | ब्रह्मा निरोपी हांसोन | काळात्म्यातें मिळोन | तुवां जावें भूमीसी || ९८ ||

काळात्म्याचे ऐसे गुण | छेदन करील धर्मवासना | पुण्यात्म्याचे अंत:करता | उपजेल बुद्धि पापाविषयी || ९९ ||

कली म्हणे ब्रह्मयासी | वैरी सांगेन माझे कैसी | वसताति भूमंडळासी | सांगेन स्वामी  ऐक पां || १०० ||

उपद्रविती मातें बहुत | कृपा न ये मज देखत | जे जन शिवहरि ध्यात | धर्मरत मनुष्य देखा || १०१ ||

आणिक असती माझे वैरी | वास करिती गंगातीरीं | आणिक वाराणशीपुरीं | जाऊनि धर्म करिती देखा || १०२ ||

तीर्थे हिंडती आ-चरण | आणिक ऐकती पुराण | जे जन करिती सदा दान | तेचि माझे वैरी || १०३ ||

ज्यांचे मनी असे शांति | तेचि माझे वैरी ख्याति | अदांभिकपणे पुण्य करिती | त्यांसी देखतांचि भीतसे || १०४ ||

नासाग्रीं दृष्टि देऊनी | जप करिती अनुष्ठानीं | त्यांसि देखतांचि नयनीं | प्राण माझा जातसे || १०५ ||

स्त्रियापुत्रांवरी प्रीति | मायापाशें आचरती | त्यांवरी माझी बहु प्रीति | परम इष्ट माझे जाणा || १०६ ||

वेदशास्त्रांते दूषिती | हरिहरांतें भेद पाहती | अथवा शिवविष्णू दूषिती | परम आप्त माझे जाणा || १०७ ||

जितेन्द्रिय असतील जे नर | सदा भजती हरिहर | रागद्वेषविवर्जित धीर | त्यांसि देखतां मज भय || १०८ ||

ब्रह्मा म्हणे कलियुगासी | तुझा प्रकाश बहुवसीं | तुवां जातांचि भूमीसी | तुझें इच्छें रहाटती || १०९ ||

एखादा विरळागत | होईल नर पुण्यवंत | त्यातें तुवा साह्य होत | वर्तत असें म्हणे ब्रह्मा || ११० ||

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन | कली करीतसे नमन | करसंपुट जोडोन | विनवीतसे परियेसा || १११ ||

माझा स्वभाव-दुर्वृत्तीसी | केवीं साह्य होऊं धर्मासी | सांगा स्वामी उपाय यासी | कवणेपरि रहाटावे || ११२ ||

कलीचे वचन ऐकोनि | ब्रह्मा हांसे अतिगहनी | सांगतसे विस्तारोनि | उपाय कलीसी रहाटावया || ११३ || 

काळ-मल असती दोनी | तुज साह्य होऊनि | येत असती  निर्गुणी | तेचि दाविती तुज मार्ग || ११४ ||

निर्मळ असती जे जन | तेचि तुझे वैरी जाण | मळमूत्रें वेष्टिले जन | तुझें इष्ट परियेसीं || ११५ ||

याचि कारणे पापपुण्यासी | विरोध असे परियेसीं | अधिक होय पुण्यराशी | तेचि जिंकिती परियेसा || ११६ ||

याकारणें विरळागत | होईल नर पुण्यवंत | तेंचि जिंकिती हें निश्चित | बहुतेक तुज वश्य होती || ११७ ||

एखादा विवेकी जन | तुझा उपद्रव साहील पूर्ण | जो न साहे तुझे दारुण | तुज वश्य जाण जाहला || ११८ ||

या कलियुगाभीतरीं | जन होतील येणेंपरीं | जे जन साहतील तुझी क्रूरी | तेंचि ईश्वरी ऐक्य होती || ११९ ||

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन | कलियुग करितसे प्रश्न | कैसें साधूचें अंत:करणं | कवण अंश निरोपावें || १२० ||

ब्रह्मा म्हणे तये वेळी | एकचित्ते ऐक कली | सांगेन ऐका श्रोते सकळी | सिद्ध म्हणे शिष्यासी || १२१ ||

धैर्य धरोनि अंत:करण | शुद्ध बुद्धी वर्तती जन | दोष न लागती कधी जाण | लोभवर्जित नरांसी || १२२ ||

जे जन भजती हरिहरांसी | अथवा असती काशीवासी | गुरु सेविती निरंतरेसीं | त्यांसी तुझा न लगे दोषु || १२३ ||

मातापितासेवकांसी | अथवा सेवी ब्राह्मणासी | गायत्रि कपिला-धेनूसी | भजणारांसी न लगे दोष तुझा || १२४ ||

वैष्णव अधवा शैवासी | जे सेविती नित्य तुळसीसी | आज्ञा माझी आहे ऐसी | तयांसी बाधूं नको || १२५ ||

गुरुसेवक असती नर | पुराण श्रवण करणार | सर्वसाधनधर्मपर | त्यांसी तूं बाधों नको || १२६ ||

सुकृती-शास्त्रपरायणांसी | गुरुतें सेविती वंशोवंशी | विवेके धर्म करणारांसी | त्यांते तुवां बाधूं नको || १२७ ||

कलि विनवी ब्रह्मयासी | 'गुरु' शब्द म्हणजे आहे कैसी | कवण गुरु स्वरुप कैसी | विस्तारावे मजप्रति || १२८ ||

सिद्धमुनींचे कथन-

ब्रह्मदेव कलीला गुरुमहिमा सांगतात

ऐकोनि कलीचें वचन | ब्रह्मा सांगतसे आपण | 'ग' कार म्हणजे सिद्ध जाण | रेफ: पापस्य दाहक: || १२९ ||

'उ' कार विष्णु अव्यक्त | ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित | त्रितयात्मक श्रीगुरु सत्य | म्हणोनि सांगे कलीसी || १३० ||

गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वित: | 

वर्णद्वयात्मको मन्त्रश्चतुर्वर्गफलप्रद: || १३१ ||

गणेशातें म्हणती गुरु | तैसाचि असे वैश्वानरु | ऐसाचि जाण शार्ङ्गधरु | गुरुशब्द वर्ते इतुके ठायीं || १३२ ||

गुरु: पिता गुरुर्माता गुरुरेव पर: शिव: |

शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन || १३३ ||

गुरु पिता, गुरु माता | गुरु शंकरु निश्चिता | ईश्वर होय जरी कोफ्ता | गुरु रक्षील परियेसा || १३४ ||

गुरु कोपेल एखाद्यासी | ईश्वर न राखे परियेसीं | ईश्वर कोपेल जरी त्यासी | श्रीगुरु राखेल निश्चित || १३५ ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वर: | गुरुरेव परं तत्त्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत् || १२६ ||

गुरु ब्रह्मा सत्य जाण | तोचि रुद्र महाविष्णु | गुरुचि तत्त्व कारण | म्हणोनि गुरु आश्रावा || १३७ ||

हरौ प्रसन्नेSपि च वैष्णवा जना:, सम्प्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययाम् |

गुरौ प्रसन्ने जगतामधीश्वर:, जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिद: || १३८ ||

ईश्वर जरी प्रसन्न होता | त्यासी होय गुरु ओळखविता | गुरु आपण प्रसन्न होतां | ईश्वर होय आधीन आपुल्या || १३९ ||

गुरुं भजन्शास्त्रमार्गान् प्रवेत्ति, तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् | 

आचारवर्णादिविवेकयज्ञान्, ज्ञानं परं भक्तिविरागयुक्तम् || १४० ||

याकारणें श्रीगुरुसी | भजावें शास्त्रमार्ग ऐसी | तीर्थव्रतयोगतपासी | ज्योति:स्वरूप असे जाणा || १४१ ||

आचारधर्मवर्णाश्रमांसी | विवेकी कर्ममार्गासी | भक्तिविरागयुक्तांसी | गुरुचि मार्ग दाखविणार || १४२ ||

इतुके ऐकोनि कलि आपण | विनवीतसे कर जोडून | गुरु सर्व देवांसमान | केवी झाला सांग मज || १४३ ||

ब्रह्मा म्हणे कलीसी | सांगेन तुज विस्तरेसीं | एकचित्ते परियेसीं | गुरुविणें पार नाहीं || १४४ ||

गुरुं विना न श्रवणं भवेत्कस्यापि कस्यचित् |

विनाकर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत्  || १४५ ||

गुरुवीण समस्तांसी | श्रवण कैचें परियेसीं | श्रवण होतां मनुष्यांसी | समस्त शास्त्रें ऐकतीं  || १४६ ||

शास्त्रें ऐकता परियेसीं | तरतील संसारापाशीं | याकारणे गुरुचि प्रकाशी | ज्योति:स्वरूप जाणावा || १४७ ||

गुरु सेवितां सर्व सिद्धि | होती परियेसा सर्व ऋद्धि | कथा वर्तली अनादि | अपूर्व तुज सांगेन || १४८ ||

गुरुनिष्ठ दीपकाची कथा:

पूर्वी गोदावरीचे तीरीं | अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी | वृक्ष असती नानापरी | पुण्य नाभीमृग वसती || १४९ ||

ब्रह्माऋषि आदिकरोनी | तप करिती तया स्थानी | तयांत 'वेदधर्म' म्हणोनि  पैलपुत्र होता द्विज || १५० ||

तया शिष्य बहु असती || वेदशास्त्र अभ्यासिती || त्यांत 'दीपक' म्हणिजे ख्याति || शिष्य होता परियेसा || १५१ ||

होता शिष्य गुरुपरायण || केला अभ्यास शास्त्रपुराण || झाला असे अतिनिपुण | तया गुरु सेवा करितां || १५२||

वेदधर्म एके दिनी | समस्त शिष्यांसी बोलावुनी | पुसतसे संतोषोनि | ऐका सकळजन || १५३ ||

बोलावून  शिष्यांसी ।| म्हणे गुरु परियेसी । प्रीति असेल जरी तुम्हांसी । तरी माझे वाक्य परिसावें ॥ १५४ ॥

शिष्य म्हणती गुरुसी | जें जें स्वामी निरोप देसी | अंगीकारुं भरंवसी | आम्हांसी तूं तारक || १५५ ॥

गुरुचें वाक्य जो न करीं | तोचि पडे रौरव-घोरीं || अविद्यामायासागरीं । बुडोन जाय तो नर ॥ १५६ ॥ 

मग तया कैंची गति । नरकीं पडे तो सततीं || गुरु तारक हे ख्याति | बोलती वेदपुराणें || १५७ || 

ऐकोनि शिष्यांचे वचनी | संतोष जाहला वेदधर्म मुनि | संदीपकांतें बोलावूनि | सांगतसे परियेसा || १५८ ||

ऐका हो शिष्य सकळिक | आमचें पूर्वार्जित असे एक | जन्मांतरी सहस्रेक | केलें होतें महापातक || १५९॥

आमुचें अनुष्ठान करितां | बहुत गेलें प्रक्षाळितां | कांहीं शेष असे आतां | भोगिल्यावांचूनि न सुटे जाणा ||१६०॥

तपसामर्थ्ये जरी उपेक्षा करित || तरी पाप मोक्षासी आड रिघत | याचि कारणें निष्कृति करित | तया पापघोरासी || १६१||

न भोगितां आपुले देही | आपले पापा निष्कृती नाही  | हे निश्चय करोनि पाहीं | भोगावें आम्हीं परियेसा || १६२||

या पापाचे निष्कृतीसी || जावें आम्हीं वाराणशींसी | जाईल पाप शीघ्रतेसीं | प्रख्यात असे अखिल शास्त्रीं || १६३ ||

याकारणें आपणासी | न्यावें वाराणसी पुरीसी | पाप भोगीन स्वदेहासीं | मातें तुम्हीं सांभाळावें || १६४ ||

या समस्त शिष्यांत | कवण असेल समर्थ | अंगीकारावें त्वरित | म्हणोनि पुसे शिष्यांसी || १६५ ||

या शिष्यांमध्ये एकु | नाम असे 'संदीपकु' | बोलतसे अतिविवेकु | तया गुरुप्रति देखा || १६६ ||

दीपकु म्हणे श्रीगुरुसी | पाप करितां देह नाशी | न करावा संग्रहो दु:खासी | शीघ्र करावा प्रतीकारु || १६७ ||

वेदधर्म म्हणे तयासी | दृढ-देह असतां मनुष्यासी | क्षालन करावें पापासी | अथवा वाढे विषापरी || १६८ ||

अथवा तीर्थ-प्रायश्चित्त | अपुले देहीं भोगोनि त्वरित | पापावेगळे न होता निरुते | आपुले आपण न भोगितां || १६९ ||

देव अथवा ऋषेश्वरांसी | मनुष्यादि जंतूंसी | क्षालन न होय पापासी| आपुले आपण न भोगिता || १७० ||

दीपक म्हणे गुरुसी | स्वामी निरोपावें आपणासी | सेवा करीन स्वशक्तीसी | न करितां अनुमान, सांगिजे || १७१ ||

ऐकोनि दीपकाचे वचन | वेदधर्म म्हणे आपण | कुष्ठी होईन अंगहीन | अंध पांगुळ परियेसा || १७२ ||

संवत्सर एकविंशत | मातें सांभाळावे बहुत | जरी असेल दृढ-व्रत | तरीच अंगीकार करावा || १७३ ||

दीपकु म्हणे गुरुसी | कुष्ठी होईन आपण हर्षी | अंध होईन एकवीस वर्षी | पापनिष्कृति करीन || १७४ ||

तुमचे पापाची निष्कृति । मी करीन निश्र्चतीं ।स्वामी निरोपावें त्वरिती । म्हणोनि चरणीं लागला ॥ १७५ ॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला वेदधर्म मुनि आपण । सांगतसे विस्तारोन । लक्षण तया पापाचें ॥ १७६ ॥

आपुलें पाप आपणासी । नोहे पुत्रशिष्यांसी । न भोगितां स्वदेहासी । नवचे पाप परियेसा ॥ १७७ ॥

याकारणें आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा । बापा आम्हांसी सांभाळीं तूं दीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥ १७८ ॥

जे पीडिती रोगें देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका । मजहूनि संदीपका । तुज कष्ट अधिक जाण ॥ १७९ ॥

याकारणें आपुले देहीं । भोगीन पाप निश्र्चयीं। तुवां प्रतिपाळावें पाहीं । काशीपुरीं नेऊनियां ॥ १८० ॥

तया काशीपुरीं जाण । पापावेगळा होईन । आपण शाश्र्वतपद पावेन । तुजकरितां शिष्योत्तमा ॥ १८१ ॥

दीपकु म्हणे श्रीगुरुसी । अवश्य नेईन पुरी काशी ।सेवा करीन एकवीस वर्षी । विश्र्वनाथासम तुम्ही ॥ १८२ ॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । एक शिष्य होता कैसा त्यासी । कुष्ठ होतांचि गुरुसी । नेलें काशीपुराप्रति ॥ १८३ ॥

मनकर्णिका उत्तरदिशीं । कंबळेश्र्वर-संनिधेसी ।राहिले तेथें परियेसीं । गुरु शिष्य दोघेजण ॥ १८४ ॥

स्नान करुनि मनकर्णिकेसी । पूजा करिती विश्र्वेशासी । प्रारब्धभोग त्या गुरुसी । भोगीत होता तया स्थानीं ॥ १८५ ॥

कुष्ठरोगें व्यापिलें बहुत । अक्षहीन अति दुःखित ।संदीपक सेवा करित । अतिभक्तीकरुनि ॥ १८६ ॥

व्यापिलें देहीं कुष्ठ बहुत । पू कृमि पडे रक्त । दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥ १८७ ॥

भिक्षा मागोनि संदीपकु । गुरुसी आणोनि देत नित्यकु । करी पूजा भावें एकु । विश्र्वनाथस्वरुप म्हणत ॥ १८८ ॥

रोगेंकरुनि पीडिती नरु । साधुजन होती क्रूरु ।तेचि रीतीं द्विजवरु । होय क्रूर व्याधिबळें ॥ १८९ ॥

भिक्षा आणितां एके दिनीं । न जेवी श्रीगुरु कोपेनीं । स्वल्प आणिलें म्हणोनी । क्लेशें सांडोनि देत भूमीवरी ॥ १९० ॥

येरे दिवशीं जाऊनि शिष्य । आणी अन्न बहुवस ।मिष्टान्न नाणिसी म्हणोनि क्लेश । करिता झाला परियेसा ॥ १९१ ॥

परोपरीचीं पक्वान्नें । कां नाणिशी म्हणे । जाय, कोपें मारुं ये आपण । शाका परोपरी मागतसे ॥ १९२ ॥

तितुकेंही आणी मागोनियां । सर्वस्व करीतसे वायां । कोपें देतसे शिविया । परोपरी परियेसा ॥ १९३ ॥

एखादें समयीं शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।मजनिमित्त कष्टलासी । शिष्योत्तम-शिखामणी ॥ १९४ ॥

सवेंचि म्हणे पापी क्रूरा । मातें गांजिलें अपारा । पू-मांस विण्मूत्रा । क्षणाक्षणां धूत नाही ॥ १९५ ॥

खाताति मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका । सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिसी म्हणतसे ॥ १९६ ॥

याकारणें पापगुण । ऐसेंचि असे जाण । वोखटें वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावें ॥ १९७ ॥

पाप जेथें असे बहुत । दैन्य मात्सर्यसहित वसत ।शुभाशुभ नेणे क्वचित । पापरुप तें जाणावें ॥ १९८ ॥

एखादे दैत्यकासी । दुःखप्राप्ति होय कैसी ।अपस्मार होय जयासी । पापरुप तोचि जाणा ॥ १९९ ॥

समस्त रोग असती देखा । कुष्ठ-सोळा भाग नव्हती का । वेदधर्म द्विजु ऐका । कष्टतसे येणेपरी ॥ २०० ॥

ऐसे गुरुचे गुणदोष । मना नाणी तो शिष्य । सेवा करी एकमानस । तोचि ईश्र्वर म्हणोनि ॥ २०१ ॥

जैसे जैसें मागे अन्न । आणूनि देतो परिपूर्ण । जैसा ईश्र्वर असे विष्णु । तैसा गुरु म्हणतसे ॥ २०२ ॥

काशीसारखे क्षेत्र असतां । कदा न करी तीर्थयात्रा । न वचे देवाचिये यात्रा । गुरुसेवेवांचूनि ॥ २०३ ॥

न तीर्थयात्रा न च देवयात्रा, 

न देहयात्रा न च लोकयात्रा ।

अहर्निशं ब्रह्महरीबुद्धया, 

गुरुं प्रपन्नो नहि सेव्यमन्यत ॥ २०४ ॥

आपुला देह संरक्षण । कधी न करी शिष्यराणा ।लय लावूनि श्रीगुरुचरणा । कवणासवें न बोलेचि ॥ २०५ ॥

अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारि । गुरुचे होय निर्धारीं । म्हणोनि सेवा करीतसे ॥ २०६ ॥

गुरु बोले निष्ठुरेसीं । आपण मनी संतोषी । जें जें त्याचे मानसीं । पाहिजे तैसा वर्ततसे ॥ २०७ ॥

वर्ततां येणेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।येवोनि उभा सन्मुख । वर माग म्हणतसे ॥ २०८ ॥

अरे गुरुभक्ता दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।तुष्टलों तुझे भक्तीसी निका । प्रसन्न झालों माग आतां ॥ २०९ ॥

दीपक म्हणे ईश्र्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।न पुसतां आपण गुरुसी । वर न घें परियेसा ॥ २१० ॥

म्हणोनि गेला गुरुपाशीं । विनवीतसे तयासी ।विश्र्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होऊनि आलासे ॥ २११ ॥

निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशम व्याधीचा । वर होतां सदाशिवाचा । होईल बरवें तुम्हांसी ॥ २१२ ॥

ऐकोनि शिष्याचे वचन । बोले गुरु कोपोन । माझे व्याधीनिमित्त जाण । नको प्रार्थूं ईश्र्वरासी ॥ २१३ ॥

भोगिल्यावांचोनि । निवृत्ति नव्हे गा परियेसीं ।जन्मांतरी बाधिती ऐसी । धर्मशास्त्र असे जाण ॥ २१४ ॥

मुक्ति-अपेक्षा ज्याचे मनीं । निवृत्ति करावी पापधुनी । शेष राहिलिया निर्गुणी । विघ्न करी मोक्षासी ॥ २१५ ॥

ऐसेपरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसीं । निरोप पुसोनि श्रीगुरुसी । गेला ईश्र्वरासन्मुख ॥ २१६ ॥

जाऊनि म्हणे ईश्र्वरासी । नलगे वर आपणासी ।नये गुरुचे मानसीं । केवीं घेऊं म्हणतसे ॥ २१७ ॥

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंटपासी । बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तांत विष्णूपुढ़ें ॥ २१८ ॥

श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।कोठे त्यांचा असे वास । सांगावें मज प्रकाशोनि ॥ २१९ ॥

सांगे ईश्र्वर विष्णूसी । आश्र्चर्य देखिलें परियेसीं ।दीपक ‘ म्हणिजे बाळ कैसी । गुरुभक्ति करितो अभिनव ॥ २२० ॥

गोदावरीतीरवासी । ‘ वेदधर्म ‘ म्हणिजे तापसी ।त्याची सेवा अहर्निशी । करितो भावें एकचित्तें ॥ २२१ ॥

न ऐकिला देखिला कोणीं । गुरुभक्ति करणार निर्वाणी । त्यातें देखोनि माझे मनीं । अतिप्रीति वर्ततसे ॥ २२२ ॥

वर देऊं म्हणोनि आपणु । गेलों होतों ऐक विष्णु ।गुरुचा निरोप नाहीं म्हणोनु । न चे वर परियेसा ॥ २२३ ॥

अनेक दिव्य सहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनियां ॥ २२४ ॥

तैसे तापसी योगियांसी । नव्हे मन वर द्यावयासी ।बलात्कारें देतां कैसी । वर न घे तो दीपक ॥ २२५ ॥

तनुमन गुरुसी समर्पूनि । सेवा करितो संतोषोनि ।त्रिमूर्ति गुरुचि म्हणोनि । निश्र्चय केला मानसीं देखा ॥ २२६ ॥

समस्त देव माता पिता । गुरुचि होय ऐसें म्हणतां । निश्र्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥ २२७ ॥

किती म्हणोनि वर्णूं त्यासी । अविद्या-अंधकारासी । तोचि दीप परियेसीं । कुलदीपक नाम सत्य ॥ २२८ ॥

धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे तो दीपक ।चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरुची भक्तीनें ॥ २२९ ॥

इतुकें एकोनि शार्ङगधरु । पहावया गेला शिष्य-गुरु । त्यांचा भक्तिप्रकारु । पाहता झाला तये वेळीं ॥ २३० ॥

सांगितले होतें विश्र्वनाथें । अधिकत्व दिसे आणिक बहुतें । संतोषोनि दीपकातें । म्हणे विष्णु परियेसा ॥ २३१ ॥

बोलावूनि दीपकासी । म्हणतसे हृषीकेशी । तुष्टलों तुझ्या भक्तीसी । वर माग म्हणतसे ॥ २३२ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी । वर देसी परियेसीं । कवण कार्या सांग मज ॥ २३३ ॥

दिव्य कोटी सहस्त्र वरुषीं । तप करिती अरण्यवासी । त्यांसी करितोसि उदासी । वर नेदिसी नारायणा ॥ २३४ ॥

मी तर तुज भजत नाहीं । तुझें नामस्मरण नाहीं ।बलात्कारें येवोनि पाहीं । केवीं देसी वर मज ॥ २३५ ॥

ऐकोनि दीपकाचें वचनु । संतोषी जाहला महाविष्णु । सांगतसे विस्तारोनु । तया दीपकाप्रती देखा ॥ २३६ ॥

गुरुभक्ति करिसी निर्वाणेसीं । म्हणोनि जाहलों संतोषी । जे भक्ति केलीस गुरुसी । तेचि आम्हांसी पावली ॥ २३७ ॥

जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा असे प्राण । त्यासी वश्य झालों आपण । जें जें मागेल तें तें म्यां द्यावें ॥ २३८ ॥

सेवा करिती मातापितीं । तेचि सेवा मज पावती ।पतिसेवा स्त्रिया करिती । तेचि मज पावतसे ॥ २३९ ॥

एखादे भल्या ब्राम्हणासी । यति-योगेश्र्वर-तापसी । नमन करिती भक्तीसीं । तेंचि मज पावे जाणा ॥ २४० ॥

ऐसें ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक ।विनवीतसे ऐक । सिद्ध म्हणे द्विजासी ॥ २४१ ॥

ऐक विष्णु हृषीकेशी । निश्र्चय असे माझे मानसीं । वेदशास्त्रादिमीमांसी । गुरु आम्हांसी देणार ॥ २४२ ॥

गुरुपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां अधीन । आमुचा देव गुरुचि जाण । अन्यथा नाहीं आपणासी ॥ २४३ ॥

सर्व देव सर्व तीर्थ । गुरुचि आम्हां असे सत्य ।त्याचेनि आम्हां परमार्थ । केवीं दूर असे सांग ॥ २४४ ॥

समस्त योगी सिद्धजन । गुरुवांचूनि नाही ज्ञान ।ज्ञान होतांचि ईश्र्वर आपण । केवीं दूर असे सांग मज ॥ २४५ ॥

जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतां काय चोज ।याकारणें श्रीगुरुराज । भजतसें परियेसा ॥ २४६ ॥

संतोषोनि महाविष्णु । म्हणे धन्य धन्य माझा प्राणु । तूंचि शिष्य शिरोरत्न । भोळा भक्त तूंचि माझा ॥ २४७ ॥

कांहीं तरी माग आतां । वर देईन सर्वथा ।विश्र्वनाथ आला होता । दुसरेन आलों आपण देखा ॥ २४८ ॥

आमचे मन संतोषी । वर माग जो तुझे मानसीं ।आम्ही जाहलों तुज वशी । जें पाहिजे तें देऊं आतां ॥ २४९ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । जरी वर आम्हां देसी ।गुरुभक्ति होय अधिक मानसीं । तैसें ज्ञान आणिक द्यावें ॥ २५० ॥

गुरुस्वरुप आपण ओळखें । तैसे ज्ञान देईं सुखें ।यापरतें न मागें आणिकें । म्हणोनि चरणीं लागला ॥ २५१ ॥

दिधला वर शार्ङगपाणी । संतोषोनि बोले वाणी ।ऐके दीपक शिष्यशिरोमणि । माझा प्राणसखा होसी ॥ २५२ ॥

तुवा ओळखिलें गुरुसी । देखिलें दृष्टीं परब्रह्मासी । आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन ऐक एकचित्तें ॥ २५३ ॥

लौकिक सुबुद्धि असे जैशी । धर्माधर्मसुमनेसी ।उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसीं । स्तुति करीं गा श्रीगुरुतें ॥ २५४ ॥

जे जे समयी श्रीगुरुसी । तूं भक्तीनें स्तुति करिसी । तेणें आम्ही होऊं । तेंचि आमुची स्तुति जाण ॥ २५५ ॥

वेद वाचिती साङगेसी । वेदान्त-भाष्य अहर्निशी ।वाचिती जन भक्तीसीं । आम्हां पावे निर्धारीं ॥ २५६ ॥

बोलती वेद सिद्धांत । गुरुचि ब्रह्म ऐसें म्हणत ।याचिकारणें गुरु भजतां । सर्व देव तुज वश्य ॥ २५७ ॥

‘ गुरु ‘ म्हणजे अक्षरें दोन । अमृताचा समुद्र जाण । तयामध्यें बुडतांचि क्षण । केवीं होय परियेसा ॥ २५८ ॥

जयाचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । तोचि त्रैलोक्यपूज्य जाण । अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥ २५९ ॥

यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्गुरुस्तदा ॥ २६० ॥

आपण अथवा ईश्र्वरु । ब्रह्मा देत जो का वरु ।फलप्राप्ति होय गुरु । गुरु त्रिमूर्ति याचिकारणें ॥ २६१ ॥

ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूनें परियेसीं ।ब्रह्मा सांगतसे कलीसी । एकचित्तें परियेसा ॥ २६२ ॥

वर लाधोनियां दीपक । गेला गुरुचे सन्मुख ।पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥ २६३ ॥

ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधलें विनायकें ।विस्तारोनि सांगे निकें । माझें मन स्थिर होय ॥ २६४ ॥

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला हृषीकेशीं । म्यां मागितलें ऐसी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनि ॥ २६५ ॥

गुरुची सेवा तत्परेसीं । अंतःकरणीं दृढ शुद्ध ऐशी । वर दिधला संतोषीं । दृढभक्ति तुमचे चरणीं ॥ २६६ ॥

संतोषोनि तो गुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारु ।जीविते होय तूं स्थिरु । काशीपुरीं वास करीं ॥ २६७ ॥

तुझे वाक्यें सर्वसिद्धि । तुझे द्वारीं नवनिधि ।विश्र्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषें ॥ २६८ ॥

तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती । श्रियायुक्त ते नांदती । तुझ्या स्मरणमात्रेसीं ॥ २६९ ॥

येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसीं ।दिव्यदेह तत्क्षणेसीं । झाला गुरु वेदधर्म ॥ २७० ॥

शिष्याचा पहावया वासु । कुष्ठी झाला होता क्लेशु । तो तापसी अतिविेशेषु । त्यासी कैंचें पाप राहे ॥ २७१ ॥

लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशीं ।काशीक्षेत्रमहिमा आहे ऐसी । पाप जाय सहस्त्रजन्मींचे ॥ २७२ ॥

तया काशीनगरांतु । धर्म अथवा अधर्म-रतु । वास करिती नर क्वचितु । पुनर्जन्म नाहीं जाणा ॥ २७३ ॥

सूत म्हणे ऋषीश्र्वरासी । येणेंपरी कलीसी । सांगे ब्रह्मा परियेसीं । शिष्यदीपकआख्यान ॥ २७४ ॥

सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावें याचिगुणीं । तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे ॥ २७५ ॥

यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मनः ।

तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥ २७६ ॥

दृढ भक्ति असे जयापाशीं । त्रिकरणसह मानसीं ।

तोचि लाधे ईश्र्वरासी । ईश्र्वर होय तया वश्य ॥ २७७ ॥

गंगाधराचा नंदनु । करीतसे श्रोतयां नमनु ।

न म्हणावें न्यून-पूर्ण । माझे बोबडे बोलांसी ॥ २७८ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्याने नाम द्वितीयोऽध्यायः ॥

🪔 🌺 🙏 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 🪔 🌺 🙏 


Friday, March 6, 2026

गुरुचरित्र- अध्याय १

 

गुरुचरित्र 

अध्याय १-मंगलाचरण 

सिद्धमुनी आणि नामधारकाची भेट

(ओवीसंख्या १४९)

॥ ॐ ॥

या अध्यायात काय आहे:

गुरुचरित्राचा पहिला अध्याय श्रीगणेशाच्या मंगलस्मरणाने सुरू होतो आणि तत्पश्चात सूतमुनी गुरूच्या परममहिमेचे वर्णन करतात—गुरू हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप असून त्यांच्या कृपेनेच जीवाला अज्ञान, दुःख आणि संसारबंधनातून मुक्ती मिळते. नामधारक आपल्या जीवनातील संकटांनी व्याकुळ होऊन गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि “मी गुरूभक्त असूनही माझ्यावर दुःख का येते?” अशी साधकाच्या मनातील शाश्वत शंका व्यक्त करतो. त्यावर सूतमुनी त्याला शांत करीत म्हणतात की श्रीगुरूंचे चरित्र श्रवण हेच सर्व दुःखनिवारणाचे औषध आहे, आणि याच संवादातून संपूर्ण ग्रंथाचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

सूची:

  • श्री गणेश स्तुती 
  • श्री सरस्वती स्तुती
  • त्रिदेव-स्मरण
  • समग्र देवदेवतांस वंदन
  • स्वकुळाचा इतिहास
  • गुरुचरित्र लिहिण्याचा संकल्प
  • गुरुचरित्राचा महिमा
  • श्रीनृसिंहसरस्वतींचा (श्रीगुरूंचा) महिमा
  • नामकरणी नावाचा शिष्य श्रीगुरूंना भेटण्याचा निश्चय करतो
  • नामकरणी  श्रीगुरूंची प्रार्थना करतो

🌺 🌺 🌺 

श्रीगणेशाय नमः | श्री सरस्वत्यै नमः | श्रीगुरुभ्यो नमः | श्रीकुलदेवतायै नमः ||

श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्गुरुभ्यो नमः: ||

श्री गणेश स्तुती 

ॐ नमोजी विघ्नहरा | गजानना गिरिजाकुमरा | जय जय लंबोदरा | एकदंता शूर्पकर्णा || १ ||

हालविशी कर्णयुगुले | तेथूनि जो का वारा उसळे | त्याचेनि वाते विघ्न पळे | विघ्नांतक म्हणती || २ ||

तुझे शोभे अन्न | जैसे तप्त कांचन | किंवा उदित प्रभारमण | तैसे तेज फाकतसे || ३ ||

विघ्नकाननछेदनासी | हाती फरश धरिलासी || नागबंद कटीसी | उरग यज्ञोपवीत || ४ ||

चतुर्भुज दिससी निका | विशालाक्षा विनायका | प्रतिपाळिसी विश्वलोका | निर्विघ्ने करूनिया || ५ ||

तुझे चिंतन जे करिती | त्या विघ्ने न बाधती | सकळाभीष्टे  साधती | अविलंबेसी || ७ ||

सकळ मंगल कार्यासी | प्रथम वंदिजे तुम्हासी | चतुर्दश विद्यांसी | स्वामी तूचि लंबोदरा || ७ ||

वेद शास्त्रे पुराणे | तुझेचि असेल बोलणे | ब्रह्मादिकि या कारणे | स्तविला असे सुरवरी || ८ ||

त्रिपुर साधन करावयासी | ईश्वरे अर्चिले तुम्हासी | संहारावया दैत्यांसी | पहिले तुम्हांसी स्तविले || ९ ||

हरिहर ब्रह्मादिक गणपती | कार्यारंभी तुज वंदिती | सकळाभीष्टे साधती | तुझेनि प्रसादे || १० ||

कृपानिधी गणनाथा | सुरवरदिका विघ्नहर्ता | विनायका अभयदाता | मतिप्रकाश करी मज || ११||

समस्त गणांचा नायक | तूचि विघ्नांचा अंतक |  तूते वंदिती जे लोक | कार्य साधे तयांचे || १२ ||

सकळ कार्या आधारू | तूचि कृपेचा सागरू | करुणानिधि गौरीकुमरू | मतिप्रकाश करी मज || १३ ||

माझे मनींची वासना | तुवा पुरवावी गजानना | साष्टांग करितो नमना | विद्या देई मज आता || १४ ||

नेणता होतो मतिहीन | म्हणोनि धरिले तुझे चरण | चौदा विद्यांचे निधान | शरणागतवरप्रदा || १५ ||

माझिया अंत:करणीचे व्हावे | गुरुचरित्र कथन करावे | पूर्णदृष्टीने पहावे | ग्रंथसिद्धि पाववी दातारा || १६ ||

श्री सरस्वती स्तुती 

आता वंदू ब्रह्मकुमारी | जिचे नाम वागीश्वरी | पुस्तक वीणा जिचे करी | हंसवाहिनी असे देखा || १७ ||

म्हणोनि नसतो तुझे चरणी | प्रसन्न व्हावे मज स्वामिणी | राहोनिया माझिये वाणी | ग्रंथी रिघू करी आता || १८ ||

विद्या वेद शास्त्रांसी | अधिकार जाणा शारदेसी | तिये वंदिता विश्वासी | ज्ञान होय अवधारा || १९ ||

ऐक माझी विनंती | द्यावी आता अवलीला मती | विस्तार करावया गुरुचरित्री | मतिप्रकाश करी मज || २० ||

जय जय जगन्माते | तूचि विश्वी वाग्देवते | वेदशास्त्रे तुझी लिखिते | नांदविशी येणेपरी || २१ ||

माते तुझिया वाग्बाणी | उत्पत्ति वेदशास्त्रीपुराणी | वदता साही  दर्शनी | त्यांते अशक्य परियेसा || २२ ||

गुरूचे नामी तुझी स्थिती | म्हणती नृसिंहसरस्वती | याकारणे मजवरी प्रीति | नाम आपुले म्हणूनी || २३ ||

खांबसूत्रीची बाहुली जैसी | खेळती तया सूत्रासरसी | स्वतंत्रबुधि नाही त्यांसी | वर्तती आणिकाचेनि मते || २४ ||

तैसे तुझेनि अनुमते | माझे जिव्हे प्रेरी माते | कृपानिधि वाग्देवते| म्हणोनि विनवी तुझा बाळ || २५ ||

म्हणोनि नमिले तुझे चरण | व्हावे स्वामिणी प्रसन्न | द्यावे माते वरदान | ग्रंथी रिघू करवी आता || २६ ||

त्रिदेव-स्मरण:

आता वंदू त्रिमूर्तीसी | ब्रह्माविष्णुशिवांसी | विद्या मागे मी त्यांसी | अनुक्रमे करोनी || २७ ||

चतुर्मुखे असती ज्यासी | कर्ता जो का सृष्टीसी | वेद झाले बोलते ज्यासी | त्याचे चरणी नमन माझे || २८ ||

आता वंदू हृषिकेशी | जो नायक त्या विश्वासी | लक्ष्मी सहित अहर्निशी | क्षीरसागरी असे जाणा || २९ ||

चतुर्बाहु नरहरी | शंख चक्र गदा करी | पद्महस्त मुरारी | पद्मनाभ परियेसा || ३० ||

पीतांबर असे कसियेला | वैजयंती माळा गळा | शरणागता अभीष्ट सकळा | देता होय कृपाळू || ३१ ||

आता नमू शिवासी | धरिली गंगा मस्तकेसी | पंचवक्त्र दहा भुजेसी | अर्धांगी असे जगन्माता || ३३ ||

पंचवदने असती ज्यासी | संहारी जो या सृष्टीसी | म्हणोनि बोलती स्मशानवासी | त्यांचे चरणी नमन माझे || ३३ ||

व्याघ्रांबर पांघरून | सर्वांगी असे सर्पवेष्टण | असा शंभु उमारमण | त्याचे चरणी नमन माझे || ३४ ||

समग्र देवदेवतांस वंदन:

नमन समस्त सुरवरा | सिद्धसाध्यां अवतारा | गंधर्वयक्षकिन्नरा| ऋषीश्वरा नमन माझे  || ३६ ||

वंदू आता कविकुळासी |  पराशरादि व्यासांसी| वाल्मीकादि सकळिकांसी |  नमन माझे परियेसा || ३६ ||

नेणे कवित्व असे कैसे | म्हणोनि तुम्हा विनवितसे | ज्ञान द्यावे जी भरवसे | आपुला दास म्हणोनि || ३७ ||

न कळे ग्रंथप्रकार | नेणे शास्त्रांचा विचार | भाषा नये महाराष्ट्र | म्हणोनि विनवी तुम्हासी || ३८ ||

समस्त तुम्ही कृपा करणे | माझिया वचना साह्य होणे | शब्दव्युत्पत्तीही नेणे | कविकुळ तुम्ही प्रतिपाळा || ३९ ||

ऐसे सकळिका विनवोनि | मग ध्याइले पूर्वज मनी | उभयपक्ष जनकजननी || ४० ||

स्वकुळाचा इतिहास:

आपस्तंबशाखेसी | गोत्र कौंडिण्य महाऋषि | साखरे नाम ख्यातिशी |  सायंदेवापासाव || ४१ ||

त्यापासूनि नागनाथ | देवराव तयाचा सुत | सदा श्रीसद्गुरुचरण ध्यात | गंगाधर जनक माझा || ४२ ||

नमन करिता जनकचरणी | मातापूर्वज ध्यातो मनी | जो का पूर्वज नामधारणी | आश्वलायन शाखेचा || ४३ ||

काश्यपाचे गोत्री | चौंडेश्वरी नामधारी | वागे जैसा जन्हु अवधारी | अथवा जनक गंगेचा || ४४ ||

त्याची कन्या माझी जननी | निश्चये जैशी भवानी | चंपा नामें पुण्यखाणी | स्वामिणी माझी परियेसा || ४५ ||

गुरुचरित्र लिहिण्याचा संकल्प:

नमिता जनकजननीसी | नंतर नमू श्रीगुरुसी | घाली मति प्रकाशी | गुरुचरण स्मरावया || ४६ ||

गंगाधराचे कुशी | जन्म झाला परियेसी | सदा  ध्याय श्रीगुरुसी | एका भावे निरंतर || ४७ ||

म्हणोनि सरस्वती गंगाधर | करी संतांसी नमस्कार | श्रोतया विनवी वारंवार | क्षमा करणे बाळकासी || ४८ ||

वेदाभ्यासी संन्यासी | यती योगेश्वर तापसी |  सदा न्यायी श्रीगुरुसी | तयांसी माझा नमस्कार || ४९ ||

विनवितसे समस्तांसी | अल्पमती आपणासी | माझे बोबडे बोलांसी  सकळ तुम्ही अंगिकारा || ५० ||

तावन्मात्र माझी मति | नेणे काव्यव्युत्पत्ति | जैसे श्रीगुरु निरोपिती | तेणे परी सांगत || ५१ ||

पूर्वापार आमुचे वंशी | गुरु प्रसन्न अहर्निशी | निरोप देती माते परियेसी | चरित्र आपुले विस्तारावया || ५२ ||

म्हणे ग्रंथ कथन करी | अमृतघट स्वीकारी | तुझे वंशी परंपरी | लाधती चारी पुरुषार्थ || ५३ ||

गुरुवाक्य मज कामधेनु | मनी नाही अनुमानु | सिद्धि पावविणार आपणु | श्रीनृसिंहसरस्वती || ५४ ||

त्रैमूर्तीचा अवतार | झाला नृसिंहसरस्वती नर | कवण जाणे याचा  पार | चरित्र कवणा न वर्णवे || ५५ ||

चरित्र ऐसे श्रीगुरुचे | वर्णू न शके मी वाचे | आज्ञापन असे श्रीगुरुचे | म्हणोनि वाचे बोलतसे || ५६ ||

गुरुचरित्राचा महिमा:

ज्यास पुत्रपौत्री असे चाड | त्यासी कथा हे असे गोड | लक्ष्मी वसे अखंड | तया भुवनी परियेसा || ५७ ||

ऐशी कथा जयाचे घरी | वाचिती नित्य प्रेमभरी | श्रियायुक्त निरंतरी | नांदती पुत्रकलत्रयुक्त || ५८ ||

रोग नाही तया भुवनी | सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि | नि:संदेह साता दिनी | ऐकता बंधन तुटे जाणा || ५९ ||

ऐसी पुण्यपावन कथा | सांगेन ऐक विस्तारता | सायासाविण होय साध्यता | सद्य:फल प्राप्त होय || ६० ||

निधान लाभे अप्रयासी | तरी कष्ट का सायासी | विश्वास माझिया बोलासी | ऐका श्रोते एकचित्ते || ६१ ||

आम्हा साक्षी अप्रयासी | म्हणोनि विनवितसे बळे | श्रीगुरुस्मरण असे भले | अनुभवा हो सकळिक || ६२ ||

तृप्ति झालियावरी ढेकर | देती जैसे जेवणार | गुरुमहिमेचा उद्गार | बोलतसे अनुभवोनि || ६३ ||

मी सामान्य म्हणोनि | उदास व्हाल माझे वचनी | मक्षिकेच्या मुखांतुनी | मधु केवी ग्राह्य होय || ६४ ||

जैसे शिंपल्यात मुक्ताफळ | अथवा कर्पूर कर्दळ | विचारी पा अश्वत्थमूळ | कवणापासाव उत्पत्ति || ६५ ||

ग्रंथ कराल उदास | वाकुड कृष्ण दिसे ऊस | अमृतवत निघे त्याचा रस | दृष्टि द्यावी तयावरी || ६६ ||

तैसे माझे बोलणे | ज्याची चाड गुरुस्मरणे | अंगिकार करणार शहाणे | अनुभविती एकचित्ते || ६७ ||

ब्रह्मरसाची गोडी | अनुभवितां फळे रोकडी | या बोलाची आवडी |  ज्यासी संभवे अनुभव || ६८ ||

गुरुचरित्र कामधेनु | ऐकता होय महाज्ञानु | श्रोती करोनिया सावध मनु | एकचित्ते परियेसा || ६९ ||

श्रीनृसिंहसरस्वतींचा (श्रीगुरूंचा) महिमा:

श्रीगुरु नृसिंहसरस्वती | होते गाणगापुरी ख्याति | महिमा त्यांचा अत्यदृभुती | सांगेन एका एकचित्ते || ७० ||

तया ग्रामी वसती गुरु | म्हणोनि महिमा असे थोरु | जाणती लोक चहू राष्ट्रु | समस्त जाती यात्रेसी || ७१ ||

तेथे राहोनि आराधिती | त्वरित होय फलप्राप्ति | पुत्र दारा धन संपत्ति | जे जे इच्छिले होय जना || ७२ ||

लाधोनिया संताने | नामें ठेविती नामकरणे | संतोषरूपे येऊन | पावती चारी पुरुषार्थ || ७३ ||

नामकरणी नावाचा शिष्य श्रीगुरूंना भेटण्याचा निश्चय करतो : 

ऐसे असता वर्तमानी | भक्त एक 'नामकरणी' | कष्टतसे अति गहनी | सदा ध्याय श्रीगुरुसी || ७४ ||

ऐसे मनी व्याकुळित | चिंतेने वेष्टिला बहुत | गुरुदर्शना जाऊ म्हणत | निर्वाणमानसे निघाला || ७५ ||

अति निर्वाण अंत:करणी | लय होवोनि गुरुचरणी | जातो शिष्यशिरोमणी | विसरोनिया क्षुधातृषा || ७६ ||

निर्धार करोनि मानसी | म्हणे पाहीन श्रीगुरुसी | अथवा सांडीं देहासी | जडस्वरूपे काय काज || ७७ ||

नामकरणी  श्रीगुरूंची प्रार्थना करतो:

ज्याचे नामस्मरण करिता | दैन्यहानि होय त्वरिता | आपण तैसे नामांकिता | किंकर म्हणतसे || ७८ ||

दैव असे आपुले उणे | तरी का भजावे श्रीगुरुचरण | परिस लावता लोहा जाण‌ | सुवर्ण केवी होतसे || ७९ ||

तैसे तुझे नाम परिसे | माझे हृदयी सदा वसे | माते कष्टी सायासे | ठेविता लाज कविताही || ८० ||

या बोलाचिया हेवा | मनी धरोनि पहावा | गुरुमूर्ती सदाशिवा | कृपाळू बा सर्वभूती || ८१ ||

अतिव्याकुळ अंत:करणी | निंदास्तुति आपुली वाणी | कष्टला भक्त नामकरणी | करिता होय परियेसा || ८२ ||

राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे | आजि पाहुणे पंढरीचे रावे | वंदू विघ्नहरा भावे | नमू ते सुंदरा शारदेसी || ८३ ||

गुरूची त्रैमूर्ति | म्हणती वेदश्रुति | सांगती दृष्टांती | कलियुगात || ८४

कलियुगात ख्याति | श्रीनृसिंहसरस्वती | भक्तांसी सारथी | कृपासिंधु || ८५ ||

कृपासिंधु भक्ता | वेद वाखाणिता | त्रयमूर्ति गुरुकृपा | म्हणोनिया || ८६ ||

त्रयमूर्तीचे गुण | तू एक निधान | भक्तांसी रक्षण | दयानिधि || ८७ ||

दयानिधि यती | विनवितो मी श्रीपती | नेणे भावभक्ति  | अंत:करणी || ८८ ||

अंत:करणी स्थिरु | नव्हे बा श्रीगुरु | तू कृपासागरु | पाव वेगी || ८९ ||

पाव वेगी आता | नरहरी अनंता | बाळालागी माता | केवी टाकी || ९० ||

तू माता तू पिता | तूचि सखा भ्राता | तूचि कुळदेवता | परंपरी || ९१ ||

वंशपरंपरी | धरूनि निर्धारी | भजतो मी नरहरी | सरस्वतीसी || ९२ ||

सरस्वती नरहरी | दैन्य माझे हरी | म्हणूनि मी निरंतरी | सदा कष्टे वारी || ९३ ||

सदा कष्टी चित्ता | का हो देशी आता | कृपासिंधु भक्ता | केवी होसी || ९४ ||

कृपासिंधु भक्ता | कृपाळू अनंता | त्रयमूर्ति जगन्नाथा | दयानिधी || ९५ ||

त्रयमूर्ति तू होसी | पाळिसी विश्वासी | समस्त देवांसी | तूचि दाता || ९६ ||

समस्ता देवांसी | तूचि दाता होसी | मागो मी कवणासी | तुजवांचोनी || ९७ ||

तुजवाचोनी आता | असे कवण दाता | विश्वासी पोषिता | सर्वज्ञ तू || ९८ ||

सर्वज्ञाची खूण | असे हे लक्षण | समस्तांचे जाणे (= समस्तांचे भूत, वर्तमान, भविष्य जाणणे)| कवण ऐसा || ९९ ||

सर्वज्ञ म्हणोनि | वानिती पुराणी | माझे अंत:करणी | न ये साक्षी (=अनुभूती येत नाही) || १०० ||

कवण कैशापरी | असती भूमीवरी | जाणिजेचि तरी | सर्वज्ञ तो || १०१ ||

बाळक तान्हये | नेणे बापमाये | कृपा केवी होय | मातापित्या || १०२ ||

दिलियावांचोनि | न देववे म्हणोनि | असेल तुझे मनी | सांग मज || १०३ ||

समस्त महीतळी | तुम्हा दिल्हे बळी | त्याते हो पाताळी | बैसविले || १०४ ||

सुवर्णाची लंका | तुवा दिल्ही एका | तेणे पूर्वी लंका कवणा दिल्ही || १०५ ||

अढळ ध्रुवासी | दिल्हे हृषिकेशी | त्याने हो तुम्हासी काय दिल्हे || १०६ ||

नि:क्षत्र करूनी | विप्राते मेदिनी | देता तुम्हा कोणी | काय दिल्हे || १०७ ||

सृष्टीचा पोषक | तूचि देव एक | तूते मी मशक | काय देऊ || १०८ ||

नाही तुम्हा जरी | श्रीमंत नरहरी | लक्ष्मी तुझे घरी | नांदतसे || १०९ ||

याहोनी आम्हासी | तू काय मागसी | सांग हृषिकेशी | काय देऊ || ११० ||

मातेचे वोसंगी (=मांडीवर) | बैसोनिया बाळ वेगी | पसरी मुखसुरंगी | स्तनकांक्षेसी || १११ ||

बाळापासी माता | काय मागे ताता | ऐक श्रीगुरुनाथा | काय देऊ || ११२ ||

घेऊनिया देता | नाम नाही दाता | दयानिधि म्हणता | बोल दिसे || ११३ ||

देऊ न शकसी | म्हणे मी मानसी | चौदाही भुवनासी | तूचि दाता || ११४ ||

तुझे मनी पाही | वसे आणिक काही | सेवा केली नाही | म्हणोनिया || ११५ ||

सेवा घेवोनिया | देणे हे सामान्य | नाम नसे जाण | दातृत्वासी || ११६ ||

तळी बावी विहिरी | असती भूमीवरी | मेघ तो अंबरी | वर्षतसे || ११७ ||

मेघाची ही सेवा | न करिता स्वभावा | उदकपूर्ण सर्वा | केवी करी || ११८ ||

सेवा अपेक्षिता | बोल असे दाता | दयानिधि म्हणता | केवी साजे || ११९ ||

नेणे सेवा कैसी | स्थिर होय मानसी | माझे वंशोवंशी | तुझे दास || १२० ||

माझे पूर्वजवंशी | सेविले तुम्हांसी | संग्रह बहुवसी | तुझे चरणी || १२१ ||

बापाचे सेवेसी | पाळिती पुत्रासी | तेवी त्वा आम्हासी | प्रतिपाळावे || १२२ ||

माझे पूर्वधन | तुम्ही द्यावे ऋण | का बा नये करुणा | कृपासिंधु || १२३ ||

आमुचे आम्ही घेता | का बा नये चित्ता | मागेन मी सत्ता | घेईन आता || १२४ ||

आता मज जरी | न देसी नरहरी | जिंतोनि वेव्हारी | घेईन जाणा || १२५ ||

दिसतसे आता | कठिणता गुरुनाथा | दास मी अंकिता | सनातन || १२६ ||

आपुले समान | असेल कवण | तयासवे मन | कठिण कीजे || १२७ ||

कठीण की जे हरी | तुवा दैत्यांवरी | प्रह्लाद कैवारी | सेवकांसी || १२८ ||

सेवा बाळकासी | करू नये ऐसी | कठिणता परियेसी | बरवे न दिसे || १२९ ||

माझिया अपराधी | धरोनिया बुद्धि | अंत:करण क्रोधी | पहासी जरी || १३० ||

बाळक मातेसी | बोले निष्ठुरेसी | अज्ञाने मायेसी | मारी जरी || १३१ ||

माता त्या कुमारासी | कोप न धरी कैशी | आलिंगोनि हर्षी | संबोखी पा || १३२ ||

कवण्या अपराधेसी | न घालिसी आम्हासी | अहो हृषिकेशी | सांगा मज || १३३ ||

माता हो कोपासी | बोले बाळकासी | जावोनि पितयासी | सांगे बाळ || १३४ ||

माता कोपे जरी | एखादे अवसरी | पिता कृपा करी संबोखूनि || १३५ ||

तू माता तू पिता | कोपसी गुरुनाथा | सांगो कवणा आता | क्षमा करी || १३६ ||

तूचि स्वामी ऐसा | जगी झाला ठसा | दास तुझा भलतैसा | प्रतिपाळावा || १३७ ||

अनाथरक्षक | म्हणती तुज लोक | मी तुझा बाळक प्रतिपाळावे || १३८ ||

कृपाळु म्हणोनि | वानिती पुराणी | माझे बोल कानी | न घालिसीच || १३९ ||

नायकसी गुरुराणा | माझे करुणावचना | काय दुश्चितपणा | तुझा असे || १४० ||

माझे करुणावचन | न ऐकती तुझे कान | ऐकोनि पाषाण | विखुरतसे || १४१ ||

करुणा करी ऐसे | वानिती तुज पिसे | अजुनी तरी कैसे | कृपा न ये || १४२ ||

ऐसे नामांकित | विनविता त्वरित | कृपाळु श्रीगुरुनाथ | आले वेगी || १४३ ||

वत्सालागी धेनु | जैशी ये धावोनु | तैसे श्रीगुरु आपणु | आले जवळी || १४४ ||

येताचि गुरुमुनि | वंदी नामकरणी | मस्तक ठेवोनि | चरणयुग्मी || १४५ ||

केशव तो मोकळी | झाडी चरणधुळी | आनंदाश्रुजळी | अंघ्रि (= चरण, पाय) क्षाळी || १४६ ||

हृदयमंदिरात | बैसवोनि व्यक्त | पूजा उपचारित | षोडशविधि || १४७ ||

आनंदभरित | झाला नामांकित | हृदयी श्रीगुरुनाथ | स्थिरावला || १४८ ||

भक्तांच्या हृदयांत | राहे श्रीगुरुनाथ | संतोष बहुत | सरस्वतीसी || १४९ ||

|| इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोSध्याय : ||

|| श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु || श्रीगुरुदेवदत्त  ||

🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 🪔 🌺 🙏 


अर्वाचीन भक्तलीलामृत-अध्याय ३१ वा

श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी पंचकुंडा उपापती । जयजयाजी प्रतापज्योती । तुझें बालक मी निश्चिती । माझी उपेक्षा करूं नको ॥ १ ॥ कैलासपर्वत पर मरम्य । तें स्वां केले निवासधाम । प्रदोष कालीं पुरुषोत्तम । तुजलागीं ध्यातसे || || पूर्वी दक्षप्रजापती । तुज अवमानितां पशुपती । कोपोनि तूं निश्चितीं । वीरभद्र प्रकटविला || || स्वभक्तांचे करण्या रक्षण | दक्ष अससी तूं पार्वतीरमण । तो तूं मज दयाधन । कां उपेक्षिसी कळेना || || काय तुझ्या आले मनीं । कीं हा पातकी अज्ञानी । म्हणोनि हे शूलपाणी | पेटसी ना अनूनि मज || || परी व्याधाचे घनीं वृत्त । आणणे हे उमानाथ । मी लेकरूं तुझें सत्य | माझी उपेक्षा करूं नको || || असो ईश्वराचे भक्त निर्वाण | कोणत्याही जातींत पावीत जनन । ते

साक्षात् होती नारायण । तेथे शंका घेणे नको ॥ ७ ॥ जयांची मुळींच एक जाती । जैसी हृदयांत प्राणज्योती । किंवा जगांत एक विभूती । इर्श्वर जैसा साच कीं ॥ ८ ॥ मतें पंथाभिमान । यांतें न ज्यांच्या चित्ती स्थान ।

तेथे द्वैत कोठून । करी रिघाव सुज्ञ हो ।। ९ ।। पूर्वी कमाल कबीर ।

| होऊनि गेले भक्त थोर । त्यांचे जातीसी परमेश्वर । काय पाहता जाहला ||१०|| ईश्वर भावाचा भुकेला । हाचि आहे दुष्काळ त्याला । सद्भक्तीसी असे विकला | दयाघन पांडुरंग ||११|| कोणत्याही जातींत । बा कोणत्याही स्थितीत । निर्माण होवोत भगवद्भक्त । ते मिय हरीतें ||१२|| गंगेचिया दक्षिणेस | ग्राम एक चार कोस । शिरडी नाम विलसे त्यास । कोपरगांवासंनिध ||१३|| तथा शिरडी ग्रामासी । आले महाराज पुण्यराशी । बाबा साई जयांसी । म्हणती अवघे भक्तजन || १४ || तयांचा तो ठावठिकाण । न कळे करणा- लागून । चित्त आनंदमयपूर्ण | जयांचे ते सर्वदा ॥ १५॥ कोणीं जरी केला प्रश्न । कीं आपण आलांत कोठून । ठावठिकाण नामा- भिधान | काय सांगा आपुलें ||१६|| ऐसा प्रश्न होतां क्षणीं महाराज देती उत्तर झणीं । जेवीं मेघगर्जना etat गगनीं । धारा अवतरती भूवरी ||१७|| आम्हांसी नाही ठावठिकाण | आम्ही मुळींच निर्गुण । कर्मवशे पावूनि बंधन | पिंडामती पावलों ||१८|| या पिंडासी देह म्हणती । देहीं आमुचें नांव निश्चिती । विश्व चि गाव निगुती । आमुचें जाणा सर्वथा ||१९|| ब्रह्म आमुचा जनिता । माया आमुची माता । यायोगे ती साकारता । आम्ही पावलों शरीर है ||२०|| हेंचि तयांचे प्रत्युत्तर | लोकांचिये प्रश्नावर | जग अव नवर। भावना जयांची सर्वदा ||२१|| त्या महाराजे शिरडींत । चमत्कार केले अगणित | सकल वर्णावया येथ । नाहीं मती दासाने ||२२|| आधींच ले गांव लहान । त्यांतून थोडकी दुकान । तींही असती बहुत सान | हिंगबोजवार विक्रीचीं ||२३|| त्या दुकान- दारांपासीं । महाराज मागूनि तलासी । दीप लाविती मशीदीसी । तैसेचि देउळी अगणित ||२४|| ऐशापरी कित्येक वेळां । साईनीं दीपोत्सव केला । नित्य तेल देण्याला । वाणी अवधे कंटाळले ||२५|| दुकानदार अवधे जन । करिती विचार एकवटून रोज आणावें कोठून । तेल यति द्यावया ||२६|| ऐसा विचार करूनि मानसीं । महाराज येतां दुकानासी । खोटेंचि सांगती तयांसी । तेल नाही म्हणूनियां ॥ २७ ॥ ऐसें उत्तर ऐकताक्षणीं । बाबा aftaar गनीं । असत्य वदण्या वांलागुनी । कांहीं न वाटे अवघड ॥ २८ ॥ याचि हे बुडाले जन । दुरावला नारायण । पुढे हे पावती पतन । आपुलिया कर्मवशे ।। २९ ।। जो असत्य वदे वाणी । तो पातक्यांचा मुकुटमणी । तयांसी तो चक्रपाणी । न भेटे कदापि ॥ ३० ॥ सत्य वाक्य ज्याचेजवळ | तयासी विकला घननीळ । जपतपादि सकळ । सत्यापुढे बाबुर्डे ॥ ३१ ॥ सत्य पुण्याईचा घाट । सत्य ही ते सत्य मोक्षाची वाट । सत्य आनंदनदीचा घाट | न सोडावें ॥ ३२ ॥ वाण्यांसी न देतां प्रत्युत्तर | महाराज निघाले सत्वर । कृत्य केले अघटित थोर । अगाध लीला बाबांची ।। ३३ । मशीदीच्या सभोवार । पणत्या ठेविल्या मचुर | कांकडे घातले आंत थोर । कौतुके लोक पाहती ॥ ३४ ॥ जन परस्परें बोलती । तेलावीण कैसे लागती । दीप येथे निश्चितीं । वेडा पीर असे हा ।। ३५ ।। खडकी पेरणें वीजालागुन । अथवा वांझेचे वाळंतपण । करावया सुज्ञ जन । इच्छील काय कधीतरी || ३६ || हा वेड्यांचा शिखामणी । अज्ञान्यांचा अग्रगणी | दीप तेलावांचूनी | लावावया इच्छीत से ।। ३७ ।। तेल होतें टमरेलांत | लावण्यापुरते सांजवात | तें घेऊनि हातांत | गेले बाबा मशीदीसी ।। ३८ ।। तैं नानासाहेब. डेंगळे | लोकांसी बोलू लागले । तुम्हीं अंध झालां सगळे | उगी तयासी निंदूं नका ।। ३९ ।। कोणाची योग्यता कैशापरी । हें एक जाणे श्रीहरी । हिरा पडला जरी गारी । तरी कां गार मानावा ॥ ४० ॥

कांहीं वेळ बसा स्वस्थ । हा फकीर काय करितो येथ । तें पहा हो सावचित्त । वृथा घाई करूं नका ॥ ४१ ॥ ऐसे लोकांसी सांगितलें । डेंगळे मशीदीसी आले । मौनव्रत धारण केलें । चमत्कार पहावया ।। ४२ ।। तैं काय केलें महाराजांनीं । तेलांत घालूनि अर्धे पाणी । आत्मारामालागुनी | अर्पण केलें तेधवां ||४३|| तेलमिश्रित पाणी प्याले । मग निवळ पाणी घेतले | पणत्यांमार्जी ओतलें । स्नेहाऐवजीं तत्क्षणी ||४४ || काडी ओढूनि पेटविले | दीप बाबांनीं अवघे भले । चकित झाले डेंगळे । पाय धरले जावोनी ||४५|| दिवे जाळिले रात्रभर । लोक पाहती चमत्कार । केवढा बाबांचा अधिकार | प्रति- ईश्वर जन्मला ||४६ || शिरडीचे लोक मिळाले । साईपदी लीन झाले । म्हणती आम्ही अपराध केले । कोपूं नका आम्हांवरी ॥४७॥ आम्ही पोरें तुमचीं । तुम्हीं आहां माय साची । क्षमा करा अपराधांची । साईमहाराज कृपानिधी ||४८|| तुम्ही कृपेचे सागर । तुम्ही ज्ञान- नभींचे दिनकर । तुम्हीं सद्गुणांचे सरोवर | शांततेचे मेरु तुम्ही ॥ ४९ ॥ तेधवां बाबा अवघ्यांपती । बोलूं लागले निश्चितीं । तुम्ही ! ऐका रे माझी उक्ती । ये समयीं सावचितें ||५० || वर्तन ठेवा ऐशापरी । जेणें राजी राहील श्रीहरी । असत्य न वदावी वैखरी । सत्य सदा सांभाळावे ॥ ५१ ॥ घातपात कवणाचा । करूं नका कधींच सावा | धर्मकर्मी द्रव्याचा । व्यय करावा यथाशक्ती ॥५२॥ तरीच होईल कल्याण | अंतीं भेटेल नारायण । है माझे सत्य वचन | सदा वागवा मानसीं ।। ५३ ।। ते मानले अवघ्यांसी । वंदूनि - साई- चरणांसी । लोक गेले स्थानासी । अति आनंदें आपुल्या ॥५४॥ साई- महाराज योगाभ्यासी । किती वर्णावें तयांसी । त्यांच्या अगम्य लीलेसी । वर्णिता न ये पार कधीं ||१५|| है अखिल वर्तमान | चितांबर लागून | डेंगळ्यांनीं केलें कथन । तेही भाविक म्हणोनियां ।। ५६ ।। असे शय्या विचित्र बाबांची । एक फळी लांकडाची । रुंदी एक चीत साची । असे लांब चार हात || ५७ ॥ तीच त्यांचा स्पंदन | तीच त्यांचं अंथरुण । जीर्ण चिंध्यांनी बांधून । टांगिलीसे मशिदीत ॥ ५८ ॥ ती मशीर होती जीर्ण | किलच्याही गेल्या निघून । अगर्दी आढ्याचे सन्निधान । फळी टांगिली बाबांनी ॥५९॥ नुसतें वैसai तिच्यावरी । तन् होय धनूपरी । ऐशा विचित्र शय्येवरी । शयन करिती महाराज || ६० || फळीचे उभय बाजूंसी । म्हणजे उशापायथ्यासी । लावूनि दिवे पुण्यराशी । निजती योग. बळानें ॥ ६१ ॥ नुसता पाय ठेवितां बरी । जी तुटेल निर्धारीं । ऐसी तिची बळकटी खरी । काय वर्णन करावें ॥। ६२ || ते असत्य वाटे. feesia | म्हणून मुद्दाम रात्रीस | जाऊनि पाहती बाबांस | तो ते निद्रिस्त फळीवरी ।। ६३ ।। ही मौज पाहण्यापती | दाटी होऊ लागली अती । तेणें उपाधी निश्चितीं । होऊं लागली सर्वदा ॥ ६४ ॥ त्या फळीस म्हणूनी । तोडूनि टाकिलें एके दिनीं । मोकळे वासा- पासूनी । शीघ्र व्हावयाकारणे ॥ ६५ ॥ ख्याती झाली लोकांत बाबा साई महामहंत | नवसही अनंत । करूं लागले तयांप्रती ॥ ६६ ॥ शिरडी झाल महाक्षेत्र । वाराणसीसम पवित्र | बाबांमुळे सर्वत्र । नांव झाले वियेवें ॥ ६७ ॥ जैसें पुष्पयोग मृत्तिकेस । किंवा हिन्या- मुळे कोंदणास | वा सुवर्णामुळे विधीस | महत्त्व येते जैशापरी ॥ ६८ ॥ तैसें faster ariya | भूमंडळीं महत्र आले । खेड्याचें क्षेत्र बनले । थोर योग्यता साधूची ।। ६९ ।। असो एके समयासी । मंडळी आली बसी । तया शिरडी ग्रामासी | सिद्धदर्शन घ्यावया ॥ ७० ॥ चांदोरकर कुळभूषण | गोविंदात्मज नारायण | कलेक्टराचा चिटणीस जाण । नानासाहेब म्हणती जया ॥ ७१ ॥ दुजे रामदास हरिदास | वास जयांचा वाईस । तिसरे त्यांचे सोबतीस | होते बापू नगरकर ।। ७२ ।। कानगांवकर ते चौथे । ऐसे जमोनि आले तेथें । सिद्धदर्शन घ्यायातें। शिरडीग्राम श्रवण करा ॥ ७३ ॥ त्या रामदासी बुवासी । जाणे होतें दुसरे दिवशीं । हनुमंताच्या जयंतीसी । सीनातटीं नगरांत ।। ७४ ।। ते तळमळ करू लागले । म्हणती पाहिजे आतांचि गेलें । दर्शन घेणे पुरे झाले | चला गाडी आटोपा ।। ७५ ।। महाराज म्हणती चिटणीसासी । प्रथम करूनि भोजनासी । मग जानें वाटे मशीं । तुम्हीं नगराकारणें || ७६ || या ऐकोनि महाराजवचना । स्तब्ध झाले साहेब नाना । घेऊनि कानगांवकरांना | केली तयारी भोजनाची ॥ ७७ ॥ इकडे तो वाईकर । जावया झाला बहुत आतुर । म्हणे अहो बापू नगरकर | काय विचार करणे आतां ॥ ७८ ॥ माझी उद्यां आहे कथा | नगरामाजी तत्त्वतां । या वेड्याच्या नादा आतां । लागणे पुरे झालें || ७९ || चिटणीसाचें आहे ठीक | घरीं पैसा मुबलक । मला मागणे येईल भीक । लागतां नादी साईच्या ॥ ८० ॥ येथे न प्राप्ति कवडीची | चला वाट धरू स्टेशनाची गाडी पाहिजे आर्ताची । साधिली आपणां अवश्य ॥ ८१ ॥ ऐसें बोलून निघाले । उभयतां स्टेशनावरी आले । मार्गे शिरडीसी राहिले । mariant व चिटणीस ॥ ८२ ॥ महाराज म्हणती 

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...