Thursday, April 9, 2026

श्रीसाईसच्चरित - अध्याय २८

 IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २८         

दृष्टांतकथनं       

या अध्यायात काय आहे

*      अध्यायारंभ (- १०)

*      लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते. (११-९८) 

*      बऱ्हाणपूरच्या एका बाईस बाबा स्वप्नात खिचडी मागतात आणि ती बाबांना खिचडीचा नैवेद्य दाखवण्यासाठी शिरडीत येते. बाबा सर्व पदार्थांतून त्या बाईंनी आणलेली खिचडी निवडतात  (९९-११५)

*      शिवभक्त मेघाच्या कथा आणि अध्यायाचा समारोप (११६-२१७)

. मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात. (११७-१५०)

. खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात. (१५१-१६३)

. मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके ओले होते, बाकी शरीर कोरडे राहते. (१६४- १८६)

. बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास भक्तांकडून आलेलं  शिवलिंग मेघास देतात (१८७-२१४)


लाला लक्ष्मीचंद या मुंबईच्या गृहस्थांस स्वप्नामध्ये एका वृद्ध व्यक्तीचे दर्शन होते. पुढे लाला लक्ष्मीचंद दासगणूंच्या कीर्तनास जातात तेथे साईबाबांची प्रतिमा पाहतात. ही प्रतिमा स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीशी मिळती जुळती असते. यावरून लक्ष्मीचंदांस कळते की ते स्वप्नातील गृहस्थ साईबाबा होते.  

 

                     मेघा बाबांस मुसलमान समजत असतो. त्यामुळे मेघा मशिदीत येताच बाबा त्याला दगड मारून जाण्यास सांगतात:-  मेघा हा गुजराती ब्राह्मण रावसाहेब साठयांच्या पदरी होता. मेघा शिवभक्त होता. साठे साईभक्त होते आणि त्यांना साईबाबांना गंगास्नान घालावयाचे होते. तसे त्यांनी मेघास सांगिंतले. मेघाच्या माहितीप्रमाणे साईबाबा मुसलमान होते आणि तो मुसलमान व्यक्तीची सेवा करू इच्छित नव्हता. परंतु आपली नोकरी सांभाळावयाची असल्याने तो काही बोलला नाही आणि तो शिरडीस आला. परंतु तो मशिदीची पायरी चढू लागताच बाबांनी उग्र अवतार धारण केला आणि त्याला दगड मारू लागले. ते बोलत होते,' मी मुसलमान आहे नाही का? तू उच्च जातीचा ब्राह्मण आहेस. तुला माझा विटाळ होईल. तेव्हा तू येथून निघून जा.' आपल्या मनातील विचार बाबांना कळलेले पाहून मेघा थक्क झाला. तरी त्याचा विश्वास बसत नव्हता. पुढे तो घरी गेल्यानंतर अंथरुणाला खिळला आणि या आजारपणातच त्याला बाबांचा ध्यास लागला. पुढे तो शिरडीतच राहून जमेल तशी बाबांची सेवा करीत राहिला. (११७-१५०)

 

                    खंडोबाच्या मंदिराचे दार बंद असल्याने मेघा खंडोबाची पूजा न करताच परत येतो. बाबा त्याला दार उघडे असल्याचे सांगतात:- मेघा शिवभक्त होता. आता तो बाबांचाही भक्त झाला आणि बाबांनाच शिवाचे रूप मानू लागला. तो मुखाने साईशंकरअसा घोष करू लागला. शिवास बेलपत्र प्रिय. परंतु शिरडीत बेलाचे झाड नव्हते. त्यामुळे तो कोस  दीड कोस दूर  जाऊन बेलाची पाने घेऊन येत असे आणि  सर्व देवतांचे यथासांग पूजन करून बाबांच्या वंदनास येत असे. एकदा मेघा याचप्रमाणे सर्व देवांची पूजा करीत असता खंडोबाच्या देवळाचे दार बंद असल्याने तो खंडोबाची पूजा न करता तसाच बाबांकडे आला. तेव्हा बाबा त्यास म्हणाले. 'अरे, एका देवाची पूजा राहिली.' मेघाने खंडोबाची पूजा राहिल्याचे सांगताच बाबा म्हणाले,' जा आता, दार उघडे आहे,' मेघा पुन्हा गेला असता खरोखरच दार उघडे होते. मेघा मग खंडोबाची पूजा करून बाबांकडे आला.   (१५१-१६३)

 

                    मेघा बाबांस गंगास्नान घालतो. बाबांचे फक्त डोके ओले होते, बाकी शरीर कोरडे राहते:- एकदा मकर संक्रान्तीच्या दिवशी मेघाला शिवास  गंगास्नान घालण्याची इच्छा झाली. त्याच्या दृष्टीने बाबा शिवस्वरूप असल्याने त्याने आपली इच्छा बाबांस  सांगितली. बाबांनी त्यास मान्यता  दिली. मेघाने जाऊन-येऊन आठ कोस पायपीट करून गोदावरीचे पाणी गंगाजल म्हणून  घागरीतून आणले. बाबांना पाटावर बसविले. बाबांनी डोके पुढे करून फक्त डोक्यावरच थोडे पाणी ओतण्यास सांगितले. मेघाने ते न ऐकता सर्व अंगावर पाण्याची घागर पालथी केली. परंतु पाहतो तो बाबांचे फक्त डोकेच ओले झाले होते. बाकी अंग कोरडे होते. (१६४- १८६)

 

                    बाबा स्वप्नात येऊन मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगतात. नंतर एका रामदास भक्तांकडून आलेलं  शिवलिंग मेघास देतात:- मेघा बाबांची दोन स्वरूपात पूजा करीत असे. एक- बाबांची प्रतिमा. ही प्रतिमा त्याला नानासाहेब चांदोरकरांनी दिली होती. दोन - प्रत्यक्ष बाबा. बाबांची अशा प्रकारे उपासना करता करता बारा महिने लोटले. एक दिवशी पहाटेच्या वेळेला मेघाला दृष्टांत झाला. त्याच्या समोर बाबा उभे होते. बाबांनी त्याच्या बिछान्यावर अक्षता टाकल्या आणि मेघाला त्रिशूळ काढण्यास सांगितलेबिछान्यावर अक्षता पडलेल्या दिसत होत्या. वाड्याची सर्व कवाडे बंद असताना बाबा आत कसे येतील, असे वाटून मेघाला दृष्टांताबद्दल शंका आली. शंकेचे समाधान करून घेण्यासाठी तो ताबडतोब मशिदीत गेला आणि बाबांचे दर्शन घेऊन या दृष्टांताच्या सत्यतेविषयी प्रश्न केला. त्यावर  बाबा म्हणाले,' माझिया प्रवेशा नलगे दार I नाही मज आकार ना विस्तार II वसे निरंतर सर्वत्र II १९९II टाकूनीया मजवरी भार I मीनला जो मज साचार II तयाचे सर्व शरीर व्यापार I मी सूत्रधार चालवी  II २०० II' मेघा या उत्तराने समाधान पावून वाड्यात परतला आणि बाबांची छबी जिथे दिसली होती तेथे त्याने तांबड्या रंगात त्रिशूळाची आकृती काढली. दुसऱ्या दिवशी मशिदीत  समर्थ रामदासांचा एक भक्त आला आणि त्याने बाबांना शिवलिंग अर्पण केले. त्याच वेळी मेघाही तेथे आला. मेघाला पाहून बाबा म्हणाले,' हा शंकर आला I सांभाळी याजला तू आता' II २०४II मेघा सद्गदित होऊन शिवलिंग घेऊन निघाला. त्याच वेळी काकासाहेब दीक्षित वाड्यात स्नान करून बाबांचे नामस्मरण करीत होते. त्या वेळी ध्यानात त्यांना शिवलिंग दिसले. त्याच वेळी मेघा त्यांच्याकडे आला आणि त्याने बाबांनी दिलेले शिवलिंग दाखविले. दीक्षितांना आश्चर्य वाटले. कारण त्यांना ध्यानात दिसलेले शिवलिंग या शिवलिंगासारखेच होते. मेघाने पुढे त्रिशूळाच्या आकृतीशेजारीच बाबांच्या हातून शिवलिंगाची स्थापना केली. श्री. दाभोळकर म्हणतात,' मेघास आवडे शंकरपूजन I करून शंकर लिंगप्रदान II केले तद्भक्तीचे दृढीकरण I नवल विंदान साईंचे II २१४ II (. २८- ओवी १८७-२१४)


Thursday, April 2, 2026

श्रीसाईसच्चरित, अध्याय २६


 श्रीसाईसच्चरित, अध्याय २६     

अपस्मारात्महत्त्यानिवारणं तथा निजगुरूपदस्थिरीकरणं   

(ओवीसंख्या १५६)

या अध्यायात काय आहे

चिंतन

मनोमन करिता बाबांचे स्मरण अंतश्चक्षूंनी घेता बाबांचे दर्शन II

सदैव गाता  बाबांचे गुणगान   I  होईल सार्थक जन्माचे II (स्वविचार)  

 

*      अध्यायारंभ; बाबांची आंतरिक पूजा करण्याविषयी श्री दाभोळकरांचे मार्गदर्शन  (- ३७)

*      बाबांशिवाय इतर व्यक्तीस गुरू मानणारे पंत नावाचे गृहस्थ बाबांच्या भेटीस गेले असता मूर्च्छित होऊन पडतात; बाबा त्यांस आपल्या गुरुशीच एकनिष्ठ राहण्याचा संकेत देतात (३८-५६)

*      हरिश्चंद्र पितळे  यांच्या मुलाचा अपस्मार बाबा बरा करतात व त्यांस तीन रुपये देऊन आधी दिलेल्या दोन रुपयांमध्ये हे तीन रुपये ठेवून त्यांची पूजा करण्यास सांगतात (५७-११२)

*      बाबांचे एक भक्त गोपाळ नारायण आंबेडकर दारिद्र्यामुळे आत्महत्त्येस जात असता एक खानावळवाले त्यांस अक्कलकोट स्वामींची पोथी वाचण्यास देतात; या पोथीतील आत्महत्त्येच्या निष्फळतेवरील अध्याय वाचून आंबेडकर आत्महत्त्येपासून परावृत्त होतात; अध्यायाचा समारोप (११३-१५६)


 बाबा आपल्या भक्तास आत्महत्त्येपासून परावृत्त करतात

 

श्री. गोपाळ नारायण आंबेडकर हे बाबांचे भक्त होते. ते आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्रस्त झाले होते. एकदा ते शिरडीला आले असताना विहिरीत उडी मारून आत्महत्त्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

 

तेथे समोरच एक खाणावळ होती. त्या खाणावळीचा सगुण नावाचा मालक बाबांचा भक्त होता. तो आंबेडकरांजवळ येऊन त्याने अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची पोथी आंबेडकरांच्या हातात देऊन विचारले,'ही पोथी तुम्ही वाचली आहे का?'

 

आंबेडकरांनी पोथी हातात घेऊन चाळली असता योगायोगाने एक अध्याय त्यांच्या वाचण्यात आला. या अध्यायातील कथा अशी होती-

 

स्वामी समर्थांचे एक भक्त असाध्य रोगाने पीडित असल्याने विहिरीत उडी मारून आत्महत्त्येचा विचार करीत असतात. त्याच वेळी स्वामी समर्थ त्याच्या समोर प्रगट होऊन त्याला उपदेश करतात की मनुष्याला सारे भोग त्याच्या कर्मांमुळे भोगावे लागतात आणि हे भोग त्याच जन्मात भोगले नाहीत तर दुसरा जन्म घेऊन भोगावे लागतात. या भक्ताने मग आत्महत्त्येचा विचार रहित केला.

ही कथा आंबेडकरांस मार्गदर्शक वाटली आणि बाबांचे आभार मानून त्यांनी आत्महत्त्येचा विचार रहित केला. आंबेडकरांनी ज्योतिषविद्येचा अभ्यास करून या विद्येवर उपजीविका सुरू केली. बाबांच्या कृपेमुळे यथावकाश त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

 

 

श्रीसाईसच्चरित अध्याय २७

 श्रीसाईसच्चरित अध्याय २७

दीक्षानुग्रहदानं     

(ओवीसंख्या २०२)

चिंतन

बाबांनी भक्तांना निरनिराळ्या पोथ्या, ग्रंथ वगैरे  वाचण्यास प्रवृत्त केले. यांमध्ये बऱ्याचशा पोथ्या, ग्रंथ असे असत की भक्तच बाबांकडे  घेऊन येत. त्यांची अशी श्रद्धा अशी असे की बाबांनी कृपास्पर्श करून हे ग्रंथ दिले तर त्यांचे वाचन निर्विघ्नपणे होईल. हे ग्रंथ कधी बाबा भक्तांस परत न देता शामाला ठेवून घेण्यास सांगत तर कधी दक्षिणेसह भक्तांस वाचण्यास परत देत. श्री दाभोळकरांच्या मते हासुद्धा बाबांच्या भक्तांवरील दीक्षानुग्रहाचाच प्रकार होता आणि भक्तांची कुवत पाहून केलेला होता.

*      अध्यायारंभ (- ३०)

*      काका महाजनींनी आणलेला श्री भागवत ग्रंथ बाबा शामाकडे ठेवण्यास देतात. पुढे काका महाजनी दुसरा श्रीभागवत ग्रंथ घेऊन येतात तो बाबा काकांस परत देतात . बऱ्याच भक्तांनी आणलेले ग्रंथ बाबांनी भक्तांना परत न देता शामाकडे ठेवण्यास दिले (३१-६१)

*      एका रामदासी बुवाची  विष्णुसहस्रनामाची पोथी बाबा शामा ऊर्फ माधवराव देशपांडे यांस देतात- विष्णुसहस्रनामाची बाबांनी सांगितलेली महती (६२ -१३० )

*      बापूसाहेब जोगांना बाबा लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्यास प्रोत्साहन देतात (१३१-१३८)

*      दादासाहेब खापर्डे यांच्या पत्नीने आणलेला प्रसाद ग्रहण करून बाबा त्या पूर्वजन्मी एक गाय असल्याचे शामाला सांगतात (१३९-१६८)

*      अध्यायाचा समारोप (१६९-२०२)

Monday, March 30, 2026

दिव्यांची उद्याननगरी-क्वालालंपूर

 दिव्यांची उद्याननगरी-क्वालालंपूर    

क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी. बहुतेक वेळा याचा संक्षिप्त उल्लेख के एल असा होतो. मलेशियाची ओळख आणि मलेशियाच्या भावी प्रगतीचे प्रतीक असणा-या जगातील सर्वांत उंच जुळ्या इमारती पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्येच आहेत. मलेशियामधील सर्वांत जास्त लोकसंख्येचे हे शहर. क्वालालंपूर हे मलेशियाचे सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र आहे.क्वालालांपूरची गणना अल्फा वर्ल्ड सिटीमध्ये झाली आहे. Foreign Policy 2010 च्या जागतिक नगर निर्देशांकाप्रमाणे क्वालालंपूरचा क्रमांक अठ्ठेचाळीसावा होता.  २०१० मधील 2thinknow Innovation Cities Index प्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये क्वालालंपूरचा क्रमांक सदुसष्टावा होता. १९९० पासून या शहरामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळांचे आयोजन झाले आहे. यांमध्ये १९९८ च्या कॉमनवेल्थ स्पर्धा आणि फॉर्म्युला वन Grand प्रिक्सचा समावेश आहे. त्याचबरोबर येथे अनेक राजकीय आणि सांस्कृतिक समारंभांचे आयोजनही झाले आहे. क्वालालंपूर  आपल्याला  त्याच्या  आधुनिकतेने  आणि  कुठलीही  गोष्ट  शक्य  करून  दाखविण्याच्या  क्षमतेने  थक्क  करून  सोडते. क्वालालंपूरमधील सुंदर उद्याने आणि प्रकाशाने झगमगणाऱ्या इमारतींमुळे क्वालालंपूरला ‘गार्डन सिटी ऑफ लाईट्स’ म्हणजे ‘दिव्यांची उद्याननगरी’ असे सार्थ नाव दिले आहे. 

दृष्टिक्षेपात क्वालालंपूर

स्थान: ???

क्षेत्रफळ : २४३.६५ चौ. कि. मी.

लोकसंख्या: १८ लाख. 

जाण्यास  योग्य  वेळ: ???

१ . परिचय

स्थान, विस्तार आणि सीमा

क्वालालंपूर या शब्दाचा मले भाषेमध्ये अर्थ आहे ‘दलदलयुक्त संगम’. याचे कारण क्वालालंपूर हे Klang आणि गोंबाक नद्यांच्या संगमावर वसले असून हा पूर्वी दलदलीचा प्रदेश होता. क्वालालंपूरची भौगोलिक रचना पाहू गेलो तर क्वालालंपूर KlaMg Valley या मोठ्या दरीमध्ये वसले आहे. याच्या पूर्वेकडे टिटिवांगसा पर्वतरांगा आहेत. पूर्व आणि उत्तर दिशेस छोट्यामोठ्या पर्वतरांगा आहेत. पश्चिम दिशेस मलाक्काची सामुद्रधुनी आहे.  द्वीपकल्पीय मलेशियाच्या मध्य पश्चिम किनार्‍यावरील Selangor राज्यामध्ये क्वालालंपूरचे स्थान असून ते मलेशियामध्ये असणाऱ्या एकूण तीन केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे. बृहत् क्वालालंपूरला Klang Valley असे म्हणतात. बृहत् क्वालालंपूर हा क्वालालंपूरसहित उपनगरांचा समुदाय असून याची लोकसंख्या २०१० मध्ये ६९ लाख होती. लोकसंख्या आणि आर्थिक विकास यांच्या दृष्टीने हा देशातील सर्वाधिक वेगाने वाढ होणारा महानगरी प्रदेश आहे. क्वालालंपूर हे मलेशियाच्या संसदेचे ठिकाण आहे. पूर्वी येथे संघराज्याच्या कार्यकारी आणि न्यायिक शाखा होत्या. परंतु १९९९ साली त्या पुत्रजया येथे हलविण्यात आल्या. काही प्रशासकीय विभाग अजूनसुद्धा क्वालालंपूरमध्ये आहेत. मलेशियाच्या राजाचे, Istana Negaraचे अधिकृत निवासस्थान क्वालालंपूरमध्येच आहे. 

प्राकृतिक

हवामान

क्वालालंपूरचे हवामान बारा महिने उष्ण आणि दमट असते. तापमान २० ते ३० सेल्सिअसमध्ये असते. पावसाळा असा वेगळा  ऋतू नसतो. दिवसभरात केव्हाही वादLee पाऊस येऊ शकतो.

इतिहास

क्वालालंपूरचा  विस्तार  लक्षात  घेता  तसे  ते अलिकडचे  शहरच  म्हणावे  लागेल. हा  भाग  क्लँग   आणि  गोंबाक  नद्यांच्या  संगमावर  येत  असून  येथील  वास्तुरचनेला  सुरुवात  १८५७  सालापर्यंत  झाली  नव्हती. या  साली  ८७  चिनी  खाणकामगार  कथलाच्या  शोधात  येथे  आले. एकोणीसाव्या शतकाच्या  मध्यास  औद्योगीकरणाच्या  काळामध्ये  कथील  हा  अगदी  इंग्लंड  आणि  अमेरिकेमध्येसुद्धा  महत्त्वाचा  धातू  समजला  जात  होता. कथलाच्या  शोधात  आलेल्या  खाणकामगारांना  क्वालालंपूरच्या जवळ  कथील  सापडले. क्लँग आणि  गोंबाक  नद्यांच्या  संगमजवळील  मोठा  जंगलांनी  व्यापलेला  प्रदेश  व्यापाराचे  केंद्र  स्थापन  करण्यास  आदर्श  भाग  होता. या  ठिकाणास  बहासा  मलेशिया  भाषेमध्ये  क्वालालंपूर  म्हणजे  'दलदलयुक्त  संगम ' असे  म्हणत. कथील  सापडलेल्या  भागामध्ये  लोक मोठ्या  प्रमाणावर   स्थायिक  झाले  आणि  काही  वर्षांतच   येथे  ब-याच  वसाहती  स्थापन  झाल्या. या  वसाहती  मुख्यत: क्वालालंपूर आणि  अंपांग  या  भागांमध्ये  झाला. अंपांग  हे  आज  क्वालालंपूरचे उपनगर आहे. १८६८  मध्ये  वसाहतींसाठी  प्रशासकीय  व्यवस्था  निर्माण  करण्यात  आली. तेव्हा  स्थानिक  घराण्यांनी   Yap Ah Loy याची  चिनी  समाजाचा  नेता  म्हणून  निवड  केली. Yap Ah Loy हे  क्वालालंपूरचे  पहिले  महापौर  झाले  आणि  त्यांनीच   शहराची  पायाभरणी  केली. दुस-या  महायुद्धामध्ये  क्वालालंपूर  जपानी  वर्चस्वाखाली  आले . युद्ध  संपल्यानंतर  ब्रिटिश  परत  आले  आणि  शहराचा  पुन्हा  विकास  सुरू  झाला. याला  कारण  म्हणजे  १९४८  सालापासून  अनेक  नवी  उपनगरे  बनवून  शहराच्या  विस्ताराचा  कार्यक्रम   हाती  घेण्यात  आला.

खाणकामगारांची   वसाहत  ते  मोठे  शहर  म्हणून  क्वालालंपूरचा   विकास  होताना  ब-याच  गुंतागुंतीही  निर्माण  झाल्या. या  भागामध्ये  मलेरियाचा  प्रभाव  बराच  होता. त्यामुळे  पुष्कळ  खाणकामगार  मृत्युमुखी  पडले. झटपट  आलेली  श्रीमंती  आणि  कमकुवत  प्रशासकीय  व्यवस्था  यांमुळे  कायदाविरहित  स्थिती  निर्माण  झाली. संपत्तीच्या  लालसेने  आलेल्या  नवीन  लोकांमुळे  परिस्थिती  आणखी  वाईट  झाली.

क्वालालंपूरच्या   स्वत:च्या  अशा  समस्या  असताना  मलेशियामध्ये  यादवी  युद्ध  सुरू  झाले. या  युद्धामध्ये  स्थानिक  सुलतान  पराक या क्वालालंपूरच्या उत्तरेकडील  राज्याच्या  सिंहासनासाठी  आपापसामध्ये  लढू लागले . त्यावेळच्या  स्ट्रेट्स  सेटलमेंटमधील  व्यापा-यांना  यादवी  युद्धाची  काळजी  लागली  होती. कारण  यादवी  युद्धाचा  आर्थिक  विकासावर  मोठा  परिणाम  होणार  होता. त्यामुळे  त्यांनी  ब्रिटनला  हस्तक्षेप  करून  शांतता  प्रस्थापित  करण्याची  विनंती  केली. कथलाच्या  उत्पादनामध्ये  ब्रिटनचे  मोठे  आर्थिक  हितसंबंध  होते. त्यामुळे  या  संघर्षातून  शांततापूर्ण    तोडगा  काढण्यासाठी  ब्रिटनने  गव्हर्नर  अँड्रू क्लार्क  यास  पाठविले . क्लार्कने  Pangkor पीस  ट्रीटी  नावाचा  शांतता  करार  करून  १८७४ मध्ये  यादवी  युद्धाचा  शेवट  केला. पराकमध्ये  नवीन  सुलतान  गादीवर  आला. याशिवाय  ब्रिटिशांनी  तेथे  कायमचे  बस्तान  बसवले  आणि  मले  धर्म  आणि  परंपरा  यांव्यतिरिक्त  इतर  कुठल्याही  बाबींमध्ये  निर्णय  घेण्यापूर्वी  आपली  संमती  घेतली  पाहिजे  अशी  मागणी  केली.

१८८०  साली  राजधानी  Klang   हून  क्वालालंपूर  येथे  आणण्यात  आली. यामुळे  शहराच्या  विकासामध्ये  आणखी  वाढ  झाली. ब्रिटनच्या  वसाहतीचा  प्रशासक  Frank  स्वेटनहम  यानेसुद्धा  त्याच्या  प्रशासनाचे  केंद्र  म्हणून  क्वालालंपूरची    निवड  केली . १८८१  साली  लागलेल्या  आगीनंतर   त्याने  विटांच्या  इमारती  बांधावयास  घेतल्या. त्यामुळे  शहराचे  आगीपासून  रक्षण  झाले  तसेच  लोकांच्या  आरोग्यामध्येही   सुधारणा  झाली.

स्वेटनहम  याने  या  प्रदेशातील  चार  सल्तनती  एकत्र  केल्या  आणि  १८९६  मध्ये  संयुक्त  मले  संघराज्याची  (फेडरेटेड  मले  स्टेट्स)    स्थापना  केली. क्वालालंपूरचे   स्थान  मध्यवर्ती  असल्यामुळे  त्याची  राजधानी  म्हणून  निवड  करण्यात  आली. या  संघराज्याचे  प्रशासन  ब्रिटिशांकडून   ब्रिटिश  वसाहतींचे  व्यवस्थापन  करीत  होते  तसेच  होत  होते. सुलतान  अब्दुल  समद  बिल्डिंग  ही  वास्तू  राजकारणाचे  केंद्र  होती  आणि  फावल्या  वेळामध्ये  पडांग  येथे  क्रिकेट  खेळणे  किंवा  सेलंगोर  क्लबमध्ये  आराम   करणे  हा  ब्रिटिश  अधिका-यांचा  उद्योग  होता. रॉयल  क्लबमध्ये  केवळ  गो-या  लोकांना  प्रवेश  होता  आणि  हे  ठिकाण  म्हणजे  ब्रिटिश  साम्राज्यवादाचे  चिन्ह  झाले  होते.

दुस-या महायुद्धामध्ये क्वालालंपूर जपानी  वर्चस्वाखाली  आले. युद्ध  संपल्यानंतर  ब्रिटिश  परत  आले  आणि  शहराचा  पुन्हा  विकास  सुरू  झाला. याला  कारण  म्हणजे  १९४८  सालापासून  अनेक  नवी  उपनगरे  बनवून  शहराच्या  विस्ताराचा  कार्यक्रम  हाती  घेण्यात  आला.

 

तरीसुद्धा  ब्रिटिशांपासून  स्वातंत्र्य  मिळविण्याची  मागणी  पुढे येऊ लागली. स्वातंत्र्यासाठी  कम्युनिस्टांच्या  पुढाकाराखाली  चळवळ  जोर  धरू  लागली. अखेर  ३०  ऑगस्ट १९५७  रोजी  हजारो  लोकांच्या  साक्षीने  रॉयल  सेलंगोर  क्लबवरून    युनिअन जॅक कायमचा  उतरवला  गेला . यानंतर  क्वालालंपूर  नव्या  मले  संघराज्याची  (फेडरेशन  ऑफ  मले ) आणि  १९६३  सालापासून  आजच्या  मलेशियाची  राजधानी  झाले.

 

ब्रिटनपासून    स्वातंत्र्य  मिळाल्यानंतर  क्वालालंपूरमधील    निरनिराळ्या  वांशिक  गटांमध्ये  असंतोष उफाळून आला. याचा  परिणाम  म्हणून  १९६९  मध्ये  आणीबाणी  जाहीर  करण्यात  आली. ही  आणीबाणी  दोन  वर्षे  टिकली. आर्थिक  विकास  आणि  एकत्र  काम  करण्याची  इच्छा  यांमुळे  हा  असंतोष  अखेर  संपला आणि  १९७४  मध्ये  क्वालालंपूर  मलेशियाचा  संघराज्य  प्रदेश   (फेडरल  टेररीटरी  ) झाला. नव्या  इमारतींमध्ये  वाढ  झाली. यांमध्ये  पेट्रोनास  टॉवर्सचा  समावेश  होतो. लोकसंख्यासुद्धा  वीस  लाखाच्या  पुढे  गेली. अलीकडील  काही  वर्षांमध्ये  शहराची  वाढ  सातत्याने  होत  आहे . १९८८  मध्ये  क्वालालंपूरमध्ये   राष्ट्रकुल  स्पर्धा  भरल्या  होत्या.

 

२ प्रवास

China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...