Wednesday, December 11, 2024

विकृतांवर मात कशी कराल

विकृतांवर मात कशी कराल?

'मनुष्य असा कसा वागू शकतो?' तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

आपण समाजात अशी व्यक्ती पाहिली असेल किंवा अशा व्यक्तीबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. अशी व्यक्ती पुरुष, स्त्री, लहान मुलगा, मुलगी कुणीही असू शकते. कदाचित् ही व्यक्ती सोश्योपाथ (sociopath) असू शकेल.  

डॉ. मार्था स्काऊट (Dr Martha Stout) यांनी त्यांच्या Outsmarting the Sociopath next door या पुस्तकात अशा व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे.

सोश्योपाथचे वर्णन करण्यास मनोरुग्ण, वेडा, वेडसर, अर्धवट अशी सर्व वर्णने अपुरी पडतात. कारण अशा व्यक्तींच्या वर्तनास काहीतरी कारण असते, सुधारणेला काहीतरी वाव असतो. पण सोश्योपाथच्या बाबतीत अशी काहीच शक्यता नसते. तुम्ही एकच अपेक्षा करू शकता की सोश्योपाथ तुम्हाला कुठेच भेटू नये. पण दुर्दैव असे असते की सोश्योपाथ कधी तरी, कुठे तरी तुमच्या आयुष्यात येतो‌. कधी सोश्योपाथ तुमच्या घरातील व्यक्ती असू शकते. मराठीत अशा व्यक्तीस केवळ विकृत व्यक्ती म्हणता येईल. पण सोश्योपाथचे वर्णन करण्यास नेमका प्रतिशब्द नाही . त्यामुळे मी येथे सोश्योपाथ हाच शब्द वापरला आहे. आपल्या हातात एकच गोष्ट आहे की सोश्योपाथपासून स्वतः:चे रक्षण करणे.  

१. मानसिकतेतील भगदाड (A hole in the Psyche):-

सोश्योपाथच्या मानसिकतेमध्ये फार मोठे भगदाड असते. 

टॉम आणि जॅक आपापल्या गाड्या चालवीत समोरासमोरून येत असतात. टॉमची चूक होते आणि टॉम विरुद्ध लेनमध्ये येतो. टॉमला वाचवण्यासाठी जॅक रस्ता सोडून गाडी बाजूला घेतो आणि जॅकची गाडी चिखलात पडते. जॅक चांगले कपडे घालून मैत्रिणीला भेटायला चाललेला असतो. जॅकचा संताप अनावर होतो. तो सरळ पिस्तूल काढतो आणि टॉमला शूट करतो.

सोश्योपाथच्या ठिकाणी सदसद्विवेकबुद्धीचा अभाव असतो. आपण कधी चुकून एखादी वाईट गोष्ट केली असेल, तर आपल्याला सदसद्विवेकबुद्धीची टोचणी लागेल. पण सोश्योपाथला तसे कधीच वाटणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचे वाईट झालेले पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. हे लोक खुनी असतात का? खुनी माणूस सोश्योपाथ असू शकेल, पण सारेच सोश्योपाथ खुनी नसतात. अशा व्यक्तींची जागा तुरुंगात असली पाहिजे. पण कायदा यांना पकडण्यास असमर्थ असतो. उलट हे लोक समाजात मोठ्या पदांवरही आढळून येतात.

२. जेव्हा सोश्योपाथ तुमच्या घरातील व्यक्ती आहे (When the Sociopath belongs to you)

(१९७३  च्या  बी.आर. चोप्रा यांच्या 'धुंद' चित्रपटातील एक दृश्य. पुस्तक वाचताना मला असं वाटलं की  चित्रपटातील रणजीत ही व्यक्तिरेखा लेखिकेने सांगितलेल्या सोश्योपाथच्या वर्णनाशी जुळते)

सायलस नावाच्या मुलाला आपली आई मूर्ख आहे असे वाटते. सायलसच्या वर्तनाला कंटाळून त्याचे वडील पूर्वीच निघून गेले आहेत. सायलस आणि  त्याची आई समुद्रकिनाऱ्यावर एका घरात राहतात. एका रात्री खूप मोठे वादळ झालेले असते आणि किनाऱ्यावरील घरे उद्ध्वस्त झालेली असतात. आईच्या नकळत सायलस रात्रीच्या वेळी या घरांत शिरतो आणि मिळेल ती चीजवस्तू उचलून आणतो. त्याला एका म्हाताऱ्या माणसाचे प्रेत पाण्यात तरंगताना दिसते. या प्रेताच्या खिशातील पैसेही तो काढून घेतो. नंतर त्याच्या आईला त्याच्या बॅगेत या साऱ्या वस्तू आढळतात, तेव्हा ती हाताने चेहरा झाकून रडण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.

एका घटनेमध्ये बारा वर्षांच्या एका मुलाने सहा वर्षांच्या आपल्या बहिणीवर बलात्कार केला होता. दुसरी घटना अशी. एका आईने आपली दोन वर्षांची मुलगी जिन्यात जाऊ नये म्हणून जिन्याला एक छोटे फाटक केले होते. आई लॉंड्रीमध्ये काही कामासाठी गेली असता तिला आपल्या मुलीची किंकाळी ऐकू आली. तिने बाहेर येऊन पाहिले तर तिच्या मुलीचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला होता. समोरच तिचा मोठा मुलगा निर्विकारपणे  पाहत उभा होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रकार कसा घडला याबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं. कदाचित फाटक कसे उघडावे ते ती शिकली असावी.

या सर्वांमध्ये एकच गोष्ट सामायिक होती आणि ती म्हणजे सदसद्विवेकबुद्धीचा अभाव. उलट आपण काही गैरकृत्य केल्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हतं. पुन्हा अशी मुले आपण कसे निरागस आहो हे दाखविण्यात आणि दुसऱ्याच्या मानसिक दुर्बलतेचा उपयोग करून अधिकाधिक फायदा उपटण्यात हुशार असतात.

मग यावर उपाय काय आहे? यावर सध्या तरी उपाय नाही. अशा मुलांना एखाद्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी पाठवूनही त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत नाही. Kazdin model म्हणून एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या सल्ल्याने हा ट्रेनिंग प्रोग्राम मुलाकडून करून घेता येईल. 

तुमच्या ज्या चांगल्या मुलास या सोश्योपाथिक भावंडाचा त्रास होतो आहे, त्याला तुम्हाला विश्वासात घ्यावे लागेल. कायदेशीर सल्ल्याची तयारीही ठेवावी लागेल. कारण अशा मुलांनी ड्रग्ज बाळगायला सुरुवात केली तर तुमच्यापाठी पोलीसांचा ससेमिरा लागू शकतो.

३.कार्यालयातील दुष्ट प्रवृत्ती (Human evil at work)

सोश्योपाथिक बॉस:

ग्रेसने तिच्या बॉस अंजेलाने सांगितलेले ई-मेल्सना उत्तरे पाठवण्याचे काम केले. पण अंजेला म्हणाली की हे काम तिने सांगितलेच नव्हते. ग्रेसला नीट ऐकण्याची सवय केली पाहिजे असे सांगून तिने ग्रेसची खरडपट्टी काढली आणि ग्रेसला मनगटाला बांधण्यासाठी एक ऑरेंज बॅंड दिला, जो पाहिल्यानंतर ग्रेसला आपण नीट ऐकत नाही, याची आठवण राहिली पाहिजे. ग्रेसला अतिशय अपमानित झाल्यासारखे वाटले. पण ती काही करू शकत नव्हती.

बॉसबाबतीत  असा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असतो. या परिस्थितीत  शक्यतो नोकरी बदलणे चांगले. ते शक्य नसेल तर बॉसने वेळोवेळी कसा त्रास देतो त्याचा तारीखवार तपशील लिहिणे चांगले. सीनिअर मॅनेजमेंटबरोबर चर्चा करण्याची वेळ आली तर या तपशिलाचा उपयोग होऊ शकतो.

सोश्योपाथिक व्यावसायिक:

ज्यांनी मदत करावयाची असे व्यावसायिक म्हणजे डॉक्टर, शिक्षक, वकील सोश्योपाथ असणे फार दु:खदायक असते. परंतु व्यावसायिकांस प्रमाणपत्र देणारे बोर्ड असते. कोर्टात जाणे फार खर्चिक व वेळकाढू ठरते. त्याऐवजी या बोर्डाकडे तक्रार करावी.

४. सोश्योपाथबरोबर न्यायालयात लढत ( The Sociopath in Court):

सोश्योपाथविरुद्ध न्यायालयातील लढत खूपच कठीण असणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण आपली न्यायव्यवस्था कायद्याच्या पालनासाठी आहे. या न्यायव्यवस्थेमध्ये सोश्योपाथ व्यक्तीस काय शिक्षा करावी याची काही तरतूद नाही. सोश्योपाथ किती विकृत असला तरी तो एक गोष्ट चांगली जाणतो आणि ती म्हणजे दुबळे सावज हेरणे. आपण खूप चांगले आहोत हे दाखवून देण्यात तो तरबेज असतो. त्याच्याकडे सदसद्विवेकबुद्धी नावाची चीज नाही. त्यामुळे अमुक व्यक्ती सोश्योपाथ आहे हे सिद्ध करण्याऐवजी त्याचे गैर आणि हिंसक वर्तन सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योग्य ते रेकॉर्ड ठेवा. तुमच्या मुलाचा  किंवा मुलीचा कायदेशीर ताबा मिळवताना तुम्हाला न्यायालयात सोश्योपाथिक जोडीदाराचा सामना करावा लागतो. घटस्फोट झाला आणि तुम्हाला मुलाचा किंवा मुलीचा ताबा मिळाला तरी न्यायालय जोडीदाराला मुलाला किंवा मुलीला भेटण्याचा हक्क मान्य करते. मग हा सोश्योपाथिक जोडीदार राजरोस तुमच्या घरी येऊन मुलाला किंवा मुलीला तुमच्याविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करतो. तुमचे मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे मानसिक संतुलन बिघडणे हा त्याचा विजय आहे. तुम्ही निर्विकार राहा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा की त्याचेच मानसिक संतुलन बिघडेल. तो त्याचा पराभव असेल आणि तुमचा विजय असेल.

५. सर्वांत धोकादायक सोश्योपाथ (The iciest of all): 

ज्या वेळी सोश्योपाथ दुसऱ्याची हत्या करणे किंवा दुसऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त करणे अशांसारखी कृत्ये करतो, तेव्हा या कृत्यांमागील त्याचा हेतू केवळ मजा आणि आनंद असू शकतो. हत्येनंतर कोर्टामध्ये आणि प्रेस मध्ये मिळणारी प्रसिद्धी सोश्योपाथच्या आसुरी प्रवृत्तीला मेजवानी असू शकते. 

हल्लीच्या इंटरनेटच्या युगामध्ये सोश्योपाथच्या आसुरी शक्तीला मिळालेले आणखी एक शस्त्र म्हणजे सायबर अटॅक. हा निरुपद्रवी वाटणारा हल्ला प्रत्यक्षात भयंकर आणि सावज ठरलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरू शकतो. कारण सोश्योपाथ एखाद्या व्यक्तीस सतत आक्षेपार्ह संदेश पाठवून त्या व्यक्तीला जगणे कठीण करू शकतो.

आपली अशी अपेक्षा असते की राक्षस हा राक्षसासारखा दिसावा. पण सोश्योपाथ निरागस दिसण्याचा प्रयत्न करतो. कोर्टात ज्युरीजवर सोश्योपाथचे निरागस दिसणे प्रभाव पाडू शकते. सायबर अटॅकच्या बाबतीत सिक्युरिटी सेटिंग्ज अधिक सुरक्षित करता येतील.

६. सोश्योपाथवर मात कशी कराल (Transcending the sociopath's effects):

६.१-तुम्ही कशा प्रकारच्या व्यक्तीचा सामना करता आहा, त्याला समजून घ्या.

६.२-लक्षात ठेवा तुमची बाजू चांगुलपणावर आधारित आहे. तुमचं उद्दिष्ट निश्चित करा.

६.३-गेम बदला. उदा. सोश्योपाथ तुमच्या मुलांचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तुम्ही मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

६-४. तुमच्या स्वतःच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा.

६-५. सोश्योपाथला जे हवे आहे ते त्याला मिळू देऊ नका. तुमचा तोल ढळण्यामध्ये सोश्योपाथला आनंद मिळतो. तुम्ही शांतच राहा.

६-६. त्या विशिष्ट सोश्योपाथपासून त्रास होणारे इतरही लोक असतील. त्यांची मदत घ्या.

६-७.लक्षात घ्या, आता तुम्ही ठरवलेले उद्दिष्ट तुमच्या आयुष्याचा केवळ एक भाग आहे, पूर्ण आयुष्य नाही.

६-८. संकटाचा फार बाऊ करू नका. तुमची समस्या इतरांना तुमच्याइतकी महत्त्वाची वाटणार नाही. 

६-९. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

६-१०. हिंसाचारापासून स्वतःचं रक्षण करा.

७. सोश्योपाथ की नार्सिसिस्ट (Sociopath or Narcissist)

नार्सिसस ही ग्रीक कथेतील व्यक्तिरेखा. नार्सिसस दिसायला अतिशय सुंदर होता. एकदा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून तो स्वतःच्याच प्रेमात पडला आणि प्रेमात झुरून त्याचा अंत झाला.

सोश्योपाथप्रमाणे आपल्याला गोंधळात टाकणारे  व्यक्तिमत्त्व म्हणजे नार्सिसिस्ट. नार्सिसिस्ट म्हणजे स्वतःच्याच प्रेमात बुडालेले व्यक्तिमत्त्व.  दोघांमध्ये बराच सारखेपणा असला तरी मूलतः फरकसुद्धा आहे. सोश्योपाथमध्ये सदसद्विवेकबुद्धी नसते, तर नार्सिसिस्टमध्ये सदसद्विवेकबुद्धी असते, पण दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती नसते. सोश्योपाथला सत्तेची भूक असते तर नार्सिसिस्टला स्तुतीची भूक असते. तांत्रिकदृष्ट्या सोश्योपाथ हा नार्सिसिस्ट असतो पण नार्सिसिस्ट सोश्योपाथ असेलच असे नाही.

८. संस्थात्मक पातळीवरील सोश्योपथी (Sociopathy at the institutional level):-

संस्था  सोश्योपथिक असू शकतात का ? ज्या व्यक्ती कुटुंबवत्सल आणि प्रेमळ आहेत, त्या दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा आणू शकतात का? याचं उत्तर दुर्दैवाने होय असे आहे. अशा संस्थांमध्ये नफेखोरीसाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब करणाऱ्या कंपन्या तसेच जुलमी राजवटींचा समावेश होतो.

९. सत्प्रवृत्ती (The nature of good):-

एका ठिकाणी एक लठ्ठ मुलगा राहायला आला होता. सर्व मुले त्याच्या लठ्ठपणावरून त्याला चिडवीत असत. एकदा या मुलांनी या लठ्ठ मुलाला चिखलात पाडलं. एका मुलीने हे पाहिलं आणि तिला राहवलं नाही. या व्रात्य मुलांना तिने जाब विचारला. मुले काही बोलली नाहीत. परंतु पुन्हा त्यांनी त्या लठ्ठ मुलाला त्रास दिला नाही.

सत्प्रवृत्ती अशी आहे. दुष्प्रवृत्त लोक त्यांचा स्वभाव सोडत नाहीत, त्याचप्रमाणे सत्प्रवृत्त लोकही त्यांचा स्वभाव सोडत नाहीत. येथेच आशेला जागा आहे.

सोश्योपथी हा दुष्प्रवृत्तीचा प्रकार आहे. सोश्योपथीवर सध्या तरी वैद्यकीय शास्त्रात इलाज नाही. पुढे मागे कदाचित न्युरोलॉजीद्वारे यावर काही उपाय शोधला जाऊ शकेल. तोपर्यंत सत्प्रवृत्त माणसांना सोश्योपथिक जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात भेटत राहणार. त्यांना टाळणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे यावर उपाय नाही. तर त्यांच्यावर मात केली पाहिजे.

लेखिकेविषयी:

पुस्तकाच्या लेखिका डॉ. मार्था स्टाऊट यांनी हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सायकिॲट्री डिपार्टमेंटमध्ये सायकॉलजीच्या फॅकल्टी म्हणून पंचवीस वर्षे काम केले आहे. बोस्टनच्या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी क्लिनिकल असोशिएट म्हणून काम केले आहे. क्लिनिकल सायकॉलजिस्ट म्हणून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय केला आहे आणि मानसशास्त्रीय आघात (trauma) आणि PTSD यात त्यांनी विशेष काम केले आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पदवी पातळीवर त्यांनी मानसशास्त्र विषय शिकवला आहे.

समीक्षा:

लेखिका डॉ. मार्था स्काऊट या मानसशास्र विषयावरील अधिकारी व्यक्ती असून आपला सारा अनुभव या पुस्तकातून सोप्या भाषेत त्यांनी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. मानसशास्त्रातील गुंतागुंतीच्या कल्पना त्यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. सोश्योपाथ या व्यक्तिमत्वाचे सविस्तर स्पष्टीकरण करून अशा व्यक्तिमत्वापासून स्वतःचा बचाव करता येईल ते सांगितले आहे. पुस्तकात उद्धृत केलेली बाधित लोकांची पत्रे, निरनिराळ्या पुस्तकांतील उद्धरणे या सर्वांवरून लेखिकेने पुस्तक लिहिण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. सोश्योपाथ हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात आणि त्यावर मात करण्यात हे पुस्तक मैलाचा दगड आहे.

पुस्तकाविषयी:

पुस्तकाचे नाव: Outsmarting the Sociopath next door.
लेखिका: Dr Martha Stout
प्रकाशक: John Murray Learning
उपलब्धता: हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे.

या लेखिकेची इतर पुस्तके:
Tha Paranoia Switch
The myth of sanity

डिस्क्लेमर:
Outsmarting the Sociopath next door या Dr Martha Stout लिखित पुस्तकाची ही संक्षिप्त समीक्षा आहे. समीक्षक या पुस्तकावर कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करीत नाही. पुस्तकाचे कॉपीराइट्स लेखक/प्रकाशक यांचेकडे आहेत. या समीक्षेतील पुस्तकाचे आणि पुस्तकातील विषयांचे उल्लेख केवळ शिक्षण आणि मनोरंजन यांसाठी आहेत. या समीक्षेतील मते समीक्षकाची वैयक्तिक मते आहेत असे नाही.

-Dr Hemant Junnarkar
© All rights reserved






Monday, November 18, 2024

३० दिन में चिंता से मुक्ति पाइये

३० दिन में चिंता से मुक्ति पाइये

आज हम सभी तरह-तरह की चिंता से ग्रस्त हैं।  कोई नहीं जानता कि इस चिंता को कैसे दूर किया जाए।  ऐसे समय में बेव एज़बेट द्वारा लिखित पुस्तक 'थर्टी डेज़ थर्टी वेज़ टू रिड्यूस एंग्जाइटी' आपकी मदद करेगी।

यह पुस्तक 30 दिन या एक महीने का कार्यक्रम है।  प्रत्येक दिन के लिए एक योजना दी गई है।  आप को बस दैनिक निर्देशों का पूरे मन से पालन करना है।  30 दिन बाद आपको फर्क जरूर महसूस होगा।  अब आइए देखें कि 30 दिनों में चिंता को कैसे हराया जाए।

दिन 1 🌅 

आज आप बहुत चिंतित महसूस कर रहे हो,  इसका मतलब यह नहीं है कि आपको काही  फ्रैक्चर हुआ है या आप को कोई सज़ा हुई है।

चिंता क्या है?  यह एक सामान्य बात है।  सफल लोग भी चिंता से ग्रस्त होते हैं। आप चिंता से पीड़ित हैं इस कारण घबराने की ज़रूरत नहीं।

 दिन 2 🌅 


यदि आप चिंता से पीड़ित हैं, तो इसे ऐसे समझें जैसे आपके घर में कोई अनचाहा मेहमान आया है।  तो फिर क्या करें, इस मेहमान को घर में एक अलग कमरा दे दें और कहें, 'यह आपका कमरा है।'  यहां बैठो और जो चाहो करो.  मेरे काम में विघ्न मत डालो।'

दिन 3 🌅 

यदि आप किसी चीज़ का विरोध करने की कोशिश करते हैं, तो वह चीज़ मजबूत और अधिक कष्टप्रद हो जाती है।  इसलिए चिंता का विरोध करने के बजाय, अपने दिमाग को दूसरी ओर मोड़ें।   पढ़ें, फ़िल्म देखें, कुछ दिलचस्प खोजें।

दिन 4 🌅 

यदि आपके पास करने के लिए बहुत सारा काम है तो आप चिंतित महसूस करते हैं।   काम के पहाड़ को रातों-रात निपटाने की कोशिश न करें।  अपने कार्यों की एक सूची बनाएं और उन्हें चरण दर चरण पूरा करते रहें।  जैसे-जैसे कार्य पूरे होंगे, आपकी चिंता कम होगी।

दिन 5 🌅 

अपनी चिंताओं को पराये व्यक्ति की नज़र से देखें।  मान लीजिए कि कोई एलियन किसी विदेशी ग्रह से आया है और आपकी चिंता उसके लिए एक केस स्टडी है।  वह आपकी चिंता पर एक रिपोर्ट बनाकर अपने प्रधान कार्यालय को भेजना चाहता है।  इस एलियन को वह जानकारी दे जो उसे चाहिए।  आप अपनी चिंता और उस पर काबू पाने के बारे में बहुत कुछ सीखेंगे।

दिन 6 🌅 

आपने सुना होगा कि आपका दिमाग एक शरारती बंदर या 'माइंड मंकी' है।  इस दिमागी बंदर को वश में करने के लिए यौगिक ध्यानसाधना का उपयोग किया जा सकता है।

दिन 7 🌅 

आपका अतीत आपको सताता रहता है।   यदि आप अतीत के बारे में सोचने के बजाय वर्तमान स्थिति में आपके आसपास क्या हो रहा है, इसके बारे में सोचने की आदत बना लें, तो आप अतीत से बाहर आकर वर्तमान में जी सकेंगे।

दिन 8 🌅 

इस दिन अपने आप से दया का व्यवहार करें।  अपने उपर गुस्सा न करे से, खुद के प्रति क्रूर होना बंद करें, खुद को 'इमोशन डिटॉक्स' उपचार दें।

दिन 9 🌅 

आप खुद को कोई बंधनों में जखड़ते रहते हैं | जैसे कि 'एक निश्चित कार्य अवश्य होना चाहिए, दुसरा कोई कार्य निपटाना बहुत ज़रूरी हैं'।'  आपको सबकुछ करने या न करने की आजादी है.  इसलिए ऐसे बंधनकिरक विचार और ऐसी भाषा बंद करें। 

दिन 10 🌅 

आप जो कुछ भी देखते हैं वह वैसा ही है।  यदि आप किस चीज़ के बारे में अच्छा सोचते हैं तो वह चीज़  आप को अच्छी दिखती हैं | यदि आप उस चीज़ के बारे में बुरा सोचते हैं तो वह चीज़  आप को  बुरी  दिखती है।  इसलिए अपने नकारात्मक विचारों और नकारात्मक भाषा को बदलें और सब कुछ आपको अच्छा लगेगा।

दिन 11 🌅 

कुछ मान्यताएँ तथ्य नहीं हैं, लेकिन आप आश्वस्त हैं कि वे तथ्य हैं।  धारणाओं की सुंदरता यह है कि जब ये धारणाएँ बदलती हैं, तो आपका अनुभव भी बदलता है।  ऐसी कुछ मान्यताओं की सूची बनाइये।  देखिए, विचार कीजिए कि ये मान्यताएं हैं या तथ्य।  यदि ये मान्यताएँ असत्य हैं, तो उन्हें बदल दें और आपका अनुभव बदल जाएगा।

दिन 12 🌅 

क्या आप लगातार सोचते रहते हैं कि 'अगर कुछ हुआ तो क्या होगा' या 'अगर कुछ नहीं हुआ तो क्या होगा?'  ऐसी बातें लिखो.  अब उनके उत्तर लिखिए.  आप देखेंगे कि इनमें से कई चीजें घटित नहीं होती हैं।  लेकिन आप बिना वजह चिंता कर रहे हैं.

दिन 13 🌅 

याद रखें जब आपके सामने कोई समस्या आती है तो वह एक कठिन कार्य है, विनाश नहीं।  किसी भी काम को पूरा करने का एक तरीका होता है।  कार्य के पहले चरण को 'प्रारंभ' के रूप में लिखें और जो परिणाम आप चाहते हैं उसे 'अंत' के रूप में लिखें।  अब सीढ़ी पर चढ़ने की तरह बीच के चरणों को शुरू से अंत तक भरें।  यही है समस्या का समाधान !

देखें कि आपका दृष्टिकोण कैसे उज्ज्वल होता है। यदि नहीं, तो साधारण चीजों का आनंद लें।  टहलने जाएं, झपकी लें।

दिन 14 🌅 

आज आप को चित्रकार बनना  हैं।  यह 'आर्ट थेरेपी' है। एक साधारण नोटबुक और ज़्यादा महंगी नही ऐसी रंग सामग्री काफी है।  एक बच्चा इस बात की परवाह नहीं करता कि तस्वीर कैसी दिख रही है, किसे पसंद है, बल्कि वह अपनी भावनाओं को कागज पर उतार देता है।  एक बच्चे की तरह चित्र बनाएं.

दिन 15 🌅 

क्या आप जानते हैं कि आपके अंदर एक बालक हैं |  तुमने इस बालक को अब तक कैद में रखा है।  आपको एक जिम्मेदार माता-पिता बनकर इस बालक को बचाना होगा।  याद रखें कि आप बचपन में कितने मासूम, खुले विचारों वाले, चंचल थे और अपने भीतर के बालक से मिलें।

दिन 16 🌅 

जब आप अपने भीतर के बालक से मिलेंगे तो आपकी क्या प्रतिक्रिया होगी?  यह मिली-जुली प्रतिक्रिया होगी.  शायद रो भी दें.  लेकिन बुरा ना माने।  वह भी स्वाभाविक है.  इस छोटे बालक के संपर्क में रहें, उसके लिए समय निकालें, वो चीज़ें करें जो आपको बचपन में पसंद थीं। 

दिन 17 🌅 

अपने भीतर के बालक से संपर्क करें।  लेकिन इससे उसे यकीन नहीं होगा.   इस छोटे से बालक को विश्वास दिलाओ कि,' मैं तुम्हारे साथ हूं।  मैंने अब तक तुम्हें नजरअंदाज किया है.  लेकिन अब मैं अपने व्यस्त कार्यक्रम से आपके लिए समय निकालूंगा।'

दिन 18 🌅 

आपके और आपके अंदर बसे हुए बालक के लिये आज का दिन एक मज़ेदार दिन है।  अपनी कल्पना से कोई खुशी के मौके ढूंढ लो और उन का  आनंद लो।  यदि आप छुट्टी ले सकते हैं, तो छुट्टी लें।  सुबह उठो.  बढ़िया नाश्ता करें.  संगीत वाद्य बजाएं।  आइसक्रीम पार्लर जाएं और आइसक्रीम खाएं।  आज आपका दिन है.

दिन 19 🌅 

आज का दिन आभार व्यक्त करने का, धन्यवाद देने का है।  आप कहते हैं, मेरी जिंदगी में कुछ भी अच्छा नहीं हो रहा है.  मुझे क्या और किसे धन्यवाद देना चाहिए?  आप ऐसा कैसे कहते हैं?  अब आराम से बैठ कर किताब पढ़ रहा हो,  इसका मतलब है कि आप एक किताब खरीद सकते हैं।  सच है या नहीं?  आइए और याद करे, कई अच्छी बातें याद आयेगी.

दिन 20 🌅 

क्या आप जीवन को बहुत गंभीरता से लेते हैं?  तो आज खूब हंसिए.  ये है 'लाफ्टर थेरेपी'.  किसी को एक चुटकुला बताओ.  कॉमेडी फिल्में देखें.

दिन 21 🌅 

आप जो खाते हैं उसका आपकी भावनाओं पर बहुत प्रभाव पड़ता है और इनमें से सबसे खराब है चीनी, जो आपके स्वास्थ्य के लिए भी हानिकारक है।   अपने स्वास्थ्य पर ध्यान दें.  अपने आहार में साबुत अनाज, ताज़ी सब्जियाँ, फल, प्रोटीन शामिल करें।  खूब सारा पानी पीओ।

दिन 22 🌅 

अब आपको दो अक्षर के शब्द का महत्व समझना होगा और वह शब्द है - 'नहीं'.  क्योंकि अगर आप 'ना' कहना चाहते हुए भी ना नहीं कह पाते तो लोग आपकी बात मान लेते हैं और फिर अनचाहे काम आप के गेले में पड़ते हैं हरकतें  और इस से आपकी चिंता बढ़ जाती है।

दिन 23 🌅 

क्या आप हर किसी को खुश करने की कोशिश करते हैं?  अगर आप ऐसा करते हैं तो इस आदत को छोड़ दें।  ऐसा इसलिए है क्योंकि आप दूसरों के काम में इतने व्यस्त हैं कि आपके पास अपने लिए पर्याप्त समय नहीं है।

दिन 24 🌅 

आप किस तरह की व्यक्ति हो यह समझने का एक अच्छा तरीका है |  आप  जिन लोगों के साथ जुड़ते हो वो लोग आप के सारे में बहुत कुछ बता सकते हैं |  इन लोगों का चेहरा एक दर्पण की तरह होता है जिसमें आप अपना चेहरा देख सकते हैं।  इस आईने में देखो और खुद को बदलते रहो।

दिन २५ 🌅 

आज आप 'सिंक्रोनिसिटी' नामक एक नई अवधारणा के बारे में जानने जा रहे हैं।  इस अवधारणा के जनक आधुनिक मनोविज्ञान के संस्थापक कार्ल जंग हैं।  इस अवधारणा के अनुसार, आप जो चाहते हैं उसकी वेव्ह लेंग्थ पर आप को होना चाहिए।  इसका मतलब है कि वह चीज़ आपकी ओर स्वतः ही आकर्षित हो जाती है।  'आज का दिन अच्छा रहने वाला है,' कहें तो आप का दिन अच्छा रहेगा। 

दिन 26 🌅 

क्या आपको लगता है कि अन्य लोग आपसे अधिक होशियार, बेहतर, अधिक बुद्धिमान हैं?  लेकिन सच्चाई ऐसी नहीं है.  आप भी उतने ही होशियार, अच्छे, बुद्धिमान हैं।  आपके जैसा कोई नहीं है.  तुम सिर्फ तुम हो.

दिन 27 🌅 

किसी और का एहसान निभाना हो या किसी दूसरे को नाराज न करना हो, इसलिए आप हर दिन अपने दिल के खिलाफ कुछ काम करते हैं, उन सभी चीजों को आज ही त्याग दें।  आज वो सभी काम करें जो आपको पसंद हैं.

दिन 28 🌅 

आपकी अंतरात्मा आपको कुछ बता रही है।   किसी समय आपने यह आवाज सुनना बंद कर दिया है।  आपका दिमाग आपको ज़्यादा सोचने पर मजबूर कर देता है और आपकी स्थिति गांठों में बंधी सुई चीज् की तरह हो जाती है।  कहीं दूर घूमने जाएं या बिना किसी खास जगह को ध्यान में रखे किसी दौरे पर निकल जाएं।  आपको अपनी अंतरात्मा की आवाज सुनाई देने लगेगी।

दिन 29 🌅 

जब आप अपने आप को अतीत के दुखों और पीड़ाओं के बारे में बता रहे हैं, तो आप अपने आप को अपने अतीत के बारे में एक कहानी बता रहे हैं जो अब नहीं हो रही है।  वह आपके जीवन की कहानी का पहला मसौदा था, इसे फेंक दें और आज ही एक बेहतर कहानी लिखना शुरू करें।

दिन 30 🌅 

श्रद्धा को आम तौर पर धार्मिक विचार माना जाता है।  लेकिन आप उन चीज़ों में भी श्रद्धा रख सकते हैं जो धर्म से संबंधित नहीं हैं जैसे कि आपके प्रियजन, प्रेम की शक्ति, जीवन ।  तो थोड़ी श्रद्धा रखो.  प्रकृति पर श्रद्धा रखें.  प्रकृति में चाहे कितनी भी विपदा हो, प्रकृति स्वयं को बदल लेती है, संतुलन स्थापित कर लेती है।  लोगों की बुनियादी अच्छाई पर भरोसा रखें.  आप स्वयं एक अद्भुत, अद्भुत व्यक्ति हैं।  अपने पर श्रद्धा रखो।

समीक्षा 🔬:-

तो यह बेव एज़बेट द्वारा लिखित पुस्तक का संक्षिप्त परिचय है।  पुस्तक इतनी सरल भाषा में लिखी गई है कि इसमें छिपे महान सिद्धांतों पर हमारा ध्यान ही नहीं जाता।  30 दिनों में चिंता से छुटकारा पाना हमें एक असंभव विचार लगता है। लेकिन इस पुस्तक के उपरोक्त सारांश से आपको एहसास होगा कि यह असंभव नहीं है।  आपको इसमें अपना दिल लगाना होगा और यह पुस्तक उसके लिए मार्गदर्शक है।  लेखिका द्वारा विभिन्न पुस्तकों से दिये गये उद्धरण उसके अध्ययन को दर्शाते हैं।  चूंकि लेखक एक अच्छे कार्टूनिस्ट हैं, इसलिए लेखक ने प्रत्येक अध्याय के विषय को दर्शाने के लिए उपयुक्त कार्टून बनाए हैं।  संक्षेप में, यह पुस्तक किसी संग्रह में रखने के लिए नहीं है, बल्कि पास में रखने और लगातार पढ़ने, क्रियान्वित करने के लिए है।  मैं इस पुस्तक को पूरे 5 सितारे देता हूँ।

किताब के बारे में:

Name of the book: 30 Days 30 Ways to overcome anxiety

Author: Bev Aisbett

Pages:206

Introduction

Chapters Day 1 to Day 30

Other books by Bev Aisbett

Published by Harper Collins Publishers

पुस्तक की रूपरेखा:-

 पुस्तक में 30 दिनों के लिए 30 अध्याय हैं।  अध्याय का  नाम एक संदेश है.   अध्याय की शुरुआत में एक विचारोत्तेजक कार्टून है.  फिर लेखक बहुत ही सरल भाषा में विषय पर चर्चा करता है।  इसके बाद लेखक इस दिन क्रियान्वित करने की क्रिया बताता है।  अंत में इस दिन के लिये मंत्र दिया गया है जिसे आप को आचरण में लांना हैं |

बेव एज़बेट पुस्तक के लेखक:-

बेव एज़बेट एक स्वतंत्र चित्रकार और कार्टूनिस्ट हैं।  1993 में, वह गंभीर चिंता और अवसाद से पीड़ित हो गए।  इससे उबरने के बाद उन्होंने अपनी मशहूर किताब लिविंग विद आईटी- ए सर्वाइवर्स गाइड टू पैनिक अटैक्स लिखी।  बेव ने कई किताबें लिखी हैं।  उनमें चिंता निवारण पर अधिक पुस्तकें शामिल हैं।

-Book review by Dr Hemant Junnarkar

© Dr Hemant Junnarkar, All rights reserved

अस्वीकरण:

यह बेन एज़बेट द्वारा लिखित पुस्तक 'थर्टी डेज़ थर्टी वेज़ टू रिड्यूस चिंता' की एक संक्षिप्त समीक्षा है।  यह सिर्फ एक समीक्षा है.   समीक्षक पुस्तक पर किसी भी प्रकार के कॉपीराइट का दावा नहीं करता है।   कॉपीराइट लेखक/प्रकाशक के पास रहता है।   पुस्तक में संदर्भ और इसकी सामग्री की चर्चा केवल शिक्षा और मनोरंजन के लिए है।




China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...