Monday, March 16, 2026

०९. दक्षिणेचा मोती – फुकेत

 वैशिष्ट्ये 

  थायलंड मधील सर्वांत मोठे बेट

  ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या इंग्रजी चित्रपटातील चित्रीकरणाचे ठिकाण असलेले ‘जेम्स बॉंड आयलंड’ येथे आहे. 

 

१ . परिचय 

फुकेतविषयी झटपट माहिती

 

स्थान:

???

क्षेत्रफळ:

५४० चौ. कि. मी.

लोकसंख्या:

२ लाख.

जाण्यास योग्य  वेळ:

नोव्हेंबर ते फेब्रुवारी.    



दृष्टिक्षेपात फुकेत


विस्तार


फुकेत हे थायलंड मधील सर्वांत मोठे बेट आहे.  ५४०  चौ  मीटर्स  आकारमान  असणारे  हे  बेट  जवळ  जवळ  सिंगापूरच्या  आकाराचे  आहे.


भौगोलिक स्थान

थायलंडच्या ईशान्य किना-यापासून थोडे दूर अंदमान समुद्रामध्ये.


मुख्य शहर

फुकेत टाऊन.


प्रचलित भाषा 

थाई, चिनी, इंग्लिश.


लोकसंख्या 

२११,०००.


हवामान: स्थानिक हवामान उष्ण आणि दमट आहे. उष्ण कटिबंधीय हवामान, मुख्यत: मॉन्सून वा-यांवर अवलंबून आहे. मे  महिन्यामध्ये  या  बेटावर  पाऊस  येतो  आणि  वर्षभरात  साधारण  १००  इंच  पाऊस  पडतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हवामान थंड आणि कोरडे असते.


विस्ताराने माहिती


फुकेत  हा  शब्द  बहुतेक  बुकित  या  मले  शब्दापासून  तयार झाला  आहे. फुकेत दुरून टेकडीसारखे  दिसते, त्यामुळे  हे  नाव  पडले  असावे. शतकानुशतके थाई  मुख्यभूमी , चीन  आणि  मलेशियामधून  फुकेतमध्ये  असंख्य  लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे  येथे  चिनी  प्रभाव  असलेली  मिश्र  संस्कृती  दिसून  येते  आणि  त्यामुळे  फुकेत  पर्यटकांचे   भेट  देण्याचे  आवडते ठिकाण आहे.

फुकेत थायलंडच्या ईशान्य किनार्‍यावर आहे. ते Bankokच्या दक्षिणेकडे ८६० किमी तर विषुववृताच्या उत्तरेस ८३० किमी अंतरावर आहे (अक्षांश ७.५ﹾ).  या भौगोलिक स्थानामुळे त्याची तुलना इथिओपिया, नायजीरिया आणि व्हेनेझुएलाबरोबर होऊ शकते. हिंदी महासागरातील अंदमान समुद्रामध्ये फुकेत आहे. हे थायलंडमधील सर्वांत मोठे बेट असून स्वतंत्र प्रांताचा दर्जा  मिळण्याएवढे त्याचे आकारमान आहे. 

बेटाची लांबी ४९ किमी असून रुंदी २१ किमी आहे. आसपास असणाऱ्या ३९ बेटांच्या ७० चौकिमी क्षेत्रफळासह  फुकेतचे एकूण क्षेत्रफळ ५७० चौकिमी आहे. थायलंडच्या मुख्य भूमीपासून छोट्या खाडीने विभागले असून Sarasin या ६०० मीटर लांबीच्या पुलाने थायलंडच्या मुख्य भूमीशी जोडले आहे. 

फुकेतच्या प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आहे. बेटाची भूमी मुख्यत: granite आणि थर असलेल्या खडकांची आहे. टेकड्या भरपूर असून काही टेकड्यांची उंची ५०० मीटर्स आहे. टेकड्या सर्वत्र असून पश्चिम किनार्‍याकडे त्या कमी होत जातात. मैदानी भागांमध्ये शहरी वस्ती असून तेथे रबर आणि नारळाची लागवड होते. Khao Phra Thaew National Park मध्ये  खारफुटीची आणि विषुववृत्तीय पर्जन्यजनित  अरण्ये आहेत. 

बेटाच्या पश्चिम किनार्‍यावर उत्कृष्ट बीचेस आहेत. पावसाळ्यामध्ये बेटावर आदळणाऱ्या अजस्र लाटांमुळे हे बीचेस तैय्यार झाले असून मध्ये मध्ये खडकाळ भूशिरे आहेत.  

बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर लहान बीचेस आहेत आणि तेही दलदलीने भरलेले आहेत. पूर्वीच्या कथलाच्या खाणकामाच्या काळातील कचरा या किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला हे सुद्धा या किनार्‍याच्या दुरावस्थेचे एक कारण आहे. बहुतेक सारा पूर्व किनारा खारफुटीच्या जंगलांनी भरलेला आहे. 

फुकेतच्या आसपास असणारी बेटे दोन प्रकारची आहेत. पश्चिमेकडे असणारी बेटे मुख्यत: graniteची असून ही बेटे दक्षिण आणि पूर्व किनार्‍यास जवळ आहेत.  ही बेटे कमी उंचीची असून जंगलांनी भरलेली आहेत. या बेटांमध्ये Koh Racha Yai आणि Koh Hee सारखे बीचेस आहेत. नैऋत्य दिशेस असणारी बेटे चुनखडीच्या खडकांची असून पूर्व आणि दक्षिण बाजूस पसरलेली आहेत. ही बेटे समुद्राशी काटकोनामध्ये उभी असून अतिशय निसर्गरम्य  आहेत. यांमध्ये Phi Phi आयलंड्स आणि फंग आ बेचा समावेश होतो. ही बेटे तयार  होण्यास कारणीभूत असणारे चुनखडीचे खडक फुकेतच्या पूर्वेकडील फंग आ प्रांत ते Krabi प्रांत आणि पुढे Trang पर्यंत पसरलेले आहेत. या खडकांमुळे या साऱ्या किनारपट्टीवर सुंदर वनश्री निर्माण झाली आहे. 

फुकेत सहसा नैसर्गिक आपत्तींपासून मुक्त आहे. पावसाळ्यामध्ये कधी कधी मोठी वादळे होतात, परंतु त्यांचे रूपांतर टायफूनमध्ये कधी झाले  नाही. पावसाळ्यामध्ये क्वचित पाणी साचते आणि छोटे मोठे पूर  येतात. पावसाळ्यामध्ये काही भूस्खलनाचे प्रकार होऊन कधी कधी जीवितहानी झाली आहे. जेथे वृक्षतोड झाली आहे, अशा ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. २००४ साली त्सुनामीमुळे जो भूकंप झाला होता, तो फुकेतमध्ये केवळ जाणवला होता, त्यामुळे नुकसान असे झाले नव्हते. तरीसुद्धा फुकेतखालून एक साधारण भूकंपकारी रेषा आहे. कदाचित त्यामुळेच एप्रिल २०१२ मध्ये फुकेतला ४.४. रिश्टर मात्रेचा धक्का बसला होता. परंतु त्यामुळे कुठलेच मोठे नुकसान असे झाले नाही.      


इतिहास: सतराव्या शतकामध्ये फुकेतमध्ये कथलाचे साठे आढळल्याने डच, इंग्रज आणि नंतर फ्रेंच, फुकेतवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करू लागले. थाई राजा Narai याने डच आणि इंग्रज यांचा प्रभाव कमी करण्यासाठी फ्रेंचांबरोबर करार करून व्यापाराचा एकाधिकार फ्रेंचांना दिला.  परंतु १६८८ साली झालेल्या सयामी क्रांतीमुळे थायलंडमधून फ्रेंचांना हुसकून देण्यात आले.  यानंतर १७८५ मध्ये ब्रह्मी लोकांनी फुकेतवर आक्रमण केले. यावेळी फुकेतचा गव्हर्नर नुकताच मरण पावला होता. परंतु त्याची पत्नी थान फू यिंग चान मोठी धीराची बाई होती. तिने आणि तिची बहीण मूक हिने होत्या त्या साऱ्या फौजा एकत्र करून ब्रह्मी आक्रमकांविरुद्ध यशस्वी लढा दिला. या लढ्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग होता. रामा पहिला या थायलंडमधील त्या वेळच्या राजाने या वीरांगनांचा यथोचित गौरव केला.  Chulalongkorn (रामा पाचवा) या राजाच्या कारकीर्दीमध्ये फुकेतला कथलाचे उत्पादन करणाऱ्या दक्षिणेकडील प्रांतांच्या प्रशासकीय केंद्राचा दर्जा देण्यात आला. १९३३ साली फुकेतला स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्यात आला.  

फुकेतला कसे जावे: बँकॉक आणि सिंगापूरहून विमानाने फुकेत तासाभराच्या अंतरावर आहे. आशियामधील बहुतेक सर्व विमानतळांना फुकेत जोडलेले आहे.

फुकेतमध्ये राहावे कुठे: फुकेतचा आकार पाहिलात तर उभट आहे. त्याची लांबी २१ किमी तर रुंदी ४९ किमी आहे. म्हणजे रुंदी लांबीपेक्षा जास्त आहे. फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट उत्तरेकडे आहे. पूर्व किनाऱ्यावर फुकेत शहराशिवाय फारसे काही नाही. फुकेत शहर औद्योगिक केंद्र असल्यामुळे येथे पर्यटकांच्या दृष्टीने फारसे काही नाही. फुकेतमधील बीचेस पश्चिम किनाऱ्यावर आहेत. त्यामुळे राहण्यास योग्य ठिकाण पश्चिम किनाऱ्याच्या मध्यभागी असणारे पातोंग हे आहे. पातोंगमध्ये राहून तुम्ही उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील ठिकाणी सहज जाऊ शकता. फुकेतमधील निशाजीवन आणि खरेदी यांचे केंद्रही पातोंगच आहे. या भागामध्ये हॉटेल्सही भरपूर आहेत.  

२. प्रवास

उत्तर फुकेत

फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट, http://www.phuketairportonline.com/                                                                                         


फुकेत इंटरनॅशनल एअरपोर्ट हा थायलंडमधील दुसरा सर्वांत मोठा वर्दळीचा विमानतळ आहे. हा विमानतळ म्हणजे फुकेत आयलंडचे प्रवेशद्वार असून थायलंडच्या दक्षिण भागातील पर्यटकांचे नंदनवन आहे. आज या विमानतळावर १० ए्अरलाइन्स सेवा देतात, २९ लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात, २७ हजार उड्डाणे होतात तर १२ हजार टन सामानाची नेआण होते. यावरून या विमानतळाच्या भव्यतेची कल्पना येईल.

पश्चिम फुकेत

पातोंग (Patong) शहर : पातोंग हे फुकेतच्या पश्चिम किनार्‍यावरील शहर निशाजीवन आणि खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. १९८०च्या उत्तरार्धामध्ये पाश्चिमात्य, विशेषत: युरोपिअन पर्यटकांमध्ये पातोंग लोकप्रिय झाले. आता येथे भरपूर हॉटेल्स झाली असून हे ठिकाण म्हणजे पर्यटकांची मक्का झाले आहे. २००४ मध्ये आलेल्या सुनामीचा पातोंगला मोठा फटका बसला होता आणि येथे बरीच हानी झाली होती. पातोंग आता या हानीमधून बऱ्यापैकी सावरले आहे.      

पातोंग बीच: पातोंग शहराच्या पूर्ण पश्चिम बाजूस ३.५ किमी लांबीचा बीच आहे. येथील निशाजीवन बांगला रोड आणि पॅराडाइज कॉंप्लेक्स या दोन भागामध्ये एकवटले आहे. पॅराडाइज कॉंप्लेक्स भागातील निशाजीवन समलिंगी लोकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. या दोन्ही भागांमध्ये बार्स, डिस्कोथेक्स आणि गो गो बार्स भरपूर आहेत. 

काटा (Kata) बीच: कॅरन बीचच्या दक्षिणेकडे काही मिनिटांच्या अंतरावर काटा बीच आहे. येथील पांढरीशुभ्र वाळू, स्वच्छ पाणी, चहुबाजूंना असणारी नारळाची झाडे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे बीचजवळच रेस्तराँ आणि राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. हा बीचसुद्धा निशाजीवणासाठी चांगला आहे. मे ते ऑक्टोबरमध्ये लाटांचा उपयोग करून घेण्यासाठी येथे सर्फर्सची गर्दी असते तर नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये सूर्यास्नासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते.  काटाचे दोन मुख्य भाग पडतात.

१. काटा सेंटर:- हा भाग उत्तर दिशेस असून कॅरनला जवळ आहे. 

२. काटा साऊथ:- येथे ब्राऊजिंग करण्यासाठी कॅफे, सूव्हनिर्स आणि कपड्यांची दुकाने भरपूर आढळतील.   


कॅरन (Karon) बीच: 

कमला बीच: 

फुकेत फँटसी : www.phuket-fantasea.com

        

फुकेत फँटसी हा एक थीम पार्क असून याला ‘बेस्ट अट्रॅक्शन अॅवॉर्ड मिळाले आहे.  हे  थीम पार्क सफारी पार्कच्या निर्मात्यांनी बनविले आहे.  हा थीम पार्क एकूण १४० एकर क्षेत्रामध्ये पसरला आहे. हा पार्क बांधण्यासाठी ३५० कोटी बाथ एवढा खर्च आला होता. फुकेत फँटसीची प्रमुख आकर्षणे अशी आहेत:-

१. कार्निव्हल व्हिलेज:- येथे निरनिराळे खेळ खेळावयास मिळतील, हस्तव्यवसाय पाहावयास मिळतील, तसेच खरेदी करता येईल. 

२. रेस्तराँ:- येथे ४,००० आसनक्षमता असणारे बफे पद्धतीचे भव्य रेस्तराँ असून यामध्ये थाई आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळतात.

३. थिएटर शो:- येथे तुम्हाला श्वास रोखून धरावयास लावणारा ला व्हेगा पद्धतीचा भव्य थिएटर शो पाहावयास मिळेल. या शोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष परिणाम यांच्या सहायाने तुमच्यासमोर थाई संस्कृतीची रहस्ये उलगडली जातील. हा प्रयोग सहकुटुंब पाहण्यासारखा आहे.    


बांगताओ (Bangtao) बीच:  


पूर्व फुकेत

फुकेत शहर

जुने फुकेत शहर

जुन्या फुकेत शहरामधील साइनो-पोर्तुगीज वास्तू:  

              

फुकेतचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जुन्या फुकेत शहरामधील साइनो-पोर्तुगीज म्हणजे चिनी आणि पोर्तुगीज पद्धतीच्या वास्तू. फुकेतमध्ये कथलाच्या व्यापारासाठी निरनिराळ्या देशातून लोक आले. या लोकांनी अनेक वास्तूसुद्धा बांधल्या. त्यांमध्ये मुख्यत: चिनी आणि पोर्तुगीज पद्धतीने बांधलेल्या वास्तू लक्ष वेधून घेतात. या वास्तू मुख्यत: दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या प्रकारच्या वास्तू म्हणजे शॉप हाऊसेस. यांची शैली चिनी-पोर्तुगीज अशा मिश्र प्रकारची आहे. दुसऱ्या प्रकारच्या वास्तू म्हणजे मोठे प्रासाद. यांची शैली चिनी आणि वसाहतकालीन अशी मिश्र प्रकारची आहे. या वास्तू कुणी आणि कधी बांधल्या याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.  परंतु या वास्तू पाहताना तुम्हाला भूतकाळामध्ये कित्येक शतके मागे गेल्यासारखे वाटेल.   

Phithak Chinpracha House Museum (Chinpracha House) Ban Chinpracha, 98 Krabi Road      

 

हा सुंदर प्रासाद Phithak Chinpracha (११८३-१९४९) याने १९०३ मध्ये बांधला. १९०९ मध्ये थाई अधिकार्यांकडून यास संवर्धनाचे पारितोषिक मिळाले. 

Phra Pithak Mansion, 9 Krabi Road  

 

Phra Pithak Chinpracha यानेच Chinpracha हाऊसला लागून हा आणखी एक सुंदर प्रासाद बांधला आहे. हा प्रासाद बांधण्यास दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये सुरुवात झाली आणि १९४० साली याचे बांधकाम पूर्ण झाले. हा प्रासाद लोकांना पाहण्यास खुला नाही. 

फुकेत प्रॉव्हिन्शल हॉल, Surin, Phuket 83000

 

ही सुंदर इमारत  १९१० साली बांधण्यात आली असून तिचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आणि ९९ दरवाज्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

थाई हुआ (Thai Hua) म्युझिअम: 

Opening Hours: Daily from 09:00 – 17:00 

Location: 28 Krabi Road, Phuket Old Town area within walking distance from the famous Soi Romanee and Baan Chinpracha Mansion. Its parking space is open until 17:30 only.  

Tel: +66 (0)76 211 224 

Price Range: 200 baht per person + 200 baht to take photos! 


     

हे म्युझिअम युरोपिअन-साइनो-थाई पद्धतीचे बांधकाम आहे. याचे बांधकाम १९३४ साली पूर्ण झाले. ही थायलंडमधील सर्वांत जुनी शाळा असून तिची स्थापना १९११ साली झाली. १९९० सालच्या उत्तरार्धामध्ये या शाळेचे स्थलांतर झाले. सध्या या वास्तूमध्ये आर्ट गॅलरी आहे.  

 

बान क्लुंग जिंदा (Baan Klung Jinda)

 

ही वास्तू शंभर वर्षे जुनी असून सध्या येथे जुने सयामी खाद्यपदार्थ मिLaणारे उपाहारगृह आहे. ही अद्भुत वास्तू चिनी लष्करामधील एका इसमाने बांधली असून या वास्तूचे बांधकाम पूर्णपणे चिनी पद्धतीचे आहे. येथे ब-याच पुरातन वस्तू आहेत.

फुकेत फिलॅटेलिक म्युझिअम:

 

हे फुकेतमधील सर्वांत जुने डाक आणि तारघर आहे. याचे नूतनीकरण करून येथे फिलॅटेलिक म्युझिअम करण्यात आले आहे. येथे जुनी डाक सामग्री, जुने टेलिफोन्स, तसेच जुने थाई पोस्टाची तिकीटे ठेवण्यात आली आहेत.  


दक्षिण फुकेत

चालोंग : 

चालोंग हा दक्षिण फुकेतमधील उपजिल्हा आहे.  

चालोंग बे: चालोंगचा पूर्व किनारा दलदलयुक्त असल्याने पोहण्यास उपयोगी नाही. पण बोटिंगसाठी उपयोगी आहे. येथे ७२० मीटर्स लांब आणि सात मीटर्स रुंद जेटी आहे. येथे रेस्तराँ, दुकाने भरपूर आहेत. 


वत चालोंग (Wat Chalong):

वत चालोंग फुकेत शहराच्या दक्षिणेस आठ किमी अंतरावर आहे. फुकेतमध्ये एकूण २९ बौद्ध मंदिरे असून वत चालोंग यांमधील सर्वांत मोठे बौद्ध मंदिर आहे. १८७६ साली कथलाच्या खाणकामगारांचे बंड झाले होते. या बंडामध्ये जखमी झालेल्या लोकांवर Luang Pho Chaem आणि Luang Pho Chuang या दोन बौद्ध भिक्खूंनी औषधोपचार केले होते. त्यांची स्मृती म्हणून हे बौद्धमंदिर बांधले आहे.    

केप प्रोम्थेप (Cape Promthep):

प्रोम्थेप केप किंवा लेम प्रोम्थेप (Laem Promthep) हे एका खडकाळ भूशिराचे नाव आहे. हे भूशिर फुकेतच्या ईशान्य दिशेस असून समुद्रामध्ये शिरले आहे. येथून समुद्राचे अतिशय सुंदर ठिकाण असून येथून सूर्यास्ताचेही अतिशय सुंदर दृश्य दिसते. येथे एक टेकडी असून टेकडीवर एक मंदिर आणि दीपगृहसुद्धा आहे. येथून रवाई (Rawai) आणि नैहाम (Naiham) बीच जवळ आहेत.    

फं ङा (Phang Nga)

फं ङा आ प्रांत: फं ङा हा थायलंडच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या पश्चिम दिशेस अंदमान समुद्र तर दक्षिण दिशेस फं ङा बे हा उपसागर आणि फुकेत प्रांत आहे.     

फङ आ बे: मले द्वीपकल्पाचा भाग असणारी दक्षिण थायलंडची मुख्यभूमी आणि फुकेत बेटाच्यामध्ये  असणारा फङ आ बे हा  उपसागर मले सामुद्रधुनीचा भाग आहे. फङ आ बेचे एकूण क्षेत्रफळ ४०० चौकिमी असून येथे एकूण १०० बेटे आहेत. या उपसागरामध्ये जिथे तिथे पाचूसारख्या हिरव्या पाण्यातून काटकोनातून बाहेर आलेले चुनखडीचे उंच खडक ठिकठिकाणी दिसतात. येथील बेटांवर चुनखडीच्या गुहा आढळतात. १९८१ पासून या उपसागराचा मोठा भाग आओ फङ आ बे नॅशनल पार्क म्हणून संरक्षित केला गेला आहे. त्यामुळे या उपसागरातील दुर्मिळ प्राणी आणि  वनस्पती यांना संरक्षण मिळाले आहे.

फं ङा बेमधील चुनखडीचे खडक म्हणजे फार मोठे आश्चर्य आहे. हे खडक पाहून असा प्रश्न पडेल की हे खडक तयार कसे झाले? या खडकांचा इतिहासही रंजक आहे. सुमारे १३ कोटी वर्षांपूर्वी या भागामध्ये मले द्वीपकल्पाची उत्तर सीमा ते उत्तर व्हिएटनाम एवढ्या विस्तृत भागामध्ये पोवळ्याचे खडक होते. हे पोवळे नंतर मृत झाले आणि त्यांमध्ये असणाऱ्या कॅल्साइट किंवा कॅल्शिअम कार्बोनेटच्या अंशामुळे येथे शेकडो मीटर्स जाडीचे खडक तयार झाले.  नंतर  भूगर्भातील हालचालींमुळे हे खडक भूपृष्ठाच्या वर आले. ही क्रिया डोंगर तयार होतात तशी होती. यानंतर साडेसात कोटी वर्षे पाऊस, वारा, समुद्राच्या लाटा, सूर्याची उष्णता, या सर्वांचा परिणाम होऊन या खडकांचे आज दिसणारे स्वरूप तयार झाले आहे. या खडकांमध्ये असणाऱ्या निनिराळ्या रासायनिक पदार्थांवरून त्यांना निरनिराळे रंग प्राप्त झाले आहेत         

फंग आ बे हे फुकेतमधील पर्यटकांचे सर्वांत आवडते आकर्षण आहे. फुकेतहून कारने फंग आ आयलंडला ४५ मिनिटात पोहचता येते. फंग आ बे ला क्रूझने सफर करणे हा आणखी एक वेगळा अनुभव आहे. जेम्स बॉंड आयलंड आणि को Panyee ही  येथील सर्वांत जास्त लोकप्रिय दोन ठिकाणे आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे फुकेतच्या उत्तर टोकाकडून बोटीने सफर करणे. फङ आ बेमधील सर्व बेटांना भेट द्यावयाचे ठरवले तर एक महिना सहज लागेल. येथे अतिशय सुंदर परंतु निर्मनुष्य असे पुष्कळ बीचेस आहेत. येथे स्नॉर्केलिंग आणि डायव्हिंगसाठी उत्तम साइट्स आहेत.     

को पिंग गान/ गन (Ping Gan/Ping Gun) आणि को तापू (Tapoo) /जेम्स बॉंड आयलंड: 

खाओ फिंग कान (Khao Phing Kan) किंवा को खाओ फिंग कान हे बेट फं ङा बेमध्ये फुकेतच्या ईशान्य दिशेस आहे. हे बेट म्हणजे निसर्गाचा एक चमत्कार आहे. हे बेट म्हणजे एक उंच खडक असून यामध्ये अनेक गुहा आहेत. या गुहा पाहणे म्हणजे मजेदार अनुभव आहे. बेटाचा पूर्व किनारा गजबजलेला असून येथे कपड्यांचे, शिंपले आणि लाकडापासून बनवलेल्या सूव्हनिर्सचे आणि इतर वस्तूंचे बरेच स्टॉल्स आहेत.  

या बेटाच्या किनार्‍यापासून ४० मीटर्स अंतरावर २० मीटर्स उंचीचा एक खडक आहे. या खडकास खाओ किंवा को तापू म्हणतात. तापूचा अर्थ थाई भाषेमध्ये ‘खिळा’. को तापू म्हणजे ‘खिळ्याचे बेट’. या उभट खडकाचा वर पसरट आणि खाली निमुळता आकार येथील लोकांना खिळ्यासारखा वाटल्यास नवल नाही. को तापूविषयी एक मजेदार कथा प्रचलित आहे. एकदा एक कोळी फंग आ बेमध्ये मासेमारी करीत होता. मासेमारी करताना बहुतेक वेळा त्याला भरपूर मासळी मिळत असे. परंतु एकदा त्याला मासळी काहीच मिळाली नाही. उलट जाळ्यामध्ये एक गंजलेला खिळा आला. त्या कोळ्याने रागाने तो खिळा पाण्यात फेकून दिला आणि त्याने जाळे पुन्हा पाण्यात टाकले. जाळे ओढून पाहतो तर जाळ्यामध्ये पुन्हा तोच खिळा. कोळ्याने राग येऊन तो खिळा जमिनीचा भाग पाहून त्यात ठोकला. तो खिळा म्हणजेच हा खडक. हा खडक संरक्षित क्षेत्रात असल्यामुळे याच्या फार जवळ जाता येते नाही. तेव्हा याचे निरीक्षण बोटीतून किंवा याच्या जवळ असणाऱ्या  को पिंग गान बेटाच्या किनार्‍यावरून करता येते. हे थायलंडमधील सर्वांत प्रसिद्ध बेट फंग आ बेमध्ये आहे. को तापू आता एवढे प्रसिद्ध झाले आहे की ते फुकेतची ओळख झाले आहे.    

ही बेटे आव फं ङा नॅशनल पार्कचा भाग आहेत. ही बेटे १९७४ साली आलेल्या  ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ या जेम्स बॉंडच्या  चित्रपटामध्ये झळकली होती. तेव्हापासून या बेटांचे नाव ‘जेम्स बॉंड आयलंड’ पडले.  पुष्कळ लोक को तापूस जेम्स बॉंड आयलंड समजतात. प्रत्यक्षात खाव फिंग कान हे जेम्स बॉंड आयलंड आहे.   

द मॅन विथ द गोल्डन गन’ आणि को पिंग गान:

 

बॉंडपटांची परिणामकारकता त्यामधील खलनायकावर अवलंबून असते. यामध्ये खलनायकाचे गुप्त आणि सुसज्ज निवासस्थानही महत्त्वाचे असते. बॉंडला अखेर या गुप्त निवासस्थानामध्ये जाऊन खलनायकाचा शेवट करावा लागतो. या कामी त्याला बहुतेक वेळी एखाद्या सुंदर युवतीची मदत मिळते. ही युवती बऱ्याच वेळा खलनायकाच्या पक्षातील असते. ‘द मॅन विथ द गोल्डन गन’ मध्ये असा खलनायक आहे सोनेरी बंदुकीचा वापर करणारा फ्रॅन्सिस्को स्कॅरामँगा आणि त्याचे निवासस्थान एका अज्ञात बेटावर आहे, जेथे स्कॅरामँगाने सौर शक्तीवर चालणारी संयंत्रे बनविली आहेत. बॉंड अखेर त्याच्या नेहमीच्या शिताफीने स्कॅरामँगाचा खात्मा करतो. चित्रपटास आवश्यक असणाऱ्या  प्रखर उन्हाची  आणि खलनायकाच्या निवासस्थानाच्या  गूढरम्यतेची गरज को पिंग गानने पूर्ण केली आहे.              

Koh Panyee: 


को पनक (Koh Panak) आयलंड: 

       


को पनक हे बेत फुकेत आणि को Side Yi पासून सारख्या अंतरावर आहे. या बेटावर बऱ्याच गुहा आहेत. या गुहा पाहावयाच्या असतील तर वाटाड्यास बरोबर घेणे चांगले.  

हॉन्ग आयलंड: 

      

हॉन्ग आयलंडचा स्टार लाईट किंवा चांदण्यातील प्रवास प्रसिद्ध आहे. येथे नैसर्गिक प्रकाशाचे तीन स्रोत आहेत. त्यामुळे येथे विजेरीची गरज भासणार नाही.

बांगला रोड नाइट लाइफ: 

जुने फुकेत शहर:

सायमन कॅबरे:

बिग बुद्धा: 

थाई बॉक्सिंग: 

वत चालोंग (Chalong): 

उपक्रम  

स्पीडबोटने फाय फाय आयलंडचा दौरा:

फुकेत फँटझिया शो: 

फोर इन वन अर्ध्या दिवसाची सफारी:

फुकेत आयलंड आणि सिटी दौरा:

सी कयाकिंग- हॉंग बाय स्टारलाइट:

व्हाइट वॉटर रॅफ्टिंग: 

ए टी व्ही (ATV) 

फङ् आ बे चा क्रूझने दौरा:    

फुकेतमधील प्रवासकार्यक्रम

दिवस ६ 

कॉ समुईहून विमानाने फुकेतला आगमन.

आल्यावर  रंगीबेरंगी (colourful) मार्केट  मध्ये  फेरफटका  मारून  १९  व्या  शतकातील  साइनो-पोर्तुगीज (Sino-Portuguese) पद्धतीच्या    इमारती  पाहणे. 

संध्याकाळी प्रेक्षणीय फॅण्टझिया शो  पाहणे . 

दिवस ७ 

फङ् आ (Phang Nga) डिस्कव्हरी लँडचा दौरा.

क्रूझने प्रसिद्ध फङ् आ बेला जाणे.

फङ् आ बेमध्ये पाहावयाची ठिकाणे:-

मॅनग्रोव्ह फॉरेस्ट, सागरी गुहा, समुद्रातील चुनखडीचे खडक, जेम्स बॉन्ड आयलंड वगैरे.     

३. परिशिष्टे


BEST LUXURY HOTELS

1. Avista Hideway, Patong Beach, http://www.phuket.com/avista-hideaway-resort-spa/

2. The Naka Island, http://www.phuket.com/naka-island-luxury-collection-resort/

3. Cape Sienna, Kamala Beach, http://www.phuket.com/capesienna/


BEST BOUTIQUE HOTELS

1. SALA Phuket Resort, Mai Khao Beach, http://www.phuket.com/salaphuket/

2. Manathai Resort, Surin Beach, http://www.phuket.com/manathai/

3. Burasari Resort, Patong Beach http://www.phuket.com/burasari/


BEST BEACHSIDE HOTELS

1. Moevenpick Resort & Spa, Karon Beach, http://www.phuket.com/moevenpick/

2. The Surin Phuket, Surin Beach, http://www.phuket.com/the-surin-phuket/

3. The Mangrove Panwa Phuket Resort, Panwa, http://www.phuket.com/the-mangrove-panwa-phuket-resort/


BEST BUDGET HOTELS

1. Deevana Patong Resort & Spa, Patong Beach, http://www.phuket.com/deevana/

2. Safari Beach Hotel, Patong Beach, http://www.phuket.com/safaribeachhotel/

3. Aloha Villa, Patong Beach, http://www.phuket.com/aloha-phuket/



  





Thursday, March 12, 2026

श्रीसाईसच्चरित -अध्याय २१ आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २१         

अनुग्रहकरणं

(ओवीसंख्या १३०)

या अध्यायात काय आहे

एक प्रांताधिकारी सुलक्षण I दुसरे पाटणकर विचक्षण II तिसरे एक वकील विलक्षण I अनुग्रहण तिघांचे एकविंशती’ II ७० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

संतसंगमासाठी ईश्वरी कृपा आवश्यक   

 (अध्यायारंभ- ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (1-17)

वांद्रे गावी इनूस नावाचा मुजावर असताही श्री. दाभोळकर त्याच्या दर्शनाला गेले नाहीत, हा लेखकाचा स्वतःचा अनुभव

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥

गताध्यायांतीं कथानुसंधान । ठाकूरादिकां महापुरुषदर्शन । कैसें झालें तें करावें श्रवण । एकाग्र मन करोनि ॥१॥

काया तया वक्त्याच्या बोलें । श्रवणीं जें पडतां श्रोता न डोले । अंगींचा रोमांचही न हाले । व्यर्थ गेले ते बोल ॥२॥

जया श्रवणीं न श्रोते रिझले । बाष्पगद्नद कंठ न दाटले । नयनीं प्रेमानंदाश्रु न वाहिले । व्यर्थ गेलें तें कथन ॥३॥

वाणी बाबांची मनोहारिणी । उपदेशाची अलौकिक सरणी । जयांची प्रतिपदीं अभिनव करणी । मस्तक चरणीं तयांचे ॥४॥

येता दैव उदयासी I

गांठी न पडे  साधुसंतांशी II

तो जवळ असता उशापाशी I

पापराशीस दिसेना IIII 

या प्रमेयाच्या सिद्धतेसी । नलगे जावें देशीं विदेशीं । मीच माझिया अनुभवासी । श्रोतियांसी कथितों कीं ॥६॥

पीर मौलाना नामें प्रसिद्ध । होते वांद्रें शहरीं सिद्ध । हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध । घेती शुद्ध दर्शन तें ॥७॥

मी ते शहरचा न्यायाधीश । मुजावर (= मुस्लिम साधू, दर्ग्यामध्ये देखभाल करणारा) तयांचा नाम इनूस । पाठ पुरविली रात्रंदिवस । यावया दर्शनास तयानें ॥८॥

हजारों लोक तेथें यावे । किमर्थ आपण तेथें जावें । भीडेभाडेच्या भरीं भरावें । आंचवावें निज लौकिका ॥९॥

ऐसें कांहीं मनीं भावावें । दर्शनास कधींही न जावें । आपणचि आपल्या छायेस भ्यावें । दुर्दैव यावें आडवें ॥१०॥

ऐसीं कित्येक वर्षें गेलीं । तेथूनि पुढें बदली झाली । पुढें जेव्हां ती वेळ आली । शिरडी जोडिली अखंड ॥११॥

तात्पर्य हा संतसमागम । अभाग्यास ना तेथें रिगम । होतां ईश्वरी कृपा हा सुगम । अन्यथा दुर्गम हा योग ॥१२॥

येविषयींची गोड कथा । श्रोतां सादर परिसिजे आतां । या संतांच्या अनादि संस्था । गुह्य व्यवस्था कैशा त्या ॥१३॥

यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥

देश - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥

जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥

तैसाच हा स्वानंदसम्राट । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥

कानडी सत्पुरुषांचे मार्गदर्शन

(मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य - हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (18-72)

वाचिलें ते नाही संपले I पाहिजे ते कृतीत उतरले II

या उपड्या घड्यावर तोय ओतले I तैसे जाहले ते सकळ II ७२ II

एकदा एक बीए झालेले गृहस्थ मामलेदारी मिळाल्यानंतर बेळगावातील वडगाव येथे एका कानडी सत्पुरुषांस भेटतात. त्यांच्याकडे निश्चळदासकृतविचारसागरनावाचा ग्रंथ असतो. ते सत्पुरुष सांगतात की या ग्रंथामुळे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. पुढे तुम्हाला एक महापुरुष भेटतील. हे गृहस्थ पुढे शिर्डीस जातात आणि बाबा त्यांना म्हणतात, ‘ कानडी अप्पाने सांगितले तेवढे येथे सोपे नाही. येथे अनिवार्य अंग झिजवावे लागते.त्या गृहस्थांस खूण पटते की ते महापुरुष म्हणजे बाबाच.

एकदां एक आंग्लविद्याविभूषित । बी. ए. या उपपदानें युक्त । जे हळू हळू मागे क्रमत । झाले नामांकित अधिकारी ॥१८॥

मिळाली पुढें मामलत । वाढतां वाढतां झाले प्रांत । तयांसी साईबाबांचा सांगात । सुदैवें प्राप्त जाहला ॥१९॥

 मामलेदाराच्या नोकरीची वाईट परिस्थिती:

दिसाया ही मामलत बरी । डोंगरी जैसी दुरुनि साजरी । निकट जातां वेढिली काजरीं । मानें परी ती मोठीच ॥२०॥

गेले ते पूर्वील गोड दिवस । जैं होती या अधिकाराची हौस । प्रजाही मानी अधिकारियास । परस्परांस आनंद ॥२१॥

पुसूं नये आतांचे हाल । सुखाची नोकरी गेला तो काळ । आतां जबाबदारीचा सुकाळ । ओला दुकाळ पैशाचा ॥२२॥

पूर्वील मामलतीचा मान । तैसेंच पूर्वील प्रांतासमान । वैभव आतां ये ना दिसून । नोकरी कसून करतांही ॥२३॥

असो तेंही अधिकारसंपादन । अलोट पैका वेंचल्यावांचून । न करितां सतत अभ्यासशीण । इतर कोण करूं शके ॥२४॥

आधीं होऊं लागे बी. ए. । मग तो नगदी कारकून होये । महिना पगार तीस रुपये । मार्गें ऐसिये ती गति ॥२५॥

यथाकाळ घांटावर जावें । जमीनपाणी काम शिकावें । मोजणीदारांमध्यें रहावें । पास व्हावें परीक्षे ॥२६॥

पुढें जेव्हां एकादी असामी । स्वयें जाईल वैकुंठधामीं । करील आपुली जागा रिकामी । पडेल कामीं ती याच्या ॥२७॥

आतां असो हें चर्‍हाट । कशास पाहिजे नुसती वटवट । ऐशा एकास साईंची भेट । झाली ती गोष्ट परिसावी ॥२८॥

***

बेळगांवानिकट देख । ग्राम आहे वडगांव नामक । आलें मोजणीदारांचें पथक  । मुक्काम एक तैं केला ॥२९॥

गांवीं होते एक सत्पुरुष । गेले तयांचे दर्शनास । चरणांवरी ठेविलें शीस । प्रसाद - आशीष पावले ॥३०॥

त्या सत्पुरुषांचे हातांत । होता निश्चळदासकृत । विचारसागरनामक ग्रंथ । जो ते वाचीत तैं होते ॥३१॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

निश्चल दास:

निश्चल दास हे एक प्रसिद्ध भारतीय तत्त्ववेत्ता, संत आणि योगी होते. ते निर्गुण ब्रह्म संकल्पनेचे समर्थक होते आणि त्यांनी वेदांत व योगदर्शनाचा गहन अभ्यास केला होता. त्यांचा जन्म १७व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा १८व्या शतकाच्या प्रारंभी झाला असावा, आणि ते निर्गुण भक्ती परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते प्रामुख्याने हिंदी भाषेत लिहीत असत, आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान सामान्य जनांसाठी समजण्याजोग्या भाषेत मांडले.

विचार सागर ग्रंथ:

"विचार सागर" हा निश्चल दास यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो हिंदीतील एक महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानपर ग्रंथ मानला जातो. यामध्ये त्यांनी अद्वैत वेदांत आणि योगदर्शन यांचे तत्त्वज्ञान अत्यंत सुलभ आणि समन्वयी शैलीत मांडले आहे.

ग्रंथाचा विषय:

1. अद्वैत वेदांत आत्मा, ब्रह्म, मायेला दिलेले स्थान, मोक्षाचे स्वरूप.

2. विवेक-विचार आत्मा व शरीरातील फरक, वास्तव व अवास्तवाची ओळख.

3. योगसाधना मनाच्या स्थैर्यासाठी साधनेचे मार्ग.

4. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय निर्गुण उपासना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा समतोल दृष्टिकोन.

5. साधकासाठी मार्गदर्शन वैराग्य, शम, दम, तितिक्षा इत्यादी साधन चातुष्टयाचा अभ्यास.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढें कांहीं वेळ जातां । येतों म्हणूनि निघूं लागतां । ते साधू जें वदले उल्हासता । तया गृहस्था तें परिसा ॥३२॥

बरे आता आपण यावे I

या ग्रंथाचे अवलोकन करावे II

तेणे तुमचे मनोरथ पुरावे I

असावे हे लक्षात  II . २१, . ३३ II

तुम्ही पुढें निजकार्योद्देशें । जातां जातां उत्तर दिशे । मार्गांत महाभाग्यवशें । महापुरुषासीं दर्शन ॥३४॥

पुढील मार्ग ते दावितील । मनासी निश्चलता ते देतील । तेच मग उपदेशितील । ठसवितील निजबोध ॥३५॥

तेथील मग तें कार्य सरलें । जुन्नरास तेथूनि बदलले । नाणेंघाट चढणें आलें । ओढवलें तें संकट ॥३६॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

नाणेंघाट:

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. 

 

नाणेघाटाची पायथ्यापासूनची उंची दोन हजार फूट आहे. चढही बेताबेताने आहे. धाप लागत नाही. अधेमधे पायऱ्याही आहेत. नाणेघाट ही इतर घाटांप्रमाणे डोंगराच्या कडेनी किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने जाणारी नैसर्गिक वाट नाही. तो डोंगर फोडून तयार केलेला रस्ता आहे. घाटाच्या चढणीची सुरुवात वैशाखरे गावापासून होते. या गावाच्या नावाची व्युत्पत्ती वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांचा थांबा अशी सांगितली जाते. या वाटेशी संबंधित एक दंतकथा आहे. सातवाहन राजाने, कोणता ते नाव माहीत नाही; हा रस्ता बांधण्याचे आवाहन केले ते नाणा किंवा नाना आणि गुणा ह्या दोन भावांनी स्वीकारले. दोघांनी दोन वाटांनी रस्ता बांधायला घेतला. नाणाचा आधी बांधून झाला म्हणून रस्त्याचे नाव नाणेघाट. घाट चढून गेल्यावर दिसणाऱ्या जकातीच्या रांजणामुळे नाणेघाट हे नाव पडले अशीही समजूत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

मार्ग तेथील अति बिकट । रेडयावरूनि चढती घाट । रेडा हाच तदर्थ शकट । आणिला निकट आरूढाया ॥३७॥

होतील पुढें मोठे अधिकारी । मिळतील घोडे गाडया मोटारी । आज तों घ्या रेड्याची हाजिरी । वेळ साजिरी करा कीं ॥३८॥

घाट चढणें अशक्य पायीं । रेडियावीण नाहीं सोई । ऐसी ती नाणेंघाटाची नवलाई । अपूर्वाई वाहनाची ॥३९॥

मग तयांनीं केला विचार । पालणिला रेडा केला तयार । तयावरी चढविलें खोगीर । कष्टें स्वार जाहले ॥४०॥

स्वार खरे पण होती चढण । रेडियासारिखें अपूर्व वाहन । झोंके हिसके खातां जाण । भरली कणकण पाठींत ॥४१॥

असो पुढें हा प्रवास सरला । जुन्नराचा कार्यक्रम पुरला । मग बदलीचा हुकूम झाला । मुक्काम हालला तेथूनि ॥४२॥


कल्याणास झाली बदली । चांदोरकरांची गांठ पडली । साईनाथांची कीर्ति ऐकिली । बुद्धि उदेली दर्शनाची ॥४३॥

दुसरे दिवशीं आली बारी । झाली चांदोरकरांची तयारी । म्हणती चला हो बरोबरी । करूं वारी शिरडीची ॥४४॥

घेऊं बाबांचें दर्शन । करूं उभयतां तयांसी नमन । राहूं तेथें एक दो दिन । येऊं परतोन कल्याणा ॥४५॥

परी तेच दिनीं ठाणें शहरांत । दिवाणीचे अदालतींत । मुकदमा - सुनावणी निर्णीत । त्यागिली सोबत तदर्थ ॥४६॥

नानासाहेब आग्रह करीत । चला हो आहेत बाबा समर्थ । पुरवितील तुमचा दर्शनार्थ  । किंपदार्थ  मुकदमा ॥४७॥

परी हें कैंचें तयांस पटे । तारीख चुकवितां भय वाटे । चुकतील केवीं हेलपट्टे । भालपट्टीं लिहिलेले ॥४८॥

नानासाहेब चांदोरकरें । कथिलीं पूर्वील प्रत्यंतरें । दर्शनकाम धरितां अंतरें । विघ्न तें सरे बाजूला ॥४९॥

परी येईना विश्वास जीवा । करितील काय निजस्वभावा । म्हणती आधीं घोर चुकवावा । निकाल लावावा दाव्याचा ॥५०॥

असो मग ते ठाण्यास गेले । चांदोरकर शिरडीस निघाले । दर्शन घेऊनि परत फिरले । नवल वर्तलें इकडे पैं ॥५१॥

वेळीं जरी हे हजर राहिले । दाव्याचें काम पुढें नेमिलें । चांदोरकरही हातचे गेले । खजील अंतरीं ॥५२॥

विश्वास ठेवितों बरें होतें । चांदोरकर सवें नेते । दर्शनाचें कार्य उरकतें । स्वस्थचित्तें शिरडींत ॥५३॥

दाव्यापरी दावा राहिला । साधुसमागमही अंतरला । उठाउठी निश्चय केला । जावयाला शिरडीस ॥५४॥

न जाणों मी शिरडीस जातां । समयीं नानांची भेट होतां । स्वयें निरवितील साईनाथा । आनंद चित्ता होईल ॥५५॥

शिरडीस नाहीं कोणी परिचित । तेथ मी सर्वथैव अपरिचित । नाना भेटतां होईल उचित । जरी क्वचित योग तो ॥५६॥

ऐसे विचार करीत करीत । बैसले ते अग्निरथांत । दुसरे दिवशीं पावले शिरडींत । नाना तैं अर्थात्‌ नाहींत ॥५७॥

हे जे दिनीं यावया निघाले । नाना ते दिनीं जावया गेले । तेणें हे बहु हताश झाले । अति हिरमुसले मनांत ॥५८॥

असो मग तयांस तेथें भेटले । तयांचे दुसरे स्नेही भले । तयांनीं साईंचें दर्शन करविलें । हेतु पुरविले मनाचे ॥५९॥

दर्शनें पायीं जडलें चित्त । घातला साष्टांग दंडवत । शरीर झालें पुलकांकित । नयनीं स्रवत प्रेमाश्रु ॥६०॥

मग ते होतां क्षणैक स्थित । काय तयांसी बाबा वदत । त्रिकालज्ञ मुख करोनि सस्मित । सावचित्त तें परिसा ॥६१॥

कानडी आप्पाचें तें सांगणें । जैसें रेडिया संगें घाट चढणें । ऐसें न येथील सोपें चालणें । अंग झिजविणें अनिवार्य॥६२॥

कर्णीं पडतां खुणेचीं अक्षरें । अंतरंग अधिकचि गहिंवरे । पूर्वील सत्पुरुषवचन खरें । प्रत्यंतरें ठरलें कीं ॥६३॥

मग जोडूनियां उभय हस्तां । साईपदीं ठेविला माथा । म्हणती कृपा करा साईनाथा । मज अनाथा पदरीं घ्या ॥६४॥

आपणचि माझे महापुरुष । निश्चळदासग्रंथोपदेश । आज मज कळला अशेष । निर्विशेष सुखबोध ॥६५॥

कुठें वडगांव कुठें शिरडी । काय ही सत्पुरुष - महापुरुषजोडी । किती ती स्वल्पाक्षरभाषा उघडी । उपदेश - निरवडी कैसी हे ॥६६॥

एक म्हणती ग्रंथ वाचा । पुढें संगम महापुरुषाचा । मग ते पुढील कर्तव्याचा । उपदेश साचा करतील ॥६७॥

देवयोगें तेही भेटले । तेच ते हे खुणांहीं पटविलें । परी तें एकाचें वाचिलें । दुजिया आचरिलें पाहिजे ॥६८॥

तयांसी म्हणती साईनाथ । अप्पांनीं सांगितलें तें यथार्थ । परी जेव्हां तें येईल कृतींत । पूर्ण मनोरथ तैं होती॥६९॥

निश्चलदास - विचारसागर । वडगांवीं भक्तार्थ झाला उच्चार । काळें ग्रंथपारायणानंतर । शिरडींत आचार कथियेला ॥७०॥

ग्रंथ करावा आधीं श्रवण । त्याचेंच मग करावें मनन । होतां पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे ॥७१॥



वाचिलें तें नाहीं संपलें ।

पाहिजे तें कृतींत उतरलें ।

या उपड्या घडयावर तोय ओतलें ।

तैसें जाहलें तें सकळ ॥७२॥


सौदागर आणि  घोडा

(‘सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (73-104)

नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंतकीर्ती II

नको शुष्क भजनप्रीती I प्रेमळ भक्ती पाहिजे II९८II

एकदा अनंतराव पाटणकर नावाचे गृहस्थ बाबांचे भेटीस येतात. यांनी वेदांचे वाचन केलेले असते परंतु यांच्या मनाला स्थैर्य नसते. ते बाबांना याबद्दल विचारतात. बाबा त्यांना एक गोष्ट सांगतात.एका सौदागरासमोर एक घोडा नऊ लेंड्या टाकतो. सौदागर त्या घट्ट बांधून जवळ ठेवतो.पाटणकर केळकरांना या गोष्टीचा अर्थ विचारतात. केळकर या गोष्टीचा अर्थ सांगतात की घोडा ही ईंश्वरी कृपा. नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती (१. श्रवण २. कीर्तन ३. विष्णुस्मरण ४. चरणसेवन ५. अर्चन ६. वंदन ७. दास्य ८. सख्य ९. आत्मनिवेदन). यांतील एक जरी भक्ती सफल झाली तरी मनाला स्थैर्य येईल. दुस-या दिवशी जाताना बाबा त्यांना विचारतात, ‘पदरी लेंड्या बांधल्यास काय?’ पाटणकर उत्तर देतात, ‘तुमची कृपा असू द्या, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील.

व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन । हातीं न ये जों अनुभवज्ञान । ब्रह्मसंपन्न गुरुकृपेवीण । पुस्तकी ज्ञान निष्फळ ॥७३॥

ये अर्थींची अल्प कथा । दावील भक्तीची यथार्थता । पुरुषार्थाची अत्यावश्यकता । श्रोतां निजस्वार्था परिसिजे ॥७४॥

एकदां एक पुण्यपट्टणकर । नामें अनंतराव पाटणकर । साईदर्शनीं उपजला आदर । आले सत्वर शिर्डीस ॥७५॥

वेदान्त श्रवण जाहला सकळ । सटीक उपनिषदें वाचिलीं समूळ । परी तन्मानस अक्षयीं चंचळ । राहीना तळमळ तयांची ॥७६॥

घेतां साईसमर्थांचें दर्शन । निवाले पाटणकरांचे नयन । करुनि पायांचें अभिवंदन । यथोक्त पूजन संपादिलें ॥७७॥

मग होऊनि बद्धांजुळी । बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी । अनंतराव प्रेमसमेळीं । करुणाबहाळीं पुसत कीं ॥७८॥

केलें विविध ग्रंथावलोकन । वेदवेदांग - उपनिषदध्ययन ॥ केलें सच्छास्त्र - पुराणश्रवण । परी हें निर्विण्ण मन कैसें ॥७९॥

वाचिलें तें व्यर्थ गेलें । ऐसेंच आतां वाटूं लागलें । अक्षरहीन भावार्थी भले । वाटती चांगले मजहून ॥८०॥

वायां गेलें ग्रंथावलोकन । वायां शास्त्रपरिसीलन । व्यर्थ हें सकळ पुस्तकी ज्ञान । अस्वस्थ मन हें जोंवरी ॥८१॥

काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती । किमर्थ महा - वाक्यानुवृत्ती । जेणें न लाधे चित्तास शांति । ब्रह्मसंवित्ति कशाची ॥८२॥

कर्णोपकर्णीं परिसिली वार्ता । साईदर्शनें निवारे चिंता । विनोद गोष्टी वार्ता करितां । सहज सत्पथा लाविती ते ॥८३॥

म्हणवून महाराज तपोराशी । पातलों आपुल्या पायांपासीं । येईल स्थैर्य माझिया मनासी । आशीर्वचनासी द्या ऐशा ॥८४॥

तंव महाराज झाले कथिते । एका विनोदपर आख्यायिकेतें । जेणें अनंतराव समाधानातें । पावले साफल्यते ज्ञानाच्या ॥८५॥

ती अल्पाक्षर परमसार । कथा कथितों व्हा श्रवणतत्पर । विनोद परी तो बोधपर । कोण अनादर करील ॥८६॥

बाबा देत प्रत्युत्तर | 'एकदा एक आला सौदागर || तेव्हा एक घोडें समोर | घाली लेंडार नवांचे || .२३, .८७|| सौदागर निजकार्यतत्पर | लेंडिया पडतां पसरिला पदर || बांधून घेता घट्ट त्या समग्र | चित्तैकाग्र्य लाधला'|| .२३, .८८ ||

हें काय वदले साईसमर्थ । काय असावा कीं मथितार्थ । लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ । कांहींही अर्थ कळेना ॥८९॥

ऐसा विचार करीत करीत । अनंतराव माघारा येत । कथिलें संभाषण इत्थंभूत । केळकरांप्रत तयानें ॥९०॥

म्हणती सौदागर तो कोण । लेंडियांचें काय प्रयोजन । नवांचेंच काय कारण । सांगा उलगडून हें मजला ॥९१॥

दादा हें काय आहे कोडें । मी अल्पबुद्धी मज तें नुलगडे । होईल बाबांचे हृदय उघडें । ऐसें रोकडें मज कथा ॥९२॥

दादा वदती मजही न कळे । ऐसेंच बाबांचें भाषण सगळें । परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळें । कथितों आकळे जें मज ॥९३॥

कृपा ईश्वरी तें हें घोडें । हें तों नवविधा भक्तीचें कोडें । विनाभक्ति न परमेश्वर जोडे । ज्ञाना न आतुडे एकल्या ॥९४॥

श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण । चरणसेवन-अर्चन - वंदन । दास्य - सख्य - आत्मनिवेदन । भक्ति हे जाण नवविधा ॥९५॥

पूर्ण भाव ठेवूनि अंतरीं । यांतून एकही घडली जरी । भावाचा भुकेला श्रीहरी । प्रकटेल घरींच भक्ताच्या ॥९६॥

जपतपव्रत योगसाधन । वेदोपनिषद - परिशीलन । उदंड अध्यात्मज्ञान - निरूपण । भक्तिविहीन तें फोल ॥९७॥

नको वेदशास्त्रव्युत्पत्ती । नको ज्ञानी हे दिगंतकीर्ति । नको शुष्कभजनप्रीती । प्रेमळ भक्ति पाहिजे ॥९८॥

स्वयें आपणा सौदागर समजा । सौद्याच्या या भावार्था उमजा । फडकतां श्रवणादि भक्तीची ध्वजा । ज्ञानराजा उल्हासे ॥९९॥

घोडयानें घातल्या लेंडया नऊ । सौदागर आतुरते धांवत घेऊं । तैसाच नवविधा भक्तिभावु । धरितां विसांवु मनातें ॥१००॥

तेणेंच मनास येईल स्थैर्य । सर्वांठायीं सद्भाव गांभीर्य । त्यावीण चांचल्य हें अनिवार्य । कथिती गुरुवर्य सप्रेम ॥१०१॥

दुसरे दिवशीं अनंतराय । वंदूं जातां साईंचे पाय । पदरीं बांधिल्यास लेंडया कायपृच्छा ही होय तयांस ॥१०२॥

अनंतराव तेव्हां प्रार्थिती । कृपा असावी दीनावरती । सहज मग त्या बांधिल्या जाती । काय ती महती तयांची ॥१०३॥

तंव बाबा आशीर्वाद देती । कल्याण होईलआश्वासिती । अनंतराव आनंदले चित्तीं । सुखसंवित्ति लाधले ॥१०४॥

बाबांच्या निंदापर चर्चेमध्ये वकिलाचा सहभाग

('साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (105-130) 

आतां आणीक अल्प कथा । श्रोतां परिसिजे सादरचित्ता । कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता । सन्मार्गप्रवर्तकता तैसीच ॥१०५॥

एकदां एक वकील आले । येतांक्षणींच मशिदी गेले । साईनाथांचें दर्शन घेतलें । पाय वंदिले तयांचे ॥१०६॥

सवेंच मग देऊन दक्षिणा । बैसले बाजूस वकील तत्क्षणा । तेथें चालल्या साई - संभाषणा । आदर श्रवणा उपजला ॥१०७॥

बाबा तंव तिकडे मुख फिरविती । वकीलांस अनुलक्षून वदती । बोल ते वर्मीं जाऊन खोंचती । वकील पावती अनुताप ॥१०८॥

लोक तरी हो लबाड किती । पायां पडती दक्षिणाही अर्पिती । आणीक आंतून शिव्याही देती । काय चमत्कृती सांगावी॥१०९॥

ऐकून हें वकील स्वस्थ राहिले । कीं ते निजांतरीं पूर्ण उमजले । उद्नार अन्वर्थ हें तयां पटलें । तात्पर्य ठसलें मनासी ॥११०॥

पुढें जेव्हां ते वाडयांत गेले । दीक्षितांलागीं कथिते झाले । कीं जें बाबा लावूनि बोलले । सार्थचि वहिलें तें सर्व ॥१११॥

येतांच मजवर झाडिला ताशेरा । तो मज केवळ दिधला इशारा । कुणाची थट्टानिंदादि प्रकारा । देईं न थारा अंतरीं ॥११२॥

शरीरप्रकृति होऊनि अस्वस्थ । मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त । राहिले रजेवर येथें स्वस्थ । आपुली प्रकृती सुधरावया ॥११३॥

वकीलांच्या खोलींत असतां । मुन्सफांसंबंधें निघाल्या वार्ता । अर्थोअर्थीं संबंध नसतां । ऊहापोहता चालली ॥११४॥

औषधावीण या शरीरापदा । टळतील का लागतां साईंच्या नादा । पावले जे मुन्सफीचे पदा । तयां हा धंदा साजे कां ॥११५॥

ऐसी तयांची निंदा चालतां । चालली साईंची उपहासता । मीही तयांतचि होतों अंशता । तिची अनुचितता दर्शविली ॥११६॥

ताशेरा नव्हे हा अनुग्रह । व्यर्थ कुणाचा ऊहापोह । उपहास - निंदादि कुत्सित संग्रह । असत्परिग्रह वर्जावा ॥११७॥

आणीक एक हें प्रत्यंतर । असतां शंभर कोसाचें अंतर । साई जाणें सर्वाभ्यंतर । खरे अंतर्ज्ञानी ते ॥११८॥

आणिक एक झाला निवाड । असोत मध्यें पर्वत पहाड । कांहीं न साईंच्या दृष्टीआड । गुप्तही उघड त्यां सर्व ॥११९॥

असो पुढें तेव्हांपासुनी । केला निश्चय वकीलांनीं । अत:पर निंदा - दुरुक्तिवचनीं । खडा कानीं लाविला ॥१२०॥

आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची दृष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥१२१॥

उदेली सत्कार्य - जागरूकता । मागें पुढें साईसन्निधता । समर्थ कोण तया वंचिता । निर्धार चित्ता हा ठसला ॥१२२॥

पाहूं जातां या कथेसी । संबंध जरी त्या वकीलासी । तरी ती सर्वार्थी आणि सर्वांसीं । बोधक सर्वांसी सारिखी ॥१२३॥

वकील वक्ते श्रोते समग्र । आणिक साईंचे भक्त इतर । तयांचाही ऐसाच निर्धार । व्हावा मी साचार प्रार्थितों ॥१२४॥

साईकृपामेघ वर्षता I

होईल आपणा सर्वांची तृप्तता II

ये अर्थी काही नाही नवलता I

सकळा तृषार्ता निववील II १२५ II

अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा । अगाध साईचरित्राची सीमा । मूर्त परब्रम्हावतार ॥१२६॥

समारोप

 आतां पुढील अध्यायीं कथा । परिसावी सादर श्रद्धाळू श्रोतां । पुरवील तुमच्या मनोरथा । देईल चित्ता स्थैर्यता ॥१२७॥

भक्तांची भावी संकटावस्था । ठाऊक आधींच साईसमर्था । थट्टामस्करी विनोद वार्ता । हंसतां खेळतां टाळिती ॥१२८॥

भक्तहेमाड साईंस शरण । जाहलें हें कथानक संपूर्ण । पुढील कथेचें अनुसंधान । संकटनिवारण भक्तांचें ॥१२९॥

कैसे साई कृपासागर । भक्तांचीं भावी संकटें दुर्धर । आधीं जाणूनि करिती परिहार । इशारा वेळेवर देउनी ॥१३०॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अनुग्रहकरणंनाम एकविंशोऽध्याय: संपूर्ण" ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...