Sharing knowledge, experiences etc. on all subjects such as travel, literature, spiritualism
Saturday, November 15, 2025
हंटर व्हॅली गार्डनची सफर
Tuesday, November 11, 2025
द मर्चंट ऑफ व्हेनिस-अंक १-प्रवेश १
द मर्चंट ऑफ व्हेनिस
अंक १
प्रवेश १
|
अँटोनिओ |
: |
खरं सांगायचं तर मला आज मानसिक दडपण का आले आहे माझं मलाच कळत नाही. मला त्याचा वीट आला आहे आणि तू म्हणतोस की तुलाही त्याचा वीट आला आहे. पण हे दडपण कशामुळे आले आहे याचा मला उलगडा होत नाही. स्वत:ला जाणणे मला कठीण जात आहे. |
|
सॅलरिनो |
: |
तुम्हाला तुमच्या जहाजांची काळजी लागली आहे. तुमचं मन समुद्रामध्ये त्या जहाजांबरोबर हेलकावे खात आहे. परंतु ती जहाजे सुरक्षित आहेत. ही जहाजे प्रवाहामध्ये बड्या असामी किंवा उमरावांप्रमाणे एखादी भपकेबाज मिरवणूक जावी किंवा समुद्रातील पक्षी पंख फुलवून जावे त्याप्रमाणे जात आहेत आणि इतर छोट्या जहाजांकडे अशा तोऱ्यात पाहत आहेत की ही छोटी जहाजे या मोठ्या जहाजांस निमूटपणे सलाम करून मार्ग मोकळा करून देत आहेत. |
|
सोलॅनिओ |
: |
महाराज, खरं सांगायचं तर माझे जर इतर देशात असे जोखमीचे व्यवसाय असते तर मलासुद्धा असेच मानसिक दडपण आले असते. वारा कसा वाहत आहे ते जाणून घेण्यासाठी मी एकसारखा गवताची पाती उपटून हवेत भिरकावत बसलो असतो. मी एकसारखा नकाशांचे निरीक्षण करून चांगली बंदर, चांगले धक्के तसेच चांगले जलमार्ग शोधत बसलो असतो आणि काही अघटित तर घडणार नाही ना, असा विचार करून माझ्यावरही मानसिक दडपण आले असते. |
|
सॅलरिनो |
: |
सूप थंड करण्यासाठी त्यावर फुंकर मारताना माझ्या मनात विचार आला असता की असाच सोसाट्याचा वारा माझ्या जहाजांची दैना करू शकेल. वाळूच्या घड्याळातील वाळूकडे पाहताना माझ्या मनात विचार येईल की माझी जहाजे वाळूच्या किनाऱ्यावर रुतली तर काय होईल. चर्चमध्ये गेलो तर चर्चच्या बांधकामाचे दगड पाहून माझ्या डोळ्यासमोर समुद्रातील धोकादायक खडक येतील. माझी जहाजे जर अशा खडकांवर आदळली, तर जहाजांमधील सारे मसाल्याचे पदार्थ पाण्यात फेकले जातील. सारे रेशमाचे कापड वाऱ्यावर तरंगत गरजणाऱ्या लाटांना आच्छादून टाकेल. एका क्षणात माझे सारे होत्याचे नव्हते होईल. एका दृष्टीने, मी असा विचार करावा का? आणि अशी दुर्घटना घडली तर मी दु:खी होईन, म्हणून असा विचार मी करू नये का? स्पष्ट आहे. आपल्या जहाजांतील मालाची काळजी वाटत असल्याने अँटोनिओ काळजीत आहे, हे मी जाणून आहे. |
|
अँटोनिओ |
: |
अरे बाबा, असे काही नाही. माझ्या सुदैवाने माझी सारी गुंतवणूक एकाच जहाजामध्ये किंवा एकाच ठिकाणी नाही. या वर्षी काही मोबदला मिळाला नाही तरीसुद्धा मला फरक पडणार नाही. त्यामुळे माझ्या व्यापारातील जोखीम हे काही माझ्या दु:खाचे कारण नाही. |
|
सोलानिओ |
: |
काय सांगता? मग तुम्ही प्रेमात पडला असाल. |
|
अँटोनिओ |
: |
चूप रे ! |
|
सोलॅनिओ |
: |
प्रेमातसुद्धा नाही? मग असं म्हणू या की तुम्ही दु:खी आहात कारण तुम्ही आनंदी नाही. चला तर मग हसा, बागडा आणि सांगा की तुम्ही आनंदात आहात कारण तुम्ही दु:खी नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरं. काही लोक त्यांच्या डोळ्यांच्या खिडक्यांतून सतत डोकावत असतात आणि पोपट बॅगपायपर पक्ष्याकडे पाहून हसतो, त्याप्रमाणे हसत असतात. तर काही लोक एरंडेल प्याल्याप्रमाणे राहून कुणी शपथेवर जरी सांगितले की हसण्यासारखी घटना घडली आहे तरी आपले दात हसण्यासाठीसुद्धा दाखवणार नाहीत. |
|
|
|
(बसॅनिओ, लॉरेन्झो आणि ग्रेश्यानो प्रवेश करतात.) |
|
|
|
हा पहा तुमचा आदरणीय नातलग बसॅनिओ आला आहे. बरोबर लॉरेन्झो आणि ग्रेश्यानोसुद्धा आले आहेत. चला, आम्ही आता तुमचा निरोप घेतो. कारण तुम्हाला आमच्यापेक्षा चांगले सोबती मिळाले आहेत. |
|
सोलॅनिओ |
: |
तुमचे हे आदरणीय मित्र आले नसते तर तुम्हाला आनंदित केल्याशिवाय मी येथून गेलो नसतो. |
|
अँटोनिओ |
: |
बाबांनो, तुम्हीसुद्धा मला तेवढेच प्रिय आहात. तुमचीसुद्धा काही कामे असतील आणि त्यामुळे तुम्हाला जावे लागत आहे असे मी समजतो. |
|
सॅलरिनो |
: |
(बसॅनिओ, लॉरेंझो आणि ग्रेश्यानोला उद्देशून) नमस्कार मंडळी. |
|
बसॅनिओ |
: |
नमस्कार नमस्कार. हास्यविनोद करण्यासाठी पुन्हा कधी भेटू या? मला फक्त कधी ते सांगा. तुम्ही लोक हल्ली जरा चक्रम होत चालला आहात. असं वागणं बरं आहे का? |
|
सॅलरिनो |
: |
असं काही नाही. आपण नक्कीच भेटू या. |
|
|
|
(सॅलरिनो आणि सोलॅनिओ जातात.) |
|
लॉरेंझो |
: |
बसॅनिओ, आता तुला अँटोनिओ भेटला आहे, तेव्हा आम्ही दोघेसुद्धा निघतो. परंतु रात्री आपण जेवावयास भेटणार आहो, हे विसरू नको. |
|
बसॅनिओ |
: |
नाही विसरणार. |
|
ग्रेश्यानो |
: |
अँटोनिओ, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. तुम्ही जगाची फार चिंता करता बुवा. जे लोक एखादी गोष्ट विकत घेताना फार विचार करतात, ते ती निश्चित गमावून बसतात. मी नक्की सांगतो, तुमच्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे. |
|
अँटोनिओ |
: |
जग जसे आहे तसेच मी मानतो, ग्रेश्यानो. माझ्या दृष्टीने जग म्हणजे एक रंगभूमी आहे जेथे प्रत्येक माणसाला आपली भूमिका बजावायची आहे. माझ्या वाट्याला मात्र दु:खी भूमिका आली आहे. |
|
ग्रेश्यानो |
: |
असे असेल तर मी विदुषकाची भूमिका बजावतो. माझ्या चेहऱ्यावर वृद्ध माणसासारख्या सुरकुत्या पडू देत, परंतु हास्यविनोदाने. माझे हृदय असह्य वेदनांनी थंड पडण्यापेक्षा माझे पित्ताशय मद्याने उष्ण होणे केव्हाही चांगले. ज्या मनुष्याच्या रक्तात ऊब आहे त्याने उगीच दगडात कोरलेल्या आपल्या आज्याच्या मूर्तीसारखे का मख्ख बसून राहावे? त्याने जाग आल्यावर झोपी का जावे आणि सदैव चिंताग्रस्त राहून कावीळ का ओढवून घ्यावी? अँटोनिओ, माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि मी हे तुमच्यावरील प्रेमापोटी बोलत आहे. माझे ऐका, असे लोक असतात की जे चेहऱ्यावर असा काही मुखवटा धारण करतात की त्यांचे तोंड नेहमी साचलेल्या डबक्याप्रमाणे मख्ख दिसते. हे लोक आपण फार ज्ञानी असल्याचा आव आणतात आणि कायम गंभीर चेहऱ्याने वावरतात. त्यांची बोलण्याची ढब अशी असते की, मी बृहस्पती आहे, मी बोलताना कुत्र्यानेसुद्धा भुंकता कामा नये. असे बरेच लोक मला माहीत आहेत अँटोनिओ. ते मुळीच बोलत नाहीत, त्यामुळे त्यांना हुशार समजतात. माझी खात्री आहे, या लोकांनी बोलण्यासाठी तोंड उघडले तर ते किती मूर्ख आहेत ते सर्वांना समजेल. मी पुन्हा कधीतरी या विषयावर आणखी बोलेन. तोपर्यंत जरा हसा. उगीच उदास होऊन बसू नका. हे झालं माझं मत. परंतु मीही शेवटी बुद्दूच आहे. चल लॉरेंझो, आपण निघू या. आम्हाला निरोप द्या. माझे भाषण मी रात्रीच्या जेवणानंतर पूर्ण करीन. |
|
लॉरेंझो |
: |
ठीक आहे, चला. आपण आता रात्री जेवणाच्या वेळी भेटू या. ग्रेश्यानो आता ज्या हुशार माणसांबद्दल बोलत होता, त्यांपैकी एक मला झाले पाहिजे. कारण ग्रेश्यानो मला मुळी बोलूच देत नाही. |
|
ग्रेश्यानो |
: |
अगदी बरोबर. दोनेक वर्षे माझ्याबरोबर राहा आणि तुम्हाला स्वत:चाच आवाज ओळखू येणार नाही. |
|
अँटोनिओ |
: |
चला भेटू आता, तुझा हा उपदेशाचा डोस घेऊन मी आता थोडा जास्त बोलेन. |
|
ग्रेश्यानो |
: |
शांतता फक्त गाईच्या जिभेला (गाईच्या जिभेपासून बनविलेला पदार्थ) आणि लग्नासाठी उपवर झालेल्या कुमारिकेला शोभते (कारण तिने न बोलणे अभिप्रेत असते). |
|
|
|
(ग्रेश्यानो आणि लॉरेंझो जातात.) |
|
अँटोनिओ |
: |
तुझं काय म्हणणं आहे यावर? (ग्रेश्यानोच्या उपदेशाबद्दल). |
|
बसॅनिओ |
: |
क्षुल्लक कारणासाठी अफाट बडबड करणारा ग्रेश्यानोसारखा माणूस साऱ्या व्हेनिसमध्ये शोधून सापडणार नाही. त्याच्या बोलण्यातून अर्थ शोधून काढणे म्हणजे दोन पिंपे भरून फोलपटांतून गव्हाचे दोन दाणे शोधून काढण्यासारखे आहे आणि शोधून काढल्यानंतर तुम्हाला कळेल की हा शोध काही उपयोगाचा नव्हता. |
|
अँटोनिओ |
: |
बरं ते जाऊ दे. आता मला त्या मुलीबद्दल सांग जिच्यासाठी तू खास सफरीवर जाणार आहेस. तू मला सांगण्याचं कबूल केलं होतंस. |
|
बसॅनिओ |
: |
अँटोनिओ, माझी आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे, तुला चांगलंच माहीत आहे. या साऱ्याला कारण मी माझ्या ऐपतीच्या बाहेर जाऊन केलेला खर्च. त्यामुळे त्याबद्दल मी तक्रार करू शकत नाही. चैनीचे आयुष्य जगण्यासाठी मी जी काही कर्जे काढली आहेत, त्यांचा आता डोंगर झाला आहे. मला या कर्जांतून आता सन्मानाने बाहेर पडायचे आहे. मी पैसा आणि प्रेम या दोन्हींमध्ये तुझा ऋणाईत आहे. तुझ्या प्रेमामध्येच माझ्या सर्व ऋणांतून मुक्त होण्याची हमी आहे असे मी मानतो. |
|
अँटोनिओ |
: |
तुझी काय योजना आहे ते तरी सांग. ही योजना सन्मानाच्या कसोटीवर टिकण्यासारखी असेल जसा तू अजून टिकून आहेस, तर व्यक्तिश: मी, माझी पैशाची थैली आणि माझा जो काही पैसाअडका असेल तो तुझ्यासाठी मुक्तपणे उपलब्ध आहे. |
|
बसॅनिओ |
: |
फार पूर्वी मी शाळकरी विद्यार्थी असताना माझे एक अजब तंत्र होते. खेळताना मी सोडलेला एखादा बाण हरवला तर मी त्याच दिशेने तितक्याच वेगाने दुसरा बाण सोडत असे आणि बऱ्याचदा हा दुसरा बाण शोधताना मला दोन्ही बाण सापडत असत. माझा आतासुद्धा या तंत्रावर विश्वास आहे. कारण याचा परिणाम केवळ विश्वासावर आधारित आहे. तू मला बरेच पैसे उसने दिले आहेत आणि एखाद्या बिघडलेल्या मुलाप्रमाणे मी ते सर्व गमावून बसलो आहे. परंतु तू जर पहिला बाण सोडला त्याच दिशेने दुसरा बाण सोडण्यास तयार असशील तर मी निश्चित लक्ष्यावर दृष्टी ठेवून राहीन आणि कदाचित मला दोन्ही बाण सापडतील. तसे झाले नाही तर मला दुसरा बाण निश्चितच सापडेल आणि माझे सध्याचे ऋण आहे तसेच राहील. |
|
अँटोनिओ |
: |
बसॅनिओ , तू मला चांगला ओळखतोस आणि तरी हे सर्व सांगून तू माझ्या प्रेमाविषयी एक प्रकारे अविश्वास दाखवीत आहेस. यापेक्षा मी माझे सर्वस्व गमावले असते तर ते मला परवडले असते. तू मला फक्त सांग की मी काय करायला हवे आणि मी ते केलेच म्हणून समज. चल, काय ते सांगून टाक. |
|
बसॅनिओ |
: |
ठीक, सांगतो तर. बेल्मॉंट गावी एक मुलगी आहे. तिला वडिलोपार्जित पुष्कळ संपत्ती मिळाली आहे. ती अतिशय सुंदर आहे आणि सुंदर या शब्दापेक्षा सुंदर असे तिचे गुण आहेत. मी पूर्वी तिच्याकडे गेलो असताना तिच्या डोळ्यांतून मला नि:शब्द अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. तिचे नाव पोर्शिया आहे. केटोची मुलगी आणि ब्रूटसची पत्नी म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या पोर्शियापेक्षा ती कुठल्याही बाबतींत यत्किंचितही कमी नाही. तिची योग्यता सारे जग जाणून आहे आणि चहुबाजूंनी ख्यातनाम असे युवक तिच्याशी विवाह करण्याच्या इच्छेने येत आहेत. तिच्या कानांवर रुळणाऱ्या सोनेरी केसांच्या बटा पाहून जेसन हा राजपुत्र जसा सोनेरी कातडीच्या शोधात आला होता त्याप्रमाणे बरेच राजपुत्र बेल्मॉंटच्या किनाऱ्यावर दाखल होत आहेत. प्रिय अँटोनिओ, त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याची माझी जर ऐपत असती तर मी स्वत:ला फार नशीबवान समजलो असतो. |
|
अँटोनिओ |
: |
तुला चांगले माझे माहीत आहे की माझे सारे नशीब सागरस्थ आहे. माझ्याकडे तेवढा पैसा नाही की पैसा उभा करता येईल अशी मालमत्ताही जवळ नाही. पण मी तुला सांगू शकतो की, माझी व्हेनिसमध्ये जी पत आहे तिचा जास्तीत जास्त वापर करून पोर्शियापर्यंत पोहचता येईल एवढा पैसा तू निश्चित उभा करू शकशील. तेव्हा पैसा उभा करण्यासाठी तूही प्रयत्न कर आणि मीही प्रयत्न करतो. माझी खात्री आहे की मी तेवढा पैसा कर्ज म्हणून किंवा माझ्यावर मेहरबानी म्हणून तरी मिळवू शकेन. |
सुवचने, म्हणी, वाक्प्रचार :
Gratiano: They lose it that do buy it with much care.
Two grains of wheat hid in two bushels of chaff: गवताच्या भाऱ्यात सुई शोधणे, चार आण्याची कोंबडी दहा रुपयाचा मसाला.
Thursday, November 6, 2025
पर्यटकांसाठी मार्गदर्शन
२. पाणी भरपूर प्यावे.
३. उन्हामध्ये फिरताना हॅट किंवा कॅप घालावी.
४. येथे अनोळखी पर्यटकांस फसवण्याचे प्रकार बरेच होतात. त्यामुळे अनोळखी लोकांपासून सावध राहावे.
China Trip
DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...
-
आपण अलिकडे हवामानातील बदल, पर्यावरणाचे रक्षण वगैरे विषयांबद्दल बरेच वाचतो आणि ऐकतो. पर्यावरणाचे रक्षण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे ...
-
ऑक्टोबर-नोव्हेंबर पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमसचे वातावरण सुरू होते. आमची सून मनाली हिने हंटर्स व्हॅली गार्डनमध्ये ख्रिसमस ला...
-
थायलंड (पूर्वीचे नाव : सयाम) हा आग्नेय आशियातील सुंदर देश आहे. येथे आधुनिक प्रगती आणि प्राचीन संस्कृती यांचा सुंदर संगम ...