Thursday, March 12, 2026

श्रीसाईसच्चरित -अध्याय २१ आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २१         

अनुग्रहकरणं

(ओवीसंख्या १३०)

या अध्यायात काय आहे

एक प्रांताधिकारी सुलक्षण I दुसरे पाटणकर विचक्षण II तिसरे एक वकील विलक्षण I अनुग्रहण तिघांचे एकविंशती’ II ७० II

                                                            अध्याय ५३(अवतरणिका)

*      अध्यायारंभ - ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (-१७)

*      मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य- हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (१८-७२)

*      सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (७३-१०४)

*      'साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (१०५-१३०)

संतसंगमासाठी ईश्वरी कृपा आवश्यक   

 (अध्यायारंभ- ईश्वरी कृपा झाल्याशिवाय संतसमागमाचा योग येत नाही (1-17)

वांद्रे गावी इनूस नावाचा मुजावर असताही श्री. दाभोळकर त्याच्या दर्शनाला गेले नाहीत, हा लेखकाचा स्वतःचा अनुभव

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥

गताध्यायांतीं कथानुसंधान । ठाकूरादिकां महापुरुषदर्शन । कैसें झालें तें करावें श्रवण । एकाग्र मन करोनि ॥१॥

काया तया वक्त्याच्या बोलें । श्रवणीं जें पडतां श्रोता न डोले । अंगींचा रोमांचही न हाले । व्यर्थ गेले ते बोल ॥२॥

जया श्रवणीं न श्रोते रिझले । बाष्पगद्नद कंठ न दाटले । नयनीं प्रेमानंदाश्रु न वाहिले । व्यर्थ गेलें तें कथन ॥३॥

वाणी बाबांची मनोहारिणी । उपदेशाची अलौकिक सरणी । जयांची प्रतिपदीं अभिनव करणी । मस्तक चरणीं तयांचे ॥४॥

येता दैव उदयासी I

गांठी न पडे  साधुसंतांशी II

तो जवळ असता उशापाशी I

पापराशीस दिसेना IIII 

या प्रमेयाच्या सिद्धतेसी । नलगे जावें देशीं विदेशीं । मीच माझिया अनुभवासी । श्रोतियांसी कथितों कीं ॥६॥

पीर मौलाना नामें प्रसिद्ध । होते वांद्रें शहरीं सिद्ध । हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध । घेती शुद्ध दर्शन तें ॥७॥

मी ते शहरचा न्यायाधीश । मुजावर (= मुस्लिम साधू, दर्ग्यामध्ये देखभाल करणारा) तयांचा नाम इनूस । पाठ पुरविली रात्रंदिवस । यावया दर्शनास तयानें ॥८॥

हजारों लोक तेथें यावे । किमर्थ आपण तेथें जावें । भीडेभाडेच्या भरीं भरावें । आंचवावें निज लौकिका ॥९॥

ऐसें कांहीं मनीं भावावें । दर्शनास कधींही न जावें । आपणचि आपल्या छायेस भ्यावें । दुर्दैव यावें आडवें ॥१०॥

ऐसीं कित्येक वर्षें गेलीं । तेथूनि पुढें बदली झाली । पुढें जेव्हां ती वेळ आली । शिरडी जोडिली अखंड ॥११॥

तात्पर्य हा संतसमागम । अभाग्यास ना तेथें रिगम । होतां ईश्वरी कृपा हा सुगम । अन्यथा दुर्गम हा योग ॥१२॥

येविषयींची गोड कथा । श्रोतां सादर परिसिजे आतां । या संतांच्या अनादि संस्था । गुह्य व्यवस्था कैशा त्या ॥१३॥

यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥

देश - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥

जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥

तैसाच हा स्वानंदसम्राट । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥

कानडी सत्पुरुषांचे मार्गदर्शन

(मामलेदार गृहस्थांस कानडी सत्पुरुषांची भेट आणि पुढे बाबांकडून मार्गदर्शन होण्याविषयी भाष्य - हे कानडी सत्पुरुष निश्चळदासांचा 'विचारसागर' ग्रंथ वाचत असतात - रेड्यावरून नाणेघाट चढण्याची गोष्ट (18-72)

वाचिलें ते नाही संपले I पाहिजे ते कृतीत उतरले II

या उपड्या घड्यावर तोय ओतले I तैसे जाहले ते सकळ II ७२ II

एकदा एक बीए झालेले गृहस्थ मामलेदारी मिळाल्यानंतर बेळगावातील वडगाव येथे एका कानडी सत्पुरुषांस भेटतात. त्यांच्याकडे निश्चळदासकृतविचारसागरनावाचा ग्रंथ असतो. ते सत्पुरुष सांगतात की या ग्रंथामुळे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. पुढे तुम्हाला एक महापुरुष भेटतील. हे गृहस्थ पुढे शिर्डीस जातात आणि बाबा त्यांना म्हणतात, ‘ कानडी अप्पाने सांगितले तेवढे येथे सोपे नाही. येथे अनिवार्य अंग झिजवावे लागते.त्या गृहस्थांस खूण पटते की ते महापुरुष म्हणजे बाबाच.

एकदां एक आंग्लविद्याविभूषित । बी. ए. या उपपदानें युक्त । जे हळू हळू मागे क्रमत । झाले नामांकित अधिकारी ॥१८॥

मिळाली पुढें मामलत । वाढतां वाढतां झाले प्रांत । तयांसी साईबाबांचा सांगात । सुदैवें प्राप्त जाहला ॥१९॥

 मामलेदाराच्या नोकरीची वाईट परिस्थिती:

दिसाया ही मामलत बरी । डोंगरी जैसी दुरुनि साजरी । निकट जातां वेढिली काजरीं । मानें परी ती मोठीच ॥२०॥

गेले ते पूर्वील गोड दिवस । जैं होती या अधिकाराची हौस । प्रजाही मानी अधिकारियास । परस्परांस आनंद ॥२१॥

पुसूं नये आतांचे हाल । सुखाची नोकरी गेला तो काळ । आतां जबाबदारीचा सुकाळ । ओला दुकाळ पैशाचा ॥२२॥

पूर्वील मामलतीचा मान । तैसेंच पूर्वील प्रांतासमान । वैभव आतां ये ना दिसून । नोकरी कसून करतांही ॥२३॥

असो तेंही अधिकारसंपादन । अलोट पैका वेंचल्यावांचून । न करितां सतत अभ्यासशीण । इतर कोण करूं शके ॥२४॥

आधीं होऊं लागे बी. ए. । मग तो नगदी कारकून होये । महिना पगार तीस रुपये । मार्गें ऐसिये ती गति ॥२५॥

यथाकाळ घांटावर जावें । जमीनपाणी काम शिकावें । मोजणीदारांमध्यें रहावें । पास व्हावें परीक्षे ॥२६॥

पुढें जेव्हां एकादी असामी । स्वयें जाईल वैकुंठधामीं । करील आपुली जागा रिकामी । पडेल कामीं ती याच्या ॥२७॥

आतां असो हें चर्‍हाट । कशास पाहिजे नुसती वटवट । ऐशा एकास साईंची भेट । झाली ती गोष्ट परिसावी ॥२८॥

***

बेळगांवानिकट देख । ग्राम आहे वडगांव नामक । आलें मोजणीदारांचें पथक  । मुक्काम एक तैं केला ॥२९॥

गांवीं होते एक सत्पुरुष । गेले तयांचे दर्शनास । चरणांवरी ठेविलें शीस । प्रसाद - आशीष पावले ॥३०॥

त्या सत्पुरुषांचे हातांत । होता निश्चळदासकृत । विचारसागरनामक ग्रंथ । जो ते वाचीत तैं होते ॥३१॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

निश्चल दास:

निश्चल दास हे एक प्रसिद्ध भारतीय तत्त्ववेत्ता, संत आणि योगी होते. ते निर्गुण ब्रह्म संकल्पनेचे समर्थक होते आणि त्यांनी वेदांत व योगदर्शनाचा गहन अभ्यास केला होता. त्यांचा जन्म १७व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा १८व्या शतकाच्या प्रारंभी झाला असावा, आणि ते निर्गुण भक्ती परंपरेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातात. ते प्रामुख्याने हिंदी भाषेत लिहीत असत, आणि त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान सामान्य जनांसाठी समजण्याजोग्या भाषेत मांडले.

विचार सागर ग्रंथ:

"विचार सागर" हा निश्चल दास यांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो हिंदीतील एक महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानपर ग्रंथ मानला जातो. यामध्ये त्यांनी अद्वैत वेदांत आणि योगदर्शन यांचे तत्त्वज्ञान अत्यंत सुलभ आणि समन्वयी शैलीत मांडले आहे.

ग्रंथाचा विषय:

1. अद्वैत वेदांत आत्मा, ब्रह्म, मायेला दिलेले स्थान, मोक्षाचे स्वरूप.

2. विवेक-विचार आत्मा व शरीरातील फरक, वास्तव व अवास्तवाची ओळख.

3. योगसाधना मनाच्या स्थैर्यासाठी साधनेचे मार्ग.

4. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय निर्गुण उपासना, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यांचा समतोल दृष्टिकोन.

5. साधकासाठी मार्गदर्शन वैराग्य, शम, दम, तितिक्षा इत्यादी साधन चातुष्टयाचा अभ्यास.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढें कांहीं वेळ जातां । येतों म्हणूनि निघूं लागतां । ते साधू जें वदले उल्हासता । तया गृहस्था तें परिसा ॥३२॥

बरे आता आपण यावे I

या ग्रंथाचे अवलोकन करावे II

तेणे तुमचे मनोरथ पुरावे I

असावे हे लक्षात  II . २१, . ३३ II

तुम्ही पुढें निजकार्योद्देशें । जातां जातां उत्तर दिशे । मार्गांत महाभाग्यवशें । महापुरुषासीं दर्शन ॥३४॥

पुढील मार्ग ते दावितील । मनासी निश्चलता ते देतील । तेच मग उपदेशितील । ठसवितील निजबोध ॥३५॥

तेथील मग तें कार्य सरलें । जुन्नरास तेथूनि बदलले । नाणेंघाट चढणें आलें । ओढवलें तें संकट ॥३६॥

----------------------------------------------------------------------------------------------------------------

नाणेंघाट:

नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. 

 

नाणेघाटाची पायथ्यापासूनची उंची दोन हजार फूट आहे. चढही बेताबेताने आहे. धाप लागत नाही. अधेमधे पायऱ्याही आहेत. नाणेघाट ही इतर घाटांप्रमाणे डोंगराच्या कडेनी किंवा नदीच्या प्रवाहाच्या बाजूने जाणारी नैसर्गिक वाट नाही. तो डोंगर फोडून तयार केलेला रस्ता आहे. घाटाच्या चढणीची सुरुवात वैशाखरे गावापासून होते. या गावाच्या नावाची व्युत्पत्ती वैश्यगृह म्हणजे व्यापाऱ्यांचा थांबा अशी सांगितली जाते. या वाटेशी संबंधित एक दंतकथा आहे. सातवाहन राजाने, कोणता ते नाव माहीत नाही; हा रस्ता बांधण्याचे आवाहन केले ते नाणा किंवा नाना आणि गुणा ह्या दोन भावांनी स्वीकारले. दोघांनी दोन वाटांनी रस्ता बांधायला घेतला. नाणाचा आधी बांधून झाला म्हणून रस्त्याचे नाव नाणेघाट. घाट चढून गेल्यावर दिसणाऱ्या जकातीच्या रांजणामुळे नाणेघाट हे नाव पडले अशीही समजूत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

मार्ग तेथील अति बिकट । रेडयावरूनि चढती घाट । रेडा हाच तदर्थ शकट । आणिला निकट आरूढाया ॥३७॥

होतील पुढें मोठे अधिकारी । मिळतील घोडे गाडया मोटारी । आज तों घ्या रेड्याची हाजिरी । वेळ साजिरी करा कीं ॥३८॥

घाट चढणें अशक्य पायीं । रेडियावीण नाहीं सोई । ऐसी ती नाणेंघाटाची नवलाई । अपूर्वाई वाहनाची ॥३९॥

मग तयांनीं केला विचार । पालणिला रेडा केला तयार । तयावरी चढविलें खोगीर । कष्टें स्वार जाहले ॥४०॥

स्वार खरे पण होती चढण । रेडियासारिखें अपूर्व वाहन । झोंके हिसके खातां जाण । भरली कणकण पाठींत ॥४१॥

असो पुढें हा प्रवास सरला । जुन्नराचा कार्यक्रम पुरला । मग बदलीचा हुकूम झाला । मुक्काम हालला तेथूनि ॥४२॥


कल्याणास झाली बदली । चांदोरकरांची गांठ पडली । साईनाथांची कीर्ति ऐकिली । बुद्धि उदेली दर्शनाची ॥४३॥

दुसरे दिवशीं आली बारी । झाली चांदोरकरांची तयारी । म्हणती चला हो बरोबरी । करूं वारी शिरडीची ॥४४॥

घेऊं बाबांचें दर्शन । करूं उभयतां तयांसी नमन । राहूं तेथें एक दो दिन । येऊं परतोन कल्याणा ॥४५॥

परी तेच दिनीं ठाणें शहरांत । दिवाणीचे अदालतींत । मुकदमा - सुनावणी निर्णीत । त्यागिली सोबत तदर्थ ॥४६॥

नानासाहेब आग्रह करीत । चला हो आहेत बाबा समर्थ । पुरवितील तुमचा दर्शनार्थ  । किंपदार्थ  मुकदमा ॥४७॥

परी हें कैंचें तयांस पटे । तारीख चुकवितां भय वाटे । चुकतील केवीं हेलपट्टे । भालपट्टीं लिहिलेले ॥४८॥

नानासाहेब चांदोरकरें । कथिलीं पूर्वील प्रत्यंतरें । दर्शनकाम धरितां अंतरें । विघ्न तें सरे बाजूला ॥४९॥

परी येईना विश्वास जीवा । करितील काय निजस्वभावा । म्हणती आधीं घोर चुकवावा । निकाल लावावा दाव्याचा ॥५०॥

असो मग ते ठाण्यास गेले । चांदोरकर शिरडीस निघाले । दर्शन घेऊनि परत फिरले । नवल वर्तलें इकडे पैं ॥५१॥

वेळीं जरी हे हजर राहिले । दाव्याचें काम पुढें नेमिलें । चांदोरकरही हातचे गेले । खजील अंतरीं ॥५२॥

विश्वास ठेवितों बरें होतें । चांदोरकर सवें नेते । दर्शनाचें कार्य उरकतें । स्वस्थचित्तें शिरडींत ॥५३॥

दाव्यापरी दावा राहिला । साधुसमागमही अंतरला । उठाउठी निश्चय केला । जावयाला शिरडीस ॥५४॥

न जाणों मी शिरडीस जातां । समयीं नानांची भेट होतां । स्वयें निरवितील साईनाथा । आनंद चित्ता होईल ॥५५॥

शिरडीस नाहीं कोणी परिचित । तेथ मी सर्वथैव अपरिचित । नाना भेटतां होईल उचित । जरी क्वचित योग तो ॥५६॥

ऐसे विचार करीत करीत । बैसले ते अग्निरथांत । दुसरे दिवशीं पावले शिरडींत । नाना तैं अर्थात्‌ नाहींत ॥५७॥

हे जे दिनीं यावया निघाले । नाना ते दिनीं जावया गेले । तेणें हे बहु हताश झाले । अति हिरमुसले मनांत ॥५८॥

असो मग तयांस तेथें भेटले । तयांचे दुसरे स्नेही भले । तयांनीं साईंचें दर्शन करविलें । हेतु पुरविले मनाचे ॥५९॥

दर्शनें पायीं जडलें चित्त । घातला साष्टांग दंडवत । शरीर झालें पुलकांकित । नयनीं स्रवत प्रेमाश्रु ॥६०॥

मग ते होतां क्षणैक स्थित । काय तयांसी बाबा वदत । त्रिकालज्ञ मुख करोनि सस्मित । सावचित्त तें परिसा ॥६१॥

कानडी आप्पाचें तें सांगणें । जैसें रेडिया संगें घाट चढणें । ऐसें न येथील सोपें चालणें । अंग झिजविणें अनिवार्य॥६२॥

कर्णीं पडतां खुणेचीं अक्षरें । अंतरंग अधिकचि गहिंवरे । पूर्वील सत्पुरुषवचन खरें । प्रत्यंतरें ठरलें कीं ॥६३॥

मग जोडूनियां उभय हस्तां । साईपदीं ठेविला माथा । म्हणती कृपा करा साईनाथा । मज अनाथा पदरीं घ्या ॥६४॥

आपणचि माझे महापुरुष । निश्चळदासग्रंथोपदेश । आज मज कळला अशेष । निर्विशेष सुखबोध ॥६५॥

कुठें वडगांव कुठें शिरडी । काय ही सत्पुरुष - महापुरुषजोडी । किती ती स्वल्पाक्षरभाषा उघडी । उपदेश - निरवडी कैसी हे ॥६६॥

एक म्हणती ग्रंथ वाचा । पुढें संगम महापुरुषाचा । मग ते पुढील कर्तव्याचा । उपदेश साचा करतील ॥६७॥

देवयोगें तेही भेटले । तेच ते हे खुणांहीं पटविलें । परी तें एकाचें वाचिलें । दुजिया आचरिलें पाहिजे ॥६८॥

तयांसी म्हणती साईनाथ । अप्पांनीं सांगितलें तें यथार्थ । परी जेव्हां तें येईल कृतींत । पूर्ण मनोरथ तैं होती॥६९॥

निश्चलदास - विचारसागर । वडगांवीं भक्तार्थ झाला उच्चार । काळें ग्रंथपारायणानंतर । शिरडींत आचार कथियेला ॥७०॥

ग्रंथ करावा आधीं श्रवण । त्याचेंच मग करावें मनन । होतां पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे ॥७१॥



वाचिलें तें नाहीं संपलें ।

पाहिजे तें कृतींत उतरलें ।

या उपड्या घडयावर तोय ओतलें ।

तैसें जाहलें तें सकळ ॥७२॥


सौदागर आणि  घोडा

(‘सौदागराच्या घोड्याने नऊ लेंड्या टाकण्याचीगोष्ट सांगून बाबा अनंत पाटणकरांना नवविधा भक्तीविषयी मार्गदर्शन करतात (73-104)

नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंतकीर्ती II

नको शुष्क भजनप्रीती I प्रेमळ भक्ती पाहिजे II९८II

एकदा अनंतराव पाटणकर नावाचे गृहस्थ बाबांचे भेटीस येतात. यांनी वेदांचे वाचन केलेले असते परंतु यांच्या मनाला स्थैर्य नसते. ते बाबांना याबद्दल विचारतात. बाबा त्यांना एक गोष्ट सांगतात.एका सौदागरासमोर एक घोडा नऊ लेंड्या टाकतो. सौदागर त्या घट्ट बांधून जवळ ठेवतो.पाटणकर केळकरांना या गोष्टीचा अर्थ विचारतात. केळकर या गोष्टीचा अर्थ सांगतात की घोडा ही ईंश्वरी कृपा. नऊ लेंड्या म्हणजे नवविधा भक्ती (१. श्रवण २. कीर्तन ३. विष्णुस्मरण ४. चरणसेवन ५. अर्चन ६. वंदन ७. दास्य ८. सख्य ९. आत्मनिवेदन). यांतील एक जरी भक्ती सफल झाली तरी मनाला स्थैर्य येईल. दुस-या दिवशी जाताना बाबा त्यांना विचारतात, ‘पदरी लेंड्या बांधल्यास काय?’ पाटणकर उत्तर देतात, ‘तुमची कृपा असू द्या, म्हणजे त्या सहज बांधल्या जातील.

व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन । हातीं न ये जों अनुभवज्ञान । ब्रह्मसंपन्न गुरुकृपेवीण । पुस्तकी ज्ञान निष्फळ ॥७३॥

ये अर्थींची अल्प कथा । दावील भक्तीची यथार्थता । पुरुषार्थाची अत्यावश्यकता । श्रोतां निजस्वार्था परिसिजे ॥७४॥

एकदां एक पुण्यपट्टणकर । नामें अनंतराव पाटणकर । साईदर्शनीं उपजला आदर । आले सत्वर शिर्डीस ॥७५॥

वेदान्त श्रवण जाहला सकळ । सटीक उपनिषदें वाचिलीं समूळ । परी तन्मानस अक्षयीं चंचळ । राहीना तळमळ तयांची ॥७६॥

घेतां साईसमर्थांचें दर्शन । निवाले पाटणकरांचे नयन । करुनि पायांचें अभिवंदन । यथोक्त पूजन संपादिलें ॥७७॥

मग होऊनि बद्धांजुळी । बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी । अनंतराव प्रेमसमेळीं । करुणाबहाळीं पुसत कीं ॥७८॥

केलें विविध ग्रंथावलोकन । वेदवेदांग - उपनिषदध्ययन ॥ केलें सच्छास्त्र - पुराणश्रवण । परी हें निर्विण्ण मन कैसें ॥७९॥

वाचिलें तें व्यर्थ गेलें । ऐसेंच आतां वाटूं लागलें । अक्षरहीन भावार्थी भले । वाटती चांगले मजहून ॥८०॥

वायां गेलें ग्रंथावलोकन । वायां शास्त्रपरिसीलन । व्यर्थ हें सकळ पुस्तकी ज्ञान । अस्वस्थ मन हें जोंवरी ॥८१॥

काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती । किमर्थ महा - वाक्यानुवृत्ती । जेणें न लाधे चित्तास शांति । ब्रह्मसंवित्ति कशाची ॥८२॥

कर्णोपकर्णीं परिसिली वार्ता । साईदर्शनें निवारे चिंता । विनोद गोष्टी वार्ता करितां । सहज सत्पथा लाविती ते ॥८३॥

म्हणवून महाराज तपोराशी । पातलों आपुल्या पायांपासीं । येईल स्थैर्य माझिया मनासी । आशीर्वचनासी द्या ऐशा ॥८४॥

तंव महाराज झाले कथिते । एका विनोदपर आख्यायिकेतें । जेणें अनंतराव समाधानातें । पावले साफल्यते ज्ञानाच्या ॥८५॥

ती अल्पाक्षर परमसार । कथा कथितों व्हा श्रवणतत्पर । विनोद परी तो बोधपर । कोण अनादर करील ॥८६॥

बाबा देत प्रत्युत्तर | 'एकदा एक आला सौदागर || तेव्हा एक घोडें समोर | घाली लेंडार नवांचे || .२३, .८७|| सौदागर निजकार्यतत्पर | लेंडिया पडतां पसरिला पदर || बांधून घेता घट्ट त्या समग्र | चित्तैकाग्र्य लाधला'|| .२३, .८८ ||

हें काय वदले साईसमर्थ । काय असावा कीं मथितार्थ । लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ । कांहींही अर्थ कळेना ॥८९॥

ऐसा विचार करीत करीत । अनंतराव माघारा येत । कथिलें संभाषण इत्थंभूत । केळकरांप्रत तयानें ॥९०॥

म्हणती सौदागर तो कोण । लेंडियांचें काय प्रयोजन । नवांचेंच काय कारण । सांगा उलगडून हें मजला ॥९१॥

दादा हें काय आहे कोडें । मी अल्पबुद्धी मज तें नुलगडे । होईल बाबांचे हृदय उघडें । ऐसें रोकडें मज कथा ॥९२॥

दादा वदती मजही न कळे । ऐसेंच बाबांचें भाषण सगळें । परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळें । कथितों आकळे जें मज ॥९३॥

कृपा ईश्वरी तें हें घोडें । हें तों नवविधा भक्तीचें कोडें । विनाभक्ति न परमेश्वर जोडे । ज्ञाना न आतुडे एकल्या ॥९४॥

श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण । चरणसेवन-अर्चन - वंदन । दास्य - सख्य - आत्मनिवेदन । भक्ति हे जाण नवविधा ॥९५॥

पूर्ण भाव ठेवूनि अंतरीं । यांतून एकही घडली जरी । भावाचा भुकेला श्रीहरी । प्रकटेल घरींच भक्ताच्या ॥९६॥

जपतपव्रत योगसाधन । वेदोपनिषद - परिशीलन । उदंड अध्यात्मज्ञान - निरूपण । भक्तिविहीन तें फोल ॥९७॥

नको वेदशास्त्रव्युत्पत्ती । नको ज्ञानी हे दिगंतकीर्ति । नको शुष्कभजनप्रीती । प्रेमळ भक्ति पाहिजे ॥९८॥

स्वयें आपणा सौदागर समजा । सौद्याच्या या भावार्था उमजा । फडकतां श्रवणादि भक्तीची ध्वजा । ज्ञानराजा उल्हासे ॥९९॥

घोडयानें घातल्या लेंडया नऊ । सौदागर आतुरते धांवत घेऊं । तैसाच नवविधा भक्तिभावु । धरितां विसांवु मनातें ॥१००॥

तेणेंच मनास येईल स्थैर्य । सर्वांठायीं सद्भाव गांभीर्य । त्यावीण चांचल्य हें अनिवार्य । कथिती गुरुवर्य सप्रेम ॥१०१॥

दुसरे दिवशीं अनंतराय । वंदूं जातां साईंचे पाय । पदरीं बांधिल्यास लेंडया कायपृच्छा ही होय तयांस ॥१०२॥

अनंतराव तेव्हां प्रार्थिती । कृपा असावी दीनावरती । सहज मग त्या बांधिल्या जाती । काय ती महती तयांची ॥१०३॥

तंव बाबा आशीर्वाद देती । कल्याण होईलआश्वासिती । अनंतराव आनंदले चित्तीं । सुखसंवित्ति लाधले ॥१०४॥

बाबांच्या निंदापर चर्चेमध्ये वकिलाचा सहभाग

('साईबाबांच्या का नादी लागता?' या चर्चेत एक वकील सामील होतात आणि पुढे बाबांबरोबर भेट होते तेव्हा बाबा या चर्चेचा अंतर्ज्ञानाने उल्लेख करतात - अध्यायाचा समारोप (105-130) 

आतां आणीक अल्प कथा । श्रोतां परिसिजे सादरचित्ता । कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता । सन्मार्गप्रवर्तकता तैसीच ॥१०५॥

एकदां एक वकील आले । येतांक्षणींच मशिदी गेले । साईनाथांचें दर्शन घेतलें । पाय वंदिले तयांचे ॥१०६॥

सवेंच मग देऊन दक्षिणा । बैसले बाजूस वकील तत्क्षणा । तेथें चालल्या साई - संभाषणा । आदर श्रवणा उपजला ॥१०७॥

बाबा तंव तिकडे मुख फिरविती । वकीलांस अनुलक्षून वदती । बोल ते वर्मीं जाऊन खोंचती । वकील पावती अनुताप ॥१०८॥

लोक तरी हो लबाड किती । पायां पडती दक्षिणाही अर्पिती । आणीक आंतून शिव्याही देती । काय चमत्कृती सांगावी॥१०९॥

ऐकून हें वकील स्वस्थ राहिले । कीं ते निजांतरीं पूर्ण उमजले । उद्नार अन्वर्थ हें तयां पटलें । तात्पर्य ठसलें मनासी ॥११०॥

पुढें जेव्हां ते वाडयांत गेले । दीक्षितांलागीं कथिते झाले । कीं जें बाबा लावूनि बोलले । सार्थचि वहिलें तें सर्व ॥१११॥

येतांच मजवर झाडिला ताशेरा । तो मज केवळ दिधला इशारा । कुणाची थट्टानिंदादि प्रकारा । देईं न थारा अंतरीं ॥११२॥

शरीरप्रकृति होऊनि अस्वस्थ । मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त । राहिले रजेवर येथें स्वस्थ । आपुली प्रकृती सुधरावया ॥११३॥

वकीलांच्या खोलींत असतां । मुन्सफांसंबंधें निघाल्या वार्ता । अर्थोअर्थीं संबंध नसतां । ऊहापोहता चालली ॥११४॥

औषधावीण या शरीरापदा । टळतील का लागतां साईंच्या नादा । पावले जे मुन्सफीचे पदा । तयां हा धंदा साजे कां ॥११५॥

ऐसी तयांची निंदा चालतां । चालली साईंची उपहासता । मीही तयांतचि होतों अंशता । तिची अनुचितता दर्शविली ॥११६॥

ताशेरा नव्हे हा अनुग्रह । व्यर्थ कुणाचा ऊहापोह । उपहास - निंदादि कुत्सित संग्रह । असत्परिग्रह वर्जावा ॥११७॥

आणीक एक हें प्रत्यंतर । असतां शंभर कोसाचें अंतर । साई जाणें सर्वाभ्यंतर । खरे अंतर्ज्ञानी ते ॥११८॥

आणिक एक झाला निवाड । असोत मध्यें पर्वत पहाड । कांहीं न साईंच्या दृष्टीआड । गुप्तही उघड त्यां सर्व ॥११९॥

असो पुढें तेव्हांपासुनी । केला निश्चय वकीलांनीं । अत:पर निंदा - दुरुक्तिवचनीं । खडा कानीं लाविला ॥१२०॥

आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची दृष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥१२१॥

उदेली सत्कार्य - जागरूकता । मागें पुढें साईसन्निधता । समर्थ कोण तया वंचिता । निर्धार चित्ता हा ठसला ॥१२२॥

पाहूं जातां या कथेसी । संबंध जरी त्या वकीलासी । तरी ती सर्वार्थी आणि सर्वांसीं । बोधक सर्वांसी सारिखी ॥१२३॥

वकील वक्ते श्रोते समग्र । आणिक साईंचे भक्त इतर । तयांचाही ऐसाच निर्धार । व्हावा मी साचार प्रार्थितों ॥१२४॥

साईकृपामेघ वर्षता I

होईल आपणा सर्वांची तृप्तता II

ये अर्थी काही नाही नवलता I

सकळा तृषार्ता निववील II १२५ II

अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा । अगाध साईचरित्राची सीमा । मूर्त परब्रम्हावतार ॥१२६॥

समारोप

 आतां पुढील अध्यायीं कथा । परिसावी सादर श्रद्धाळू श्रोतां । पुरवील तुमच्या मनोरथा । देईल चित्ता स्थैर्यता ॥१२७॥

भक्तांची भावी संकटावस्था । ठाऊक आधींच साईसमर्था । थट्टामस्करी विनोद वार्ता । हंसतां खेळतां टाळिती ॥१२८॥

भक्तहेमाड साईंस शरण । जाहलें हें कथानक संपूर्ण । पुढील कथेचें अनुसंधान । संकटनिवारण भक्तांचें ॥१२९॥

कैसे साई कृपासागर । भक्तांचीं भावी संकटें दुर्धर । आधीं जाणूनि करिती परिहार । इशारा वेळेवर देउनी ॥१३०॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अनुग्रहकरणंनाम एकविंशोऽध्याय: संपूर्ण" ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


श्रीसाईसच्चरित - अध्याय २० -आनंदानुभव

 

IIश्रीसाईसच्चरित II

अध्याय २०         

ईशावास्यभावार्थबोधनं

(ओवीसंख्या १३५)

या अध्यायात काय आहे

अध्यायारंभ

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात 

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप

अध्यायारंभ (1-11

ईशावास्य उपनिषदातील शंकेचा मोलकरणीकडून उलगडा

ईशावास्य उपनिषदावर भाष्य लिहिताना गणुदासांस शंका येते आणि बाबा काकांच्या मोलकरणीकडून या शंकेचे निरसन करवितात  (12-93)








 





































Dressing in rags when faced with deficiency 

But doing the same in spite of sufficiency

Is called ‘display of dearth with satisfaction’

For happiness or unhappiness is nothing but emotion  II Ch.20, St. 92 II

These were the lines with which Ganudas was confused

And thus the puzzle was solved  

The whole bunch of Eeshaavasya was discovered  

When  its correct meaning was uncovered 93

श्री. दाभोलकरांचे भाष्य आणि अध्यायाचा समारोप (94-135)

'










मी अशरीर सर्वत्र एक । मजहूनि कोणी नाहीं आणिक । मीच कीं सकलांचा व्यापक । स्वरूपोन्मुख हें ज्ञान ॥१११॥

पूर्णब्रब्रह्मस्वरूपच्युत । ऐसा हा जीवात्मा पूर्ववत । कधींतरी स्वस्वरूपाप्रत । पावावा निश्चित हें ध्येय ॥११२॥

श्रुति - स्मृति आणि वेदान्त । या सर्वांचा हाचि सिद्धान्त । हेंचि अंतिम साध्य निश्चित । च्युतासी अच्युतपदप्राप्ति ॥११३॥

सम: सर्वेषु भूतेषु। जोंवरी अप्राप्त हा स्थितिविशेषु । तोंवरी न भूतात्मा  हृषीकेशु । ज्ञान प्रकाशूं समर्थ ॥११४॥

विहितकर्में चित्त शुद्ध । होतां होईल अभेदबोध । शोकमोहादि संसृतीविरुद्ध । प्रकटेल सिद्ध ज्ञान तें ॥११५॥

अखिल त्रैलोक्य सचराचर । आच्छादी जो ईश परमेश्वर । निष्क्रिय निष्कल जो परात्पर । तो अशरीर सदात्मक ॥११६॥

नामरूपात्मक हें विश्व । सबाह्य आच्छादी हा ईश । तो मीच मी भरलों अशेष । निर्विशेषरूपत्वें ॥११७॥

अस्तु वस्तुत: जें निराकार । मायागुणें भासे साकार । कामुकापाठीं हा संसार । तोचि असार निष्कामा ॥११८॥

हें यत्किंचित्‌ भूतभौतिक । जगत्‌ चेतनाचेतनात्मक । ईश्वरचि हा अद्वितीय एक । निर्धार नि:शंक करावा ॥११९॥

जगद्वुद्धीचा हा विवेक । जरी मनासी पटेना देख । तरी हें धनहिरण्यादिक । यांचा अभिलाख न करावा ॥१२०॥

हेंही जरी न घडे तरी । जाणावें आपण कर्माधिकारी । आमरणान्त शतसंवत्सरीं । कर्मचि करीत रहावें ॥१२१॥

तेंही स्ववर्णाश्रमोचित । यथोक्तानुष्ठानसहित । अग्निहोत्रादि नित्यविहित । चित्त अकलंकित होईतों ॥१२२॥

हा एक चित्तशुद्धीचा मार्ग । दुजा सर्वसंगपरित्याग । हें न आक्रमितां ज्ञानयोग । कर्मभोगचि केवळ ॥१२३॥

ही ब्रह्मविद्या हें उपनिषद । सर्वां न देती अधिकारविद । वृत्ति न जोंवरी झाली अभेद । उपनिषद्बोध शाब्दिक ॥१२४॥

तरी तोही व्हावा लागे । जिज्ञासु आधीं तोच मागे । म्हणोनि बाबांहीं पाठविलें मागें । मोलकरीण सांगेल म्हणोनि ॥१२५॥

स्वयेंच बाबा हा बोध देते । तरी हें पुढील कार्य न घडतें । एकमेवाद्वितीयनसतें । ज्ञान हें कळतें बाबांचें ॥१२६॥

मजवांचूनि आणीक कोण । आहे ती काकांची मोलकरीण । मीच ती ही दिधली खूण । ईशावास्य जाणविलें ॥१२७॥

परमेश्वरानुग्रहलेश । आचार्यानुग्रह विशेष । नसतां आत्मज्ञानीं प्रवेश । सिद्धोपदेशचि आवश्यक ॥१२८॥

आत्मप्रतिपादक जें जें शास्त्र । श्रवणीं आणावें तें तेंच मात्र । प्रतिपाद्य जें तें मीच सर्वत्र । मजवीण अन्यत्र कांहींच न ॥१२९॥

होतां आत्मतत्त्वाचें विवरण । तोच मी आत्मा नव्हे आन । हें जयासी अभेदानुसंधान । आत्माही प्रसन्न तयासीच ॥१३०॥

असो आत्मनिरूपण होतां । ऐसेंच आत्मानुसंधान राखितां । ऐसीच निश्चल धरितां आत्मता । परमात्मा हाता येईल ॥१३१॥

समारोप

पुढील अध्यायकथानुसंधान । विनायक ठाकूरादि कथा कथन । श्रोते करोत सादर श्रवण । परमार्थप्रवण होतील ॥१३२॥

त्याही कथा ऐशाच गोड । ऐकतां पुरेल श्रोतियांचें कोड । महापुरुषदर्शनाची होड । पुरेल चाड भक्तांची ॥१३३॥

जैसा उगवतां दिनमणि । अंधार जाय निरसोनी । तेवीं या कथापीय़ूषपानीं । माया हरपोनी जातसे ॥१३४॥

अतर्क्य साईंचें विंदान । त्यावीण कोण करील कथन । मी तों एक निमित्त करून । तेचि तें वदवून घेतील ॥१३५॥

स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ईशावास्यभावार्थबोधनं नाम विंशोऽध्याय: संपूर्ण: ॥

॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

परिशिष्ट

ईशावास्य उपनिषद्

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

शांतीचा अर्थ - [पूर्णं अदः] - तें परब्रह्म पूर्ण आहे. [पूर्णं इदं] - हे सोपाधिक ब्रह्महि स्वरूपानें पूर्ण आहे. [पूर्णं पूर्णात् उदच्यते] - ते हे कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवते. पण ते त्याच्यापासून जरी निराळें होत असलें तरी आपले पूर्णत्व सोडीत नाहीं. तर ते पूर्णच उद्‌भवते. [पूर्णस्य पूर्णं आदाय] - कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन [पूर्ण एव अवशिष्यते] - पूर्णच-केवल ब्रह्म-अवशिष्ट राहतें. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीं जें अखंड एकरस सर्वव्यापी ब्रह्म होतें तेंच हे सृष्टीनंतरचें नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे. पण तेहि पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हें कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असें भासू लागते. प्रलयसमयीं त्या द्वैतरूप कार्यब्रह्मांतील पूर्णत्व तेवढें घेऊन म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यांतून काढून घेऊन तें पहिलें कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहते. त्रिविध तापांची शांति होवो.

ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ १ ॥

जगत्याम् यत् किं च जगत् इदम् सर्वम् ईश आवास्यम् - अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड व चेतनस्वरुप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे - तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः - त्या ईश्वराचे सतत स्मरण ठेऊन (कारण सर्व त्याचे आहे) ह्या जगताचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. त्यांत आसक्त होऊं नये. कारण, - धनम् कस्य स्वित् - हे धन, हे भोग पदार्थ कुणाचे आहेत ? अर्थात कुणाच्याच मालकीचे नव्हेत. जगांतील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धां परमेश्वर-रहित नाही. मनुष्य (चुकीने) ह्या सर्व पदार्थांशी ममता व आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग फक्त परमेश्वरासाठींच केला गेला पाहिजे. ॥ १ ॥

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः ।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥ २ ॥

कर्माणि कुर्वन् एव इह शतम् समाः जिजीविषेत् - ह्या जगात् (इह) ईश्वरपूजनार्थ भाव ठेऊनच शास्त्रनियत कर्मांचे आचरण करीत शंभर वर्षे आयुष्य कंठीत करण्याची इच्छा केली पाहिजे - एवम् कर्म त्वयि नरे न लिप्यते - हे मनुष्या, अशा प्रकारे त्यागपूर्वक ईश्वरासाठी केलेल्या कर्माने तूं लिप्त होणार नाहीस - इतः अन्यथा न आस्ति - मुक्तिसाठी ह्याप्रमाणे कर्म करीत राहाणे हा एकमेव मार्ग आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही. ॥ २ ॥

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः ।
ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥ ३ ॥

असुर्याः नाम लोकाः ते अन्धेन तमसा आवृता - असुरांचे जे नरकरूपी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व अज्ञान व दुखःरुप महान अंधकाराने आच्छादित आहेत - ये के च आत्महनः जनाः - जे कोणी आत्म-विरोधी आचरण करणारी माणसे असतात - ते प्रेत्य तान् अभिगच्छति - ते मेल्यावर त्या भयंकर अशा नरकांत जातात. -- मानव शरीर इतर शरीरांपेक्षा श्रेष्ठ व दुर्लभ आहे. ईश्वर कृपेने असे शरीर केवळ मुक्ति मिळवण्याच्या उद्देशाने दिले गेलेले असते. दुसर्‍या मंत्रात केलेल्या उपदेशानुसार आचरण करणे म्हणजे आत्महीत साधणे होय. ह्या उलट ईश्वर समर्पण भाव न ठेवता, विषयांचा केवळ यथेच्छ भोग घेत राहाणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे. कारण अशाने केवळ जन्म व्यर्थ गेला एव्हढेच नव्हे तर आपल्याला अधिकाधिक कर्मबंधनात जखडून घेतल्यासारखे होईल. अधिकाधिक पतन झाल्यास क्षुद्र योनिंमध्ये जन्म मिळून नरकातच भटकत राहावे लागेल. ॥ ३ ॥

अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् ।
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥ ४ ॥

अनेजत् एकं मनसः जवीयः - परमेश्वर अचल, एकरूप, मनापेक्षाही अधिक तीव्र गतिमान आहे - पूर्वम् अर्षत् - सर्वांचा आदि आणि ज्ञानस्वरूप (सर्वांचे ज्ञान ज्याला आहे असा) - एनत् देवाः न आप्नुवन् - ह्या परमेश्वराला इन्द्रादि देव देखील जाणूं शकत नाहीत. - तत् अन्यान् धावतः तिष्ठत् अत्येति - अन्य कोणी कितीही वेगाने धावले तरी स्वताः एके ठिकाणी स्थीर (जागेवरून न हालतां) राहूनही ते त्या सर्व धावणार्‍यांचे अतिक्रमण करणारे आहेत - तस्मिन् मातरीश्वा अपः दधाति - त्यांच्या सत्तेनेंच वायु जल वगैरे (सर्वमहाभूतांना) सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ४ ॥

तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके ।
तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ॥ ५ ॥

तत् एजति तत् न एजति - तो चालतोही आणि चालत नाहीही (सगुण रूपानें भक्तांसाठी कुठेही प्रकट होणे म्हणजे चालणे, आणि निर्गुण रूपाने सर्वथा अचल स्थितीत राहणे म्हणजे न चालणे. परस्पर विरोधी गुण व क्रिया करणे हे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे). - तत् दूरे तत् अन्तिके - ते अति दूर आहेत (श्रद्धा, प्रेमरहित मनुष्यांसाठी त्यांचे दर्शन दुर्लभ आहे), तसेच अत्यन्त निकटही आहेत (भक्तांच्या ह्रुदयांत ?) - तत् अस्य सर्वस्य अंतः - जगतांतील प्रत्येक वस्तूत - तत् सर्वस्य उ बाह्यतः - आणि जगताच्या पलिकडेही. [ह्या सर्व अचिंत्य शक्त्या परमेश्वरी शक्तिचा एक अंशमात्र समजले जाते. थोडक्यात त्याचे स्वरूप व सामर्थ्य हे कल्पनातीत आहे] ॥ ५ ॥

 

यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति ।
सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ ६ ॥

तु यः सर्वणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति - परंतु जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराचे ठिकाणी पाहातो - च सर्वभूतेषु आत्मानम् - तसेंच सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराला (तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने) पाहातो - ततः न विजुगुप्सते - तो कुणाचाही द्वेष करीत नाही. ॥ ६ ॥

यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः ।
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ७ ॥

यस्मिन् विजानतः - अशा प्रकारे ज्याची मति झाली आहे - सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत - त्याला सर्व प्राणी एकमात्र परमात्मरूपच होतात - तत्र एकत्वम् अनुपश्यतः - असें सर्व प्राणीमात्रांस एकत्व (समभाव) रूपाने पाहाणार्‍या माहात्म्याला - कः मोहः कः शोकः - मग कशाचा मोह आणि कशाचे (कुणापासून) दुःख ? सर्वच आप्त, मग जें काही घडेल ती सर्व परमेश्वरी लीलाच. ॥ ७ ॥

 

स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् ।
कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूः याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ ८ ॥

सः शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् पर्यगात् - तो महापुरुष परम तेजोमय, शरीररहित, क्षत रहित (कशाचाही परिणाम होत नाही असा), सच्चिदानंदस्वरूप (शुद्ध), शुभ-अशुभ परिणाम रहित अशा परमेश्वराला प्राप्त होतो - कविः मनिषीः परिभूः स्वयंभूः - जे सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वनियंता स्वताःच्या इच्छेनें कुठेही केव्हांही प्रकट होऊं शकणारे आहेत, आणि - शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात् - अनादि कालापासून सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार सर्व पदार्थांची उत्पत्ती करत आलेले आहेत (ईश्वर बहुतेक अशा महात्म्यांना प्रजापति म्हणून नेमत असेल) ॥ ८ ॥



पुढील तीन मंत्रात विद्या व अविद्याचें तत्त्व-वर्णन - पण आधी त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे - परमेश्वर प्राप्ती हेतूनें केलेला शास्त्राभ्यास वा निष्काम कर्म म्हणजे विद्याआणि भोगांच्या प्राप्तिसाठी केलेला अभ्यास व काम्यकर्मे म्हणजे अविद्या

 

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाँ रताः ॥ ९ ॥

ये अविद्याम् उपासते ते अन्धम् तमः प्रविशन्ति - जे लोक अविद्येची (भोगांच्या प्राप्तीसाठी साधनरूप कर्मांचे अनुष्ठान) उपासना करतात त्यांचा शेवटीं अज्ञानस्वरूप घोर अन्धकारांत प्रवेश होतो - ये विद्यायाम् रताः ते ततः उ भूयः इव तमः - आणि जे नुसत्या शास्त्रांचे पठण करून मिथ्याभिमानाने मत्त होऊन आमच्यासाठी काही कर्तव्य उरलेले नाहीअशा अविर्भावात कर्तव्यकर्म न करतां, शास्त्र विपरीत कर्मात रत होतात, तेंही घोर नरकाला प्राप्त होतात. ॥ ९ ॥

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १० ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविषयी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - विद्यया अन्यत् एव आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति - की ज्ञानाच्या यथार्थ अनुष्ठानाने तसेच कर्माच्या यथार्थ अनुष्ठानाने (मागील मंत्रात सांगितलेल्या फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १० ॥

 

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ॥ ११ ॥

यः तत् उभयम् विद्याम् च अविद्याम् च वेद - जो मनुष्य ज्ञानतत्त्व व अज्ञान-कर्म तत्त्व ह्या दोन्हींना यथार्थपणे जाणतो - अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते - तो कर्तव्यकर्माचे अनुष्ठानाने मृत्युला पार करून ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताची (परमेश्वराची) प्राप्ती करतो. [कर्म - अकर्म - विकर्म - नैष्कर्म्य - त्यांत आणि संचितकर्म व प्रारब्ध प्रभाव हें सर्व सोपे तर नाहीच, पण गोंधळ उडविणारे आहेत , तरीपण जाणून घेणे आवश्यक आहे. अतिशय सावधानता आणि विवेक गरजेचे आहे] ॥ ११ ॥

अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते ।
ततो भूय इव ते तमो य उ सम्भूत्याँ रताः ॥ १२ ॥

ये सम्भूतिम् उपासते (ते) अन्धम् तमः प्रविशन्ति - मान, किर्ति, अधिकार, धन तसेच भोग्य वस्तूंच्या वृद्धीसाठी पितर, क्षुद्र देवता, व मनुष्यांची (नेता वगैरे) उपासना करणारे घोर नरकात जातात - ये सम्भूत्याम् रताः ते ततः उ भुयः एव तमः (प्रविशन्ति) - आणि जे इतर देव-देवींच्या उपासनेंत व्यग्र आहेत तेही अज्ञानरूपी घोर नरकांतच जातात. ॥ १२ ॥

 

अन्यदेवाहुः सम्भवात् अन्यदाहुरसम्भवात् ।
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥ १३ ॥

धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविष्यी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - सम्भवात् अन्यत् एव आहुः असम्भवात् अन्यत् आहुः इति - की ज्यांच्यासाठी पितर, देवता इत्यादींच्या उपासनेचे स्वरूप व हेतु ब्रह्मोपासना आहे त्यांच्यासाठी (मागील मंत्रांतील फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १३ ॥

सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह ।
विनाशेन मृत्युं तीर्त्वा सम्भूत्याऽमृतमश्नुते ॥ १४ ॥

यः तत् उभयम् सम्भूतिम् च विनाशम् च सह वेद - जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील क्षुद्र देवदेवता यांना यथार्थपणे जाणतो - विनाशेन मृत्युम् तीर्त्वा सम्भूत्याम् अमृतम् अश्नुते - तो विनाशशील देवादिंच्या उपासनेने मृत्युला पार करून अविनाशी परब्रह्माच्या उपासनेने अमृततत्त्वाची प्राप्ती करून घेतो (परमपद पावतो). ॥ १४ ॥

 

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥ १५ ॥

पूषन् सत्यस्य मुखम् - अखिल ब्रह्माण्डाचे पोषण करणाऱ्या सत्यस्वरूप परमेश्वरा तुझे मुख तर - हिरण्मयेन पात्रेण अपिहितम् - सुर्यमण्डळाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या तेजस्वी पात्राने झाकलेले आहे - सत्यधर्माय दृष्टये तत् त्वम् अपावृणु - मी तुझ्या सत् धर्माची भक्तिभावाने उपासना करतो आणि तुझ्या दर्शनासाठी आतूर आहे. तुं माझ्यासाठी त्यांत बाधा आणणारी सर्व प्रकारची आवरणें काढून टाक. ॥ १५ ॥

पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः ।
यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥

पूषन् एकर्षे प्राजापत्य सूर्य - एकट्यानेंच सर्व भक्तांचे पोषण करणाऱ्या हे प्रजापति सूर्या, - रश्मिन् व्यूह तेजः समूहः - (तुझ्या किरणांचे तेज आमचे डोळे दिपवून टाकत असल्यामुळे) तुझ्या ह्या किरणांना एकत्र करून ते तेजस्वी किरण थोडा वेळ आवरून घे - यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि - ज्या योगे तुझे जे अतिशय कल्याणमय दिव्य स्वरूप आहे ते मी आपल्या कृपेने पाहूं शकेन - यः असौ असौ पुरुषः अहम् सः अस्मि - (ज्ञानदृष्टी झाल्यावर भक्त म्हणतो) अरे हा जो सुर्याचा आत्मा आहे तो तर परम पुरुष परमात्माच आहे आणि तो तर मी स्वताःच असल्यासारखा भासतोय. ॥ १६ ॥

 

वायुरनिलममृतमथेदं भस्मांतँ शरीरम् ।
ॐ क्रतो स्मर कृतँ स्मर क्रतो स्मर कृतँ स्मर ॥ १७ ॥

अथ वायुः अमृतम् अनिलम् - आतां हा प्राण आणि इन्द्रिये वायु तत्त्वात प्रवेश करोत - इदम् शरीरम् भस्मांतम् - हे स्थूल शरीर अग्निमध्ये भस्म होऊन जावो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो. ॥ १७ ॥

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
     
विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
युयोध्यस्मज्जुहुराणमेनो
    
भूयिष्ठां ते नमउक्तिं विधेम ॥ १८ ॥

अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥

॥ इति ईशोपनिषत् ॥

Wednesday, March 11, 2026

गुरुचरित्र अध्याय २


गुरुचरित्र 

अध्याय २ - शिष्यदीपकाख्यान

(गुरुनिष्ठ दीपकाची कथा)

(ओवीसंख्या २७८ )

॥ ॐ ॥

या अध्यायात काय आहे:

नामधारकास स्वप्नात सिद्धमुनींचे दर्शन होते आणि जागृत अवस्थेत आल्यावर त्याला स्वप्नात दिसले तसेच सिद्धमुनी भेटतात. नामधारक त्यांना शरण जातो. तेव्हा सिद्ध मुनी त्याला गुरूचा महिमा सांगतात. नामधारक सिद्धमुनींना प्रश्न विचारतो की हा गुरूचा महिमा कुठल्या शास्त्रात सांगितला आहे.

सिद्धमुनी सांगतात की हा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने कलीला सांगितला आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेवाने कालाप्रमाणे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग यांना पृथ्वीवर पाठविले. जेव्हा कलियुगाची वेळ आली तेव्हा कलीने तो पृथ्वीवर जाऊन लोकांना  कशा प्रकारे पीडा देणार आहे ते सांगितले.

त्या वेळी ब्रह्मदेवाने कोणास त्रास देऊ नये ते कलीला  सांगितले. त्यातच एक जो गुरुचरणी अनन्य होईल , त्याला पीडा देऊ नये असे सांगितले. येथे ब्रह्मदेव कलीला गुरुनिष्ठ दीपकाची गोष्ट सांगतात.

दीपक आपल्या  गुरूंना वाराणशीला घेऊन येतो. गुरूंना कुष्ठरोग झालेला असतो. दीपक गुरूंची सर्वतोपरी सेवा करतो तरी गुरू त्याला एक सारखा त्रास देतात. 

दीपकच्या गुरुनिष्ठेवर प्रसन्न होऊन भगवान श्रीविष्णू त्याला भेटायला येतात आणि वर मागण्यास सांगतात. परंतु दीपक नम्रपणे सांगतो की मला वर द्यायचाच असेल तर गुरूवरील माझी निष्ठा दृढ व्हावी. श्रीविष्णू प्रसन्न होऊन दीपकला तसा वर देतात. मग दीपक गुरूंना घडलेला प्रकार सांगतो. त्यामुळे गुरूसुद्धा दीपकला आशिर्वाद देतात. गुरूंचे कुष्ठ बरे होऊन त्यांना दिव्य देह प्राप्त होतो.

सूची:

१. नामधारकास स्वप्नामध्ये सिद्धमुनींचे दर्शन

२. सिद्धमुनींचा नामधारकाबरोबर संवाद:

२.१. गुरूचा महिमा 

२.२. सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेव    सत्य, त्रेता आणि द्वापार  युगांना पृथ्वीवर पाठवतात

२.३. ब्रह्मदेव आणि कलीचा संवाद

२.३.१.गुरुनिष्ठ दीपकाची कथा

🌺 🌺 🌺 

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारकास स्वप्नामध्ये सिद्धमुनींचे दर्शन:

त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा | कृष्णातिरी वास करोनि वोजा | सुभक्त तेथे करिती आनंदा | ते सुर स्वर्गी पहाती विनोदा || १ ||

ऐसे श्रीगुरुचरण ध्यात | जातां भक्त 'नामांकित' | अति श्रमला चालत | राहिला एका वृक्षातळी || २ ||

क्षण एक निद्रिस्त | मनी श्रीगुरु चिंतित | कृपानिधि अनंत | दिसे स्वप्नी परियेसा || ३ ||

रूप दिसे सुषुप्तींत | जटाधारी भस्मांकित | व्याघ्रचर्म परिधानित | पीतांबर वास देखा || ४ ||

येऊनि योगेश्वरु जवळी | भस्म लाविले कपाळी | आश्वासूनि तया वेळी | अभयकर देतसे || ५ ||

इतके देखोनि सुषुप्तीत | चेतन झाला नामांकित | चारी दिशा अवलोकित | विस्मय करी तरे वेळी || ६ ||

जागृत झाल्यावर नामधारकास सिद्धमुनी भेटतात

मूर्ति देखिली सुषुप्तीत | तेचि ध्यातसे मनांत | पुढे निघाला मार्ग क्रमित | प्रत्यक्ष देखें तैसाचि || ७ ||

देखोनियां योगीशातें | करिता झाला दंडवत | कृपा भाकी करुणावक्त्र | तारीं तारीं म्हणतसे || ८ ||

जय जया जी योगाधीशा | अज्ञानतमविनाशा | तूंचि ज्योति:प्रकाशा | कृपानिधि सिद्धमुनी || ९ ||

तुझे दर्शनें नि:शेष | गेले माझे दुरितदोष | तूं तारक आम्हांस | म्हणोनि आलासी स्वामिया || १० ||

कृपणे भक्तालागुनी | येणें झाले कोठोनि | तुमचेच नाम कवण मुनी | कवण स्थानी वास तुम्हां || ११ ||

सिद्ध म्हणे आपण योगी | हिंडू तीर्थे भूमि-स्वर्गी | प्रसिद्ध आमुचा गुरु जगी | 'नृसिंहसरस्वती' विख्यात || १२ ||

ज्याचे स्थान गाणगापुर | अमरजासंगम भीमातीर | त्रयमूर्तीचा अवतार | नृसिंहसरस्वती || १३ ||

भक्त तारावयालागीं | अवतार त्रयमूर्ति जगीं | सदा ध्याती अभ्यासयोगी | भवसागर तरावयासी || १४ ||

ऐसा श्रीगुरु कृपासिंधु | भक्तजनां सदा वरदु | अखिल सौख्य श्रियानंदु | देता होय शिष्यवर्गा || १५ ||

त्याच्या भक्तां कैचे दैन्य | अखंड लक्ष्मी परिपूर्ण | धनधान्यादि गोधन | अष्टैश्वर्ये नांदती || १६ ||  

ऐसे म्हणे सिद्ध मुनि | ऐकोनि विनवी | नामकरणी | आम्ही असतों सदा ध्यानीं | तया श्रीगुरुयतीचे || १८ ||

ऐशी कीर्ति ब्रीद ख्याति | सांगतसे सिद्ध मति | वंशोवंशी करितो भक्ति | कष्ट आम्हां केवी पाहे || १८ ||

तूं तारक आम्हांसी | म्हणोनि मातें भेटलासी | संहार करोनि संशयासी | निरोपावे स्वामिया || १९ ||

सिद्धमुनी नामधारकास गुरूचा महिमा सांगतात

सिद्ध म्हणे तये वेळी | ऐक शिष्या स्तोममौळी | गुरुकृपा सूक्ष्मस्थळी | भक्तवत्सल परियेसा || २० ||

गुरुकृपा होय ज्यास | दैन्य दिसे कैचे त्यास | समस्त देव त्यासी वश्य | कळिकाळासी जिंके नर || २१ ||

ऐसी वस्तु पूजूनी | दैन्यवृत्ती सांगसी झणी | नसेल दृढ तुझे मनी | म्हणोनि कष्ट भोगतोसी || २२ ||

त्रयमूर्ति श्रीगुरु | म्हणोनि जाणिजे निर्धारु | देऊ शके अखिल वरु | एक भावे भजावे || २३ ||

एखादे समयी श्रीहरि | अथवा कोपे त्रिपुरारि | राखे श्रीगुरु निर्धारी | आपुले भक्तजनांसी || २४ ||

आपण कोपे एखाद्यासी | रक्षूं न शके व्योमकेशी | अथवा विष्णु परियेसी | रक्षूं न शके अवधारी || २५ ||

ऐसे ऐकोनि नामकरणी | लागे सिद्धाचिया चरणी | विनवीतसे कर जोडुनी | भावभक्ती करोनियां || २६ ||

स्वामी ऐसे निरोपिती | संदेह होत माझे चित्ती | गुरुचि केवीं झाले त्रिमूर्ति | ब्रह्मा-विष्णु-महेश्वर || २७ ||

आणीक तुम्ही निरोपिलेती | विष्णु रुद्र जरी कोपती | राखो शके गुरु निश्चिती | गुरु कोपलिया न राखे कोणी || २८ ||

हा बोल असे कवणाचा | कवण शास्त्रपुराणींचा | संदेह फेडीं गा मनाचा | जेणे मन दृढ होय || २९ ||

येणेपरी नामकरणी | सिद्धासी पुसे वंदोनि | कृपानिधि संतोषोनि | सांगतसे परियेसा || ३० ||

सिद्धमुनींचे कथन:

ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न केल्यानंतर सत्य, त्रेता आणि द्वापार युगांना पृथ्वीवर पाठवतात

सिद्ध म्हणे शिष्यासी | तुवां पुसिले आम्हांसी | वेदवाक्य- साक्षीसी | सांगेन ऐक एकचित्ते || ३१ ||

वेद चारी उत्पन्न | झाले ब्रह्मयाचे मुखेंकरून | त्याचियापासाव पुराण | अष्टादश विख्यात || ३२ ||

त्या अष्टादशांत | ब्रह्मवाक्य असे ख्यात | पुराण 'ब्रह्मवैवर्त' | प्रख्यात असे त्रिभुवनी || ३३ ||

-----------------------------------------------------------

👉ब्रह्मवैवर्त पुराण:

ब्रह्मवैवर्त पुराण हे अठरा पुराणांपैकी महत्त्वाचे पुराण असून राधा-कृष्ण तत्त्व, सृष्टी-निर्मिती आणि  स्त्री-शक्तीचा दिव्य महिमा सांगणारे महत्त्वाचे वैष्णव महापुराण आहे. हे पूर्ण ब्रह्म खंड, प्रकृती खंड , गणेश खंड आणि कृष्ण जन्म खंड अशा चार खंडांमध्ये विभागले आहे. 

-----------------------------------------------------------

नारायण विष्णुमूर्ति |  व्यास झाला द्वापारांतीं | प्रकाश केला हे क्षितीं | ब्रह्मवाक्यविस्तार || ३४ ||

तया व्यासापासुनी| ऐकिलें समस्त ऋषिजनीं | तेचि कथा विस्तारोनि | सांगेन एका एकचित्ते || ३५ ||

चतुर्मुख ब्रह्मयासी | कलियुग पुसे हर्षी | गुरुमहिमा विस्तारेसी | ब्रह्मदेवे निरुपिला || ३६ ||

ऐसे म्हणतसे नामकरणी | पुनरपि सिद्धासी नमूनि | विनवीतसे करद्वय जोडोनि | भावभक्तीकरोनिया || ३८ ||

म्हणे सिद्धयोगीश्वरा | अज्ञानतिमिरभास्करा | तूं तारक भवसागरा | भेटलासी कृपासिंधु || ३८ ||

ब्रह्मदेव कलियुगासी | सांगे केवी कारणेंसी | आद्यंत विस्तारेसीं | निरोपिजे स्वामिया || ३९ ||

ऐक शिष्या एकचित्ता | जंघी प्रळयो झाला होता | आदिमूर्ति निश्चिता | होता वटपत्रशयनी || ४० ||

अव्यक्तमूर्ति नारायण | होता वटपत्रशयन | बुद्धि उपजे चेतन | आणिक सृष्टी रचावया || ४१ ||

प्रपंच म्हणजे सृष्टिरचना | करणे म्हणोनि आलें मना | जागृत होई या कारणा | आदिपुरुष तये वेळी || ४२ ||

जागृत होवोनि नारायण | बुद्धि संभवे चेतन | कमळ उपजवीं नाभींहून | त्रैलोक्याचे रचनाघर || ४३||

तया कमळामधून|  उदयो झाला ब्रह्मा आपण | चारी दिशा पाहोन | चतुर्मुख झाला देखा || ४४ ||

म्हणे ब्रह्मा तये वेळी | समस्तांहूनि आपण बळी | मजहूनि आणिक स्थूळी | कवण नाही म्हणतसे || ४५ ||

हांसोनिया नारायणु | बोले गाढ शब्दवचनु | आपण असे महाविष्णु | भज म्हणे तया वेळी || ४६ ||

देखोनियां श्रीविष्णूसी | नमस्कारी ब्रह्मा हर्षी | स्तुति केली बहुवसी | अनेक काळ परियेसा || ४७ ||

संतोषोनि नारायण | निरोप दिधला अतिगहन | सृष्टि रची गा म्हणून | आज्ञा दिल्ही तये वेळी || ४८ ||

ब्रह्मा विनवी विष्णूसी | नेणे सृष्टि रचावयासी | देखिली नाहीं कैसी | केवीं रचूं म्हणतसे || ४९ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचनु | निरोप दिला महाविष्णु | वेद असती हे घे म्हणोनु | देता झाला तये वेळी  || ५० ||

सृष्टि रचावयाचा विचार | असे वेदांत सविस्तर | तेणेचिपरी रचूनि स्थिर | प्रकाश करीं म्हणितले || ५१ ||

अनादि वेद असती जाण | असे सृष्टिचे लक्षण | जैसी आरसा असे खूण | सृष्टि रचावया तैसा वेद || ५२ ||

या वेदमार्गे सृष्टीसी | रचीं गा ब्रह्मया अहर्निशी | म्हणोनि सांगे हृषिकेशी | ब्रह्मा रची सृष्टीते || ५३ ||

सृष्टी प्रजा अनुक्रमे | विविध स्थावरजंगमें | स्वेदज अंडज नामें | जारज उद्भिज्ज उपजविले || ५४ ||

श्रीविष्णूचे निरोपानें | त्रिजग रचिलें ब्रह्मयाने | तेणेपरी सृष्टीक्रमणें | व्यासें असे कथियेली || ५५ ||

सिद्ध म्हणे शिष्यासी | नारायण वेदव्यासीं | विस्तार केला पुराणांसी | अष्टादश विख्यात || ५६ ||

तयांत ब्रह्मवैवर्त | पुराण असे प्रख्यात | ऋषेश्वरांसी सांगे सूत | तेचि परी सांगतसे || ५७ ||

सनकांदिकांते उपजवोनि | ब्रह्मनिष्ठ येणें गुणी | मरीच्यादि ब्रह्म सगुणी | उपजवी ब्रह्मा तये वेळीं || ५८ ||

तेथोनि देवदैत्यांसी | उपजवी ब्रह्मा परियेसीं | सांगता कथा विस्तारेंसीं | असे, ऐक शिष्योत्तमा || ५९ ||

कृत-त्रेत-द्वापारयुग | मग उपजवी कलियुग | एकेकातें निरोपी मग | भूमीवरी प्रवर्ताया || ६० ||

बोलावूनि कृतयुगासी | निरोपी ब्रह्मा परियेसीं | तुवां जावोनि भूमीसी | प्रकाश करीं आपणांते || ६१ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन | कृतयुग आलें संतोषोन | सांगेन त्याचे लक्षण | ऐका श्रोते एकचित्ते || ६२ ||

असत्य नेणे कधीं वाचे | वैराग्यपूर्ण ज्ञानी साचें | यज्ञोपवीत आभरण त्याचें | रुद्राक्षमाळा करकंकणे || ६३ ||

येणें रूपें युग-सत्य | ब्रह्मयासी असे विनवित | मातें तुम्ही निरोप देत | केवीं जाऊं भूमीवरी || ६४ ||

भूमीवरी मनुष्य लोक | असत्य-निंदा-अपवादक | मातें न साहे तें ऐक | कवणेपरी वर्तावे || ६५ ||

ऐकोनि सत्ययुगाचे वचन | निरोपी तो ब्रह्मा आपण | तुवां वर्तावे सत्वगुण | क्वचित्काळ येणेंपरी || ६६ ||

न करीं जड तूंतें जाण | आणिक युग पाठवीन | तुवां रहावें सावधान | म्हणूनि पाठवी भूमीवरी || ६७ ||

वर्ततां येणेपरी ऐका | झाली अवधि सत्याधिका | बोलावूनि त्रेतायुगाते, विवेका | निरोपी ब्रह्मा परियेसा || ६८ ||

त्रेतायुगाचे लक्षण | ऐक शिष्या सांगेन | असे त्याची स्थूल तनु | हाती असे यज्ञसामग्री || ६९ ||

त्रेतायुगीं याचि कारणें | यज्ञ करिती सकळ जनें | धर्मशास्त्र प्रवर्तणे | कर्ममार्ग ब्राह्मणांसी || ७० ||

हातीं देखा वृषभ असे | धर्मप्रवर्तक सदा वसे | ऐसें युग गेलें हर्षे | निरोप घेऊनि भूमीवरी || ७१ ||

बोलावूनि ब्रह्मा हर्षीं | निरोप देत द्वापारासी | सांगेन तयाचे रूपासी | ऐका श्रोते एकचित्ते || ७२ ||

खड्ग खट्वांग धरोनि हातीं | धनुष्य बाण येरा हातीं | लक्ष्य उग्र असे शांति | निष्ठुर दया दोनी असे || ७३ ||

पुण्य पाप समान देखा | स्वरूपे द्वापार ऐसा निका | निरोप घेऊनि कौतुका | आला आपण भूमीवरी || ७४ ||

सिद्धमुनींचे कथन-

ब्रह्मदेव आणि कलीचा संवाद:

त्याचे दिवस पुरल्यावरी | कलियुगातें पाचारी | जावें त्वरित भूमिवरी | म्हणोनि सांगे ब्रह्मा देखा || ७५ ||

ऐसें कलियुग देखा | सांगेन लक्षणें एका |  ब्रह्मयाचे सन्मुखां | केवीं गेले परियेसा || ७६ ||

विचारहीन अंत:करणी | पिशाचासारखा वदनी | तोंड खालतें करुनी | ठायीं ठायीं पडतसे || ७७ ||

क्रूर आपण विरागहीन | कलह द्वेष सवे घेऊन | वाक हाती धरूनि शिस्न | येत ब्रह्मयासन्मुख || ७८ ||

जिव्हा धरोनि उजवे हाती | नाचे कली अतिप्रीती | दोषोत्तरें करी स्तुति | पुण्यपापसंमिश्रित || ७९ ||

वांकुल्या दावी हांसे रडे | जिव्हा तोंड करुनि वांकुडे | उभा ठेला ब्रह्मयापुढे | काय निरोप म्हणतसे || ८० ||

देखोनि तयाचें लक्षण | ब्रह्मा हांसे अतिगहन | पुसतसे अति विनोदाने | लिंग जिव्हा कां धरिली || ८१ ||

कलियुग म्हणे ब्रह्मयासी | जिंकीन समस्त लोकांसी | लिंग जिव्हा रक्षणारांसी | हारी असे आपणांते || ८२ ||

याकारणें लिंग जिव्हा | धरोनि नाचें ब्रह्मदेवा | जेथें जाईन मी स्वभावा | आपण न भिये कवणिया || ८२ ||

ऐकोन कलींचे वचन | निरोप देतो ब्रह्मा आपण | भूमीवरी जाऊन | आपुले गुण प्रकाशी || ८४ ||

कलि म्हणे ब्रह्मयासी | मज पाठवितां भूमीसी | आपुले गुण आहेत कैसी | सांगेन ऐका स्वामिया || ८५ ||

छेद करीन धर्मासी | आपण असें निरंकुशी | निरानंद परियेसी | निद्रा-कलह माझे प्राण || ८६ ||

परद्रव्यहारक परस्त्रीरत | हे दोघे माझे भ्रात | प्रपंच-मत्सर-दंभक | प्राणसखे माझे असती || ८७ ||

बकासारिखे संन्यासी | तेचि माझे प्राण परियेसी | छळ करोनि उदरासी | मिळविती पोषणार्थ || ८८ ||

तेचि माझे सखे प्राण | आणीक असतील पुण्यजन | तेचि माझे वैरी जाण | म्हणोनि विनवी ब्रह्मयासी || ८९ ||

ब्रह्मा म्हणे कलियुगासी | सांगेन तुज उपदेशी | तुझ्या युगीं आयुष्य नरासी | स्वल्प असे एक शत || ९० ||

पूर्व युगायुगीं देखा | आयुष्य बहु मनुष्यलोकां | तप अनुष्ठान ऐका | करिती अनेक दिवसवरी || ९१ ||

मग होय तयांसी गति | आयुष्य असे अखंडिती | याकारणें कष्टती क्षिती | बहु दिवसपर्यंत || ९२ ||

आतां ऐसे नव्हे जाण | स्वल्प आयुष्य मनुष्यपणें | करिती तप अनुष्ठानें | शीघ्र पावती परमार्था || ९३ ||

जे जन असती ब्रह्मज्ञानी | पुण्य करिती जाणोनि | त्यांसी तुवां साह्य होऊनि | वर्तत असे म्हणे ब्रह्मा || ९४ ||

ऐकोनि ब्रह्मयाचे वचन | कली म्हणतसे नमून | स्वामींनी निरोपिले जे जन | तेचि माझे वैरी असती || ९५ ||

ऐसे वैरी जेथ असती | केवीं जाऊं तिये क्षिती | ऐकतां होते मज भीति | केवीं पाहू तयांसी || ९६ ||

पंचाशत भूमंडळात | भरतखंडीं पुण्य बहुत | मातें मारितील देखत | कैसा जाऊं म्हणतसे || ९७ ||

ऐकोनि कलीचें वचन | ब्रह्मा निरोपी हांसोन | काळात्म्यातें मिळोन | तुवां जावें भूमीसी || ९८ ||

काळात्म्याचे ऐसे गुण | छेदन करील धर्मवासना | पुण्यात्म्याचे अंत:करता | उपजेल बुद्धि पापाविषयी || ९९ ||

कली म्हणे ब्रह्मयासी | वैरी सांगेन माझे कैसी | वसताति भूमंडळासी | सांगेन स्वामी  ऐक पां || १०० ||

उपद्रविती मातें बहुत | कृपा न ये मज देखत | जे जन शिवहरि ध्यात | धर्मरत मनुष्य देखा || १०१ ||

आणिक असती माझे वैरी | वास करिती गंगातीरीं | आणिक वाराणशीपुरीं | जाऊनि धर्म करिती देखा || १०२ ||

तीर्थे हिंडती आ-चरण | आणिक ऐकती पुराण | जे जन करिती सदा दान | तेचि माझे वैरी || १०३ ||

ज्यांचे मनी असे शांति | तेचि माझे वैरी ख्याति | अदांभिकपणे पुण्य करिती | त्यांसी देखतांचि भीतसे || १०४ ||

नासाग्रीं दृष्टि देऊनी | जप करिती अनुष्ठानीं | त्यांसि देखतांचि नयनीं | प्राण माझा जातसे || १०५ ||

स्त्रियापुत्रांवरी प्रीति | मायापाशें आचरती | त्यांवरी माझी बहु प्रीति | परम इष्ट माझे जाणा || १०६ ||

वेदशास्त्रांते दूषिती | हरिहरांतें भेद पाहती | अथवा शिवविष्णू दूषिती | परम आप्त माझे जाणा || १०७ ||

जितेन्द्रिय असतील जे नर | सदा भजती हरिहर | रागद्वेषविवर्जित धीर | त्यांसि देखतां मज भय || १०८ ||

ब्रह्मा म्हणे कलियुगासी | तुझा प्रकाश बहुवसीं | तुवां जातांचि भूमीसी | तुझें इच्छें रहाटती || १०९ ||

एखादा विरळागत | होईल नर पुण्यवंत | त्यातें तुवा साह्य होत | वर्तत असें म्हणे ब्रह्मा || ११० ||

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन | कली करीतसे नमन | करसंपुट जोडोन | विनवीतसे परियेसा || १११ ||

माझा स्वभाव-दुर्वृत्तीसी | केवीं साह्य होऊं धर्मासी | सांगा स्वामी उपाय यासी | कवणेपरि रहाटावे || ११२ ||

कलीचे वचन ऐकोनि | ब्रह्मा हांसे अतिगहनी | सांगतसे विस्तारोनि | उपाय कलीसी रहाटावया || ११३ || 

काळ-मल असती दोनी | तुज साह्य होऊनि | येत असती  निर्गुणी | तेचि दाविती तुज मार्ग || ११४ ||

निर्मळ असती जे जन | तेचि तुझे वैरी जाण | मळमूत्रें वेष्टिले जन | तुझें इष्ट परियेसीं || ११५ ||

याचि कारणे पापपुण्यासी | विरोध असे परियेसीं | अधिक होय पुण्यराशी | तेचि जिंकिती परियेसा || ११६ ||

याकारणें विरळागत | होईल नर पुण्यवंत | तेंचि जिंकिती हें निश्चित | बहुतेक तुज वश्य होती || ११७ ||

एखादा विवेकी जन | तुझा उपद्रव साहील पूर्ण | जो न साहे तुझे दारुण | तुज वश्य जाण जाहला || ११८ ||

या कलियुगाभीतरीं | जन होतील येणेंपरीं | जे जन साहतील तुझी क्रूरी | तेंचि ईश्वरी ऐक्य होती || ११९ ||

ऐकोनि ब्रह्मयाचें वचन | कलियुग करितसे प्रश्न | कैसें साधूचें अंत:करणं | कवण अंश निरोपावें || १२० ||

ब्रह्मा म्हणे तये वेळी | एकचित्ते ऐक कली | सांगेन ऐका श्रोते सकळी | सिद्ध म्हणे शिष्यासी || १२१ ||

धैर्य धरोनि अंत:करण | शुद्ध बुद्धी वर्तती जन | दोष न लागती कधी जाण | लोभवर्जित नरांसी || १२२ ||

जे जन भजती हरिहरांसी | अथवा असती काशीवासी | गुरु सेविती निरंतरेसीं | त्यांसी तुझा न लगे दोषु || १२३ ||

मातापितासेवकांसी | अथवा सेवी ब्राह्मणासी | गायत्रि कपिला-धेनूसी | भजणारांसी न लगे दोष तुझा || १२४ ||

वैष्णव अधवा शैवासी | जे सेविती नित्य तुळसीसी | आज्ञा माझी आहे ऐसी | तयांसी बाधूं नको || १२५ ||

गुरुसेवक असती नर | पुराण श्रवण करणार | सर्वसाधनधर्मपर | त्यांसी तूं बाधों नको || १२६ ||

सुकृती-शास्त्रपरायणांसी | गुरुतें सेविती वंशोवंशी | विवेके धर्म करणारांसी | त्यांते तुवां बाधूं नको || १२७ ||

कलि विनवी ब्रह्मयासी | 'गुरु' शब्द म्हणजे आहे कैसी | कवण गुरु स्वरुप कैसी | विस्तारावे मजप्रति || १२८ ||

सिद्धमुनींचे कथन-

ब्रह्मदेव कलीला गुरुमहिमा सांगतात

ऐकोनि कलीचें वचन | ब्रह्मा सांगतसे आपण | 'ग' कार म्हणजे सिद्ध जाण | रेफ: पापस्य दाहक: || १२९ ||

'उ' कार विष्णु अव्यक्त | ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित | त्रितयात्मक श्रीगुरु सत्य | म्हणोनि सांगे कलीसी || १३० ||

गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वित: | 

वर्णद्वयात्मको मन्त्रश्चतुर्वर्गफलप्रद: || १३१ ||

गणेशातें म्हणती गुरु | तैसाचि असे वैश्वानरु | ऐसाचि जाण शार्ङ्गधरु | गुरुशब्द वर्ते इतुके ठायीं || १३२ ||

गुरु: पिता गुरुर्माता गुरुरेव पर: शिव: |

शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन || १३३ ||

गुरु पिता, गुरु माता | गुरु शंकरु निश्चिता | ईश्वर होय जरी कोफ्ता | गुरु रक्षील परियेसा || १३४ ||

गुरु कोपेल एखाद्यासी | ईश्वर न राखे परियेसीं | ईश्वर कोपेल जरी त्यासी | श्रीगुरु राखेल निश्चित || १३५ ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्दैवो महेश्वर: | गुरुरेव परं तत्त्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत् || १२६ ||

गुरु ब्रह्मा सत्य जाण | तोचि रुद्र महाविष्णु | गुरुचि तत्त्व कारण | म्हणोनि गुरु आश्रावा || १३७ ||

हरौ प्रसन्नेSपि च वैष्णवा जना:, सम्प्रार्थयन्ते गुरुभक्तिमव्ययाम् |

गुरौ प्रसन्ने जगतामधीश्वर:, जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिद: || १३८ ||

ईश्वर जरी प्रसन्न होता | त्यासी होय गुरु ओळखविता | गुरु आपण प्रसन्न होतां | ईश्वर होय आधीन आपुल्या || १३९ ||

गुरुं भजन्शास्त्रमार्गान् प्रवेत्ति, तीर्थं व्रतं योगतपादिधर्मान् | 

आचारवर्णादिविवेकयज्ञान्, ज्ञानं परं भक्तिविरागयुक्तम् || १४० ||

याकारणें श्रीगुरुसी | भजावें शास्त्रमार्ग ऐसी | तीर्थव्रतयोगतपासी | ज्योति:स्वरूप असे जाणा || १४१ ||

आचारधर्मवर्णाश्रमांसी | विवेकी कर्ममार्गासी | भक्तिविरागयुक्तांसी | गुरुचि मार्ग दाखविणार || १४२ ||

इतुके ऐकोनि कलि आपण | विनवीतसे कर जोडून | गुरु सर्व देवांसमान | केवी झाला सांग मज || १४३ ||

ब्रह्मा म्हणे कलीसी | सांगेन तुज विस्तरेसीं | एकचित्ते परियेसीं | गुरुविणें पार नाहीं || १४४ ||

गुरुं विना न श्रवणं भवेत्कस्यापि कस्यचित् |

विनाकर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत्  || १४५ ||

गुरुवीण समस्तांसी | श्रवण कैचें परियेसीं | श्रवण होतां मनुष्यांसी | समस्त शास्त्रें ऐकतीं  || १४६ ||

शास्त्रें ऐकता परियेसीं | तरतील संसारापाशीं | याकारणे गुरुचि प्रकाशी | ज्योति:स्वरूप जाणावा || १४७ ||

गुरु सेवितां सर्व सिद्धि | होती परियेसा सर्व ऋद्धि | कथा वर्तली अनादि | अपूर्व तुज सांगेन || १४८ ||

गुरुनिष्ठ दीपकाची कथा:

पूर्वी गोदावरीचे तीरीं | अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी | वृक्ष असती नानापरी | पुण्य नाभीमृग वसती || १४९ ||

ब्रह्माऋषि आदिकरोनी | तप करिती तया स्थानी | तयांत 'वेदधर्म' म्हणोनि  पैलपुत्र होता द्विज || १५० ||

तया शिष्य बहु असती || वेदशास्त्र अभ्यासिती || त्यांत 'दीपक' म्हणिजे ख्याति || शिष्य होता परियेसा || १५१ ||

होता शिष्य गुरुपरायण || केला अभ्यास शास्त्रपुराण || झाला असे अतिनिपुण | तया गुरु सेवा करितां || १५२||

वेदधर्म एके दिनी | समस्त शिष्यांसी बोलावुनी | पुसतसे संतोषोनि | ऐका सकळजन || १५३ ||

बोलावून  शिष्यांसी ।| म्हणे गुरु परियेसी । प्रीति असेल जरी तुम्हांसी । तरी माझे वाक्य परिसावें ॥ १५४ ॥

शिष्य म्हणती गुरुसी | जें जें स्वामी निरोप देसी | अंगीकारुं भरंवसी | आम्हांसी तूं तारक || १५५ ॥

गुरुचें वाक्य जो न करीं | तोचि पडे रौरव-घोरीं || अविद्यामायासागरीं । बुडोन जाय तो नर ॥ १५६ ॥ 

मग तया कैंची गति । नरकीं पडे तो सततीं || गुरु तारक हे ख्याति | बोलती वेदपुराणें || १५७ || 

ऐकोनि शिष्यांचे वचनी | संतोष जाहला वेदधर्म मुनि | संदीपकांतें बोलावूनि | सांगतसे परियेसा || १५८ ||

ऐका हो शिष्य सकळिक | आमचें पूर्वार्जित असे एक | जन्मांतरी सहस्रेक | केलें होतें महापातक || १५९॥

आमुचें अनुष्ठान करितां | बहुत गेलें प्रक्षाळितां | कांहीं शेष असे आतां | भोगिल्यावांचूनि न सुटे जाणा ||१६०॥

तपसामर्थ्ये जरी उपेक्षा करित || तरी पाप मोक्षासी आड रिघत | याचि कारणें निष्कृति करित | तया पापघोरासी || १६१||

न भोगितां आपुले देही | आपले पापा निष्कृती नाही  | हे निश्चय करोनि पाहीं | भोगावें आम्हीं परियेसा || १६२||

या पापाचे निष्कृतीसी || जावें आम्हीं वाराणशींसी | जाईल पाप शीघ्रतेसीं | प्रख्यात असे अखिल शास्त्रीं || १६३ ||

याकारणें आपणासी | न्यावें वाराणसी पुरीसी | पाप भोगीन स्वदेहासीं | मातें तुम्हीं सांभाळावें || १६४ ||

या समस्त शिष्यांत | कवण असेल समर्थ | अंगीकारावें त्वरित | म्हणोनि पुसे शिष्यांसी || १६५ ||

या शिष्यांमध्ये एकु | नाम असे 'संदीपकु' | बोलतसे अतिविवेकु | तया गुरुप्रति देखा || १६६ ||

दीपकु म्हणे श्रीगुरुसी | पाप करितां देह नाशी | न करावा संग्रहो दु:खासी | शीघ्र करावा प्रतीकारु || १६७ ||

वेदधर्म म्हणे तयासी | दृढ-देह असतां मनुष्यासी | क्षालन करावें पापासी | अथवा वाढे विषापरी || १६८ ||

अथवा तीर्थ-प्रायश्चित्त | अपुले देहीं भोगोनि त्वरित | पापावेगळे न होता निरुते | आपुले आपण न भोगितां || १६९ ||

देव अथवा ऋषेश्वरांसी | मनुष्यादि जंतूंसी | क्षालन न होय पापासी| आपुले आपण न भोगिता || १७० ||

दीपक म्हणे गुरुसी | स्वामी निरोपावें आपणासी | सेवा करीन स्वशक्तीसी | न करितां अनुमान, सांगिजे || १७१ ||

ऐकोनि दीपकाचे वचन | वेदधर्म म्हणे आपण | कुष्ठी होईन अंगहीन | अंध पांगुळ परियेसा || १७२ ||

संवत्सर एकविंशत | मातें सांभाळावे बहुत | जरी असेल दृढ-व्रत | तरीच अंगीकार करावा || १७३ ||

दीपकु म्हणे गुरुसी | कुष्ठी होईन आपण हर्षी | अंध होईन एकवीस वर्षी | पापनिष्कृति करीन || १७४ ||

तुमचे पापाची निष्कृति । मी करीन निश्र्चतीं ।स्वामी निरोपावें त्वरिती । म्हणोनि चरणीं लागला ॥ १७५ ॥

ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला वेदधर्म मुनि आपण । सांगतसे विस्तारोन । लक्षण तया पापाचें ॥ १७६ ॥

आपुलें पाप आपणासी । नोहे पुत्रशिष्यांसी । न भोगितां स्वदेहासी । नवचे पाप परियेसा ॥ १७७ ॥

याकारणें आपण देखा । भोगीन आपुले पापदुःखा । बापा आम्हांसी सांभाळीं तूं दीपका । एकवीस वर्षेपर्यंत ॥ १७८ ॥

जे पीडिती रोगें देखा । प्रतिपाळणारासी कष्ट अधिका । मजहूनि संदीपका । तुज कष्ट अधिक जाण ॥ १७९ ॥

याकारणें आपुले देहीं । भोगीन पाप निश्र्चयीं। तुवां प्रतिपाळावें पाहीं । काशीपुरीं नेऊनियां ॥ १८० ॥

तया काशीपुरीं जाण । पापावेगळा होईन । आपण शाश्र्वतपद पावेन । तुजकरितां शिष्योत्तमा ॥ १८१ ॥

दीपकु म्हणे श्रीगुरुसी । अवश्य नेईन पुरी काशी ।सेवा करीन एकवीस वर्षी । विश्र्वनाथासम तुम्ही ॥ १८२ ॥

ब्रह्मा म्हणे कलीसी । एक शिष्य होता कैसा त्यासी । कुष्ठ होतांचि गुरुसी । नेलें काशीपुराप्रति ॥ १८३ ॥

मनकर्णिका उत्तरदिशीं । कंबळेश्र्वर-संनिधेसी ।राहिले तेथें परियेसीं । गुरु शिष्य दोघेजण ॥ १८४ ॥

स्नान करुनि मनकर्णिकेसी । पूजा करिती विश्र्वेशासी । प्रारब्धभोग त्या गुरुसी । भोगीत होता तया स्थानीं ॥ १८५ ॥

कुष्ठरोगें व्यापिलें बहुत । अक्षहीन अति दुःखित ।संदीपक सेवा करित । अतिभक्तीकरुनि ॥ १८६ ॥

व्यापिलें देहीं कुष्ठ बहुत । पू कृमि पडे रक्त । दुःखे व्यापला अत्यंत । अपस्मारी झाला जाण ॥ १८७ ॥

भिक्षा मागोनि संदीपकु । गुरुसी आणोनि देत नित्यकु । करी पूजा भावें एकु । विश्र्वनाथस्वरुप म्हणत ॥ १८८ ॥

रोगेंकरुनि पीडिती नरु । साधुजन होती क्रूरु ।तेचि रीतीं द्विजवरु । होय क्रूर व्याधिबळें ॥ १८९ ॥

भिक्षा आणितां एके दिनीं । न जेवी श्रीगुरु कोपेनीं । स्वल्प आणिलें म्हणोनी । क्लेशें सांडोनि देत भूमीवरी ॥ १९० ॥

येरे दिवशीं जाऊनि शिष्य । आणी अन्न बहुवस ।मिष्टान्न नाणिसी म्हणोनि क्लेश । करिता झाला परियेसा ॥ १९१ ॥

परोपरीचीं पक्वान्नें । कां नाणिशी म्हणे । जाय, कोपें मारुं ये आपण । शाका परोपरी मागतसे ॥ १९२ ॥

तितुकेंही आणी मागोनियां । सर्वस्व करीतसे वायां । कोपें देतसे शिविया । परोपरी परियेसा ॥ १९३ ॥

एखादें समयीं शिष्यासी । म्हणे ताता ज्ञानराशी ।मजनिमित्त कष्टलासी । शिष्योत्तम-शिखामणी ॥ १९४ ॥

सवेंचि म्हणे पापी क्रूरा । मातें गांजिलें अपारा । पू-मांस विण्मूत्रा । क्षणाक्षणां धूत नाही ॥ १९५ ॥

खाताति मज मक्षिका । कां न निवारिसी संदीपका । सेवा करितां म्हणे ऐका । भिक्षा नाणिसी म्हणतसे ॥ १९६ ॥

याकारणें पापगुण । ऐसेंचि असे जाण । वोखटें वाक्य निर्गुण । पाप म्हणोनि जाणावें ॥ १९७ ॥

पाप जेथें असे बहुत । दैन्य मात्सर्यसहित वसत ।शुभाशुभ नेणे क्वचित । पापरुप तें जाणावें ॥ १९८ ॥

एखादे दैत्यकासी । दुःखप्राप्ति होय कैसी ।अपस्मार होय जयासी । पापरुप तोचि जाणा ॥ १९९ ॥

समस्त रोग असती देखा । कुष्ठ-सोळा भाग नव्हती का । वेदधर्म द्विजु ऐका । कष्टतसे येणेपरी ॥ २०० ॥

ऐसे गुरुचे गुणदोष । मना नाणी तो शिष्य । सेवा करी एकमानस । तोचि ईश्र्वर म्हणोनि ॥ २०१ ॥

जैसे जैसें मागे अन्न । आणूनि देतो परिपूर्ण । जैसा ईश्र्वर असे विष्णु । तैसा गुरु म्हणतसे ॥ २०२ ॥

काशीसारखे क्षेत्र असतां । कदा न करी तीर्थयात्रा । न वचे देवाचिये यात्रा । गुरुसेवेवांचूनि ॥ २०३ ॥

न तीर्थयात्रा न च देवयात्रा, 

न देहयात्रा न च लोकयात्रा ।

अहर्निशं ब्रह्महरीबुद्धया, 

गुरुं प्रपन्नो नहि सेव्यमन्यत ॥ २०४ ॥

आपुला देह संरक्षण । कधी न करी शिष्यराणा ।लय लावूनि श्रीगुरुचरणा । कवणासवें न बोलेचि ॥ २०५ ॥

अहोरात्र येणेपरी । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारि । गुरुचे होय निर्धारीं । म्हणोनि सेवा करीतसे ॥ २०६ ॥

गुरु बोले निष्ठुरेसीं । आपण मनी संतोषी । जें जें त्याचे मानसीं । पाहिजे तैसा वर्ततसे ॥ २०७ ॥

वर्ततां येणेपरी देख । प्रसन्न होवोनि पिनाक ।येवोनि उभा सन्मुख । वर माग म्हणतसे ॥ २०८ ॥

अरे गुरुभक्ता दीपका । महाज्ञानी कुलदीपका ।तुष्टलों तुझे भक्तीसी निका । प्रसन्न झालों माग आतां ॥ २०९ ॥

दीपक म्हणे ईश्र्वरासी । हे मृत्युंजय व्योमकेशी ।न पुसतां आपण गुरुसी । वर न घें परियेसा ॥ २१० ॥

म्हणोनि गेला गुरुपाशीं । विनवीतसे तयासी ।विश्र्वनाथ आम्हांसी । प्रसन्न होऊनि आलासे ॥ २११ ॥

निरोप झालिया स्वामीचा । मागेन उपशम व्याधीचा । वर होतां सदाशिवाचा । होईल बरवें तुम्हांसी ॥ २१२ ॥

ऐकोनि शिष्याचे वचन । बोले गुरु कोपोन । माझे व्याधीनिमित्त जाण । नको प्रार्थूं ईश्र्वरासी ॥ २१३ ॥

भोगिल्यावांचोनि । निवृत्ति नव्हे गा परियेसीं ।जन्मांतरी बाधिती ऐसी । धर्मशास्त्र असे जाण ॥ २१४ ॥

मुक्ति-अपेक्षा ज्याचे मनीं । निवृत्ति करावी पापधुनी । शेष राहिलिया निर्गुणी । विघ्न करी मोक्षासी ॥ २१५ ॥

ऐसेपरी शिष्यासी । गुरु सांगे परियेसीं । निरोप पुसोनि श्रीगुरुसी । गेला ईश्र्वरासन्मुख ॥ २१६ ॥

जाऊनि म्हणे ईश्र्वरासी । नलगे वर आपणासी ।नये गुरुचे मानसीं । केवीं घेऊं म्हणतसे ॥ २१७ ॥

विस्मय करोनि व्योमकेशी । गेला निर्वाणमंटपासी । बोलावून समस्त देवांसी । सांगे वृत्तांत विष्णूपुढ़ें ॥ २१८ ॥

श्रीविष्णु म्हणे शंकरास । कैसा गुरु कैसा शिष्य ।कोठे त्यांचा असे वास । सांगावें मज प्रकाशोनि ॥ २१९ ॥

सांगे ईश्र्वर विष्णूसी । आश्र्चर्य देखिलें परियेसीं ।दीपक ‘ म्हणिजे बाळ कैसी । गुरुभक्ति करितो अभिनव ॥ २२० ॥

गोदावरीतीरवासी । ‘ वेदधर्म ‘ म्हणिजे तापसी ।त्याची सेवा अहर्निशी । करितो भावें एकचित्तें ॥ २२१ ॥

न ऐकिला देखिला कोणीं । गुरुभक्ति करणार निर्वाणी । त्यातें देखोनि माझे मनीं । अतिप्रीति वर्ततसे ॥ २२२ ॥

वर देऊं म्हणोनि आपणु । गेलों होतों ऐक विष्णु ।गुरुचा निरोप नाहीं म्हणोनु । न चे वर परियेसा ॥ २२३ ॥

अनेक दिव्य सहस्त्रवर्षी । तप करिती महाऋषि ।वर मागती अहर्निशी । नाना कष्ट करोनियां ॥ २२४ ॥

तैसे तापसी योगियांसी । नव्हे मन वर द्यावयासी ।बलात्कारें देतां कैसी । वर न घे तो दीपक ॥ २२५ ॥

तनुमन गुरुसी समर्पूनि । सेवा करितो संतोषोनि ।त्रिमूर्ति गुरुचि म्हणोनि । निश्र्चय केला मानसीं देखा ॥ २२६ ॥

समस्त देव माता पिता । गुरुचि होय ऐसें म्हणतां । निश्र्चय केला असे चित्ता । गुरु परमात्मा म्हणोनि ॥ २२७ ॥

किती म्हणोनि वर्णूं त्यासी । अविद्या-अंधकारासी । तोचि दीप परियेसीं । कुलदीपक नाम सत्य ॥ २२८ ॥

धर्म ज्ञान सर्व एक । गुरुचि म्हणे तो दीपक ।चरणसेवा मनःपूर्वक । करितो गुरुची भक्तीनें ॥ २२९ ॥

इतुकें एकोनि शार्ङगधरु । पहावया गेला शिष्य-गुरु । त्यांचा भक्तिप्रकारु । पाहता झाला तये वेळीं ॥ २३० ॥

सांगितले होतें विश्र्वनाथें । अधिकत्व दिसे आणिक बहुतें । संतोषोनि दीपकातें । म्हणे विष्णु परियेसा ॥ २३१ ॥

बोलावूनि दीपकासी । म्हणतसे हृषीकेशी । तुष्टलों तुझ्या भक्तीसी । वर माग म्हणतसे ॥ २३२ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । काय भक्ति देखोनि आम्हांसी । वर देसी परियेसीं । कवण कार्या सांग मज ॥ २३३ ॥

दिव्य कोटी सहस्त्र वरुषीं । तप करिती अरण्यवासी । त्यांसी करितोसि उदासी । वर नेदिसी नारायणा ॥ २३४ ॥

मी तर तुज भजत नाहीं । तुझें नामस्मरण नाहीं ।बलात्कारें येवोनि पाहीं । केवीं देसी वर मज ॥ २३५ ॥

ऐकोनि दीपकाचें वचनु । संतोषी जाहला महाविष्णु । सांगतसे विस्तारोनु । तया दीपकाप्रती देखा ॥ २३६ ॥

गुरुभक्ति करिसी निर्वाणेसीं । म्हणोनि जाहलों संतोषी । जे भक्ति केलीस गुरुसी । तेचि आम्हांसी पावली ॥ २३७ ॥

जो नर असेल गुरुभक्त जाण । तोचि माझा असे प्राण । त्यासी वश्य झालों आपण । जें जें मागेल तें तें म्यां द्यावें ॥ २३८ ॥

सेवा करिती मातापितीं । तेचि सेवा मज पावती ।पतिसेवा स्त्रिया करिती । तेचि मज पावतसे ॥ २३९ ॥

एखादे भल्या ब्राम्हणासी । यति-योगेश्र्वर-तापसी । नमन करिती भक्तीसीं । तेंचि मज पावे जाणा ॥ २४० ॥

ऐसें ऐकोनि दीपक । नमिता झाला आणिक ।विनवीतसे ऐक । सिद्ध म्हणे द्विजासी ॥ २४१ ॥

ऐक विष्णु हृषीकेशी । निश्र्चय असे माझे मानसीं । वेदशास्त्रादिमीमांसी । गुरु आम्हांसी देणार ॥ २४२ ॥

गुरुपासोनि सर्व ज्ञान । त्रयमूर्ति होती आम्हां अधीन । आमुचा देव गुरुचि जाण । अन्यथा नाहीं आपणासी ॥ २४३ ॥

सर्व देव सर्व तीर्थ । गुरुचि आम्हां असे सत्य ।त्याचेनि आम्हां परमार्थ । केवीं दूर असे सांग ॥ २४४ ॥

समस्त योगी सिद्धजन । गुरुवांचूनि नाही ज्ञान ।ज्ञान होतांचि ईश्र्वर आपण । केवीं दूर असे सांग मज ॥ २४५ ॥

जो वर द्याल तुम्ही मज । श्रीगुरु देतां काय चोज ।याकारणें श्रीगुरुराज । भजतसें परियेसा ॥ २४६ ॥

संतोषोनि महाविष्णु । म्हणे धन्य धन्य माझा प्राणु । तूंचि शिष्य शिरोरत्न । भोळा भक्त तूंचि माझा ॥ २४७ ॥

कांहीं तरी माग आतां । वर देईन सर्वथा ।विश्र्वनाथ आला होता । दुसरेन आलों आपण देखा ॥ २४८ ॥

आमचे मन संतोषी । वर माग जो तुझे मानसीं ।आम्ही जाहलों तुज वशी । जें पाहिजे तें देऊं आतां ॥ २४९ ॥

दीपक म्हणे विष्णूसी । जरी वर आम्हां देसी ।गुरुभक्ति होय अधिक मानसीं । तैसें ज्ञान आणिक द्यावें ॥ २५० ॥

गुरुस्वरुप आपण ओळखें । तैसे ज्ञान देईं सुखें ।यापरतें न मागें आणिकें । म्हणोनि चरणीं लागला ॥ २५१ ॥

दिधला वर शार्ङगपाणी । संतोषोनि बोले वाणी ।ऐके दीपक शिष्यशिरोमणि । माझा प्राणसखा होसी ॥ २५२ ॥

तुवा ओळखिलें गुरुसी । देखिलें दृष्टीं परब्रह्मासी । आणीक जरी आम्हां पुससी । सांगेन ऐक एकचित्तें ॥ २५३ ॥

लौकिक सुबुद्धि असे जैशी । धर्माधर्मसुमनेसी ।उत्कृष्टाहूनि उत्कृष्टेसीं । स्तुति करीं गा श्रीगुरुतें ॥ २५४ ॥

जे जे समयी श्रीगुरुसी । तूं भक्तीनें स्तुति करिसी । तेणें आम्ही होऊं । तेंचि आमुची स्तुति जाण ॥ २५५ ॥

वेद वाचिती साङगेसी । वेदान्त-भाष्य अहर्निशी ।वाचिती जन भक्तीसीं । आम्हां पावे निर्धारीं ॥ २५६ ॥

बोलती वेद सिद्धांत । गुरुचि ब्रह्म ऐसें म्हणत ।याचिकारणें गुरु भजतां । सर्व देव तुज वश्य ॥ २५७ ॥

‘ गुरु ‘ म्हणजे अक्षरें दोन । अमृताचा समुद्र जाण । तयामध्यें बुडतांचि क्षण । केवीं होय परियेसा ॥ २५८ ॥

जयाचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । तोचि त्रैलोक्यपूज्य जाण । अमृतपान सदा सगुण । तोचि शिष्य अमर होय ॥ २५९ ॥

यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि ।अनुग्रहो भवेन्नृणां सेव्यते सद्गुरुस्तदा ॥ २६० ॥

आपण अथवा ईश्र्वरु । ब्रह्मा देत जो का वरु ।फलप्राप्ति होय गुरु । गुरु त्रिमूर्ति याचिकारणें ॥ २६१ ॥

ऐसा वर दीपकासी । दिधला विष्णूनें परियेसीं ।ब्रह्मा सांगतसे कलीसी । एकचित्तें परियेसा ॥ २६२ ॥

वर लाधोनियां दीपक । गेला गुरुचे सन्मुख ।पुसतसे गुरु ऐक । तया शिष्या दीपकासी ॥ २६३ ॥

ऐक शिष्या कुळदीपका । काय दिधलें विनायकें ।विस्तारोनि सांगे निकें । माझें मन स्थिर होय ॥ २६४ ॥

दीपक म्हणे गुरुसी । वर दिधला हृषीकेशीं । म्यां मागितलें ऐसी । गुरुभक्ति व्हावी म्हणोनि ॥ २६५ ॥

गुरुची सेवा तत्परेसीं । अंतःकरणीं दृढ शुद्ध ऐशी । वर दिधला संतोषीं । दृढभक्ति तुमचे चरणीं ॥ २६६ ॥

संतोषोनि तो गुरु । प्रसन्न झाला साक्षात्कारु ।जीविते होय तूं स्थिरु । काशीपुरीं वास करीं ॥ २६७ ॥

तुझे वाक्यें सर्वसिद्धि । तुझे द्वारीं नवनिधि ।विश्र्वनाथ तुझे स्वाधी । म्हणे गुरु संतोषें ॥ २६८ ॥

तुझे स्मरण जे करिती । त्यांचे कष्ट निवारण होती । श्रियायुक्त ते नांदती । तुझ्या स्मरणमात्रेसीं ॥ २६९ ॥

येणेपरी शिष्यासी । प्रसन्न झाला परियेसीं ।दिव्यदेह तत्क्षणेसीं । झाला गुरु वेदधर्म ॥ २७० ॥

शिष्याचा पहावया वासु । कुष्ठी झाला होता क्लेशु । तो तापसी अतिविेशेषु । त्यासी कैंचें पाप राहे ॥ २७१ ॥

लोकानुग्रह करावयासी । गेला होता पुरी काशीं ।काशीक्षेत्रमहिमा आहे ऐसी । पाप जाय सहस्त्रजन्मींचे ॥ २७२ ॥

तया काशीनगरांतु । धर्म अथवा अधर्म-रतु । वास करिती नर क्वचितु । पुनर्जन्म नाहीं जाणा ॥ २७३ ॥

सूत म्हणे ऋषीश्र्वरासी । येणेंपरी कलीसी । सांगे ब्रह्मा परियेसीं । शिष्यदीपकआख्यान ॥ २७४ ॥

सिद्ध म्हणे नामकरणी । दृढ मन असावें याचिगुणीं । तरीच तरेल भवार्णी । गुरुभक्ति असे ॥ २७५ ॥

यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा यस्य महात्मनः ।

तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति ॥ २७६ ॥

दृढ भक्ति असे जयापाशीं । त्रिकरणसह मानसीं ।

तोचि लाधे ईश्र्वरासी । ईश्र्वर होय तया वश्य ॥ २७७ ॥

गंगाधराचा नंदनु । करीतसे श्रोतयां नमनु ।

न म्हणावें न्यून-पूर्ण । माझे बोबडे बोलांसी ॥ २७८ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्याने नाम द्वितीयोऽध्यायः ॥

🪔 🌺 🙏 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 🪔 🌺 🙏 


China Trip

  DAY 1 - Australia (or New Zealand) – Beijing, China May 22 Australia (or New Zealand) – Beijing, China Today, you'll depart to Beijing...