अगस्त्य ऋषी म्हणाले-
कामक्रोधादिकांनी जो पीडित | तो हिताचे नाही ऐकत | मरण इच्छिणाऱ्याला नाही रुचत | जसे औषध 💊 ॥अ. ३, ओ. १ ॥
हे नरश्रेष्ठा, मायावी दैत्य रावण सीतेला | समुद्रांतरी 🌊 घेऊन गेला | तिला परत आणायला | शक्य आहे का तुला? ॥अ. ३, ओ. २॥
देवता दारी 🚪 ज्याच्या | बांधल्या माकडांच्या 🐒 कळपासारख्या | चवऱ्या 🪭 ढाळण्यास देवस्त्रिया | ज्याच्यापाशी आहेत || अ. ३, ओ.३||
शंभूच्या वराने गर्व चढल्याने | त्रैलोक्य भोगतो निष्कंटकपणे. | त्याच्यावर जय मिळवणे | तुला शक्य कसे होईल? || अ.३, ओ.४ ||
शिवाच्या वराने उन्मत्त | झाला आहे ज्याचा पुत्र इंद्रजित | त्याच्यासमोर कितीदा युद्धांत | देवांनी पळ काढला || अ.३, ओ.५ ||
कुंभकर्ण नावाचा भ्राता ज्याचा | नाश करण्यास समर्थ देवांचा | दिव्यास्त्रांनी 🏹 सुसज्ज आणि चिरंजीव ज्याचा | दुसरा भ्राता बिभीषण || अ.३, ओ.६||
लंका नावाच्या ज्याच्या दुर्गास 🏯 | जिंकणे कठीण देवदानवांस | ज्याच्या चतुरंग सैन्यास | कोटींच्या संख्येत मोजावे लागते || अ.३, ओ.७||
नृपनंदना, अशा त्या रावणास | इच्छितोस एकट्याने जिंकण्यास | जसा बालक🧒 चंद्र 🌙 धरण्यास | प्रयत्न करतो || अ.३, ओ.८||
श्रीराम म्हणाला-
मुनिश्रेष्ठ, मी आहे क्षत्रिय धर्माने | माझी भार्या हरण केली राक्षसाने | निष्फळ नाही का माझे जगणे | जर मी लवकर मारले नाही त्या राक्षसाला ? || अ. ३, ओ.९ ||
तुमच्या या तत्त्वज्ञानाचे म्हणून | काही नाही मला प्रयोजन | कामक्रोधादिक करती दहन 🔥 | माझ्या या तनूला || अ.३, ओ.१०||
अहंकारही जीवनास माझ्या | सज्ज आहे नाश करण्या. | शत्रूने हरण केली असता भार्या | किंवा केला असता अपमान-|| अ.३, ओ.११ ||
-जो तत्त्वज्ञानाचा भुकेला असेल | तो नराधम समजावा या जगातील 🌎. | तेव्हा समुद्र 🌊 ओलांडून रणात रावणाचा वध करता येईल | असा उपाय सांगावा || अ. ३, ओ.१२||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
असे जर म्हणतोस | तर शरण जा त्या अविनाशी पार्वतीपतीस | तो पावता प्रसन्नतेस | इच्छिलेले देईल || अ.३, ओ.१३||
रावण जो जिंकता येईना | ब्रह्मा, विष्णू आणि देवादिकांना | तो शंकराच्या अनुग्रहाविना | तुला कसा मारता येईल? || अ.३, ओ.१४||
मी शिवाच्या विरजामार्गाचा आश्रय घेतला | त्याच मार्गाची 🛣️ दीक्षा मी देतो तुला | त्या मार्गाने त्यागून मर्त्यत्वाला 💀| तेजोमय 🚨 हो || अ. ३, ओ.१५ ||
याच्या योगाने रणात मारून सर्व शत्रूंस | पूर्ण करून सर्व इच्छांस | भोगून भूमंडलास 🌎| साधशील शिवाशी सायुज्यता || अ.३, ओ.१६ ||
सूत म्हणाला-
मग त्या मुनिश्रेष्ठांस | राम करून दंडवत् प्रणिपातास | पावून दु:खमुक्तीस | हर्षयुक्त अंत:करणाने म्हणाला-|| अ.३, ओ.१७||
श्रीराम म्हणाला-
हे मुने, मी झालो कृतार्थ फार | पूर्ण केलेत माझे मनोरथ पुरेपूर | पिऊन गेलात तुम्ही सागर 🌊| तुम्ही जर प्रसन्न माझ्यावर | काय दुर्लभ मला मुनिवर | विरजादीक्षेविषयी मला सांगा || अ. ३, ओ.१८ ||
अगस्त्य ऋषी म्हणाले-
करावा आरंभ या व्रतास | शुक्ल पक्षातील अष्टमी, एकादशी वा चतुर्दशीस | असताना सोमवार दिवस | साधून आर्द्रा नक्षत्र || अ.३, ओ.१९ ||
वायू, रुद्र, अग्नी 🔥 आणि परमेश्वर | या सर्वांहून जो थोर | श्रेष्ठांहून श्रेष्ठ खरोखर | अशा शिवाचे, || अ. ३, ओ.२०||
जो आहे उत्पत्तिस्थान ब्रह्मा, विष्णू, अग्नी 🔥 आणि वायू यांचे | ध्यान करून त्या सदाशिवाचे | (ज्ञानरूप) अग्नीने 🔥 आवसथ्य 🏠 (=घरातील) अग्नीचे | शुद्धीकरण करून (=गृहाग्नीमागील मूळ हेतू जाणून) - || अ.३, ओ.२१||
पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवून | त्यांच्या पाच, चार, तीन | इत्यादी मात्रांच्या (=गुणांच्या) विधिक्रमाने त्यांचे ध्यान करून | त्यापुढे- || अ.३, ओ.२२ ||
अमात्र अशा (=मोजता येणार नाही अशा) एकमात्रास (=ओंकाराच्या एकमेव ध्वनीस) | स्थिर करून द्वादशस्थानास (=भ्रुकुटीच्या थोडे वर) | प्राप्त करून अमरत्वास | पाशुपत व्रत आचरावे || अ. ३, ओ.२३||
हे पाशुपत व्रत मी करीन | असा प्रातःकालींच 🌄 संक्षेपाने संकल्प करून | आपल्या शाखेच्या विधीस अनुसरून | अग्निस्थापन 🔥 करावे || अ. ३, श्लो. २४ ||
स्नान करून शुचिर्भूत होऊन | शुभ्र वस्त्र, शुभ्र यज्ञोपवीत, शुभ्र फुलांच्या माळा माळून | श्वेतचंदनाची उटी लेऊन | धरून उपवास- || अ.३, ओ. २५||
होऊन एकाग्रचित्त | 'प्राणापानादि' विरजामंत्र जपत | अनुवाक (=पठण) संपेपर्यंत | समिधा, आज्य (=तूप), चरु (=शिजवलेला भात) इत्यादिकांचे हवन करावे || अ.३, ओ.२६ ||
'याते अग्ने' (=' हे अग्ने, तू ये') इत्यादी मंत्र उच्चारून | आत्म्याच्या ठिकाणी अग्नीची कल्पना करून | 'अग्निरिति' ('अग्निरिति भस्म' म्हणजे 'हे भस्म म्हणजे अग्नी आहे') इत्यादी मंत्र म्हणून | भस्म अंगाला लावावे || अ. ३, ओ. २७ ||
विद्वान होता भस्माच्छादित | महापातकांपासून होतो मुक्त | खरोखर होतो मुक्त | ह्यांत संशय नाहीं || अ. ३, ओ.२८ ||
भस्म हे अग्नीचे वीर्य जाण | त्यामुळे जो करतो भस्मधारण, भस्मस्नान | तो होतो वीर्यवान. | भस्मशयन करणारा होतो जितेंद्रिय, || अ.३, ओ.२९||
सर्व पापांतून होतो मुक्त | शिवाशी सायुज्यता करतो प्राप्त | तेव्हा तू आण आचरणात | तुला हे जे सांगितले || अ. ३, ओ.३० ||
आता मी शिवसहस्रनाम देतो तुला | ज्याने तुझी सर्व कार्ये जातील सिद्धीला. |
सूत म्हणाला-
असे बोलून अगस्त्य ऋषींनी रामाला | शिवसहस्रनाम दिले || अ.३, ओ.३१||
आणि रामाला केले कथन | 'हे सहस्त्रनाम वेदांचे सार जाण | प्रत्यक्ष शिवाचे रूप हे करते प्रदान | रात्रंदिवस जप कर याचा || अ.३, ओ.३२||
त्यामुळे भगवान (शिव) प्रसन्न होतील | आणि पाशुपतास्त्र तुला देतील | ज्यायोगे तू तुझ्या प्रियेला पुन्हा मिळवशील | शत्रूचा नाश करून || अ. ३, ओ. ३३ ||
सामर्थ्य एवढे त्या अस्त्राचे | की त्यायोगे तू शोषण करशील समुद्राचे 🌊 | ते अस्त्र आहे पार्वतीपतीचे | करण्याचे जगाचा 🌎 संहार || अ.३, ओ. ३४ ||
हे अस्त्र तुझ्याकडे नसेल तर | दानवांवर जय मिळवणे कठीण फार | म्हणून ते तू प्राप्त कर | शरण जाऊन शंकराला' | अ.३, ओ. ३५ ||
अशा प्रकारे वर दिल्याप्रमाणे श्रीपद्मपुराणातील शिवगीता या चांगल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील शिव आणि राघव यांच्या संवादातील 'विरजादीक्षानिरूपण' नावाचा तिसरा अध्याय पूर्ण झाला.
शब्दार्थ व टीपा:
१. सूदन (वि, ना.पुं)=नाश करणारा, मारणारा.
"किमु" = काय तर म्हणायचंच, काय शिल्लक राहतं?, मग काय उरतं?
श्लोक २१
ध्यात्वाग्निनाऽवसथ्याग्निं विशोध्य च पृथक्पृथक्' यामधील कल्पनेचे स्पष्टीकरण:
तात्त्विक आणि योगमार्गाशी संबंधित अर्थ:
1. ज्ञानाग्नी आणि कर्मकांड:
येथे "अग्नि" हा प्रतिकात्मक शब्द आहे.
ज्ञानाग्नि = आत्मज्ञानाचा अग्नी (म्हणजे विवेक, अंतरदृष्टी).
आवसथ्य अग्नि = बाह्य यज्ञात वापरला जाणारा अग्नी, म्हणजे कर्मकांड व विधीनिष्ठ धार्मिक क्रिया.
आवसथ्य अग्नी= आवास=घर, आवसथ्य= घरातील, वैदिक काळात घरात अग्नी प्रज्वलित ठेवीत. आवसथ्य अग्नी म्हणजे हा घरातील अग्नी.
2. वास्तविक साधना:
केवळ बाह्य यज्ञ (कर्मकांड) करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही.
त्यासाठी आवश्यक आहे की, ज्ञानाच्या अग्नीने बाह्य कर्मांची विशुद्धी करावी म्हणजे त्यांचा खरा हेतू ओळखावा.
पृथक पृथक = आत्मज्ञान आणि कर्म यामधील भेद ओळखावा, म्हणजे काय योग्य आहे आणि काय केवळ बाह्य प्रदर्शन आहे ते समजावं.
3. अंतर्गत परावर्तन:
इथे सांगितलं जातं की साधकाने आपली साधना बाह्य यज्ञापुरती मर्यादित न ठेवता, अंतर्मुख होऊन ज्ञानाचा अग्नी चेतवावा.
सारांश:
हे वाक्य सांगतं की केवळ कर्मकांडावर (बाह्य अग्नी) आधारित साधनेपेक्षा, ज्ञानरूपी अग्नीने त्या कर्मांचे परिशुद्धीकरण (विशोधन) केलं पाहिजे. तसेच, योग्य ते निवडण्यासाठी विवेक विकसित केला पाहिजे. हेच आत्मसाक्षात्काराच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे.
ज्ञानाच्या अग्नीने बाह्य यज्ञाचा अग्नी शुद्ध करावा आणि वेगळेपणा ओळखून त्यापासून स्वतःला अलग ठेवावं. केवळ बाह्य यज्ञ (कर्मकांड) करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. त्यासाठी आवश्यक आहे की, ज्ञानाच्या अग्नीने बाह्य कर्मांची विशुद्धी करावी म्हणजे त्यांचा खरा हेतू ओळखावा.
श्लोक २२
'ध्यात्वा गुणविधिक्रमात्'
पंचमहाभूतांचे गुण: रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द. पृथ्वीमध्ये हे सारे पाच (५) गुण आहेत. जलामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस (४) हे चार गुण, तेजामध्ये शब्द, स्पर्श, रूप हे तीन (३) गुण, वायूमध्ये शब्द, स्पर्श हे दोन (२) गुण, तर आकाशामध्ये शब्द हा एकच (१) गुण.
पंचमहाभूतांचे हे गुण जाणून त्याप्रमाणे त्यांचे ध्यान करावे
श्लोक २३
द्वादशान्तं व्यवस्थितम् – 'द्वादशान्त' म्हणजे बारा (१२) अंगुळे अंतर, म्हणजे भृकुटीच्या थोडं वर जिथे ध्यान एकाग्र केलं जातं.
स्थित्याम् स्थाप्य – त्या ठिकाणी (द्वादशान्तस्थानी) स्थिर करावे
एकमात्रम् अमात्रं – एकमात्र (ओंकाराचा एकमात्र ध्वनी) आणि अमात्र (ज्याला मोजता येणार नाही असा)
अमृतः भूत्वा – अमर, अविनाशी बनून
व्रतं पाशुपतं चरेत् – पाशुपत व्रताचे आचरण करावे
मराठी अर्थ (भावार्थासह):
एकमात्र आणि अमात्र अशा ओंकाराचा ध्यान करून, तो ध्वनी द्वादशान्त (म्हणजे भृकुटीच्या थोड्यावर असलेल्या स्थळी) स्थिर करावा. अशा प्रकारे अमर (मृत्यूरहित) बनून, पाशुपत व्रताचे पालन करावे.
समासत:=संक्षिप्तपणे.
श्लोक २४
'स्वशाखया'
"शाखा" हा शब्द वेदाच्या विविध भागांशी संबंधित आहे. उदा., ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे अनेक शाखा (उपविभाग) आहेत. प्रत्येक शाखेची विधी, मंत्र, उपासना पद्धती वेगळी असते. म्हणूनच, "स्वशाखया" याचा अर्थ — ज्या शाखेचा अभ्यास (शिक्षण) साधकाने केला आहे, त्या शाखेच्या परंपरेनुसार.
विमृज्य – चोळून
श्लोक २७-
"याते अग्ने याज्ञयातनूः" ह्या मंत्राने अग्नीचा आपल्या ठिकाणी समारोप करून भस्म घेऊन "अग्निरिति भस्म" इत्यादि मंत्रांनी अभिमंत्रण करून अंगांचे ठायीं लावावे. २७.
© Dr Hemant Junnarkar
All rights reserved
No comments:
Post a Comment