Sunday, May 12, 2024

रफीसाहेब, एक दंतकथा




रफीसाहेब, एक दंतकथा

सुशील जयवंत

रफीसाहेब आणि सोनिक ओमी:

रफीसाहेब  आणि सोनिक ओमी  हे  काका पुतण्या असणारे संगीतकार, अविभक्त भारतातील  पंजाबचे. सोनिक ओमींकडे गाणी गाताना रफीसाहेब म्हणत , ' ऐसा लगता है मैं अपने घर आया हूं.' रफीसाहेबांनी सोनिक  ओमींच्या ' दिल ने फिर याद किया' (१९६६) या पहिल्या चित्रपटातील गीते गाण्यासाठी  केवळ एक रुपया मानधन घेतले.     

---च्या घरी पैसे पाठवले:
साहेबांची   ---- यांच्याशी   ओळख झाली.  रफीसाहेबांना जेव्हा कळलं की त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तेव्हा त्यांनी आपल्या पीएला त्यांच्या आईवडिलांना पैसे पाठवण्यास सांगितले. एकदा पीए रजेवर होता किंवा काही कारणामुळे पैसे पाठवायचे राहिले, तेव्हा आईवडिलांकडून ---ना विचारणा झाली. तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही तर पैसे पाठवत नव्हतो. चौकशी केल्यावर त्यांना कळले की रफीसाहेब पैसे पाठवत होते.

जेव्हा रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धवट सोडले

रफीसाहेबांनी रेकॉर्डिंग अर्धे सोडले असे कधी घडले नाही. परंतु याला एक गाणे अपवाद आहे.
 'माया' चित्रपटातील 'तसवीर तेरी दिल में, जिस दिन से उतारी है' या गाण्याचे रेकॉर्डिंग होते. गाण्याचे रेकॉर्डिंग तर चांगले होत होते. परंतु संगीतकार सलिल चौधरी पुन्हा पुन्हा रिटेक्स घेत होते. तेव्हा रफीसाहेबांनी न राहवून त्याबद्दल विचारले. तेव्हा सलिलजींनी सांगितले की लताबाईंना हवा तसा परिणाम येत नाही. त्यामुळे त्या रिटेक्स घ्यायला सांगत आहेत. रफीसाहेबांना ते आवडलं नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग अर्धवट सोडून ते निघून गेले.

रफीसाहेबांमुळे 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला


सूरज चित्रपटासाठी नायकाची निवड करायची होती. संगीतकार शंकर जयकिशन यांच्याकडे 'बहारों फूल बरसाओ' या गाण्याची चाल होती. ताराचंद बडजात्यांनी रफी साहेबांना ही चाल तुम्ही निरनिराळ्या गटांसाठी कशी म्हणाल असे विचारले. रफीसाहेबांनी जेव्हा ही चाल राजेंद्रकुमारसाठी गाऊन दाखवली, ती ताराचंद बडजात्यांना पसंत पडली आणि 'सूरज' चित्रपट राजेंद्रकुमारला मिळाला.



No comments:

Post a Comment