Tuesday, June 18, 2024

मृत्युंजय महामंत्र - एक अर्थबोध

©Dr Hemant Junnarkar, All rights reserved

मृत्युंजय महामंत्र:

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनात्
मृत्योर्मुक्षीय माSमृतात्


बहुतेक संकेतस्थळांवर असणारा अर्थ:

तीन नेत्र असणाऱ्या त्र्यंबकाचे, शिवाचे , जो सुगंध देणारा, पोषण करणारा आहे, आम्ही यजन करतो. काकडी ज्याप्रमाणे आपल्या बंधनापासून (=वेलाशी असणाऱ्या संलग्नतेपासून) मुक्त होते त्या प्रमाणे आम्हाला अमरत्वापासून नाही तर मृत्यूपासून मोक्ष किंवा मुक्ती मिळू दे.

वरील अर्थ ओढून ताणून काढलेला आणि संस्कृत व्याकरणाचे नियम न पाळणारा आहे. या अर्थातील चुका थोडक्यात खाली दिल्या आहेत-

शिवास सुगंध देणारा किंवा पुष्टी देणारा म्हणण्यात चूक नाही. पण पुढे जो 'उर्वारुकासारखा' म्हटले आहे, ते कुणाला असा प्रश्न राहतो. मग उर्वारुक (काकडी ) जसा बंधनातून मुक्त होतो, असा अर्थ काढावा लागतो. या अर्थामध्ये मग बरेच पदरचे शब्द टाकावे लागतात. शिवाय मृत्यूपासून मुक्त कर, अमरत्वापासून नाही, यातील सर्वांत मोठी चूक म्हणजे मा या शब्दाचा अर्थ नको असा केला आहे. मा चा नकारार्थी उपयोग फक्त आज्ञार्थामध्ये केला जातो.

संस्कृतमध्ये प्रत्यय शब्दाला जोडले जातात, त्यामुळे शब्दांचा क्रम बदलला तरी अर्थामध्ये फरक पडत नाही. वृत्ताची बंधने पार पाडण्यासाठी शब्दांचा क्रम बदलला जातो. अशा वेळी अर्थबोधासाठी खालील पद्धत उचित ठरेल.

१. प्रथम अन्वय तयार करावा. म्हणजे गद्यामध्ये शब्द ज्या क्रमाने असतात, तसे म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा क्रमाने मांडावे.

२. विशेषणे नामाजवळ तर क्रियाविशेषणे क्रियापदाजवळ आणावी. संस्कृतमध्ये नाम ज्या विभक्तीमध्ये असते, त्याच विभक्तीमध्ये विशेषण असते. त्यामुळे कुठल्या नामाचे कुठले विशेषण आहे ते ओळखणे सोपे जाते. 

३. संधींचा आणि समासांचा विग्रह करावा. आता तुम्हाला अर्थ स्पष्ट होऊ लागेल.

याप्रमाणे मी मृत्युंजय मंत्राचा खालीलप्रमाणे अर्थ केला आहे-

अन्वय/सन्धि/समासविग्रह: 
ॐ , उर्वारुकम् इव सुगन्धिं, पुष्टिवर्धनम् त्रि+अम्बकम् ( वयम्) यजामहे |
(स: त्र्यम्बक:) मा मृत्यो: अमृतात् बन्धनात् मुक्षीय |
शब्दार्थ:
उर्वारुक (ना. नपुं)= या शब्दाचा अर्थ स्पष्ट नाही. ही काहीतरी हिरवी , रसयुक्त वनस्पती असावी. बऱ्याच संकेतस्थळावर या शब्दाचा अर्थ काकडी असा दिला आहे.
सुगन्धि (वि)=सुगंधी.
पुष्टिवर्धन (वि)=पोषक, पुष्टिकारक 
त्र्यम्बक (ना.पुं)=तीन नेत्र असलेला, शिव
यजामहे = यज् धातु आ.प. वर्तमानकाळ प्र.पु.ब.व.=यजन करतो
मुक्षीय=मला मोक्ष मिळू दे, मला मुक्ती मिळू दे. मुच् धातूचे आशिर्वादार्थी प्रथम पुरुषी एकवचनी रूप.
मुच् धातू गण ७, उ.प.
आशिर्वादार्थी आत्मनेपदी रूपे
आशिर्लिङ्लकार
पुरुष एकवचन द्विवचन बहुवचन
प्रथम मुक्षीष्ट मुक्षीयास्ताम् मुक्षीरन्
मध्यम मुक्षीष्ठा: मुक्षीयास्ताम् मुक्षीध्वम्
उत्तम मुक्षीय मुक्षीवहि मुक्षीमहि

अर्थ: ॐ, उर्वारुकाप्रमाणे सुगंधी आणि पुष्टिकारक अशा त्र्यंबकाचे (=तीन नेत्र असणाऱ्या शिवाचे ) (आम्ही) यजन करतो. 
(तो त्र्यंबक) मला मृत्यूच्या अमृत (=मृत्यू न पावणाऱ्या, नष्ट न होणाऱ्या) बंधनापासून मला मोक्ष, मुक्ती देवो.

श्लोकाचे सौंदर्य:
त्र्यम्बक=शिवास अनेक नावे असूनसुद्धा येथे त्र्यम्बक, म्हणजे तीन नेत्र असलेला या नावाची निवड केली आहे. कारण मंत्राच्या पुढील चरणामध्ये मृत्यूच्या बंधनातून मुक्त करण्याची प्रार्थना केली आहे.

सर्व जीवांस दोन नेत्र आहेत. केवळ शिव हेच असे दैवत आहे, ज्यास तीन नेत्र आहेत. म्हणजे दोन नेत्र असणाऱ्यांना जे दिसते, त्यापेक्षा अधिक शिवाला दिसते. दोन नेत्र असणारा केवळ जन्म आणि मृत्यूपर्यंत असणारा प्रवासच जाणू शकतो. परंतु यापेक्षा अधिक तिसरा नेत्र असणारा शिव या दोन्ही ध्रुवांपलिकडे पाहण्याची क्षमता असला पाहिजे. जसे श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

No comments:

Post a Comment

31/5/2026 Shanghai- Jin Mao Tower

31/5/2026 (Sun)  Jin MaoTowers Jin Mao Towers China Town- Dollar shop visit and purchases French concession Spirit of Shanghai show Bund Sha...