२. शाळाप्रवेशाची पूर्वतयारी:
चला, तुमची शाळा तर ठरली. प्रकरण २ मध्ये, प्रवेशाआधी काय पूर्वतयारी करावी, ते सांगितले आहे. पूर्वतयारी ही चिंता कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. लेखक 'टिप्स चार्ट' नावाचा तक्ता तयार करण्यास सुचवतात. या तक्त्यामध्ये मुलाला कुठल्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावर काय उपाय करता येतील, त्यांची नोंद करावी.
आपल्या मुलाला अमुक अमुक समस्या आहेत, त्यांचा पाढा शाळेपुढे वाचून दाखवू नका, तर मुलाच्या चांगल्या गुणांविषयी सांगून मुलाची एक सकारात्मक प्रतिमा तयार करा. कल्पना करा, की तुम्ही शाळेपुढे तुमच्या मुलाचे मार्केटिंग करीत आहात.
३. जमिनीची मशागत करा:
प्रकरण ३ 'ग्राऊंड प्रेपरेशन'बद्दल आहे. शारीरिक तयारीबरोबरच तुम्हाला मुलाची मानसिक तयारीसुद्धा केली पाहिजे. लेखक 'व्हिज्युअल थर्मोमीटर' नावाच्या एका उपकरणाचा वापर मुलाला शिकवण्यास सांगतात. या उपकरणामध्ये ट्रॅफिक लाइटप्रमाणे हिरवा,पिवळा आणि लाल रंगांचा वापर केलेला असतो. या रंगांचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करण्याचे शिक्षण तुम्ही मुलाला देऊ शकता.
४. शाळेबरोबर सहयोग करा:
तुमचा मुलगा ज्या शाळेत जातो, त्या शाळेबरोबर तुम्ही एक कोलॅबरेशन किंवा सहयोगच करीत असता. प्रकरण ४ अशा सहयोगाचा पाया तयार करण्याबद्दल आहे. अशा सहयोगासाठी शाळेमध्ये आणि तुमच्यामध्ये माहितीची नियमित देवाणघेवाण असू द्या. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल आणि भविष्यातील संघर्ष टळू शकतील. यासाठी तुमच्या प्रतिक्रिया सकारात्मक असाव्यात, नकारात्मक असू नयेत. शाळा आणि तुमच्यामध्ये उत्तम सहयोग राहणे तुमच्या मुलासाठी हितकारक ठरेल.
५. भावनांचा उद्रेक:
आपल्या मुलाच्या भावनांचा उद्रेक होऊन तो रडू लागणे , किंवा त्याचे चिडणे, ओरडणे कुठल्याही पालकांना सहन न होणारी करणारी घटना आहे. लेखक सांगतात की असा उद्रेक अचानक होत नाही, तर तो अनेक लहान लहान अप्रिय घटनांचा एकत्रित परिणाम असू शकतो. कुठल्या घटनेने मुलाच्या भावनांचा उद्रेक होतो, याची तुम्हाला माहिती असेल तर शाळेला आधीच सांगून ठेवा. इतरांच्या दृष्टीने किरकोळ असणारी पण मुलाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी एखादी गोष्ट, म्हणजे एखादे खेळणं, कीचेन किंवा आणखी कुठली गोष्ट , जिने त्याच्या भावनांचा उद्रेक शांत होऊ शकतो, अशी कुठलीही गोष्ट मुलाजवळ द्यावी. कधी हे शाळेच्या नियमात बसत नाही. मग तुम्हाला शाळेला ते पटवून द्यावे लागेल.
नवीन परिस्थितीचा सामना करावा लागला तर आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर अशा परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. ऑटिस्टिक व्यक्तीपाशी अशा अनुभवाचा अभाव असणे मोठा अडथळा आहे. नवीन परिस्थितीचा सामना करताना ऑटिस्टिक व्यक्ती गडबडून जाण्याची शक्यता असते.
लेखकांनी प्रकरण ६ आणि ७ मध्ये अशा अडथळ्यांचा विचार केला आहे. लेखक सांगतात की पालकांनी मुलांच्या सर्व समस्या स्वत: सोडवण्यापेक्षा अडथळ्यांना तोंड देण्यासाठी त्यांच्या मुलाला विकसित केले पाहिजे.
८. सॅच्युरेशन (Saturation) मॉडेल:
अपंगत्वाचे वैद्यकीय मॉडेल मानते की अपंग लोक त्यांच्या कमजोरी किंवा फरकांमुळे अक्षम आहेत तर सॅच्युरेशन मॉडेलप्रमाणे अपंग लोक समाजाच्या विशिष्ट धारणेमुळे अक्षम आहेत. सॅच्युरेशन मॉडेल ऑटिस्टिक व्यक्तींना समाजात इतरांच्या बरोबरीने वागण्याची संधी देते.
१०. मित्रांची आवश्यकता:
शाळेत, मुलांसाठी मित्र असणे आवश्यक आहे. प्रकरण १० मध्ये लेखक असे सुचवतात की मुलांचे मैत्रीपूर्ण संबंध वाढण्यासाठी शाळांनी क्लब स्थापन करावे आणि मुलांमध्ये मैत्री वाढेल असे विविध उपक्रम करावे.
११,१२ - शाळेबरोबर मतभेद:
तुमचे शाळेबरोबर मतभेद होत असतील तर काय करावे याचा विचार प्रकरण ११ आणि १२ मध्ये केला आहे.
अशा परिस्थितीत लेखक संघर्षापेक्षा समन्वयावर भर देतात. तुमची भूमिका तुम्ही शाळेला नम्रपणे परंतु ठामपणे समजावून सांगितली पाहिजे.
१३. शाळेला निरोप:
एवढे करूनही तुमचे शाळेबरोबर जमत नसेल आणि शाळा बदलण्याची वेळ आलीच तर त्याचीही तयारी ठेवली पाहिजे आणि शाळेचा निरोप घेताना कटुता टाळून पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याची शक्यता ठेवली पाहिजे हे प्रकरण १३ मध्ये सांगितले आहे.
१४. आदर्श शाळा:
अखेरच्या चौदाव्या प्रकरणात लेखक आपली ऑटिस्टिक मुलांच्या आदर्श शाळेची कल्पना स्पष्ट करतात. लेखकांच्या मते अशा शाळेत 'टॉप डाऊन कल्चर' असावे. म्हणजे वरिष्ठ पातळीवर अनुभवी लोकांचे व्यवस्थापक मंडळ असावे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची खालच्या पातळीपर्यंत अंमलबजावणी व्हावी. अशा शाळेचे व्यवस्थापन लवचिक, म्हणजे परिस्थितीप्रमाणे बदल करता येईल असे असावे. शाळेत समवयस्क गटांसाठी प्रशिक्षण असावे. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे तत्त्व ध्यानात घेऊन एखादी अप्रिय घटना कशी टाळता येईल, याचा विचार करून शाळेचे व्यवस्थापन व्हावे.
समीक्षा: 🔬
हे पुस्तक यूके मधील शालेय परिस्थिती समोर ठेवून लिहिले आहे. परंतु पुस्तकात केलेले मार्गदर्शन सर्वच ठिकाणच्या शालेय परिस्थितीत लागू होईल असे आहे. खरे तर पुस्तकाचा विषय प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत स्थलांतराचा आहे. पण लेखकांनी असा फरक कुठे स्पष्ट केलेला नाही. पुस्तकातील चर्चा शालेय प्रवेशाविषयी आहे. हा विषयच असा आहे की येथे कुठल्याही रेडिमेड सोल्यूशनची अपेक्षा करता येत नाही. ऑटिस्टिक मुलाचे शालेय जीवन आणि संगोपन यांविषयी सामान्य स्वरूपाचे मार्गदर्शन असे या पुस्तकाबद्दल म्हणता येईल. माझे या पुस्तकाचे रेटिंग 'थ्री स्टार' आहे.
पुस्तक परिचय:
पुस्तकाचे नाव: Championing your autistic teen at secondary school-getting the best from mainstream settings
लेखक : Debby Elly with Garreth D. Morewood
पुस्तकाची रूपरेषा:
हे पुस्तक चौदा प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. या चौदा प्रकरणांमध्ये, लेखक ऑटिस्टिक मुलाने प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन तेथे यशस्वी होण्यापर्यंत विविध विषयांची चर्चा करतात आणि वाचकाला बरीच उपयुक्त माहिती देतात.
लेखक-परिचय:
या पुस्तकाचे लेखक गॅरेथ डी मोरेवुड स्टुडिओ थ्री साठी शैक्षणिक सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी यूकेच्या शाळांमध्ये २५ वर्षे काम केले आहे.
पुस्तकाच्या सहलेखिका डेबी एली या जुळ्या ऑटिस्टिक मुलांच्या माता आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा पैलू आहे. त्या प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये उप-संपादक आहेत, त्यानंतर २००८ ते २०२१ पर्यंत चाललेल्या ऑ-किड्स या मासिकाच्या त्या सह-संस्थापक होत्या. त्या फ्रीलान्स ट्रेनर, लेखक आणि सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी ऑटिझमवर अनेक लेख आणि पुस्तके लिहिली आहेत.
डिस्क्लेमर:
गॅरेथ डी. मोरेवुड आणि डेबी एली यांनी लिहिलेल्या 'चॅम्पियनिंग युवर ऑटिस्टिक टीन ॲट सेकंडरी स्कूल-गेटिंग द बेस्ट फ्रॉम मेनस्ट्रीम सेटिंग्ज' या पुस्तकाची ही संक्षिप्त समीक्षा आहे.
समीक्षक पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे

No comments:
Post a Comment