Tuesday, April 23, 2024

सुलभ श्रीमद्भगवद्गीता

                                 


सुलभ श्रीमद्भगवद्गीता 









सुलभ श्रीमद्भगवद्गीता
मनोगत


भगवद्गीतेची ओळख मला कधी झाली? माझ्या मोठ्या भावाला शाळेत एका स्पर्धेमध्ये सार्थ भगवद्गीता बक्षीस मिळाली. तेव्हापासून मी भगवद्गीता वाचतो आहे. शाळेमध्ये भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठांतरासाठी असे. 

माझ्या बहिणीला शालेय अभ्यासक्रमात पूज्य विनोबा भावे यांची 'गीताई' होती.  भगवद्गीता ज्या अनुष्टुभ छंदामध्ये आहे, त्याच छंदामध्ये विनोबाजींनी गीताई लिहिली आहे. गीताई इतक्या सोप्या मराठीत लिहिली आहे की जणू काही भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन मराठी होते, असे वाटावे.

माझे पदवी शिक्षण के. जे. सोमैया कॉलेज , मुंबई येथे झाले. कॉलेजचे संस्थापक के.जे.सोमैया संस्कृतप्रेमी होते. त्यामुळे आम्हाला भगवद्गीतेवर पेपर असे. या परीक्षेत सर्वांत जास्त गुण मिळाल्याबद्दल मला एकदा बक्षीस मिळाले होते. या पेपर्सच्या निमित्ताने मी स्वामी विवेकानंदांचे 'कर्मयोग' हे पुस्तक वाचले. कॉलेजमध्ये एकदा स्वामी चिन्मयानंद यांचे भगवद्गीतेवरील प्रवचन ऐकले.

आम्ही मिरा रोड, मुंबई येथे राहत असताना तेथे इस्कॉनचे मंदिर होते. माझी सौभाग्यवती वर्षा मंदिराच्या कार्यात खूपच भाग घेत असे. त्यामुळे मी मंदिराचे कीर्तन, प्रवचन असे बरेच कार्यक्रम अटेंड केले. श्रील प्रभुपादांचे 'भगवद्गीता - जशी आहे तशी' हे पुस्तक वाचले.

नंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केले. तेथेही नॉर्थ सिडनी येथे इस्कॉनचे चांगले मंदिर आहे. वर्षाने येथेही मंदिराच्या कार्यात सहभाग ठेवला. त्यामुळे पुन्हा कीर्तन, प्रवचन अटेंड करणे चालू राहिले.

माझ्या कामावरील साहेब श्री. नंदू मेहता यांच्यामुळे मी रामकृष्ण मिशनच्या लिव्हरपूल रोडवरील वेदांत हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊ लागलो. तेथे माताजी भगवद्गीतेतील निरनिराळ्या अध्यायांवर पूर्ण दिवस रिसॉर्ट्स घेत असतात. असे बरेच रिसॉर्ट्स मी अटेंड केले.

एवढे सारे करून मला सतत असे वाटत होते की भगवद्गीता मला समजत नाही. उलट अधिकाधिक गोंधळ होतो आहे.

मी विचार केला, असं का बरं होतं आहे? तेव्हा माझ्या लक्षात आले की भगवद्गीतेवरील पुस्तके लिहिताना किंवा प्रवचने सांगताना लेखक किंवा प्रवचनकार त्यामध्ये आपल्या पदरचे काहीतरी ॲड करतात. ते समजण्यासाठी उपयोगी असले तरी मूळ भगवद्गीतेत काय सांगितले आहे, याविषयी गोंधळ उडतो. आजकाल तर असे दिसते की कोणीही येतो आणि 'भगवद्गीतासुद्धा असे सांगते' म्हणून प्रतिपादन करतो. 'गीता का सार', 'गीता संदेश' म्हणून मेसेजेस समाज माध्यमांवर फिरत असतात. हे खरोखर भगवद्गीतेत सांगितले आहे का, असा प्रश्न मला पडत असे.

तेव्हा मी ठरवले की आपणच आपल्याला समजेल असे भगवद्गीतेचे व्हर्शन बनवायचे. हे व्हर्शन बनवताना माझी मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे होती:-

१. आपल्या दैनंदिन संभाषणातील सोपी मराठी भाषा वापरायची. आलंकारिक भाषेचा किंवा कठीण भाषेचा सोस मुळीच ठेवायचा नाही.

२. रचनेसाठी ओवी छंदाचा वापर, जो छंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी वापरला आहे. ओवीमध्ये साडेतीन चरण असतात, तीन चरण दीर्घ तर चौथा चरण आखूड असतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक असते. शब्दसंख्या शिथिल असते. माझ्या ओव्यांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणांत यमक आहे, पण ते नावापुरते, यमक जुळवण्याच्या अट्टाहासात भाषेला अवघडपणा येऊ नये म्हणून. बऱ्याच ठिकाणी पहिले, दुसरे किंवा तिसरे चरण आखूड झाले आहेत आणि चौथा चरण दीर्घ झाला आहे.

३. मराठी भाषेत बहुतांश संस्कृत शब्द असल्याने भाषांतर करताना जर भगवद्गीतेतील संस्कृत शब्द मराठीत असेल, तर तो अवघड असला तरी तसाच ठेवला आहे. परंतु जेथे संस्कृत शब्द मराठीत नाही, तेथे सोपा मराठी शब्द वापरला आहे. म्हणजे वाचताना भगवद्गीता समजली तर पाहिजे, पण मूळ भगवद्गीतेचा फील कुठेही जाता कामा नये, असा प्रयत्न केला आहे.

उदा. 
'श्रेयान्स्वधर्मो विगुणो परधर्मात्सुनिष्ठात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:'

हा भगवद्गीतेतील सुप्रसिद्ध श्लोक घेतला तर यातील बहुतेक सारे शब्द मराठीत आहेत. विगुण हा शब्द समजण्यासारखा असला तरी मराठीत नित्य वापरात नाही. 

त्यामुळे माझे भाषांतर असे झाले-
गुणसंपन्न परधर्माहून | बरा स्वधर्म गुणविहीन ||
बरे स्वधर्मात निधन | परधर्म भयावह || अ.३, श्लो.३५ ||

४. संकल्पना भाषांतरित करण्याऐवजी तशाच वापरल्या आहेत. उदा. भूत ही संकल्पना भगवद्गीतेत सतत येते. तिचे भाषांतर करून प्राणी, सजीव, जीवमात्र असे केले तर या प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. प्रत्येक शब्दाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. निराळ्या व्यक्तिमत्त्वाचे शब्द आले की ते मूळ संहितेचे व्यक्तिमत्त्व बदलून टाकतात. त्यामुळेच मूळ भगवद्गीता कुठेतरी हरवल्या सारखी वाटते. शिवाय हे प्राणी , सजीव, जीवमात्र हे शब्द ज्याअर्थी संस्कृत भाषेत आहेत आणि भगवद्गीतेतही निरनिराळ्या संदर्भात येत असेल, तर भूत शब्दामागे काही एक संकल्पना अभिप्रेत आहे आणि ती तशीच ठेवली पाहिजे. 

आणखी एक उदाहरण म्हणजे 'नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:' या श्लोकाचे. येथे भाव, अभाव, सत्, असत् या शब्दांसाठी निराळे शब्द योजले तर या शब्दांमागील संकल्पनेपासून दूर गेल्यासारखे होईल.

५. भगवद्गीता वाचताना मला असे वाटते की भगवद्गीता हा एक सलग संवाद आहे. भगवद्गीता सांगताना भगवान श्रीकृष्ण काही अध्याय सांगत नव्हते. हे अध्याय पुढील रचनाकारांनी आपल्या सोयीसाठी केले आहेत. त्यामुळे अध्यायाचे नाव एक असेल तर वेगळ्याच विषयावर चर्चा केलेली आढळते. त्यामुळे मी असे शक्य तितके विषय आयडेंटिफाय करून त्यांना नावे दिली आहेत.

६. भगवद्गीता हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. त्यामुळे त्यांच्या इंटरप्रिटेशनसाठी भगवद्गीता पुरेशी आहे. त्यामुळे कुठल्याही बाह्य ग्रंथाचा आधार न घेता, भगवद्गीतेत दिलेल्या स्पष्टीकरणाच्या आधारेच भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ लावायचा.

६. कुठलाही विषय आपल्याला चित्रांतूनच चांगला समजतो. त्यामुळे ठिकठिकाणी चित्रे वापरली आहेत. जिथे समर्पक चित्रे मिळाली नाहीत तिथे मी चित्रे काढली आहेत. अवघड कल्पनांची उकल व्हावी, म्हणून डायग्रॅम्सही काढले आहेत.

भगवद्गीता लिहीत असताना एकेक अध्याय झाला की माझे परम मित्र श्री. मिलिंद बर्वे यांना पाठवीत असे. श्री. मिलिंद बर्वे संस्कृत भाषेचे प्रेमी असून आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करीत असतात. माझे भाषांतर चांगले समजते, असे मत त्यांनी दिले.

यासाठी ग.का. रायकर आणि दि.अ.घैसास यांचे जयहिंद प्रकाशनाकडून प्रकाशित 'सान्वय व सार्थ श्रीमद्भगवद्गीता' या पुस्तकाचा वापर केला आहे. या लैखकांचे मन:पूर्वक आभार. (यांचेच पुस्तक माझ्या मोठ्या भावाला बक्षीस मिळाले होते. पुस्तक तेच आहे‌ . फक्त त्यात अन्वय ॲड केला आहे).

श्रील प्रभुपादांच्या 'भगवद्गीता-जशी आहे तशी' या पुस्तकाचा खूप उपयोग झाला आहे. सर्व श्रीकृष्णभक्तांस श्रील प्रभुपाद गुरूसमान आहेत. त्यांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार.

आता मला भगवद्गीता वाचावीशी वाटली की ही भगवद्गीता मी वाचतो. मला ती समजायला सोपी वाटते आणि मुख्यत: मूळ भगवद्गीतेपासून दूर गेल्यासारखे वाटत नाही. मी ही भगवद्गीता लिहिली नसती, तर इतक्या वेळा कधीच वाचली नसती. भगवद्गीता कळली आहे असे म्हणण्याचे धाडस कुणीच करणार नाही. मीही ते करीत नाही. भगवद्गीतेत काय आहे आणि काय नाही, त्याची बऱ्यापैकी कल्पना आली आहे, एवढेच मी म्हणू शकतो. माझा हा प्रयत्न कसा झाला आहे, त्यावर वाचकांनी जरूर प्रतिक्रिया लिहाव्यात आणि काही सुधारणा हव्या असतील तरी सांगावे.

माझा हा प्रयत्न भगवान श्रीकृष्णास अर्पण करून हे मनोगत पूर्ण करतो.

-डॉ.हेमंत जुन्नरकर

Sanjal bhabhi’s unique hobby संजलवहिनींचा आगळा छंद

 


Sanjal bhabhi’s unique hobby

 

Back in Christmas 2022, my cousin Sushil from Sydney, was like, "Hey bro, wanna check out Melbourne?" And we were like, "Why not?" We've been in Sydney for more than  a decade, but not had a chance to visit Melbourne, so it sounded fun. Sushil, his wife Madhavi, my wife Varsha and I, started early morning.

Sushil, being the driving enthusiast he is, took the wheel all the way, blasting Rafi's tunes on his phone the whole ride. We rolled into Melbourne by evening.

"We're gonna crash at my buddy Kishen Bhai's place," Sushil told us.

I asked Sushil,' Are you sure they will be  cool with us,  we are strangers to them? "

"Don't sweat it, or I wouldn't have invited you," Sushil reassured.

Turns out, Kishen Bhai and his wife Sanjal were the nicest hosts ever. They really made us feel at home. Sanjal bhabhi cooked delicious dishes. 

Kishan bhai and Sanjal bhabhi

The next day, we planned a beach trip, but poor Madhavi felt sick halfway, so we had to return. It was scorching hot that day, unlike the cold December back in India.

We were having a chat, when  Sanjal bhabhi showed us the video of her son Karan's wedding. In the video, I was surprised to see bhabhi reading out a poem on Karan which showed all the excellence of craftsmanship.

I asked, ' Whose poem is this?' I was more surprised when bhabhi told me that she had comppsed the poem.

Then bhabhi opened her file and showed us more poems penned by her on loose leaves.And believe me,  there was one poem written on Kishan Bhai himself.

I said, "Kishan Bhai, you're lucky to have someone write a poem about you, especially your wife." Kishen Bhai was all smiles.

Turns out, whenever there's a gathering or a get-together, friends ask Sanjal bhabhi to whip up a poem for the occasion. Sanjal bhabhi readily takes up the challenge with pleasure.  She is not particular about the sophisticated language but uses day-to-day language , a mixture of English and Hindi, with amusing rhymings. That makes her poems appealing to the crowd and wins applause accompanied with laughter of satisfied acceptance of the observations in the poems. Her poems shows close observation of the qualities of friends and  certainly you need generous heart to appreciate them. Will not a man be pleased if his cooking skill is appreciated by someone?

I thought, if  a poet were asked to write a poem, he would select heroes from the history, most probably. But who makes a simple man feel like a hero , highlighting the qualities, perhaps not known to him as well. That makes Sanjal bhabhi's hobby a unique one, doesn't it? 

I told bhabhi, "Good thing we skipped the beach, or I'd never know about this cool talent of yours."

Coming to know that I'm into languages,  a little bit, so now sometimes bhabhi sends me her poems for some fine-tuning, I just do a little touch up, I confess, as I hate  to meddle with the essence of any spontaneous art work.

Last year, when Karan's mother-in-law passed away, bhabhi composed another   beautiful poem to read out  the funeral. It really captured the essence of who Raji was. Read the poem and you will understand yourselves.

 

Raji, a person of rare stature:

The memorable event in Karan-Divya’s life was staged ,

On the day, they both got engaged,

When we met Raji, a person with the rare stature,

With the cool, calm and sweet nature.

She was ready to help others with no expectation, 

Busy with the social work, her passion,

She was intelligent and artistic,

Who did her work which was filled with a magic.

On the seashore, she loved walking,

Speechless, as if meditating.

Thus was the life, smooth and steady,

But suddenly a cloud made it shady.

Nobody had expected what befell,

When suddenly Raji bade us farewell,

The God gave her a short life, unfortunately,

And we are all standing at a turn of life, so tricky. 

Raji’s memories will never part,

We will always nurture them in our heart.

Paddy, Divya, Manju,  do not feel alone, 

We are always there, just grab a phone.


I felt, Raji's soul must have been happy at her heavenly abode to find someone appreciate her qualities.

So, what do you guys think of Sanjal' bhabhi's hobby? Pretty unique, huh? Bhabhi takes so much pains to write down a poem, would you take pains writing your opinion about the hobby?

संजलवहिनींचा आगळा छंद

२०२२ च्या ख्रिस्मसमध्ये माझ्या मावस भावाने, सुशीलने त्यांचा मेल्बर्नला जाण्याचा बेत सांगितला आणि आम्हाला येण्याबद्दल विचारले. आम्ही याआधी मेल्बर्नला गेलो नसल्याने आम्हीसुद्धा येण्याचे कबूल केले.

सुशील, त्याची पत्नी माधवी, मी आणि माझी पत्नी वर्षा, असे आम्ही चौघे जण मेल्बर्नला पोहचलो.

मेल्बर्नला सुशीलचे मित्र किशन भट्टी आणि त्यांची पत्नी संजल यांची भेट झाली. किशन भाई आणि संजलवहिनी अतिशय प्रेमळ दांपत्य.   संजलवहिनी मराठी परंतु किशनभाई काश्मीरी.   माझी व वर्षाची त्यांच्याशी पूर्वीची ओळख नसतानाही ते आमच्याशी अतिशय प्रेमाने वागले. त्यांनी आम्हा सर्वांचे खूप चांगले आदरातिथ्य केले.



किशनभाई आणि संजलवहिनी  

दुसऱ्या दिवशी आमचा मेल्बर्नमध्ये बीचवर जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे मी, वर्षा, सुशील, माधवी आणि संजलवहिनी, असे पाच जण निघालो. परंतु माधवीची अर्ध्या रस्त्यात तब्येत बिघडल्याने आम्हाला परत यावे लागले.

भारतामध्ये डिसेंबर थंडीचा , परंतु ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळ्याचा महिना. त्या दिवशी खूपच कडक ऊन होतं. 

आम्ही घरीच गप्पा मारत बसलो. मग संजलवहिनींनी मुलाच्या, करणच्या,   लग्नाचा व्हिडिओ  दाखवला.

त्या वेळी लग्नाच्या व्हिडिओमध्ये संजलवहिनी इंग्रजीमध्ये कविता म्हणताना दिसल्या. मी कवितेची तारीफ केली. त्या वेळी त्यांनी सांगितलं की ही कविता त्यांनी स्वतः मुलावर लिहिली आहे. 

मग त्यांनी फाइल उघडून त्यांनी लिहिलेल्या आणखी कविता दाखवल्या. त्यांच्या कविता हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत. त्यामध्ये हिंदीत एक कविता किशनभाईंवरही आहे. मी किशनभाईंना म्हटलं, 'आप बहुत लकी हो, कि तुमपर किसी ने कविता लिखी है, और वोभी तुम्हारे बीबीने.' किशन भाई साहजिक हसले.

कुणाच्या घरी वाढदिवस किंवा कुठला समारंभ असला, की संजलवहिनींचा छंद माहीत असणारे लोक त्यांना कविता बनवण्यास सांगतात. संजलवहिनीसुद्धा आह्वान स्वीकारून प्रसंगानुरूप छानदार कविता बनवतात. ज्या व्यक्तीवर कविता लिहिली, त्यांच्या गुणविशेषांचे सूक्ष्म निरीक्षण, सर्वांना समजणारी संभाषणातील हिंदी आणि इंग्रजी अशी संमिश्र भाषा आणि चटपटीत यमकांची योजना  यांमुळे त्यांच्या कविता समारंभात सर्वांची वाहवा मिळवतात.

मला या आगळ्या छंदाचं खूप कौतुक वाटलं. म्हटलं, 'बरं झालं आपला बीचवर जाण्याचा कार्यक्रम रद्द झाला. नाहीतर तुमचा हा छंद मला समजलाच नसता.'

मलासुद्धा भाषेची थोडीफार आवड आहे हे कळल्यावर आता कविता लिहिली की इंडिपेंडंट ओपिनियनसाठी संजलवहिनी  कविता माझ्याकडे पाठवतात. मी कवितेचा मूळ आशय बदलणार नाही, यांची काळजी घेत थोडे शब्द इथेतिथे करतो.

गेल्या वर्षी दिव्याच्या, संजलवहिनींच्या सुनेच्या आईस , म्हणजे संजलवहिनींच्या विहीणीस देवाज्ञा झाली. त्या वेळी संजलवहिनींनी लिहिलेली कविता खाली दिली आहे-

Raji, a person of rare stature:

The memorable event in Karan-Divya’s life was staged ,

On the day, they both got engaged,

When we met Raji, a person with the rare stature,

With the cool, calm and sweet nature.

She was ready to help others with no expectation, 

Busy with the social work, her passion,

She was intelligent and artistic,

Who did her work which was filled with a magic.

On the seashore, she loved walking,

Speechless, as if meditating.

Thus was the life, smooth and steady,

But suddenly a cloud made it shady.

Nobody had expected what befell,

When suddenly Raji bade us farewell,

The God gave her a short life, unfortunately,

And we are all standing at a turn of life, so tricky. 

Raji’s memories will never part,

We will always nurture them in our heart.

Paddy, Divya, Manju,  do not feel alone, 

We are always there, just grab a phone.

या कवितेवरून संजलवहिनींनी विहिणीच्या गुणविशेषांचं निरीक्षण आणि मनापासून केलेलं कौतुक  दिसून येतं. संजलवहिनींच्या विहिणीचा आत्मा हे कौतुक ऐकून समाधान पावला असेल असं मला वाटलं.

मी असा छंद आतापर्यंत पाहिला नव्हता. संजलवहिनींच्या आगळ्या छंदास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.

तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला संजलवहिनींचा छंद. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

सिडनी येथे महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या कालिदास जयंती कार्यक्रमात सादर केलेल्या कथा

 

सिडनी येथे महाराष्ट्र मंडळातर्फे होणाऱ्या कालिदास जयंती कार्यक्रमात सादर केलेल्या कथा 



© Dr Hemant Junnarkar  (All rights reserved)


सिडनीमध्ये महाराष्ट्र मंडळातर्फे दर वर्षी 'कालिदास जयंती' कार्यक्रम साजरा केला जातो.  या कार्यक्रमामध्ये सिडनीतील निरनिराळे मराठी साहित्यिक आपल्या साहित्यकृती सादर करतात. मी प्रथम केवळ प्रेक्षक म्हणून जात असे. परंतु मंडळातर्फे सर्वांना आवाहन केले जाते की तुम्हीसुद्धा आपल्या साहित्यकृती सादर करा. त्यामुळे मी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मंडळाच्या या प्रोत्साहनाबद्दल  मी मंडळाचा अतिशय आभारी आहे. आतापर्यंत दर वर्षी एक कथा सादर केली आहे. या कथा खाली दिल्या आहेत.  

 (कालिदास जयंती २०२३ मध्ये सादर केलेली कथा )

ऍडमिशन 

 

(मराठीतील अजरामर विनोदी लेखक कै. चिं.वि. जोशी  यांचे कथानायक चिमणराव जोग आणि त्यांचे कुटुंब सिडनीमध्ये आहेत अशी कल्पना करून ही कथा लिहिली आहे. कै. चिं.वि. जोशी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कथा सांगत आहे. कथेचं नाव आहे  '                   ऍडमिशन.')

नुकताच हिंवाळा सुरू झाला होता.  वीक एंडचा दिवस. सकाळची वेळ. काऊनं मला वीक एंडच्या  कामाला जुंपण्यापूर्वी मी व्हॉट्स अपवर नजर टाकत होतो.   

'अहो, ऐकलंत का?' वॉशिंग मशीनमध्ये कपडे कोंबत काऊ म्हणाली.' जानकी, बाला आणि रवी  अशी शेट्टी फँमिली आता आपल्याकडे येणार आहे.'    

'आज घरी पाहुणे येण्याचा योग आहे,' मी माझं आजचं राशिभविष्य वाचून म्हटलं, ' वा!'

माझा 'वा!' ऐकून काऊ भलतीच खूष झाली आणि पुढे सांगू लागली, ' रवीला आपल्या घराजवळच्या ब्राइट फ्युचर शाळेत ऍडमिशन हवं आहे.'

'काऊ, अभ्यास करणं अधिक महत्त्वाचं की शाळा?' मी विचारलं. 

'ते दिवस गेले आता. हल्ली शाळेच्या नावावरच सर्व अवलंबून आहे,' काऊ म्हणाली.

'हे व्रत  पतीने केले असता, पत्नी  प्रेमाने वागू लागते,' मी पोस्ट मोठ्या उत्सुकतेने स्क्रोल करीत राहिलो, तर खाली लिहिलं होतं, 'असं कुठलंही व्रत नाही,' आणि चार स्माइली टाकल्या होत्या. 'काय चावटपणा आहे हा,' मी म्हणालो.

'का ? लागली मिरची?' काऊ म्हणाली.

'अगं तुला नाही म्हटलं मी, या पोस्टला म्हटलं,' मी घाबरून म्हणालो.

 

' तुम्ही मोबाइल जरा बाजूला ठेवता का?' काऊ वैतागून म्हणाली. ' जानकीने आपण जवळचे नातलग आहोत असं दाखवून ते आपल्या घरी राहतात असं शाळेला पत्र दिलं आहे.

'आं?' आता माझं मोबाइलमधलं लक्ष पूर्णपणे उडालं,' जवळचे नातलग? आपल्या घरी राहतात? कुणाचं डोकं हे?'  मोबाइल बाजूला ठेवून मी म्हणालो.

'अहो, कुणाला मदत केली तर काही बिघडतं का? कालच्या सत्संगामध्ये ब्रह्मज्ञानीबाबाजी सांगत होते की माणसाने केलेली चांगली कामं परलोकात त्याच्या कामाला येतात,' काऊ म्हणाली.

'परलोकात जे काही व्हायचं ते होईल, पण शाळेच्या लक्षात आलं तर शेट्टी फँमिलीबरोबर या लोकात आपलीही वरात निघेल. आणि शेट्टी फँमिलीनं अरब आणि उंटाच्या गोष्टीप्रमाणे उद्या आपल्यालाच होमलेस केलं म्हणजे?' मी विचारलं.

काही होमलेस करीत नाही.  जानकी माझी चांगली मैत्रीण आहे,' काऊ ठसक्यात म्हणाली.

'अच्छा, तीच जानकी ना जिचे मिस्टर बाला सारा स्वयंपाक करतात?' मी विचारलं.

'हो. तीच जानकी. आणि तुम्हीसुद्धा शिका की बालांकडून काही तरी. एकदाच रस्सा भाजी बनवली तर त्या भाजीला टूथपेस्टची चव,' काऊ फणका-याने म्हणाली.

'अगं, त्याचं असं झालं, तू सांगितलेले मसाले मी शोधत होतो. तेवढ्यात मला आठवलं हे सारे जिन्नस पतंजली टूथपेस्टमध्ये आहेत. म्हणून थोडी टूथपेस्टच टाकली,' मी साळसूदपणे म्हटलं.

'कर्म माझं,' काऊ कपाळाला हात .लावून म्हणाली, 'मग भाजी डेटॉलमध्ये तर धुतली नाहीत नं?'

'आठवत नाही आता,' मी डोकं खाजवत म्हणालो.

 

म्हणूनच सांगते बालांकडून शिका. बालांनी फेसबुकवर रेसिपी अपलोड केली की तोंडाला पाणी सुटण्याच्या इमोजींचा पाऊस पडतो नुसता,' काऊ म्हणाली.

'मग आज आपला स्वयंपाक बालांचा का?' मी खवचटपणे विचारलं.

 'आज ते सारे झटकाज रेस्तरॉंमध्ये जेवायला जात आहेत. कारण रोज बालांच्या हातचं खाऊन जानकीला कंटाळा आला आहे. नंतर सारे जण 'बाईपण भारी देवा'च्या शोला जाणार आहेत,' काऊ म्हणाली.

'भारी तर खरंच,' मी स्मित करीत म्हणालो.

'तुम्हीच पहा. बाला स्वयंपाक करतात आणि जानकी रवीचा अभ्यास घेते. रवीला सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून जिवाचं रान करताहेत दोघं जण. तुम्ही स्वयंपाक नाही, मुलांचा अभ्यास तरी घ्या. राघू तर सांगत की अप्पांना कुठलीच शंका विचारण्यात अर्थ नाही,' काऊ इतस्तत: पडलेल्या कपड्यांची आवराआवर करीत म्हणाली.

'म्हणणारच. राघू एकदा मला विचारतो, 'अप्पा, वाघाचे वडील कोण?' म्हटलं, 'अरे, राघू मूर्खच आहेस. वाघाचे वडील वाघच.' तर विचारतो कसा, 'अप्पा, मूर्खाचे वडील कोण?'

काऊला हसताना पाहून मी म्हटलं, ' तू हसू नकोस. हल्ली मुलांचा अभ्यास घेणं सोपं नाही. आता परवाचीच गोष्ट पहा.  मोरूनं मला  विचारलं, 'अप्पा, 'तो जलेगी भी तेरे बाप की' हे संस्कृतमध्ये कसं म्हणता येईल?'

मी म्हटलं,' मो-या, मला अभ्यासातलं विचार.'

तर म्हणतो,' अप्पा, हे रामायण आहे. हनुमान इंद्रजिताला असं म्हणतो.'

मी म्हटलं,' हे असं रामायण आम्हाला शिकवलं नाही.'

तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं करून काऊ म्हणाली, 'तुम्हाला सांगितलं होतं, मुलांना सिलेक्टिव्ह स्कूलमध्ये ऍडमिशन मिळेल का ब्रह्मज्ञानीबाबाजींना विचारायलाते तरी विचारलं का?'

 

'विचारलं. बाबाजी म्हणाले, 'बेटा, वैसा बोलना मुश्किल है. क्यों कि वो पढाई बडी कठिन होती है.'

मी म्हटलो, ' क्या बात कर रहे हो बाबाजी, आप को जरूर पता होगा. आप तो ब्रह्मज्ञानी हो.'

बाबाजी म्हणाले,' बेटा, ब्रह्मज्ञान उस से आसान हैं.''

'तुम्ही नीट विचारलं नसेल. एक काम धड जमत नाही. सगळीकडे मलाच बाई लक्ष घालावं लागतं,' काऊ कुरकुरत म्हणाली.

'बरं, आता हा शेट्टी परिवार आपल्याकडे कशासाठी येणार आहे?' मी मूळ मुद्द्याकडे वळलो.

'ब्राइट फ्युचर शाळेच्या प्रिन्सिपल मार्था येणार आहेत व्हिजिटला,' काऊ म्हणाली.

'बघ, काय म्हटलं होतं मी?' मी डोळे विस्फारून म्हटलं.

'ही नुसती फॉर्मँलिटी आहे, असं जानकी म्हणाली. त्यांना आपण एक फँमिली आहो, असं वाटलं पाहिजे,' काऊ म्हणाली.

एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि शेट्टी परिवार आमच्या घरी अवतरला.     

नमस्कार चमत्कार झाल्यानंतर काऊनं चहाचे कप आणले. आम्ही चहाचे घुटके घेत असतानाच मैनाच्या किंचाळण्याचा आवाज आला, 'अप्पा, यानं तुमचा मोबाईल फोडला.

रवीनं आल्याआल्या माझा मोबाईल पाडला होता आणि त्याचा सोक्ष-मोक्ष लावला होता.  

मैनानं रवीच्या पाठीत एक धपाटा घातला.  

' अम्मा, नानिगे होडेदा,' असं ओरडून रवीनं कानठळ्या बसवणा-या आवाजात  टाहो फोडला. 

 

'काय बाई एवढासा तो मोबाइल. त्याच्यापायी एवढं मारावं का माझ्या लेकराला, ' जानकीबाई खाऊ की गिळू अशा नजरेने मैनाकडे पाहत म्हणाल्या.

रवीकडे रागाने बघणा-या मैनाला मी म्हटलं, 'मैना, आता भांडणं बंद. त्या मार्थाबाई येतील, त्यांना आपण एक फँमिली आहो असं वाटलं पाहिजे.'

'अहो, चिमणीराव,' बाला म्हणाले.

'चिमणीराव नाही, चिमणराव,' मी दुरुस्ती केली.  

'अहो, तेच ते हो,' बाला आपला हेका पुढे चालवीत म्हणाले, ' तर चिमणीराव, त्यावरून तर त्यांची जास्त खात्री पटेल. कारण होल वर्ल्डमध्ये सर्वी जाणतात, की इंडियन लोक एकमेकांशीच जास्त फाईट्ट करतात.

आमचं असं हितगुज चालू असतानाच पुन्हा एकदा दारावरील बेल वाजली. दरवाजा उघडल्यावर मार्थाबाई ऐटीत आत आल्या.        

हाय, हाऊ आर यूझाल्यावर मार्थाबाई  घराचं निरीक्षण करीत सोफ्यावर टेकल्या  आणि पर्समधून एक पत्र काढून  वाचू लागल्या. पत्र वाचून झाल्यावर मार्थाबाईंनी  रवीला विचारलं, 'हे रँंवी, स्वीट बॉय, कुड यू टेल मी युवर ऍड्रेस?' 

रवीनं पोपटासारखा आमच्या घराचा पत्ता सांगितला. मी चाटच झालो. आईनं पठ्ठ्याला भलताच ट्रेन केला असावा.

'ओके, दॅट्स डन, 'असं म्हणून मार्थाबाई निघाल्या.  

'ऑल गुड नाऊ?' काऊनं दारात मार्थाबाईंना विचारलं.  

'येस. ऑल गुड फॉर नाऊ. आफ्टर सिक्स मन्थ्स देअर विल बी वन मोअर व्हिजिट अँड दॅट विल बी अ सरप्राईज व्हिजिट,' मार्थाबाईंनी उत्तर दिलं आणि गाडी स्टार्ट करून फुर्रकन निघून गेल्या.  

काऊचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

सिडनी, १५ जुलै २०२३

 

बंड्या प्रेमात पडला                     

(कालिदास जयंती २०२२ मध्ये सादर केलेली कथा वर्षी करोनामुळे कालिदास जयंती सभामंडपात साजरी झाली नव्हती. खालील कथा ऑनलाईन सादर केली)            

                           

'बंड्यामला एक सांगतू प्रेमात पडणार आहेस की नाहीस?' भांडी घासता घासता वसंतरावांनी विचारलं.  

'अरेच्चा ! ही काय जबरदस्ती आहेमला नाही प्रेमात पडायचं.' बंड्या म्हणाला.

'अरे बाबा, प्रेमात पड अगर पडू नको. लग्नाचा कधी विचार करणार आहेस?' राधाबाईनी विचारलं.

बंड्यावसंतराव आणि राधाबाईहे तीन माणसांचे कुटुंब पूर्वी वेंटवर्थव्हिलच्या उपनगरात युनिटमध्ये राहत असेआता बॉक्स हिलला नवीन हाऊस घेतल्यापासून राधाबाई आणि वसंतरावांचा बंड्यापाठी लग्नासाठी ससेमिरा लागला होता.

'आईहे ऑस्ट्रेलिया आहेइथे मुली लग्न करतात आणि भांडण करून अर्धी प्रॉपर्टी घेऊन निघून जातातआमच्या ऑफीसमधल्या  निकने लग्नच केलं नाही.' बंड्या म्हणाला.

'अरे तू तुझ्या बापाला कमी समजू नकोसतुझ्या नावावर आम्ही काही प्रॉपर्टी ठेवली नाहीआमचे डोळे मिटेपर्यंत तुला काहीही मिळणार नाहीत्यामुळे   ती तुझ्याबरोबर आयुष्यभर नांदणार याची खात्री बाळग,' वसंतराव   म्हणाले.

'अरेच्चाम्हणजे तुम्ही मला चक्क ब्लॅकमेल करत आहातइथे पाहिलं नं कसे नव्वद वर्षांचे म्हातारे माना डुगू डुगू हलवीत व्हील चेअरवर  शॉपिंग करीत असताततुम्ही काही नव्वदीपर्यंत राम म्हणणार नाही आणि तोपर्यंत मी आणि माझ्या बायकोने आश्रितासारखं राहायचं कायबरंते जाऊ द्यातुम्ही का प्रेमात पडला नाहीत?' बंड्याने विचारलं.

'अरे बाबामोठी माणसं सांगतात तसं वागावंवागतात तसं वागू नये,' वसंतराव म्हणाले.

'बाकी हे प्रेमात पडले नसतील यावर माझा विश्वास नाहीपरवा तर कमालच  केलीतासभर बसवून माझ्याकडून करोनासाठी फायझर व्हॅक्सिनचं  रजिस्ट्रेशन करून घेतलं.  ॲस्ट्राझीनिकामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात म्हणे.  गोरी नर्स बघून आले की ॲस्ट्राझीनिका घेऊनआता नाही का झाल्या रक्ताच्या गुठळ्या? ' राधाबाई फणक्याने म्हणाल्या.

रक्ताच्या गुठळ्या- करोनाचं काय घेऊन बसलीस ? जगातील कुठल्याही रोगाला तोंड देण्याचं सामर्थ्य आता माझ्यात आलं आहे. ती नर्स होतीच तशी गोड,’ वसंतराव स्वप्नात हरवल्यासारखे कुठे तरी पाहत म्हणाले.

घ्या. ऐका आता. लाकडं घाटावर जायची वेळ आली तरी थेरं संपत नाहीत. माझ्या मैत्रिणी आल्या की लागले गोंडा घोळायला,' राधाबाई ठसक्यात म्हणाल्या.

'तुझ्या मैत्रिणी नात्या येतात बाजूच्या स्वर्णमाला ब्यूटी पार्लरमध्ये डॉलर्स उडवायला  आणि चहाचे पैसे वाचवायला येतात तुझ्याकडेमी स्वर्णमाला बाईंच्या कौशल्याला दाद देत असतो,' वसंतराव म्हणाले.

'कळतात बरं का टोमणे मलामी माझ्या पैशावर जाते ब्यूटी पार्लरमध्येतुमच्या बहिणीसारख्या नवऱ्याच्या पैशावर भुवया नाही कोरतआणि ते भांडं नीट घासा जराकाल मी कुकर लावायला घेतला तर कुकरला चक्क भाताचं शीत लागलेलं .’ राधाबाई कडाडल्या. ‘

घासतो घासतो,  नीटच घासतो,' वसंतराव कातावून म्हणाले, ''बंड्यातू मथितार्थ लक्षात घेबायकोच्या मैत्रिणी पाहावयाच्या असतील तरी लग्न करायला हवे की नको?' वसंतरावांनी विचारलं.

'म्हणजे तुम्ही आज हा प्रश्न धसास लावायचा ठरवलेलं दिसतं तरठीक तरमीसुद्धा जातो आणि येतो चांगली चायनीज सून घेऊन तुमच्यासाठीबसा बेडकाच्या तंगड्या खातआणि एखादी तंगडी  घशात अडकली की म्हणा रामनव्वदाव्या वर्षी मान डुगू डुगू हलवायचाही त्रास नाही.' असे म्हणून बंड्या गाडीची चावी घेऊन ताड ताड निघाला

'अगं बाईथांबवा त्यालाचायनीज सून आणतोय म्हणेम्हणजे आता घरात वुहानची प्रयोगशाळा सुरू तर होणार नाही ना ? माझ्या सर्व मैत्रिणी आपल्या घरावर बहिष्कार टाकतील हं, ' राधाबाई घाबरून म्हणाल्या.

अरेच्च्या, मग माझं कसं होणार?’ वसंतराव म्हणाले. राधाबाईनी डोळे वटारून पाहताच वसंतराव दुसरीकडे पाहू लागले.

वसंतराव आणि राधाबाई दोघे बंड्याच्या पाठी धावलेपरंतु बंड्या गाडी स्टार्ट करून राइटचा सिग्नल  देताच निघालासुद्धावसंतराव आणि राधाबाई कपाळाला हात लावून बसले

'प्रेमात पड म्हणे.' बंड्या स्वतः शीच बडबडत होता. 'बिल चांगला सांगत होताइथली मुलं आई-वडिलांच्या बरोबर राहत नाहीतमीच पडलो श्रावणबाळआता भोगतोय फळं ! '     

बंड्या तसा सभ्य  मुलगाकारण दुसरा एखादा मुलगा अशा वेळी पबमध्ये गेला असताबंड्या आला वुलवर्थसमध्येगाडी पार्क करून बाहेर येतो तोच त्याला ट्रॉलीच्या रांगेतून ट्रॉली काढताना सई दिसलीवेंटवर्थव्हिलच्या युनिटमध्ये राहत असताना सई आणि तिचे आई-वडील त्याच बिल्डिंगमध्ये राहत असत.   बंड्या आणि सईच्या  घरच्यांचे चांगले संबंध होतेसई चांगलीच चुणचुणीत होतीवसंतरावांच्या डोळ्यात खुपणारी राधाबाईंची महागडी ऍव्हॉनची प्रसाधने सई स्वतःच्या नावावर खरेदी करून गुपचूप राधाबाईना आणून द्यायचीत्यामुळे राधाबाईंचं आणि सईचं चांगलं सूत  होतं  . तिच्या या कौशल्यामुळे बंड्या तिला ‘आनंदीबाई’ म्हणत असे.

सईला बघून बंड्याच्या डोक्यात लक्खकन एक युक्ती चमकलीतो धावत जाऊन सईला म्हणाला ,'आनंदीबाईइकडे कुठे?'

'अरे,आम्ही आलो त्या रानड्यांकडे हाऊस वॉर्मिंगला आई-बाबा बसले सगळ्यांबरोबर गप्पा मारतमी म्हटलं जरा शॉपिंग करून घ्यावंतेवढाच जाताना वेळ वाचेल.'  

'शॉपिंग जाऊ देबंड्या तिच्या हातातील ट्रॉली बाजूला करीत म्हणाला, 'चलमाझ्याबरोबर घरीमला तुझ्या प्रेमात पडायचं आहे.'

'अय्या खरंचम्हणजे तू मला हृतिक रोशन सारखं ‘कहो ना प्यार है’ म्हणणार?’ सई आनंदून म्हणाली

' ! हे सारं खोटं हं.' बंड्या म्हणाला.

'उं उं ! म्हणजे तू मला प्रेम चोप्रासारखं फसवणार?' असं म्हणत सई रडू लागली

 ‘ माझे आईआता भोकाड पसरू नकोसपब्लिक माझी धुलाई करील,’ बंड्या घाबरून म्हणाला. 

वुलवर्थसमध्ये पोलीस असण्याचं काही कारण नाहीपरंतु अचानक एक पोलीस दत्त म्हणून उभा राहिला. 'आर  बी टी ची कमाई सोडून हा पांडू इथे कुठे तडफडायला आला?' बंड्या वैतागून पुटपुटला.

बंड्याकडे करड्या नजरेने पाहत पोलीस सईला म्हणाला, ' आर यू ऑल राईट मॅम ?'

'येस येस आय ॲम ऑल राईटथँक्स व्हेरी मच, ' सई अश्रू पुसून उसने हसत म्हणाली.

नो वरीजटेक केअर,' पोलीस बंड्याकडे संशयाने पाहत निघून गेला.

सई निमूटपणे बंड्याबरोबर निघाली आणि गाडीत येऊन बसलीदोघे घरी आलेसईला दारात पाहताच वसंतराव आणि राधाबाईंच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळल्यात्या कशासाठी ते ओळखून सई मनातून खटटू झाली.

चहा-बिस्किटे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सई म्हणाली,' काकू निघते मी आताउशीर होतोय.' 

'थांब सई,' बंड्या एकदम उठून म्हणाला.

सईने बंड्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.

'अजून मी तुला ‘कहो ना प्यार है’ , म्हटलं  नाहीतू पोलीसाला माझ्यासाठी खोटं सांगितलं ती अदा मला एवढी आवडली की मी तेव्हाच ठरवून टाकलं की तुला ‘कहो ना प्यार है’ म्हणायचंचहो . आणि मी तुला प्रेम चोप्रासारखं फसवणारही नाही. ' बंड्या एका दमात म्हणाला.  

बंड्याला एकदम आपण तरंगत आहोत असा भास झालाप्रेमात पडल्यावर 'आय वॉंट टू डान्स ऍण्ड प्लेअसं वाटतं हे बंड्याला  हिंदी चित्रपटातून  माहीत होतं.

पण चक्क तरंगण्याचा अनुभवमग  बंड्याच्या लक्षात आलं की कंबरदुखी विसरून वसंतरावांनी बंड्याला चक्क उचलून घेतलं होतंवसंतरावांनी बंड्याला एकदम सोडलंबंड्या जवळ जवळ पडलाचवसंतराव म्हणालेबंड्या प्रेमात-'

'पडला.’ सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं.

 'हिप हिपवसंतराव म्हणाले.

सगळ्यांनी वाक्य पूर्ण केलं, 'हुर्रे.'  

प्रतिक्रिया:

जितेंद्र वैद्य:

बघितले सर खूप छान भट्टी जमली आहे.पण बंड्या काल्पनिक की अस्तित्वात असो खुप शुभेच्छा. इतर सहभागी कलाकार आणि सिडनी वासींयाना शुभेच्छा नमस्कार💐👏

मिलिंद बर्वे:

उत्तमम् (संस्कृत)

अरुण डाबरे (नागपूर)

👌👌👌Ekdam Sunder ahe Sir

समीर राणे:

मस्त भाऊ 👌🏻👌🏻👌🏻

लतामावशी:

Chan mast sunder.

Sangeeta Rodrigues:

आपला बंड्या प्रेमात प ङ ला वाटतं 😍👌🏼 मस्त छान छोटीशी गोष्ट आणि हळूच एक सुंदर विनोदाची झालर . मजा आली 👌🏼💐🙏🏻

वर्षाच्या आई:

अप्रतिम👌👌👍👍👏👏

संतोष चावक : मस्त👌👌[11:22 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Jijaji Sahi katha

[5:42 pm, 19/09/2021] माधवी: Did you listen to Bhau's story on Kalias program? Very interesting,  good narration. Please convey my congratulations,  I don't have his or Varsha's number.

[5:43 pm, 19/09/2021] माधवी: From Lalita our friend I think kalidas jayanti ka?

[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Chan hoti on very lighter mood

[11:23 pm, 26/09/2021] वैशाली चित्रे: Mag Advait la kadhi ase mhannar 😃😃😃



Monday, April 22, 2024

अण्णाआजोबांचे ज्ञानवर्ग -क्वांटम फिजिक्स

 

अण्णाआजोबांचे ज्ञानवर्ग -क्वांटम फिजिक्स 


(माझ्या वडिलांना, अण्णांना, वाचनाची खूप आवड होती. ते थोडं वाचन करीत, परंतु जे वाचत त्याचं ते चांगलं परिशीलन करीत. कुठलीही गोष्ट ते अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगत. ज्या काळात गुगल नव्हतं , त्या काळात आम्हाला निरनिराळ्या शंकांच्या निरसनासाठी अण्णांचा आधार होता. कुठल्याही प्रश्नावर त्यांनी 'मला माहीत नाही, ' किंवा 'एकसारखे प्रश्न विचारून मला भंडावू नका,' असं सांगितल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या या ज्ञानोपासनेने प्रेरित होऊन मी ही  कथा लिहिली आहे.)


'अण्णाआजोबा, आज मी एक बातमी वाचली. आपल्यापासून अब्जावधी किलोमीटर, म्हणजे खरं तर काही प्रकाशवर्षे दूर असणा-या ता-यावर म्हणे जीवसृष्टी असल्याचा शास्त्रज्ञांना शोध लागला. कसं कळत असेल हो त्यांना?,' गोपाळ म्हणाला.

'अहो शास्त्रज्ञमहाराज, कशाला अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या ता-यांच्या उठाठेवी करता? आई झोपली की स्वयंपाक खोलीतील लाडवांचा डबा दिसतो तेवढं पुरेसं नाही का?' सीता खवचटपणे म्हणाली.

गोपाळ यावर काही बोलण्याच्या आत अण्णाआजोबा म्हणाले,'सीता, गोपाळने चांगला प्रश्न विचारला आहे. गोपाळ, यासाठी तुला क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम मेकनिक्स म्हणून भौतिकशास्त्राची शाखा आहे, तिची माहिती करून घेतली पाहिजे.'

'क्वांटम फिजिक्स? हा काय प्रकार आहे बुवा?' करीम म्हणाला. 

'आहे, आहे, आमच्या भौतिकशास्त्राच्या मँडम सांगत होत्या. पण त्या म्हणाल्या, ते खूप कठीण आहे. एवढयात तुम्हाला समजणार नाही,' यस्मीन म्हणाली.

'असू दे कठीण. अण्णाआजोबांनी सांगितलं की कठीण गोष्टीसुद्धा कळतात आपल्याला. सांगा हो अण्णाआजोबा,' गणपत म्हणाला.

'बरं बरं, सांगतो,' अण्णाआजोबा म्हणाले. सारे जण अण्णाआजोबांभोवती गोळा झाले.

'लाडवाचा विषय चालला होता ना, हे घ्या  लाडू,' ज्योत्स्नाआजीने रव्याच्या लाडवांचा डबा समोर आणून ठेवला.

'थँक्यू ज्योत्स्नाआजी,' असं म्हणत सर्वांनी डब्यातील एकेक रव्याचा लाडू उचलून लाडू खात खात अण्णाआजोबा काय सांगतात ते ऐकू लागले.

'तुम्ही चौपाटीवर गेला असाल. तेथे समुद्राच्या लाटा कुणी पाहिल्या आहेत?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'हो अण्णाआजोबा, मी पाहिल्या आहेत समुद्राच्या लाटा,' अहमद म्हणाला.

'अण्णाआजोबा, याने लाटा वगैरे काही पाहिल्या नाहीत. चौपाटीवर गेल्यावर हा नुसता भेळीच्या गाड्या शोधत असतो,' यस्मिन म्हणाली.

'यस्मिन, आता मार खाशील हं,' अहमद रागावून म्हणाला.

'नाही नाही, अहमदने ख-याच पाहिल्या असतील लाटा. अहमद, कशा होत्या लाटा?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'वारा संथ असला की लाटा लहान असतात. वारा जोरात आला की मोठ्यामोठ्या लाटा येतात. दोन खडकांच्या मध्ये वारा नसताना अर्धवर्तुळाकार लाटा मी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी लाटा हळुवारपणे विरुद्ध दिशांनी येतात आणि एकमेकांत मिसळून जातात. मग लाटच दिसत नाही,' अहमदने सांगितलं.

'वा अहमद, तू लाटांचं वर्णन फारच चांगलं केलंस. आता बाहेर दिसणा-या सूर्यप्रकाशाकडे पहा. हा प्रकाशसुद्धा अशा लाटांच्या किंंवा तरंगांच्या स्वरूपात असतो,' अण्णाआजोबा म्हणाले.

'अच्छा. म्हणजे आपण ध्वनिलहरी, विद्युतलहरी म्हणतो, तशा प्रकाशलहरी म्हणायच्या का?' गोपाळने विचारलं.

'हो तशाच. या लाटासुद्धा कमीअधिक उंचीच्या, लांबीच्या असतात, वर्तुळाकार असतात. आणि गंमत म्हणजे अहमदने सांगितल्याप्रमाणे त्या एकमेकांना नाहीशा करतात. म्हणजे प्रकाश चक्क अदृश्य होतो,' अण्णा आजोबा म्हणाले.

'अण्णाआजोबा, आमच्या वर्गात प्रकाश नावाचा एक मुलगा आहे. तो एका जागी ठरतच नाही. टीचर त्याला म्हणतात, ' तू मध्येच कसा रे अदृश्य होतोस?' या प्रकाशाचंही तसंच दिसतंय. गंमतच म्हणायची.' सीता म्हणाली.

अण्णाआजोबांना हसू आवरेना. हसत हसत ते म्हणाले,' आहे खरी गंमत. पण ही गंमत इथेच संपत नाही.

शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की अतिनील (ultraviolet) किरणे, ज्यामध्ये प्रकाशलहरी अगदी कमी लांबीच्या असतात, त्यांचासुद्धा विद्युच्चुंबकीय (electro-magnetic) परिणाम होतो.

शास्त्रज्ञांना कळेना असं का होतं. हे कोडं सोडवलं थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइनने. त्याने १९०५मध्ये असा सिद्धांत मांडला की प्रकाश केवळ तरंगमय नाही, तर तो कणमयही आहे. 

हा नवाच सिद्धांत होता. कारण कण असतात पदार्थाचे. पण प्रकाश तर ऊर्जा किंवा कार्यशक्ती आहे. तिचे कसे कण असणार? पण या मांडणीमुळे शास्त्रज्ञांना पुढील गुंता सोडवण्याचा मार्ग सापडला. त्यामुळे आइनस्टाइनलला या सिद्धांताबद्दल १९२१ साली नोबेल पारितोषिक मिळाले.  प्रकाशाच्या या कणांना शास्त्रज्ञांनी नाव दिलं 'फोटॉन.'

'अण्णाआजोबा, मी पाहिले आहेत फोटॉन्स,' गणपत म्हणाला,'आमच्या घरी दुपारी झरोक्यातून ऊन आलं की त्यात फोटॉन्स दिसतात.'

'नाही बाळा, ते धूलिकण. फोटॉन्स नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाहीत. फोटॉन्स हे प्रकाशाचाच भाग आहेत. फोटॉन हा शब्द ग्रीक फोस किंवा फोटोसपासून बनला आहे आणि त्याचा अर्थ आहे प्रकाश. कळतंय ना? डोक्यावरून जात नाही ना सीता?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'हो हो, चांगलं कळतंय. सांगा पुढे,' सीता उत्सुकतेने म्हणाली.

'गणपत, तू दुकानातून बिस्किटं आणत असशील. कशी आणतोस सांगशील?' अण्णाआजोबांनी गणपतला विचारलं.

'हो. पारले ग्लुको बिस्किटं बरणीत ठेवलेली असतात. ती सुटी मिळतात. ब्रिटानिया किंवा दुसरी कुठली बिस्किटं हवी असतील, तर ती सुटी मिळत नाहीत, अख्खा पुडा घ्यायला लागतो,' गणपत म्हणाला.

'शाबास. आता असं समजा की निसर्ग हा एक दुकानदार आहे. तुम्हाला तो पदार्थ सुटा देतो, पण ऊर्जा किंवा शक्ती मागितली, तर तुम्हाल पाकीटात देतो. याचा अर्थ फोटॉन्स पाकीटबंद असतात.

मँक्स प्लँक नावाच्या जर्मन फिजिसिस्टने १९०० साली असं सुचवलं होतं की ऊर्जा अशा पाकीटांतून संक्रमित होते. या पाकीटांना त्याने शब्द वापरला 'क्वांटा' म्हणजे 'विशिष्ट परिमाण.' ऊर्जा या स्वरूपात असल्याने तिला म्हटले गेले 'क्वांटम एनर्जी' आणि या ऊर्जेच्या अभ्यासासाठी असणारी भौतिकशास्त्राची शाखा 'क्वांटम फिजिक्स' म्हणून ओळखली जाते.' अण्णाआजोबा म्हणाले.

'वा अण्णाआजोबा, खूपच चांगलं सांगितलं. पण या ऊर्जेचे उपयोग काय आहेत?' अहमदने विचारलं.

'खूपच. हल्ली सर्व क्षेत्रात क्वांटम एनर्जीचा वापर होतो. फोटॉन्स म्हणजे आपले मित्रच आहेत. टोस्टरचं बटण दाबलं की फोटॉन्स लागले कामाला. मग गणपतला सकाळी चहाबरोबर खाण्यासाठी गरमागरम टोस्ट मिळतो. टोस्टरच नाही तर सारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, डिजिटल कॅमेरा, जी पी एस, कॉंप्युटर्स, लेझर, एक्स रे, एम आर आय - सर्वच ठिकाणी क्वांटम एनर्जीचा उपयोग होतो. खरं तर क्वांटम एनर्जीने आपलं जीवन एवढं व्यापलं आहे, की क्वांटम एनर्जीचा वापर होत नाही, असं क्षेत्रच राहिलं नाही,' अण्णाआजोबा म्हणाले.

'सारं  अगदी अचंबित करणारं आहे!' करीम उद्गारला.

'अगदी बरोबर बोललास करीम. नील्स बोर नावाच्या शास्त्रज्ञाने तर म्हटलं आहे की क्वांटम सिद्धांताच्या पहिल्या ओळखीत तुम्ही अचंबित झाला नसाल, तर कदाचित हा सिद्धांत तुमच्या लक्षातच आलेला नसेल,'अण्णाआजोबांनी सांगितलं.

'पण अण्णाआजोबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही,' गोपाळ म्हणाला.

'आता आपण तुझ्या प्रश्नाकडे येऊ या,' अण्णाआजोबा म्हणाले.

'गोपाळ, एक काम कर. तू असा मध्ये उभा रहा,' अण्णाआजोबा म्हणाले. गोपाळ मध्ये उभा राहिला. 

'अहमद, आता तू गोपाळच्या बाजूला उभा रहा,' अण्णाआजोबा म्हणाले. अहमद गोपाळच्या बाजूला उभा रहा.

'आता गोपाळ, तुझं नाव प्रोटॉन. आणि अहमद, तुझं नाव इलेक्ट्रॉन. कळलं?' दोघांनी माना डोलावल्या.‌

'आता अहमद, तू गोपाळभोवती फे-या मार,' अण्णाआजोबा म्हणाले.

'हा झाला हायड्रोजनचा अणू. सर्वांत सोपी रचना - मध्यभागी प्रोटॉन आणि त्याभोवती फिरणारा इलेक्ट्रॉन. या आता बसा दोघं जण,' अण्णाआजोबा म्हणाले.

'सर्व पदार्थ अशा अणूंचे बनलेले असतात. या प्रोटॉन्सचा फोटॉन्शी काही संबंध नाही. प्रोटॉन्स धन विजेने भारित असतात तर इलेक्ट्रॉन्स ऋण विजेने भारित असतात. काही अणूंच्या केंद्रस्थानी प्रोटॉन्सच्या जोडीला न्यूट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन्स उदासीन असतात-म्हणजे ना धन विजेने भारलेले, ना ऋण विजेने भारलेले. तरीसुद्धा प्रोटॉन्सच्या गळ्यात गळा घालून अणूच्या केंद्रस्थानी बसतात. इलेक्ट्रॉन्स मात्र म्हणतात, 'आम्ही आपले बाहेरच बरे.' मारतात फे-या, मारतात फे-या. कुठलं गाणं म्हणत असतील?'

'मी सांगते अण्णाआजोबा, यस्मीन म्हणाली, "ये दोस्ती, हम नहीं छोडेंगे.' 

सर्वजण हसू लागले. अण्णाआजोबा सुद्धा हसले आणि म्हणाले, ' या विश्वातील सारे पदार्थ-घन, द्रव, वायू-सजीव, निर्जीव- या सूक्ष्म अणूंचे बनलेले आहेत.

'सीता, तुझी दिल्लीला राहणारी मावसबहीण आशा तुझ्या घरी राहायला आली की तू काय करते?' अण्णाआजोबांनी विचारली.

'अय्या, अण्णाआजोबा मी तर आनंदाने अगदी वेडी होते. पहिल्यांदा आम्ही एकमेकींना कडकडून मिठी मारून थोडा वेळ नुसत्याच उड्या मारतो. आम्ही एकमेकींना शाळेतल्या गमती जमती सांगतो. काय करायचं, कुठे जायचं ते ठरवायला लागतो,' सीता म्हणाली.

'म्हणजे शास्त्रीय भाषेत तुम्ही दोघी खूप उत्तेजित (excite) होता, तुमची ऊर्जापातळी (energy level) खूप वाढते, खरं की नाही?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'हो, ऊर्जापातळी एवढी वाढते की आम्ही रात्रीसुद्धा गप्पा मारत बसतो. शेवटी आई आणि मावशी आम्हाला रागवतात आणि म्हणतात, "आता झोपा. उद्यासाठी थोड्या गप्पा ठेवा,' सीता म्हणाली.

'आता प्रकाश जेव्हा एखाद्या वायूच्या अणूमधून जातो, तेव्हा प्रकाशामधील फोटॉन भेटला की वायूच्या अणूमधील इलेक्ट्रॉन सीतासारखाच उत्तेजित होतो आणि त्याची ऊर्जापातळी वाढते,' अण्णाआजोबांनी सांगितलं.

'प्रत्येक वायूच्या अणूमधील इलेक्ट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक वायूच्या अणूमधील ऊर्जापातळीमधील वाढ  कशी असेल?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'वेगवेगळी असेल,' सर्व मुले एकदम म्हणाली.

'तुम्ही सर्वांनी इंद्रधनुष्य पाहिलं असेल,' अण्णाआजोबा म्हणाले. सर्वांनी माना डोलावल्या. 'बालकवी ठोंबरे यांनी या इंद्रधनुष्याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. कोण सांगेल?' 

'मी सांगतो अण्णाआजोबा,'अहमद म्हणाला,

'वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे.'

'शाबास, आता हे इंद्रधनुष्य का दिसतं, माहीत आहे?' अण्णाआजोबा म्हणाले.

'मी सांगतो अण्णाआजोबा,' गणपत म्हणाला,'सूर्यप्रकाश सात रंगांचा बनलेला असतो. ऊन असताना, विशेषत: सूर्य आपल्या पाठीमागे असताना समोर पाऊस पडला, तर पावसाचे थेंब असंख्य लोलकांचं काम करतात आणि प्रकाशाचं पृथक्करण होऊन इंद्रधनुष्य दिसतं.'

'गणपतने आता एक महत्त्वाचा शब्द वापरला-लोलक,' अण्णाआजोबा म्हणाले,' तुम्ही लोलक पाहिला आहे का?' 

'मी पाहिला आहे,' सीता म्हणाली,' माझी मैत्रीण नंदाच्या घरी लोलकांचं झुंबर आहे. सकाळी या झुंबरावर ऊन पडलं किंवा रात्री लाइट लावला की खोलीभर सगळीकडे सातरंगी प्रकाश दिसतो.'

'म्हणजे हे लोलक प्रकाशाचं पृथक्करण करतात,'अण्णाआजोबा म्हणाले, ' आता शास्त्रज्ञांकडे जो लोलक असतो त्याला प्रिझम किंवा त्रिकोणचिती म्हणतात.  हा प्रिझम सिलिंडर सारखा असतो. पण सिलिंडर गोलाकार असतो, प्रिझम त्रिकोणी असतो. या प्रिझममधून प्रकाशझोत सोडला की शास्त्रज्ञांना सातरंगी वर्णपट किंवा spectrum दिसतो.

आणि आपण आता पाहिल्याप्रमाणे फोटॉन्सची ऊर्जापातळी बदलली की वर्णपटसुद्धा वेगळा दिसतो.

'शेरलॉक होम्सच्या गोष्टी कुणी वाचल्या आहेत?' अण्णाआजोबांनी विचारलं.

'अण्णाआजोबा, तुम्हीच आम्हाला सांगितल्या आहेत,'करीम म्हणाला,' ब्लू कार्बंकल भारी मजेदार गोष्ट आहे. या गोष्टीत जेम्स रायडर हा चोर काऊंटेसबाईंचा हिरा चोरून आपल्याला भेट मिळणा-या बदकाला भरवतो. हे बदक सगळ्या बदका़ंत मिसळल्यावर हा चांगलाच फसतो. कारण आता हे बदक ओळखणार कसं? शेरलॉक होम्स जेम्स रायडरला बरोबर शोधून काढतो. शेरलॉक होम्स खूप कठीण गुन्ह्यांचा तपास लावतो.'

'करीम, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे. मला तर ही गोष्टच आठवत नाही,' अण्णाआजोबा म्हणाले,' तर शेरलॉक होम्स गुन्ह्यांचा तपास कसा लावतो?'

'अण्णाआजोबा, तो काय करतो, आधी सारे क्लूज गोळा करतो. या क्लूजचा अभ्यास करून तो तर्कसंगत निष्कर्ष काढतो,' करीम म्हणाला.

'तर गोपाळ, आता तुझ्यापुढे सारे क्लूज आहेत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू शोधून काढू शकतोस का? मला तुम्हा मुलांनी नुसती श्रवणभक्ती करायला नको आहे. तुम्हीसुद्धा विचार करून प्रश्नांची उत्तरं शोधून काढली पाहिजेत,' अण्णाआजोबा म्हणाले.

'प्रयत्न करतो अण्णाआजोबा,' गोपाळ म्हणाला.

'शाबास, ये असा समोर. तुला लागलं तर या व्हाइटबोर्डचा वापर कर,' अण्णाआजोबा म्हणाले.

'शास्त्रज्ञांनी काय केलं असेल, निरनिराळ्या वायूंमधून प्रकाश सोडून, त्या प्रकाशाचे प्रिझममधून पृथक्करण करून या सा-या वर्णपटांचा डाटाबेस बनवला असेल.

'एखादा ग्रह जीवसृष्टीस अनुकूल असण्यासाठी तेथे ऑक्सिजन असला पाहिजे. तेथे पाणी असलं पाहिजे,' गोपाळ म्हणाला.

'पाणी तर द्रवपदार्थ आहे,' गणपतने शंका काढली.

' ज्या ग्रहावर पाणी असेल तेथील वातावरणात पाण्याची वाफ आढळेल,' गोपाळ म्हणाला.

'बरोबर आहे,'अण्णाआजोबा म्हणाले,'पाण्याचा अणू हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनला आहे. त्यामुळे त्याला अणू (atom) न म्हणता रेणू (molecule) म्हणतात.'

'जीवसृष्टी आहे की नाही हे सांगण्यास आणखी एका वायूचे अस्तित्व उपयोगी पडते, तो म्हणजे मिथेन. आपण  एखादे डबके हलवले तर कुजलेल्या गाळातून बुडबुडे बाहेर पडतात. हे बुडबुडे मिथेन वायूचे असतात,'अण्णाआजोबा म्हणाले.

'शी गं बाई, हा घाणेरडा वायू जीवसृष्टीबद्दल काय सांगणार?' सीता म्हणाली.

'सजीव कुजण्याने उत्पन्न होणारा मिथेन वायू आहे, त्या अर्थी तेथे जीवसृष्टी असली पाहिजे,' गोपाळ म्हणाला.

'बरोबर,' अण्णाआजोबा म्हणाले.

'दूर ग्रहावरून आलेला प्रकाश दुर्बिणीत बंदिस्त झाल्यावर शास्त्रज्ञ या प्रकाशाचा प्रिझममधून वर्णपट घेत असतील. हा वर्णपट जर ऑक्सिजन, पाण्याची वाफ, मिथेन अशा वायूंतून नोंदविलेल्या वर्णपटाशी जुळला, तर या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे,' गोपाळ म्हणाला.

'वा गोपाळ, फार चांगल्या प्रकारे स्पष्ट केलंस', अण्णाआजोबा गोपाळच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून म्हणाले.

एवढ्यात ज्योत्स्नाआजी बाहेर आली आणि म्हणाली,'काय शिकवलं आज अण्णाआजोबांनी?'

'ब्रेडचा टोस्ट कसा होतो ते,' गणपत  म्हणाला. सर्व मुले हसू लागली.

'गणपतला एवढ्या गोष्टींतून खाण्याचीच गोष्ट लक्षात राहिली,' सीता म्हणाली.

'असू दे. एखाद्याला एक सारखं चिडवू नये. मी तुझ्याबरोबर आहे गणपत. मला आवडतो टोस्ट. अण्णाआजोबा, उद्या ब्रेड घेऊन या. आपण मुलांना  चहाबरोबर गरमागरम टोस्ट, बटर, जाम देऊ या, ' ज्योत्स्नाआजी म्हणाली.

'थँक्यू ज्योत्स्नाआजी, थँक्यू अण्णाआजोबा,' असं म्हणून सर्व मुले निघून गेली.


(हा लेख Super Smart Science, Quantum Physics made easy या Dr. Vincent Tobin यांच्या पुस्तकातील माहितीवर आधारित आहे. पुस्तकाची अधिक माहिती www.waylandbooks.co.uk या संकेतस्थळावर मिळेल)