Thursday, January 29, 2026

चहाविषयी रंजक माहिती

काही विशिष्ट कारणांनी चहा न घेणारे लोक सोडले तर चहा बहुतेक सर्वांच्या जीवनाचा आवश्यक भाग झाला आहे. पण या चहाविषयी माहिती आपल्यापैकी किती जणांना आहे? या चहाविषयी रंजक माहिती श्री. पारितोष तिरोडकर त्यांच्या ChaiGPT - Gossip. Pause. Tea या पुस्तकात सांगत आहेत.

ChatGPT या AI आधारित tool चे नाव देऊन  लेखक आधी आपली उत्सुकता वाढवतात, पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करतात आणि मग चहा विषयी माहिती अशा शैलीत सांगतात की पुस्तक पूर्ण  वाचल्याशिवाय खाली ठेवून शकत नाही .        
चहाचा इतिहास:
चहाला सुमारे ५००० वर्षांचा इतिहास आहे. पण भारतात चहा लोकप्रिय करण्याचे श्रेय ब्रिटिशांकडे जाते. ब्रिटिश राजवटीत १९ व्या शतकात चहा भारतात आला आणि रुजला.

चहाचे प्रकार:
चहाचे असंख्य प्रकार आहेत. मसाला चहा, आल्याचा चहा, वेलचीचा चहा ही त्याची काही उदाहरणे. चहा दूध घालून आणि दुधाशिवायही लोकांच्या पसंतीला उतरतो. सुलेमानी चहात दूध घालत नाही आणि त्यात लिंबू, पुदिना आणि काही मसाले घालतात.

चहाचे प्रादेशिक प्रकार:
चहाचे विविध प्रदेशांत लोकप्रिय असे प्रकार आहेत. मुंबईमधील कटिंग चहा, हैदराबादचा इराणी चहा, काश्मीरचा नून चहा यांचा स्वाद त्या त्या प्रदेशात गेल्यावर आवर्जून घेण्यासारखे आहेत.

चहा आणि आयुर्वेद:
आयुर्वेदाने मनुष्याच्या प्रकृतीचे  कफ, वात आणि पित्त असे तीन घटक असून आणि आरोग्याच्या समस्या या घटकांतील असंतुलनामुळे होते असे प्रतिपादन केले आहे. या तिन्ही दोषांवर वेगवेगळ्या प्रकारे बनवलेला चहा उपयुक्त आहे.

चहा आणि भारत:
भारतात दिवसाला लक्षावधी कप चहा प्यायला जातो. भारतात ज्यांनी चहा व्यवसायाने सुरुवात करून पुढे आपली यशस्वी कारकीर्द घडवली असे बरेच लोक आहेत. यांमध्ये भारताचे सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा आवर्जून उल्लेख केला जातो.

चहाचा विश्वविजय:
चहाची जागतिक उलाढाल २०० बिलियन डॉलर्स आहे. उत्तर अमेरिकेत चाय लाटे लोकप्रिय आहे. कॅनडामध्ये सुपर मार्केट्मसध्ये चहाचे निरनिराळे इन्फ्युजन्स विक्रीसाठी ठेवलेले असतात. यू के मध्ये चहाला प्रतिष्ठेचे स्थान आहे. अशा प्रकारे चहाने सारे विश्व व्यापले आहे.

लेखक निरनिराळ्या चहाच्या कृतीसुद्धा सांगतात आणि आपल्या जीवनातील भावनिक प्रसंग, राजकारणी लोकांच्या राजकीय बैठकी चहाशी कशा निगडित आहेत , त्यांचे वर्णन करतात. 

५५ पानांचे हे चिमुकले पुस्तक आपल्या आवडत्या पेयाविषयी, चहाविषयी अशी रंजक माहिती देते. तेव्हा पुस्तक जरुर वाचा आणि चहाविषयी आपल्या आठवणींमध्ये रमून जा. 
पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे.

लेखकाविषयी:

                  श्री. पारितोष तिरोडकर 

या पुस्तकाचे लेखक श्री. पारितोष तिरोडकर यांनी ऑस्ट्रेलियामधून फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.  

श्री. तिरोडकर यांना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यू के आणि भारत या देशांमध्ये  फायनान्स आणि ऑडिट या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा १२ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.श्री. तिरोडकर यांनी टीडी बँक, रॉयल बँक ऑफ कॅनडा, यूबीएस, ड्यूश बँक आणि मॉर्गन स्टॅनली अशा नामांकित संस्थांसोबत काम केले आहे. 

डिस्क्लेमर: 

श्री. पारितोष तिरोडकर  यांनी लिहिलेल्या ChaiGPT -Gossip, Pause, Tea या पुस्तकावर लिहिलेली ही ब्लॉग पोस्ट  आहे. ब्लॉगचा लेखक  पुस्तकावर कोणत्याही प्रकारच्या कॉपीराइटचा दावा करत नाही. कॉपीराइट लेखक/प्रकाशकाकडे आहे. पुस्तकातील संदर्भ आणि त्यातील आशयाची चर्चा केवळ शिक्षण आणि मनोरंजनासाठी आहे. 

-Blog post by Dr Hemant Junnarkar 
Blog post © Dr Hemant Junnarkar,
All rights reserved 





Monday, January 5, 2026

कॅटरॅक्ट डॅम, सिडनी (Cataract dam, Sydney) ची सफर

कॅटरॅक्ट डॅम — कुठे आहे
Cataract Dam हे धरण न्यू साउथ वेल्स (NSW),  या ऑस्ट्रेलियाच्या राज्यामध्ये Cataract (पूर्वी Appin) या भागात स्थित आहे. हे धरण सिडनी शहरापासून सुमारे ८४ किमी दक्षिणेला आहे. 

📜 डॅमचा इतिहास
कॅटरॅक्ट (Cataract) हा सिडनीच्या पाणी पुरवठा योजनेतील सर्वांत जुना आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक डॅम आहे. याचे बांधकाम १९०२ मध्ये सुरू झाले आणि १९०७ मध्ये पूर्ण झाले.  सिडनीच्या वाढत्या पाण्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी Upper Nepean Scheme ही योजना सुरु झाली. हा डॅम या योजनेमधील  पहिला डॅम होता.  

या डॅममधून मुख्यतः सिडनी मेट्रो भाग व Macarthur आणि Illawarra या प्रांतांना पाणीपुरवठा होतो. शिवाय पुरवठा व टंचाईच्या  काळात डॅमचा बफर म्हणून उपयोग होतो. 

सिडनी प्रणालीमध्ये Warragamba Dam हा क्षमतेने सर्वांत मोठा असून, Cataract Dam हा Upper Nepean Scheme मधील तुलनेने लहान पण ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

📏 फिजिकल माहिती:
हा डॅम  कॅटरॅक्ट (Cataract) नदीवर बांधलेला असून कॅटरॅक्ट नदी पुढे नेपिअन (Nepean) नदीमध्ये विलीन होते.

हा डॅम ग्रॅव्हिटी (gravity) प्रकारचा डॅम (सिंचनासाठी) असून याची उंची ५६ मीटर असून लांबी २४७ मीटर आहे. या डॅमची साठा क्षमता ९४,३०० मेगॅलिटर ( सुमारे ९४ अब्ज लिटर) इतकी आहे. धरणातील पाण्याचे पृष्ठभाग क्षेत्र ८५० हेक्टर आहे.

आमची कॅटरॅक्ट डॅमची सफर

तारीख: ३/१/२०२६ (शनिवार)
मी, माझी पत्नी वर्षा, संजय कुलकर्णी, पत्नी वर्षा, संजयचे चिरंजीव वरुण, संजयची मुलगी सुप्रिया, सुप्रियाचे पती नीरज, सुरेश मगर, त्यांच्या पत्नी सुचित्राताई, माझा मावसभाऊ सुशील, त्याची पत्नी व माझी भावजय माधवी,  अशी आम्ही सर्वांनी ही सफर केली.

सकाळी अकरापर्यंत आम्ही सारे आपापल्या ठिकाणांहून गाड्या घेऊन निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही कॅटरॅक्ट डॅमला पोहचलो. गाड्या पार्क केल्यानंतर आम्ही थोडा फराळ केला आणि डॅमला चालत जाण्यास निघालो. परंतु सुरुवातीलाच एक मनुष्य भेटला आणि त्याने सांगितले की वाटेत एक साप निघाला आहे. तेव्हा तुम्ही चालत जाऊ नका. त्यामुळे आम्ही गाड्या घेऊनच डॅमपर्यंत निघालो.

कॅटरॅक्ट डॅमवरील ही भव्य दगडी कमान केवळ सौंदर्यासाठी नसून, डॅमच्या पाणी-नियंत्रण यंत्रणेचा भाग असलेल्या Valve House ची रचना आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेल्या या इमारतीत कमानीचा वापर भार सुरक्षितपणे पेलण्यासाठी तसेच दीर्घकालीन टिकाऊपणासाठी करण्यात आला. मजबूत दगड, अर्धगोल कमान आणि व्हिक्टोरियन शैलीतील छत यांमुळे ही रचना आजही अभियांत्रिकी आणि वास्तुकलेचा सुंदर संगम दर्शवते.
कॅटरॅक्ट डॅमवरील हे माहिती फलक केवळ मार्गदर्शनासाठी नसून, २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या  सिडनीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत. एका फलकावर डॅमची तांत्रिक माहिती दिली आहे, तर दुसऱ्या फलकावर संपूर्ण Sydney Water Supply System चा नकाशा दाखवण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगातील माहितीफलकांचे हे दगडी पूर्वज मानता येतील.

Cataract dam-whereabouts
(Map created using AI (illustrative purpose only)

पत्ता:
Baden Powell Drive, Appin NSW 2560, Australia 

🚗 ३) कसे जावे
📌 सिडनी ➜ Cataract Dam
सिडनीपासून Hume Highway (M31) ने दक्षिणेला चला. 
त्यानंतर Campbelltown exit घ्या आणि Appin Road वर पुढे चला. 
Appin पर्यंत आल्यानंतर Bulli-Wollongong Road ने डावे वळा आणि तेथून डॅमच्या दिशेने वाट डावीकडे मिळेल (signposted). 
🚗 सुमारे १.५ ते २ तासांचा ड्राईव्ह सिडनीपासून.
©Dr Hemant Junnarkar
All rights reserved